हातातून गेलेली किंवा घालवलेली वेळ अगदी ब्रह्मदेव जरी आला तरी आपण मिळवू शकत नाही. ह्यात नवीन असं काही मी सांगत नाहीये. अनादी काळापासून आपले संत-महात्मे आणि बुजूर्ग आपल्या कानीकपाळी ओरडून सांगताहेत पण तरीही आपण तेवढ्याच सातत्याने वेळ घालवत राहतो. येणार्या युगात असा वेळ घालवणं आपल्या कोणालाच परवडणारं नाही, ते हानिकारक ठरणार आहे, वेळ कसा वाया जाऊ द्यायचा नाही ह्याचा विचार करताना एक साधं सोप्पं उत्तर मिळालं...
मागच्या आठवड्यात जगाला प्रदक्षिणा घातल्यासारखा प्रवास केला. एका आठवड्यात लेह लडाख, बँकॉक, दिल्ली आणि सॅनफ्रान्सिस्को. तीन रात्री लेह, बँकॉक, सॅनफ्रान्सिस्कोच्या हॉटेल्समध्ये आणि चार रात्री विमानप्रवासात होते. नाही म्हटलं तरी पोटात खड्डा पडला होता. लेहची ऑक्सिजन लेवल, बँकॉक-दिल्ली-सॅनफ्रान्सिस्कोमधला अपसाईड डाऊन करणारा हमखास जेट लॅग लागणारा टाईम डिफरन्स, मोठ्या विमान प्रवासांमुळे येणारा क्षीण आणि हे असूनही ह्याची कोणतीही निशाणी चेहर्यावर दिसू न देता उत्साही मनाने तिथल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं ही तारेवरची कसरतच होती. पण ह्या आठवड्यात असं हे जाणं ही कमिटमेंट होती त्यामुळे मला कंटाळा आलाय, आता नाही मी जात असं म्हणण्याचीही सोय नव्हती. आयुष्यात अपरिहार्य अशा अनेक गोष्टींना आपल्या सर्वांनाच सामोरं जावं लागतं. आमच्या बाबतीत जगाला प्रदक्षिणा घालणारे मोठे प्रवास हे न टाळता येण्यासारखे. ट्रेनचा किंवा विमानाचा कोणताही क्लास असो किंवा कारची कोणतीही कॅटॅगरी, अमुक एका वेळेनंतर कंटाळा येतोच. आणि इथेच आपला कस लागतो. कंटाळा न येता ह्या प्रवासांना कसं सामोरं जायचं? कंटाळ्याचं रुपांतर आनंदात कसं करायचं? आणि त्याहीपुढे जाऊन त्या प्रवासात एखादा बरेच दिवस रखडलेला-बाजूला पडलेला प्रोजेक्ट पूर्ण करून आत्मिक समाधान कसं मिळवायचं? हे मी ह्या प्रवासात शिकले, अर्थात अनेक मोठे प्रवास कंटाळा येण्यात वाया घालविल्यानंतर उशिरा सूचलेलं हे शहाणपण आहे. पण त्याने खूप फायदा होतोय. सिडनी, सॅनफ्रान्सिस्को, न्यूयॉर्क, लंडन, मॉस्को अशा मोठ्या प्रवासांमध्ये खूप प्रोजेक्टस पूर्ण केलेयत आणि हुश्यsss म्हणून स्वत:चीच पाठ थोपटलीय. म्हणूनच माझ्यासारख्या कामानिमित्त भरपूर प्रवास करणार्यांसोबत ह्या अनुभवांचं शेअरिंग.
