परीक्षा संपल्या, टप्प्याटप्प्याने मतदानही होईल आणि प्रत्येकाला ओढ लागेल ती सुट्टीतल्या सहलीची. आता तसा थोडा उशीर झालाच पण व्हेन देअर इज अ विल, देअर इज अ वे वीणा वर्ल्ड आहे तुम्हाला जशी हवी तशी सुट्टीची मजा द्यायला. अर्थात जेव्हा असा उशीर झालेला असतो तेव्हा चुका घडू शकतात, त्यासाठीच एक खबरदारी म्हणून ह्या लेखाचा प्रपंच.
गुढीपाडव्याला आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झाली. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! एक एप्रिलला नवीन फायनान्शियल इयरही सुरू झालं. आणि त्याचवेळी वीणा वर्ल्डसुद्धा सहा वर्षाचं झालं. नव्या उमेदीने नवीन वर्षात पदार्पण करतानाच आम्ही एप्रिल-मे-जून साठी म्हणजे पहिल्या तिमाहीसाठीचं ट्रॅव्हल प्लॅनरही प्रकाशित केलं. तसं बघायला गेलं तर हे एक छोटसं पत्रक (लीफलेट). पण छोटं असलं तरी बडे काम की चीज. वीणा वर्ल्ड सुरू करण्याच्या, उभं करण्याच्या धावपळीत ह्या पत्रकाला आम्ही जस्ट लीफलेट म्हणत होतो, त्याला काही नाव नव्हतं हे आमच्या लक्षातच आलं नाही. एक दिवस ते लक्षात आल्यावर आम्ही आमच्या पर्यटकांना त्या ट्रॅव्हलविषयी, कुठे जायचं, कसा टप्प्या-टप्प्याने दरवर्षी प्रवास करायचा, पाच वर्षात किती आणि कोणते देश आपण पूर्ण करू शकतो, भारतामध्ये उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम हा प्रवास कसा करू शकतो ह्याविषयी मार्गदर्शन करणार्या ह्या पत्रकाला नाव द्यायचं ठरवलं. थोडक्यात वीणा वर्ल्डमध्ये ह्या पत्रकाचं बारसं करायचं आम्ही ठरवलं. बाळाला नाव ठेवताना जसं घरातल्या प्रत्येकाचं मन महत्त्वाचं असतं तसंच आम्हीही एक छोटासा एक्झरसाइज संपूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये केला. सर्वांना त्या प्रक्रियेत समाविष्ट करून घेतलं. सध्या सुट्टया सुरू झाल्यामुळे प्रचंड कामाचे दिवस आहेत. प्रत्येक डिपार्टमेंट खूपच बिझी आहे. सीझनच्या सुरुवातीला कामात बुडालेल्या टीमला अशा पीक सीझनवेळी थोड्या त्यांच्याशी असंबंधित गोष्टीत खेचायचं म्हणजे, आता हे काय सीझनमध्ये? इथे इतकी कामं पडलीयेत, ह्यांचं वेगळंच काही हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चेहर्यावर, कपाळावर किंवा मनातल्या मनात रीमार्कस् येणार हे माहीत होतं. मला मात्र दिसत होतं की, रोजच्या धकाधकीत वेगळं काहीतरी करायला मिळणार होतं, रूटिनमध्ये थोडावेळ अर्धा-एक तास ब्रेक मिळणार होता. प्रत्येक डीपार्टमेंटमध्ये कुणीतरी क्रीएटिव्ह असतंच असतं, त्या क्रीएटिव्हिटीला वाव मिळणार होता. लीफलेटला नाव ठेवणं ही साधी गोष्ट असली तरी ती स्टार्ट टू एन्ड कशा पद्धतीने कमी वेळात करता येते हे ज्युनियर्सना कळणार होतं. प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही गोष्ट पर्सनल किंवा प्रोफेशनल आयुष्यात प्रत्येकाला करावी लागते त्याची एक ट्रायल संपूर्ण ऑर्गनायझेशनच्या सहभागाने होणार होती. पीपल सपोर्ट व्हॉट दे क्रीएट ह्यावर माझा खूप विश्वास आहे त्यामुळे लीफलेटचं जे काही नाव येणार होतं त्यापाठी प्रत्येक टीम मेंबरची आत्मियता राहणार होती कारण सर्वांनी मिळून ते दिलं होतं. प्रत्येक डीपार्टमेंटचे टीम मेंबर्स एकत्र येणार होते वेगळ्या गोष्टीसाठी, थोडी चर्चा करणार होते, इनव्हॉल्व होणार होते हे महत्त्वाचं होतं. आणि मी प्रोजेक्ट दिला, त्या पीक सीझनमध्ये दामटवला असं म्हणणं जास्त चपखल बसेल इथे.
