IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10AM - 7PM

वुमन्स डे आणि वीणा वर्ल्ड

17 mins. read

Published in the Sunday Sakal on 02 March, 2025

‘डर के आगे जीत है‌’ ही सॉफ्टड्रिंकच्या जाहिरातीतली एक छान टॅगलाईन आहे. हल्ली आपण आरोग्यासाठी हेल्दी फूडच्या पाठी असल्याने सॉफ्ट ड्रिंक्स किंवा पॅकेज्ड फूड वर्ज्य करतो आणि ते चांगलंच आहे म्हणा. आरोग्य उत्तम ठेवणं हे बऱ्यापैकी आपल्या हातात आहे, हे तसं बऱ्याच उशिरा कळलं. पण ज्याक्षणी कळलं त्या क्षणापासून आम्ही आमच्यात बदल करायला सुरुवात केली. शरीराने आणि मनाने म्हणजेच विचारांनी हेल्दी रहायचं हे ठरवून टाकलं आणि हाच आमच्या वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल टूर्सचाही पाया आहे. काळजी, चिंता, विवंचना तर आहेतच पण त्यांच्याशी सामना करायचा तर मन प्रसन्न हवं, मनात आनंदाची लहर फिरायला हवी आणि  समाधानाचे तरंग उमटायला हवेत. जर घरातल्या महिलेचं मन प्रसन्न नसेल, तर ते घर प्रसन्न, समाधानी कसं असेल? म्हणूनच तिला हे आनंदाचे बहाणे, हसण्याचं निमित्त मिळवून देणारी सहल म्हणजे आपली वुमन्स स्पेशल. हसूया, नाचूया, गाऊया, नटूया, सजूया, घराची गावाची शहराची राज्याची देशाची सीमा ओलांडूया, आत्मविश्वासाने एकेक पाऊल पुढे टाकूया, आयुष्य आनंदी बनवूया. घराघरात उत्साहाची कारंजी लावूया.

पूर्वी बऱ्याचदा वुमन्स स्पेशल टूर्सवर लेहलडाखपासून लंडनपर्यंत, शिमल्यापासून सॅनफ्रान्सिस्कोपर्यंत, ऑस्ट्रेलिया ते अमेरिकेपर्यंत कुठेही जिथे वुमन्स स्पेशल सुरू असेल तिथे मी जात असे. प्रचंड प्रवास केला पण कधी दमले नाही. कारण टूरवर महिला ज्या तऱ्हेने एन्जॉय करायच्या, सहलीवर जो काही सळसळता उत्साह दिसायचा, तो बघून मला शक्ती मिळायची. नऊवारीतून पाचवारी, पाचवारीतून प्लाझो, चुडिदार मधून जीन्स, जीन्समधून स्कर्ट आणि चक्क स्विमिंग कॉश्च्यूम घालून पूलमध्ये मनसोक्त डुंबणाऱ्या महिलांची ट्रान्सफॉर्मेशन्स बघून मला मिळणाऱ्या आनंदाला परिसीमा नव्हती.

आज खरंतर मला ह्या सर्व महिलांचे आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांनी मला उर्जा दिली. माझ्या आयुष्याला आणि व्यवसायाला अर्थ दिला. कमर्शियली व्यवसाय होत असतो. पण तो करीत असताना जे एक प्रकारचं समाधान मिळावं लागतं ते या वुमन्स स्पेशलने दिलं. इतक्या वर्षांमध्ये महिलांना चौकटीबाहेर येऊन मुक्त आनंद घेताना बघून आपण समाजाची एक गरज भागविण्यामध्ये छोटंसं का होईना योगदान दिल्याचं समाधान मिळालं. ‌‘मी एकटी कशी बाहेर फिरायला जाऊ? लोक काय म्हणतील? मुलांना आणि पतीला सोडून एकटी मजा कशी करू?‌’ ह्या टॅबू मधून बाहेर यायलाच बरीच वर्षं लागली. टूरवर पहिल्याच दिवशी घरातल्यांच्या, मुलांच्या आठवणीनं कावऱ्याबावऱ्या झालेल्या सगळ्याजणी पुढच्या चार-पाच दिवसात इतक्या मोकळ्या व्हायच्या आणि टूरवर मिळालेल्या नव्या मैत्रिणींच्या गराड्यात खुलायच्या की त्यांना आणायला एअरपोर्टवर आलेल्या त्यांच्या पतींच्या चेहऱ्यावर आपली टूरवर गेलेली पत्नी हीच होती का? असा प्रश्न उमटलेला मी पाहिला आहे.