जगभरात कुठेही गेले आणि कितीही दिवसांसाठी गेले तरी मी मोठी कार्गो बॅग न घेता छोटी फोर व्हिलर बॅग व त्यावर चपखल बसेल अशी मध्यम आकाराची पर्स कम टोट बॅग घेते. त्यामुळे मोठी बॅग ओढण्याचं, पर्स खांद्यावर घेण्याचं, भरपूर वस्तू आणि सामान असल्याने रूममध्ये पसारा होण्याचं-आवरा आवरीचं कसलंच टेंशन येत नाही. जेवढ्यास तेवढ्या गरजेपुरत्या लागणार्या वस्तू. ह्यामुळे फिजिकल स्ट्रेस तर येतच नाही पण मनानेही आपण मोकळे राहतो. बरं एवढं कमी सामान असलं तरी त्यात भरपूर गाणी, सिनेमे, वेब सीरीज लोड केलेला आयफोन, बोसचे नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स, एक्सप्रेस स्पा ची छोटीशी घडी होणारी नेक पिलो, आयमास्क आणि एक पुस्तक हे दागिने माझ्यासोबत असतातच. कुठे फ्लाइट लेट झालं, कॅन्सल झालं, दुसर्याच कुठल्यातरी एअरपोर्टवर उतरवलं... हू केअर्स? आय अॅम फुल्ली लोडेड विथ माय ओन एंटरटेन्मेंट. आणि एंटरटेन्मेंटचा कंटाळा आला तर एखादा प्रोजेक्ट असतोच ज्यावर कोणत्याही डिस्टर्बन्सशिवाय काम करता येतं. आणि हो, असं अगदी कामच केलं पाहिजे प्रवासात असं काही नाही बरं का. आपल्याला मशिन बनायचं नाहीये. आयुष्याच्या धकाधकीत आपल्याला आपल्यातलं माणूस जागृत ठेवायचंय, कितीही वय झालं तरी मनाने-उत्साहाने तरुणाईतच रहायचंय त्यामुळे एखाद्यावेळी ठरवलेली गोष्ट नाही होऊ शकली तर आपल्याला आपणच माफही करायचंय. प्रवासाला निघताना शारीरिकरित्या दमलेलो असू तर बाकी सबको मारो गोली म्हणत डोळ्याला मास्क लावून, गळ्याला नेक पिलो लावून सरळ ताणून द्यायची. दररोज किमान सहा तास झोप मस्ट. सात वा आठ तास मिळवता आली तर नथिंग लाईक इट. शांत चित्ताने झोप घेता आली पाहिजे, ते टेक्निक आपल्याला जमलंच पाहिजे. कधी जर वाटलं की ह्या प्रवासात मला कोणतंही काम करायचं नाहीये तर तेसुद्धा परफेक्टली ऑल राईट. माईंड फ्रेम जर एखाद्या प्रोजेक्टवर काम करण्याची नसेल तर ओढून ताणून हाफ हार्टेडली ते करायलाही जाऊ नये. अशावेळी एखाद्या फ्लाइटमध्ये मी चार पाच सिनेमेही एकापाठोपाठ सलग पाहिले आहेत. येणार्या प्रवासात काय काय करायचं ह्या गोष्टींची इतकी मोठी लिस्ट माझ्याकडे असते की प्रवासाला निघताना आणि प्रवास संपल्यावर दोन्ही वेळचा उत्साह तेवढाच असतो. प्रवासाने दमायला झालंय असं होतच नाही कधी. तसं होऊनही चालणार नाही कारण प्रवास हेच तर आमचं वीणा वर्ल्ड टीमचं आयुष्य आहे.
या आठ दिवसांच्या प्रवासात मी एक पेंडींग प्रोजेक्ट पुढच्या पायरीवर नेऊन ठेवला. या आठवड्याची वेगवेगळ्या वृत्तपत्रांची तीन आर्टिकल्स लिहायची होती तीही सॅनफ्रान्सिस्को-मुंबई प्रवासात लिहिली. आणि मी आणखी आनंदी झाले. एकतर प्रोजेक्ट पुढे नेला त्यामुळे मानसिक शांती तर मिळालीच पण अचिव्हमेंटचं समाधान उल्हासित करून गेलं. वृत्तपत्रांसाठी काय लिहू हे त्यांच्या त्यांच्या टाईमलाईनप्रमाणे ह्या आठवड्यात रोज येणारं टेंशन गायबच झालं. म्हणजे हा पूर्ण आठवडा मी दुसर्या कोणत्यातरी कामावर अधिक लक्ष देऊ शकणार होते. सो, ह्या प्रवासाने मला भरपूर फायदा मिळवून दिला. एअर तिकिटाचे पैसे पूर्ण वसूल. हाहाहा!
