तिथल्या आम्हाला मिळालेल्या सर्व्हिसला एकच शब्द फीट बसत होता तो म्हणजे,सिल्व्हर सर्व्हिस. ती सर्व्हिस देणारा तिथला सर्व स्टाफ हा रुबाबदार पोशाखात वावरत होता. आम्ही शंभरजणं असलो तरी डायनिंग टेबलवर बसलेल्या प्रत्येकाला स्पेशल ट्रीटमेंट दिली जात होती, आमच्या प्रत्येकाच्या खूर्चीमागे एक जण उभा होता, आम्हाला काय हवं नको ते पहाण्यासाठी. काही क्षण तर वाटलं की आपण एखाद्या राज घराण्यातलेच कुणीतरी आहोत की काय!
एव्हरिथिंग विल बी ऑलराइट इन द एन्ड सो इफ इट्स नॉट ऑलराइट इट्स नॉट येट द एन्ड. द बेस्ट एक्झॉटिक मॅरिगोल्ड हॉटेलमधल्या चित्रपटातील हे वाक्य स्वित्झर्लंड टूरिझमचा भारतातील हेड क्लॉडियोच्या समारोपातल्या भाषणाचे शेवटचे वाक्य होते. भारतातल्या स्वित्झर्लंड टूरिझमच्या प्रमुखपदी क्लॉडियो झेम्प हा गेली चार वर्ष कार्यरत होता. त्याची भारतातील कारकीर्द संपल्याने तो आता अमेरिकेतल्या स्वित्झर्लंड टूरिझमचा ताबा घेण्यासाठी निघाला होता. तेव्हा त्या निमित्ताने स्वित्झर्लंड कॉन्स्युलेट जनरलने त्यांच्या स्वतःच्या घरी क्लॉडियोसाठी फेअरवेल डिनर पार्टी ठेवून आम्हा काही टूर कंपन्यांना आमंत्रण दिले होते. स्वतःच्या घरी बोलवण्याची स्वित्झर्लंड कॉनस्युलरची ही पद्धत मनाला भावून गेली. आणि स्वित्झर्लंड हे भारतातल्या पर्यटकांसाठी युरोपातले सर्वात लोकप्रिय डेस्टिनेशन का ठरते ह्या गोष्टीची अधिक खात्री पटली. भारतात अनेक मार्केटिंग कॅम्पेन्स, ट्रेनिंग्ज इत्यादी घडवून स्वित्झर्लंडला पर्यटनासाठी अव्वल नंबरवर कायम ठेवण्याचे काम स्वित्झर्लंड टूरिझमने केलेच पण त्याचबरोबर भारतातल्याच काही अनोख्या आकर्षणांची ओळखसुद्धा आम्हा भारतीय लोकांना घडवून आणली. जगात अनेक ठिकाणी प्रवास केलेल्या पर्यटकांच्या मनात नेहमीच उत्सुकता असते की कुठल्या नवीन ठिकाणाला भेट द्यायची किंवा कुठला नवीन आविष्कार पहायचा तर साहजिकच जगभरातील ट्रॅव्हल एजंट्सच्या मनातसुद्धा शोधमोहिम कायम असते ती आपल्यासोबत येणार्या पर्यटकांना प्रत्येकवेळी नवीन काहीतरी दाखवायचं म्हणून. जेव्हा कुठल्या ट्रॅव्हल कंपनीची ट्रॅव्हल कॉन्फरन्स घडते त्यावेळी कॉन्फरन्सला जाण्यासोबतच एक आकर्षण नेहमी असतं, ते म्हणजे आपण जातोय ती कॉन्फरन्स नेमकी कुठे घडतेय. यावेळी स्वित्झर्लंड टूरिझमने भारतातील ट्रॅव्हल एजंट्ससाठी ट्रॅव्हल कॉन्फरन्स आयोजित केली होती. अनेक देशातले टूरिझम बोर्डस् ट्रॅव्हल एजंट्ससाठी एक्झीबिशन्स, कॉन्फरन्स घडवत असतात. मग अशावेळेला दरवर्षी एकाच ठिकाणी (म्हणजेच उदाहरणार्थ हॉटेल, हॉल किंवा एखादं रीसॉर्ट अथवा तत्सम डेस्टिनेशन) जाऊन म्हणावी तेवढी उत्सुकता राहत नाही. पण स्वित्झर्लंड टूरिझम बोर्डाने यंदा कॉन्फरन्ससाठी हैदराबाद येथील फलकनुमा पॅलेसची अनाउंसमेंट करून आम्हा सर्वच ट्रॅव्हल एजंटना सुखद धक्का दिला, आणि मग काय तिथे कॉन्फरन्सला जाण्याची उत्सुकता अधिक वाढली.