ही सगळी किमया असते वुमन्स स्पेशलच्या जादुई वातावरणाची. बघा ना, नेहमी कोणती तरी जबाबदारी घेणारी, कोणाची तरी काळजी करणारी, कोणासाठी तरी मागे राहणारी महिला जेव्हा एकटीच जगाचा अनुभव घ्यायला बाहेर पडते, तेव्हा तिच्यावर कसलीही जबाबदारी नसते. कोणतेही प्रश्न मनात न ठेवता जेव्हा ती जैसलमेरच्या वाळवंटात किंवा केरळच्या बॅकवॉटरमध्ये नाहीतर मॉरिशसच्या सागर किनाऱ्यावर किंवा पॅरिसच्या सीन क्रुझवर इतर महिलांसोबत असते, तेव्हा खऱ्या अर्थानं ती आपलं लाईफ एन्जॉय करत असते.

प्रत्येक टूरवर माझ्या आणि महिलांच्या संवादात माझं एकच सांगणं असायचं, ‌‘मुलगी आनंदी झाली तर घर आनंदी होतं सर्वार्थाने‌’ हे लक्षात घेऊया. म्हणून या मुलीला पर्यटनाच्या माध्यमातनं आनंद देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा स्वत:ला गिल्टमध्ये टाकू नका. तुम्ही घराबाहेर येताय, धम्माल करताय ही तुमची गरज आहे. पर्यटन हा आपला चार्जर आहे. तेव्हा जमेल तसं तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षातून किमान एकदा तरी असं स्वत:ला चार्ज करायचं आणि मग हसतहसत आयुष्याला सामोरं जायचं. काही वर्षांनी महिला हळूहळू त्या अपराधी वाटण्याच्या मानसिकतेतून बाहेर आल्या. नंतरचं आमचं लक्ष्य होतं ते घरच्यांना महिलांच्या ह्या पर्यटनाकडे सहृदयतेने बघण्यासाठी प्रवृत्त करण्याचं, कारण इथे दबंगशाही नव्हती. जे काही करायचं ते प्रेमाने. ‌‘केल्याने देशाटन... मनुजा चातुर्य येतसे फार‌’ ह्या उक्तीप्रमाणे महिला एकट्या पर्यटन करू लागल्या. त्यांच्यातल्या स्वागतार्ह बदलाचे पडसाद घरात उमटू लागले. घरातला आनंद वाढायला लागला आणि मग, ‌‘तू एकटी जाणार?‌’, ‌‘तू आम्हाला सोडून कशी जाऊ शकतेस?‌’, ‌‘आम्ही नाही बाबा असे मुलांना आणि नवऱ्याला सोडून भटकायला जात‌’, ‌‘काय मेलं ते भटकायचं खूळ डोक्यात भरलंय‌’, ‌‘असे पैसे उधळायला लाज नाही वाटत?‌’... अशा आणि याहून टोकाच्या कमेंट्‌‍स कमी व्हायला लागल्या. घरातल्या मंडळींना वुमन्स स्पेशलच्या टॉनिकची महती कळली. घरातली चिडचीड वाढायला लागली की, ‌‘अगं तुला आता वुमन्स स्पेशलला जायची गरज आहे‌’ असं घरातलेही म्हणायला लागले आणि आम्ही भरून पावलो. आतातर घरातली मंडळीच तिला वुमन्स स्पेशलची टूर गिफ्ट देताहेत.

