आज आयुष्य जगून घेऊया, उद्या कुणी बघितलाय? ही धारणा आहे आजच्या पिढीची आणि ते चांगलही आहे. आईवडिलांनी आमच्यासाठी खूप काही करून ठेवायला पाहिजे ही डीमांड आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात कमी व्हायला लागलीय. आम्ही आमचं बघून घेऊ, आईबाबा तुम्ही आमची चिंता करू नका, आयुष्य आनंदात जगा ही भावना वाढायला लागलीय. पण आत्ता जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या तरुणपणी असं नव्हतं. सर्वांसाठी आयुष्य वेचता वेचता आपण स्वतः सीनियर कधी झालो हे त्यांना कळलंच नाही...
पैशाने सुख विकत घेता येत नाही पण पैशाने आनंद मात्र निश्चित विकत घेता येतो. आम्ही आहोत नं त्याच व्यवसायात, आणि आम्ही हा व्यवसाय आनंदाचा असला तरी तो गंभीरपणे-एकदम सीरियसली करतोय. अनेक नवसंकल्पनांची रुजवात आम्ही पर्यटनक्षेत्रात त्यामुळेच करू शकलो. त्यातली आमची आवडती संकल्पना जी पर्यटकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली ती म्हणजे सीनियर्स स्पेशल. रीटायर्ड बट नॉट टायर्ड, टोटली यंग अॅट हार्ट अशा आयुष्याच्या सुवर्णकाळात प्रवेश करणार्या ज्येष्ठ मंडळींच्या ह्या श्रेष्ठ सहली, देशविदेशातल्या. सप्तखंडांमधल्या पर्यटनस्थळांवर आय हॅव बीन देअर, डन दॅटची विजयी मोहोर उठविणार्या आमच्या ह्या सीनियर मंडळींच्या मागणीस्तव साउथ अमेरिका, अंटार्क्टिका आणि लेह-लडाखच्या सीनियर्स स्पेशल सहलींचही आयोजन ह्या येत्या दोन वर्षात आम्ही करतोय.
महाराष्ट्रातून नुसतं दिल्लीपर्यंत जायचं म्हटलं की आमच्या ह्या सीनियर मंडळींच्या घरची काळजीवाहू ज्युनियर मंडळी लागलीच डोकं वर काढणार. तुम्हाला झेपेल का?, सगळी कामं घरबसल्या करता येतात की तुम्हाला पर्सनली जायची काय गरज आहे, उगाच कशाला स्वतःला त्रास करुन घेताय?, अगं तू कशाला करतेस, माणसं आहेत नं करायला, उगाच पडली बिडलीस तर... हे आमच्याच नव्हे तर ज्या ज्या भाग्यवान घरात ज्येष्ठ मंडळी आहेत तिथे ही डायलॉगबाजी सुरूच असते. आपल्याला कदाचित जोपर्यंत आपण तेवढे ज्येष्ठ होत नाहीत तोपर्यंत कळतच नाही की त्यांना बाहेर पडायचं आहे, त्यांना पूर्वीसारखंच हिंडा-फिरायचं आहे, वय झालं- शरीर थकलं पण मन अजून तिशीच्याच उंबरठ्यावर आहे त्याचं काय? समाजात अनेक ठिकाणी दिसणारं हे एक चॅलेंज. आमच्या बिझनेस माईंडने ते अचूक टिपलं. ज्येष्ठ मंडळींना जग बघायचं आहे पण मनात कुठेतरी थोडीशी अंधुकशी धास्तीही आहे की, जमेल नं आपल्याला?, झेपेल नं मला? घरातल्या मंडळींनाही काळजी आहेच दाखवत नसले तरी. ह्या ठिकाणी आम्ही कुटुंबांच्या ह्या थोड्याशा चिंतीत चित्रात प्रवेेशकर्ते झालो मैं हूँ ना! म्हणत. तिथेच जन्म झाला सीनियर्स स्पेशलचा. तेव्हापासून आजपर्यंत आमचे टूर मॅनेजर्स आणि संपूर्ण वीणा वर्ल्ड टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करताहेत, आनंदाने ज्येष्ठ मंडळींना त्यांच्या दिमतीला राहून जग दाखवताहेत. गेल्या सहा वर्षांत हजारो सीनियर्स- ज्येष्ठ मंडळींनी वीणा वर्ल्डच्या माध्यमातून नॉर्थ ईस्ट अरुणाचल आसामपासून राजस्थान गुजरात करीत केरळ अंदमानपर्यंत आणि परदेशात थायलंड मॉरिशसपासून युरोप अमेरिका अगदी स्कॅन्डिनेव्हीया रशियापर्यंतचं जग पालथं घातलं. आमच्या टूर मॅनेजर्सना आणि आम्हा सर्वांसाठी सीनियर्स स्पेशलची सहल आशीर्वाद स्पेशल बनून जाते, सहल संपताना एवढे खंडीभर आशीर्वाद जे मिळतात समाधानी-आनंदी अशा ज्येष्ठ पर्यटक मंडळींकडून. आमचा उत्साह सतत द्विगुणित होत राहण्याचं एक कारण हे ज्येष्ठांचे आशीर्वाद असावेत.
