मतदानाच्या शेवटच्या फैरी झडताहेत, अनेक गोष्टींचं भवितव्य पेटीबंद होणार आहे. निकाल काय लागणार ते कळायला जवळ-जवळ एक महिन्याचा कालावधी आहे. एक सुविचार आठवला, जर तुम्ही तुमचं काम चोख बजावलं असेल, मन:पूर्वक प्रयत्न केले असतील तर चिंता-काळजी सोडून शांतपणे परिणामांची वाट बघा. जो होगा सो होगा। लेट्स एन्जॉय!
निवडणुका म्हणजे अनेकांच्या अक्षरशः जीवन-मरणाचा प्रश्न. काही दिवसांतच ही रणधुमाळी ओसरेल. तेवीस मे ला एकदाचा काय लागायचा तो निकाल लागेल. आपली-सर्वसामान्यांची मानसिक ओढाताणही संपेल. हो बघा नं, राज्यावर-देशावर कोण राज्य करणार ह्याची आम्हाला कसली घोर चिंता. सगळं मनःस्वास्थ्यच ढासळलेलं. एक दिवस आमच्यातली चर्चा खूपच गरमागरम झाल्यावर आम्ही सुज्ञ झालो आणि ठरवलं, मतदान कुणाला करायचं हा संपूर्णपणे वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. त्यात कुणी कुणाला इन्फ्लुएन्स करायचं नाही. प्रत्येकाने शंभर टक्के मतदान मात्र करायचं. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास बघितला तर सरकार सरकारचं काम करतं आणि आपल्याला आपल्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत, त्यात कसूर नको. मात्र जे सरकार येईल त्याने देशाचं भलं करावं, देशाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी, आणि सोबत दैनंदिन प्रश्न सोडविण्याची आणि वैयक्तिक आयुष्य जगताना जे कष्ट पडताहेत ते सुसह्य करावे ही अपेक्षा ठेवूया, यापेक्षा जास्त आता ह्या गोष्टींमध्ये आपला वेळ नको घालवूया. आपलं आयुष्य-आपलं भविष्य आपल्याला घडवायचं आहे, सो लगे रहो उद्या महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात मतदान आहे, त्यासाठी उमेदवारांना आणि मतदारांना दोघांनाही शुभेच्छा!
निवडणुका आणि त्यांचे निकाल ह्यांच्यानुसार आमच्या सहलींचं आणि व्यवसायाचं वेळापत्रक वरखाली होत असतं. ज्यांचा निवडणुकांशी थेट संबंध नाही अशी मंडळी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली रे लागली की पर्यटनाला निघतात. ज्यांना ज्यांना इलेक्शनची ड्युटी लागते, जे उमेदवार वा प्रचारक असतात ते मात्र मतदान होईपर्यंत कुठेही जायचा विचार करीत नाहीत. मतदान झालं की निकालाचा दिवस येईपर्यंत मग ही मंडळी प्रवासाला निघतात. कालपासूनच आमच्या ऑफिसेसमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणत्या सहली उपलब्ध आहेत त्याची विचारणा होतेय. जिथे सहली फुल्ल झाल्यात तेथे आम्ही कस्टमाईज्ड हॉलिडेचा पर्याय देतोय. प्रचारफेर्या, सभा, दौरे यांनी कार्यमग्न असलेल्या मंडळींना आम्ही टूर मॅनेजरच्या दिमतीतल्या गाईडेड टूर ऐवजी कस्टमाईज्ड हॉलिडेचा ऑप्शन देतो. शांत- निवांत-त्यांना हवा तसा आनंद ते त्यातून मिळवू शकतात. त्यातही त्यांना जर आणखी सोप्पं करुन हवं असेल, डोक्याला अजिबात ताप नको हवा असेल तर त्यांच्या त्या वैयक्तिक हॉलिडेसाठी टूर मॅनेजरही सोबत देऊ शकतो. एकदा का पर्यटनाला जायचा विचार पक्का झाला की वीणा वर्ल्ड आहेच सर्वतोपरी सहाय्य करायला आपल्या दिमतीला. इतर ठिकाणी नाही पण पर्यटन ह्या विषयावर आमची मालकी आहे बरं का!
आता जी मंडळी पर्यटनाला निघणार आहेत त्यांच्यासाठी काय-काय पर्याय आहेत ते आपण बघूया, म्हणजे ठरवाठरवीत वेळ जाणार नाही कारण आत्ता ऑलरेडी तसं बघायला गेलं तर थोडा उशीरच झाला आहे. विमानं, हॉटेल्स, सहली आदींना अनेक ठिकाणी सोल्ड आऊट किंवा हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. पण वीणा वर्ल्ड आहे नं! वुई विल मेक इट हॅपन!
