परदेश सहलीला जाताना व्हिसा महत्त्वाचा तसंच फॉरेक्स सुद्धा. ज्या देशात आपण जातो त्या देशातल्या चलनामध्ये किंवा युएस डॉलरमध्ये आपल्याला सहलीचं पार्ट पेमेंट करावं लागतं. तसंच सहलीवर आपण जे पैसे घेऊन जातो ते ही त्यांच्या चलनात असले तरच आपल्याला त्याचा उपयोग होतो. हे चलन कुठे मिळवायचं, कसं मिळवायचं ही कटकट वाटते कधी कधी पर्यटकांना.
पर्यटकांना सल्ले देणं हे आमचं काम. वर्षानुवर्षाच्या सततच्या प्रवासातून अनुभव मिळवीत गेले, शिकत गेले आणि ते वाचकांशी आणि पर्यटकांशी दर रविवारच्या ह्या वृत्तपत्रीय संवादातून शेअर करीत गेले. एक दोन नव्हे गेली वीस वर्ष सातत्याने हे सुरू आहे. दर रविवारी चार-चार वृत्तपत्रांसाठी काय नव्याने लिहायचं हा प्रश्न पडायचा पण एकदा पेन आणि कागद हातात घेतलं की दोन अडीच तासात एखादा विषय झरझर कागदावर उतरायचा. आता तर हे रूटीनच बनून गेलंय. आज काय लिहावं ह्याचा विचार करताना नजरेसमोर आली ती वीणा वर्ल्ड विंटर ऑफर. ऑक्टोबर ते डिंसेबर ह्या कालावधीत दोन महत्त्वाच्या सुट्ट्या असतात दिवाळी आणि ख्रिसमस, त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक ह्या विंटर ऑफरमध्ये बुकिंग करून अॅडव्हान्स बुकिंग अंतर्गत पैसे तर वाचवतातच पण त्यासोबत असलेल्या अनेक अॅडिशनल बेनीफिट्सचाही फायदा घेतात. ह्या महिन्यात निर्णय घेणारे तसेच यापुढे कधीही बुकिंग करणारे पर्यटक आपल्या सहलीच्या निवडीपासून ते सहल परत येईपर्यंत काय-काय करू शकतात, कसा त्या सहलीचा जास्तीत-जास्त आनंद घेऊ शकतात ह्यासंबंधी सर्व गोष्टी एका लेखाद्वारे पर्यटकांसमोर ठेवूया ह्या उद्देशाने आज लिहायला सुरुवात केली आणि अथपासून इतिपर्यंत बर्यापैकी गोष्टी इथे नमूद करू शकले.
इंटरनेट-हॉलीवूड-बॉलीवूड-सोशल मीडियाद्वारे, ऑनलाईन-ऑफलाईन ट्रॅव्हल कंपन्यांमुळे तसेच विमानप्रवास सोपा झाल्यामुळे पर्यटन फोफावलंय ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक माणूस पर्यटनाची आस बाळगतोय. येत्या अनेक वर्षात चांगल्या, विश्वासू, आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि परिपक्व पर्यटनसंस्थांना चांगले दिवस असणार आहेत, अशा आणखी संस्थांची गरज भासणार आहे कारण आता तर भारतीय लोकसंख्येच्या फक्त एक टक्का इतकेच पर्यटक छोटं-मोठं पर्यटन करताहेत. सध्याच्या टूरिझम प्रो-गर्व्हमेंटमुळे भारत आणखी सक्षम होणार आहे पर्यटनाच्या बाबतीत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय वा विदेशी पर्यटकांचीही संख्या वाढणार आहे. घेशील किती दो करांनी अशी अवस्था असणार आहे. वाढत्या पर्यटक संख्येला प्लॅनिंगची जोड मिळाली तर वेळ आणि पैशाची बचत होऊ शकेल, आणि त्यातला आनंद द्विगुणित करता येईल.