कोणताही प्रोजेक्ट घेतला तर आधी 6W+2H थिअरी आम्ही वापरतो. कारण बर्याचदा काय करायचंय हे माहीत असतं पण का करायचंय ते क्लिअर होत नाही. 6W म्हणजे, व्हॉट? व्हेअर? व्हेन? हू? हूज? व्हाय? हे प्रश्न विचारायचे. त्याने संपूर्ण प्रोजेक्ट क्लिअर केल्यावर तो कसा करायचा त्यासाठी हाऊ आणि तो करताना हर्डल्समध्ये दोन गोष्टी आम्ही बघतो त्या म्हणजे, पास्ट हर्डल्स आणि प्रॉबॅबल हर्डल्स. हा प्रोजेक्ट आधी घेतला होता का? त्यावेळी काही अडचणी आल्या होत्या का? जुनाच किंवा नवीन असेल तरी त्यात रोज बदलत्या आसमंतात काही नव्या अडचणी येऊ शकतात का? ह्या गोष्टी बघितल्या जातात आणि टाईमलाईनमध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण केला जातो. इथे हा प्रोजेक्ट कसा पूर्ण झाला, ह्या लीफलेटला काय नाव मिळालं हे स्टेप बाय स्टेप बघूया.
पीक सीझनमध्ये एक छोटासा प्रोजेक्ट जो डायरेक्ट कामाशी निगडीत नव्हता तो देत असल्याने पहिल्यांदाच सॉरी म्हणून घेतलं. त्यांना म्हटलं आपलं लीफलेट नावाचं बाळ आता सहा वर्षांचं झालंय पण वीणा वर्ल्ड उभं करायच्या घोडदौडीत आपण त्याचं बारसं करायला विसरलोय. त्याचं नाव ठेवणे (What) हा आपला प्रोजेक्ट. आज दिवसाच्या शेवटी (When) हे नाव पक्कं करायचंय. तुम्ही कोणत्याही लोकेशनला (Where) असाल तेथून तुम्हाला नावाचे ऑप्शन पाठवायचे आहेत. तुमच्या संपूर्ण टीमला (Who) तुम्ही ह्यात समाविष्ट करायचंय. आपल्याला आणि आपल्या पर्यटकांना (Whose) कम्युुनिकेशनमध्ये हे नाव वापरायचंय. आता हे का (Why) करायचं तर हे जे लीफलेट आहे ते पर्यटकांना त्यांची सहल किंवा त्यांच्या पर्यटनाचं पाच वर्ष-दहा वर्ंषाचं कॅलेंडर बनविण्यात मदत करतं. आता ही सहल घेऊया, नंतर ती सहल घेऊया, पाच वर्षात एवढी राज्य किंवा एवढे देश पूर्ण करूया ह्याची आखणी करायला मदत करतं. पर्यटक जेव्हा कार्यालयात येतात तेव्हा त्यांच्यासमोर हे ठेवल्यावर एक्सप्लेन करणं सोप्पं जातं. जे काम वेबसाईट करते त्याच्या आधीची पायरी आहे हे लीफलेट. आपली संपूर्ण संस्था त्यावर अवलंबून आहे कारण वर्षभरातली सर्व प्रोडक्ट्स त्यात असतात. ह्या अॅक्च्युअली मूर्ती लहान किर्ती महानची किंमत लीफलेट म्हणून आपण रसातळाला पोहचवलीय. आता त्याचं महत्त्व लक्षात घेऊन आपण एक साधं-सोप्पं सर्वांना पटकन कळेल असं नाव देऊया. अनेक मॅगझिन्सना नावं असतात त्यातलाच हा प्रकार. नाव शोधा, आठवा, लिहा, वाचा, विचार करा (How). न आवडलेली नावं खोडून टाका. आवडलेली नावं पाठवून द्या. ह्यातली हर्डल्स (Hurdles) आज तुमचा इन्चार्ज वा मॅनेजर नसेल तर टीममध्ये दुसर्या कुणीतरी इनिशिएटीव्ह घ्या, कुणी