एक मात्र सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे की येणार्या भविष्यात जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर आपल्याला मेंटली, फिजिकली, इमोशनली, सोशली आणि फायनान्शियली सांऊड राहता आलं पाहिजे. आपल्याला मिळणारा वेळ कमी कमी होत जाणार आहे, त्या कमी वेळात दुपटीने वा तिपटीने कामं करावी लागणार आहेत. इलाज नाहीये कारण येणारी परिस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, पण त्यासाठी स्वत:ला तयार करणं हे काम आपलं आपल्यालाच करायचंय. इथेच महत्त्वाची आहे ती, माय कमिटमेंट विथ टाईम आता यापुढे आपली लढाई आहे ती वेळेशी, आयुष्याप्रमाणेच ती गोष्ट एकदा गेली की परत आणता येणार नाहीये. इथे लढाई म्हणण्याचं कारण आहे आत्तापर्यंत आपल्या हातातून निसटून गेलेल्या किंवा जाणार्या वेळेची आपण कधी पर्वाच केली नाही. लक्ष्मीची उधळपट्टी केल्यावर जशी लक्ष्मी थांबत नाही तसंच आपण वेळेचीही कळत नकळत अतोनात उधळपट्टी केलीय आणि म्हणूनच वेळ आपल्याजवळ थांबत नाहीये. त्या जाणार्या वेळेला पुन्हा आपल्याकडे खेचून आणायचं म्हणजे स्वत:च स्वत:शी लढायचं. आपल्याला लागलेल्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल करायचा. आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्व त्या वेळेला द्यायचं. मनापासून प्रयत्न केले तर मग वेळ नक्कीच आपला मित्र बनून आपल्या वाटचालीत सहभागी होईल. थोडक्यात तुमच्या-आमच्या, माझ्या-तुझ्या, स्वत:च्या-दुसर्यांच्या... वेळेची कदर केली तर वेळच वेळ आपल्याला उपलब्ध होईल.
आमचे टूर मॅनेजर्स फॅमिली टूरवर असताना पर्यटकांना दुसर्या दिवशीचा कार्यक्रम सांगताना नेहमी म्हणतात की, आपल्याला सकाळी इतक्या वाजता निघायचंय, आम्ही मॉर्निंग अलार्म देऊच पण तुम्हीही वेळेत तयार होऊन, वेळीच ब्रेकफास्ट करून पाच-दहा मिनिटं आधीच बसजवळ तयार रहा. उशीर करू नका. वेळेत आलेल्या इतर सर्व पर्यटकांची आपण कदर केली पाहिजे. आपल्यामुळे बस खोळंबणार नाही हे बघावं, कारण आपण ग्रुप टूरमध्ये आलोय, इथे सर्वांच्या सहकार्याने सहल उत्तम पार पडणार आहे. लेट्स कोऑपरेट! वेळ पाळणं म्हणजे इतरांची कदर करणं, दुसर्यांचा विचार करणं आणि हेच उत्तर आहे येणार्या भविष्यकाळाला जर यशस्वीपणे तोंड द्यायचं असेल तर. म्हणजे बघानं ग्रुपमध्ये एक पर्यटक जरी उशिरा आले तरी आधी आलेल्या चाळीस जणांना ताटकळत रहावं लागतं. (अर्थात हल्ली अशा पर्यटकांसाठी बस थांबवता येत नाही कारण स्थलदर्शनाच्या आणि बसच्या ड्रायव्हिंग अवर्सच्या वेळा पाळाव्या लागतात. ह्या पर्यटकांना मग स्वखर्चाने टॅक्सी करून स्थलदर्शनाच्या ठिकाणी यावं लागतं.) मी जर एखादी गोष्ट किंवा हे आर्टिकल जर ह्या दिवशी लिहून देते म्हटलं आणि ते दिलं नाही