Published in the Sunday Sakal on 12 January 2025
जानेवारी महिना म्हणजे वीणा वर्ल्डमध्ये सॅलरी रिव्हिजनचा महिना. एचआर फुल्ल ऑन असतं सगळ्यांची कुंडली मांडण्यात, मॅनजर्स गॅसवर असतात. खरंतर हा सगळा व्याप कमी झाला पाहिजे हे दरवर्षी वाटतं. अमेरिकन पद्धतीप्रमाणे इन्फ्लेशन प्लस वन पर्सेंट असंच असायला हवं हे आम्ही दरवर्षी ठरवतो, पण येरे माझ्या मागल्या. वर्षभरात कुणीतरी अपेक्षेपेक्षा चांगलं काम केलेलं असतं. एखादा उभरता हुआ तारा कुठेतरी दिसत असतो, तर एखाद्याचा परफॉर्मन्स उतरंडीवर आलेला असतो. त्यामुळे कितीही केलं तरी सर्वांना एकच मोजमाप नाही लावता येत. अमेरिकेत हायर अँन्ड फायर अशी बेभरवशाची संस्कृती तर जपान अगदी आत्ताआत्तापर्यंत एकदा एखाद्या संस्थेशी नातं जुळलं की आयुष्यभर माणसं तिथेच चिकटलेली असा. भौगोलिकदृष्ट्या आपला भारत ह्या पश्चिम आणि पूर्व संस्कृतींच्या मध्यावर असल्याने आपल्यात दोन्हीचं सार उतरलेलं. त्यामुळे आपण सॅलरी इन्क्रिमेंट या, तसं बघायला गेलं तर टेक्निकल गोष्टीकडे भावनिक दृष्टीने बघतो. प्रत्येक व्यक्तीचा, टीम मेंबरचा विचार करतो. वेळ लागतो हे सगळं करायला. पण शेवटी प्रत्येक व्यक्ती महत्वाची. एक एक टीम मेंबर मिळून तर संस्था बनते. हा सगळा एक्झरसाइज सुरू असताना मॅनेजर्स, सिनियर मॅनेजर्स, जनरल मॅनेजर अशी सर्व मंडळी सखोल विचार करीत असतात. शेवटी शेवटी आम्हीही आखाड्यात उतरतो आणि जिथे ’टू बी ऑर नॉट टू बी’ सारखी परिस्थिती असते तिथे इनपुट देतो. त्या चेंबरमध्ये काही माणसांवर किंवा टीम मेंबर्सवर खूप चर्चा होते. वेगवेगळे मतप्रवाह असतात. कुणी त्या टीम मेंबरविषयी स्पष्टीकरण देत असतं तर कुणी डोकं धरून बसलेलं असतं. ह्या सगळ्या प्रकारात एक जाणवलं किंवा त्या निष्कर्षाप्रती मी पोहोचले ते म्हणजे कोणत्याही माणसावर किंवा टीम मेंबरवर खूप चर्चा व्हायला लागली की ती अलार्मिंग सिच्युएशन समजावी. ती व्यक्ती ऑर्गनायझेशनमध्ये हवी की नको? जस्ट जॉब म्हणून ती व्यक्ती इथे आहे की आपलं डिपार्टमेंट अलोकेशन चुकलंय? की त्या टीम मेंबरची करियर लाइनच चुकलीय? म्हणजे रिक्रूट-रिव्ह्यू रिलोकेट रिलीज’ ही पद्धत प्रत्येकाच्या बाबतीत वापरली जाते तरीही जर एखाद्या मेंबरविषयी एवढं डिस्कस करावं लागत असेल तर वुई हॅव टू डू समथिंग अबाऊट इट. खितपत पडायचं नाही माणसांनी ऑर्गनायझेशनमध्ये आणि ऑर्यनायझेशननेही माणसांमध्ये फार रमायचं नाही. एकदुसऱ्यांपासून मोकळे होऊया आणि काहीतरी आणखी छान करूया आपल्या आयुष्याचं. थोडा टोकाचा विचार वाटेल पण लाँग टर्ममध्ये तो दोन्ही पार्ट्यांच्या हिताचा असतो.
