व्हिक्टोरियाची राजधानी मेलबर्न ही यार्रा नदीच्या काठावर, पोर्ट फिलिप बेच्या किनार्यावर वसलेली आहे. आपल्या फेस्टिव्हल्स आणि इव्हेंट्सची शान मिरवणारी आणि चवदार खाद्यसंस्कृतीने पर्यटकांना खूश करणारी ही राजधानी तुम्हाला भुरळ घातल्याशिवाय रहात नाही. वेगवेगळ्या सीझन्समध्ये वेगवेगळे एक्सपीरियन्सेस् घेऊन व्हिक्टोरिया आणि मेलबर्न आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत... तुम्ही कधी निघताय?
बर्यापैकी थंडी होती, त्यामुळे थर्मल्स घालून त्यावर मी वॉटरप्रूफ जॅकेट आणि वॉटरप्रूफ पॅन्टस् परिधान करून बाहेर पडले. थंड हवेत प्रसन्न वाटत होते आणि गरम कपड्यांचे लेयर्स घातल्यामुळे कितीही थंडी असली तरी ती बोचरी वाटत नव्हती. पाहता पाहता बर्फ पडू लागला आणि बघावं तिथे पांढर्याशुभ्र बर्फाचं साम्राज्य दिसू लागलं. मग काय, आम्हीही बर्फात लोळून मनसोक्त धम्माल करीत स्नोफॉलचा आनंद घेऊ लागलो. मी अनेकदा ऑस्ट्रेलियाला भेट दिली होती पण यापूर्वी ऑस्ट्रेलियात कधीही न अनुभवलेला बर्फ यावेळी भारतातील पहिली ऑस्सी स्पेशलिस्ट अॅम्बॅसेडर म्हणून माझी निवड झाल्यामुळे मी ऑस्ट्रेलियाला भेट दिली असताना अनुभवला. हो! ऑस्ट्रेलियातसुद्धा आपण माऊंट बुलर या स्कि व्हिलेजला भेट देऊन स्किइंगची मजा लुटू शकतो. मेलबर्नहून केवळ अडीच तासांवर आपण माऊंट बुलरच्या अनोख्या पांढर्याशुभ्र जगात हॉलिडे एन्जॉय करू शकतो. अफाट भूभाग आणि विरळ लोकवस्ती असलेल्या ऑस्ट्रेलियाला जी निसर्गाची देणगी मिळाली आहे तिचं डोळेभरून दर्शन घडतं ते ऑस्ट्रेलियाच्या ईस्ट कोस्टच्या टोकावर असलेल्या, देशात आकाराच्या बाबतीत सेकंड स्मॉलेस्ट ठरलेल्या व्हिक्टोरिया राज्यात. या राज्यात नितळ सागरकिनारे, वन्यजीवांनी समृध्द नॅशनल पार्कस् आणि हिरव्यागार वायनरीज् आहेत, जोडीला सरोवरे आणि स्किइंगसाठी प्रसिध्द असलेले पर्वतही आहेत. व्हिक्टोरियाची राजधानी मेलबर्न ही यार्रा नदीच्या काठावर, पोर्ट फिलिप बेच्या किनार्यावर वसलेली आहे. आपल्या फेस्टिव्हल्स आणि इव्हेंट्सची शान मिरविणारी आणि चवदार खाद्यसंस्कृतीने पर्यटकांना खूश करणारी ही राजधानी तुम्हाला भुरळ घातल्याशिवाय रहात नाही. जगभरात आपल्या कॅफे कल्चरसाठी प्रसिध्द असलेल्या मेलबर्नच्या या कल्चरचा स्वाद घ्यायचा तर कॅफे कल्चर टूर करायलाच हवी. जरा आडबाजूच्या कॅफेंना भेट देऊन, तिथल्या कॉफीची लज्जत चाखताना सोबत टेस्टी खाद्यपदार्थ खायची संधी देणारी टूर तुम्हाला कॉफी आवडत नसली तरी अवश्य करा. मेलबर्नचं एक झगमगतं आकर्षण म्हणजे मेलबर्न स्टार ऑब्झर्वेशन व्हील. सदर्न हेमिस्पियरमधील एकमेव जायंट ऑब्झर्वेशन व्हील म्हणून ओळखलं जाणार्या ह्या चक्रात तुम्ही दिवसा किंवा रात्री केव्हाही बसून मेलबर्न शहराचं ३६० अंशातून दर्शन घेऊ शकता. तुम्ही ह्या चक्राची प्रायव्हेट केबिन बूक करून, लागोपाठ दोन किंवा तीनवेळा त्यातून फेरी मारू शकता. मेलबर्नला आल्यावर घेतलाच पाहिजे असा अनुभव म्हणजे युरेका व्हर्टिगो. या शहरातील ९७५ फूट उंचीचा