संस्था असो किंवा नातं दोन्ही जर टिकवायची असतील तर त्यात कोणतेही गैरसमज असणार नाहीत हे आपण बघितलं पाहिजे, नव्हे तशी खबरदारी घेतली पाहिजे. आम्ही वीणा वर्ल्ड ही संस्था चालवतोय, आणि ती संस्था जर वर्षानुवर्ष चांगल्यातर्हेने चालवायची असेल तर आमचं पर्यटकांसोबतचं नातं हे चांगलं आणि सुदृढ असलं पाहिजे. सगळ्या गोष्टी सरळ असल्या पाहिजेत, सुस्पष्ट पाहिजेत, त्यात कुठेही गोंधळ नको, गैरसमज नको.
एखादी गोष्ट सातत्याने आपण करीत असू आणि त्याचा फायदा ज्यांना होतो त्यांना ती गोष्ट रुचत असेल, दरवर्षी त्याच्या मागणीत चढत्या क्रमाने वाढ होत असेल तर ती गोष्ट विन-विन सिच्युएशन बनून रूढ होते, आपलं स्थान पक्क करते, सर्वांना त्याची सवय होते, आणि अशा गोष्टींची आपण वाट बघतो त्या-त्या वेळी. एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान असणारी वीणा वर्ल्ड समर ऑफर म्हणजे खासकरून एप्रिल-मे-जून च्या उन्हाळी सुट्टीतल्या सहली सर्वात कमी किमतीत मिळण्याची सुवर्णसंधी. त्याचप्रमाणे एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान जाहीर होते वीणा वर्ल्ड विंटर ऑफर, ज्यामध्ये असतात मुख्यत्वे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या सहली सर्वात कमी किमतीत. वर्षातून दोनदा जाहीर केल्या जाणार्या, समर व्हेकेशन आणि विंटर व्हेकेशनला लक्ष्य करणार्या ह्या ऑफर्सची नावं पूर्वी जानेवारी ऑफर आणि जुलै ऑफर अशी होती, म्हणजे त्यांचं नामकरण झालं नव्हतंच. जानेवारी महिन्यात असणारी म्हणून जानेवारी ऑफर आणि जुलैमध्ये असणारी म्हणून जुलै ऑफर ही आपोआप चिकटलेली नावं होती. पूर्वी मुलगी झाली तर बेबी आणि मुलगा झाला तर बाबू ही नावं जशी चिकटली जायची तसंच ह्या दोन ऑफर्सच्या बाबतीत झालं. वीणा वर्ल्ड बर्यापैकी स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही हळूहळू आपल्याकडच्या प्रत्येक गोष्टीला काय नाव दिलंय? ते नाव समर्पक आहे का? त्या नावातून ती गोष्ट म्हणजे काय हे प्रतित होतं का? ते नाव उच्चारल्यावर समोरच्याला पटकन कळतं काय आहे ते, की त्याला म्हणजे काय हे समजावून सांगावं लागतं? अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली, आणि बर्यापैकी नावं आम्ही बदलली. व्यवस्थापनाच्या भाषेत सांगायचं तर टर्मिनॉलॉजी व्यवस्थित केली, म्हणजे ते काम अजूनही चालू आहेच आणि ते तसं संपणारं नाहीये. मात्र आता जेव्हा नव्याने काही करायला जातो तेव्हा त्या गोष्टीला नाव काय द्यायचं ह्यावर थोडा ऊहापोह करतोच. दोन गोष्टी मुख्यत्वे असतात, प्रत्येक गोष्टीला किंवा कृतीला नाव असावं, ते सहज सोपं असावं, आणि त्या नावातून ती गोष्ट म्हणजे काय ते प्रतित व्हावं. ह्यामुळे समजावून सांगण्याचा आणि