अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला जपान आपणास सांगतो की,‘परकीयांच्या भाषेचं अवडंबर न माजवता आपण आपल्या भाषेत शिकू शकतो. बॉम्बस्फोटांनी बेचिराख झाल्यावर भूकंपांमध्ये उध्वस्त झाल्यावर, ज्वालामुखीत जळून खाक झाल्यावर, त्सुनामीमध्ये सगळं काही पाण्यात गेल्यावरही पुन्हा आपण सर्वकाही नव्याने उभारु शकतो. मनाच्या हिमतीवर-अखंड मेहनत आणि स्वत:च्या जिद्दीवर. आपली परंपरा, रूढी-संस्कृती-संस्कार ह्याची कोणतीही लाज न बाळगता त्यांना जोपासत असतानाच अल्ट्रामॉडर्न जगाच्या निर्मितीमध्ये महत्वाची कामगिरी बजावू शकतो’.
उगवत्या सूर्याचा देश, सर्वात महागडा देश, समर आणि विंटर ऑलिम्पिक्स भरविणारा पहिला आशियाई देश, उच्च राहणीमानाचा देश, सर्वात जास्त आयुर्मान असलेला देश, बालमृत्यूचं प्रमाण नगण्य असणारा देश, प्रचंड मोठ्ठं मिलिटरी बजेट असणारा देश, आयात निर्यातीच्या बाबतीत जगातल्या चौथ्या क्रमांकावर असलेला देश, प्रचंड ताकदीचा देश, जगातली तीन नंबरची इकॉनॉमी म्हणून मिरवणारा देश, आजच्या मॉडर्न जगातही सम्राटाला मानणारा आणि कॉन्स्टिट्युशनल मोनार्की सांभाळणारा देश, 98.5% जापनीज लोकांचा देश, हिरोशिमा आणि नागासाकीच्या बॉम्ब हल्ल्यात बेचिराख होऊनही पुन्हा उसळून उठणारा देश, स्वत:च्या जापनीज भाषेचा गर्व असणारा देश, जागतिक महायुद्धांमध्ये महत्त्वाचा ठरलेला देश, प्रतिचौरस किलोमीटर्समध्ये जास्तीस-जास्त माणसांची घनता असलेला देश, भूकंपाचा आणि त्सुनामीचा देश, पंचाहत्तर टक्के भाग जंगलांनी, पर्वतांनी व्यापलेला असूनही निसर्गाची हानी न करणारा देश, सायंटिफिक रिसर्चमध्ये अग्रस्थानी असलेला देश, प्लॅनिंग- एक्झिक्युशन-डेडीकेशन-परफेक्शनच्या बाबतीत कुणीही हात धरू शकणार नाही असा देश, एकशे पंचाहत्तर एअरपोर्टस् असलेला देश, बुद्धिझम मानणारा देश, संस्कृती-परंपरा जपणारा देश, भरपूर कॉफी पिणारा देश, ऑटोमोबाइलचं सर्वात जास्त उत्पादन करणारा देश, जगातलं सर्वात मोठं फिश मार्केट असणारा देश, 99% साक्षर लोकांचा देश, 96% एम्लॉयमेंट असलेला देश... अशा अनेक वेगवेगळ्या आभुषणांनी नटलेला जपान नेमका आहे तरी किती मोठा? आपल्या भारताशी तुलना केली तर भारताचा आकार जपानपेक्षा नऊपट मोठा आहे किंवा आपला महाराष्ट्र, गोवा, केरळ, अंदमान निकोबार एकत्र केल्यावर जेवढा होईल तेवढाच हा देश पण जगाच्या तुलनेत किती उच्च स्थान पटकावलंय बघा बरं. जपानच्या सुरस तसंच चमत्कारिक कथाही आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतात.
