All Veena World Sales Offices will be open from 10 AM to 8 PM from 1st to 31st March, including Sundays!

IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10AM - 8PM

स्वीकार लो...

18 mins. read

Published in the Sunday Sakal on 23 March 2025

इन्स्टाग्रामर्स, यु ट्यूबर्स, पॉडकास्टर्स, इन्फ्लूएन्सर्स सगळे मिळून सध्या एकच गोष्ट प्रमोट करताहेत आणि ती म्हणजे टूरिझम. कुणीतरी कुठेतरी गेलंय आणि तिथल्या मस्त मस्त फोटोज आणि व्हिडियोजनी सोशल मिडीया भरून गेलाय. आयुष्यात `समथिंग टू लूक फॉरवर्ड टू‌’ असं काहीतरी आपल्याला सतत हवं असतं आणि त्या ‌‘लूक फॉरवर्ड टू‌’ च्या गोष्टींमध्ये टूरिझमने अग्रस्थान पटकवलंय आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही आनंदाच्या बिझनेसमध्ये आहोत. चाळीस वर्षं ह्या टूरिझममध्ये घातल्यावर असं वाटतं की कुणीतरी कधीतरी कुठेतरी पर्यटन करावंच. घराचा उंबरठा ओलांडावा, गावाची वेस मागे टाकावी, राज्याच्या बाहेर काय आहे ते बघावं, देशाची सीमा पार करावी, साता समुद्रापार जाण्याची मनिषा बाळगावी. ‌‘केल्याने देशाटन... मनुजा चातुर्य येतसे फार‌’ हे सुभाषित जेव्हा टूरिझमला सुरुवातही झाली नव्हती त्यावेळीचं आहे. आयुष्यात जे काही थोडंफार यश मिळविण्याची माझी मानसिकता तयार झाली ती टूरिझममुळे, आपला भारत आणि जग पिंजून काढल्यामुळे. त्यामुळे प्रत्येकाने टूरिझम हे आपल्या महत्वाच्या गरजांमध्ये समाविष्ट करावं. कुणाबरोबरही जा, इंडिव्हिज्युअली जा, सोलो ट्रॅव्हलर बना, पण रूटीनमधून बाहेर पडा, निसर्गाकडे जा, मॅनमेड वंडर्स बघून थक्क व्हा, इतिहासात रमून जा, भूगोलाचे चमत्कार अनुभवा, वेगवेगळ्या राज्यांच्या, देशांच्या लोककला- संस्कृती-परंपरा जाणून घ्या, आत्मविश्वास वाढवा. आनंदी आठवणींचा लाइव्ह अल्बम तयार करा. आपल्यापैकी अनेक जण ह्या पीक सीझनमध्ये प्रवासाला निघतील. सध्या आमचेही हजारो पर्यटक देशविदेशात पर्यटन करताहेत. असं म्हणता येईल की `आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार...‌’. हे हे करावं जर तुम्ही पर्यटनाला बाहेर पडणार असाल तर. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या एनर्जी लेव्हल्स हाय ठेवण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी गरज असते ती शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्याची. शारिरीक स्वास्थ्यात पटकन असा फारसा बदल करता येणार नाही. फार फार तर काही इन्स्टंट एनर्जी टॅब्लेट्‌‍स आपल्या फिजिशियनला विचारून सोबत ठेवल्या तर, ज्याला माझा विरोध आहे, पण इनकेस. माझ्या दृष्टीने पर्यटनात शारिरीक स्वास्थ्य उत्तम ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं बिन पैशाचं, बिना साइड इफेक्टचं टॉनिक आहे,  ते म्हणजे `मन करा रे प्रसन्न‌’. मन प्रसन्न तर शरीर सुदृढ आणि शरीर ठणठणीत तर पर्यटनाचा आनंद दुगना, पैसा वसूल.

दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जर पर्यटनाला निघालोच आहोत तर जरा मिरवून घेवूया. स्वत:वर प्रेम करूया. छान दिसूया. खूप खर्च करायला पाहिजे असं काही नाही पण असलेल्या कपड्यांमध्येच छान छान कॉम्बिनेशन्स बनवूया. अजून खरेदी केली नसेल तर चांगल्या ब्रँडची मिड्साइज फोर व्हीलर सुटकेस किंवा त्याचीच छोटी स्ट्रोलर जी विमानात केबिनमध्ये घेता येईल अशी आणि एक क्रॉस शोल्डर पर्स किंवा छोटी हॅवरसक ह्याचा सेट करूनच ठेवायचा. मी माझा अर्धा जगप्रवास फक्त केबिन बॅग, त्यावर टोट बॅग आणि क्रॉस शोल्डर पर्स ह्यावर केलाय आणि तरीही स्मार्ट ट्रॅव्हलरचा लूक अबाधित ठेवला बरं का. एकदा पर्यटनाची सवय लागली की आपण घरात शांत बसू शकत नाही, म्हणूनच चांगल्या बॅगांच्या सेटबरोबर दुसऱ्या गोष्टींचे सेट्‌‍स आपल्याला सोबत ठेवायचेत ते म्हणजे एकदम कम्फर्टेबल स्पोर्टस शूज, स्टाइलिश सनग्लासेस, घडी करता येईल अशी स्मार्ट हॅट, बॉलिवूड स्टार्ससारखे फोटो जे काढायचे असतात. तुम्ही दूरदेशी जाणार असाल आणि विमानप्रवास मोठा असेल तर खास विमानप्रवासासाठी थोडेसे लूज कपडे घाला. हल्ली कॉडसेट्‌‍स निघालेत ते चांगले. विमानप्रवासात पायात सॉक्स आणि अंगावर जॅकेट किंवा चांगला स्वेटर घालूनच घ्यावा. कधी कधी विमानातलं टेंपरेचर खूपच थंड असतं. ओढणीवाले पंजाबी ड्रेस-साडी ह्याला प्रवासात सोडचिठ्ठी द्या. सडंसुटं मोकळं फिरा. आपला हात कॅमेऱ्यावर आणि डोळे सभोवताली असले पाहिजेत. चांगला स्मार्टफोन आणि इंटरनॅशनल रोमिंग कार्ड हे अगदी मस्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे फोन हरवू नये म्हणून सरळ फोन लटकविण्यासाठी जी क्रॉस शोल्डर स्लिंग बॅग मिळते ती घ्यावी. तुमच्या क्रॉस शोल्डर पर्समध्ये जाईल अशी छोटीशी वॉटरबॉटल सुद्धा सोबत ठेवायची. परदेश प्रवास असेल तर पासपोर्ट ही महत्वाची आणि जोखमीची गोष्ट. त्याची काळजी घेणं अतिमहत्वाचं. पासपोर्ट पाऊचमध्ये पासपोर्ट घालून ते कपड्याच्या आत ठेवणं बरेच जण पसंत करतात. पण आम्हाला आमचा कपड्यांचा लूक खराब करायचा नसतो नं, तेव्हा मग क्रॉस शोल्डर पर्स वा छोट्या हॅवरसॅक मध्ये अगदी आतल्या खणात पासपोर्ट व करन्सी ठेवणं चागलं. पर्स कधीही आपल्यापासून दूर करायची नाही. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तुमची पर्स तुमच्यापासून लांबवण्याचे अनेक प्रकार आता देशात-जगात कुठेही कधीही घडताहेत. खबरदारी घेणं आपलं काम.

