हिंदू धर्माचं बालीमधलं अनोखं रुप जितकं आपल्या कुतूहलतेचा भाग बनतं तितकंच तिथला हिरवागार निसर्ग, आरसपानी पाणी, मनमोहक सागरकिनारे, प्रतिम बीचेस आणि आपल्याला बॅक इन अॅक्शन येण्यास भाग पाडणारे थरारक वॉटर स्पोर्ट्स बालीच्या अधिक जवळ जाण्याच्या आपल्या उत्सुकतेत भर घालतात
बाली... देवांची नगरी... आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेलं पर्यटन आकर्षण. खरंतर हे बाली डेस्टिनेशन वेगळ्या रंगात, ढंगात पर्यटकांच्या भेटीला आणण्यासाठी वीणा वर्ल्ड अनेक दिवस प्रयत्नशील होतं, तो योग अखेर जुळून आला आणि बाली आम्ही आमच्या वेगवेगळ्या स्पेशालिटी टूर्सच्या माध्यमातनं मॅजिक टच देऊन पर्यटकांच्या भेटीला आणलं. या देवांच्या नगरीत पाऊल ठेवताच आपल्याही नकळत आपण बालीच्या प्रेमात पडतो. हिंदू धर्माचं बालीमध्ये दिसणारं अनोखं रुप जितकं आपल्या कुतूहलतेचा भाग बनतं तितकंच तिथला हिरवागार निसर्ग, आरसपानी पाणी, मनमोहक सागरकिनारे आणि आपल्याला बॅक इन अॅक्शन येण्यास भाग पाडणारे थरारक वॉटर स्पोर्ट्स बालीच्या अधिक जवळ जाण्याच्या आपल्या उत्सुकतेत भर घालतात. या नगरीत आपण सुखावतो ते इथल्या लोकांच्या प्रेमळ आदरातिथ्यानं. इथल्या सर्व सुखसोयींनी सज्ज अशा क्लासिक रिसॉर्टमधला आरामदायी स्टे म्हणजे परक्या नगरीतही आपलेपणाचा अनुभव देणारा. बालीमधल्या या अप्रतिम अविष्कारानं आमची पर्यटनाची तहान पुरेपूर भागवली आणि वीणा वर्ल्ड पर्यटकांच्या भेटीस घेऊन आलं नव्या ढंगातलं, नव्या रंगातलं मॅजिकल बाली.
वीणा वर्ल्डच्या बाली सहलीत एक अद्भुत अनोखी दुनिया अनुभवायला मिळेल हे शंभर टक्के.. बालीमधला निळा अथांग सागर,अनोख्या धाटणीची वास्तुशिल्पं, अतिथी देवो भवःची पावलागणिक प्रचिती तुमच्या मनावर एक आगळा ठसा उमटवेल. सांस्कृतिक केंद्र उबुड, बीच डेस्टिनेशन नुसा दुआ, हॅपनिंग प्लेस कुटा ही प्रसिध्द ठिकाणं, समुद्रातली अप्रतिम प्राचीन मंदिरं, एलिफंट केव्हज्, तेगाल्लालांग राईस टेरेस, ज्वालामुखीच्या विवरातला बाटुर लेक, तांजुंग बेनोआची टर्टल आयलंड टूर, ग्लास-बॉटम बोट, स्नॉर्केलिंग, केचक डान्स, अफलातून देवदान शो, अविस्मरणीय रिव्हर राफ्टिंग हे सारं पाहून आणि अनुभवून पर्यटक चकित न झाले तर नवल. हे सर्व वीणा वर्ल्डच्या सात दिवसांच्या सहलीत समाविष्ट आहे बरं का आणि ह्या ऑल इन्क्लुसिव्ह सहलीची किंमत आहे फक्त पंचाहत्तर हजार रुपये.
बालीच्या सर्वात लोकप्रिय स्थलदर्शनांपैकी खास आहेत ती समुद्रालगत असलेली उलुवाटु आणि तानाह लोट ही मंदिरं, उलुवाटु आणि तानाह लोट या मंदिरांना चहुबाजूंनी वेढलेला फेसाळता समुद्र या जागेचा जणू रखवालाच. त्याचं फेसाळलेलं रुप पाहून भीती वाटत नाही तर त्यातही सौंदर्याची एक झलक दिसते. उलुवाटु येथील प्रभु रामचंद्र आणि सीता मातेच्या कथांचं नृत्य स्वरूपात अतिशय सुरेख कथन करणारा केचक डान्स म्हणजे बालीतील सांस्कृतिक कलेच्या माध्यमातनं पाहता येणारा संगीत नाटकाचा सुरेख अध्याय. हिरवाईची महिरप लाभलेल्या उबुडचा प्रांत म्हणजे जणू एक हरवलेलं नंदनवनंच, पुरातन भारताचा एक छोटा भाग इथे दडून बसलाय. उबुडमधील कलात्मक म्युझियम्स पाहून बालीची समृद्ध कलापरंपरा आपल्यासमोर उलगडते तर उबुडजवळच केली जाणारी हिरवीगार भातशेती पाहून डोळे सुखावतात. जागृत ज्वालामुखीचा आनंद देणारं माउंट बाटुर हा पर्वत आणि तिथल्या विवरातल्या बाटुर लेकजवळचा निसर्ग लक्ष वेधून घेतो.