साध्यासाध्या गोष्टी असतात. परवाच एक किस्सा घडला. ऑफिसमध्ये एका टोकाला मी बसते तर दुसऱ्या टोकाला सुधीर सुनिला नील. कधीतरी आम्ही मधेच भेटतो आणि वॉटरकूलर टॉक्स म्हणजेच नळावरच्या गप्पा सुरू होतात. बाजूलाच एक वॉशरूम आहे. सुनिला म्हणाली, "अरे ह्या वॉशरूममध्ये एक छोटं कपाट पाहिजे. कपडे ठेवायला, युनिफॉर्म टी-शर्ट टांगायला काहीच नाहीये. काहीतरी असायला हवं नाही का?” आणि मग आमच्या लक्षात आलं की दरवर्षी त्या बाथरूमच्या बाबतीत आम्ही ही चर्चा करतो. म्हणजे आत गेल्यावर ’अरे किती हा पसारा इथे? कपाट का नाही?’ ह्या विचाराने त्रासतो, बाहेर आल्यावर कामाच्या धबडग्यात विसरून जातो ते वॉशरूम थॉट्स. आठ नऊ वर्ष गेली या वैचारिक त्रासात. खरं तर एक इन्स्ट्रक्शन ॲडमिनिस्ट्रेशनला दिली असती तर आठ दहा दिवसांत ते काम फत्ते झालं असतं, पण ते काम त्यांना न सोपवल्यानेे आठ दहा वर्षं हा त्रास आम्ही सोसला.
’देव मनात असतो’ हा विचार मनात एवढा चपखल बसलाय की त्याचा अतिरकेच झालाय म्हणायचा. अनेक घरं आम्ही बदलली. प्रत्येक वेळी घरात छोटं मोठं इंटिरियर व्हायचं. घरात आल्यावर डोक्यात प्रकाश पडायचा, ‘अरे आपण देवघरच केलं नाही.‘ देव मनात असतो नं. कुठच्यातरी अशाच एका घराच्या इंटिरियर नंतर ’देवाशी प्रतारणा नाही, घरात देवघर पाहिजेच’ या विचाराने मला ग्रासलं आणि मी तडक प्रभादेवीच्या आकार आर्ट गॅलरीत जाऊन पोहोचले. अनेक वर्षं त्यांच्या शोरूममधली मोठमोठी देवघरं जाता येता दिसत होती. आत गेल्यावर एक देवघर सिलेक्ट केलं. आता पैसे द्यायचे आणि घेऊन जायचं एवढाच मामला होता. पण त्या सेल्स पर्सनने म्हटलं, "हा आमचा डिस्प्ले पीस आहे, तुम्ही ॲडव्हान्स भरा, दोन महिन्यांत डिलिव्हरी मिळेल. अरे बापरे! ’आज अभी इसी वक्त’ वाल्या माझ्या मनाला दोन महिने हा प्रचंड मोठा कालावधी वाटला आणि मी ऑर्डर न करता शोरूम मधून बाहेर आले, आता सांताक्रूझला जाऊन मार्बलचं देवघर घेऊन जाऊया हा विचार करीत. वाटेत काहीतरी काम निघालं आणि सांताक्रूझला जाणं राहिलं आणि मार्बलचं देवघरही. म्हणता म्हणता दहा वर्षं निघून गेली पण देवघर काही आलं नाही. शेवटी दहा वर्षांनी पुन्हा मी त्याच शोरूममध्ये गेले, मुकाट पैसे भरले आणि दोन महिन्यांनी ते देवघर आमच्या घरात आलं. त्याच वेळी काम न केल्याने ती दहा वर्षं ’घरात देवघर नाही’ ह्या कधीतरी डोकावणाऱ्या विचारात आणि त्याने स्वत:ला कोसण्यात गेली.