गोल्ड प्लेटेड युरेका टॉवर हा या शहराचा आयकॉन ठरला आहे. या टॉवरवरील लेटेस्ट आकर्षण म्हणजे व्हर्टिगो. इथे एका स्पेशली तयार केलेल्या सेटवर तुम्हाला असा फील दिला जातो, जणू तुम्ही २८५ फूट उंचीवर अधांतरी लटकत आहात. मेलबर्नच्या रस्त्यांवर ८८ मजल्यां इतक्या उंचीवर हा थ्रिलिंग एक्सपीरियन्स तुमच्या मेलबर्न भेटीला एक वेगळंच वलय देतो. तुम्हाला नव्या देशाला भेट दिल्यावर तिथल्या डिशेसवर ताव मारायला आवडत असेल तर मेलबर्नमध्ये तुमची चंगळ होईल. वर्ल्ड क्लास शेफ्स आणि त्यांच्या कौशल्यातून निर्माण झालेल्या लज्जतदार डिशेस आणि जोडीला रसरशीत वाइन्स, यामुळे तुमची मेलबर्न भेट एकदम चविष्ट होईल. मेलबर्नमधील क्विन व्हिक्टोरिया मार्केट हे ईट-शॉप-एक्सप्लोअर या त्रिसूत्रीचं उगमस्थान मानायला हरकत नाही. याशिवाय ह्या शहरातील साउथ मेलबर्न मार्केट, आर्ट सेंटर संडे मार्केट या मार्केट्समध्येही अवश्य चक्कर मारा.
तुमच्या ऑस्ट्रेलियन हॉलिडेज्च्या आठवणी जरा अधिक मधूर करायच्या असतील तर मेलबर्नपासून फक्त एका तासाच्या अंतरावर असलेल्या यार्रा व्हॅली चॉकलेटरी अॅन्ड आईस्क्रीमरी ला भेट द्यायला विसरू नका. ऑस्ट्रेलियाच्या प्राईम वायनरी भागात, हिरव्यागार पार्श्वभूमीवर उभारलेली ही चॉकलेटची यम्मी दुनिया म्हणजे चॉकलेट प्रेमींची मूर्त झालेली फँटसीच. इथे तुम्ही मनमुराद चॉकलेट टेस्टिंग करू शकता आणि तेही विनामूल्य, सोबत आईसक्रीमच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेतच. युरोपमधल्या टॅलेंटेड चॉकलेटिअर्सना इथे काम करताना बघायची संधी मिळते शिवाय इथल्या शोरूममधले चॉकलेटचे २५० हून अधिक प्रकार मोहात पाडतात ते वेगळेच. इथे आम्ही चॉकलेट कसे तयार होते याचा हॅन्ड्स ऑन अनुभव घेतला तो इथल्या चॉकलेट मेकिंग क्लासमध्ये. अनेक प्रकारचे चॉकलेट बनवायला शिकलो आणि ते गिफ्ट म्हणून सोबत आणले. यार्रा व्हॅलीत आल्यावर पफिंग बिलीची राईड तर घ्यायलाच पाहिजे. जुन्या काळातील वाफेच्या इंजिनवर चालणारी ही झुक-झुक गाडी आता पर्यटकांचे आकर्षण ठरली आहे. या रेल्वे प्रवासातील सर्वात रोमांचकारी भाग म्हणजे ट्रेस्टल ब्रिज. ह्या ३०० फूट लांबीच्या टिम्बर ब्रिजवरून जाताना आपण खेळण्यातल्या गाडीनेच प्रवास करतोय असं वाटतं. यार्रा व्हॅलीत आल्यानंतर इथल्या चेरीच्या बागांमध्ये स्वतः हाताने खुडून चेरी खाण्याचा अनुभव घेतल्याशिवाय तुमचा हॉलिडे कम्प्लीट कसा होणार. इथलं चेरी हिल ऑर्चर्डस् हे ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं चेरी यू-पिक ऑर्चर्ड मानलं जातं. ह्या बागेत तुम्ही पंधरा वेगवेगळ्या प्रकारच्या चेरीज थेट झाडावरून खुडून खाऊ शकता. या फार्मवर ताज्या चेरींप्रमाणेच चेरीचे इतर प्रॉडक्टस् आणि आईस्क्रीम देखील मिळते. वाइनरीज्साठी प्रसिध्द असलेल्या यार्रा व्हॅलीत रॉशफोर्ड वाइन्सला भेट देऊन वाइन टेस्टींग करण्यापासून ते हॉट एअर बलूनिंग करण्यापर्यंत एकापेक्षा एक भन्नाट अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता.