2006 साली म्हणजे अठरा वर्षांपूर्वी पहिली वुमन्स स्पेशलची संकल्पना मी राबवली, यशस्वी केली आणि वीणा वर्ल्ड झाल्यानंतर तर आत्ता दर आठवड्याला किंवा दररोज वुमन्स स्पेशलद्वारे महिला देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात मुक्त विहार करतात, मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण करून घेतात. मस्त मस्त कपडे घालतात, सिनेस्टार्सप्रमाणे मोठ्ठे गॉगल्स लावतात, असंख्य फोटोज काढतात, स्वत:वर प्रेम करतात. आय ॲम ब्युटीफुल, आय ॲम बोल्ड, आय ॲम द क्वीन अँड आय लव्ह मायसेल्फ हा आमच्या वुमन्स स्पेशलचा कन्सेप्ट आहे. मी माझं आयुष्य आनंदात जगतेय, तू तुझं आयुष्य आनंदात जग आणि त्यासाठी दोघींनी एकमेकींना मदत करूया आणि जीवनाच्या आनंदी सफरीवर निघूया हा सिधासाधा मामला आहे, जो वुमन्स स्पेशलवर जगला जातोय, पण पुढे तो आयुष्यातही कामी येतो. आयुष्यातले खाचखळगे हसतहसत लीलया पेलण्यासाठीची सकारात्मक मनोवृत्ती जागृत करण्याचं बळ हे वुमन्स स्पेशलला एकमेकींकडून एकमेकींना मिळत राहतं. निर्धास्त-बिनधास्त- बोल्ड हा नारा आम्ही लावत असलो तरी इतक्या वर्षांत वुमन्स स्पेशल कधीही ‌‘चीप‌’ झाली नाही डिसेन्सी आणि एलिगन्सची पातळी सोडली नाही म्हणूनच वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशलच्या एवढ्या सहली भारतात आणि जगात सतत सुरू आहेत.

आठ मार्च येतोय. आपला वुमन्स डे! आम्ही ‌‘वुमन्स डे‌’ च्या निमित्तानं जास्तीत जास्त महिलांना या आनंदाच्या नव्या रंगात न्हाऊन निघायला सांगतो. त्यासाठी अथक तयारी करतो. आमची टीम सज्ज असते ही ‌‘दे  धम्माल‌’ घडवून आणायला. ह्या वुमन्स डे ला महिलांनी चक्क 48 टूर्स हाऊसफुल्ल केल्या आहेत. हा वर्ल्ड रेकॉर्डच म्हणता येईल. आता महिला त्यांचं युरोप अमेरिकेला जायचं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण करू शकताहेत,  ऑस्ट्रेलियाच्या महाखंडाची वारी करू शकताहेत, जपान कोरियाची अद्भुत दुनिया बघू शकताहेत किंवा आपल्या इनक्रेडिबल इंडियाच्या ट्रॅव्हल मिशनमधली अनेक राज्य पाहू शकताहेत.

दोन वर्षांपूर्वीपासून आम्ही वुमन्स स्पेशलच्या टूर्समध्ये जिथे शक्य आहे तिथे राफ्टिंग, कायाकिंग, हायकिंग, ट्रेकिंग, डेझर्ट सफारी, वाइल्ड लाइफ सफारी, जेटबोट राइड, सनसेट क्रुझ, सायंटिफिक मसाज ह्या गोष्टींचा समावेश केला. भारतीय भोजनासोबत लोकल फूडचाही आस्वाद द्यायला सुरुवात केली. वेगवेगळे एक्स्पिरियन्सेस, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटिज्‌‍, फॅशन शो, रॅम्प वॉक या ॲक्टिव्हिटिज्‌‍नी वुमन्स स्पेशल टूर्स आणखी हॅपनिंग झाल्या. टूरवर येणाऱ्या मैत्रिणी मैत्रिणी आणि फॅमिली गर्लगँगचे ग्रुप्स वाढू लागले आणि वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल लक्झरी न राहता महिलांची गरज बनली. वुमन्स स्पेशल सहलीचे हे सात-आठ दिवस म्हणजे ह्या सगळ्या मुलींसाठी (हो ! वुमन्स स्पेशलवर सगळ्या मुलीच असतात बरं!!) एक अनोखा ब्रेक ठरतो. वेगवेगळ्या शहरातल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि वेगवेगळ्या वयोगटाच्या महिलांच्यात होणारी संवादाची आणि संस्कृतीची देवाणघेवाण मजेदार असते. तर असा आहे वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशलचा फंडा. आनंदाचा, उत्साहाचा, प्रेरणेचा, आत्मविश्वासाचा, सहकार्याचा, सकारात्मकतेचा.