सीनियर्सची सर्वात जास्त डीमांड कोणत्या सहलींना असेल तर ती भारतात राजस्थान-केरळला आणि परदेशात युरोप-अमेरिकेला. राजस्थान केरळच्या सहली दिवाळीनंतर असतात तर युरोप अमेरिकेच्या आत्ताच्या सीझनमध्ये, युरोप अमेरिकेची थंडी कमी झाल्यावर. सुट्टीचा माहोल संपल्यावर जून अखेरीस, त्यानंतर पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आणि गणपतीनंतर अशा तीन वेळा सीनियर्ससाठी आम्ही युरोप अमेरिकेच्या सहली आयोजित केल्या आहेत. आत्तापर्यंत ह्या वेगवेगळ्या सहलींना तीनशेहून अधिक पर्यटकांनी बुकिंग केलंय, बहुतेक मंडळींची व्हिसा प्रोेसेस सुरूही झालीय. कॉन्स्युलेटमधली गर्दी वाढायला लागलीय तेव्हा आणखी उशीर त्रासदायक ठरू शकतो.
आता युरोपच्या सहलींविषयी थोडक्यात जाणूया. ह्या सहलीत मुंबई ते युरोप व युरोप ते मुंबई हा विमानप्रवास असतो. एअरलाईनच्या संबंधित देशात जाता येता एक ट्रान्झिट हॉल्ट घेऊन तो केला जातो. युरोपमधला एका देशातून दुसर्या देशात जाण्याचा प्रवास व स्थलदर्शन आपण एअरकंडिशन्ड लक्झरी कोचने करतो. सहलीत लंडन असेल तर युके ते युरोपमधील फ्रान्स-पॅरिसचा प्रवास आपण युरोस्टारने करतो, इंग्लिश चॅनलच्या खालून. माऊंट टिटलिस केबल कार, लुसर्न क्रुझ, सीन रिव्हर क्रुझ अशा छोट्या प्रवासाचे आगळेवेगळे अनुभवही आपण ह्या प्रवासात घेणार आहोत. सहल काळातील आपले वास्तव्य चांगल्या हॉटेल्समध्ये असतं. आत्तापर्यंतच्या पर्यटकांना आवडलेली ही हॉटेल्स हॉलिडे इन एक्सप्रेस, इबीस स्टाईल नोव्होटेलसारख्या चेन हॉटेल्समधली असतात किंवा काही ठिकाणी आम्ही त्या-त्या देशाच्या चांगल्या लोकल ब्रँडची हॉटेल्सही वापरतो. युरोपमध्ये आम्ही जास्तीत जास्त संख्येने भारतीय पर्यटक नेण्यामध्ये अग्रेसर असल्याने बहुतेक सर्वच ठिकाणी आता भारतीय भोजनाची चांगली सोय झाली आहे. मधून कधीतरी चेंज म्हणून युरोपीयन कॉन्टिनेंटल- इटालियन किंवा अमेरिकन फास्ट फूडचा तडकाही दिला जातो. सर्वत्र ब्रेकफास्ट- लंच- डिनर आयोजित केलं जातं. ब्रेकफास्ट कॉन्टिनेंटल स्वरुपाचा असतो व काही ठिकाणी भारतीय ब्रेकफास्ट डिशेस देण्याचाही आमचा प्रयत्न असतो. युरोप स्थलदर्शनाच्या बाबतीत अद्वितीय आहे ह्यात वाद नाही. म्हणून तर जगभरातून सर्वात जास्त पर्यटक कोणत्या खंडाला भेट देत असतील तर ती युरोप खंडाला. शाळेपासून वाचत-ऐकत आणि आता वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपल्याला सतत आकर्षित करणारी अनेक स्थळं आपण ह्या सहलीत बघतो. सहलीच्या शेवटी तुमचे पाय दमणार आहेत, डोळे दीपणार आहेत आणि अप्रतिम अलौकिक-अफलातून आठवणी घेऊन तृप्त होऊन तुम्ही मायदेशी परतणार आहात ह्याची खात्री आहे.
