‘व्हॉट इज युवर गोल इन लाईफ?’ हा प्रश्न आला की गडबडायला होतं, आजच्या मल्टिटास्किंगच्या जमान्यात. फॅमिली, एज्युकेशन, हेल्थ, करियर, वेल्थ, सोशल, रीटायरमेंट अशा अनेक स्तरांवरची वेगवेगळी लक्ष्य असतात. ही महत्त्वाची ‘लक्ष्य’ पूर्ण करीत असतानाच त्यात अजून एका ‘लक्ष्य’ची भर पडलीय, ती म्हणजे ‘पर्यटन’. आणि त्यातलंच एक लक्ष्य आम्ही आमच्या महिलांसाठी-वुमन्स स्पेशलसाठी समोर ठेवलंय...
मल्टिपल असो वा सिंगल, प्रत्येकाच्या आयुष्यात, आयुष्यातल्या प्रत्येक दशकात, दशकातल्या प्रत्येक वर्षात, वर्षातल्या प्रत्येक महिन्यात, महिन्यातल्या प्रत्येक आठवड्यात, आठवड्यातल्या प्रत्येक दिवसात आणि दिवसातल्या प्रत्येक तासात कोणतं ना कोणतं लक्ष्य समोर असेल, त्याविषयी काहीतरी करण्याची उर्मी मनात असेल, त्यावर कृती वा काम करण्यासाठी हात शिवशिवत असतील तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. देअर शूड ऑलवेज् बी समथिंग टू लूक फॉरवर्ड टू! नसेल तर ते आधी निर्माण केलं पाहिजे. आमच्या ट्रेनिंग सेशन्समधला एक महत्त्वाचा संवाद असतो तो म्हणजे, ‘आपण जिवंत आहोत, धडधाकट आहोेत, आपल्या हातात काम आहे जे आपल्या आवडीचं आहे, मग अडचण कुठे आहे? लेट्स डू अवर बेस्ट, लेट्स डू समथिंग बेटर-बिगर-फास्टर’.
कुटुंब, शिक्षण, प्रकृती (सर सलामत तो पगडी पचास), करियर, संपत्ती, समाज, निवृत्ती नियोजन ह्या अनेक स्तरांवर वेगवेगळी लक्ष्य ठरलेली असतात. सगळीच महत्त्वाची आहेत, ह्यातल्या प्रत्येकाला काळानुरूप प्राधान्य आहे. ह्या प्रत्येक लक्ष्याप्रति मन:पूर्वक योगदान देणं गरजेचं आहे. अर्थात, हे सगळं लिहिताना जेवढं सोप्पं वाटतंय तेवढं नाहीये, ह्याची जाणीव आपल्या प्रत्येकाला आहे. सध्याच्या फॅशनेबल युगात त्याला स्ट्रेसफुल म्हटलं जातं. तणावपूर्ण-ताण तणाव मिश्रित. खरंतर,आपण स्ट्रेस निर्माण करतोय आणि मग तो कमी होण्यासाठी उतारा शोधतोय ही परिस्थिती आहे. आणि हा उतारा किंवा उपाय जो आहे त्यात आम्ही येतो. ‘जस्ट लीव्ह द प्लेस! टेक अ ब्रेक! गो समव्हेअर! फ्रीकाऊट! रीज्युविनेट! रीफ्रेश! रीवाईव्ह! एनर्जाईज’ आठवताहेत का हे सारे शब्द? तुमच्या ओळखीचे हे शब्द आमच्या मालकीचे आहेत बरं का! आणि त्यावर पहिला अधिकार जर कुणाचा असेल, तर तो
घर-कुटुंब-संसार-मुलंबाळं-परीक्षा-करियर आदी सर्व जबाबदार्या लिलया पेलणार्या महिलांचा-मुलींचा. ‘टेक अ ब्रेक’ची गरज त्यांना सर्वात जास्त आहे आणि म्हणूनच शंभर देश बघण्याचं स्वप्न माझ्यासोबत मी महिलांसमोर ठेवलंय.
