वेळ बदलली, काळ पुढे गेला, आणि भारतीय पर्यटक सप्तखंडांवर स्वारी करू लागला. एकदा युरोपला जायचं स्वप्न उराशी बाळगणारा आमचा पर्यटक आठ ते दहा वेळा युरोपला जातोय आणि आम्हीही पर्यटकाच्या वाढत्या इच्छेला पुरून उरावं ह्यासाठी नव्वदहून जास्त एकट्या युरोपचेच ग्रुप टूरचे पर्याय आणतो. हे सगळं इतक्या जलद गतीने घडतंय की काही विचारू नका. पर्यटकांची पर्यटनाची ही वाढती ओढ लक्षात घेऊन संपूर्ण वीणा वर्ल्ड जय्यत तयारीनिशी सज्ज होतंय.
तो फॉरेनला जाऊन आलाय किंवा ती फॉरेन रीटर्न आहे ह्या वाक्याला चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी जबरदस्त वजन असायचं. रुपया म्हणजे आपलं भारताचं चलन कडीकुलपात बंद होतं, एअरतिकीट महाग होतं, व्हिसा म्हणजे काय? तो कुठून मिळतो? त्यासाठी काय करावं लागतं? ही माहिती असणारा भाव खाऊन जायचा. परदेशात जायचं तर त्यासाठी लागणारं परकीय चलन कोणत्याही प्रवाशाला तीन वर्षातून फक्त पाचशे युएस डॉलर्स एवढंच घेता यायचं. एकोणीसशे एक्याण्णवला तत्कालीन अर्थमंत्री श्री मनमोहन सिंग यांनी रुपया खुला केला, हळूहळू अवकाशात विमानांची गर्दी दिसायला लागली, स्पर्धेमुळे विमान तिकीटाचे दर आवाक्यात यायला लागले. इंटरनेटचा वापर वाढायला लागला, माहितीचा सागर माणसाच्या हातात आला, भिती कमी झाली आणि सगळ्याच उद्योगांप्रमाणे पर्यटनाला चालना मिळाली. आता परदेश पर्यटन सोप्प झालंय किंवा आमच्यासारख्या अनेक ऑनलाईन- ऑफलाईन पर्यटनसंस्थांनी त्यात खारीचा वाटा उचललाय. हळूहळू कसं सगळं बदलत गेलं ते ह्या पिढीने पाहिलंय. काय होतं आणि काय आहे ह्याचा चलत्चित्रपट जेव्हा मन:पटलावर आठवणींच्या स्वरूपात समोर येतो तेव्हा नॉस्टॅल्जिक व्हायला होतंच पण त्यासोबत आपण किती नशीबवान आहोत हे जाणून मन मोहरूनही जातं. बघानं, आज प्रत्येक प्रवाशाला विदेश पर्यटन करताना एका वर्षात (जानेवारी ते डिसेंबर) दहा हजार युएस डॉलर्स घेता येतात. अनेक देशांनी भारतात व्हिसा कॉन्स्युलेट आणल्या आहेत किंवा ऑनलाईन व्हिसाची सुविधा आणल्याने तेही काम अवघड राहिलेलं नाहीये. युरोप अमेरिकेसाठी जसं आम्ही सात आठ महिने आधी बुकिंग घेतो, तसं काही सहली जिथे ऑन अरायव्हल व्हिसा आहे तिथे अगदी सात-आठ तास आधी बुकिंग घेऊनही पर्यटकांना परदेश पर्यटनाचा आनंद सहजासहजी मिळवून देतो. फॉरिन टूर करणं ही आता अचंब्याची गोष्ट राहिलेली नाही. अर्थात त्याची ओढ प्रचंड आहे आणि ती दिवसागणिक वाढतेय हे वास्तवही आहे.