कपडे काय घ्यावे ह्या बाबतीत आता खूपच अवेअरनेस आलाय. छोटी घडी होणारे, बॅगेतली कमी जागा व्यापणारे, मिक्स ॲन्ड मॅच करून फ्रेश स्मार्ट लूक देणारे कपडे असावेत. पर्यटक आता थंड हवेच्या प्रदेशासाठी आणि ट्रॉपिकल वा थोडया वॉर्म डेस्टिनेशनवाल्या प्रदेशासाठी दोन सेट्‌‍स तयारच करून ठेवायला लागले आहेत. जिथे जायचं तिथलं हवामान बघून तो सेट सोबत घेऊन निघायचं एवढं ते आता पर्यटकांच्या अंगवळणी पडलंय. ॲक्चुअल पर्यटन सुरू असताना फोटोज काढणं, फोटोरुपात आठवणी जमवणं हा आपल्या पर्यटनाचा गाभा असला तरी आपण पर्यटनस्थळी गेल्यावर आपल्या डोळयांनी ती गोष्ट बघणं ह्याला अग्रक्रम देऊया. एक दोन फोटो काढल्यावर मोबाइल आत ठेवूया. डोळ्यांमध्ये ते सौंदर्य साठवूया, कान नाक डोळे टच फील ह्या सगळ्यांनी मिळून त्या पर्यटनस्थळाची मजा लुटूया. त्यासाठीच तर एवढे पैसे आणि वेळ खर्च करून आपण तिथे गेलोय. 'खाऊ की नको, जाऊ की नको, घेऊ की नको' ही मी निर्माण केलेली एक थिअरी आहे जी पर्यटनात प्रचंड उपयोगी येते. प्रवासात शरीर हलकं असणं गरजेचं आहे त्यामुळे `खाऊ की नको‌’ असा प्रश्न आला की खाणं थांबवायचं. बस जेव्हा टॉयलेट हॉल्ट साठी थांबते तेव्हा आपण `जाऊ की नको‌’ असा `टू बी ऑर नॉट टू बी' चा गहन विचार करायला लागतो त्यावेळी ह्या साध्या गोष्टीसाठी एवढा विचार करायची गरज नाही हे लक्षात घेऊन जाऊन यायचं, नाहीतर होतं काय की आपण गरज नाही म्हणून बसमध्ये बसतो, सर्वजण जाऊन परत आले की आपलं मन कच खातं आणि आपण पटकन आलोच हं म्हणत जातो आणि सर्वांचाच खोळंबा करतो. तिसरी गोष्ट खरेदीची. `घेऊ की नको‌’ असं वाटलं की किंमत क्वालिटी बघून घेऊन टाकावी ती वस्तू.  पुढे मिळेल ह्याची काय गॅरंटी. त्या प्रवासात रुखरुख नाही लावून घ्यायचीय आपल्याला.

ज्यावेळी आपण पर्यटन करतो त्यावेळी आपण आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करीत असतो. आपण एक पर्यटक म्हणून कसे वागतो ह्यावर संपूर्ण भारताविषयीचं मत आपण परदेशात निर्माण करीत असतो. त्यामुळे तिथले नीतीनियम आणि इंटरनॅशनल नॉर्म्स पाळणं हे आपले कर्तव्य बनून जातं. एकदा मी अगदी सुरुवातीला विमानात `सीट बेल्ट्‌‍स ऑन'ची साइन सुरू असताना वरच्या केबिन बॅगेतून काहीतरी घेण्यासाठी उभी राहिले आणि तो सुपरवायजर माझ्यावर एवढ्या मोठ्याने अक्षरशः खेकसला की मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. अर्थात पुन्हा आयुष्यात कधीही ती चूक मी केली नाही. एकदा अलास्काच्या केटचिकन आयलंडवर आम्ही एक शो बघत होतो. छोटी छोटी मुलं काय मस्त परफॉर्मन्स देत होती. शो संपल्यावर त्यातल्या सुपर परफॉर्मन्सवाल्या मुलीला मी हॅन्डशेक करीत काँग्रज्युलेट केलं आणि तिची आई जी काय कडाडली माझ्यावर, ‌‘डोन्ट टच माय चाइल्ड‌’ की मी उभ्या उभ्या हादरले. तेव्हापासून शपथ घेतली असं कुणाला हॅन्डशेक करणं, गाल ओढणं वगेरे आपलं भारतीय ममत्व आपल्याजवळच ठेवायचं. एकदा अमेरिकेत ऑरलँडो डिझ्नी पार्कमध्ये लाइनमध्ये उभं असताना आमच्यातल्या एका कपलमध्ये तू तू मैं मैं झाली. तिथल्या पोलिसांनी नेलं की उचलून दोघांनाही. त्यांचा गुन्हा काय तर ‌‘सोशल डेकोरम‌’ बिघडविण्याचा. एकदा न्यूझीलंडमध्ये अशीच तू तू मैं मैं. तिथे पतीला एका तुरूंगात तर पत्नीला दुसऱ्या तुरूंगात ठेवलं त्यांनी आठ दिवस. पोलिसांचं म्हणणं, ते दोघं एकत्र राहणं योग्य नाही. आपलं मोठ्या आवाजातलं बोलणं वा तू तू मैं मैं अडचणीत आणते ती अशी. हल्ली अशी हमरीतुमरी एअरपोर्टवर केली तर कायदेशीर कार्यवाही केली जाईल असे बोर्ड तुम्ही पाहिले असतील. मागे एका टूरवरून एका हॉटेलचा मेसेज आला `तुमच्या ग्रुपमधल्या दोन रुम्स पर्यटक अतिशय डर्टी स्वरूपात सोडून गेलेयत. आम्ही आता इंडियन ग्रुप्सना हॉटेल द्यायचं की नाही हा विचार करतोय‌’. एक दोघांचं बिहेवियर संपूर्ण देशाला दावणीला बांधतं ते असं. म्हणून आपण प्रत्येकाने आपली रूम स्वच्छ स्वरूपात सोडली तर आपण आपल्या देशाचं नाव अव्वल ठेवण्यात निश्चितच मदत करू शकू.