फलकनुमा पॅलेसमध्ये अधिक लक्षात राहिला तो तिथल्या डायनिंग हॉलमधला गाला डिनर. त्या डीनरचा थाटच काही और होता. हैदराबादच्या निझामाच्या फलकनुमा पॅलेसचं हॉटेलमध्ये रुपांतर झालं अनं ते ओळखलं जाऊ लागलं ताजचे फलकनुमा पॅलेस हॉटेल म्हणून. तिथे आम्ही पोहोचलो तेव्हा चेक-इन करण्याआधी मुख्य प्रवेशद्वारापासून आम्हाला एका शाही घोडागाडीत बसवून रीसेप्शन गेटपर्यंत आणण्यात आले, अर्थात तशी घोडागाडी आत्तापर्यंत एखाद्या ऐतिहासिक सिनेमात राजा- राजवड्यांचीच पाहिली होती. तिच्यातून उतरल्या-उतरल्या आमच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला आणि तिथेच उभ्या असलेल्या धिप्पाड छत्रीधारी दरबानने आम्हाला रीसेप्शनपर्यंत शाही इतमामात पोहोचवले. खर्याअर्थानं आमच्या रॉयल हॉलिडेला सुरुवात झाली होती असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. तसं पाहिलं तर हा हॉलिडे नव्हता, आम्ही बिझनेससाठी म्हणजेच ट्रॅव्हल कॉन्फरन्ससाठी एकत्र आलो होतो. फलकनुमा पॅलेसमध्ये चेक-इन केल्यानंतर आम्ही आपापल्या रूममध्ये गेलो, तिथे जाता-जाताच नजर पडली तिथल्या परिसरावर. त्या पॅलेसमध्ये सभोवती अनेक प्रोग्राम आमच्यासाठी आयोजित केले होते, अर्थात तशी लगबग-सजावट पाहिली तेव्हा त्याचा अंदाज लागलीच आला. त्या संध्याकाळी सुफी गाण्यांचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता, तसंच लाइव्ह बासरी वादनसुद्धा होतं. संपूर्ण पॅलेस आमच्यासाठीच बूक केल्यामुळे तिथे सगळीकडेच म्युझिकचा एक छान फील देण्यात आला होता.
पुढच्या दोन दिवसांत फलकनुमा पॅलेसच्या मीटिंग रूममध्ये बिझेनस मीटिंग तर छान पार पडल्या पण सर्वात अधिक जर काही लक्षात राहिलं असेल तर तिथल्या डायनिंग हॉलमधला गाला डिनर. ताज फलकनुमा पॅलेसच्या डायनिंग हॉलला डायनिंग वन झिरो वन असं म्हटलं जातं आणि हा जगातला सगळ्यात लाँगेस्ट डायनिंग हॉल म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत देश-विदेशातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी या हॉटेलमधल्या रॉयल ट्रीटमेंटचा आस्वाद घेतला आहे. त्या डायनिंग हॉलमधलं अतिशय सुंदर लाकडी कोरीव काम आणि आकर्षक शँडेलियर्सनी सजलेला तो हॉल पाहून आम्ही थक्कं झालो. त्या हॉलमधील डायनिंग टेबलची एक खासियत अशी होती की त्या टेबलवर एका टोकाला बसलेल्या व्यक्तीने बाजूच्या व्यक्तीशी अगदी कानात जरी हळू आवाजात कुजबूज केली तरी टेबलाच्या विरुद्ध टोकाला बसलेल्या व्यक्तीला ते ऐकू जात होतं. तो हॉल रंगबिरंगी सुंदर फुलांनी सुजला होता त्यामुळे वातावरणही सुंगधित झालं होतं. तिथल्या आम्हाला मिळणार्या सर्व्हिसला एकच शब्द फीट बसत होता तो म्हणजे, सिल्व्हर सर्व्हिस. ती सर्व्हिस देणारा तिथला सर्व स्टाफ हा