एक मासा किती रुपयाला विकला जावा? जगातला सर्वात मोठा टूना फिश जगातल्या सर्वात मोठ्या फिश मार्केटमध्ये सात लाख पस्तीस हजार डॉलर्सला विकला गेला. म्हणजे आपल्या पाच कोटी रुपयांना, जपानमधल्या म्हणजे टोकियोमधल्या त्सुकिजी ह्या फिश मार्केटमध्ये...
‘‘नील काय करतोयस? जरा इकडे ये, ह्या दोन शब्दांचा अर्थ काय ते सांग जरा’’ गुगल उघडण्यापेक्षा अशी आयती उत्तरं मिळवायला मला सोप्पं वाटतं. ‘‘अगं थांब गं! मी रेस्टॉरंटचं बुकिंग करतोय’’, ‘खाण्यासाठी जन्म आपूला’ ह्या चळवळीचा जनक असलेला नील दर रविवारी एका नवीन रेस्टॉरंटमध्ये आम्हाला घेऊन जात असतो. मुलांशी मोबाईल-फ्री संवाद साधायला हा मस्त वेळ असतो म्हणा. अर्थात हा संवाद जरा जास्तच महागात पडतो अशी कुरकुर माझ्या स्त्रीसुलभ मनाने सुधीर आणि सुनिलाजवळ व्यक्त केलीच. मी नीलला म्हटलं, ‘‘अरे कालच आपण बाहेर जेवलो, आज सोमवार, पुढचा रविवार यायला अजून सहा दिवस आहेत’’ तर म्हणे, ‘‘मी रविवारच्या रेस्टॉरंटचं नाही तर डिसेंबरमधल्या माझ्या टोकियोमधल्या रेस्टॉरंटच्या लंचचं बुकिंग करतोय.’’ आता खुर्चीवरून खाली पडायची वेळ माझी होती. आत्तापर्यंतच्या प्रवासात जगभरातल्या बर्याचशा भोजनांचा बहुतांशी शाकाहारी आस्वाद घेतला पण दोन-पाच दिवस आधी बुकिंग करण्यापलिकडे माझी मजल गेली नव्हती. पाच महिने आधी रेस्टॉरंट बुकिंग करायचं ह्याचा विचारही नव्हता. म्हणजे सहलीतल्या एअरलाईन्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स ह्यांचं बुकिंग आम्ही वर्ष-वर्ष आधी करतो पण जपानी फूडवर प्रेम करणार्या नीलचं कौतुक वाटलं माझ्या मातृसुलभ ममतेला. असं इन अॅडव्हान्स प्लॅनिंग करणार्या नीलकडून जपानी फूड आणि जपानी रेस्टॉरंट्स ह्याची इतकी माहिती मिळाली की मी त्याला म्हटलं, ‘अरे आपल्या सगळ्या सेल्स टीमला तू हे ट्रेनिंग द्यायला हवं, म्हणजे तुझ्यासारखी फूड लव्हर मंडळी जेव्हा जपानला जातील तेव्हा त्यांनाही ह्या अशा जपानी रेस्टॉरंट्सची माहिती देता येईल. जपानमध्ये काही रेस्टॉरंट्स 2020 पर्यंत बुक्ड आहेत आणि जपानी माणसाच्या स्वभाव व सवयींनुसार अशा तर्हेने केलेलं अॅडव्हान्स बुकिंग रद्द करणं हे एटिकेटमध्ये बसत नाही. शब्द दिला म्हणजे दिला. त्याहीपुढे जाऊन आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुणाचा तरी रेफरन्स दिल्याशिवाय किंवा तुम्ही त्या रेस्टॉरंटचे जुने मेंबर असल्याशिवाय तुम्हाला रेस्टॉरंट्स बुकिंग देत नाहीत. ऐकावं ते नवलंच! तर फूडलव्हर मंडळींनी नीलशी संपर्कात रहायला हरकत नाही neil@veenaworld.com वर. असो.