सध्या जमाना एकदम अनप्रेडिक्टेबल झालाय. फ्लाइट कॅन्सल होणं, डीले होणं, मिस होणं, एखादं साइटसीइंग व्हीआयपी मुव्हमेंटमुळे वा अपरिहार्य कारणास्तव बंद होणं, ओव्हर टूरिझममुळे गर्दी उसळणं, थंडी वारा पावसाने आपल्या दिवसाची दैना उडवणं, एअरलाईनमध्ये बॅगा हरवणं, एखाद्या ठिकाणाचे नियम बदलणं, ह्या आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी घडताहेत. अशावेळी पेशन्स आणि पॉझिटिव्ह अप्रोच फार महत्वाचा असणार आहे. तेव्हा आपल्या सगळ्या ग्रंथ पुराणात शिकविल्याप्रमाणे एक ॲटिट्यूड अंगी बाळगूया, ‌‘स्वीकार लो‌’ आणि मग मार्गक्रमणा करूया. कितीही मोठी अडचण असली तर मार्ग निघतोच. चाळीस वर्षांचा माझा अनुभव आहे. सो.. हॅप्पी जर्नी, डोन्ट वरी बी हॅप्पी! हकुना मटाटा!


देखो अपना देश दिल से! प्यार से! सम्मान से!

सिक्कीम हे नॉर्थ ईस्ट मधलं हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक छोटसं सुंदर राज्य आहे. उंच पर्वत, सर्वदूर पसरलेले हिरवेगार चहाचे मळे हे इथलं डोळे सुखावणारं चित्र. सिक्कीमचा जवळपास 40% भाग जंगलाने व्यापलेला आहे. इथे आपल्याला तिबेटी संस्कृतीचं दर्शन घडतं. सिक्कीमच्या पूर्वेला भूतान तर पश्चिमेला नेपाळ हे देश आहेत. उत्तरेला चीनची सीमा आहे. गंगटोक हे इथलं सर्वात मोठं, राजधानीचं शहर. गंगटोकपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर बर्फाच्छादित डोंगररांगांनी वेढलेला त्सोगमो म्हणजेच चांगू लेक हा हाय अल्टिट्यूड ग्लेशिअल लेक आहे. या लेकचा रंग वातावरणातल्या चढउतारामुळे वर्षभर बदलत राहतो. समरमध्ये लेक निळाशार असतो तर थंडीत गोठलेल्या बर्फासारखा शुभ्र. पेलिंग हे सिक्कीमच्या पश्चिमेला वसलेलं आकर्षक शहर आहे. हे कांचनजंगाच्या मोहक दृश्यांंसाठी ओळखलं जातं. या शहरात अनेक मॉनेस्ट्रीज आहेत तसंच वॉटरफॉल्स आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी सुद्धा हे शहर प्रसिद्ध आहे. सिक्कीमच्या खाद्य संस्कृतीवर इथल्या वैविध्यपूर्ण परंपरांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. सिक्कीम राज्य त्याच्या जैव विविधतेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. इथल्या वैविध्यपूर्ण वनस्पती, अल्पाईन मिडोज्‌‍ सब ट्रॉपिकल जंगल्स या गोष्टी लक्ष वेधून घेतात. रेड पांडा, स्नो लेपर्ड, आणि ब्ल्यू शीप या दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती इथल्या उंचावरच्या भागात आढळतात. इथे तिबेटी मोमोज म्हणजेच भाज्या किंवा मांसाचं स्टफिंग असलेले डपलिंग, थुक्पा म्हणजे भाज्या किंवा मांस घालून बनवलेले नूडल्स सूप प्रसिद्ध आहे. भाताबरोबर सर्व्ह केली जाणारी फागशापा ही पोर्क डिश आणि सेल रोटी म्हणजे सणासुदीच्या दिवशी खाल्लंं जाणारं एक पारंपरिक नेपाळी राईस डोनट हे पदार्थही खास आहेत. सिक्कीममधली प्रेक्षणीय स्थळं पहायची असतील, ट्रेकिंग आवडत असेल, तर मार्च ते जून दरम्यान इथे आल्हाददायक वातावरण असतं. हिमालयीन लँडस्केप्सचा क्लिअर व्ह्यू पहायला आणि ट्रेकिंगसाठी जात असाल तर मार्च ते जून हे महिने बेस्ट आहेत. आणि जर बर्फ पाहण्यासाठी तुम्ही इथे जाणार असाल तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे महिने खास राखून ठेवा. प्रत्येक सीझनमध्ये हॅपनिंग असलेल्या आपल्या सिक्कीम राज्याला आवर्जून भेट द्याच!


अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

तम्हाला देवांची निर्मिती ज्या ठिकाणी झाली ती जागा माहितीये? हे एक असे शहर आहे जे कोणी निर्माण केलं हेही एक रहस्यच आहे. मेक्सिको शहराच्या ईशान्येला सुमारे 50 किलोमीटर अंतरावर तेओतिउआकान हे प्री कोलंबियन अमेरिकेतील सगळ्यात मोठ्ठं रहस्य आहे. हे शहर इथल्या अद्भुत पिरॅमिड्स आणि अर्बन प्लॅनिंगसाठी ओळखले जाते. तेओतिउआकान या नावाचा नाहुआट्ल भाषेतला अर्थ 'ज्या ठिकाणी देवांची निर्मिती झाली ती जागा' असा होतो. याचा अविश्वसनीय इतिहास जतन व्हावा म्हणून 1987 साली युनेस्को तर्फे हे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. ख्रिस्तपूर्व 100 व्या वर्षापर्यंत तेओतिउआकान हे हजारो लोकांचं घर होतं. अत्याधुनिक आर्किटेक्चर, ग्रीड बेस्ड स्ट्रीट सिस्टिम आणि इथले सूर्य आणि चंद्राचे भव्य पिरॅमिड्स यासाठी हे शहर त्याकाळात प्रसिद्ध होतं. हे शहर अझटेकच्या पूर्वीचे आहे. कोणत्याही विशिष्ट समुदायात इथे राहणाऱ्या लोकांचं मूळ सापडत नाही आणि म्हणूनच ती नेमकी कुठून आली होती याबद्दल काहीच उत्तरं मिळत नसल्याने याबद्दलचं गूढ उकलत नाही. तुम्ही जर तेओतिउआकान या ठिकाणी भेट देणार असाल तर मेसो अमेरिकेमधली सर्वात प्रतिष्ठित पिरॅमिडसपैकी एक मानला जाणारा सन पिरॅमिड अवश्य पहा. आकाराने सर्वात मोठं असलेलं हे सन पिरॅमिड काही खगोलीय घटना सूर्याशी कशा प्रकारे संबंधित आहेत याच्या अभ्यासासाठी बांधलं गेलं. त्याशिवाय ‌‘ॲव्हेन्यू ऑफ द डेड‌‘ च्या उत्तरेकडील टोकाला आपल्याला मून पिरॅमिड पहायला मिळतो. हा पिरॅमिड 'गॉडेस ऑफ मून' म्हणजेच चांद्रदेवीशी निगडीत आहे. हा सुद्धा अशाच पद्धतीने चंद्रकलांचा अभ्यास करण्यासाठी बांधला गेला. हे पिरॅमिड्स त्याकाळी धार्मिक आणि खगोलशास्त्रीय हेतूंसाठी वापरले गेले असावेत.

