वुई ऑल आर लूकिंग फॉरवर्ड टू 2020! येणारं नवीन वर्ष सर्वार्थाने छान असेल अशी अपेक्षा करूया. आम्ही 2020ला T20 जोडलाय आणि त्यामुळे 8 मार्च 2020 इंटरनॅशनल वुमन्स डे ला आम्ही निघालोय ऑस्ट्रेलियाला. आमच्यासाठी आणि आमच्या महिलांसाठी हे पुढचं पाऊल असणार आहे.
वुमन्स स्पेशल सहली सुरू करून एक तप लोटलं. बाल्यावस्था संपली आणि किशोरावस्था सुरू झाली. नाऊ वुई आर इन अवर टीन्स. आता थोडंसं वेगळं काहीतरी करायला हवं नाही का. म्हणजे वुमन्स स्पेशलने गेल्या बारा वर्षात भारतातच नव्हे तर जगभरात आपली एक इमेज निर्माण केली आहे. सातत्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतात आणि परदेशात वुमन्स स्पेशल सहली आयोजित करणारी वीणा वर्ल्ड सर्वांच्याच प्रशंसेचा भाग झाली आहे. युरोप अमेरिका जपान चायना साऊथ ईस्ट एशिया राजस्थान केरळ दुबई... अशा सर्व ठिकाणी महिलांना एवढ्या मोठ्या संख्येने फिरताना बघून स्थानिक लोकं आश्चर्यात पडतात, त्यांच्यासाठी ती एक मोठी नवलाई असते, काहीजणं येऊन चौकशीही करतात, फोटो काढून घेतात. एकूणच वुमन्स स्पेशल महिलेचाच नव्हे तर घरातल्याही सर्वांच्या कौतुकाचा भाग झाली आहे ज्याचं आम्हाला समाधान आहे आणि आनंदही. घरातल्या महिलेने कुटुंबाला सोबत न घेता एकटीने परदेशवारीला निघायचं, एकटीने धम्माल करायची, स्वत:वर प्रेम करायचं, नटण्या-थटण्याने स्वत:चे लाड करायचे, आयुष्यात कधीही न घातलेले कपडे घालायचे, हुंदडायचं, बागडायचं, छान स्वातंत्र्य अनुभवायचं, स्विमिंग कॉश्च्युम घालून स्विमिंग करायचं, म्युझिकच्या तालावर नाचायचं, गायचं, भरपूर हसायचं... हे सगळं स्वत:साठी करायला पूर्वी महिला थोड्या बिचकायच्या. घरच्यांना सोडून हे असं करताना एक प्रकारची गिल्ट-अपराधीपणाची भावना असायची, एखादा गुन्हा केलाय असं वाटून महिला उदास व्हायच्या. काहींना तर रडू आवरायचं नाही. अक्षरश: कौन्सिलिंग करायला लागायचं सहलीवर. आता ती अपराधीपणाची भावना गेली आहे. ह्यासाठी महिलांच्या घरच्यांना मनापासून धन्यवाद द्यायचेत मला कारण त्यांनी वुमन्स स्पेशलचं महत्त्व जाणलं. आपल्या आईला, आजीला, बहिणीला, मुलीला, पत्नीला, वहिनीला, मावशीला, आत्याला अशातर्हेच्या आऊटिंगची, माय टाईम, मी टाईमची गरज आहे हे त्यांना कळलं आणि तिच्या आनंदात त्यांनी आपला आनंद मानला. हे प्रत्येक घरातल्या, शेजारातल्या, समाजातल्या विचारांचं परिवर्तन होतं. हेच कारण आहे वुमन्स स्पेशल संकल्पना क्लोज टू माय हार्ट असण्याचं. व्यावसायिकदृष्ट्या कमर्शियली कोणताही उद्योग करताना आपली एखादी संकल्पना किंवा निर्माण असं समाधान देणारं असेल तर एकूणच उद्योग वाटचाल आनंदमय होऊन जाते, आगळी ऊर्जा मिळते पुढील वाटचालीसाठी. सो, वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल इज अ बिग वर्ल्ड आऊट देअर!