आपण सेंच्युरी मारायची तीसुद्धा पन्नाशीच्या आत. आता माझी पन्नाशी ओलांडलीय पण म्हणतात नं ‘एज इज जस्ट अ नंबर’ माझ्या उत्साहाशी आणि उमेदीशी त्याचा काहीही संबंध नाही. आणि जोपर्यंत माझी देशांची शंभरी होत नाही तोपर्यंत मी पन्नाशीच्या आतच असणार आहे, फॉरेव्हर यंग. मग माझं वय टेक्निकली साठ असो वा सत्तर. मला हे लिहितानासुद्धा मस्त वाटतंय. मनाची घडंणच जर अशी झाली तर जग अर्ध जिंकलच. तर मैत्रिणींनो ‘लेट्स टेक अ चॅलेंज, लेट्स कम्प्लीट हंड्रेड कंट्रीज!’ अहो, हे दिवास्वप्न नाहीये, हे एक खरंखुरं स्वप्न आहे, जे पूर्ण होण्यासारखं आहे. प्रतिमा फडके म्हणून आमची टूर मॅनेजर आहे तिने चाळीशीच्या आत पन्नास देश पूर्ण केलेत. आमचे अनेक टूर मॅनेजर्स पस्तिशीच्या आत पन्नास देश पूर्ण करून आता पंचाहत्तरीकडे कूच करताहेत. यावर्षी टूर मॅनेजर्सचा मॅनेजर विवेक कोचरेकर शंभर देश पूर्ण करेल तेही चाळीशीच्या आत.वीणा वर्ल्ड हॅज सो मेनी सच इन्स्पायरिंग स्टोरीज. ह्यांनी स्वप्न पाहिलं, खडा परफॉर्मन्स दिला आणि त्यांची इच्छापूर्ती झाली. आम्हाला अभिमान आहे ह्या सर्वांचाच. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वप्न बघूया, ते पूर्णत्वाला नेण्यासाठी प्लॅन करूया, त्यानुसार मार्गक्रमणा करूया आणि स्वप्न पूर्ण होण्याची खात्री बाळगूया. हे आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या लक्ष्याबाबतही तेवढंच खरं आहे.
‘स्वप्न बघायचं पण एवढे शंभर देश बघायला वेळ आणि पैसा ह्याचं नियोजन कसं करायचं?’ हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर सर्वप्रथम उभा ठाकतो. इतरही महत्त्वाच्या प्रायॉरिटीज आहेत, ते सगळं सोडून जिप्सी थोडंच बनायचंय आपल्याला? बरं, पैसाही सगळ्या प्राथमिक-प्रापंचिक गरजा भागल्यानंतरच पर्यटनाकडे वळवायचाय. कसं हे सगळं शक्य होणार? आमच्या पुणे ऑफिसमधली ॠजुता नातू, तन्मयी गोखले, श्रेया अष्टेकर आणि सध्या न्यूझीलंडला असलेली नीरजा कुलकर्णी, ह्या चौघींनी हे शंभर देश बघायचं चॅलेंज घेतलंय आणि अक्षरश: वायफळ खर्च न करता पर्यटनासाठी त्या पैशाची बचत करतात आणि देशविदेश पालथे घालताहेत तेसुद्धा स्वत:चं करियर आणि परफॉर्मन्स सांभाळून. ‘काहीही अशक्य नाही’ हे जणू त्या,वीणा वर्ल्डमधल्या सगळ्या मुलींना उदाहरणादाखल सांगताहेत. पैशाचे नियोजन करून पर्यटन करण्याचं उत्कृष्ट उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय, ते आमचे पर्यटनप्रेमी पर्यटक बाबा भातंब्रेकर ह्यांनी. अनेकदा मी त्याचा उल्लेख केलाय, आणि आजही करतेय कारण त्यांनी अशक्य ते शक्य करुन दाखवलं त्यांच्या उदाहरणाने. बाबा