चेरी ब्लॉसम कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं कुणाला म्हटलं जातं माहितीय? जगात कुठे कुठे चेरी ब्लॉसम बघायला मिळतो? चेरी ब्लॉसम बघायला नेमकं कधी जावं? साकुरा म्हणजे काय? चेरी ब्लॉसम कोणत्या देशाचं नॅशनल फ्लॉवर आहे? हनामी कशाला म्हणतात? चला, जरा जनरल नॉलेज तपासूया.
ऑसम, सिंपली सुपर्ब! वीणा, अगं जपानलाच नाही तर आम्ही चायनामध्येही चेरी ब्लॉसम फुल्ल टू एन्जॉय केला. हे देश खूप छान आहेत पण चेरी ऑन द केक वॉज चेरी ब्लॉसम टेलीव्हिजन स्टार - अॅक्टर मेधा जांबोटकरचा फोन आला आणि मला आनंद तर झालाच पण हायसंही वाटलं कारण ह्यावर्षी मार्च एप्रिलमध्ये आम्ही भारतातून सर्वात जास्त पर्यटक घेऊन जपानला गेलो होतो आणि सोबत चायना कोरीयाच्या सहलीही होत्या. पर्यटकांची संख्या बघून एअरलाईन्स, टूरिझम बोर्ड्स, कॉन्स्युलेट खूश झाले होते कारण हे पहिल्यांदाच घडत होतं. आम्हाला मात्रप्रेशर आलं होतं सगळं ठरल्याप्रमाणे पार पडेल नं ह्याचं. आमच्या टूर मॅनेजर्स टीमने आणि त्यांच्या साथीला असणार्या कॉर्पोरेट ऑफिस टीमनेकमाल केली आणि पर्यटकांनी चेरी ब्लॉसमची धम्माल अनुभवली.
चार वर्षांपूर्वी आम्ही जपानला जाणार्या पर्यटकांची संख्या वाढवायला घेतली. जपान महाग असल्याने काही मोजकी पर्यटकमंडळीच जपान पहायचं स्वप्न पूर्ण करू शकत होती. पर्यटक जात नाहीत म्हणून टूर्स नाहीत आणि टूर्स नाहीत म्हणून पर्यटक जात नाहीत असं दुष्टचक्र सुरू होतं, जे बदलायला हवं होतं. आम्ही जपान अफोर्डेबल करायचं ठरवलं. एअरलाईन आणि जपानमधील पार्टनर जोडीला आले आणि आम्ही ना नफा ना तोटा ह्या तत्त्वावर जपानच्या सहली आणल्या, आणि पहिल्याच वर्षी पंधराशे पर्यटक जपानला जाऊन आले. आमचा हुरुप वाढला. एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली तर त्याला यश येतं ते असं. आता जपानच्या सहली व्यवस्थित सुरू आहेत. चेरी ब्लॉसम असो वा ऑटम कलर्स, उन्हाळ्याची सुट्टी असो वा दिवाळीची, पर्यटक मोठ्या संख्येने जपानला जाताहेत. गेली तीन वर्ष आम्ही ख्रिसमसच्या वेळीही जपानची सहल करतोय. जपानने आता पर्यटकांच्या मनातला एक कोपरा व्यापलाय हे निश्चित.
या आठवड्यात आम्ही चेरी ब्लॉसम 2020चं बुकिंग खुलं केलं आणि पर्यटकांनी बुकिंगला सुरुवातही केली. येत्या वर्षीचं वैशि असं आहे की जपान चेरी ब्लॉसमच्या जास्तीत जास्त सहलींचा चॉइस आहेच पण साऊथ कोरीया, चायना, तैवान इथलाही चेरी ब्लॉसम पर्यटकांनी डोळे भरून बघावा म्हणून ह्या देशांच्या स्वतंत्र किंवा कॉम्बिनेशन्समध्ये टूर्स आणल्या आहेत. ज्यांचे हे चारही देश बघून झालेयत त्यांच्यासाठी युरोप अमेरिकेतल्या चेरी ब्लॉसमच्या सहली आहेत. ज्यात स्पेन, जर्मनी, अॅमस्टरडॅम, स्कॉटलंड, व्हॅन्क्युवर कॅनडा, वॉशिंग्टन युएसए चा समावेश आहे. आम्ही चेरी ब्लॉसम 2020 च्या जगभरातील सहलींचा चॉईस पर्यटकांसमोर दिलाय त्यामुळे त्यांना हवं असलेलं कॉम्बिनेशन नक्कीच त्यात मिळेल ह्याची खात्री आहे. आणखी एक गोष्ट नव्याने आम्ही आणलीय ती म्हणजे युरोपच्या एकाच सहलीत ट्युलिप गार्डन्स आणि चेरी ब्लॉसम बघण्याची किंवा जपानमध्ये एकाच सहलीत अल्पाईन रूट आणि चेरी ब्लॉसम बघण्याची सुवर्णसंधी. आयडियाज भरपूर आहेत, आता चॉईस इज युवर्स.
