वैयक्तिकरित्या प्रवास करण्याची अनेक कारणे असू शकतात. काही पर्यटकांना सर्वात लक्झुरियस हॉलिडे हवा असतो तर काही लोकांना स्वत:हून फिरून त्या ठिकाणचे खाद्यपदार्थ चाखत, शहरातल्या कानाकोपर्यात लपलेले खजिने शोधून काढायचे असतात. असाच एकदा मी माझ्या मैत्रिणीबरोबर कस्टमाईज्ड सेल्फ ड्राईव्ह हॉलिडे निवडला होता स्लोव्हेनिया, क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रो बघण्यासाठी. आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडे टीमने ह्या हॉलिडेचे आम्हाला हवे तसे नियोजन करून दिले होते
किती सुंदर आहे ही जागा. आपण इथे थोडावेळ थांबून पोहूया का? माझ्या मैत्रिणीने विचारताच मी आमची गाडी पार्किंगमध्ये लावली. स्वच्छ सूर्यप्रकाशात एड्रियाटिक समुद्राचे पाणी चमकत होते. त्या आरसपाणी पाण्यातून तो स्वच्छ वाळूचा तळ लख्खं दिसत होता. थंड वारा वाहत होता आणि अतिशय प्रसन्न वाटत होतं. मॉन्टेनेग्रो ते क्रोएशियाच्या समुद्रकिनार्यावर त्या सुंदर दिवशी आम्हाला ती जागा खूपच आवडली. खरेतर त्या जागेचे नावसुद्धा आम्हाला माहीत नव्हते, ते आम्ही गूगल मॅपवर बघितले. तसा आजचा दिवस पूर्णपणे मोकळा होता कारण पुढच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यावर कुठल्याच स्थलदर्शनाचं आयोजन केलं नव्हतं, त्यामुळे इथे थांबायला काहीच हरकत नव्हती. त्यात ती जागा इतकी सुंदर होती की त्या स्वच्छ पाण्यात पोहण्याचा मोह आम्हाला आवरेना. क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रोमध्ये असे अनेक बीचेस् दिसतात. तिथे उन्हाळ्यात सनबाथिंग आणि पोहण्याचा आनंद घेताना टूरिस्टसोबतच लोकल्सही तितक्याच प्रमाणात दिसतात. क्रोएशियाच्या समुद्रात डुंबून आम्हीसुद्धा त्या लोकल लोकांप्रमाणे जगण्याचा आनंद घेतला.
स्वत: गाडी चालवत स्लोव्हेनिया, क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रो बघण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीबरोबर एक कस्टमाईज्ड सेल्फ ड्राईव्ह हॉलिडे निवडला होता. ग्रुप टूरबरोबर न जाता आम्ही वैयक्तिकरित्या प्रवास करत आमच्या हॉलिडेवर निघालो होतो. आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडे टीमने आमच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आमच्या मनासारखा सहल कार्यक्रम आखून आमच्या प्रवासाचे संपूर्ण नियोजन केले होते.
वैयक्तिकरित्या प्रवास करण्याची अनेक कारणे असू शकतात. काही पर्यटकांना सर्वात लक्झुरियस हॉलिडे हवा असतो तर काही लोकांना स्वत:हून फिरून त्या ठिकाणचे खाद्यपदार्थ चाखत, शहरातल्या कानाकोपर्यात लपलेले खजिने शोधून काढायचे असतात. अगदी दुकानात रेेडिमेड कपडे न विकत घेता आपल्या मापाप्रमाणे जसे आपण आपली लांबी, उंची इ.चे माप देऊन टेलरकडून आपले कपडे शिवून घेतो तसेच टेलरमेड किंवा आपल्या आवडीनुसार आपला हॉलिडे आपण कस्टमाईज्ड करून घेऊ शकतो. अर्थात त्यासाठी आमच्या टीमला सर्वप्रथम तुमच्या आवडी-निवडीची पूर्ण ओळख करून दिली पाहिजे.