तेओतिउआकान मधून जाणारा मुख्य रस्ता 'अव्हेन्यू ऑफ द डेड' म्हणून ओळखला जातो. इथे आपल्याला अनेक मंदिरे, राजवाडे आणि पिरॅमिड्स पहायला मिळतात. इथे 'टेम्पल ऑफ द फिदर्ड सर्पंट' हे  पंख असलेल्या क्वेटझलकॉटल या सर्पदेवतेला समर्पित असलेलं मंदिर आहे. तेओतिउआकान धर्मात या देवतेला महत्त्वाचं स्थान होतं. इथली आणखी एक भव्य वास्तू म्हणजे 'पॅलेस ऑफ जॅग्वार्स.' ह्या ठिकाणी आपल्याला जॅग्वार्स आणि इतर प्राण्यांची भित्तिचित्रे पहायला मिळतात. तेओतिउआकान शहराची शतकानुशतके भरभराट होत असताना त्याचा अचानक झालेला ऱ्हास हा खरंतर गूढ आणि अनाकलनीय आहे. याबद्दल काही शक्यता वर्तवल्या जातात पण याचं निश्चित कारण कुणाला ठाऊक नाही. काही विद्वानांच्या मते पर्यावरणाचे अतिशोषण, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास अशा कारणांनी हे शहर अस्ताला जाण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असावी. तुम्हाला जर हे ऐतिहासिक अद्भुत शहर बघायचं असेल तर तुम्ही आमच्या बेस्ट ऑफ हवाई मेक्सिको टूरमध्ये आवर्जून सहभागी व्हा


आय ॲम द बॉस!

मी माधवी मुतालिक, वय अवघे 84 वर्षं. माझा जन्म कर्नाटकमधल्या एका छोट्या तालुक्यातला. गेली अनेक वर्षं पुण्यात राहते. वयाच्या 78 व्या वर्षी मी फिरायला सुरुवात केली कारण घरी मी एकटीच असायचे. पण टूर्सवर जायला लागले आणि या टूर्सनी माझा एकटेपणा नाहीसा झाला. 78 व्या वर्षी माझी पहिली टूर होती वुमन्स स्पेशल केरळ. या टूरने मला स्वातंत्र्याची जाणीव करून दिली आणि मग मी मागे वळून पाहिलंच नाही. केरळनंतर सिंगापूर, मलेशिया, राजस्थान, कुल्लू मनाली, अंदमान-निकोबार,  जपान, युरोप अशा अनेक वुमन्स स्पेशल टूर्स मी वीणा वर्ल्ड सोबत केल्या. 15 दिवसांची रोम स्वित्झर्लंडची ट्रीप सुद्धा केली. एज इज्‌‍ नॉट अ बॅरिअर आणि आय ॲम द बॉस हे फीलिंग मला या टूर्स नी दिलं. या टूर्सच्या निमित्ताने मला एकटीला फिरता आलं स्वतंत्रपणे. माझे निर्णय मला घेता आले. भारलातलं केरळ राज्य, अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश, हे त्यांच्या निसर्ग सौंदर्यामुळे मला अतिशय आवडले. स्वित्झर्लंड तर इतका आवडला की आजही कुठे फिरायला जा म्हटलं तर मी पुन्हा एकदा स्वित्झर्लंडला जाईन. या टूर्सला जाण्यापूर्वी मी कायम साड्या नेसत आले. इतकं की झोपताना सुद्धा साडीवर झोपायची माझी सवय. पण या वुमन्स स्पेशल टूर्स च्या निमित्ताने मला वेगवेगळे अटायर ट्राय करून पाहता आले. मला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवायला लागला. टूरवर एका फॅशन शो मध्ये मी स्कर्ट घातला, तर एका वेळी धोतर टोपी असा पोशाख केला. एकदा मी क्रिकेटर बनले तर एकदा वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर चा फ्लॅग हातात घेऊन जीन्स घालून टूर मॅनेजर ही झाले. एकदा क्रिएटिव्ह क्वीनचा अवॉर्ड मिळाला तर दोनदा इन्स्पिरेशन क्वीनचा. नवीन गोष्टी शिकायला वयाचं बंधन नसतं ही गोष्ट मी टूरवर गेल्यावर शिकले. मी वयाची ऐंशी वर्षं पार केल्यावर फेसबुक, व्हॉट्सॲप, इ मेल शिकले. मला पत्ते खेळायलाही आवडतात, म्हणून मी क्लास लावून ब्रिज खेळायला सुद्धा शिकले.

