व्यक्तिमत्त्वात चांगले बदल करणार्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. पण स्वभावाप्रमाणे कधीतरी मला सुधीरशी भांडण करण्याची उर्मी येतेच. माझा भांडणाचा मूड बघून हे महाशय हसत बसतात. अरे कशाला भांडतेय, गुस्सा कशाला? मुलं मोठी झाल्यावर आपणच आहोत एकमेकांसाठी, मग त्यात शब्दांचे बाण आणि त्या जखमा कशाला? लेट्स सॉल्व्ह द प्रॉब्लेम, सगळं काही नीट होईल, बी काल्म!
दर महिन्याला देशविदेशातील भ्रमंती आणि त्यामुळे होणारा पर्यटकांसोबतचा संवाद बदलते कल दाखवून देतो. पस्तीस वर्ष पर्यटनात झोकून दिल्यामुळे खर्या अर्थाने कल-आज-कल सतत डोळ्यासमोर राहिले. त्यात मी हाडाची टूर मॅनेजर. पंधरा वर्ष प्रथम भारतात आणि नंतर परदेशात सहलींसोबत टूर मॅनेजर म्हणून काम केल्यामुळे हजारो पर्यटकांच्या सवयी, आवडी-निवडी, अडी-अडचणी, गरजा,मानसिकता, पर्यटनाकडे बघण्याची दृष्टी ह्या सर्वांचं निरीक्षण करण्याची सवय लागली, नव्हेे छंदच जडला. आपला पर्यटक जेवढा जास्त आपल्याला समजत जाईल तेवढं आणखी काहीतरी नव्याने सुचत जाईल हे उमगत गेलं आणि त्याप्रमाणे कृती होत गेली. अनेक नवनवीन गोष्टी पर्यटनात रूढ करण्यात पर्यटकांशी संवाद, त्यांचं निरीक्षण आणि त्यावरचा अभ्यास ह्याचा फायदा झाला. कामाचं स्वरूप बदललं,आता गेली वीस वर्ष टूर मॅनेजर म्हणून सहलीला जाणं बंद झालं कारण ते करायला हरहुन्नरी तरुण-तरुणींची फौज निर्माण झाली. आज चारशे पन्नास टूर मॅनेजर्स देशविदेशात, अक्षरशः सप्तखंडात वीणा वर्ल्डचा झेंडा डौलाने फडकवताहेत. त्यांच्याशी चोवीस तास जोडलेलो असणं हे सध्याचं अनेक कामातलं एक काम. अर्थात भटकंती केली नाही तर आम्ही स्वस्थ कसे बसणार?त्यामुळे बिझनेस ट्रिप्स,रेकी टूर्स,फॅमिली टूर्स,सीनियर्स स्पेशलच्या ज्येष्ठ पर्यटकांना किंवा वुमन्स स्पेशलच्या सात ते सत्तर वर्षांच्या मुलींना काही सहलींवर भेटायला जाण्याची बांधिलकी ह्यामुळे पर्यटन अखंड सुरू आहे. एक न सुटणारं पण आवडणारं चांगलं व्यसनच जडलंय म्हणायला हरकत नाही.
आपण सर्वच एवढे नशिबवान की आपल्याला इंटरनेटच्या आधीचं आणि इंटरनेटच्या नंतरचं अशा दोन्ही काळात वावरता आलं. पुढच्या पिढ्यांना कदाचित माणसं हाताने काम करायची, डोक्याने विचार करायची, समोरासमोर बसून एकमेकांशी चर्चा करून प्रश्न सोडवायची ह्या गोष्टी आश्चर्यात टाकतील. इंटरनेट क्रांती पूर्वीचं पर्यटन थोडं वेगळं होतं, कधीतरी कालांतराने अंतरा-अंतराने पर्यटन घडायचं. मोजके पर्यटक पर्यटनस्थळी दिसायचे. इंटरनेट नंतर जग इतकं जवळ आलं, पर्यटन सोप्प झालंं की पर्यटकांनाही व्यसन लागलं पर्यटनाचं. अर्थात केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार। शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार॥ ह्या उक्तीनुसार पर्यटनाने व्यक्तिमत्त्व घडतात तसंच दृष्टीकोन व्यापक होतो हे आम्ही अनुभवलंय, अगदी जवळून पाहिलंय. कोणत्याही नको त्या व्यसनांपेक्षा हे खूप चांगलं आहे. माझ्या पर्यटनासाठी जसं मी वेगवेगळे बहाणे शोधत असते तसंच पर्यटन व्यावसायिक म्हणून आमच्या पर्यटकांसाठी पर्यटनाचे वेगवेगळे बहाणे शोधून काढून वीणा वर्ल्ड प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी हे समीकरण दृढ केलं.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुधीर आणि मी दोघांनी मिळून ईस्टर्न युरोपची पंधरा दिवसांची रेकी टूर केली. ईस्टर्न युरोपच्या सहलींची मागणी वाढायला लागल्यावर तिथला कोपरा नं कोपरा आपण बघायला पाहिजे ह्या विचाराने आम्ही निघालो होतो. कित्येक वर्षांनी आम्ही दोघांनी मिळून एवढा मोठा दौरा केला. पंधरा दिवसांत अनेक देश बघायचे असल्याने शेड्युल टाईट होतं पण ती सहल आमच्या ज्युबिली स्पेशलची आठवण देऊन गेली. बरंच जग पाहिलंय पण अजूनही बरंच जग बघायचंय त्यामुळे दरवर्षी अशी एक बिझनेस कम ज्युबिली टूर करूया असं आम्ही ठरवूनही टाकलं. आम्ही हे ठरवत होतो तेव्हाच नील राज सुनिला शिल्पा ह्यांनीही आमच्यासाठी असा राहिलेल्या ठिकाणांचा प्लॅन बनवला आणि आम्हाला पाठवून दिलं उदयपूरच्या लेक पॅलेसला. जगातलं सर्वात रोमँटिक असं हे हॉटेल किंवा रीसॉर्ट. समथिंग इज इन द एअर देअर! ताज हॉस्पिटॅलिटी, त्यांच्या आदरातिथ्याची एक वेगळीच लेव्हल आपल्याला इथे अनुभवायला मिळते. छोट्या छोट्या आनंदांनी भरून गेले आमचे ते दोन-तीन दिवस. शेवटच्या दिवशी रात्री गार्डनमध्ये त्यांनी आमच्या दोघांसाठीच आयोजित केलेलं कॅन्डल लाइट डिनर तर केवळ अविस्मरणीय. जगात सर्वत्र संचार करून तिथल्या वेगवेगळ्या लक्झरीजचा अनुभव घेतल्यावरही हा अनुभव खूपच आनंददायी होता. तिथल्या वातावरणातच रोमान्स भरलेला आहे जणू. ताज लेक पॅलेसची हॉस्पिटॅलिटी अनुभवतानाच वंदना गुप्तेंचा फोन आला. नेहमीप्रमाणेच खड्या आवाजात कुठे आहेस? आठ तारखेला तुला कार्यक्रमाला यायचंय, कारणं सांगायची नाहीत असा हुकूमवजा आदेशच आला. मी लेक पॅलेसला आहे असं म्हटल्यावर तिच्या आठवणी तिने सांगितल्या आणि फोन ठेवता ठेवता म्हणाली, बरं हे बघ, लेक पॅलेसला आहेस तेव्हा आता पुन्हा प्रेमात पड! वा काय मस्त नाही का. असं पुन्हा प्रेमात पडायला जमलं पाहिजे. पुन्हा पुन्हा प्रेमात पडता आलं पाहिजे. तिला म्हटलं, माझ्या पुढच्या लेखाला हे टायटल मी घेणार बरं का! आणि तसंही ज्युबिली स्पेशल सहलीची संकल्पनाच आहे, पुन्हा पुन्हा प्रेमात पडण्याची.