घरात किंवा कार्यालयात अशा खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला खटकत असतात. आपण कम्प्लेंट करीत असतो त्याबाबतीत आणि दिवसातली आपली बरीचशी शक्ती त्यात खर्च होत राहते. हे खटकणं, तक्रार करणं, हळूहळू काळजीचं रूप धारण करतं आणि त्याला आपण सध्याचा फॅशनेबल शब्द वापरतो ’स्ट्रेस’. मागे एक जण म्हणाले, "तुमच्या ऑर्गनायझेशनमधला स्ट्रेस घालवायला आम्ही मदत करू." त्यांना म्हटलं, "थँक्यू, पण आम्ही आता अनेक वर्ष खर्ची घातल्यानंतर ह्या विचाराप्रती पोहोचलोय की, ’जस्ट डू द राइट थिंग्ज ॲट फर्स्ट प्लेस. हा सो कॉल्ड स्ट्रेस म्हणून जो काही आहे तो ऑर्गनायझेशनमध्ये घुसणारच नाही ह्यावर आम्ही काम करतोय.’ म्हणजे नेमकं काय करतोय तर ऑर्गनायझेशनमध्ये संपूर्णपणे ट्रान्स्परन्सी आणतोय. निर्णय बऱ्यापैकी वेळेत घेतले जाताहेत. निर्णय घेताना पास्ट प्रेझेंट फ्युचर मधील अनुभवांसोबत सर्व फॅक्ट्स समोर ठेवून सर्वांगाने विचार करून योग्य निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो. कधी अनबन- मतांतरं-बौद्धिक वैचारिक विवादही होतील पण त्याची अपरिहार्यता लक्षात घेऊन एकत्र येऊन गोष्टी सोडवीत असतो. ’बी ऑन द सेम पेज’ हे आमच्या नीलचं कायम सांगणं असतं सर्वांना. त्यात आता हेताने ’ॲग्री टू डिसॲग्री’ ह्या थिअरीची माहिती करून दिलीय. प्रत्येक वेळी सर्वांचंच एकमत होईल असं नाही पण निर्णय खोळंबायला नकेो आणि उगाचच आर्ग्युमेंट्समध्ये वेळ जायला नको म्हणून गोष्टी पुढे जाण्यासाठी काही मंडळी ’ॲग्री टू डिसॲग्री’ असा पवित्रा घेतात आणि ते आता कॉर्पोरेट जगतात चांगलंच रुजलंय. घरात म्हणाल तर ’नेहमी मीच का पडतं घ्यायचं?’ ही सिच्युएशन, हा हा हा! आम्ही ऑफिसमध्ये ओपन हाऊस सुरू केलंय, कोणीही या आणि भेटा. ह्यामध्ये अगदी नवीन मंडळीही आम्हाला भेटतात आणि त्यांच्या मनातली उगाचच असलेली भीती कमी होते. महिन्यातला एक दिवस सातत्याने भारतभरची सर्व वीणा वर्ल्ड टीम झूमवर एकत्र भेटते आणि पुढील एका महिन्याचा परामर्श घेते. थोडक्यात ’ऑन द सेम पेज’ येते. अशा अनेक गोष्टी सातत्याने केल्यावर कशाला स्ट्रेस महाशयांची एन्ट्री होईल ऑर्गनायझेशनमध्ये. प्रिकॉशन इज् ऑलवेज बेटर दॅन क्युअर.
खटकणारी गोष्ट, वस्तू, माणसं, संबंध याचं खरंच काहीतरी केलं पाहिजे. त्याचा विचार करण्यात, त्यावर शक्ती खर्च करण्यात, त्याच्या सतत तक्रारी करीत बसण्यात काहीच अर्थ नाही. एकतर त्याचं काहीतरी करावं नाहीतर सरळ खुल्या मनाने स्विकारावं, त्यात आनंद शोधावा आणि नंतर कधीही त्याची तक्रार करू नये. आणखी एक गोष्ट आम्ही वीणा वर्ल्डमध्ये पाळतो ती म्हणजे आपला देश आणि त्याविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचत बसायचं नाही. आपण आपल्या देशाप्रतीच्या कर्तव्याची जाणीव ठेवायची आणि पुढे चालत रहायचं. शांतपणे, आत्मविश्वासाने आणि आनंदाने.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
देखो अपना देश
दिल से! प्यार से! सम्मान से!
