Published in the Sunday Sakal on 09 March, 2025
मागच्या वर्षी फेब्रुवारीत सॅनफ्रान्सिस्कोला गेले होते दहा दिवसांसाठी आमच्या धाकट्या मुलाला राजला भेटायला. कुठे जायचं असलं की एक बरं असतं, कामं अगदी धडाधड उरकली जातात. वेळ कमी असतो तेव्हा आपण जास्त ऑर्गनाइज्ड बनतो. त्या कारणासाठीही मला अधूनमधून प्रवासाला जायला आवडतं. तेव्हा त्या दहा दिवसांमध्ये थोडंफार ऑफिसचं काम करावं लागलं तरी बऱ्यापैकी वेळ राजसोबत घालवायला मिळणार होता. सोळा तासांचा विमानप्रवास. एअरपोर्टला निघताना विचार केला त्या पुढच्या आठवड्याची दोन्ही न्यूजपेपर आर्टिकल्स लिहूया. एक दोन चांगले चित्रपट बघूया आणि सात आठ तासांची मस्त झोपही घेऊया. एअर रिझर्वेशन्स टीममधल्या सुपर्णा जाधवने पहिल्याच रो मधली सीट बुक केली होती, त्यामुळे आता सीट कुठची मिळेल हा ही प्रश्न नव्हता कारण इंडिव्हिज्युअल तिकीट होतं. एअरपोर्टवर काऊंटरला पोहोचले. बॅग दिली आणि समोरची मुलगी बोर्डिंग पास देण्याची वाट बघत मी उभी होते. काऊंटर पाठच्या मुलींमध्ये काहीतरी खुसफूस सुरू झाली. एकीने जाऊन तिच्या सिनियरला आणलं आणि त्याने ॲपॉलॉजीच्या स्वरूपात बोलायला सुरुवात केली. ’तुम्ही ज्या सीटचं बुकिंग केलंय त्या सीटच्या केबिनचं दार लागत नाहीये.’ एवढंच नं! मग सीट बदलून द्या माझी. ’तोच प्रॉब्लेम आहे, फ्लाइट फुल्ल आहे. एक सीट आहे थर्ड रो मध्ये पण अनफॉर्च्युनेटली त्याचं ट्रे टेबल चालत नाहीये.’ आता मात्र थोडं इरिटेशन डेव्हलप व्हायला लागलं. म्हणजे ॲक्च्युअली मला चॉईस नाहीये. खराब दार पाहिजे की खराब ट्रे टेबल हे मला ठरवायचं आहे. `अरे यार प्रवासाच्या सुरुवातीलाच तुम्ही माझा मूड घालवलात. एवढे दिवस आधी बुकिंग केल्याचं हे फळ आहे का?’ माझा आवाज थोडासा चिरका झालेला मला जाणवला. मी कुणी व्हीआयपी नाही पण CIP म्हणजे कमर्शियली इम्पॉर्टंट पर्सन असल्याने आणखी दोन सिनियर्सनी येऊन पुन्हा तेच सांगितलं. इलाज काहीच नव्हता हे लक्षात आलं होतं. लिखाण करायचं होतं त्यामुळे थर्ड रो मधली सीट मी नाकारली आणि मुकाट माझी ओरिजनल सीट द्यायला त्यांना सांगितलं. कितीही नाही म्हटलं तरी थोडासा मूड ऑफ झाला होता. चलो देखो आगे आगे होता है क्या, म्हणत मी मजल दरमजल म्हणजे सिक्युरिटी इमिग्रेशन बोर्डिंग करीत माझ्या सीटवर जाऊन स्थानापन्न झाले. लक्ष सारखं त्या न चालणाऱ्या आणि टेपने बंद केलेल्या माझ्या केबिनच्या दाराकडे जात होतं. आता