...त्यांना मोटिवेट केलं तर ते अजून अशी थिएटर्स आपल्या शेजारी बांधतील, भले रस्ते फूटपाथ पाणी वीज चांगली हवा अन्न ह्याची वानवा असली तरी करमणूकीत आपण मागे पडता कामा नये...
Published in the Saturday Lokasatta on 20 April, 2024
रविवार हा आम्ही शुक्रवार बनविलाय. पुर्वी नाही का बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड मध्ये शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित व्हायचे आणि `फर्स्ट डे फर्स्ट शो’ बघण्यात अनेक जण आनंद मिळवायचे. आमचे शेजारी योगेश आणि कल्पना शहा दर शुक्रवारी एक सिनेमा किंवा नाटक बघायचेच. अजूनही त्यांनी ती सवय जोपासलीय. आम्ही किती तरी वेळा त्यांच्या या सवयीचा अंगिकार करायचा प्रयत्न केला पण बऱ्यापैकी अयशस्वी ठरलो. तरीही आम्ही त्यांचा आदर्श समोर ठेवलाय आणि वुई आर लुकिंग फॉरवर्ड टू धिस ‘वीकली वन मूव्ही‘. हे मिशन शक्य करायचा प्रयत्न करतोय. सिनेमा थिएटरमध्ये जाऊन त्या मोठ्या स्क्रीनवर मुव्ही बघण्यात, डॉल्बी साऊंड ऐकण्यात आणि पॉपकॉर्न वा स्टीम कॉर्न खाण्यात जो आनंद आहे तो घरी मिळणं केवळ अशक्य. आपली इच्छा जेवढी जोरदार असते नं तेवढी ती पूर्ण करण्याच्या किंवा होण्याच्या पॉसिबिलिटीज वाढतात. बॉलिवूडमधला अोम शांती अोम चित्रपटातला डायलॉग आठवला, ‘केहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।‘ आमच्या बांद्रयात दहा मिनिटांच्या पेरिफेरीत तीन मॉल्स आहेत आणि त्यात एकूण वीस थिएटर्स. आता माझ्यासारख्या चित्रपट प्रेमीने आणखी काय बरं अपेक्षा करायची आणि आता जर ‘आठवड्याला थिएटरमध्ये एक मुव्ही बघायची‘ ही इच्छा पूर्ण करू शकलो नाही तर मग माझ्यासारखी कर्मदरिद्री मीच नाही का. आणखी दहा वर्षानंतर दोष देत बसायचं नाही. ‘थ्री इडियट्स‘ मधला डॉयलॉग आठवला, ‘लेटर हाथ मेें था टॅक्सी गेट पे थी, जरा सी हिम्मत कर लेता नं, साली लार्इफ कुछ और होती।’ आता जो माझ्यासाठी असा होऊ शकतो, भविष्यात जर मी माझं मिशन पूर्ण करू शकले नाही तर, ‘थिएटर बाजू में था, गाडीकी जरूरत भी नहीं थी, जरा सी हिम्मत करती, प्लॅनिंग करती तो साली जिंदगी बॉलिवूडकी खुशियोंसे भरी होती!‘ आणि मला थिएटरची आणि मॉलवाल्यांची पण काळजी आहे. आपण जर थिएटरमध्ये गेलोच नाही तर कोसळतील न ते. अपना फर्ज बनता है त्यांच्या इकॉनॉमिला हातभार लावणं. केवढं ते आपल्यासाठी करताहेत नाही का, आणि आपण त्यांना आठवड्याला किमान एक मूव्हीचं योगदान द्यायला काय हरकत आहे. आपल्यालाही थोडा चेंज. सुधीरला हे माझे उच्च विचार जेव्हा मी ऐकवले तेव्हा त्याचं म्हणणं ‘वीणा तू गेली नाहीस म्हणून थिएटर्स बंद पडणार आहेत का?‘ नेहमी प्रमाणेच मी माझं म्हणणं आणखी रेटलं, ‘अरे जसं आता इलेक्शनचा सीझन आहे आणि छोटयांपासून अगदी उच्चपदस्थांपर्यंत प्रत्येक राजकारणी किती मेहनत घेताहेत प्रत्येक माणसाने मतदान केलं पाहिजे ह्यासाठीच नं. एक एक मत महत्वाचे आहे सुधीर, तसंच ह्या थिएटर्ससाठी माझं योगदानही महत्वाचं आहे. बुंद बुंद से बनता है सागर आणि हो, ही तुला पैशाची उधळपट्टी वाटत असेल तर आपण सुट्टीच्या दिवशी मॉर्निंग शो बघूया. पैसे कमी, गर्दी