इंटरनॅशनल वुमन्स डे-आठ मार्च हा दिवस म्हणजे आमचा दिवस. दरवर्षी ह्यावेळी आम्ही महिलांना लेट्स सेलिब्रेट लाईफ म्हणत देशात किंवा परदेशात अनेक ठिकाणी घेऊन जात असतो. म्हणजे तसं बघायला गेलं तर इंटरनॅशनल वुमन्स डे हा आमचा दिवस आहेच पण उरलेले तीनशे चौसष्ट दिवसही आमचेच आहेत ह्यावर आम्हा सगळ्यांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे आमचं सेलिब्रेशन ऑफ लाईफ सुरूच असतं. वुई आर फुल्ली एनर्जाईज्ड टू टेक ऑन लाईफ विथ इट्स प्लसेस-अॅन्ड-मायनसेस. जो होगा सो होगा। होनी को कौन रोक सकता है? बट वुई आर रेडी टू फेस इट प्रीपेअर्ड ऑर इव्हन अन प्रीपेअर्ड. हा आम्ही आमचा दृष्टीकोन बनवलाय आणि त्यामुळेच आयुष्य आनंदमयी झालंय. वुई आर इन अ ब्युटिफुल वर्ल्ड अॅन्ड मेकिंग अवर लाईव्हज् मोस्ट डीलाइटफुल! जिंदा है यार। और क्या चाहीये? बाकी सब तो हमेही करना है। दॅट्स अवर अॅटिट्यूड टूवडर्स लाईफ! त्यामुळेच जरी प्रत्येक दिवस आमचा असला तरी आठ मार्च इंटरनॅशनल वुमन्स डे आम्ही साजरा करणार नाही असं कसं होऊ शकतं सांगा बरं! सो आम्ही वुमन्स डे हा भटकंतीसाठी बहाणा बनवलाय. अ रीझन टू रोम अराऊंड द वर्ल्ड! अहो फिरण्याचे बरेच फायदे आहेत की. केल्याने देशाटन... मनूजा चातूर्य येतसे फार आचारातलं - विचारातलं - पेहरावातलं - आरोग्यातलं - आत्मविश्वासातलं चांगलं परिवर्तन घडण्यात देशविदेशातलं पर्यटन एक महत्त्वाची भूमिका बजावतंय. ट्रान्झिशन्स आणि ट्रान्सफॉर्मेशन्स दोन्ही आम्ही पाहिलीयत. मुलगी शिकली प्रगती झाली प्रमाणे मुलगी आनंदी झाली तर घर आनंदी अशी अनेक कारणं देऊ बरं का आम्ही आमच्या भटकंतीसाठी. घरातल्यांना हो म्हणावच लागतं. ते तरी काय करणार? अर्थात हे सगळं करीत असताना आमच्या घराप्रती, कुटुंबाप्रती, व्यवसाय, करियरप्रती आणि समाजाप्रती असलेली जबाबदारीही आम्ही आनंदाने झेलत असतो. नो डीफॉल्ट देअर! वुई आर रीस्पॉन्सिबल! वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशलने सततच हा विचार पसरवल्यामुळे वुमन्स स्पेशल कधीही डीसेन्सी आणि डिग्निटीच्या कक्षेच्या बाहेर गेली नाही, कधीही चीप झाली नाही, होणार नाही. तर हा वुमन्स डेचा बहाणा घेऊन आम्ही पुन्हा एकदा आठ मार्चच्या दरम्यान भारतातल्या किंवा जगातल्या भ्रमंतीला निघणार आहोत.
येत्या वर्षी आणखी एक भरभक्कम कारण आम्हाला मिळालंय वुमन्स डे-वुमन्स स्पेशलसाठी आणि ते म्हणजे ICC-T20-2020 वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप. वुमन्स स्पेशल संकल्पना राबवल्याला एक तप झालंय त्यामुळे आता वुमन्स स्पेशलमध्येही थोडी हलचल, थोडं वेगळेपण यायला हवं. बदल हा फक्त वुमन्स स्पेशलच्या महिलांमध्येच नाही झालाय तर तो इंटरनॅशनल वुमन्स वर्ल्ड कप क्रिकेटमध्येही झालाय. आपल्याकडे पहिली वुमन्स क्रिकेट मॅच खेळली गेली होती 1934 साली. पण त्यानंतर 40 वर्षांनी वुमन्स क्रिकेटला सुरुवात झाली. पहिली टेस्ट मॅच 1976साली वेस्ट इंडिज सोबत खेळली गेली. पहिली टेस्ट मॅच व्हिक्टरी आपल्या वुमन्स टीमने 2002साली मिळवली साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध. पहिला एशिया कप जिंकला 2004 साली आणि नंतर आणखी तीन जिंकले. कॅप्टन मिताली राज, बॅट्समन अंजुम चोप्रा, बॉलर झुलन गोस्वामी ह्यांनी स्वत:ला सिद्ध केलं. हायेस्ट रन स्कोअरर मिताली राज Womens T20 तसेच WODI ची सरताज समजली जाते. बॅट्समन स्मृती मंधानाने ODI मध्ये मारलेली डबल सेंच्युरी राहुल द्रविडच्या बॅटने केलीय, जी तिच्या भावाला राहुल द्रविडने भेट दिली होती. हरमनप्रीत कौरचे वडील तिच्या केस कापण्यावरून बराच काळ तिच्याशी बोलत नव्हते. झुलन गोस्वामीला फूटबॉल जास्त आवडतो आणि ती मॅराडोनाची डायहार्ड फॅन आहे. अशा अनेक गोष्टी आणि किस्से आहेत ह्या तुमच्या आमच्यासारख्या घरातून आलेल्या आपल्या वुमन्स क्रिकेट टीममधल्या मुलींचे. 