आता बघा नं, जगातल्या एका सर्वात रोमँटिक शहराला म्हणजेच पॅरिसला भेट द्यायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारे दोन-तीन रात्रींचे वास्तव्य करत आपण हॉलिडे प्लॅन करू शकता. पॅरिस आणि पॅरिस सभोवतालचा परिसर बघायचा असेल तर तीन काय सात रात्रीसुद्धा पुरणार नाहीत. आपण जर आपल्या मुलांना घेऊन पॅरिसला भेट देणार असाल तर एक संपूर्ण दिवस युरो डिस्नीमध्ये नक्कीच लागेल. तसे पॅरिसमध्ये डिस्नीलँड पॅरिसचे दोन पार्क आहेत, डिस्नीलँड थीम पार्क आणि वॉल्ट डिस्नी स्टुडिओज् पार्क. या दोन्ही पार्क्सना भेट द्यायची असेल तर पार्कमधल्या हॉटेलमध्ये राहणे योग्य ठरेल. इथे डिनर किंवा ब्रेकफास्टला मिकी माऊस व इतर डिस्नी पात्रांना भेटण्याची उत्तम संधीसुद्धा मिळते. पॅरिसजवळच लहानांच्या आवडीचा अजून एक प्रसिद्ध थीम पार्क आहेे, तो म्हणजे पार्क अॅस्टेरिक्स. आता थीम पार्कमध्येच तीन दिवस मजा केल्यावर पॅरिस शहर बघण्यासाठी केवळ दोन - तीन दिवसांचा हॉलिडे कसा पुरेल बरं. आपण जर पॅरिस शहराची शान म्हणजेच आयफेल टॉवरला भेट देत असाल आणि हनिमून किंवा एक रोमँटिक हॉलिडे घेत असाल तर केवळ आयफेलला भेट देण्यापेक्षा तिथल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये पॅरिसचा पॅनोरॅमिक नजारा बघत लंच किंवा डिनरचा आस्वाद घेणे आपल्याला नक्कीच जास्त आवडेल, नाही का? अगदी पर्यटकांच्या गर्दीपासून लांब रहायचे असेल तर स्किप द लाईन असे खास तिकीटसुद्धा आपण घेऊ शकता. आपल्यातल्या उत्सुक व चिकित्सक मंडळींना आम्ही बिहाइन्ड द सीन्स आयफेल टूर नक्कीच सुचवू. आपल्या गाईडबरोबर आयफेल टॉवरच्या इंजीन रूममध्ये जाऊन इथले एलीवेटर्स कसे काम करतात इथपासून ते त्या जमिनीखाली लपलेल्या एका बंकर रूमला भेट देण्यापर्यंत अर्थातच आयफेल टॉवरवरून दिसणार्या नजार्याची मजा लुटत आपण आपली आयफेल टॉवरची टूर करू शकता. थोडक्यात काय शहर किंवा स्थलदर्शन तेच असले तरीही त्या टूरला आपण अनेक प्रकारे कस्टमाईज्ड करू शकतो.
कस्टमाईज्ड हॉलिडेज्मध्ये जसे स्थलदर्शनात आपल्याला अनेक पर्याय निवडता येतात तसेच वास्तव्यासाठी देखील आपण अनेक पर्याय निवडू शकता. आपण जर ट्रेन, बस असे लोकल ट्रान्सपोर्ट वापरणार असाल तर नक्कीच सिटी सेंटर हॉटेल्स योग्य ठरतील. मग आपण स्थलदर्शनाची टूर संपल्यानंतरसुद्धा आपल्या मनाप्रमाणे फेरफटका मारू शकतो व लोकल मार्केट, लोकल फूड, शॉपिंग या सर्वांची पुरेपूर मजा घेऊ शकतो. आपले बजेट कळले की योग्य ते 3स्टार, 4स्टार किंवा 5स्टार हॉटेल आम्ही सुचवतो. काही पर्यटकांना पारंपरिक हॉटेल्स आवडतात तर काही मंडळींना अगदी मॉडर्न हॉटेल्स आवडतात. जगात बर्याच ठिकाणी शहराच्याजवळ एक - दोन तासांवर अनेक सुंदर रीसॉर्ट्समध्येही आपण राहू शकता. मात्र इथे राहणार असाल तर सोबत गाडी आणि ड्राईव्हर हवा किंवा स्वतःतरी गाडी चालवायला हवी. भारतात तर सगळीकडे कस्टमाईज्ड हॉलिडेवर आपल्याला आपली प्रायव्हेट गाडी व ड्राईव्हर हा सहलखर्चात समाविष्ट असतोच. परदेशात फिरताना आपल्याला ट्रेन, बस, प्रायव्हेट शोफर ड्रिव्हन कार, किंवा जगातल्या इतर पर्यटकांबरोबर मिळून - मिसळून शेअर्ड कोच ट्रान्सफर किंवा टूरमध्ये सहभागी होता येते.