कमी, थिएटर मस्त, आनंद जास्त (ही आमच्या जाहीरातीतली लाइन, सीझनच्या शब्दा जागी मी ‘थिएटर‘ शब्द टाकला). पण आयुष्याच्या साठीला तरी आपण कल्पना भाभी सारखी एक मूव्ही बघूया आठवडयाला आणि आपली राहिलेली इच्छा पूर्ण करूया’. एवढं इमोशनली घेतल्यावर सगळ्याच नवरेबुवांप्रमाणे सुधीरने, 'ॲज यु से, काय एकेक फॅडं येतात डोक्यात' म्हणत डोक्यावर हात मारत पण रविवार सकाळी नऊ वा दहा वाजताच्या शो ची तिकीटं काढायला सुरुवात केली. मैं अटल हूँँ, सॅम बहाद्दर, ओपनहायमर, बार्बी हा गेल्या सहा महिन्यातला रीझल्ट. हळू हळू 'वन मूव्ही पर वीक' ला पोहोचू आम्ही. कुठचीही सवय लावताना घाई करायची नाही. थोडं सबुरीनं घ्यायचं हे शिकलेय मी आता.ऑफिसमध्ये लंच टेबलवर कामांचे विषय काढायचे नाहीत शक्यतो हा दंडक असल्याने आपल्या आयुष्यातल्या दुसऱ्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे एंटरटेनमेंट आणि खाणं याकडेच गप्पा जातात. गेल्या काही दिवसात `लापता लेडीज‘ नावाच्या चित्रपटाची चर्चा कानावर येत होती. सुनिला बघून आली आणि `तू जाच, मस्तच आहे मूव्ही’ म्हणाली तेव्हा लंच टेबल इन्फ्लुएन्सर्सचा प्रभाव पडलाच आणि सुधीरला म्हटलं, `चलो इस संडे जाते हैं, वर्ल्ड प्लाझा मध्ये सकाळी नऊ वा दहा चा शो बघ. जास्त चांगलं थिएटर आणि सकाळच्या शो चे पैसेही कमी‘. सुधीर म्हणतो, `सकाळचा शो नाहीये. रात्री दहाचा आहे’. `नो नो रात्रीची जागरणं नको. लेट्स ाय वर्ल्ड ाइव्ह‘. `तिथेपण सकाळी नाहीये. संध्यांकाळी सहाचा पण तिकीट तेराशे रुपये प्रत्येकी’. हूsss उगाच जास्त पैसे कशाला हे मनात पण `संध्यांकाळी सहा म्हणजे खूपच गर्दी असेल मॉलमध्ये. नको नको. मार्केट सिटी बघ‘. `दुपारी एकचा शो आहे रविवारी, तिकिटही रीझनेबल आहे’. `अरे देवा, दुपारच्या जेवणाचे बारा वाजले की‘. सुधीरने अल्टिमेटम दिला, `वीणा हा बहुतेक शेवटचा आठवडा दिसतोय, फिल्म आता थिएटर्समधून जाईल. काय ते ठरव नाहीतर येईलच काही दिवसात अोटीटी वर, तेव्हा बघ’. `नाही नाही. मूव्ही चांगला आहे थिएटरमध्येच बघायचा‘. एक दिवस ॲडजस्ट करू करत आम्ही घरातली सगळी जनता रविवारी दुपारी एकच्या शो ला गेलो. लंच टाइम इन्फ्लुएन्सर्सचा पगडा बघा किती तो. पण चित्रपट खूपच छान होता, हलका फुलका होता, तरीही इंटेलिजन्ट होता. काही प्रश्न मनात उभे करून गेला. चित्रपट चांगला होता म्हणून आम्ही प्लाझा वरून ाइव्ह, ाइव्ह वरून मार्केट सिटी अशा आमच्या चॉइसेसना मुरड घालत गेलो. नुस्तं थिएटरच नाही तर वेळेचं कॉम्प्रोमाइजही केलं. कंटेन्ट चांगला असेल, प्रॉडक्ट चांगलं असेल तर लोक येतात. हा किस्सा आमच्या दर महिन्याच्या ऑल इंडिया मिटिंगमध्ये आम्ही सर्वांशी शेअर केला. जसा चांगला चित्रपट प्रेक्षकांना खेचून आणतो तशी आपली चांगली टूर घेण्यासाठी पर्यटक कुठूनही येतील. प्रॉडक्ट चांगलं करण्याला, टूरवर त्याची डीलव्हरी अतिशय उत्कृष्टरित्या करण्याला आपण सर्वाधिक महत्व देऊया. त्यादुष्टीने प्रयत्न करूया. आपल्याला कधीही मागे वळून पहावं लागणार नाही. कधी चुका झाल्याच तर लागलीच सुधारूया, पुन्हा त्या होऊ नको देऊया, `लापता लेडीज’ चित्रपट आणि