अडीच हजार किलोमीटर्स लांबीच्या हिमालयाचं आपल्या भारतातल्या तेरा राज्यांना वरदान लाभलेलं आहे. आज आपण युएसए मेक्सिकोमध्ये सिक्युरिटी वॉल बांधली जाण्याची शक्यता ऐकतो, पण आपल्या भारताच्या उत्तरेला विस्तीर्ण पसरलेला हिमालय एखाद्या भक्कम भिंतीप्रमाणे आपली रक्षा करतोय, शतकानुशतके. यासाठी देवाचे आणि हिमालयाचे आभारच मानायला हवेत. कारण हिमालयाचा जास्तीत जास्त भाग हा भारताला मिळाला आहे आणि भारतातल्या जम्मू काश्मीर राज्याला त्यातला चाळीस टक्यांपेक्षा जास्त भाग मिळालाय. काश्मीरच्या सौफ्लदर्यांला चार चाँद लागलेत ते हिमालयामुळेच आणि त्यातून निर्माण झालेल्या नद्या सरोवरांमुळे. कितीही संकटं आली, अतिरेकी कारवाया झाल्या, निसर्गाचा कोप झाला, नव्वदीत अगदी चौदा वर्षं काश्मीर बंद राहिलं तरीही काश्मीर कधी नामोहरम झालं नाही. अर्थात त्यात मोठा वाटा आपला सर्वांचाही आहे. आपण कधी काश्मीरला दुर्लक्षिलं नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा आपण काश्मीरला जात राहिलो. गेल्या आठ दहा वर्षांत तर काश्मीरमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले सध्याच्या सरकारने. त्यासाठी सरकारला धन्यवाद. आज जगातल्या सुप्रसिद्ध हॉटेल चेन्स काश्मीरमध्ये दाखल झाल्यायत. काश्मीर बदललंय आणि म्हणूनच आम्ही काश्मीरमध्ये पोहोचलो. काश्मीरसाठी आता पाच दिवसांपासून नऊ दिवसांपर्यंतच्या वेगवेगळ्या टूर्स आहेत. कुणाला एकाच हॉटेलमध्ये राहून रोज एक्स्कर्शन्स करायची असतात, तर कुणाला अगदी सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम अशा प्रत्येक ठिकाणी रहायचं असतं. कुणाला हाऊसबोट्स आवडतात, तर कुणाला त्या दुरून डोंगर साजरे वाटतात. कुणाला बेसिक हॉटेल्स चालतात, तर कुणाला फोर फाइव्ह स्टार... हाच मुद्दा होता आमच्या ह्या ‘मिशन काश्मीर' टूरचा. तो यशस्वी झाला आणि आम्ही 'काश्मीर फॉर एव्हरीवन' घेऊन सज्ज झालो आमच्या पर्यटकांसाठी आणि त्यांच्या समर व्हेकेशनसाठी. ग्रुप टूर्सना भरपूर डिमांड असली तरीही कस्टमाईज्ड काश्मीर हॉलिडे देण्यासाठीही टीम तयार आहे आणि काश्मीरच्या कॉर्पोरेट माइस टूर्स तर सुरू आहेतच. सो, चलो कश्मीर चलते हैं।
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
स्ट आफ्रिकेमधील टांझानिया हा देश त्याच्या विपुल वन्यसंपदेसाठी प्रसिध्द आहे. या देशात तुम्ही जसे गवताळ कुरणातले विविध वन्यजीव पाहू शकता, त्याचप्रमाणे सागरतळीच्या जैवविविधतेचा खजिनाही इथे आहे. आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत माउंट किलीमांजारो याच देशात आहे. या देशाची 30% भूमी नॅशनल पार्क्सनी आच्छादित आहे. सगळ्या जगात प्रतिचौरस मैल सर्वात जास्त वन्यप्राणी आढळणारा देश म्हणून टांझानिया ओळखला जातो. याच देशात आहे जगातील सर्वात मोठा निद्रिस्त ज्वालामुखी-गोरोंगोरो! सुमारे 20 ते 30 लाख वर्षांपूर्वी या ठिकाणी एका प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि नंतर त्याचा काही भाग आत कोसळून हे अतिप्रचंड विवर निर्माण झालं. या विवराची व्याप्ती 260 चौ.