आपल्या मनासारखा हॉलिडे करण्यासाठी आज जगभरात आपण अनेक प्रकारच्या हॉटेल्स आणि रीसॉर्ट्सची निवड करू शकता. जमल्यास आपल्या हॉलिडेचे शेवटचे एक-दोन दिवसांचे वास्तव्य हे नेहमी एखाद्या रीसॉर्टमध्ये करा. इथल्या अनेक सुविधांनी आपल्या हॉलिडेचा क्षीण तसंच रोजच्या कामाचा ताणतणाव अगदी आरामात दूर होईल आणि अगदी ताजेतवाने होऊन आपण घरी परत जाल. अनेक रीसॉर्ट्स हे स्पा ट्रीटमेन्ट्ससाठी प्रसिद्ध आहेत. स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, आईसलँड, जपानसारख्या अनेक ठिकाणी तर नैसर्गिक गरम पाण्याच्या थर्मल स्पाज्भोवती रीसॉर्टस् बांधले आहेत. बालीला भेट देत असाल तर नक्कीच पूल व्हिलामध्ये राहून पहा. रोमँटिक हॉलिडे असो किंवा फॅमिली ब्रेक, आपल्या रूमलाच लागून असलेल्या पूलमध्ये डुंबायची मजा काही औरच असते. जर तुम्हाला पूल व्हिलाचा हा पूल लहान वाटत असेल तर मालदीवसारख्या ठिकाणी वॉटर व्हिलाजमध्ये राहून पहा. थेट रूममधूनच समुद्रात उतरण्याची सोय इथे असल्याने संपूर्ण समुद्रच आपले स्विमिंग पूल ठरते.
अनेकवेळा आपल्याला ग्रुप टूरच्या सोईंचा, टूर मॅनेजरच्या नियोजनाचा व इतर पर्यटकांबरोबर फिरण्याचा आनंद हवा असतो पण त्याचबरोबर थोडासा विसावासुद्दा हवा असतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन वीणा वर्ल्डने ग्रुप टूर संपल्यानंतर आपल्यासाठी आणले आहेत पोस्ट टूर हॉलिडे. काही लोकप्रिय ठिकाणी ग्रुप टूरनंतर आपण पोस्ट टूर हॉलिडेची निवड करून गु्रप आणि कस्टमाईज्ड अशा दोन्ही टूरचा आनंद घेऊ शकता.
आता थोडं ग्रुप टूर आणि कस्टमाईज्ड हालिडेतलाही फरक लक्षात घेतलात तर सगळ आणखीन सोप्पं होईल हे सांगण्याच कारण एवढच की जर आपण इंडिव्हिज्युअली जाणार्या कॅटॅगरीतले असाल आणि चुकून जर तुमचा राँग नंबर ग्रुप टूरला लागला तर त्याचा त्रास तुमच्यासोबत बाकीच्या ग्रुपलाही होणार. म्हणून काय बुक करायचं त्याची सल्लामसलत घरी सर्वांसोबत डीनर टेबलवर करावी आणि टूर की हॉलिडे हे ठरवून बुकिंग करावं. टूर आणि हॉलिडेमधला आणखी एक फरक सांगते म्हणजे ठरवायला सोप्पं जाईल. ग्रुप टूर्स ह्या आधीच ठरवलेल्या असतात. दिवस, तारखा, कार्यक्रम, प्रवास, भोजन, वास्तव्य ह्या सर्व गोष्टी आखलेल्या असतात. प्रत्येक सहलीच्या तारखा आणि कार्यक्रम वेबसाईटवर दिलेला असतो त्यातून आपण आपल्या सवडीनुसार सहल ठरवायची असते. हॉलिडे पॅकेज मात्र आपल्याला हवं तसं फक्त आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या तारखेप्रमाणे, आपल्या बजेटप्रमाणे आम्ही आपल्याला तयार करून देत असतो. ग्रुप टूरला टूर मॅनेजर सतत सोबत असतो पण इथे इंडिपेन्डन्ट हॉलिडेमध्ये तुम्हाला संपूर्ण प्लॅनिंग करून दिलं जातं आणि व्हर्च्युअली आमची टीम मुंबईहून तुमच्या संपर्कात राहते, हॉलिडेवर तुमचे तुम्ही असता, कम्प्लिट प्रायव्हसी. टूर म्हणजे जास्तीत जास्त बघा आणि बघून बघून दमून जा तर हॉलिडे म्हणजे आराम करा, अॅडव्हेंचरस असं काही करा, वेगवेगळे एक्सपीरियन्सेस घ्या, वेगवेगळ्या भोजनांचा आस्वाद घ्या... वगैरे वगैरे, थोडक्यात रिज्युविनेट व्हा. आणखी एक महत्त्वाचं सांगायच म्हणजे तुमचा जर स्वतःचा खाजगी ग्रुप असेल तर तुम्हाला आम्ही टूर मॅनेजरसुद्धा देऊ शकतो. याबाबतीत नुकतच घडलेलं एक उदाहरण द्यायचं झालं तर कोस्टारिकावरून भारत फिरण्यासाठी आलेल्या इग्नेशियो भावंडांनी केवळ दोनच जणं असूनही टूर मॅनेजर घेण्याची पसंती दाखवली. मग वाट कसली बघायची? चला तर अनुभवा, आपल्या मनासारखा हॉलिडे-हवा तेव्हा हवा तसा!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.