वीणा वर्ल्डच्या सहली म्हटल्या म्हणजे ऑल इन्क्लुसिव्ह हा भाग आलाच. सहलीचा कार्यक्रम आणि त्यातलं स्थलदर्शन हे उत्कृष्ट आहे. जपान चायना कोरीया तैवानमध्ये जे-जे काही छान छान बघण्यासारखं आहे ते सगळं आम्ही आपल्या सहलीत समाविष्ट केलंय. जातोच आहोत तर महत्त्वाचं बघायचं काही राहीलं असं व्हायला नको. थोडक्यात महत्त्वाचे असे लँडमार्कस् ह्यात आहेत. अगदी जपानचा ट्रेडिशनल गेइषा डान्स जो जपानमध्ये जाणार्याला पहायचाच असतो, तो बघायचीही संधी आपल्या कार्यक्रमात आहे. कुठेही काही ऑप्शनल ठेवलं नाही. इथे खर्च कमी दाखवायचा आणि ऑप्शनलच्या नावाखाली सहलीवर जास्त पैसे भरण्याचा प्रकार नाही. जो है, सो है, सामने है! आणि व्हिसा, ब्रेकफास्ट, लंच, डीनर, स्थलदर्शन असं सगळं काही असूनही सहलीची किंमत एकदम रीझनेबल आहे. आणि हो, जपानमध्ये आपल्या भारतीयांना खाण्याचा मोठ्ठा प्रॉब्लेम असला तरी वीणा वर्ल्डकडे तुम्हाला बहुतेक ठिकाणी भारतीय भोजन मिळतं बरं का. काळजी नसावी. आता एकच आग्रह आहे आणि तो म्हणजे ह्या सर्व ठिकाणी जायला भारतातून एअरलाईन्सचे ऑप्शन्स कमी आहेत त्यामुळे सहलीही मर्यादित आहेत. जायचंच असेल तर लवकर निर्णय घ्या. तीस नोव्हेंबरपर्यंत स्पेशल प्राईस दिलीय जी डिसेंबरमध्ये मिळणार नाही, कारण आम्हालाही लवकरात लवकर एअरलाईन्सकडे नावांची आणि नंबर्सची हमी द्यावी लागते. जसे दिवस जातात तसं एअर फेअर वाढत जातं हे आता आपणाला नव्याने सांगण्याची गरज नाही. आणि चेरी ब्लॉसमच्या वेळी फक्त जपानच नव्हे तर चायना कोरीया तैवान ह्या देशांकडेही जगातून येणार्या पर्यटकांची संख्या इतकी वाढते की डीमांड जास्त आणि सप्लाय कमी असं होऊन जातं. पर्यटक पैसे द्यायला तयार असतात पण एअर तिकीट मिळत नाही. ह्यावर्षी आम्ही कितीतरी पर्यटकांना नाही घेऊन जाऊ शकलो चेरी ब्लॉसम बघायला कारण प्रत्येक सहल आम्हालाही कळण्याआधी हाऊसफुल्ल झाली होती. मतितार्थ, शुभस्य शीघ्रम!