जवळजवळ सातशे आयलंड्सचा, दोनशे ज्वालामुखींचा, दरवर्षी होणार्या पंधराशे भुकंपांचा, भारत रशिया अमेरिका चायना आदींच्या तुलनेत आकाराने छोटा असलेला जपान इंग्लिश भाषेचा अंकित न होता स्वत्व राखत, स्वत:ची भाषा जोपासत मोठा झाला. इमिग्रंट्स नसलेला जवळजवळ नव्याण्णव टक्के जपानी लोकांचा देश स्वत:च्या मेहनतीवर अमेरिका आणि चायनाच्या नंतर जगातली तृतीय क्रमांकाची आर्थिक महासत्ता झाला. ह्या देशापासून खूप काही शिकायला हवं आपल्याला. ‘साईझ डझन्ट मॅटर’ हे दाखवून देणारा जपान सततच्या भूकंपावर, त्सुनामीवर, हिरोशिमा-नागासाकीच्या अणूसंहारावर मात करीत जगाला संदेश देत राहिला, ‘कितीही संकटं येऊ दे , आम्ही सतत नव्याने उभे राहू, अधिक जोमाने काम करू!’ मनापासून म्हणावसं वाटतं, आय लव्ह यू जपान!
जपान हा इतर देशांपेक्षा खूप वेगळा आहे हे टोकियोच्या नरिता एअरपोर्टवर उतरल्यापासूनच आपल्या लक्षात येतं. इथे आपला कसा काय निभाव लागणार ही चिंता पटकन मनाला स्पर्श करून जाते. पण काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर तुमच्याबरोबर असणारच आहे ज्याने अनेकदा जपानच्या वार्या केल्या आहेत. त्याच्यासोबत सदा वाकून नम्रपणे सेवा देणारा आमचा तिथला लोकल गाईडही आपल्या दिमतीला असणार आहे. आता थोडंसं जाणून घेऊया नेमकं आपल्या ह्या सहा दिवसांच्या सहल कार्यक्रमात काय आहे ते. आपण मुंबई-टोकियो-ओसाका-मुंबई असा विमानप्रवास घेतो. हिरोशिमाचा जॅपनीज बुलेट ट्रेनचा प्रवासही आपण या सहलीत समाविष्ट केलाय. टोकियोमध्ये आशिकागा फ्लॉवर पार्क, टोकियो टॉवर, पॅलेट टाऊन, मेगा वेब, व्हिनस फोर्ट, रेनबो ब्रीजसोबत आपण आसाकुसा टेंपल, इम्पिरियल पॅलेस फोटो स्टॉप, शिंजूकू गार्डन, स्काय ट्री, नाकामिशी शॉपिंग आर्केड ह्या गोष्टी बघतो. टोकियोहून हिरोशिमाला जाताना माऊंट फुजीचा सुंदर व्ह्यू आपणाला फिफ्थ स्टेशनवरून दिसतो. तेथेच लेक हकोने आणि लेक आशीही आपण बघतो. हिरोशिमाचा बॉम्ब डोम, सडाको मॉन्युमेंट, मेमोरियल सेनोटाफ, हिरोशिमा पीस पार्क, हिस्टरी म्युझियम हे सारं बघताना मन हेलावून जातं, हाच आपल्या सहलीचा क्लायमॅक्स असतो. ओसाका हे एक आणखी मोठ्ठं शहर, तिथे आपण नारा डियर पार्क, तोडाइजी टेंपल, गोल्डन पॉव्हिलियन साईट, कियोमिझू टेंपल आणि निजो कॅसल फोटो स्टॉप एन्जॉय करतो. जाता जाता ओसाका कॅसलचं दूर दर्शन घ्यायलाही आपण विसरत नाही. तर अशी ही जपानच्या वेगळ्या विश्वाची सहल थोडक्यात इथे दिली आहे. नेहमीप्रमाणे एअरफेअर, एअरपोर्ट टॅक्स, व्हिसा, हॉटेलवास्तव्य, ट्रान्सपोर्ट, भोजन आणि हो आपणाला इंडियन भोजन देणार बरं का जपानमध्ये, काळजी नसावी, आणि सुशी पण खायला देणार. जिथे जातो तिथली मेन डिश टेस्ट करायला नको का? सो चला मंडळी, लेट्स गो टू जपान धिस टाईम!