त्यांनी सांगितलं म्हणून की काय पण उठता बसता लक्ष तिथेच जात होतं आणि मन खट्टू होत होतं की आपल्या केबिनचं दार लागत नाहीये. विमानातले पहिले आठ तास मी लिखाणात घालवले. नंतर दोन जपानी सिनेमे बघितले. तेवढ्या वेळात मला एकदाही दार लावावंसं वाटलं नाही. आधीच विमान कॉम्पॅक्ट, त्यात एकही सीट रिकामी नाही म्हणजे त्या एवढ्याशा विमानात माणसं अगदी काठोकाठ भरलेली. तिथे कुठे मी आणखी केबिनचं दार लावून क्लॉस्ट्रोफोबिया ओढवून घेऊ? फ्लाइट अटेंडंट टीम एकदम मस्त होती. आम्हाला मनापासून सर्व्हिस देत होती. ‘विमानप्रवासात भरपूर पाणी पीत रहा, कीप युवर बॉडी हायड्रेटेड’ या सूचनेनुसार मी नेहमीच विमानप्रवासात भरपूर पाणी पिते. त्यात जर गरम पाणी मिळालं तर नथिंग लाइक इट. दर अर्ध्या तासाने एअरहोस्टेस मस्त गरम पाणी आणून देत होती. शक्यतोवर विमानात खायचं नाही किंवा खाल्लं तरी सॅलड फ्रुट्स असं हलकं काहीतरी. एकदा तर न्यूयॉर्क-सिंगापूर या जगातल्या लाँगेस्ट फ्लाइटमध्ये एकोणीस तासात मी काहीही खाल्लं नव्हतं. आपला स्वत:वर आणि भूकेवर किती कंट्रोल आहे ते आजमवण्याचा हा प्रकार. आणि कोणतंही क्रेव्हिंग न होता तो लाँगेस्ट जर्नी मी सहजपणे पार पाडला. असो, तर या वेळीही फ्लाइट अटेंडंटने फ्रुट्स व सॅलड आणून दिलं. लिखाण, सिनेमे आणि झोप असा माझा सोळा तासांचा प्रवास मजेत संपन्न झाला आणि मी सॅनफ्रान्सिस्कोला लँड झाले. फ्लाइट क्रू मध्ये बरेच टीम मेंबर्स मराठी होते. त्यांच्या टीम लीडर ना मी म्हटलं ‘अरे, माझा प्रवास इतका मस्त झाला, सर्व काही छान होतं, सोळा तास कसे गेले ते कळलंही नाही. फक्त एकच कर तुझ्या मुंबई एअरपोर्ट टीमला कळव की कशाला आधी मला हे दाराचं प्रकरण सांगितलं, मूड घालवून टाकला अगदी एन्ट्रीलाच. त्यांनी सांगितलं नसतं तर कदाचित माझ्या लक्षातही आलं नसतं, आणि माझा मूडही चांगला राहिला असता. तिथे चेकइनला सांगण्यापेक्षा विमानात सांगायचं नं. अर्थात माझा प्रवास मस्तच झाला तेव्हा ऑल इज वेल!’ ते असं म्हणाले की,’हे दार खराब झालं आहे हे आमच्या लक्षात आल्यावर ते पॅसेंजरला सांगणं भाग आहे. कधीकधी अदरवाईज विमानात हंगामा होतो आणि ते चांगलं नाही’. एकंदरीत त्यांचं ‘कधी सांगायचं पॅसेंजरला‘ आणि माझं ‘कधी‘ हे वेगवेगळं होतं. त्यांच्यापरीने त्यांचं ‘कधी‘ बरोबर होतं आणि एका पॅसेंजरच्या परीने माझं ‘कधी‘ बरोबर होतं. दोघांच्या दृष्टीकोनातून हा फरक निर्माण झाला होता.