ट्रेडिशनल ऑस्ट्रेलियन चार्म आणि युरोपमधील कोस्टल जीवनशैली याचा अनोखा मिलाफ अनुभवायचा असेल तर मेलबर्नपासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या मॉर्निंगटन पेनिन्सुलाला भेट द्यायलाच हवी. मॉर्निंगटनच्या फेसाळत्या सागर किनार्यांवर तुम्ही स्टँड अप पॅडलिंग ह्या नव्याने लोकप्रिय होत असलेल्या वॉटर स्पोर्टचा आनंद लुटू शकता. अतिशय सोप्पा असलेला हा प्रकार कोणत्याही वयोगटातील लोक सहजपणे करू शकतात. इथल्या एनचँटेड मेझ गार्डनमध्ये तुम्ही ट्री सर्फिंग हा जरा अधिक थरारक खेळ खेळू शकता. झीप लाईन्स, झुलते रोप ब्रिजेस, लटकते टनेल्स यातून जाताना आपोआप अंगात टारझन संचारल्याशिवाय रहात नाही. तुम्हाला जर हॉर्स रायडिंगची हौस पूर्ण करायची असेल तर इथली हॉर्सबॅक वायनरी टूर घ्या. तुम्ही याआधी कधी हॉर्स रायडिंग केलं नसेल तरी काळजी करू नका, तुमच्यासोबत टूर गाईड येतो. व्हिक्टोरियातील सर्वात मोठी इनलँड सिटी म्हणजे बॅलॅरॅट. सुमारे दिडशे वर्षांपूर्वी गोल्ड रशमुळे हे शहर प्रकाशझोतात आलं. या शहरातील सोन्याचा साठा इतर ठिकाणांसारखा झटकन संपला नाही, त्यामुळे ह्या शहराला जी समृध्दी मिळाली तिच्या खुणा इथल्या वास्तु वैभवातून आजही पाहायला मिळतात. इथल्या सॉव्हरिन हिलवरती १८५० सालातल्या जीवनशैलीची झलक पाहायला मिळते. त्या काळातली सोन्याची खाण, स्ट्रीट थिएटर, सोनार-लोहार-कोचमन असे कामगार आणि कन्फेक्शनरी फॅक्टरी या सगळ्याला जोड मिळते ती त्या काळातली वेशभूषा करून वावरणार्या व्यक्तिरेखांची. मेलबर्न शहराजवळचं लोकप्रिय पर्यटन आकर्षण म्हणजे फिलिप आयलंड. मेलबर्नपासून फक्त दोन तासांवर असलेल्या फिलिप आयलंडवर रोज संध्याकाळी पाहायला मिळणार्या पेंग्विन परेडपासून ते ग्राँ प्री सर्किटपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी तुमचे मनोरंजन करतात. या सागर किनार्यावर रोज संध्याकाळी परत येणारे पेंग्विन्स पाहाण्यासाठी आता अंडरग्राउंड ग्लास वॉल बंकर बनवण्यात आला आहे. फिलिप आयलंडवरचा एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे अंटार्क्टिका जर्नी अॅट द नॉबीज. ह्या वर्च्युअल प्रवासात तुम्ही मल्टिमीडियामुळे प्रत्यक्ष अंटार्क्टिकावर गेल्याचा अनुभव घेऊ शकता. फिलिप आयलंडहून निघणार्या सील वॉचिंग क्रुझमध्ये सहभागी होऊन तुम्ही समुद्रातील खडकावर असलेली ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी फर सील कॉलनी पाहू शकता तसेच इथली हेलिकॉप्टर राईड घेऊन फिलिप आयलंडचे हवाई दर्शन घेऊ शकता.
वायनरीज्पासून ते सागर किनार्यांपर्यंत, शॉपिंगपासून ते अॅडव्हेंचर स्पोर्ट्सपर्यंत बहुरंगी आकर्षणांनी भरलेल्या ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतातील हॉलिडे प्रोगॅम्स घेऊन वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्ची टीम तुमच्या स्वागताला सज्ज आहे. मग विचार कसला करताय? वेगवेगळ्या सीझन्समध्ये वेगवेगळे एक्सपीरियन्सेस् घेऊन व्हिक्टोरिया आणि मेलबर्न आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत, तुम्ही कधी निघताय?
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.