सो, चलो गर्ल्स, ह्या वुमन्स डे ला किंवा पुढे वर्षभरात कधीही मिळून साऱ्याजणी देश विदेश पालथे घालूया, दृष्टीकोन व्यापक बनवूया, भविष्यासाठी अनमोल आठवणींची साठवण करूया आणि आयुष्य हसत-खेळत जगूया... कधी मॉरिशसच्या निळ्याशार समुद्रावर तर कधी लेह लडाखच्या हिमालयी उत्तुंगतेसोबत, कधी अमेरिकेच्या फ्रीडम लँडमध्ये तर कधी इंग्लंडच्या राणीच्या दिमाखात, कधी युरोपच्या अद्वितीय सौंदर्यासोबत तर कधी थायलंडच्या फेसाळत्या समुद्रावर.. चला बिनधास्त! लेट्‌‍स ब्रेक बॅरिअर्स अँड रॉक द वर्ल्ड! वुई आर अनस्टॉपेबल!

वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.


देखो अपना देश

दिल से! प्यार से! सम्मान से!

देेवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडचे नैसर्गिक सौंदर्य अद्वितीय आहे. इथे अनेक प्रसिद्ध हिंदू आणि शीख मंदिरे आहेत. हे राज्य त्याच्या अध्यात्मिक वास्तूंसाठी, साहसी पर्यटन आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत.

इथल्या नैनिताल या शहराला ‌‘द सिटी ऑफ लेक‌’ म्हणतात तर मसूरीला ‌‘क्विन्स ऑफ हिल्स विथ हिडन जेम्स‌’. हरिद्वार प्रामुख्याने गंगा आरतीसाठी प्रसिद्ध आहे तर केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश ही शहरं त्यांच्या अध्यात्मिक महत्त्वामुळे ओळखली जातात. जिम कॉर्बेट या  राष्ट्रीय उद्यानात टायगर सफारी करता येते.  ऋषिकेश जवळच्या राजाजी नॅशनल पार्क टायगर रिझर्व्हमध्ये हत्ती आणि बिबट्याही पहायला मिळतात. उत्तरकाशीत असलेलं गोविंद नॅशनल पार्क हे बर्फात राहणाऱ्या बिबट्याचं घर आहे.

उत्तराखंडमध्ये 16499 फूट उंचीवर रुपकुंड नावाचा रहस्यमय ग्लेशिअल लेक आहे जिथे शेकडो मानवी सांगाडे सापडले आहेत. उत्तराखंडमध्ये असलेलं चोपटा याला भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं. जवळच तुंगनाथ इथे जगातलं सर्वात उंचीवरचं शंकराचं मंदिर आहे. तर अल्मोडामध्ये जगातील सर्वात जुन्या शिवमंदिरांपैकी एक जागेश्वर धाम हा 124 प्राचीन मंदिरांचा समूह आहे. अल्मोडाजवळच असलेले कासार देवी मंदिर मॅग्नेटिक फिल्ड झोनमधील मंदिर आहे. उत्तराखंडमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे नॅशनल पार्क असून ते युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीत आहे. या प्रदेशातील नाग तिब्बा ट्रेक हा ऑफबीट ट्रेक अनेक गिर्यारोहक आवर्जून करतात. अनेक पर्यटक इथे रिव्हर राफ्टिंगचाही अनुभव घेतात. उत्तराखंडमध्ये जगप्रसिद्ध चिपको मूव्हमेन्टचं जन्मस्थान आहे.