रुबाबदार पोशाखात वावरत होता. मेल स्टाफच्या हातात व्हाइट ग्लोव्हजपासून डोक्यावरच्या फेट्यांपर्यंत आणि फीमेल स्टाफच्या डीझायनर साड्यांपर्यंत सारंच अप टू डेट होतं. बरं आम्ही शंभर एक जणं असलो तरी डायनिंग टेबलवर बसलेल्या प्रत्येकाला स्पेशल ट्रीटमेंट दिली जात होती, त्यासाठी आमच्या प्रत्येकाच्या खूर्चीमागे एक जण उभा होता आम्हाला काय हवं नंको ते पहाण्यासाठी. बरं, आम्हाला आणून दिली जाणारी प्रत्येक डीश ही सिल्व्हर डोमने (चांदीच्या भांड्याने) झाकलेली होती. प्रत्येक नवीन डीश ही सर्वांचा आधीचा कोर्स संपल्यानंतर एकाचवेळेस नवीन कोर्सवरचा सिल्व्हर डोम काढून प्रेझेंट केली जात होती. हा थाट पाहून काही क्षण वाटलं की आपण एखाद्या राज घराण्यातलेच कुणीतरी आहोत की काय! तो खरंतर थीम डीनर होता. आपल्या कॉर्पोरेट टीमलाही ह्याचा अनुभवता घेता येऊ शकतो बरं का. आपण जर स्वतंत्रपणे आलो तर ह्या डायनिंग हॉलच्या एक्सपीरियन्सला मुकू शकतो पण जेव्हा एखादी कंपनी त्यांच्या कर्मचार्यांच्या इन्सेंटिव्हज् टूरसाठी, मीटिंगसाठी असा हॉल रेंटवर घेते, तेव्हा असा रॉयल एक्सपीरियन्स घेता येतो.
सर्वांचे सुंदर पोशाख, अतिशय चविष्ट जेवण, सुंदर हॉल, मधुर संगीत आणि सजलेला पॅलेस या सर्व गोष्टींमुळे ती संध्याकाळ एक अविस्मरणीय संध्याकाळ ठरली होती. त्या संध्याकाळी एका खास प्रोग्रामसाठी आम्हाला रॉयल ड्रेसकोडमध्ये या अशी विनंती केली होती. अर्थात रॉयल ड्रेसमुळेही एक खास माहौल तयार झाला होता. खरंतर स्वित्झर्लंड टूरिझमला कुठल्याही भारतीय शहरात मॉर्डन पंचतारांकित हॉटेल घेऊन कमी पैशात ती कॉन्फरन्स घडवून आणता आली असती, पण आपण जर पर्यटन क्षेत्रांमध्ये आपला अव्वल नंबर भारतात टीकवून ठेवायचा असेल तर आपले इव्हेंट अशाच रॉयल ठिकाणी करावेत या भावनेने स्विस टूरिझम बोर्डाने ही रॉयल कॉन्फरन्स घडवून आणली होती. फलकनुमा पॅलेसमधील सहा हॉल, डायनिंग हॉल, गार्डन्स, आकर्षक रचनेच्या टेरेसेस् आणि इतरही जागा आपल्या कपंनीला कोणत्याही कॉर्पोरेट इव्हेंटसाठी रेंटवर घेता येऊ शकतात. एखादं अॅवॉर्ड फंक्शन असेल, इन्सेंटिव्हज् टूर, मीटिंग्ज, कॉन्फरन्स किंवा एक्झीबिशन असेल तर कंपनी एखादं नेहमीचं हॉटेल घेण्यापेक्षा, असे पॅलेस हॉटेल घेऊन रॉयल ट्रीटमेंटचा एक्सपीरियन्स आपल्या टीमला देऊ शकते. फलकनुमा पॅलेसनंतर पुढील वर्षी स्वीस टूरिझम बोर्डाने चक्क महाराष्ट्र टूरिझमच्या एका रॉयल ट्रेनवर, म्हणजेच डेक्कन ओडिसी या ट्रेनवर कॉन्फरन्स आयोजित केली होती. एका रात्रीच्या त्या ट्रेनमधील वास्तव्याबरोबर मीटिंग्जचा रॉयल टचही आम्ही सगळ्यांनी अनुभवला. आपल्या भारतातच आपण असे अनोखे अनुभव आपल्या टीमला देऊ शकतो, तसंच जगभरात कुठेही असे वेगवेगळे एक्सपीरियन्स घेता येतात.