ॲक्च्युअली ह्या प्रवासात मी पॅसेंजर होते त्यामुळे माझा दृष्टीकोन पॅसेंजरचा होता. जेव्हा आम्ही वीणा वर्ल्डवाले असतो तेव्हा आम्ही सुद्धा एअरलाइनवाला दृष्टीकोन घेऊनच गोष्टींकडे बघतो. आमचा व्यवसाय संपूर्णपणे डिपेंन्डंट. कधी एअरलाइन्स बदलतात, कधी कुठे नैसर्गिक आपत्ती ओढवते, कधी एखाद्या मोठ्या इव्हेंटमुळे सहलीचा कार्यक्रम बदलावा लागतो तर कधी गव्हर्न्ामेंट मुव्हमेंटमुळे सगळी हॉटेल्स गव्हर्न्ामेंटने घेतल्यावर टूर आयटिनरीमध्ये हॉटेल स्टे शफल करावे लागतात. अशा वेळी आम्ही पर्यटकांना पूर्वसूचना वा कल्पना देतो जेणेकरून पर्यटकांना कोणतंही सरप्राइज नको. अर्थात अशा अपरिहार्य वेळी चांगले सबस्टिट्यूट्स देण्याचा पायंडा असल्यामुळे पर्यटकांचा मूड जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो. ’पर्यटकांना कधी सांगायचं?’ जनरली लागलीच सांगायचं आणि त्याचं सोल्यूशनही द्यायचं ही पद्धत आम्ही वीणा वर्ल्डमध्ये अवलंबतो.
’कधी?’ ही गोष्ट आयुष्यात फार महत्वाची आहे. आपल्याला आपल्या आईबाबांनी कधीतरी एखादं कांड केल्यावर सुनावलेलं असतंच, ’तुला नं कधी कुठे काय बोलायचं ह्याचं भान म्हणून नाही.’ मला तर खूपदा हे ऐकायला मिळालंय. कधी कधी छडीच्या प्रसादासह, तेव्हा कुठे थोडं शहाणपण आलं. नंतर मात्र व्यवसायच असा मिळाला की ’कधी?’ ह्या गोष्टीचं भान सतत ठेवावंच लागलं. म्हणजे पूर्वी मी टूर मॅनेजर असताना किंवा आता आमच्या टूर मॅनेजर्सना ’कधी?’ याचं भान नसलं तर आली की पंचाईत. टूरचेच बारा वाजतील. म्हणजे बघानं टूरवर एखादी आनंदाची बातमी आमचा टूर मॅनेजर रडक्या चेहऱ्याने देतोय किंवा एखादी मोठी अडचण आणि त्यामुळे होणारा त्रास हसऱ्या चेहऱ्याने सांगतोय तर काय होईल? म्हणजेच हसायचं कधी आणि रडायचं कधी हे जर टूर मॅनेजरला कळलं नाही तर होणाऱ्या परिणामांची कल्पनाच केलेली बरी. पण जगभरातील म्हणजे अगदी अंटार्क्टिकापासून अंदमानपर्यंत सप्तखंडातील सहली याक्षणीही अगदी आनंदात सुरू आहेत त्यामुळे आमच्या ह्या तीनशेहून अधिक टूर मॅनेजर्सना ’कधी?’चं महत्व कळलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
पूर्वी मी टूर मॅनेजर असताना पर्यटकांना एक सल्ला देत असे माझ्या अनुभवांतून तो असा की, एखादी गोष्ट कधी करावी असा प्रश्न तुम्हाला पडेल शॉपिंग, भोजन आणि बाथरूम हॉल्ट या गोष्टींच्या बाबतीत, तर एक साधा मंत्र लक्षात ठेवा. ’खाऊ की नको?’ असं वाटलं की अजिबात खाऊ नका. पोट थोडं रिकामं राहिलं तर बरंच आहे. बाथरूम हॉल्टसाठी आपण बस थांबवतो तेव्हा अर्धी बस खाली उतरते आणि अर्धेजण ’जाऊ की नको?’ असा विचार करतात, त्याचक्षणी तो विचार सोडून द्यायचा आणि जाऊन यायचं बाथरूमला. आणि तिसरं म्हणजे शॉपिंंग करताना एखादी वस्तू आपल्याला आवडते पण आपण ’इथे घेऊ की पुढे घेऊ?’ हा विचार करतो आणि ती वस्तू तिथेच सोडून देतो. पुढे प्रवासात ती वस्तू कुठेही मिळत नाही आणि संपूर्ण टूरवर डोक्यात ती वस्तू घोळत राहते. आपण स्वत:ला कोसत राहतो आणि मूड घालवतो. त्यामुळे ’घेऊ की नको?’ हा प्रश्न आला की घेऊन टाकायची वस्तू आणि मुक्त व्हायचं त्यातून.