नव्हतं म्हणून पाठवलं नाही असं व्हायला नको, काम झालंच पाहिजे. पूर्वी मोठमोठी नावं द्यायची पद्धत होती, काय आहे ते एक्सप्लेन करावं लागायचं तसं नाही झालं पाहिजे. इट शूड बी सेल्फ एक्सप्लनेटरी. वीणा वर्ल्ड नावात ट्रॅव्हल टूर्स असं कुठे नाहीये. तो संदर्भ आणलात तर उत्तम. ठरल्याप्रमाणे नावं आली. ती सगळी एका फुलस्केपवर लिहिली. त्यातली चांगली हायलाईट केली. आणि सर्वानुमते वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल प्लॅनर असं नामकरण झालं. पहिलं बक्षिस एच.आर टीमने घेतलं कारण त्यांनी एकच पक्का ऑप्शन ट्रॅव्हल प्लॅनर हा दिला होता आणि तो परफेक्ट होता. दुसरं बक्षिस मार्केटिंग टीमला, कारण तेच नाव त्यांनी अनेक ऑप्शन्समध्ये दिलं होत. उत्तेजनार्थ बक्षिस ट्रॅव्हल शोकेस नावाला मिळालं जे प्रोडक्ट टीम, सेल्स कंट्रोल आणि व्हिसा ह्यांनी सजेस्ट केलं होतं. एकूण दोनशे नावांमधून हे निवडलं गेलं. आणि आमच्या सहा वर्ंषाच्या बाळाला नाव मिळालं. लीफलेट हे नाव हद्दपार झालं. काही नावं चांगली होती पण ती आपण का निवडली नाहीत हे ही सर्वांना कळवलं. प्रोजेक्ट पूर्ण झाला.
तसं म्हटलं तर ही वीणा वर्ल्डची अंदर की बात आहे. बिझनेस सीक्रेट. पण नेहमीप्रमाणे ती मी इथे सर्वांशी शेअर करतेय कारण असंख्य वाचकांमध्ये अनेक नवउद्योजक असणार आहेत. येणार्या जागतिकीकरणात गोष्टी फास्ट होणं, वेळेबरहुकूम होणं, निर्णय घेणं, आपल्यात आणि आपल्या टीममध्ये क्लॅरिटी असणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. वीणा वर्ल्डच्या वाटचालीत ज्या गोष्टी आम्ही महत्त्वाच्या मानतो, ज्याचा फायदा होतो, मल्टिनॅशनल्सशी स्पर्धा करताना आपला आत्मविश्वास-उमेद बरकरार ठेवतो त्या सर्व, भविष्य आपल्या कवेत सामावण्याची इच्छा ठेवणार्या तरुणाईला कामी येतील असं वाटतं. माझ्या बॉलीवूड प्रेमी फिल्मी मनाला थ्री इडियट्स सिनेमातला एक डायलॉग आठवला फ्री अॅडव्हाईज है, लेना है तो लो, नही तो जाने दो।
तर असं हे ट्रॅव्हल प्लॅनर कर लो दुनिया मुठ्ठी में म्हणत सप्तखंडांमधल्या सर्व सहलींचे पर्याय तुमच्या समोर ठेवतं. सहल निवडण्याआधी ते तुम्हाला थोडा सेल्फ-चेक चा सल्लाही देतं कारण आपण स्वतः कोणत्या प्रकारचे पर्यटक आहोत, अपल्याला फक्त कुटुंबाला घेऊन सहलीला जायला आवडतं, म्हणजे कस्टमाईज्ड सहली करून घेऊन मी अॅन्ड माय फॅमिली असं पर्यटन आवडतं की त्या सहलीत इतर सहप्रवासी असले, काळजी घेणारा टूर मॅनेजर असला तर आपल्याला निर्धास्तपणे सहलीचा आनंद घ्यायला आवडतं, हे आधी ठरवून मग पुढच्या पायरीकडे जाणं महत्त्वाचं. कारण कस्टमाईज्ड हॉलिडे आवडणारा, तो माईंडसेट