आमच्याकडे येणारे पर्यटक किंवा कोणत्याही पर्यटनसंस्थेद्वारे प्रवासाला निघणारे पर्यटक हे तीन प्रकारात दिसतात. हौशे-नवशे-गवसे किंवा अनडीसायडेड, सेमी डिसायडेड आणि डिसायडेड. अगदी नव्याने प्रवास करणार्या पर्यटकाला कसं मार्गदर्शन करायचं? फक्त हौस म्हणून प्रवास करणार्या पर्यटकाला काय तर्हेचं पर्यटन सुचवायचं? जो पर्यटक चार-पाच खंडांचा प्रवास ऑलरेडी करून एक सीझन्ड ट्रॅव्हलर बनलाय त्यांच्यासाठी वेगळं काय द्यायचं हे सगळं सहज-सोप्पं करणं हे ट्रॅव्हल अॅडव्हाईजर म्हणून आमचं काम. पर्यटकांचं काम असतं ते म्हणजे त्यांनी आधी स्वत:ला समजून घ्यायचं की आपण कोणत्या प्रकारचे ट्रॅव्हलर आहोत? आपली मानसिकता काय आहे? प्रामुख्याने दोन भाग असतात, एक ग्रुप टूर आणि दुसरं कस्टमाईज्ड हॉलिडे. ग्रुप टूरचा आखीव रेखीव योजनाबद्ध आणि टूर मॅनेजरच्या दिमतीत आपल्याला प्रवास करायला आवडतो की मी अॅन्ड मायसेल्फ, माय फॅमिली-माय प्रायव्हसी असा मनाला हवा तसा स्वच्छंद प्रवास मला खुणावतो? एकदा का हे ओळखलं की मग ग्रुप टूर वा कस्टमाईज्ड हॉलिडेचा आनंद आपण जास्तीत जास्त घेऊ शकतो. आम्ही एक छोटंसं ट्रॅव्हल प्लॅनर ह्यासाठी बनवलंय ते मग पुढच्या गोष्टींसाठी मदतीला येतं. आज ह्या लेखात आपण ग्रुप टूर संबंधात जास्त जाणून घेऊया आणि पुढच्या आठवड्यात कस्टमाईज्ड हॉलिडे विषयी संवाद करूया.
ग्रुप टूर्स ठरविताना जरी त्या टूर्स आनंदासाठी असल्या तरी एखाद्या व्यवसायाप्रमाणे आपलं लक्ष्य ठरवावं. एक छोटं-शॉर्ट टर्म म्हणजे, ह्या वर्षात किंवा येत्या दोन वर्षात मी भारतात आणि परदेशात कुठे-कुठे पर्यटन करणार? आणि येत्या दहा वर्षात मी भारतातली किती राज्य किंवा जगातले किती देश-खंड पालथे घातलेले असतील? अन्न-वस्त्र- निवारा-शिक्षण ह्याच्या पुढे हल्ली पर्यटनाने स्थान पटकावलंय त्यामुळे मुलभूत गरजांचं जसं आपण प्लॅनिंग करतो तसंच प्लॅनिंग पर्यटनाचंही केलं पाहिजे. पर्यटनाची इच्छासुद्धा मनाला उत्साही करते त्यामुळे आपल्यासमोर असं काहीतरी समथिंग टू लूक फॉरवर्ड टू असेल तर मनाची उभारी सतत टिकण्यामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावेल.
कोणत्याही ग्रुप टूरमध्ये जिथे आपण जातो तिथलं महत्त्वाचं सर्व स्थलदर्शन समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न असतो. अर्थात सहलीचा त्या ठिकाणचा कालावधी किती आहे त्यावरही ते अवलंबून असतं. म्हणजे स्वित्झर्लर्ंंड आम्ही चार दिवसांत वा सात दिवसांत दाखवतो किंवा चाळीस दिवसांचा दे दणादण कस्टमाईज्ड हॉलिडेही बनवून देऊ शकतो. आपल्याला नेमकं काय हवंय? आपली आवड- निवड व बजेटची सांगड आपल्याला घालता यायला पाहिजे. पर्यटक नेहमी सांगतात एखादं शहर किंवा ठिकाण आवडल्यावर, की अजून इथे एक दिवस रहायला हवं होतं. त्यांना लाइटर टोनमध्ये माझं सांगणं असतं, हर खुशी अधुरी होनी चाहीये। ग्रुप टूरद्वारे आम्ही तुम्हाला प्रत्येक शहराची तोंडओळख तसंच तिथल्या ज्या-ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण तुमचं मन त्याने भरत नसेल, ये दिल मांगे मोअर असं तुमचं होत असेल तर तुम्ही सहलीनंतर एअर तिकीट डिव्हिएशन घेऊन पोस्ट टूर हॉलिडे घ्या. त्या ठिकाणी पायी भटकंती करा, स्थानिकांप्रमाणे तिथल्या कॅफे-पब्ज-भोजनाचा आस्वाद घ्या. आराम करा. सहलीच्या खचाखच भरलेल्या कार्यक्रमानंतर आलेला थकवा तिथेच घालवून टाका, आणि आणखी रीफ्रेश-रीज्युविनेट व्हा इथल्या रुटीनचा सामना करण्यासाठी. अशातर्हेचा पोस्ट टूर हॉलिडे प्लॅन करून देण्यासाठी आमची एक स्पेशल टीम काम करतेय आणि गेल्या वर्षभरात अनेक पर्यटकांनी सहलीनंतर पोस्ट टूर हॉलिडेचा आनंद घेतलाय. इफ वुई कॅन व्हाय नॉट मेक द मोस्ट ऑफ अवर टूर ऑर हॉलिडे?