युरोपमधल्या प्रत्येक देशाची भाषा वेगळी, इंग्लिश सर्वांनाच कळतं असं नाही. काही देशांमध्ये इंग्लिशला मज्जावही आहे. प्रत्येक देशाची संस्कृतीही वेगळी तसंच तिथलं भोजनही. एकट्या दुकट्याने बिनधास्त फिरण्यासारखा हा खंड नाही आणि म्हणूनच युरोपमध्ये जगातल्या सर्वच देशांतून ग्रुप टूर्सद्वारे येणार्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. अधिक अप्रतिम असलेल्या हया सहलीची रंगत वाढते ती वीणा वर्ल्डच्या नावाजलेल्या पर्यटकांनी गौरविलेल्या टूर मॅनेजर्समुळे. प्रोफेशनल असूनही मोस्ट केअरिंग, सर्वांना सांभाळून घेणारे आणि सर्वांच्या दिमतीला असलेले टूर मॅनेजर्स म्हणून वीणा वर्ल्डच्या मै हूँ ना। टूर मॅनेजर्सची वाहवा केली जाते ज्याचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे. तुम्ही भारतातील कोणत्याही प्रांतातले असा किंवा अनिवासी भारतीय असा, तुमची मातृभाषा कोणतीही असो,तुम्हाला इंग्लिश येत असो वा नसो, तुम्ही फ्रीक्वेन्ट ट्रॅव्हलर असा, वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर तुमची सहल झक्कास करणार ह्यात वाद नाही. तुम्ही कम्फर्टेबली टूर करणं हे सर्वात महत्त्वाचं. युरोपमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वीणा वर्ल्डचे प्रवासी आणि त्यांच्या दिमतीला असणारे टूर मॅनेजर्स नजरेस पडतील. जसे तुमच्या दिमतीला टूर मॅनेजर्स असतात तसंच टूर मॅनेजर्सच्या दिमतीला वीणा वर्ल्डची सहाशे जणांची टीम 24/7 असते. मार्गात एखादी अडचण उद्भवली तर लागलीच त्यावर तोडगा काढणं हे सर्वांचं उद्दिष्ट असतं. टीम स्ट्रेंथ हे वीणा वर्ल्डचं वैशि ज्याचा पर्यटकांनी अनुभव घेतलाय.
एकदा तुम्ही सहलीला जायचं ठरवलं, मेगा डिस्काउंट- जंबो डिस्काउंट-स्पेशल ऑफर लॉयल गेस्ट डिस्काउंट अशा अनेक सवलतींचा लाभ घेऊन बुकिंग केलंत की आमची जबाबदारी सुरू होते. व्हिसा कसा करायचा? त्यासाठी काय कागदपत्र लागतात? इंटरव्ह्युला जावं लागतं का? फॉरिन एक्सचेंज कसं घ्यायचं? सहलीची तयारी कशी करायची? ह्याची संपूर्ण माहिती वीणा वर्ल्डकडून तुम्हाला वेळोवेळी दिली जाते. त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. दरवर्षी आम्ही पंधरा हजारंाहून अधिक प्रवासी युरोपला घेऊन जातो. त्यातील 99.99% पर्यटकांना व्हिसा मिळतो, चिंता नको.
सहलीला येताना तुम्हाला सोबत आणायचंय एक उत्साही मन आणि आनंदी चित्त. बाकी मग आमच्यावर सोपवायचं. तुमच्या पैशाचा पूर्ण मोबदला द्यायचं बंधन आम्हीच आमच्यावर घालून घेतलंय आणि म्हणूनच आत्मविश्वासाने आम्ही म्हणू शकतो, चलो, बॅग भरो, निकल पडो! ह्यावर्षी युरोप अमेरिकेला, वीणा वर्ल्डसोबत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.