जपानचं वर्णन पु. ल. नी इतकं सुंदर करून ठेवलंय की आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी जपानला भेट द्यावी असं एक स्वप्न उराशी बाळगलेलं असतं. पण तरीही अनेक वषार्ंचा इतिहास बघता आपल्याकडून जसे युरोप अमेरिकेला मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात तसे जपानला घेऊन जाण्यात टूरिझमला फारसं यश आलं नाही. एक कारण होतं ते पैशांचं, जपान खूपच महागडं आहे हा जबरदस्त पगडा, म्हणजे ते आहेच महाग म्हणूनही आपण त्याच्या वाटेला जास्त गेलो नाही. दुसरं म्हणजे भोजन, चीनप्रमाणेच जपानमध्येही आपल्या माणसांना नेमकं खायला काय मिळेल किंवा खायला मिळेल की नाही हा संभ्रम किंवा एक प्रकारची भीती. तिसरं कारण भाषा, जपानमध्ये कुणाला इंग्लिश येत नाही आणि आपल्याला इंग्लिशशिवाय काही कळत नाही. भाषा, भूगोल, भोजन सगळंच एवढं अपरिचीत असल्यावर कसे आपण त्या देशाच्या वाटेला जाणार आणि मुळ मुद्दा पैशाचा. प्रत्येक गोष्ट प्रचंड महाग. आम्हीही हे पैशाचं-भाषेचं- भोजनाचं गणित सोडवायला फार डोकं लावलं नाही आणि जपान आपणासाठी दुरून डोंगर साजरे असाच राहिला. तीन वर्षांपूर्वी वीणा वर्ल्ड थोडं स्थिरावल्यानंतर आम्ही अशी जी डेस्टिनेशन्स आहेत किंवा देश आहेत जिथे पर्यटकांना नेण्यासाठी थोड्याफार अडचणी होत्या त्याची एक लिस्टच बनवली आणि त्यावर काम सुरू केलं. ‘शक्य नाही’ हा शब्द आपल्या आणि पर्यटकांच्या डिक्शनरीमधून काढून टाकण्याचं आम्ही अगदी शतश: मनावर घेतलं. पहीलं मिशन होतं ऑस्ट्रेलिया. तोही असाच महागडा देश. पण दीड लाखात ऑस्ट्रेलिया आणलं आणि हजारो पर्यटकांना ऑस्ट्रेलियात नेऊन आणलं गेल्या दोन-तीन वर्षात. आजही ‘वीणा वर्ल्ड-ऑस्ट्रेलिया टूरिझम-भारतीय पर्यटक’ हा केसस्टडी झालाय पर्यटनक्षेत्रासाठी. ऑस्ट्रेलियाला अफोर्डेबल केल्यावर आमचं लक्ष्य होतं जपान. अतिशय सुंदर असा हा देश खूपच महाग जात होता. मी जर पर्यटक असते तर मलाही जपानच्या सहा दिवसांच्या सहलीसाठी एवढे पैसे द्यायला जीवावर आलं असतं. हल्ली आम्ही पहिला प्रश्न स्वत:लाच विचारतो, ‘तुला कितीमध्ये हे डेस्टिनेशन किंवा हा देश परवडेल?’ हो, कोणतीही गोष्ट नव्याने करायची असेल तर प्रथम ती आपल्याला भावली पाहिजे, जमली पाहिजे, झेपली पाहिजे, पर्यटकांच्या जागी आपल्याला ठेवून ते जोखलं पाहिजे. आमचे एअरलाईन पाटर्र्नर्स, डेस्टिनेशन पार्टनर्स आणि टूरिझम बोर्डस् ह्या सर्वांना सहभागी करून आम्ही अदरवाईज महाग वाटणारं जपान मोस्ट अफोर्डेबल केलं आणि गेल्या दोन वर्षात जपानही हजारो पर्यटकांनी पाहिलं. आता येतोय जपानचा मोस्ट पॉप्युलर ऑटम सीझन, लाल भडक आणि पिवळ्या धमक रंगात न्हाऊन निघालेलं जपान बघणं म्हणजे डोळ्यांना मेजवानीच.