आता एवढं सगळं ज्ञान इथे कथन केल्यावर तुम्हाला वाटेल किती आखीव रेखीव असेल नाही माझं आयुष्य... पण कसलं काय. मी पण एक माणूसच नं. दीड वर्षापूर्वी पोर्तुगालला गेले होते. प्रत्येक ठिकाणाहून एक काहीतरी चांगली मोठी सोविनियर वस्तू आणून घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवायची ही माझी सवय, जेणेकरून त्या आनंदी आठवणी सदैव डोळ्यासमोर राहतात. मला पोर्तुगालची ओळख असलेला रंगीबेरंगी रूस्टर घ्यायचा होता. फातेमा श्राईनच्या समोरच्या दुकानात तो मला मिळालाही पण पुढे जास्त चांगला मिळेल हा विचार करीत मी तो घेतला नाही. फातेमानंतर मी आणि माझी मैत्रिण शिल्पा गोरे आम्ही सिंत्रा, लिस्बन, अलगार्व्ह... पोर्तुगालच्या प्रत्येक शहरात तो रुस्टर शोधत होतो. शेवटी एके ठिकाणी मिळालेला पांढरा रुस्टर घेऊन दुधाची तहान ताकावर भागवली. पण संपूर्ण टूरवर कलरफूल रूस्टर माझ्या नजरेसमोरून हटत नव्हता, अगदी आजही मला तो आठवतो. आता पुन्हा पोर्तुगालला जाऊन तो आणेपर्यंत काही खरं नाही. एका छोट्या ’कधी?’ ची महती न जाणल्यामुळे किती हा आर्थिक फटका!
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
देखो अपना देश
दिल से! प्यार से! सम्मान से!
श्रीरामाची जन्मभूमी अयोध्या आणि श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा ज्या राज्यात आपल्याला पहायला मिळते ते राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी तर कानपूर हे इथलं सगळ्यात मोठं शहर. गंगा, यमुना, घाघरा, गोमती, शरयू या भारतातल्या प्रमुख पवित्र नद्या उत्तर प्रदेशातून वाहतात. याशिवाय गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम आपल्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे पहायला मिळतो. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा दर 12 वर्षांनी प्रयागराज इथे आयोजित केला जातो. पवित्र गंगा नदीकाठी वसलेलं भारतातील एक अध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणजे वाराणसी. इथलं काशी विश्वनाथ मंदिर भगवान शंकराला समर्पित असलेलं स्थळ आहे. इथे आपण मंत्रमुग्ध करणाऱ्या गंगा आरतीचा अनुभव घेऊ शकतो. मणिकर्णिका आणि दशाश्वघाट हे इथले धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध घाट आहेत. हे शहर बनारसी सिल्क साड्यांसाठीही प्रसिद्ध आहे. जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल हा उत्तरप्रदेशात आग्रा इथे आहे.