या राज्यात विशेषकरून इथल्या कुमाऊँ प्रदेशात पावसाळ्यात शेती आणि निसर्गाच्या जपणुकीशी निगडित असा हरेला फेस्टिव्हल साजरा केला जातो. तर बटर फेस्टिव्हल हा होळीसारखा सण लोणी आणि ताकाच्या सोबत मोठ्या उत्साहात खेळला जातो.

भट्ट की चुरकणी, आलू के गुटके आणि झंगोरा खीर हे उत्तराखंडमधले काही खास पदार्थ.

असं हे उत्तराखंड राज्य म्हणजे फक्त चारधाम, नैनिताल किंवा मसूरी नाही. तर हे बनलं आहे प्राचीन मंदिरे, अनोखे उत्सव आणि दुर्मिळ तसंच समृद्ध परंपरांनी. तर मग या सांस्कृतिकदृष्टया वैशिष्ट्यपूर्ण राज्याची भेट कधी घेताय?


अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

योसेमिटी नॅशनल पार्क हे कॅलिफोर्नियात असलेले युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय उद्यान आहे. योसेमिटी नॅशनल पार्क इथले ग्रॅनाईटचे खडक, वॉटरफॉल्स आणि इथल्या जैव विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. इथे जगातल्या सर्वात उंच 10 वॉटरफॉल्सपैकी 3 आहेत. येथील जायंट सिक्वॉशिया ट्रीज सुद्धा प्रसिद्ध आहेत. ही झाडं म्हणजे आजच्या काळातले पृथ्वीवरचे सर्वात मोठे सजीव आहेत. मात्र त्यांच्या बिया ओट्सइतक्या छोट्या असतात. `ग्रीझली जायंट‌’ हे योसेमिटी पार्कमधल्या सगळ्यात जुन्या सिक्वॉशिया ट्री चं नाव आहे. हा जगातल्या सर्वात मोठ्या वृक्षांपैकी एक आहे. ग्रीझली जायंट त्याच्या प्रचंड खोडामुळे आणि शतकानुशतकांच्या हवामान आणि पर्यावरणीय घटकांमुळे वेगळा उठून दिसतो. अलीकडच्या डेटिंग टेक्निक्सनी या महाकाय वृक्षाचं वय अंदाजे 2995  वर्षे असल्याचं सांगितलं आहे. याचं वजन अंदाजे 3700 टन आहे. या नॅशनल पार्कमध्ये 800 मैलांपेक्षा जास्त हायकिंग ट्रेल्स आहेत. योसेमिटी नॅशनल पार्कची लांबी सुमारे 1200 चौरस मैल आहे. पण त्यापैकी फार थोडा भाग मनुष्याने एक्सप्लोअर केला आहे. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये इथे पाऊस सर्वाधिक असतो, तर समर सीझन उष्ण आणि कोरडा असतो.