‘आयलंड ऑफ गॉड्स’ म्हटलं जाणार्या ह्या देवांच्या गावाला भेट देण्यासाठी फॅमिली टूर्स, स्पेशालिटी टूर्ससोबतच वीणा वर्ल्डच्या सिग्नेचर हॉलिडेजचा-इंडिपेंडन्ट पॅकेजेसचा ऑप्शनही आहे. यामध्ये पर्यटकांना आपल्या मनाप्रमाणे बाली प्लॅन करता येऊ शकतं. हवे तितके दिवस, हवं तिथे, पर्यटक आपल्या मनाचे राजे आणि बालीच्या भन्नाट एक्सपीरियन्सचे दावेदार होण्याचा लाभ सिग्नेचर हॉलिडेज्च्या इंडिपेंडन्ट पॅकेजद्वारे टूरमध्ये घेता येतो बरं का!
बाली पर्यटकांच्या भेटीला आणताना वीणा वर्ल्डनं मनोरंजनाचा बोनसही सोबत दिलाय ‘चला हवा येऊ द्या’ च्या कलाकारांना बालीमध्ये भेटण्याची संधी देऊन. झी मराठी ‘चला हवा येऊ द्या’ची टीम वीणा वर्ल्डसोबत विश्वदौर्याला निघालीय. दुबई दणक्यात पार पडलंही, ते आपल्याला लवकरच झी मराठीवर बघायला मिळेल. या टीमसोबतची बाली टूर आता जानेवारीत आहे. या विश्वदौर्यातील बालीसाठी असलेल्या वेगवेगळ्या टूर्स म्हणजे ९ जानेवारीची चार दिवसांची बाली हायलाइट्स, सात दिवसांची बाली मॅजिक तसंच बाली सीनियर्स स्पेशल आणि बाली वुमन्स स्पेशल. या टूर्सच्या पर्यटकांना ‘चला हवा येऊ द्या’ च्या कलाकारांबरोबर डिनर करण्यासोबतच गप्पा-गोष्टी, धम्माल करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या टूर्सना डिमांड भरपूर असल्याने पर्यटकांनी लवकर बुकिंग करणं महत्वाचं ठरेल. अर्थात या संधीसोबत वीणा वर्ल्डच्या उत्कृष्ट सहल कार्यक्रमाचा आनंद घेता येईल ते ओघानं आलंच.
गेल्या काही वर्षांपासनं बाली सर्वात अधिक खुणावतंय ते एकांत हवा असणार्या हनिमूनर्सना. तिथले रमणिय बीचेस, निळंशार पाणी, तिथली शांतता, त्या वातावरणातला प्रेमाचा नवा रंग... सारं काही हनिमूनर्सना हवं तसं. आयुंग रिव्हरमधला रिव्हर राफ्टिंगचा थरारक अनुभवही आजच्या जनरेशनाला हवाहवासा. लग्नाचा सीझन आता सुरू होईल तेव्हा ‘हनिमूनसाठी कुठे?’ असा विचार करत बसण्यापेक्षा वीणा वर्ल्डच्या हनिमून स्पेशल बाली सहलीचा पर्याय फायनल करून टाकणं हा हनिमूनर्ससाठी उत्तम डिसिजन. सात दिवसांची वीणा वर्ल्डची हनिमून स्पेशल बाली सहल हनिमूनर्ससाठी प्रेमाच्या नव्या रंगाचा मौसम अनुभवायला देणारी सहल ठरेल यात शंकाच नाही, आणि हनिमूनर्ससाठी इंडिपेंडन्ट पॅकेजेसही आहेत बरं का.
वीणा वर्ल्डच्या माईस टूर्ससाठी बाली उत्तम सुख सुविधांनी सज्ज आहे. जगातल्या अत्याधुनिक कॉन्फरन्स फॅसिलिटीज् असलेले काही सर्वोत्तम रिसॉर्टस बालीमध्ये आहेत. अनेक रिसॉर्ट्समध्ये ५०० पेक्षा जास्त रूम्स आहेत. रीव्हर राफ्टिंग, वॉटर स्पोर्टस्, ज्वेलरी मेकिंगसारख्या अनेक टीम बिल्डिंग अॅक्टीव्हिटीज्मुळे आणि सोबतच मनोरंजनाच्या अनेक ऑप्शन्समुळे अफोर्डेबल किंमतीत बालीची माईस टूर एक बेस्ट इन्सेंटिव्ह टूर ठरू शकते. एकंदरीतच काय तर बाली मिटिंग्ज, इन्सेंटिव्ह्ज, कॉन्फरन्सेस आणि इव्हेंट्ससाठी एक उत्तम माईस डेस्टिनेशन ठरतं.
तर मंडळी, हे नवंकोरं डेस्टिनेशन आपल्याला साद घालतंय. चला तर मग, ‘आयलंड ऑफ गॉड्स’ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या वीणा वर्ल्डच्या सात दिवसांच्या बाली सहलीला, निसर्गाचा आणि कलेचा अपरंपार आविष्कार जवळून पाहायला. चलो,बॅग भरे,निकल पडो!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.