या राज्यातल्या अवधी, मोगलाई आणि भोजपुरी पाककृती या केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. टुंडे कबाबी, आग््राा येथील पेठा, बदामी पुरी, लखनौ बिर्याणी, मालपुआ या इथल्या प्रसिद्ध डिशेस. एखाद्या व्यक्तीने फक्त वाराणसीमध्ये फूड टूर करायचं ठरवलं तर एक दिवस कमी पडेल इतके वैविध्यपूर्ण पदार्थ इथेच मिळतात. कचोरी सब्जी, टमाटर चाट, बाटी चोखा, चुरा मटार, चेन्ना दही वडा, मलाईयो, बनारसी ठंडाई, लस्सी, बनारसी पान हे त्यापैकी काही खास पदार्थ. जगप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यप्रकार कथक हाही मूळचा उत्तर प्रदेशचा. हे राज्य भारत नेपाळच्या सीमेवरचं राज्य आहे. अयोध्येच्या राममंदिराच्या बांधणीनंतर या भागातले रस्तेही आधीपेक्षा सुस्थितीत आले. राम मंदिरात झालेल्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर गेल्या वर्षीपासून इथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढायला लागली आहे. यातून पर्यटनाशी निगडीत व्यवसाय वाढीस लागावेत म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. अशा या कला आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध राज्यात भटकायचं असेल तर वीणा वर्ल्ड सोबत चला उत्तर प्रदेशच्या टूरवर.
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
ब्रिटिश सरकारने भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांवर केलेल्या अमानुष अत्याचारांचा मूक साक्षीदार असलेली सेल्युलर जेल ही वास्तू आज भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक म्हणून उभी आहे. भारतापासून हजारो किलोमीटर अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी स्वातंत्र्यलढ्यातल्या सैनिकांच्या सॉलिटरी कन्फाईनमेंटसाठी हे जेल बांधले होते. अनेक क्रांतिकारकांच्या स्फूर्तीदायक कथा या वास्तूत जतन केल्या आहेत. कैद्यांचा एकमेकांशी नजरानजर वा संवाद होणार नाही याची खबरदारी घेत हे कारागृह बांधलं होतं. त्यांच्यात एकी होऊन, त्यांनी ब्रिटिशांविरोधात बंडखोरी करू नये यासाठी कारागृहाची अशी रचना करण्यात आली होती. ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ या नावाचाच भारतीयांमध्ये दरारा होता. यात कैद्यांना मूळ भूमीपासून तोडले जाई, त्यांचे सर्व हक्क काढून घेतले जात, त्यांची ओळख आणि सोशल कनेक्शन्स कैदी गमावून बसत. म्हणूनच ही शिक्षा त्याकाळी मृत्यूदंडापेक्षा भयानक मानली जाई.
जेलच्या मूळ रचनेत मधोमध एक वॉचटॉवर आणि त्यातून निघणाऱ्या सात विंग्स होत्या. प्रत्येक विंगमध्ये तीन मजले आणि प्रत्येक मजल्यावर 21 कोठड्या होत्या. कारागृहात 694 स्वतंत्र खोल्या होत्या. यातल्या काही दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी उध्वस्त झाल्या. आज यापैकी तीन विंग्स बाकी आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी लोकांनी अंदमान आयलँडवर ताबा मिळवून ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय कैद्यांना टॉर्चर करण्यासाठी सेल्युलर जेलचा वापर केला. काळकोठडीच्या शिक्षेशिवाय कैद्यांना नारळाचं तेल काढायला घाण्याला जुंपलं जाई. लाकडं फोडायला सांगितली जात. बांधकामासाठी खडी फोडायला लागे. जर यात कैद्यांकडून काही चूक झाली तर त्यांना फटके मारले जात किंवा लोखंडी साखळदंडाने बांधून उभे केले जाई. शिवाय त्यांना उपाशी ठेवलं जाई. या काळात महावीर सिंग, मोहन किशोर नामदास आणि मोहित मोईत्रा अशा अनेक क्रांतिकारकांनी अमानुष छळाविरुद्ध उपोषण केलं. काही जणांचा यात मृत्यूही झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेल्युलर जेलमधल्या राहिलेल्या 3 विंग्ज आणि सेंट्रल वॉचटॉवरचं फेब्रुवारी 1979 साली राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्यात आलं. जेलमध्ये एका विशिष्ट ठिकाणी कैद्यांना फाशी दिली जात असे. याही परिस्थितीत इथे कैद असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी एकमेकांना संदेश पाठविण्याचे काही खास मार्ग शोधून काढले. काहींनी कपड्यांच्या तुकड्यांवर लिहून गुप्त संदेश पाठवले. काहींनी तिथे काम करत असलेल्या काही दयाळू कामगारांच्या मदतीने या नोट्स बाहेर पाठवल्या. या पत्रांमुळे देशात स्वातंत्र्यलढ्यात लढणाऱ्या क्रांतिकारकांना जेलमधल्या भीषण वास्तवाची माहिती समजण्यास मदत झाली. आज सेल्युलर जेलमध्ये अभिनेते ओम पुरी यांच्या आवाजात इथल्या कैद्यांच्या गोष्टी आणि ब्रिटिश शासनाने स्वातंत्र्यसैनिकांवर केलेल्या अत्याचारांचे वर्णन करणारा साउंड अँड लाईट शो आयोजित केला जातो. तुम्हालाही जर अंदमानला जायचं असेल तर वीणा वर्ल्डच्या फॅमिली, वुमन्स स्पेशल किंवा सिनियर्स स्पेशल टूरवर चला!