चेरी ब्लॉसमच्या सहलींचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला म्हणजे मुंबई ते मुंबई सहल. जिथे वीणा वर्ल्डचा नावाजलेला टूर मॅनेजर जाताना एअरपोर्टपासून ते परत आल्यावर एअरपोर्टपर्यंत आपल्या सोबतीला असतो, त्यामुळे आपल्याला कसलीच काळजी करावी लागत नाही. दुसरा प्रकार जॉइनिंग लीव्हिंग पर्यटकांचा, जी पर्यटक मंडळी मुंबईबाहेर किंवा भारताबाहेर राहतात त्यांच्यासाठी पहिल्या दिवशी कार्यक्रमातील पहिल्या ठिकाणी सहलीत सहभागी व्हायची आणि शेवटच्या दिवशी सहलीतल्या शेवटच्या ठिकाणाहून सहल सोडण्याची सोय असते. ह्या पर्यटकांच्या सहलीचा खर्च वेगळा असतो. त्यांना त्यांचा व्हिसा आणि एअर तिकीट स्वतः करावं लागतं. तिसरा प्रकार आहे प्रीमियम इकॉनॉमी किंवा बिझनेस क्लास किंवा फर्स्ट क्लासने जाणार्या पर्यटकांचा. आपल्या सहलीच्या खर्चात विमानाचं इकॉनॉमी क्लास एअर फेअर समाविष्ट असतं. ज्या पर्यटकांना अपग्रेड करून हवं असतं त्यांना ते इकॉनॉमी आणि बिझनेस/प्रीमियम इकॉनॉमी/फर्स्ट क्लासच्या तिकीटातली फरक रक्कम भरून घेता येतं. ह्या पर्यटकांना आमचा सल्ला असतो की तुम्ही तिकीट वेगळं घेणारच आहात तर एक दिवस आधी जा आणि एक दिवस उशीरा या जेणेकरून सहल रीलॅक्स्ड करता येईल. त्यांच्यासाठी अपग्रेडेड तिकीटाची, एअरपोर्ट ट्रान्सफरची तसेच हॉटेल वास्तव्याची सोय जादा पैसे भरून करून देता येते. चौथा प्रकार आहे पोस्ट टूर हॉलिडेचा. सहल संपल्यानंतर सहल कार्यक्रमातल्या शेवटच्या शहरात किंवा आणखी दुसर्या एखाद्या शहरात आपण दोन-तीन दिवस किंवा चक्क आठवडाभर रहायचं अगदी एखाद्या स्थानिकासारखं आणि एन्जॉय करायचं. ह्या सर्व अॅडिशनल गोष्टी करण्यासाठी तुमच्या दिमतीला आहे वीणा वर्ल्डची पोस्ट टूर हॉलिडे टीम. पाचवा प्रकार आहे, तुमचा चेरी ब्लॉसम हॉलिडे तुम्हाला हवा तसा कस्टमाईज्ड करून देण्याचा. त्यासाठीही टीम सज्ज आहे. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवंय. वुई आर अॅट युवर सर्व्हिस.
आता थोडंसं चेरी ब्लॉसमविषयी. आपल्याला जपान जरी जगाची चेरी ब्लॉसम कॅपिटल वाटत असली तरी तो किताब मिरवतंय अमेरिकेतल्या (USA) जॉर्जियामधलं मॅकन शहर. एका बिझनेसमनच्या आवडीतून, त्याच्या घराच्या मागे फुललेल्या एका चेरी ब्लॉसम झाडाच्या सौंदर्याने झपाटून जाऊन त्याने ह्या झाडांची लागवड केली आणि आज ह्या गावात साडेतीन लाख झाडं आहेत चेरी ब्लॉसमची. त्याचं फाऊंडेशन दरवर्षी ह्या झाडांमध्ये वाढ करतंय. फक्त पासष्ट वर्षात एका माणसाच्या आवडीतून हे चेरी ब्लॉसमचं विश्व निर्माण झालंय, आहे की नाही आश्चर्य. जपानने मित्रत्वाच्या भावनेने पाठविलेल्या चेरी ब्लॉसमच्या झाडांतून वॉशिंग्टनही बहरतं दरवर्षी चार एप्रिलच्या दरम्यान. कॅनडा जर्मनी अशा जगातल्या अनेक भागात जपानने चेरी ब्लॉसमची हजारो झाडं पाठवली, त्यांच्यामते चेरी ब्लॉसमचं झाड भेट देणं म्हणजे गूडलक. काहीही असो त्यांच्या ह्या भेटीने जगात वेगवेगळ्या ठिकाणी आनंद पसरला हे मात्र निश्चित. जर्मनीच्या हॅमबर्गमध्ये तर जर्मन-जापनीज सोसायटी मोठ्ठं हनामी फेस्टिव्हल आयोजित करतात. जर्मनी आणि अॅमस्टरडॅम ह्या दोन्ही कडचा चेरी ब्लॉसम बघण्यासाठी आम्ही स्पेशल टूर आयोजित केलीय, ह्या आणि इंग्लंड स्कॉटलंड अॅमस्टरडॅम ब्रुसेल्स सहलीतील पर्यटकांना एकाच वेळी चेरी ब्लॉसम आणि ट्युलिप्स गार्डनची मजा मिळणार आहे. कॅनडामध्ये व्हँक्यूवरला चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल म्हणजे वर्षातला आनंदाचा काळ. साऊथ कोरीयाच्या सहलीत आपण सेऊल, जेजू आणि बुसान ह्या शहरांना भेट देतो, जी शहरं ह्या चेरी ब्लॉसमच्या बहरामुळे एखाद्या परीकथेतली वाटतात. चायनामधला चेरी ब्लॉसमही पर्यटकांना खूप आवडतो, ग्रेट वॉल ऑफ चायना किंवा शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणार्या चेरी ब्लॉसमचं दर्शन पर्यटकांना मोहवून टाकतं आणि कॅमेर्याला दमवतं. स्पेनमध्ये हर्ते नावाचं गाव आहे जे पांढर्या चेरी ब्लॉसमने भरून जातं. निसर्गाचा हा आगळा चमत्कार बघण्यासाठी आम्ही स्पेनच्या चेरी ब्लॉसम स्पेशल सहलीत एक दिवस वाढवलाय. तैवानची वर्णी आम्ही ह्यावर्षीचेरी ब्लॉसम कॉम्बिनेशन टूर्ससाठी लावलीय. जरा वेबसाईटवर जाऊन तर बघा तैवानमधल्या तायपेई-ताइचुंगशहरातल्या चेरी ब्लॉसमचा नजारा, कुणालाही जावसं वाटेल इतकं सुंदर आहे ते.