प्रवासाला निघायचं म्हटलं म्हणजे आवड- सवड-बजेट ह्या तीन गोष्टींचा प्रथम विचार करावा लागतो. आवड थंडगार बर्फाच्छादित पहाडांची आहे की शॉपिंगची की बीचेस-सन-सँड हे जाणून ठिकाण निवडायचं. सवड किती दिवसांची आहे किंवा बजेट किती आहे हे अंड आधी की कोंबडी आधी सारखं आहे. तरीही बजेट जेवढं असेल त्यानुसार सवड ठरवणं चांगलं. सो कुठे जायचं, किती दिवस जायचं, किती पैसे खर्च करायचे ह्याची थोडीशी रुपरेखा मिळाली की पुढचा प्रश्न असतो भारतात फिरायचं की परदेशात. आपल्या देशात आपण आधारकार्ड- पॅनकार्डच्या आधारे फिरू शकतो पण परदेशात जायला पासपोर्ट मस्ट. आणि प्रत्येकाने पासपोर्टवरची व्हॅलिडीटी म्हणजेच एक्सपायरी डेट चेक करावी. सहलीवरून भारतात परत येण्याची तारीख जी असते त्यापासून पुढे सहा महिने पासपोर्ट व्हॅलिड असावा लागतो तसंच पासपोर्ट कुठे खराब झालेला नाही नं ते ही चेक करावं. एकदा का पासपोर्ट, बजेट, साधारणपणे ठिकाण ठरवलं की आमचं ऑफिस गाठायचं किंवा वीणा वर्ल्डच्या वेबसाईटवर धडकायचं. तुम्ही वीणा वर्ल्डसोबत जा किंवा स्वतंत्रपणे, नो इश्यूज्, पण वीणा वर्ल्ड वेबसाईटला भेट देण्याचा आग्रह मी एवढ्यासाठीच करते की तिथे तुम्हाला प्लॅनिंगसाठी खूप मार्गदर्शन मिळू शकेल. अनेक मंडळी मला सांगतात. आम्ही आमचे आम्ही गेलो पण तुमच्या वेबसाईटचा खूप उपयोग झाला युरोप अमेरिकेच्या पुस्तकांविषयीही पर्यटक तेच म्हणतात, स्वतः फिरताना त्या पुस्तकांचा खूप उपयोग झाला. आम्ही पर्यटन सोप्पं केलंय ते असं. असो.
आता आपण बघू या, आपल्याकडे काय काय पर्याय उपलब्ध आहेत ह्या अशा इलेवन्थ अवरला. आधी भारताचा विचार करूया. उन्हाळ्याच्या सुट्टीत जनरली थंड हवेकडे, बर्फाच्छादित पहाडांकडे जाण्याचा पर्यटकांचा कल असतो. आपल्या भारतात संपूर्ण जग एकवटलंय असं आम्ही अभिमानाने म्हणतो. यू नेम इट वुई हॅव इट अशी परिस्थिती. आपलं सौभाग्य असं की आपल्या माथ्यावर उत्तरेकडे आपल्याला हिमालयाचा जबरदस्त वरदहस्त लाभलाय. अनब्रेकेबल स्ट्राँग वॉल इन द नॉर्थ! (हाहाहा! हे माझं बॉलीवूड-हॉलीवूड Game Of Thrones प्रेम) लेह लडाख, काश्मीर, डलहौसी, मनाली, शिमला, मसूरी, नैनिताल, दार्जिलिंग, सिक्किम, नॉर्थ ईस्ट-तवांग तसंच आपले शेजारी देश नेपाळ आणि भूतान आपला उन्हाळा सुसह्य बनवितात. ह्या सर्व ठिकाणी वीणा वर्ल्डचे पर्यटक तुम्हाला मोठ्या संख्येने दिसतील. हे सगळं ज्याचं बघून झालंय त्यांच्यासाठी दक्षिणेकडे उटी-म्हैसूर-कूर्ग किंवा केरळ किंवा अंदमानचा पर्याय आहे. काही सहलींमध्ये जागा असू शकतात, आणि समजा नसतील तर तुम्ही वीणा वर्ल्डकडून तुम्हाला हवा तसा तुमच्या मनासारखा कस्टमाईज्ड हॉलिडे बनवून घेऊ शकता, टूर मॅनेजरसह किंवा शिवाय.