ग्रुप टूरच्या सहलींची किंमत ही सहल कार्यक्रमातल्या विमानप्रवासाचा इकॉनॉमी क्लास समाविष्ट करून ठरवलेली असते. ह्या इकॉनामी क्लासमध्ये आपलं ग्रुप बुकिंग असतं. आता सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक विमानात प्रीमियम इकॉनॉमी क्लास, बिझनेस क्लास किंवा फर्स्ट क्लास ह्यापैकी कोणतातरी अपग्रेडेड क्लास असतो. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही ग्रुप टूरमध्ये अॅडिशनल फेअर डिफरन्स भरून बिझनेस क्लास किंवा फर्स्ट क्लास पर्यटकांना द्यायला सुरुवात केली आणि त्याला ओव्हरव्हेल्मिंग रीस्पॉन्स मिळाला, अनेक पर्यटकांनी बिझनेस क्लासने प्रवास केला. बिझनेस क्लासमध्ये सीट्स मोठ्या असतात, बर्याचदा फ्लॅट बेड असतो, त्यामुळे व्यवस्थित झोप काढता येते, कमी माणसं असतात, कधी-कधी अपग्रेडेड मेन्यू असतो हा विमानप्रवासा दरम्यान फायदा होतो. पण एअरपोर्टचे फायदेही महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे काही एअरलाईन्स एअरपोर्ट त्याच शहरात असेल तर घरापासून घरापर्यंत स्पेशल शोफर ड्रिव्हन सर्व्हिस देतात. त्यामुळे अडनिड्या वेळी ड्रायव्हरला बोलावणं नको किंवा कोण सोडणार एअरपोर्टला ही चिंता नको. चेक-इन करताना, इमिग्रेशनच्या वेळी वेगळे झोन असतात त्यामुळे लाईनमध्ये बराचवेळ उभं राहण्याचा वेळ आणि त्रास वाचतो. बहुतेक सर्वच एअरलाईन्स बिझनेस क्लास तिकिटासोबत लाऊंज सर्व्हिस देतात त्यामुळे इमिग्रेशन ते बोर्डिंग ह्यामधला तास-दीड तासाचा वेळ कुठे घालवायचा ह्याची काळजी करावी लागत नाही. लाऊंजमध्ये खाण्यापिण्याची भोजनाची सोय असते त्यामुळे भूकेचा प्रश्नही मिटतो. बोर्डिंग करताना बिझनेस क्लास रांगेतून पटकन विमानात जाता येतं. परदेशात उतरल्यावरही अनेक एअरपोर्ट्सवर बिझनेस क्लासच्या ट्रॅव्हलर्ससाठी इमिग्रेशनच्या वेगळ्या रांगा असतात त्यामुळे तिथेही रांगेत उभं राहून थकायला होत नाही. एवढंच कशाला बिझनेस क्लासच्या बॅग्ज प्रायॉरिटी टॅग केलेल्या असल्याने सर्वप्रथम बॅगेज बेल्टवर येतात. प्रवासापूर्वी-प्रवासात-प्रवासानंतरचा असा फायदा असल्यावर सहलीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात बर्यापैकी रीफ्रेश्ड माईंडने करता येते. आता आपल्या भारतात मुख्य विमानतळावर स्पेशल असिस्टन्सची प्रणाम सेवा उपलब्ध आहे ज्यामुळे चेक-इनपासून बोर्डिंगपर्यंत आणि भारतात परत आल्यावर उतरल्यापासून बग्गी सर्व्हिस तसेच बॅगेज बेल्टवरून बॅगा काढून सुखरूप आपल्याला एअरपोर्ट बाहेर येण्याची सोयही आहे, त्याचाही फायदा कुणालाही घेता येतो त्यांचे चार्जेस भरून. अशा छोट्या-मोठ्या अनेक गोष्टी आपला प्रवास आणखी सुखकर बनविण्यासाठी सहाय्य करतात.