असणारा पर्यटक जर ग्रुप टूरला आला किंवा ग्रुप टूर करणारा पर्यटक जर कस्टमाईज्ड हॉलिडेला गेला तर त्या सुट्टीचा आनंद किरकिरा होऊ शकतो. एकदा का ग्रुप टूर वा कस्टमाईज्ड हॉलिडे हे क्लीअर झालं की दुसरा चेक असतो तो म्हणजे आपल्याला काय आवडतं ह्याचा. शांत निवांत की दे धम्माल हॅपनिंग डेस्टिनेशन आपल्याला आवडतं हे ठरणं महत्त्वाचं. भरपूर शॉपिंग करणारा, रोज नवीन रेस्टॉरंटमध्ये चवीचं खाण्याची आवड असणारा पर्यटक अंटार्क्टिकाला गेला तर त्याचं काय होईल? जो पर्यटक पाण्याला घाबरतो किंवा पाण्यात पोहणं अजिबात चालत नाही त्याने मालदिव्हला जाऊन काय करायचं? अशा अनेक गोष्टी असतात की, ज्या हॉलिडेला कुठे जायचं हेे ठरविताना विचारात घेणं खूप महत्त्वाचं असतं. बीचेस की माऊंटन्स की बिझी सिटीज हा प्रश्नही हे टॅ्रव्हल प्लॅनर आपल्याला विचारतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वांची पहिली पसंती असते ती हिमालयाच्या कुशीत दडलेल्या हिलस्टेशन्सना जायची, तिथल्या बर्फात दे धम्माल करण्याची. त्यासाठी शिमला मनाली, नैनिताल मसूरी, काश्मिर, सिक्किम दार्जिलिंग, तवांग बोमडिला, भूतान, नेपाळ आणि लेह लडाख ह्या वेगवेगळ्या डेस्टिनेशनसाठी भरपूर ग्रुप टूर्स ऑप्शन्स किंवा कस्टमाईज्ड हॉलिडेज् आहेत. ज्यांना माऊंटन्स नको असतात त्यांच्यासाठी अंदमान, केरळ, उटी कूर्ग म्हैसूर असेही ऑप्शन्स ह्या सुट्टीसाठी आहेत. ज्यांना भारताबाहेर जायचंय, परेदशवारी करायचीय त्यांच्यासाठी तर युरोप अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया आफ्रिका साउथ ईस्ट एशिया म्हणजे सिंगापूर थायलंड मलेशिया हाँगकाँग इंडोनेशिया कंबोडिया व्हिएतनाम असे अनेक देश स्वागतोत्सुक आहेत. एकट्या युरोपचा विचार केला तर ग्रुप टूर्समध्ये 81 ऑप्शन्स आहेत. वुमन्स स्पेशल किंवा सीनियर्स स्पेशल ह्या सहली एकट्या दुकट्या पर्यटकांना खूप सोयीच्या ठरल्यात, इथे पार्टनर मिळून जातो किंवा जाते. एकटे आहोत म्हणून सहलीला जाता येत नाही असं थोडंच आहे? पहिल्यांदा परदेशवारी करणार्यांनी पासपोर्ट काढल्या काढल्या साउथ ईस्ट एशिया म्हणजे सिंगापूर थायलंड मलेशियाची वारी करावी. जग कसं आहे ते तर कळतंच पण विमानप्रवास, कस्टम्स, इमिग्रेशन, बॅगेज, चेक-इन, केबीन, इनफ्लाईट मिल्स ह्या सगळ्याची तोंडओळख होऊन जाते आणि मग युरोप अमेरिकेच्या सहली विनासायास पार पडतात. अनेक गोष्टी आहेत, ट्रॅव्हल प्लॅनर आणि वेबसाईटमुळे बर्याच गोष्टींची उत्तरं मिळतात. प्रत्येक पर्यटकाने व्यवस्थित नियोजन करून सहलीचा भरपूर आनंद लुटावा ही इच्छा.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.