परदेशी सहलींना आमच्याकडे फॉरिन टूर्स म्हणायचं? इंटरनॅशनल टूर्स? अब्रॉड टूर्स? की वर्ल्ड टूर्स? ह्यावर चर्चा वादविवाद होत असतात. जाहिरातीत वापरायला मला फॉरिन टूर्स हा शब्द आवडतो, ह्या शब्दाशी नाळ जोडली गेलीय म्हणायला हरकत नाही. नववी पर्यर्ंतचं शिक्षण गावी झालं. गाव समुद्रकिनार्यावर टुमदार आहे पण त्यावेळी एसटी बसचीही सुविधा नसल्याने इतर गावांच्या मानाने प्रगतीच्या बाबतीत थोडं मागे होतं, आणि उपरोधाने त्याला फॉरेन म्हटलं जायचं. म्हणजे आमच्या वा जवळपासच्या गावातल्या मुलीचं लग्न जर इतर सुधारित गावातल्या मुलाशी ठरलं तर कुठची मुलगी? असं विचारल्यावर, फॉरेनची मुलगी असं म्हटलं जायचं किंवा मुलीला फॉरेनला दिलंय असं मुलगा आमच्या इथला असला तर म्हटलं जायचं. रॅगिंगचा सौम्य प्रकारच होता तो. आम्ही फॉरेन शब्द उच्चारला की वडील जमदग्नीचा अवतार धारण करायचे, म्हणायचे, फॉरेन शब्द चुकीचा आहे, फॉरिन म्हणा. स्पेलिंग काय आहे तेे जाणून घ्या. प्रत्येक शब्दाचा योग्य उच्चारच तुम्ही केला पाहिजे. फॉरेनचं फॉरिन झालं आणि कसं काय कोण जाणे व्यवसायाच्या निमित्ताने तो शब्द आजन्म चिकटला. हिंदी भाषेत हा शब्द फॉरेन म्हणूनच उच्चारला जातो. हिंदी पेपरच्या जाहिरातीत फॉरेन जाके आये क्या? अशीच लाईन आम्ही वापरलीय. आजही फॉरिन रिटर्न ह्या शब्दाला वजन आहेच. पूर्वी आत्ता करतोय त्यापेक्षा अधिक संख्येने नेपाळच्या सहली असायच्या कारण पासपोर्ट नसतानाही भारतातून दुसर्या देशात म्हणजे नेपाळमध्ये जाता यायचं, अनेक विदेशी वस्तूंची खरेदी तिथे करता यायची आणि परत आल्यानंतर आम्हीसुद्धा आहोत फॉरिन रीटर्न हे अभिमानाने सांगता यायचं.
वेळ बदलली, काळ पुढे गेला, अत्याधुनिकता आणि सुखसुविधांनी पायाशी लोळण घेतली आणि भारतीय पर्यटक सप्तखंडांवर स्वारी करू लागला. साऊथ ईस्ट एशिया म्हणजे, सिंगापूर थायलंड मलेशिया हाँगकाँगला जाणं हे मुंबईला जाऊन येते म्हणण्याइतकं सोप्प झालं. आयुष्यात एकदातरी युरोप पहावा डोळेभरून ही आमच्या जाहिरातीतली लाईन तुमचा किती आणि कोणता युरोप बघून झालाय? अशातर्हेने कधी बदलली गेली हे आम्हालाही कळलं नाही कारण एकदा युरोपला जायचं स्वप्न उराशी बाळगणारा आमचा पर्यटक आठ ते दहा वेळा युरोपला जातोय आणि आम्हीही पर्यटकाच्या वाढत्या इच्छेला पुरून उरावं ह्यासाठी नव्वदहून जास्त एकट्या युरोपचेच ग्रुप टूरचे पर्याय आणतो. हे सगळं इतक्या जलद गतीने घडतंय की काही विचारू नका. वीणा वर्ल्डचं आयुष्य सहा वर्षाचं, त्यात अनेक पर्यटकांनी दहा ते बारा टूर्स वीणा वर्ल्डसोबत केल्यात हे बघून समाधान मिळतंच पण पर्यटकांची पर्यटनाची वाढती ओढ लक्षात घेऊन त्यानुसार तयार राहण्यासाठी संपूर्ण वीणा वर्ल्ड जय्यत तयारीनिशी सज्ज होतंय.
सुपरपीक सीझन संपल्यावर आम्ही आणलेली पंचवीस हजारात भारत आणि पन्नास हजारात जग ही योजना पर्यटकांनी उचलून धरली आणि हजारो पर्यटकांनी गेल्या दोन महिन्यात भारत बघण्याचं आणि विदेश पर्यटनाचं-फॉरिन रीटर्न बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पुढचा म्हणजे दिवाळी ख्रिसमसचा सुपरपीक सीझन सुरू होईपर्यंत ह्यातल्या काही सहली आम्ही कंटिन्यू केल्या आहेत, जेणेकरून खूप पर्यटक ह्यावेळी पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी नसताना कमीत कमी पैशात सर्व समाविष्ट सहलीचा जास्तीत जास्त आनंद शांत निवांतपणे घेऊ शकतील. हे आणखी कमी होतं की काय म्हणून प्रत्येकाला फॉरिन रीटर्न बनवायचा ध्यास घेतलेल्या आम्ही, तीस हजारात थायलंड आणलं आणि पंचेचाळीस हजारात दुबई अबुधाबी ज्यामुळे बर्याच पर्यटकांना ह्या रॉकबॉटम टूर प्राईस असलेल्या सहलींचा लाभ घेता आला आणि फॉरिन रीटर्न बनण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करता आलं. तीस हजारात थायलंडच्या ऑगस्टच्या सहलीत आता खूपच कमी जागा उरल्यात. थायलंडला काही कालावधीसाठी व्हिसा फ्री आहे त्यामुळे फक्त पासपोर्ट घ्या आणि गाठा वीणा वर्ल्डचं तुमच्या जवळचं एखादं ऑफिस आणि निघा फॉरिन टूरला. चलो, बॅग भरो, निकल पडो! हे इथे सर्वार्थाने लागू होतंय.