वीणा वर्ल्ड सोबत जाताना रात्री 12 वाजता मी पहिल्यांदा एकटी एअरपोर्टवर गेले. फिरायला जाण्याने आपण धाडसी होतो, प्रवास आपली स्वतःशी नव्याने ओळख घडवतो, हे सगळं मी स्वतः अनुभवलं आणि तेही वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावर. आज लोक काय म्हणतील हा प्रश्न मला पडत नाही ही माझ्या प्रवासाची मिळकत. कोरोना काळापासून मी या ट्रिप्सना मुकले खरी, पण आधी केलेल्या सगळ्या टूर्समधल्या माझ्या मैत्रिणी माझ्या अजूनही संपर्कात आहेत. आमच्यातलं नातं तेवढंच घट्ट आहे. पुण्याला राहणाऱ्या आम्ही मैत्रिणी एकमेकींच्या घरी गेट टुगेदर करायला भेटतोही. वीणा वर्ल्डने मला इतकं मोठ्ठ कुटुंब दिलंय की म्हटलं तर ते आता माझं दुसरं माहेरच झालंय.


प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्‌‍

पूर्व आणि पश्चिमेचा अनोखा संगम साधणारं टर्की

टर्की हे समृद्ध इतिहास, निसर्गरम्य दृश्यं आणि रंगीबेरंगी संस्कृती यांचे अनोखे मिश्रण असलेलं एक मंत्रमुग्ध करणारं ठिकाण आहे. तुम्ही ऍडव्हेंचर लवर असाल, इतिहासप्रेमी किंवा लक्झरी ट्रॅव्हलर, टर्कीमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी विशेष नक्की आहे. इस्तंबूलच्या गजबजलेल्या बाजारांपासून ते बोदरूमच्या निवांत बीचेसपर्यंत, टर्कीतील प्रत्येक क्षण तुमच्या कायम स्मरणात राहील हे नक्की. चला यावेळी पाहू टर्की मध्ये तुम्ही एन्जॉय करू शकाल असे एकापेक्षा एक भन्नाट अनुभव:

बॉस्फोरसवरील सनसेट क्रूझ:  इस्तंबूलमध्ये युरोप आणि एशियाच्या सीमारेषेवर लक्झरी क्रूझ  घेऊन सनसेट आणि शहराची नयनरम्य स्कायलाईन पाहत टर्किश जेवणाचा आस्वाद घ्या.

ग्रँड बाजारमध्ये प्रायव्हेट शॉपिंग टूर:  जगातील सर्वात प्राचीन बाजारांपैकी एक असलेल्या ग्रँड बाजारमध्ये टर्किश ज्वेलरी, हाताने विणलेले कार्पेट्स आणि अँटिक्सची खरेदी करा.

कॅपाडोशियामध्ये हॉट एअर बलूनचा एक्सपीरियन्स: सनराईसच्या वेळी प्रायव्हेट हॉट एअर बलून राईड घेऊन जमिनीवरच्या फेअरी चिमनीज आणि रॉक फॉर्मेशन्स पहा.

लक्झरी केव्ह हॉटेल्स मध्ये रहा: कॅपाडोशियातल्या नैसर्गिक मऊ खडकांमध्ये कोरलेले, आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण आणि पॅनोरमिक टेरेसेस असलेल्या लक्झरी केव्ह हॉटेलमध्ये राहण्याचा अफलातून अनुभव घ्या.

4x4 जीपने ऑफबीट ऍडव्हेंचर: थ्रिलिंग जीप सफारी घेऊन कॅपाडोशियातील हिडन जेम्स व्ह्यू पॉईंट्स पाहत रहस्यमय दऱ्याखोऱ्यांमधून प्रवास करा.