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन
100 Country Club
पर्यटन म्हणजे स्वत:चा शोध...
वीणा वर्ल्ड सुरु झाल्यापासून मी त्यांच्याबरोबर टूर्स करतेय. मी युरोपला जाऊन आले, जपान सिंगापूर मलेशिया ह्या टूर्ससुद्धा केल्या. आपला भारत आणि भारताच्या बाहेरचा निसर्ग बघायला मला आवडतं. तसं बघायला गेलं तर मला फिरायलाच खूप आवडतं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माणसं भेटतात, तिथली संस्कृती कळते.
मी अनुराधा भिडे, मिरजला राहते. मी आणि माझे पती असे दोघेच राहतो. दोन्ही मुलींची लग्नं झालीयेत. मी सांगलीचे सेल्स पार्टनर 'नंदिनी ट्रॅव्हल्स' कडून टूर्स बुक करते. पहिल्यांदा मी माझ्या मिस्टरांबरोबर श्रीलंका टूर केली होती. पण त्यानंतरच्या सगळ्याच ट्रिप्स मी सोलो किंवा मैत्रिणींबरोबर केल्या. आजवर मी 16 देश फिरले आहे. वीणा वर्ल्डबरोबर जायचं असल्याने तशी काही फार तयारी वगैरे करावी लागत नाही. 'चलो, बॅग भरो, निकल पडो, वीणा वर्ल्ड के साथ!' या त्यांच्या टॅग लाईनप्रमाणे खरंच मी फक्त बॅग भरते आणि निघते टूरवर जायला! तरी डेस्टिनेशन निवडल्यावर, वीणा वर्ल्डकडून आयटेनरी मिळते त्यावरून जिथे जायचं तिथलं वेदर कसं आहे त्याप्रमाणे मी कपडे घेते. तिथलं एखादं माझ्या बकेट लिस्टमधलं ठिकाण पाहण्यासाठी काही विशेष तयारी असेल तर ती सुद्धा करते आणि निघते टूरला जायला. बऱ्याचदा मी एकटीच टूरवर जाते. तसंही वीणा वर्ल्डच्या कोणत्याही ग्रुप टूर बरोबर असले की रूम पार्टनर मिळण्याची गॅरंटी असतेच. मी युरोप टूर केली तेव्हा मला संपूर्ण युरोपच खूप आवडला. तिथला निसर्ग, आर्किटेक्चर्स, कला, स्वच्छता आणि त्या देशांमधली शिस्त अगदी वाखाणण्यासारखी आहे.