तर त्यावर काम करणार्या सर्वांचच वेळापत्रक गडगडतं. ऐनवेळी गोंधळायला होतं. हे टाळायचं असेल तर, आय हॅव टू ऑनर माय कमिटमेंट विथ टाईम. दुसर्याचा विचार केला तर कुणाला दिलेली वेळ किंवा एखाद्या प्रोजेक्टची टाईमलाईन आपण पाळू शकतो, इतकं सोप्प आहे ते. त्याचा बाऊ करायची, त्याचं टेंशन घ्यायची गरजच नाहीये. आमच्या लहानपणी एक खेळ असायचा, चार पाच प्रश्न विचारले जायचे आणि त्याचं एका शब्दात उत्तर द्या असं असायचं, मजा यायची. इथेही तसंच आहे. प्रोजेक्टची टाईमलाईन कशी सांभाळू? वेळेवर घरी कसं जाऊ? वेळेत तयार कसं होऊ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्या गोष्टीशी संलग्न असणार्या इतरांचा विचार केला की आपोआप मिळायला लागतात, आपल्याकडून वेळेत कामं व्हायला लागतात. मी वेळेत माझं काम केलं नाही तर त्यामुळे दुसर्या कुणालातरी त्रास होईल ह्याची जाणीव जेव्हा आपल्याला सतत राहील तेव्हा टाईमलाईन पाळणं ही एक आनंदी गोष्ट होऊन जाईल, तीचं टेंशन येणार नाही.
कमिटमेंट विथ टाईम, टाईमलाईन ह्यावरून आठवलं, वीणा वर्ल्डमध्ये कोणताही प्रोजेक्ट घेतला की पहिली टाईमलाईन ठरवली जाते आणि मग त्यावर रीव्हर्स काम केलं जातं. संदीप शिक्रे अँड असोसिएट्सकडे आमचे घराचे वा ऑफिसेसचे प्रोजेक्ट्स असतात, एसएसएच्या अल्पा शिक्रेंचं म्हणणं, अरे तुमचा प्रोजेक्ट यायच्या आधी टाईमलाईन येते, बट वूई लव्ह इट अँड दॅट वर्क्स. त्यानुसार आमची वेव्हलेंग्थही जमलीय. छोटा प्रोजेक्ट दीड महिना, मीडियम तीन महिने आणि कॉर्पोरेट ऑफिससारखा मोठा असेल तर सहा महिने असे प्रोजेक्ट्स पूर्ण होतात. दोघांनाही ह्याची कल्पना असल्याने डिसिजन्स फटाफट होतात. थोडक्यात एकमेकांचा विचार केल्याने प्रोजेक्ट्सच्या टाईमलाईन्स पाळल्या जातात. प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण होतात. जस्टीस डीलेड इज जस्टीस डीनाईड तसंच आहे इथेही. प्रोजेक्ट डीलेड इज प्रोजेक्ट डीनाईड त्यावर अवलंबित कितीतरी गोष्टींना त्याचा फटका बसतो, संबंधित व्यक्तींना त्रास होतो. हे सगळं टाळायचं असेल तर आधी वेळेशी कमिटमेंट केली पाहिजे आणि नंतर वुई हॅव टू ऑनर दॅट कमिटमेंट विथ टाईम! बाय द वे प्रोजेक्टवरून आठवलं, वीणा वर्ल्डचं मुंबईतलं सेल्स ऑफिस नेटवर्क आम्ही वाढवतोय. लवकरच चर्नीरोड-गिरगांव, माटुंगा पूर्व, चेंबूर, पवई आणि विलेपार्ले पश्चिम येथे वीणा वर्ल्ड सेल्स ऑफिसेस सुरू करून आम्ही तेथील पर्यटकांच्या आणखी जवळ येतोय. नेहमीप्रमाणे हक्काने आपले आशीर्वाद सदिच्छा आणि शुभेच्छा मागून घेतोय.
हॅव अ हॅप्पी संडे! आणि हो, बिंइग अ संडे जस्ट रीलॅक्स अॅट होम... आज कोणतीच टाईमलाईन पाळायची नाही हीच आहे कमिटमेंट विथ टाईम!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.