2005 मध्ये फायनलला येऊन आपण ऑस्ट्रेलियाकडून हरवले गेलोय. आज पंधरा वर्षांनी बघूया, कौन कितने पानी में है। लेट्स विश गूड लक टू अवर टीम. आणि म्हणूनच वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल ऑस्ट्रेलिया विथ T20 वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप साठी आम्ही तीन स्पेशल टूर्स आणल्या आहेत. एक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर वुमन्स डेच्या दिवशी आठ मार्चला होणार्या वुमन्स वर्ल्ड कप फायनलसाठी, एक इंडिया-बांग्लादेश ह्या चोवीस फेब्रुवारीला पर्थमध्ये होणार्या दे दणादण मॅचसाठी आणि एक सिडनी शो ग्राऊंडवर एकवीस फेब्रुवारीस होणार्या इंडिया- ऑस्ट्रेलिया वुमन्स वर्ल्ड कप ओपनिंग मॅचसाठी. आहे की नाही वुमन्स डे चं दमदार सेलिब्रेशन. ह्या सहलींमध्येही आम्ही चॉइस दिलाय. नऊ दिवसांची सिडनी गोल्ड कोस्ट केर्न्स मेलबर्न+MCG वुमन्स वर्ल्ड कप फायनल मॅच, सात दिवसांची सिडनी कॅनबेरा मेलबर्न+सिडनी शो ग्राऊंड वुमन्स वर्ल्ड कप ओपनिंग मॅच, आणि ज्यांचं हे नेहमीचं ऑस्ट्रेलिया बघून झालंय त्यांच्यासाठी न्यू ऑस्ट्रेलियाची एक अतिशय सुंदर नयनमनोहर सहल आणलीय, पर्थ पिंक लेक पिनॅकल्स सरव्हॅन्टीस कालबरी जेराल्डटन फ्रीमॅन्टल+WACA ग्राउंड इंडिया बांग्लादेश वुमन्स वर्ल्ड कप मॅच. ऑलरेडी बुकिंग सुरू झालंय आणि त्याचा वेग बघता ह्या वुमन्स वर्ल्ड कप क्रिकेट स्पेशल सहली लवकर फुल्ल होतील असं दिसतंय. आजच वीणा वर्ल्ड वेबसाईटवर जा किंवा डायरेक्ट तुमच्या जवळचं वीणा वर्ल्ड ऑफिस गाठा आणि चला निघा ऑस्ट्रेलियाला, सुंदर सहलीसाठी आणि वुमन्स वर्ल्डकपमध्ये अव्वल नंबरवर असलेल्या आपल्या वुमन्स क्रिकेट टीमला प्रोत्साहन देण्यासाठी. परक्या भूमीवर आपल्या माणसांकडून मिळणारा पाठिंबा, आपलं चिंअरींग अप आपल्या टीममध्ये जोश भरेल हे नक्की.
आपल्या माहितीसाठी ICC-T20-2020 वुमन्स क्रिकेटची संभाव्य वर्ल्ड कप टीमची नावे इथे देत आहोत. कोच-डब्ल्यू. व्ही.रमन, बॅट्समन बोलर ऑलराऊंडरमध्ये मिताली राज, स्मृती मंधाना, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्ज, मोना मेश्राम, हेमलता दयालन, शफाली वर्मा, झुलन गोस्वामी, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, अनुजा पाटील, मानसी जोशी, राधा यादव, अरुंधती रेड्डी, कोमल झंझाड, भारती फुलमाळी, हरमनप्रीत कौर, दिप्ती शर्मा, शिखा पांडे, देविका वैद्य, पूजा वस्त्रकार, हरलीन देओल, तानिया भाटिया, सुषमा वर्मा, रवी कल्पना. ह्या सर्वांना आपण शुभेच्छा देऊया कारण फायनल इलेव्हन कोण असणार आहेत ही निवड व्हायचीय. आपल्याला नंतर ते समजेलच. ही सगळी आपल्या मातीतली नावं वाचल्यावर वाटतंय नं की आपण त्यांना चीअर अप करायला जायला पाहिजे ऑस्ट्रेलियाला. मग वाट कसली बघताय? चलो, बॅग भरो, निकल पडो! ह्यावेळी ऑस्ट्रेलिया तेसुद्धा वुमन्स वर्ल्ड कप क्रिकेटचा थरार अनुभवायला. येताय नं!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.