योसेमिटी व्हॅली ग्लेशियर्स द्वारे तयार झाली. सुमारे एक दशलक्ष वर्षांपूर्वी, ग्लेशियरची जाडी 4000 फूट होती. या ग्लेशियर्स खूप उंचावर निर्माण झाल्या आणि रिव्हर व्हॅलीजमधून खाली वाहू लागल्या. या हालचालींमुळे यू आकारामध्ये योसेमिटी व्हॅली तयार झाली. ही व्हॅली उत्तर अमेरिकेमधल्या सर्वात उंच वॉटरफॉलपैकी एक असलेल्या योसेमिटी वॉटरफॉलचं घर असून त्याची उंची 2425 फूट आहे. हा वॉटरफॉल पाहण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे इथला स्प्रिंग सीझन. (मे-जून) यावेळी इथे सर्वाधिक बर्फ वितळतो. या योसेमिटी पार्कमधली रॉक फॉर्मेशन्स सूर्यास्ताच्या वेळी चमकतात. एल कापितान आणि हाफ डोमच्या इथले खडक आग लागल्यासारखे दिसतात. इथला हॉर्सटेल फॉलदेखील सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे त्याच्यावर पडल्यावर अग्नीप्रमाणे चमकतो. त्यावेळी व्हॉल्कॅनोमधून लाव्हा उसळत असल्याचा भास होतो. हजारो लोक सूर्यास्तापूर्वी काही काळापुरताच अनुभवता येणारा निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी योसेमिटी वॉटरफॉलला भेट देतात. 1903 साली झालेल्या प्रेसिडेन्शिअल कॅम्पिंग ट्रिपमुळे योसेमिटी नॅशनल पार्कच्या विस्ताराला चालना मिळाली. अहवाहनी हॉटेल हे योसेमिटीचं आयकॉनिक हॉटेल मानलं जातं. योसेमिटीचे पहिले रहिवासी स्वतःला अहवाहनीची असं संबोधतात. यूएस आर्मीने सर्वात आधी या नॅशनल पार्कचं संरक्षण केलं होतं. 1932 सालच्या विंटर ऑलिम्पिक्समध्ये नॉमिनेशन टाकण्यासाठी योसेमिटी इथे 800 फुटाची स्नो स्लाईड, एक मोठी आईस स्केटिंग रिंक, टोबोगन रन्स आणि अनेक स्की जंप निर्माण केल्या होत्या. तुम्हालाही जर योसेमिटी पार्कला भेट द्यायची असेल तर आमच्यासोबत आमच्या अमेरिकन स्प्लेंडर्स किंवा बेस्ट ऑफ यूएसए अँड कॅनडा या टूर्सवर चला आणि पहा हे अद्भूत योसेमिटी पार्क.


प्रत्येक गोष्टीतला आनंद...

शिवाजीराव चव्हाण, कोल्हापूर

मी वीणा वर्ल्ड कडून 2018 पासून टूर्स बुक करतोय. माझ्या पत्नीने 2017 साली या जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून मी एकटाच टूर्स करायला लागलो. मला फिरायला खूप आधीपासून आवडतं पण नोकरीमुळे आणि संसारातल्या जबाबदाऱ्यांमुळे फिरता आलं नाही. पण आता मी जसं जमेल तसं फिरायचं असं ठरवलं आहे, त्याप्रमाणे मी फिरतो.

मी 'शिवाजीराव चव्हाण' राहायला मी कोल्हापुरात आहे. कोल्हापुरातले वीणा वर्ल्डचे सेल्स पार्टनर 'ड्रीम हॉलिडेज' ह्यांच्या माध्यमातूनच टूर बुक करतो. मी आता सिनिअर सिटीझन आहे. त्यामुळे मी ज्या काही टूर्स केल्या आहेत, त्या सगळ्या सिनिअर्स स्पेशलबरोबरच केल्या. वीणा वर्ल्डकडे सिंगल ऑक्युपन्सी असते, ते एकट्या माणसाला सुद्धा ग्रुप मध्ये सामावून घेतात. मी बऱ्याचशा राज्यांमध्ये फिरलो आहे. नॉर्थ ईस्ट, त्यानंतर उत्तराखंड हिमाचलमध्ये डलहौसी केलं, मसुरी नैनिताल आणि जिम कॉर्बेट केलं. राजस्थानमध्ये मारवाड, मेवाड अशा बऱ्याच टूर्स केल्या. तसंच मी नेपाळ, भूतान याही देशांच्या टूर्स केल्या आहेत.

माझी भारतातली पहिली टूर बारा दिवसांची आसाम मेघालय अशी होती. त्या टूरचा माझा अनुभव खूपच छान होता. सगळ्याच टूर्सवर प्रोफेशनल टूर मॅनेजर असतात, त्यांची तयारी खूपच चांगली असते. ते ज्या डेस्टिनेशनला नेतात तिथली माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने सांगतात. तसंच सगळ्या गेस्टची काळजीही अतिशय आपलेपणाने घेतात.

