ऑस्ट्रेलियामध्ये एका साइटसिईंग टूरवर तिथल्या गाईडने एका हेरिटेज प्रॉपर्टीचे वय १५० वर्ष असल्याचे सांगितले, तेव्हा हेरिटेजचा अर्थ जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी किती वेगळा ठरतो हे जाणविले. काही देशांमध्ये दीडशे वर्षांची इमारतसुद्दा हेरिटेज समजली जाते आणि आपल्या मातृभूमीमध्ये मात्र पाचशे वर्ष देखील हेरिटेज हा खिताब देण्यासाठी कमीच वाटतात. हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतात अनेक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. त्यातल्या किती साईट्सना आपण भारतीयांनी भेट दिली आहे, असा प्रश्न मला पडला.
पुढच्या महिन्यात आमचे काही पार्टनर्स ऑस्ट्रेलियामधून बिझनेस मीटिंग्स्साठी भारतात येेणार आहेत. यावेळी आपला भारत दौरा केवळ मीटिंग्स्साठीच नव्हे तर भारतात दहा-पंधरा दिवसांचा हॉलिडे घेण्यासाठीही सत्कारणी लावावा असंही त्यांनी ठरवलंय. “तुम्हाला काय बघायचं आहे?” या माझ्या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर होतं, ‘या वर्षभरात इंस्टाग्रॅमवर तू जे-जे फोटो अपलोड केले आहेस त्या सर्व ठिकाणी आम्हाला भेट द्यायची आहे. त्यात कुठेतरी तू बोटीने प्रवास करून चेक-इन केलेस व अगदी राजकन्येसारखं शाही छत्री खाली चालताना तुझ्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला होता हेसुद्धा आम्हाला हवे आहे. भारतात हनिमून साजरा करण्याची आमची तीव्र इच्छा होती पण ती काही पूर्ण होऊ शकली नाही तर ह्यावेळी बिझनेस ट्रिप बरोबरच एका रोमँटिक हॉलिडेचा आनंदसुद्दा घ्यावा, असाही आमचा विचार आहे’, त्यांचा हा विचार आम्हाला खूप आवडला आणि लगेचच भारतातल्या टॉप हनिमून डेस्टिनेशन्सची यादी आम्ही त्यांना पाठवली. माझ्या उदयपूरच्या इंस्टाग्रॅम पोस्टने प्रभावित झालेल्या आमच्या ऑस्ट्रेलियन सहकार्यांच्या मनातून काही केल्या उदयपूर हटेना त्यामुळे ‘राजस्थान-दिल्ली-आग्रा’ असा भारताचा गोल्डन ट्रँगल आम्ही त्यांना सुचवला. त्यात राजस्थानमध्ये शाही थाटात हॉलिडे घेण्याची अनेक ठिकाणे आहेतच पण जगभरातून सर्वात रोमँटिक हॉटेल्स ह्या यादीत नेहमीच उच्चांकावर असणार्या ‘ताज उदयपूर लेक पॅलेस’मध्ये किमान दोन-तीन दिवस तर राहायलाच हवे. लेक पिचोलाच्या मधोमध महाराज जगत सिंह (II) यांनी १७४६ मध्ये बांधलेला हा त्यांचा ‘प्लेझर पॅलेस’ आज जगभरातून येणार्या पर्यटकांची खातीरदारी करत त्यांना एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातो. उदयपूरचे स्थलदर्शन करायचे असेल तर उदयपूर शहरात थांबून सर्व स्थलदर्शन करून मगच आपण उदयपूर लेक पॅलेसची निवड करा. कारण इथे आल्यावर आपल्याला हा रीसॉर्ट सोडून बाहेर जावेसे वाटणारच नाही. इथेच नव्हे तर अशा अनेक लक्झरी रिसॉर्टचे बुकिंग करताना एक संपूर्ण दिवस तरी या रीसॉर्टमध्येच वास्तव्य करून त्याचा आनंद घ्यावा.