सुशी, सुमो रेसलिंग, किमोनो, सामुराई, बुद्धिझम, शिंतोईझम, बेसबॉल, वेंडिंग मशिन्स, घोड्याचं कच्च मास-बसाशी, सहा ते सात इंच उंच उंबरठ्यावाली घरं, बाहेरून आल्यावर घराबाहेर चपला काढायची पद्धत, जमिनीवर बसून जेवणं, कमीत-कमी फर्निचरवाली घरं, वाकून आपल्या नम्रपणाचं दर्शन घडवणारी पण बिझनेसच्या बाबतीत तेवढीच श्रुड आग्रही असणारी-वेळ पाळणारी-शिस्तबद्ध जीवन जगणारी जपानी माणसं... अशा अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला जपान आपणास सांगतो की, परकीयांच्या भाषेचं अवडंबर न माजवता आपण आपल्या भाषेत शिकू शकतो. बॉम्बस्फोटांनी बेचिराख झाल्यावर भूकंपांमध्ये उध्वस्त झाल्यावर, ज्वालामुखीत जळून खाक झाल्यावर, त्सुनामीमध्ये सगळं काही पाण्यात गेल्यावरही पुन्हा आपण सर्वकाही नव्याने उभारु शकतो. मनाच्या हिमतीवर-अखंड मेहनत आणि स्वत:च्या जिद्दीवर. आपली परंपरा, रूढी-संस्कृती-संस्कार ह्याची कोणतीही लाज न बाळगता त्यांना जोपासत असतानाच अल्ट्रामॉडर्न जगाच्या निर्मितीमध्ये महत्वाची कामगिरी बजावू शकतो. प्रत्येक देश आपल्याला काहीतरी शिकवत असतो तो असा. जपानध्ये सगळंच काही आलबेल आहे असं नाही पण आपण टुरिस्ट म्हणून जातो तेव्हा जेवढं त्या देशाकडून चांगलं घेता येईल तेे घ्यायचा आपला महत्त्वाचा रोल असतो. आणि तो आपण पार पाडावा. जास्त खोलात जायची गरज नसते.
जपान हा इतर देशांपेक्षा खूप वेगळा आहे हे टोकियोच्या नरिता एअरपोर्टवर उतरल्यापासूनच आपल्या लक्षात येतं. इथे आपला कसा काय निभाव लागणार ही चिंता पटकन मनाला स्पर्श करून जाते. पण काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर तुमच्याबरोबर असणारच आहे ज्याने अनेकदा जपानच्या वार्या केल्या आहेत. त्याच्यासोबत सदा वाकून नम्रपणे सेवा देणारा आमचा तिथला लोकल गाईडसुद्धा आपल्या दिमतीला असणार आहे. आता थोडंसं जाणून घेऊया नेमकं आपल्या ह्या सहा दिवसांच्या सहल कार्यक्रमात काय आहे ते. आपण मुंबई- टोकियो-मुंबई असा विमानप्रवास घेतो. हिरोशिमाला जाताना जापनीज बुलेट ट्रेनचा प्रवासही आपण या सहलीत समाविष्ट केलाय. टोकियोमध्ये टोकियो टॉवर पॅलेट टाऊन, मेगा वेब, व्हिनस फोर्ट, आसाकुसा टेंपल, इम्पिरियल पॅलेस फोटो स्टॉप, शिंजुकू गार्डन, स्काय ट्री, नाकामिसे शॉपिंग आर्केडसोबत रेनबो ब्रीजही तिथनं जवळून पास होताना पाहतो. टोकियोहून हिरोशिमाला जाताना माऊंट फुजी आपल्याला दिसतो. तेथेच लेक हकोने आणि लेक आशी आपण बघतो. हिरोशिमाचा बॉम्ब डोम, सडाको मॉन्युमेंट, मेमोरियल सेनोटा, हिरोशिमा पीस पार्क, हिस्ट्री म्युझियम हे सारं बघताना मन हेलावून जातं, हाच आपल्या सहलीचा क्लायमॅक्स असतो. ओसाका हे एक आणखी मोठ्ठं शहर, तिथे जाताना आपण नारा डियर पार्क, तोडाजी टेंपल, कियोमिझू टेंपल सोबतच गोल्डन पॅव्हिलियन, निजो कॅसल आणि ओसाका कॅसलचं दूर दर्शन घ्यायलाही विसरत नाही. हे सगळं पर्यटन करीत असताना जागोजागी आपल्याला लाल पिवळे साज घातलेली ऑटम कलर्स डोक्यावर मिरवणारी झाडं बागा दिसत राहतात, मंत्रमुग्ध करून टाकतात, आपल्या कॅमेरात सतत बिझी ठेवतात. किती आणि कुठे-कुठे सेल्फी काढू असंं आपल्याला होऊन जातं. तर अशी ही जपानच्या वेगळ्या विश्वाची सहल थोडक्यात इथे दिली आहे. नेहमीप्रमाणे एअरफेअर, एअरपोर्ट टॅक्स, व्हिसा, हॉटेल वास्तव्य, ट्रान्सपोर्ट, भोजन आणि हो आपणाला इंडियन भोजन देणार बरं का जपानमध्ये काळजी नसावी आणि सुशी पण खायला देणार. जिथे जातो तिथली मेन डिश टेस्ट करायला नको का? सो, चला मंडळी लेट्स गो टू जपान धिस टाईम ड्युरिंग ऑटम कलर्स!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.