वीणा वर्ल्डच्या नेहमीच्या सहली आहेतच. पण सर्वांना देशविदेशातलं पर्यटन शक्य व्हावं म्हणून सुपरपीक सीझन वगळता आम्ही नेहमीच असं काहीतरी आणत राहणार. त्यासाठी मात्र तुम्हाला अधूनमधून वीणा वर्ल्डच्या वेबसाईटवर जायची सवय ठेवली पाहिजे किंवा वीणा वर्ल्डच्या ट्रॅव्हल प्लॅनरची लिंक मागवून घेतली पाहिजे. वेबसाईटवर नेहमी येण्याचं आणखी एक कारण म्हणजे डील ऑफ द डे!, दर मंगळवारी आणि गुरूवारी एक कोणतीतरी नवीन वा नेहमीची सहल इथे सर्वात कमी पैशात मिळू शकते. तिथल्या तिथे आपण ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा तुमच्या जवळच्या वीणा वर्ल्ड सेल्स पार्टनर्सच्या कार्यालयात वा ब्रांच ऑफिसमध्ये येवून सर्व माहिती घेऊन बुकिंग करू शकता. गेल्या महिन्यात सुरू केलेल्या ह्या डील ऑफ द डे चा शंभरहून अधिक पर्यटकांनी लाभ घेतला आणि सर्वात कमी पैशात देशातली किंवा परदेशातली सहल मिळवली. तुम्हीही ह्या मंगळवार-गुरूवारचं डील ऑफ द डे तपासण्याची सवय ठेवा. न जाणो तुम्हाला हवी असलेली सहल कमी पैशात मिळूनही जाईल. आता सर्वांनाच माहीत आहे की जरी सहल कमी पैशात असली तरी त्याचा सहलीच्या आयोजनावर कोणताही परिणाम नसतो. प्रत्येक सहल वीणा वर्ल्ड स्टाईलने नेहमीप्रमाणेच आयोजित केली जाते, मग ती तीस हजारातली थायलंडची सहल असो वा पंचवीस हजारातली राजस्थान. वीणा वर्ल्ड स्टँडर्ड मेंटेन केलं जातं आणि त्याचा अनुभव जुलै ऑगस्टमध्ये जाऊन आलेल्या अनेक पर्यटकांनी घेतला.
अफोर्डेबल टूरिझमसाठी वीणा वर्ल्डचा जन्म झाला आणि आम्हाला समाधान आहे की गेल्या सहा वर्षात साडेचार लाख पर्यटकांनी वीणा वर्ल्डच्या भारतातल्या-परदेशातल्या अगदी सप्तखंडातल्या सहलीचा पुरेपूर आनंद लुटला. वीणा वर्ल्डची ऑफिसेसमधली टीम, टूर मॅनेजर्स टीम, सेल्स पार्टनर्स टीम अशी सर्व मिळून पंधराशेहून जास्त जणांची टीम झाली आहे, जी आपल्या दिमतीला सज्ज आहे. आत्ताच आम्ही मुंबई पुणे मिळून सात सेल्स ऑफिसेसचीही त्यात भर टाकलीय. आपल्या जास्त जवळ आलोय जेणेकरून बुकिंग करण्यासाठी- चौकशीसाठी आपणास सोप्प जावं. तसंच आणखी एक बदल केलाय तो म्हणजे वीणा वर्ल्डच्या सर्व कार्यालयांची वेळ ही दहा ते सात ऐवजी अकरा ते आठ केलीय. बर्याच पर्यटकांचं म्हणणं होतं की कामावरून घरी परतताना तुमच्या ऑफिसला भेट द्यावी म्हटलं तर तुमचं कार्यालय सात वाजताच बंद. आता आम्ही अकरा ते आठचा प्रयोग केलाय. यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात आली की, सकाळ- संध्याकाळच्या गर्दीच्या वेळा यामुळे टाळता येतील आमच्या पर्यटकांनाही आणि वीणा वर्ल्ड टीमलाही. बघूया त्याचा कसा फायदा होतो ते. सो मंडळी, फॉरिन रीटर्न बनविण्याचा, देशविदेशातलं पर्यटन जास्तीत जास्त चांगलं आणि अफोर्डेबल करण्याचा वीडा आम्ही उचललाय, तुम्ही फक्त म्हणायचं, चलो, बॅग भरो, निकल पडो!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.