समजण्याचा वेळ वाचतो. सर्व गोष्टी जेवढ्या सोप्यात सोप्या करता येतील ते करण्याचा प्रयत्न. सीधी बात बाकी सब बकवास हा डायलॉग आमच्याकडे प्रसिद्ध आहे. आणि हा डायलॉग आलाय एका जाहिरातीतून. पूर्वी एका सॉफ्ट ड्रींक-शीत पेयाच्या जाहिरातीत शेवटचा डायलॉग होता, बुझाये प्यास, बाकी सब बकवास! सरळ सरळ काय ते बोलूया. आपल्या मराठीत म्हण आहे एकदम समर्पक, ताकाला जाऊन भाडं लपवू नये. आणखी एक गोष्ट ह्या नाव देण्याच्या कार्यक्रमात आठवते ती म्हणजे थ्री इडियट्स ह्या गाजलेल्या हिंदी चित्रपटातलं क्लासरूम मधलं एक दृश्य. रँचो, चतूर आणि प्रोफेसर ह्यांच्यावर चित्रित केलेला तो भाग. डेफिनेशन क्या है? आणि अरे लेकिन कहना क्या चाहते हो? एखादा टीम मेंबर त्याने सुचवलेलं नाव का असावं ह्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी जेव्हा लांबण लावतो तेव्हा कुणीतरी हळूच बोलतो, अरे लेकिन कहना क्या चाहते हो? आणि ते नाव तिथेच बाद होतं. सोप्या-सोप्या गोष्टी असतात पण ज्या महत्त्वाच्या असतात.
एव्हरीथिंग शूड बी सेल्फ एक्स्प्लनेटरी हा आमचा सध्याचा नारा आहे. पर्यटक वीणा वर्ल्डकडे बुकिंग करतात त्यामागे वेगवेगळी कारणं असतात. कुणी आकर्षक जाहिरात बघून बुकिंग करतात, कुणी बेबसाईट सर्फिंग करताना एखादी सहल आवडली म्हणून बुकिंग करतात. कुणाचा आधीच्या सहलीचा अनुभव चांगला असतो म्हणून येतात तर कुणी नातेवाईक वा मित्रमंडळींनी सुचवलंय म्हणून येतात. अशावेळी दृश्य स्वरूपात त्यांच्यासमोर दोनच गोष्टी असतात, एक वीणा वर्ल्डची जाहिरात आणि दुसरी आमची वेबसाईट. जाहिरातीत संक्षिप्त स्वरूपात आणि वेबसाईटवर संपूर्णपणे माहिती असते. ह्या दोन्ही ठिकाणी दिलेला तपशील सुस्पष्ट आणि सर्वांना समजेल असा सोपा आहे का? आपली जाहिरात किंवा वेबसाईटवरचे सहल कार्यक्रम पर्यटकांना गोंधळात तर टाकत नाहीत? इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ यू कांट कन्व्हिंन्स, कन्फ्यूज देम! असं काही आपल्याकडून होत नाहीये नं? ह्याची सर्वांची आम्ही खात्री करून घेतोय. हे काम आम्हाला येत्या दोन महिन्यात पूर्ण करायचंय. म्हणजे बर्यापैकी सगळ्या गोष्टी सुस्पष्ट स्वरूपात आधीच तिथे आहेत. पर्यटकांच्या प्रतिक्रिया, बुकिंग करताना त्यांना एखादी गोष्ट माहीत नसणं, सहलीवर गेल्यावर त्यांना चांगलं किंवा वाईट सरप्राईस मिळणं ह्याचा अभ्यास करून वेळोवेळी आम्ही सुधारणा करीत असतोच पण आता हा ड्राईव्हच घेतलाय जेणेकरून वेबसाईटवर प्रत्येक सहलीची माहिती पर्यटकांना संपूर्णपणे आणि सुस्पष्टपणे मिळेल. कोणतीही गोष्ट सरप्राईज म्हणून त्यांच्यापुढे सहलीवर गेल्यावर उभी ठाकणार नाही. उदाहरणार्थ केनियाला जीपमधून प्रवास करावा लागतो, लेह लडाखला ऑक्सिजन प्रमाण