भारतातली सगळी राज्य फिरण्याचा माझा संकल्प आहे. रणउत्सव, उज्जैन, मांडू, अमृतसर, वाघा अटारी बॉर्डर बघायची आहे, त्याचबरोबर आशिया खंड, युरोप, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हे पाचही खंड पाहण्याचा मी संकल्प केला आहे. 2020 साली युरोप टूर करायची ठरवली होती, पण कोरोना काळामुळे तेव्हा जाणं कॅन्सल करावं लागलं. आता युरोप आणि इतरही बाहेरच्या टूर्स करायचं मी ठरवलं आहे. जिथे जाता येईल ते सगळं मला बघायचं आहे.

वर्षाला माझ्या पाच ते सहा सिनिअर स्पेशलच्या टूर्स होतात. मला वाटतं की आपण आयुष्यभर जे कमावलं, त्याचा उपभोग आत्ता नाही घेतला तर शेवटी सगळं वाया जातं. मला बाहेरच्या देशातली शिस्त आवडते. तिथे फिरायला गेल्यावर खूप काही नवीन पहायला मिळतं. आपल्या भारतात सुध्दा बघण्यासारखं बरंच काही आहे.

मला सगळं जगच पहायचंय, त्यामुळे जेव्हा मला वाटतं तेव्हा मी टूर बुक करतो. शेवटी प्रत्येक गोष्टीत आनंद असतो. तो आनंद तुम्हाला शोधता यायला हवा. मला फिरायला मजा येते, म्हणून मी टूर्स करतो आणि या प्रवासात माझा हक्काचा पार्टनर असतो वीणा वर्ल्ड!


प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्‌‍

‌‘वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍सोबत - थीम पार्क स्टे

एस्सेल वर्ल्ड में रहूँगा मैं! घर नहीं जाऊंगा मैं!' नव्वदीच्या दशकात आपल्या सर्वांच्या मनातल्या सुप्त भावना ह्या जिंगल ने चपखल पकडलेल्या. थीम पार्क्समधून बाहेर पडायला कोणाला आवडेल? वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेजसोबत तुम्ही जगातल्या अनेक थीम पार्क्समध्ये खरंच राहू शकता. त्यापैकी आपल्या आशिया खंडातच असलेल्या काही थीम पार्क्सबद्दल आज जाणून घेऊया.

भारतापासून सर्वात जवळ असलेलं डिस्नीलँड म्हणजे हाँगकाँग डिस्नी. इथे आपल्याला आपल्या आवडत्या मिकी मिनी आणि त्यांच्या फ्रेंड्स सोबत डायनिंगचा अनुभव घेता येतो. तुमच्या चिमुकल्या राणीला तिच्या फेव्हरेट डिस्नी प्रिन्सेस प्रमाणे तयार व्हायचं असेल तर इथल्या बुटिकमध्ये ते देखील शक्य आहे.

आपल्या मुलांसाठी आपण त्यांच्या आवडत्या कॅरेक्टर्सच्या डिझाईनचे केक अगदी आवडीने आणतो, पण आपल्या हॉलिडेवर आपली पूर्ण रूमच त्या कॅरेक्टर्सच्या थीम वर सजवण्याची कल्पना कशी वाटतेय? हाँगकाँग डिस्नीच्या किंग्डम क्लब सिन्ड्रेला स्वीटमध्ये किंवा मग फ्रोझन थीम स्वीटमध्ये राहून हा भन्नाट अनुभव घ्यायलाच हवा.

एशियामधलं दुसरं पॉप्युलर डिस्नीलँड आहे ते जपानच्या टोकियोमध्ये. इथल्या टॉयस्टोरी हॉटेलमध्ये राहून तुमच्या छोट्या हिरोला त्याच्या कल्पनेतलं अफलातून विश्व प्रत्यक्षात अनुभवता येईल.