आपल्या कंपनीचे किती लोक जाणार आहेत, त्यांचा प्रोफाईल काय आहे आणि आपले बजेट काय आहे ह्यावर डेस्टिनेशन ठरवून आपण ही कॉर्पोरेट टूर कुठे आणि कशी घडवायची हे ठरवू शकतो. म्हणजे आपण अगदी थायलंडच्या पट्टाया आणि बँकॉकमध्ये सर्वांसाठी पॅरासेलिंग, झीप लाइनिंग अशा अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीजपासून ते सफारी वर्ल्डमध्ये आपल्या कंपनीचे बॅनर लावणे अशा गोष्टीदेखील अधिक बजेट किंवा कमी किमतीत करू शकतो. तर दुसर्या टोकाला आपण आपल्या टीमसाठी आईसलँड किंवा स्कॅन्डिनेव्हियामध्ये नॉर्दन लाइट्सचा आनंद घेत, ग्लेशियर्स बघत स्नो मोबाईल रेसिंगची शर्यतसुद्दा अनुभवू शकतो. अबुधाबीमध्ये फॉर्म्युला वनची राईड एन्जॉय करण्याची मजा काही औरच. स्वित्झर्लंडमध्ये जिथे जेम्स बाँडच्या सिनेमाचे शूटिंग झाले, तिथे जेम्स बाँंड स्टाईलमध्ये थीम बेस्ड मीटिंग्ज व पार्टीजचा आनंद घेऊ शकतो. एवढेच काय, जगावेगळं काही करायचं असेल तर तुमच्या कंपनीसाठी संपूर्ण गावच्या गाव रेन्टवर घेता येते. ऑस्ट्रिया, जर्मनी व स्वित्झर्लंडच्या काही गावांमध्ये हे शक्य आहे. याचबरोबर इथे आईस स्कल्पटिंग कॉम्पीटिशनमध्ये बर्फाचे वेगवेगळे कोरीव काम करीत मूर्त्या बनवणं, हस्की डॉग्जच्या स्लेज राईड्सचा आनंद घेत टीम बिल्डिंगचा अगदी वेगळ्या प्रकारे अनुभव घेता येतो. या इन्सेंटिव्हज् टूर्स, एक्झीबिशन्स टूर असोत किंवा अॅग्रो टूरिझममध्ये शेतकर्यांसाठीच्या अॅग्रो टूर असोत किंवा मग आर्किटेक्चरच्या कंपन्यांसाठी खास आर्किटेक्चर टूर असोत, कंपनीचा बिझनेस काय आहे ह्यावर डेस्टिनेशन आणि अॅक्टिव्हिटीजची निवड होऊ शकते.
सध्या अनेक कंपन्या आपल्या टीमसाठी माईस टूर आयोजित करतायत आणि त्यासाठी नव्या डेस्टिनेशनच्या शोधात आहेत. बाकू, अर्मेनिया, जॉर्जिया, ताश्कंद, लॅटविया, क्रोएशिया अशा युरोप आणि एशिया मधल्या नवीन डेस्टिनेशन्सकडे जाण्याचा ट्रेंड आता दिसतोय. ह्या अशा इन्सेंटिव्हज् टूरवर जर दोन-तीन दिवसांचा ब्रेक मिळाला तर तिथल्या रीफ्रेशिंग एक्सपीरियन्सनंतर, आपसातला रॅपो वाढविल्यानंतर, नक्कीच ही टीम आपल्या कंपनीच्या बिझनेसचं पुढचं टार्गेट अचिव्ह करण्याची एनर्जी घेऊन परतेल ह्यात दुमत नाही.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.