हे महाराष्ट्रातील लातूरच्या शाळेतले एक साधे शिक्षक. संपूर्ण जग बघायचं ही त्यांची इच्छा. त्यांनी पहिल्या पगारापासून ह्या जगप्रदक्षिणेसाठी बचत करायची ठरवलं. स्वत:च्या पगारातली साठ टक्के रक्कम घरखर्चासाठी, तीस टक्के रक्कम पर्यटनासाठी आणि दहा टक्के रक्कम औषध-पाण्यासाठी असं नियोजन केलं आणि ते त्यांच्या शिक्षकिय कारकिर्दीत काटेकोरपणे पाळलं. चांगल्या सवयी-चालणं-व्यायाम-सुविचार ह्याद्वारे प्रकृती उत्तम राखली ज्यामुळे दहा टक्के औषध-पाण्याचं सेव्हिंग अडीअडचणीला कामी आलं. आयुष्यभराच्या ह्या तीस टक्के रकमेच्या सेव्हिंग्ज्मधून त्यांनी सप्तखंड पालथे घातले. मी त्यांच्यासोबत अंटार्क्टिका, अमेरिका, सेंट्रल अमेरिका अशा काही सहलींना होते, आणि प्रत्येकवेळी त्यांची ही ‘६०-३०-१०’ ची स्टॅ्रटेजी माझ्या शंभर देश पूर्ण करण्याच्या इच्छेला शक्ती देऊन गेली. स्वप्न प्रत्यक्षात खरी करता येतात ती अशी.
पैशाचा प्रश्न सोडवता येऊ शकतो, ह्याची खात्री पटल्यावर दुसरा प्रश्न उभा ठाकतो तो म्हणजे वेळेचा. शंभर देश बघायला किती वेळ पाहिजे हा पहिला प्रश्न. अभिमानाची गोष्ट अशी, की बेन्नी प्रसाद नावाच्या भारतीय गिटारिस्टने केवळ सहा वर्ष, सहा महिने आणि बावीस दिवसांत सर्व देशांना भेट देऊन वर्ल्ड रकॉर्ड केलाय. त्यावेळी ‘फास्टेस्ट अमंग ऑल’ असं विशेषणही त्याच्या नावापुढे लागलं. महिलांमध्ये क्वीन एलिझाबेथ आणि हिलरी क्लिंटनच्या नावावर अनुक्रमे १२० आणि ११२ देश बघितल्याची नोंद आहे. म्हणजे नियोजन केलं तर राणीची बरोबरी आपण करू शकतो. पण कनेक्टिकटची कॅसी पेकॉलने सत्ताविसाव्या वर्षी जगातला प्रत्येक देश सर्वात कमी वेळात बघितल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. २४ जूलै २०१५ ते २ फेब्रुवारी २०१७ ह्या कालावधीत तिने हे स्वयंघोषित चॅलेंज पूर्ण केलं. फास्टेस्ट अमंग ऑल. आता जगात किती देश आहेत हा वादातित मुद्दा आहे. कुणी देश स्वत:ला स्वतंत्र म्हणवतात तर कुणी त्यांच्यावर मालकी सांगतं. तरीपण
UN नुसार आजच्या घडीला एकूण १९५ देश जगात आहेत. असो,आपण सध्या शंभरचंच चॅलेंज घेतलंय कारण आपण स्ट्रेस फ्री पर्यटनाला निघालोय, त्यामुळे जे देश पर्यटनाला अनुकूल आहेत, ज्यांचा व्हिसा व्यवस्थित मिळू शकतो अशाच देशांचा आपण विचार करतोय. आणि त्या देशांची संख्याही बरीच आहे, म्हणजे शंभर देशांचं चॅलेंज घ्यायचं आणि पर्यटनसुलभ देशांची संख्याच जर तेवढी भरली नाही तर काय करायचं, हा प्रश्न येईल. पण तसं नाहीये, त्यामुळे आपण हे चॅलेंज घेऊ शकतो. कुणाला शंभर देश पूर्ण करायला दोन वर्ष लागलीयत तर कुणाला दहा, पण ही मंडळी वेगळी