डिस्नीलँड सारखंच जगातलं दुसरं अत्यंत पॉप्युलर थीम पार्क म्हणजे युनिव्हर्सल स्टुडिओज्‌‍. एशियामध्ये सिंगापूर आणि जपानमधील ओसाका ह्या दोन ठिकाणी युनिव्हर्सल स्टुडिओज्‌‍ आहे. सिंगापूर युनिव्हर्सल मध्ये असलेले हॉलिवूड, साय-फाय, एन्शियंट इजिप्त, मिनियन लँड, द लॉस्ट वर्ल्ड सारखे आणि ओसाका युनिव्हर्सल मध्ये सुपर निनटेंडो, द विझार्ड वर्ल्ड ऑफ हॅरी पॉटर सारखे अनेक झोन्स आपल्याला एक्सप्लोअर करता येतात. ओसाका मध्ये हॅरी पॉटरच्या थीमवर आधारित 'ब्रूमस्टिक्स' आणि मिनियन थीमवर आधारित 'कुकी किचन' ह्या रेस्टॉरंट्समध्ये जेवण्याचा अनुभव अगदी न चुकवण्यासारखाच!

'लेगो गेम्स' कोणाला नाही आवडत? ह्या लेगोज्‌‍च्या थीमवर आधारित चक्क एक अम्युसमेंट पार्क मलेशियामध्ये आहे! इथे लेगोलँड थीम पार्क सोबतच लेगोलँड वॉटर पार्क, सी लाईफ ॲक्वेरियम, आणि लेगोलँड हॉटेल देखील आहे, जिथे आपण आपल्या आवडत्या लेगो कॅरेक्टर्सना भेटू शकतो. इथे तुम्ही चक्क लेगोची राफ्ट बनवून इथल्या लेझी रिव्हर वर तरंगू शकता आणि मास्टर बिल्डर सोबत एक्सक्लुसिव्ह लेगो बिल्डिंग सेशन देखील घेऊ शकता.

एशियामधल्या इतर थीम पार्क्सबद्दल म्हणाल तर साऊथ कोरिया मध्ये एव्हरलँड आहे, व्हिएतनाममध्ये विन वंडर्स आहे, आणि मलेशियामध्ये गेंटिंग स्काय वर्ल्डस्‌‍ देखील आहे. तर चला आपल्या कल्पनेतलं जग प्रत्यक्षात अनुभवायला, जगातल्या एक-से- एक थीम पार्क्समध्ये एक अफलातून हॉलिडे सेलिब्रेट करायला वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍ सोबत.

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍साठी आजच संपर्क साधा: 1800 22 7979  l  customizedholidays@veenaworld.com


मिडनाइट सन

मिडनाइट सन ही ध्रुवीय प्रदेशांमध्ये घडणारी अचंबित करणारी भौगोलिक घटना आहे. इथे वर्षातला काही काळ दिवस संपतच नाही आणि रात्र होतच नाही. पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरून हा नैसर्गिक चमत्कार दिसतो. आर्क्टिक प्रदेशात मे ते जुलै तर अंटार्क्टिका प्रदेशात नोव्हेंबर एंड ते जानेवारी एंडपर्यंत याची अनुभूती घेता येते. मिडनाइट सन ही चमत्कृती नॉर्वे, फिनलँड, स्वीडन, आईसलँड, रशिया, अलास्का, कॅनडा या देशांमध्ये अनुभवता येते. यावेळी दिवसाचे चोवीस तास सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे हायकिंग, बोटिंग आणि फिशिंग ॲक्टिव्हिटीज जोर धरतात. मध्यरात्रीच्या वेळी इथे असलेल्या सॉफ्ट आणि वॉर्म ग्लो मध्ये उजळून जाणारी ही भूमी फोटोग्राफीसाठी तुम्हाला उत्तम लँडस्केप्स पुरवते. अस्ताला न जाणारा सूर्य पर्यटकांनाही आकर्षित करतो. स्वीडनच्या मिड समर फेस्टिव्हल तसंच नॉर्वेच्या मिडनाइट सन मॅरथॉन अशा इव्हेंट्‌‍समध्ये मिडनाइट सन ही घटना सेलिब्रेट केली जाते. तुम्हाला या घटनेचा साक्षीदार व्हायचं असेल तर आमच्यासोबत या अद्भुत मिडनाइट सनच्या टूरवर चला. अधिक माहितीसाठी www.veenaworld.com

February 28, 2025

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top