ताज लेक पॅलेसमध्ये दरवळणारा देशी गुलाबांचा सुगंध, समोर दिसणारे उदयपूरचे सिटी पॅलेस व लेकच्या मधोमध असल्याने आपण पाण्यात तरंगतोय हा अनुभव, हे सारंच अनोखं आहे. ताज लेक पॅलेस बरोबरच उदयपूरमधले ‘ओबेरॉय उदयविलास’ या लक्झरी रीसॉर्टबरोबर अनेक पंचतारांकित हॉटेल्स केवळ उदयपूरच नव्हे तर संपूर्ण राजस्थानभर आणि भारताच्या अनेक प्रांतात हनिमूनसाठी उत्तम पर्याय ठरतात. अर्थात भारतात मिळणारे आदरातिथ्य हे मनापासून असल्याने फाइव्ह स्टारच नव्हे तर भारतातल्या थ्री स्टार व फोर स्टार हॉटेल्समध्येसुद्दा पर्यटकांना राजेशाही वागणूक मिळते असे म्हटले तरी चालेल. अर्थात आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्या बजेटप्रमाणे आपल्या हॉटेलची निवड केल्यास कुठल्याच प्रकारचा भ्रमनिरास होणार नाही. आमच्या या ऑस्ट्रेलियन पार्टनर्सचे बुकिंग करताना जाणविले की, ‘भारतात हॉलिडे घेताना विदेशी मंडळींसाठी विमानाचा खर्च हा हॉलिडेचा सर्वात मोठा खर्च ठरतो जसे आपल्याला इंटरनॅशनल हॉलिडे घेताना आधी विमान प्रवासाचा खर्च लक्षात घ्यावा लागतो तसा’. पण भारतात प्रवास करताना भारतीय नागरिकांना सर्वात मोठा फायदा म्हणजे विमान प्रवासावर फारसा खर्च होत नाही आणि आपल्या हॉलिडेचे बजेट हे आपण आपल्या वास्तव्यासाठी तसंच स्थलदर्शन आणि जेवण-खाण्यासाठी वापरू शकतो. त्यात भारताच्या हॉलिडेवर जवळ-जवळ सगळीकडेच आपल्याला प्रायव्हेट गाडी आणि ड्रायव्हर असल्याने प्रवाससुद्दा आरामदायी ठरतो. त्यामुळे लग्नाच्या घाई-गडबडीनंतर हनिमूनसाठी लक्झरी हॉलिडे घेऊन आराम करण्यासाठी भारतातला कुठलाही हॉलिडे उत्तम ठरतो. शिवाय व्हिसा मिळवण्याचीही गरज नसल्याने आपण कधीही हवे तेव्हा हॉलिडेवर निघू शकता. मात्र हवे तेच हॉटेल मिळवण्यासाठी जेवढ्या लवकर आपण प्लॅनिंग कराल तेवढे उत्तम.
असे म्हणतात की, जगातला कुठलाही अनुभव हा आपल्याला भारतात घेता येतो. भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती व निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेले विविध प्रांत हे सर्व भारताला पर्यटनाचा एक खजिनाच बनवतात. वाळवंटात टेन्टमध्ये राहण्याचा अनुभव असो, हिरव्यागार नारळाच्या झाडांमधून वाट काढणार्या बॅकवॉटर्समधली हाऊसबोट, रेनफॉरेस्टमध्ये ६० फुटांवरचा ट्री हाऊस स्टे, कॉफी प्लॅन्टेशन्स्मधले प्रायव्हेट पूल व्हिला किंवा भारतातल्या अनेक राजवाड्यांमध्ये राहण्याचा अनुभव, सर्व प्रकारचे पर्याय आपल्यासाठी भारतात उपलब्ध आहेत. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये बर्फाचा आनंद लुटण्यापासून ते राजस्थानच्या वाळवंटात उंटावरची सफारी करेपर्यंत, केरळच्या हिरव्यागार प्रदेशात बॅकवॉटर्स आणि बीचेसची मजा घेत तर अंदमानच्या आरसपानी पाण्यात स्कुबा डायव्हिंग करत आपण विविधप्रकारे भारतात हॉलिडे एन्जॉय करू शकतो. ऑस्ट्रेलियामध्येच फिरताना एका साइटसिईंग टूरवर तिथल्या गाईडने एका हेरिटेज प्रॉपर्टीचे वय १५० वर्ष असल्याचे