सचिन-सुप्रिया जोडी तुझी माझी ह्या कार्यक्रमात ज्यांच्या लग्नाला काही वर्ष झालीयेत, आता मुलंही त्यांच्या करियरमध्ये गुंग झाली आहेत अशा जोडप्यांसाठी तुम्ही स्पेशल टूर्स काढायला पाहिजेत हा सुझाव सुप्रिया पिळगांवकरांनी दिल्यावर व्हाय नॉट? हा प्रश्न मनात आला आणि सुरू झाली ज्युबिली स्पेशल. ज्यांच्या लग्नाला काही वर्ष झालीयेत, जे आता आमच्या नवविवाहीतांसाठी असलेल्या हनिमून स्पेशलला जाऊ शकत नाही किंवा सीनियर्स स्पेशलला येण्याइतकेही मोठे नाहीत त्या मध्यमवयीन जोडप्यांसाठी आहेत ह्या ज्युबिली स्पेशल सहली. साधारण वयोमर्यादा चाळीस ते पंचावन्न. मग लग्नाला कितीही वर्ष झालेली असोत तो प्रश्न नाही. पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला लावणार्या ह्या सहली. लग्न, करियर, मुलं-बाळं, अभ्यास, परीक्षा& ह्या धकाधकीत एकमेकांना विसरून जाणं हे स्वाभाविक असतं. तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्याच आयुष्यात ते घडतं. त्याबाबतीत अजिबात खेद-खंत नाही. आयुष्यातल्या त्या प्रायॉरिटीज आहेत आणि त्या पार पाडल्याच पाहिजेत. पण होतं असं की लग्न ते मुलांचं करियर ह्यामध्ये आपलं दिनचक्र आणि सवयी एवढ्या बदलून गेलेल्या असतात की मुलं करियरसाठी घराबाहेर पडल्यावर आता पुढे काय? हा प्रश्न डोकं वर काढतोच. आता पुन्हा प्रेमात पडायचं हा अजेंडा जर समोर असेल तर काय बहार येईल नाही. लग्नाआधीचे गुलाबी दिवस आणि लग्नानंतरची नवी नवलाई आपल्याला पुन्हा जगता आली पाहिजे. सदासर्वकाळ आपण त्या गुलाबी युगात राहू शकत नाही हे ही तेवढंच खरं आहे, अति व्हायचं ते. म्हणूनच ह्या मधल्या वेगळ्या कुटुंबासाठी-करियरसाठी- मुलाबाळांसाठी-ज्येष्ठांसाठी असलेल्या जबाबदार्या पार पाडण्याची जगनिय्यंत्याची योजना असावी. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण हे असतंच असतं. अर्थात ह्या सगळ्या कौटुंबिक जबाबदारींच्या काळात आपापल्या मनातले रोमिओ-ज्युलियेट जिवंत ठेवायचे. कौटुंबिक जबाबदार्या संपल्यावर म्हणजे त्या तशा कधीच संपत नाहीत पण त्यातून थोडी उसंत मिळाल्यावर रीतेपणा न येता पुन्हा नव्याने ते गुलाबी दिवस जगता आले पाहिजेत. ह्या मधल्या काळात अनेक घडामोडी झाल्या असतील एकमेकांचा राग आला असेल तरीही शेवटी मुलं आपापल्या घरट्यात स्थिरस्थावर झाल्यावर आपल्यालाच आयुष्य एकमेकांच्या साथीने काढायचंय ही भावना ते रागरुसवे हेवेदावे कुठच्याकुठे पळवून लावते. अर्थात हे ग्यान माझं नाही. मी मुळात शीघ्रकोपी आणि अशांत, बॅलन्स साधला जावा म्हणून स्वर्गातूनच विवाहाच्या गाठी बांधल्या जातात असं म्हणतात त्यानुसार शांत संयमी बोलक्या सुधीरच्या वाट्याला मी आले असावे. सुधीरचं माहीत नाही पण माझं मात्र त्यामुळे भलं झालं. माझ्यात शांतता आणि संयम यायला ज्या गोष्टी कारणीभूत झाल्या त्या म्हणजे सुधीर नील राज, पर्यटक आणि पर्यटन व्यवसाय. शांततेने गोष्टी चांगल्या होतात, प्रश्न लवकर सुटू शकतात हे मला थोड्या उशिरा का होईना पण समजलं ही चांगली बाजू. व्यक्तिमत्त्वात चांगले बदल करणार्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. पण स्वभावाप्रमाणे कधीतरी मला सुधीरशी भांडण करण्याची उर्मी येतेच. माझा भांडणाचा मूड बघून हे महाशय हसत बसतात. अरे कशाला भांडतेय, गुस्सा कशाला? मुलं मोठी झाल्यावर आपणच आहोत एकमेकांसाठी, मग त्यात शब्दांचे बाण आणि त्या जखमा कशाला? लेट्स सॉल्व्ह द प्रॉब्लेम, सगळं काही नीट होईल, बी काल्म!
एकमेकांचे-एकमेकांसाठी ही संकल्पनाच खूप छान आहे. आणि ती सतत आपल्या मनाच्या कोपर्यात दडलेली असली पाहिजे. ज्युबिली स्पेशल ही सहल अशाच सर्व एकमेकांचे- एकमेकांसाठी आहे. लेट्स लिव्ह लाईफ फुल्ली. लेट्स स्टार्ट अगेन! उस मोड़ से शुरू करे फिर ये जिंदगी, हर शय जहाँ हसीन थी, हम तुम थे अजनबी...
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.