व्हॅलिड पासपोर्टवाली मंडळी परदेश प्रवासाला निघू शकतात. अर्थात फॉरिनला जाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे व्हिसा. व्हिसा तीन प्रकारे काढला जातो. त्या-त्या देशाच्या कॉन्स्युलेटमध्ये अॅप्लिकेशन किंवा इंटरव्ह्यूद्वारे, ऑनलाईन अॅप्लिकेशन करुन किंवा ऑन अरायव्हल पद्धतीने म्हणजे त्या देशात पोहोचल्यानंतर तेथील विमानतळावर आपल्याला तो दिला जातो. आता आपल्या हातात तसा कमी वेळ असल्यामुळे आपल्याला एकतर जिथे ऑन अरायव्हल व्हिसा करता येतो अशा मॉरिशस, थायलंड, बाली, केनिया, हाँगकाँगसारख्या देशांमध्ये सहल घ्यावी लागेल किंवा ज्या कॉन्स्युलेटमधून व्हिसा लवकर मिळू शकतो अशा ठिकाणी आपण लागलीच अॅप्लिकेशन करुन त्या देशांमध्ये सहल करू शकतो. समर व्हेकेशनमध्ये जसा भारतात हिमालयाकडे पर्यटकांचा ओढा असतो, अगदी तसेच परदेशात साउथ ईस्ट एशिया आणि युरोपकडे पर्यटक प्रचंड प्रमाणावर गर्दी करतात. पर्यटकांसाठी एशियामध्ये सिंगापूर थायलंड मलेशिया हाँगकाँग बाली व्हिएतनाम कंबोडिया जपान चायना ह्या देशांचे व्हिसा वीणा वर्ल्डच्या साहाय्याने केले जातात आणि तसा त्यांना अवधी कमी लागतो. त्यामुळे अगदी इलेवन्थ अवर असला तरी आशियातल्या एकूण पन्नास प्रकारच्या सहलींमधून ग्रुप टूर किंवा कस्टमाईज्ड हॉलिडे अजूनही शक्य आहे. युरोप अल्टिमेट आहे आणि म्हणूनच युरोपसाठी वीणा वर्ल्डकडे एकूण एक्याऐंशी प्रकारच्या ग्रुप टूर्स आहेत आणि असंख्य कस्टमाईज्ड हॉलिडे आयडियाज. प्रश्न आहे किती लवकर व्हिसा मिळतो त्याचा. अर्थात अनेक कॉन्स्युलेट्समध्ये हल्ली एक्स्ट्रा पैसे भरून तातडीने व्हिसा करुन घेण्याची फॅसिलिटी असल्याने युरोपच्या अनेक सहली किंवा कस्टमाईज्ड हॉलिडे आजही शक्य आहे. साउथ ईस्ट एशिया किंवा युरोप ज्यांचं झालंय ती मंडळी आपला मोर्चा अमेरिकेकडे वळवितात. अमेरिका व्हिसा करायला एअर तिकीट लागत नसल्याने हा व्हिसा आधी करून ठेवता येतो आणि जनरली तो दहा वर्षांचा मिळतो. त्यामुळे ज्यांच्याकडे USA व्हिसा आहे ती मंडळी युएसएसाठीच्या पंधरा पर्यायांमधून आपली सहली निवडू शकतात किंवा हवाई-मेक्सिकोची सहल घेऊ शकतात, इथे युएसए व्हिसा असल्यावर नव्याने व्हिसा काढावा लागत नाही. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका न्यूझीलंडची कोणती सहल आता शक्य आहे ते आमची सेल्स एक्झीक्युटिव्ह मंडळी आपल्याला सांगू शकतील. पासपोर्ट घ्यायचा आणि आमचं ऑफिस गाठायचं हे महत्त्वाचं, बाकी सगळं मार्गदर्शन करायला टीम आहेच. आणि हो युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साउथ ईस्ट एशिया, फार ईस्ट एशिया अशा सर्वच ठिकाणी वीणा वर्ल्डचे भरपूर पर्यटक पर्यटन करताना तुम्हाला दिसतील, सहली सर्वत्र व्यवस्थित सुरू आहेत. वीणा वर्ल्ड अॅट युवर सर्व्हिस, काळजी नसावी.
सो इट्स नेव्हर टू लेट... चलो, वोट करो, बॅग भरो, निकल पडो।
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.