सांगितले, तेव्हा हेरिटेजचा अर्थ जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी किती वेगळा ठरतो हे जाणविले. काही देशांमध्ये दीडशे वर्षांची इमारतसुद्दा हेरिटेज समजली जाते आणि आपल्या मातृभूमीमध्ये मात्र पाचशे वर्ष देखील हेरिटेज हा खिताब देण्यासाठी कमीच वाटतात. हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतात अनेक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. त्यातल्या किती साईट्सना आपण भारतीयांनी भेट दिली आहे, असा प्रश्न मला पडला. कधी कधी आपल्याकडे असलेल्या मौल्यवान गोष्टींची किंमत ही आपल्यापेक्षा बाहेरून आलेल्या लोकांना जास्त कळते ह्याची जाणीव मला कर्नाटकाच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ओळखल्या जाणार्या ‘हम्पी’ ला भेट देऊन झाली. विदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या ‘हम्पी’मध्ये मला स्वतःलाच फॉरेनर असल्यासारखे वाटले. तुंगभद्रा नदीकिनारी एका आंब्याच्या झाडाखाली ‘मँगो ट्री कॅफे’मध्ये मांडी घालून केळीच्या पानावर अगदी हाताने भात-भाजी खाणार्या फॉरेनर्ससोबत जेवताना गम्मत वाटली. विजयनगर साम्राज्याचे अवशेष हम्पीमध्ये बघायला मिळतात. इथे प्राचीन मंदिरं, राज रस्ते, शाही घरं, पुतळे असं सर्वकाही चहूबाजूला पसरलेलं दिसतं. दगडामधूनसुद्दा सूर निघू शकतात ह्याची खात्री पटते ती इथल्या विठ्ठल मंदिरातील संगीतमय म्युझिकल पिलर्स पाहून. हम्पीचे मॉन्युमेन्ट्स लोकप्रिय आहेतच पण लांबवर दिसणार्या पर्वतरांगांवर जणू एकावर एक तोल सांभाळत उभे असलेले दगड-घोडे किंवा हम्पीचे बोल्डर्स हे इथले निसर्गसौंदर्य वाढवतात. हम्पीमध्ये राजघराण्याचे अवशेष बघून आपण जर इतिहासाला वंदन करत असलो तर दुसरीकडे आपण इथे इवॉल्व्ह बॅक या हॉटेलच्या कमलापूर पॅलेसमध्ये राहू शकतो. विजयनगर साम्राज्याच्या बांधकामाचे आर्किटेक्चर पाहिलं तर आज या कमलापूर पॅलेसमधल्या एकसे एक लक्झुरियस भव्य-दिव्य पॅलेस रूम्समध्ये आपल्या पर्सनल पूलचा आनंद घेत आपण राहू शकतो. भारतात आज इतक्या विविध प्रकारचे लक्झरी हॉलिडेज् घेणे शक्य आहे की आपली कुठलीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. पर्सनल पूल हा केवळ पॅलेस हॉटेल्समध्येे नव्हे तर राजस्थान मधल्या मारवाड भागात बिसलपूरमध्ये सुजान जवाई इथे आपल्या प्रायव्हेट लक्झरी टेन्टमध्ये प्रायव्हेट बटलरसह प्रायव्हेट हीटेड स्विमिंग पूलचा आनंद घेऊ शकता. इथल्या भागात अनेक बिबट्या वाघांचा शोध घेत आपली प्रायव्हेट जीप सफारीसुद्धा घेऊ शकता. पूलमध्ये पोहोण्याची मजा आज आपण पांढर्याशुभ्र बर्फाने वेढलेल्या गुलमर्गमध्येसुद्धा घेऊ शकतो. खैबर या गुलमर्गच्या लक्झरी हॉटेलमध्येे हीटेड पूल व आंतराष्ट्रीय दर्जाचा स्पासुद्धा आहे.
भारतातली कुठलीही जागा निवडा, तुम्हाला तुमच्या फॅमिली हॉलिडेसाठी किंवा हनिमूनसाठी ती परफेक्टच ठरेल. चला अनुभव घेऊया या
शुद्ध देसी ROMANCE!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.