किमी. आहे तर याची खोली सुमारे दोन हजार फूट आहे. या विवराचा तळ समुद्रसपाटीपासून 5,900 फूट उंचीवर आहे. या ज्वालामुखीच्या विवराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि वेगळेपण हेच की या विवराच्या तळाशी तुम्हाला आफ्रिकेच्या जंगलातील सुप्रसिध्द ‘बिग फाइव्ह’ बघायला मिळतात. गोरोंगोरोच्या शेजारी असलेल्या सेरेनगेटी आणि मसाईमारा प्रमाणेच या विवराच्या तळाशी आफ्रिकेतील गवताळ कुरणाची इकोसिस्टीम तयार झालेली आहे. त्यामुळे ज्वालामुखीच्या पोटात उतरून वन्यप्राणी दर्शनचा अनोखा अनुभव तुम्हाला इथे घेता येतो. या ज्वालामुखीच्या विवराला आणि त्यावरुन इथल्या कॉन्झर्वेशन एरियाला जे नाव ‘गोरोंगोरो’ पडले आहे, ते या परिसरात हजारो वर्षांपासून राहणाऱ्या मसाई गुराख्यांमुळे. या गुराख्यांच्या गुरांच्या गळ्यातील घंटांचा जो नाद होतो ‘गरोंग गरोंग’ त्यावरुनच हे नाव प्रचलित झालं. 1979 मध्ये या परिसराचा समावेश युनेस्कोच्या विश्व वारसा यादीत करण्यात आला आहे. या परिसराचे एकमेव वैशिष्ट्य ज्वालामुखीच्या विवरातील वन्यजीव हेच नाही, तर या परिसरात सुमारे तीस लाख वर्षांपासून मानवी वस्ती होती, याचे पुरावे सापडलेले आहेत. या विवरामध्ये 1892 मध्ये पहिला युरोपियन पोहोचला. पुढच्या काळात दोन जर्मन भाऊ इथे राहून चक्की शेती आणि वन्यप्राण्यांची शिकार करत होते. 1928 मध्ये या विवरातील प्राण्यांची शिकार थांबवण्यासाठी कायदा करण्यात आला. या विवरामध्ये सुमारे 25,000 वन्यजीव सुखाने नांदतात, त्यामुळे टांझानियाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या यादीत गोरोंगोरोचा समावेश असतोच. ब्लॅक ऱ्हायनो, हत्ती, सिंह, रान म्हशी आणि बिबट्या हे प्रसिध्द बीग फाइव्ह तर या विवरातील अरण्यात आहेतच, पण त्याबरोबरच हिप्पोपोटॅमस, वील्डरबीस्ट, थॉमसन गॅझल असे बाकीचे वन्यप्राणी सुद्धा इथे मोठ्या संख्येनं आढळतात. आफ्रिकेच्या भेटीत गोरोंगोरो क्रेटरमधील वन्यजीवांचे अद्भुत विश्व बघायला विसरू नका.
आय ॲम द क्वीन
हेमलता पाटील, नाशिक
लगी अनेक वर्षं मी वीणा वर्ल्डच्या माध्यमातून जगभ्रमंतीचा अनुभव घेत आहे. आजवर मी युरोप, युएसए, जपान, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, थायलंड, सिंगापूर, मलेशिया यांसारखे अनेक देश फिरले आहे. भारतातलं म्हणाल तर दार्जिलिंग, नैनिताल, हरिद्वार, जिम कॉर्बेट, कुलू मनाली, अंदमान, स्टॅचू ऑफ युनिटी, अशा अनेक ठिकाणी मी जाऊन आले आहे. माझ्या वीणा वर्ल्ड सोबत जवळपास 40 टूर्स होत आल्या आहेत. नुकतीच डिसेंबरमध्ये मी राजस्थान मारवाडची जोधपूर जैसलमेर बिकानेर मंडावा ही टूर केली.
आमच्या नाशिकच्या चॉकलेट हॉलिडेज मधून मी माझं बुकिंग करते. आधी मी वर्षभरात 6 ते 7 टूर्स करायचे. त्यातल्या तीन चार भारतातल्या असायच्या तर दोन तीन परदेशातल्या. गेल्या वर्षी एप्रिल नंतर आठ महिन्यांनी मी डायरेक्ट डिसेंबरमध्ये टूरला गेले. मलाच चुकल्याचुकल्यासारखं वाटलं.