विंटेज कार मधून सनराईस: भल्या पहाटे, हॉट एअर बलून्सनी भरलेल्या आकाशात आपल्या आयुष्यातला एक सर्वोत्तम सनराईस पाहण्याचा आनंद घ्या

एक्सक्लुसिव्ह वाईन टेस्टिंग: इझमिर जवळच्या उरला विनयार्डस किंवा कॅपाडोशियातील तुरासान वाईनरी मध्ये एक्सक्लुसिव्ह टर्किश वाईन टेस्टिंगचे सेशन्स अटेंड करा.

बोद्रुममध्ये लक्झरी एस्केप: बोद्रुममधल्या आल्हाददायक बीचेसवर रिलॅक्स करा, इथल्या प्रायव्हेट बीच क्लबमध्ये आपला दिवस मस्त घालवा किंवा एका लक्झुरियस प्रायव्हेट यॉटने अगदी जवळपासच्या आयलंड्सना भेट द्या.

पामुकालेतील कॉटन कॅसल आणि स्पा: पामुकालेमधील नॅचरल थर्मल स्प्रिंग्सच्या पांढऱ्या शुभ्र टेरेसेसवर विसावून लक्झरी स्पा रीट्रीटचा अनुभव घ्या.

एफेससमध्ये इतिहासाशी एकरूप व्हा: एफेसस हे प्राचीन शहर आपल्या प्रायव्हेट हिस्टोरियन गाईडसोबत पहा.

पारंपरिक टर्किश हमाम एक्स्पीरियन्स: इथल्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक हमाम्समध्ये जाऊन पारंपरिक टर्किश बाथ आणि मसाजचा आनंद घ्या.

टर्किश खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्या: फाईन वाईन्ससोबत वाढल्या जाणाऱ्या इनोव्हेटिव्ह टर्किश दिशेसचा आनंद घ्या. सोबत कुनेफे आणि टर्किश डिलाइट सारख्या क्लासिक टर्किश डीझर्ट्सचा देखील आस्वाद घ्या.

तर आपल्याला ह्यापैकी कोणता एक्सपीरियन्स आपल्या टर्की हॉलिडेवर घ्यायला आवडेल? ह्या आणि ह्या सारख्याच एकापेक्षा एक भन्नाट अनुभवांसाठी आजच वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज टीमशी संपर्क साधा.


इंडियन रोड ट्रिप्स

भारत एक वैविध्यपूर्ण देश आहे. एकीकडे हिमाच्छादित पर्वत तर दुसरीकडे अथांग पसरलेला समुद्र असं बदलत जाणारं निसर्गाचं रूप. एकीकडे काश्मीरमधल्या व्हॅलीज तर दुसरीकडे हिरवंगार केरळ, एकीकडे गुजरातचे व्हायब्रंट कलर्स तर दुसरीकडे कलकत्त्याचे गजबजलेले रस्ते... असे ऑफबीट रस्ते पालथे घालायचा उत्तम मार्ग म्हणजे आजच्या काळात फेमस असलेल्या रोड ट्रिप्स. या ट्रिप्स आपल्याला देशातले काही सुंदर, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि अनोखे प्रदेश पाहण्याची संधी देतात. अशाच काही रोड ट्रिप्सवर तुम्हीही निघू शकता आणि आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी गोळा करू शकता. मग ती रोड ट्रिप काश्मीर ते कन्याकुमारी असू शकते, गुजरात ते गुवाहाटी असू शकते किंवा ग्रेट इंडियन पेनिन्सुलाची. मनाली ते लेह, शिमला ते स्पिती व्हॅली किंवा लेह ते श्रीनगर या हिमालयातल्या रोड ट्रिप्स जगातल्या सर्वात रमणीय आणि चित्तथरारक लँडस्केपचं दर्शन घडवतात. यात तुम्ही डोंगरदऱ्यांमधून भ्रमंती करता, हाय माउंटन पासेस क्रॉस करता तर कधी नदीकाठाने ड्राइव्ह करता. हिमालय आपल्याला ऍडव्हेन्चर, नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक अनुभवांनी मोहून टाकतो. अशा ट्रिप्सविषयी अधिक माहिती हवी असेल तर आमच्या veenaworld.com वेबसाइटला भेट द्या.

March 21, 2025

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top