विरळ आहे, नॉर्थ ईस्ट-अरुणाचल सारखा भाग अजून इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने सुधारलेला नाही, टोकियोसारख्या शहरात रूमचा आकार लहान असतो, युरोपमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने एका रूममध्ये चार लोकांना रहायला बंदी आहे. अनेक छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा पर्यटकांना बुकिंग करण्यापूर्वी माहीत असायला हव्यात ह्यावर ह्या ड्राईव्हचा भर राहणार आहे. जे आहे ते असं आहे. ते सर्व जाणून मगच बुकिंग करा असा प्रेमळ सल्ला पर्यटकांना असणार आहे. कुठेही छुप्या गोष्टी नकोत, छुपे खर्च नकोत, ह्या सर्व गोष्टी बुकिंगपूर्वीच जेवढ्या क्लीअर होतील तेवढं आमचं आणि पर्यटकांचं नातं मजबूत होईल. एकदा का काय समाविष्ट आहे आणि सहलीतून काय अपेक्षा करायची हे पर्यटकांना माहीत असलं आणि अर्थातच आम्ही ते देण्यासाठी बांधिल असलो की कुठेही गैरसमजाला किंवा नाराजीला जागा रहात नाही. संस्था असो किंवा नातं दोन्ही जर टिकवायची असतील तर त्यात कोणतेही गैरसमज असणार नाहीत हे आपण बघितलं पाहिजे, नव्हे तशी खबरदारी घेतली पाहिजे. आम्ही वीणा वर्ल्ड ही संस्था चालवतोय, आणि ती संस्था जर वर्षानुवर्ष चांगल्यातर्हेने चालवायची असेल तर आमचं पर्यटकांसोबतचं नातं हे चांगलं आणि सुदृढ असलं पाहिजे. संस्था चालवायचीय, नातं दृढ करायचंय तर मग सगळ्या गोष्टी सरळ असल्या पाहिजेत, सुस्पष्ट पाहिजेत, त्यात कुठेही गोंधळ नको, गैरसमज नको. प्रत्येक सहलीचा कार्यक्र्रम हा त्या दृष्टीने अधिक सुस्पष्ट करण्याचा आमचा प्रोजेक्ट आम्ही जागतिक पर्यटन दिनी म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला पूर्ण करणार आहोत. अर्थात पूर्णविराम दिला असं हे काम नाहीये. नवीन सहली येत राहतात, असलेल्या सहलीत काही नवीन बदल केले जातात, पर्यावरणात किंवा वातावरणात बदल होत राहतात त्यानुसार आम्हाला काही पावलं उचलावी लागतात, अनेक गोष्टी पण सगळ्याची बॉटमलाईन म्हणजे बी क्लीअर. पर्यटकांना बुकिंग करण्यापूर्वी सर्व गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत. देअर शूड नॉट बी एनी सरप्राईजेस ऑर एनी मिसअंडस्टँडिंग! जसं हे आमच्या आणि पर्यटकांच्या बाबतीत तसंच ते आमची टीम आणि आमच्या असोसिएट्सच्या बाबतीतही असलं पाहिजे. आम्ही खरंतर त्रिकोणाचे तीन कोन आहोत, पर्यटक वरच्या बाजूला, डाव्या कोनात वीणा वर्ल्ड टीम आणि उजव्या कोनात आमचे भारतातले आणि जगातले सर्व असोसिएट्स. वीणा वर्ल्डचा ऑर्केस्ट्रा नीट वाजायला हवा असेल तर ह्या तीन कोनातला प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे आणि त्या प्रत्येकांमध्ये एकमेकांत सुसुत्रता, सुस्पष्टता आणि सुसंवाद असायला हवा.