काहीही म्हणा पण चेरी ब्लॉसम म्हटलं की पहिलं कुठं जावसं वाटत असेल तर ते जपानला. चेरी हे जपानचं नॅशनल फ्लॉवर. त्याला साकुरा म्हणतात जपानी भाषेत. चेरी ब्लॉसमचा बहर टोकियो ओसाकासारख्या पर्यटनस्थळी मार्च अखेर व एप्रिलच्या सुरुवातीस असतो, संपूर्णपणे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून. दरवर्षी साधारण हा पीरियेड कधी असेल हे देशातल्या नॅशनल चॅनेलद्वारे पब्लिश केलं जातं. पंधरा ते वीस दिवसांचा हा साकुरा वसंत ॠतूच्या आगमनासोबतच सारा आसमंत नवचैतन्याने भारून टाकतो. आशा आणि नवनिर्माणाचं प्रतिक बनलंय साकुरा. आयुष्य आनंद दु:ख ह्या सगळ्याची क्षणिकताही दाखवतं साकुरा. ह्या पंधरा-वीस दिवसांत जपानी लोकं आयुष्य जगून घेतात अगदी. चेरी ब्लॉसमच्या बागांमध्ये उत येतो पिकनिक्सना. ह्या पिकनिक्सना हनामी म्हटलं जातं. रात्रीच्या वेळी झाडांवर कंदील लावून ह्या पिकनिक्स केल्या जातात, ज्यांना योझाकूरा किंवा नाईट साकुरा म्हणतात. चेरी ब्लॉसमच्या दोनशे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. सोमेई योशिनो म्हणजे फिक्या गुलाबी रंगाचं पाच पाकळ्यांचं सिंगल फ्लॉवर. यामाझाकुरा हे पहाडांमध्ये फुलणारं चेरी ब्लॉसम. शिदारेझाकुरा म्हणजे वीपिंग चेरी बहराने लगडलेल्या जमिनीवर झुकणार्या फांद्यांवालं चेरी ब्लॉसम. कझान म्हणजे चाळीस-पन्नास पाकळ्यांचं भडक गुलाबी रंगाचं चेरी ब्लॉसम. युकॉन म्हणजे हळदी कलरचाही साकुरा बघायला मिळतो. पांढर्या गुलाबी रंगाने सजलेलं, वार्याबरोबर सभोवताली हवेत उडणार्या, जणू डान्स करणार्या साकुराचं जपान बघणं केवळ अवर्णनीय. जपान इतकं चेरी ब्लॉसममय होऊन जातं की साकुरा केक, साकुरा डिझाईनचे कपडे, साकुराची पेंटिंग्ज, फिल्म अॅनिमेशन्स, टॅुज, ड्रिंक्स, परफ्युम्स एवढंच काय मॅकडॉनल्डस्कडे चेरी ब्लॉसम बर्गर्स विकले जातात.
साकुराची मजा शब्दात पकडणं केवळ अशक्य त्यामुळे तुमच्या पर्यटनाच्या यादीत एकदातरी चेरी ब्लॉसमच्या एखाद्या देशाची भेट असायलाच हवी. सो चलो, बॅग भरो, निकल पडो!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.