जपानमध्ये...
सिग्नेचर जपान
रेस्टॉरंटचा लक्झुरिअस अनुभव
महागड्या जेवणाचा प्रत्यय जपानमध्ये गेल्यावर येतो. जपानच्या या लक्झुरिअस फूड एक्सपीरिअन्सविषयी-मिशलाँ स्टार रेस्टॉरंट्स टोकीयो आणि क्योटोमध्ये मिशलाँ स्टार रेस्टॉरंट्स खूप आहेत. त्यात थ्री मिशलाँ स्टार रेस्टॉरंट्सची बेस्ट रेस्टॉरंट्समध्ये गणना केली जाते. या काही रेस्टॉरंट्समध्ये सहा-सहा महीने आधी बूकींग करावं लागतं. पण इथले लोकही इतके शिस्तप्रिय आणि सुसंस्कृत आहेत की ते केलेलं बूकींग कधीच कॅन्सल करत नाहीत. इथलं फूड जेवढं टेस्टी असतं तितक्याच त्याच्या किंमती ‘जेवण इतकंही महाग असू शकतं का?’ असा प्रश्न निर्माण करणार्या असतात.
जपानची खाद्यसंस्कृती
जपानमध्ये व्हेज-नॉनव्हेज दोन्ही मिळत असलं तरी नॉनव्हेजमध्ये बरेच प्रकार मिळतात. सोबा, उडॉन, रामेन असे नूडल्सचे विविध प्रकार, ग्योजा अर्थात डंपलिंग्ज आणि सुशी असे जपानी खाद्यसंस्कृतीचे नाना प्रकार चाखताना जपानला सहलीला गेल्यावर भारतीय खाण्याचा अट्टाहास धरणारे आपण, भारतीय जेवण विसरुन जातो. तिथे साके हे पेयही खूप फेमस आहे. राईस वाईनंच म्हणा ना त्याला. हे पेय थंड-गरम असं कोणत्याही प्रकारात पिता येतं.
फुगु फिश
जपानमध्ये अचंबित करणारा फुगु फिश हा जेवणाच्या टेबलावर जिवंत ठेवला जातो. हा फिश रेस्टॉरंटच्या मेन्यु कार्डमध्ये ठेवायचा असेल तर त्यासाठी लायसन्स लागतं. विशिष्ट प्रकारेच हा फिश खाल्ला जातो बरं का! जपानमध्ये असे लक्झुरिअस आणि एक्झॉटिक एक्सपीरिअन्सेस घ्यायचे असतील तर वीणा वर्ल्डची सिग्नेचर जपान टूर प्लॅन करायलाच हवी.
मस्ट डू
जपान बुलेट ट्रेन प्रवास
ट्रेनचा प्रवासही इतका मस्त मस्त असू शकतो का? असा प्रश्न जपानमधील बुलेट ट्रेनमधनं प्रवास करताना नकळत मनात येऊन जातो. बाटलीसारखा आकार आणि पुढे टोकदार निमुळतं होत जाणारं नाक अशा ऐटीत दिसणारी ही बुलेट ट्रेन पाहताच आपण नकळत तिच्या प्रेमात पडतो. तिचा श्रीमंती थाटातला आरामदायी प्रवास, सुपरफास्ट स्पीड आणि ए-वन सर्व्हिस या गोष्टी जपानमध्ये गेल्यावर बुलेट ट्रेनमधनं प्रवास करण्यासाठी आपल्याला मजबूर करतात. या जगप्रसिद्ध ट्रेनला शिंकान्सेन असं म्हणतात. तिचं तिकीट जरी थोडं महाग असलं तरी विमानापेक्षा आरामदायी आणि जलद प्रवासाची लज्जत चाखायला मिळतेय म्हणून जपानमध्ये बुलेट ट्रेनच्या प्रवासाला जास्त पसंती आहे. वीणा वर्ल्डच्या जपान सहलीमध्ये या बुलेट ट्रेनच्या प्रवासाचा अनोखा अनुभव आपल्याला घेता येतो.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.