जसा विमानातला बिझनेस क्लास तसंच आता मुंबई दिल्लीसारख्या मेट्रो सिटीजमध्ये काही व्हिसा फॅसिलिटेशन सेंटर्सनी बायोमेट्रिकसाठी येणार्या व्यक्तींसाठी जादा खर्चाने प्रीमियम लाऊंजची सोय केलीय. तिथेही बर्यापैकी वेळ आणि त्रास वाचू शकतो. दहा किंवा दहापेक्षा अधिक जणांचा ग्रुप बायोमेट्रिकसाठी त्यांचे चार्जेस भरून ओडीएमव्ही म्हणजेच ऑन डिमांड मोबाईल व्हिसा सर्व्हिस त्यांच्या कार्यालयातही बोलावून घेऊ शकतात. आमच्या व्हिसा टीमकडे ह्याबाबतीत अधिक माहिती मिळू शकते.
एखाद्या सहलीत जर क्रुझ समाविष्ट असेल तर जादा खर्चाने आपण त्यावरील अपग्रेडेड रूम किंवा स्वीट रूम घेऊ शकता. हीच गोष्ट मॉरिशस किंवा मालदीवसारख्या जिथे एकाच हॉटेलमध्ये वास्तव्य असतं अशा ठिकाणी रूम अपग्रेड करून घेऊ शकता. आपल्याला बर्थ डे, अॅनिव्हर्सरी किंवा एखाद्या अचिव्हमेंटचं सेलिब्रेशन जर सहलीवर हवं असेल तर त्या ठिकाणच्या उपलब्धतेनुसार आणि सहल कार्यक्रमातील वेळेनुसार जादा आकार भरून अशी सेलिब्रेशन्स करता येतात. ग्रुप टूरमध्ये वैयक्तिक पर्यटकाचा सहलीचा आनंद वाढविण्यासाठी ज्या काही गोष्टी उपलब्ध करून देता येतील ते द्यायचा आमचा प्रयत्न आहे आणि अॅडव्हान्स इंटिमेशनने पर्यटक त्या गोष्टींचा आस्वाद घेताहेत.
परदेश सहलीला जाताना व्हिसा महत्त्वाचा तसंच फॉरेक्स सुद्धा. ज्या देशात आपण जातो त्या देशातल्या चलनामध्ये किंवा युएस डॉलरमध्ये आपल्याला सहलीचं पार्ट पेमेंट करावं लागतं. तसंच सहलीवर आपण जे पैसे घेऊन जातो ते ही त्यांच्या चलनात असले तरच आपल्याला त्याचा उपयोग होतो. हे चलन कुठे मिळवायचं, कसं मिळवायचं ही कटकट वाटते कधी-कधी पर्यटकांना. त्यांच्या सोयीसाठी आम्ही विंटर ऑफरमध्ये फॉरिन टूर्सचे पैसे भारतीय रुपयांत भरण्याची सवलत दिली आहे म्हणजे एक्सचेंजचा त्रास नको. पण जेव्हा सहलीला आपण निघतो तेव्हा शॉपिंगसाठी, छोट्या-मोठ्या सर्व्हिसेससाठी तिथलं स्थानिक चलन किंवा युएस डॉलर्स आपल्याला सोबत घेऊन जावे लागतात. इथे वीणा वर्ल्ड फॉरेक्स-ऑथोराईज्ड मनी चेंजर आपल्या सेवेस सज्ज आहे रीझनेबल एक्सचेंज रेट घेऊन. बरं तुमची संपूर्ण माहिती आमच्याकडे असल्याने एक्स्ट्रॉ डॉक्युमेंट्सचीही गरज लागत नाही. आणि आता वीणा वर्ल्डची पुणे, चर्नीरोड, प्रभादेवी, माटुंगा, चेंबुर, विलेपार्ले, बोरिवली, वसई, घाटकोपर, वाशी, ठाणे, डोंबिवली, पवई, चिंचवड येथील सर्व ब्रांच ऑफिसेस अधिकृत लायसन्ससह आपणांस फॉरिन एक्सचेंज देण्यास सज्ज आहेत.
पर्यटकांना कमीत कमी सायासात जास्तीत जास्त सोयी कशा देता येतील हा विचार आहे. लेट्स मेक द मोस्ट ऑफ अवर ट्रॅव्हल!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.