जसं सहल कार्यक्रमांचं तसंच आमच्या जाहिरातींचंही. वीणा वर्ल्डच्या जाहिराती आकर्षक दिसण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. कारण ज्यावेळी आपण कुठेही जाहिरात देतो तेव्हा ती त्या त्या संबधित ग्राहकांनी बघावी हा आपला हेतू असतो. जाहिराती हा खर्चिक भाग आहे त्यामुळे त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला पाहिजे ही रास्त इच्छा असते कोणत्याही जाहिरातदाराची, त्यामुळे जाहिरात आकर्षून घेणारी असावी ह्यावर आम्ही खास लक्ष पुरवतो. त्याचवेळी ती जाहिरात कोणतीही दिशाभूल करणारी, गोंधळात टाकणारी, छुपे खर्च असणारी अशी कधीही नसावी ह्यावरही कटाक्ष असतो. तसं बघायला गेलं तर वीणा वर्ल्डच्या जाहिराती ह्या अनाऊंसमेंट्स असतात. सध्या एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान सुरू असलेली वीणा वर्ल्ड विंटर ऑफरसुद्धा एक अनाऊंसमेंट आहे. पर्यटकांनी लवकरात लवकर बुकिंग करावं, आम्हाला अमूक एका बुकिंगची खात्री मिळावी, त्यानुसार पुढच्या सर्व गोष्टी लाईनवर लागायला वेळ मिळावा ह्या दृष्टीने ही विंटर ऑफर जुलैमध्ये आणली जाते. आता पर्यटक एवढं लवकर बुकिंग का करतील जर त्यामध्ये त्यांच्या फायद्याचं काही नसेल तर? म्हणून मग समर ऑफर असो किंवा विंटर ऑफर, आम्ही ना नफा ना तोटा ह्या तत्वावर सहलींच्या किमती आणतो. जंबो डिस्काउंटवर चाइल्ड डिस्काउंट, फ्री एक्स्पीरियन्स, विंटर ऑफर अॅडिशनल डिस्काउंट इत्यादी मार्गाने. पर्यटकांना आता हे माहीत झालंय त्यामुळे जानेवारीतली समर ऑफर असो किंवा जुलैमधली विंटर ऑफर पर्यटक ह्याचा फायदा घेतात, हजारो रुपये वाचवितात. जेवढं आधी बुकिंग तेवढी जास्त बचत हे आता जागतिक स्पर्धा, ऑनलाईन बुकिंगमुळे आपल्या सगळ्यांच्याच अंगवळणी पडलंय. दरवर्षी ह्या समर वा विंटर ऑफर्समध्ये, त्यांच्या कालावधीत सातत्यता असते त्यामुळे पर्यटकही ह्या ऑफरसाठी थांबतात. जुलैच्या पहिल्या दहा दिवसातच विंटर सीझनच्या बर्याच सहली फुल्ल झाल्या हे त्याचंच प्रतिक. असो, सध्या विंटर ऑफर सुरू आहे, ज्यांना-ज्यांना त्यामध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी लवकर निर्णय घेणं चांगलं कारण ऑफर जरी एकतीस जुलैपर्यंत असली तरी दररोज सहली फुल्ल होताहेत. आपल्याला हवी असलेली सहल फुल्ल झालीय असं व्हायला नको.
खाली संक्षिप्त स्वरूपात विंटर ऑफरची झलक दिली आहे. डील ऑफ द डे हा नवीन प्रकार आहे जो तुम्हाला वेबसाईटवर बघायला मिळेल. रोज एक काहीतरी डील त्यात दिसेल. न जाणो तुम्हाला हवी असलेली सहल एकदम कमी किमतीत मिळूनही जाईल. सो ऑल द बेस्ट! आणि हो, आम्ही आता तुमच्या आणखी जवळ येतोय. मुंबईत चेंबूर, पवई, सेंट्रल मांटुगा, विलेपार्ले ही वीणा वर्ल्ड सेल्स ऑफिसेस सुरु झालीयेत तर लवकरच चर्नीरोड आणि पुण्यात चिंचवड येथे सुरू होताहेत. महाराष्ट्र गुजरातसह अनेक राज्यातील दोनशे प्रीफर्ड सेल्स पार्टनर्ससह संपूर्ण वीणा वर्ल्ड टीम आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. आणि जिथे आम्ही नाही आहोत तिथे ऑनलाईन बुकिंग आहेच. सो, वेलकम टू वीणा वर्ल्ड!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.