खरंतर प्रत्येकच टूर मेमोरेबल असते. त्यामुळे सगळ्याच टूर्स लक्षात राहण्यासारख्या असतात. त्यातही सांगायचं तर एकदा माझ्या नातीला घेऊन सिंगापूर-मलेशियाला गेले होते. ती टूर, तिथलं वातावरण, सगळंच लक्षात राहण्यासारखं होतं. एकदा मी सेव्हन सिस्टर्स करत होते आणि नेमका त्याचवेळी माझ्या मुलीचा इथे महाराष्ट्रात ॲक्सिडेंट झाला. तर एखाद्या फॅमिली मेंबरप्रमाणे सुनील केणी आणि प्रवीण मोरे या टूर मॅनेजर्सनी मला खूप मदत केली. म्हणजे अगदी फ्लाइट बुक करून देण्यापासून ते फ्लाइटमध्ये बसवून देण्यापर्यंत, आपल्या माणसासाठी आपण जे काही करू ते सगळं आमच्या टूर मॅनेजरने केलं. त्यांच्यातला आपलेपणा भावला मला. आता मला कंबोडिया, व्हिएतनाम बघायचंय.
ज्यावेळी मी टूरला जाते, त्यावेळी वातावरण बदलाबरोबरच आजूबाजूच्या निसर्गाचा अनुभव घेणं, स्वतःबरोबर राहणं, हे मला मनापासून आवडतं. अशावेळी मी स्वतःशी बोलू शकते आणि हे बोलणं मला जास्त महत्वाचं वाटतं. वीणा वर्ल्डबरोबर जाण्याचं माझं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे इथे मला अनुभवता येणारा ‘मोकाटपणा’ हे आहे. एकदा त्यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवली की मी हुंदडायला मोकळी असते, आणि हे असं मुक्तपणे फिरणं मला मनापासून आवडतं.
अनुराधा भिडे, मिरज
प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत - पॉप्युलर आयलंड गेटअवेज्
तम्हाला जर का शांत समुद्रकिनाऱ्यांवर विश्रांती घ्यायची असेल, रंगीबेरंगी कोरल रीफ्समध्ये डुबकी मारायची असेल किंवा अगदी समृद्ध संस्कृती देखील अनुभवायची असेल, तर जगभरात असलेली एक-से-एक आयलंड्स तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात. मग तो फॅमिली हॉलिडे असो किंवा रोमँटिक गेटअवे, या एक्झॉटिक आयलंड हॉलिडेज्चा अनुभव घ्याच.
मालदीव: l इथल्या लक्झुरियस ओव्हरवॉटर विलाज् मध्ये राहण्याचा भन्नाट अनुभव घ्या. ह्या विलाज् मधून तुम्हाला समुद्राला डायरेक्ट ॲक्सेस मिळतो.
l सीप्लेनने तुमच्या हॉटेलला पोहोचण्याचा अनोखा अनुभव घ्या.
l निळ्याशार पाण्यात वसलेल्या खासगी सँडबँकवर रोमँटिक पिकनिकचा आनंद घ्या.
l इथा आणि SEA या अंडरवॉटर रेस्टॉरंट्समध्ये मरिनलाईफ पाहत जेवणाचा आस्वाद घ्या.
मॉरिशस: l कसेला नेचर पार्कमध्ये अक्षरशः सिंहांसोबत चालण्याचा थरारक अनुभव घ्या.
l हेलिकॉप्टर फ्लाइट घेऊन मॉरिशसचं आल्हाददायक निसर्गसौंदर्य आणि इथल्या `ल मोर्न’ येथे असलेला प्रसिद्ध अंडरवॉटर वॉटरफॉलचं इल्युजन पहा.
l ट्रान्स्परन्ट बबल लॉजमध्ये राहून तारकांनी भरलेल्या आकाशाखाली चांदण्यात झोपण्याचा अनुभव घ्या.
सेशल्स: l जगातील सर्वात मोठ्या कोरल अटोल्स पैकी एक असलेल्या `अल्दाब्रा’ ॲटोलमध्ये स्नॉर्कलिंग करण्याचा अनुभव घ्या.
l `ला दिग’ आयलंडवर मऊ पांढऱ्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यावर पहुडा.
l `ईल मोयेन’ आयलंडवर फिरताना विशाल कासव पहा आणि निर्जन समुद्रकिनाऱ्यावर पिकनिक एन्जॉय करा.