आहेत. त्यांचा बर्याच जणांचा दृष्टीकोन रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा होता त्यामुळे बर्याचदा देशावर टिक मार्किंग झालं, पासपोर्टवर इमिग्रेशनचा स्टॅम्प आला, की त्यांचा हेतू साध्य होत होता. आपलं तसं नाहीये. जग बघणं, स्थलदर्शन करणं, वेगवेगळ्या ठिकाणची कला-परंपरा-खाद्यसंस्कृती ह्याचीही तोंडओळख करून घ्यायचीय, तसंच आयुष्यातल्या सर्व महत्त्वाच्या जबाबदार्या सांभाळून आपल्याला पर्यटन करायचंय त्यामुळे आपला स्पॅन हा पाच-दहा नव्हे तर चांगला पंचवीस वर्षांचा ठेवलाय. आता पटकन पंचवीस वर्षात शंभर म्हणजे वर्षाला चार असं गणित नाहीये. कधी एखाद्या वर्षी एकच देश होईल तर कधी एखाद्या वर्षी दहा-बारा देशसुद्धा. म्हणूनच इतर सर्व प्लॅनिंगसोबत हे ही महत्त्वाचं.
जनरली शाळा, कॉलेज, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या कालावधीत हल्ली पर्यटनाची आवड सर्वत्र वाढल्यामुळे साधारपणे पंधरा ते वीस देश बघून झालेले असतात. मग उरतात ऐंशी देश, जे पंचवीस ते पन्नास ह्या वयात करायचे आहेत. दहा वर्ष ग्रेस म्हणजे साठीपर्यंत. नंतर प्रकृतीमुळे बरीच रीस्ट्रिक्शन्स येऊ शकतात म्हणून आरामशीर ठिकाणं साठीनंतर ठेवायची, शांत-निवांत. एका वर्षी वेस्टर्न युरोपची सहल केली तर एका फटक्यात दहा देश होतात तसंच दुसर्या वर्षी सेंट्रल ईस्टर्न युरोप केली तर आठेक देश आपल्या खात्यात जमा होतात. स्कॅन्डिनेव्हिया रशिया टॅलिन म्हणजे सहा देश, साउथ अमेरिका म्हणजे पाच देश. सिंगापूर थायलंड मलेशिया हाँगकाँग मकाव म्हणजे एका वर्षात पाच देश. बरं, ह्या सर्व सहली टिक मार्किंगवाल्या नाहीत तर महत्त्वाच्या स्थलदर्शनाने खचाखच भरलेल्या आहेत. तेव्हा देशांची संख्या वाढण्याबरोबरच अनुभवविश्वात भर पडते, दृष्टीकोन व्यापक होतो तो अॅडेड अॅडव्हान्टेज. वेळ काढावा लागणार आहे नियोजन करून. आणि ते अनेकांनी शक्य करून दाखवलं, मग आपण का नाही?
आता ह्यातली देशांची शंभरी कदाचित सर्वांना गाठता येणार नाही. पण माझी एका देशाची भ्रमंती जेव्हा मला दहा देश बघितल्याचा आनंद देते, तेव्हा मी मनाने येत्या दहा वर्षांत शंभरी पूर्ण करतेय की. एखादी गोष्ट झाली नाही, पूर्णत्वाला पोहोचली नाही तर त्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही. आपण ठरवतो एक आणि होतं वेगळंच काही, हेच तर आयुष्य आहे. ते ‘वेगळंच काही’ सुद्धा तेवढ्याच आनंदाने आपण स्विकारतो तेव्हा आयुष्याची लढाई लढायला मी सुुसज्ज आहे असं म्हणता येईल. सो, लेट्स लूक फॉरवर्ड टू धिस चॅलेंजिंग गोल ऑफ हंड्रेड कंट्रीज!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.