त्याच्याशी सलंग्न असलेला हा घटनाक्रम मॅनेजमेंट थिअरी शिकवून गेला. आणि हो तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर जरूर बघा. आणि थिएटरमध्ये जाऊन बरं का? थिएटर्स वाचवायची आहेत नं आणि त्यांच्या मालकांचा बिझनेसही वाढला पाहिजे. त्यांना मोटिवेट केलं तर ते अजून अशी अनेक थिएटर्स आपल्या शेजारी बांधतील, जास्त दूरही जायला नको. भले आपल्याला रस्ते फूटपाथ पाणी वीज चांगली हवा अन्न ह्याची वानवा असली तरी करमणूकीत आपण मागे पडता कामा नये. किती उच्च विचार नाही का, हाहाहा... `लापता लेडिज‘ मध्ये हरवलेल्या मुलींची स्टोरी आहे. छान तऱ्हेने उलगडत गेली आहे ती कहाणी. हरवण्याचा फायदा होऊ शकतो असाही एक विचार हा चित्रपट देऊन जातो.हरवणं हा वेगळाच विषय आहे. कुणी गलतीसे मिस्टेक करीत हरवतात तर कुणी कुणाच्यातरी निष्काळजीपणामुळे हरवतात. कुणी अनोळखी ठिकाणी खरोखरच हरवतात. टूर्सवर कधी कधी हरविण्याचे प्रकार होतात किंवा व्हायचे चान्सेस असतात म्हणूनच आमचे टूर मॅनेजर्स सतत `फॉलो द ग्रुप, सूचना, डीरेक्शन्स, फ्लॅग आणि येलो टी शर्टधारीकडे लक्ष असू द्या’, हे सांगत असतात. हरवल्यामुळे सर्वांनाच होणारा मनस्ताप टाळण्यासाठीची ही सावधगिरी. पण माणसं हरवतात किंवा आपणही आयुष्यात कधीतरी कुठेतरी हरवलो असू. आठवून तर पहा कधी आपण हरवलो होतो ते आणि काय आपली मनस्थिती झाली होती त्यावेळी. हरवण्यापेक्षा आपल्या माणसांना गवसल्याचा आनंद जास्त असायचा, आनंदाचा परमोच्च बिंदूच जणू. आणि त्यासाठी कधीतरी हरवायलाच हवं. पण आता मेला तो हरवण्याचा आनंद सुद्धा ह्या टेक्नॉलोजीने हिरावून नेलाय. मोबाइलमुळे कोण कुठे कधी ह्यातलं सगळं सरप्राइजच निघून गेलंय. नाही म्हणजे चांगलंच आहे ते. मला खूप वर्षांपूर्वी सिंगापूर शहरात लिहिलेली एक पाटी आठवली, `आमच्या देशात तुम्ही कधीही हरवूच शकणार नाही, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शक पाट्या दिसतील त्याला फॉलो करा, तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला विनासायास पोहोचाल‘. परफेक्ट. एखाद्या देशामधल्या सोयी सुविधा अशाच असायला हव्यात. पण आयुष्यात एखादी व्यक्ती कधीही कुठंही हरवली नसेल तर सापडण्यातल्या आनंदाला ते मुकले असंच म्हणावं लागेल.`हाय कंबख्त तूने तो पी ही नहीं’ पुन्हा एकदा हा बॉलिवूडचा पगडा.हरविण्याची कला आत्मसात करता येईल का? हो, म्हणजे आता नॅचरली ते होणार नसेल तर त्यातला आनंद अनुभवण्यासाठी आपल्याला जाणून बुजून हरवून घ्यावं लागेल. मग ते कधी `लॉस्ट इन द वूड्स‘ असेल, कधी `लॉस्ट इन द फॉरेस्ट’ असेल, कधी `लॉस्ट इन द बूक‘ असेल, तर कधी `लॉस्ट इन थॉट्स’. गरज आहे ह्याची. ज्यावेळी आपण स्वत:ला असे कम्प्लीटली लॉस्ट करू तेव्हाच आपण स्वत:ला शोधू आणि त्यातला अनोखा आनंद अनूभवू शकू. मात्र त्यासाठी त्या मोबाईल नावाच्या आपल्या घनिष्ट मित्राला `लॉस्ट’ करून ठेवायला पाहिजे. दिवसातले काही तास तरी तो किंवा आपण कुणीतरी लापता झालं पाहिजे एकमेकांपासून
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरीता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.