वीणा वर्ल्डच्या वुमन्स स्पेशल टूर्स या मला फार आवडतात. त्यामुळे मी बहुतेकदा वुमन्स स्पेशल टूर्स सोबतच जाते. या टूर्स म्हणजे आपल्या घरातल्या चिंता आणि ताणतणाव मागे सोडून आपल्याला नवीन जगात घेऊन जातात. तिथलं वेगळं जेवण, आगळी संस्कृती, लोकांचं राहणीमान, या वैविध्यपूर्ण गोष्टींचा अनुभव आपल्याला मिळतो, नवीन उत्साह संचारतो. कधीकधी आपल्या वर्तुळाच्या बाहेर पडलो की आपली दुःख छोटी वाटायला लागतात. आपण स्वत:ला लकी वाटायला लागतो. शिवाय या टूर्सवर असणाऱ्या ड्रेस कोड मुळे खरेदी करायला उत्साह येतो. कुटुंबासोबत जायचं म्हटलं की काही बंधनं येतात, पण फक्त बायकांची टूर असली की जोक्स, डान्स, पार्टी, फॅशन शो या सगळ्या गोष्टी जास्त खुलेपणाने करता येतात.
वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर अगदी मुंबईला फ्लाईट्सपासून आमच्यासोबत असतात. त्यामुळे एकटं वाटत नाही. प्रत्येक महिला जास्तीत जास्त कम्फर्टेबल कशी असेल याकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं. शिवाय त्यांच्या व्हेइकल्स उत्तम आणि कम्फर्टेबल असतात. ते चांगल्या तऱ्हेने ठिकाणांची माहिती देतात, रोजचा दिनक्रम आदल्या दिवशी आणि सकाळी सांगतात, शिवाय त्या त्या ठिकाणचे लोकल गाईड्सही असतात, त्यामुळे त्या त्या ठिकाणची वैशिष्ट्यं कळतात. खरोखरच पैसे वसूल होतात.
भारतातली काश्मीरची टूर माझ्या विशेष लक्षात राहिली आहे. त्याचं कारण म्हणजे आम्ही दिवाळीच्या सुमारास तिथे होतो आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात आम्हाला घराची आठवणही होऊ दिली नाही त्यांनी. भारताबाहेरची माझी सर्वात आवडती टूर होती ती म्हणजे जपान चेरी ब्लॉसम. शिवाय 99000 मध्ये युरोप पहा या वीणा वर्ल्डच्या पहिल्या युरोप टूरवर सुद्धा आम्ही जाऊन आलो होतो. या सहली माझ्या अगदी हृदयाच्या जवळच्या आहेत. आता 19 जानेवारीला तिसऱ्यांदा केरळला चालले आहे. प्रत्येक टूरवरून मी नव्याने उत्साहाने परत येते. प्रत्येक टूर मला भरभरून आनंद देते.
प्राइव्हेट हॉलिडे आयडियाज्
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत
इमॅजिन करा की सिंगापूरच्या केबल कारमधल्या प्रायव्हेट केबिनमध्ये तुम्ही रोमँटिक डिनर घेताय तुमच्या खास व्यक्तीसोबत... डॉल्फिन आयलँडवर तुम्ही डॉल्फिनसोबत पोहताय... किंवा तुमच्या हॉटेलमधल्या बेडवर पडल्यापडल्या अंडर वॉटर व्ह्यू पहायला मिळेल अशा ओशन स्यूट मध्ये तुम्ही राहताय.
येस येस...बट वेट.. हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला सिंगापूरला जावं लागेल. सिंगापूर हा प्रत्येक पर्यटकाला भुरळ घालणारा देश आहे. एकेकाळी हा देश नसून हे एक छोटसं बेट होतं. पण आज मात्र हा देश जगातल्या सगळ्यात श्रीमंत आणि विकसित देशांपैकी एक देश आहे. या देशात असलेले विविध थीम पार्क्स, सहकुटुंब फिरता येतील अशी अनेक आकर्षक ठिकाणं, राहण्यासाठी उपलब्ध असलेले अनेक पर्याय आणि स्ट्रीट फूडची मेजवानी या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सिंगापूरला जायलाच हवं.