फुकेत आणि क्राबी: l `फांग न्गा बे’मध्ये प्रायव्हेट यॉट किंवा लाँगटेल बोटीवरून सनसेट क्रूझ एन्जॉय करा.
l फुकेत एलिफंट सँक्च्युरीमध्ये हत्तींसोबत चालण्याचा अनुभव घ्या, सोबत त्यांना फीड करा आणि त्यांच्या पुनर्वसनाबद्दल देखील जाणून घ्या.
l निसर्गाच्या सान्निध्यात एमराल्ड पूल आणि गरम पाण्याच्या स्प्रिंग्समध्ये रिलॅक्स करा.
l रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या बायोल्युमिनसेंट प्लँक्टन्ससोबत पोहण्याचा जादुई अनुभव घ्या.
बाली: l उबुदमधे राईस टेरेसच्या दृश्यांनी नटलेल्या प्रायव्हेट पूल व्हिलामध्ये रहा.
l `नुसा लेम्बोंगन’ आणि `नुसा पेनीदा’ आयलंड्सवर स्नॉर्कलिंग आणि स्कुबा डायव्हिंगचा थरार अनुभवा.
l अयुंग नदीवर व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थ्रिल्लिंग एक्सपीरियन्स घ्या.
l बालीच्या प्रसिद्ध लक्झरी बीच क्लबमध्ये रिलॅक्स करा आणि समुद्राच्या लाटांसोबत संध्याकाळ एन्जॉय करा.
l माउंट बटुरच्या शिखरावर सनराइज पाहण्यासाठी ट्रेकिंग करा आणि व्होल्कॅनोच्या उष्णतेवर शिजवलेल्या ब्रेकफास्टचा अनोखा आस्वाद घ्या.
l प्रसिद्ध `बाली स्विंग’सारख्या इंस्टाग्रामेबल ठिकाणांना भेट द्या.
ह्यापैकी बहुतेक आयलंड डेस्टिनेशन्सवर व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो, त्यामुळे शेवटच्या क्षणीही आपल्या हॉलिडेचं प्लॅनिंग करणं सोप्पं होतं. चला तर मग, तुमचा ड्रीम आयलंड हॉलिडे प्लॅन करायला आता आणखी उशीर करू नका. वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज् टीम आहेच तुमच्या दिमतीला!
विविड सिडनी
हा सिडनी, ऑस्ट्रेलियातला लाईट, म्युझिक तसंच आयडियाज आणि खाद्यपदार्थांशी निगडित सर्वात मोठा फेस्टिव्हल आहे. या वर्षी 23 मे ते 14 जून दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं आहे. फेस्टिव्हलचं हे पंधरावं वर्षं आहे. हा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा इव्हेंट रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई आणि 3D प्रोजेक्शन्सच्या सहाय्याने सिडनी ऑपेरा हाऊस आणि सिडनी हार्बर ब्रिज यांसारखी शहरातील प्रतिष्ठित ठिकाणं उजळवून टाकतो. यात स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश असलेले लाईव्ह म्युझिक इव्हेंट्स होतात. तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनपासून कला, डिझाईन अशा विषयांवर चर्चा, वर्कशॉप्स होतात. स्ट्रीट फूड मार्केट्सपासून डायनिंग इव्हेंट्सपर्यंत खाद्यपदार्थांचे ऑप्शन्स ट्राय करता येतात. गेल्या वर्षी फेस्टिव्हलला आजवरचा सर्वाधिक रिस्पॉन्स मिळाला. अनेक ॲवॉर्ड्सनी गौरवला गेलेला `विविड सिडनी महोत्सव’ यावर्षी तुम्हालाही आमंत्रित करतोय तुमच्या कल्पनेपलीकडचा विचार करायला, नवनवीन अनुभव घ्यायला आणि युनिक आयडियाज् मध्ये हरवून जायला. अधिक माहितीसाठी www.veenaworld.com ला भेट द्या.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.