तुम्हाला झू कीपर म्हणून अनुभव घ्यायचा असेल तर एक दिवस तुम्ही सिंगापूर झू मध्ये झू कीपर म्हणून अनुभव घेऊ शकता. तुम्हाला सुगंधाचं वेड असेल तर सेंटोपियामधलं परफ्यूम्स तयार करण्याचं वर्कशॉप तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जाईल. जर तुम्हाला साहसी गोष्टी करायला आवडत असतील तर सेंटोसा बेटांवर चित्तथरारक अशा ल्युज राईडचा अनुभव घेऊन पहा. जरा हटके काही करायचं असेल तर प्रायव्हेट यॉट चार्टरने सिंगापूरचे सदर्न आयलँड एक्सप्लोअर करा किंवा पुलाऊ उबिन मॅन्ग्रोव्ह फॉरेस्ट मध्ये जाऊन कायाकिंगचा अनुभव घ्या. तुम्ही जर अस्सल खवय्ये असाल तर सिंगापूरमधल्या हॉकर्स सेंटर मध्ये चिली क्रॅब, लाक्सा अशा काही लोकल डिशेस खाऊन बघा. मिशेलिन स्टार रेस्टोरंट्स मध्ये गॉर्मेट डायनिंगचा अनुभव घ्या किंवा सिंगापूर झू मधल्या वाईल्ड एरिया मध्ये ब्रेकफास्ट करायला मिळाला तर? मजा आएगा! सिंगापूरमध्ये तुम्हाला रहायला सुद्धा अनेक ऑप्शन्स आहेत. तुम्ही मरिना बे सँड्स वर राहू शकता आणि क्षितीजाच्या पार पाहत इन्फिनिटी पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेऊ शकता. आणखी एक हटके ऑप्शन म्हणजे तुम्ही सेंटोसा आयलँडवर कॅपेला सिंगापूर हॉटेल्समध्ये प्रायव्हेट पूल व्हिलाज मध्ये राहू शकता. तुम्ही जर व्हिंटेज मूडमध्ये रमणारे असाल तर रॅफल्समध्ये कलोनिअल स्टाईलने राहून जुन्या काळातला चार्म अनुभवू शकता किंवा सेंटोसामधल्या ‘द ट्री टॉप वॉक‘ इथे ट्री टॉप लॉफ्ट्समध्ये राहू शकता.
जर तुम्हाला शॉपिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर अफोर्डेबल फॅशन आउटलेट्स पासून लक्झरी बुटिक्स पर्यंतची शॉपिंगची रेंज तुम्हाला ऑर्चर्ड रोडवर मिळेल. अशा अनेक अनोख्या गोष्टी आहेत सिंगापूरमध्ये करण्यासारख्या. तेव्हा तुम्हाला जर सिंगापूर प्रायव्हेट हॉलिडे बुक करण्यासाठी मदत हवी असेल तर आजच वीणा वर्ल्डच्या कस्टमाइज्ड हॉलिडे टीमशी संपर्क साधा.
वीणा वर्ल्ड कस्टमाइज्ड हॉलिडेज्साठी आजच संपर्क साधा: 1800 22 7979 l customizedholidays@veenaworld.com
व्हॉट्स ट्रेन्डींग
अराऊंड द वर्ल्ड?
निसर्गाच्या सौंदर्याचा एक अनोखा अविष्कार म्हणजे चेरी ब्लॉसम. जपान, तैवान, कोरिया आणि चीन या देशांमध्ये हा उत्सव आपल्याला पाहता येतो. चेरी ब्लॉसम म्हणजेच जपानी भाषेत साकुरा. जपानच्या सुंदरतेचं वर्णन करायचं झालं तर ते साकुरा शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. नाजूक गुलाबी, पांढऱ्या फुलांनी बहरलेली साकुराची झाडं आणि पारंपरिक किमोनो घालून येणाऱ्या सुंदर जपानी तरुणी अशा रम्य वातावरणात, संगीत आणि निसर्गाच्या सानिध्यात तिथले लोक एक दिवस घालवतात. हनामी म्हणजे चेरी ब्लॉसम पाहण्याची पारंपरिक प्रथा. यावेळी या झाडांच्या खाली पिकनिक किंवा स्पेशल टी पार्टीचं आयोजन केलं जातं. पिंक थीम असलेले फूड अँड ड्रिंक्स यावेळी सर्व्ह केले जातात. एखाद्या स्वप्नातल्या जगात आल्याचा हा अनुभव आपण मार्च एप्रिलमध्ये अनेक आशियाई देशांमध्ये घेऊ शकतो. तर मग तुम्ही ह्या वर्षी कोणत्या देशात अनुभवताय हा अनोखा चेरी ब्लॉसमचा सोहळा?
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.