खरंतर स्लोगन ही जबाबदारी असते त्या-त्या कपंनीची कारण जे लिहिलंय ते प्रत्यक्षात खरं उतरलं पाहिजे. चलो, बॅग भरो, निकल पडो! हे म्हणताना पर्यटकांना खरोखर तसं वाटायला पाहिजे असं काहीतरी आम्हाला सतत निर्माण करता आलं पाहिजे. वीणा वर्ल्डचा जन्मच मुळी अफोर्डेबल टूरिझमसाठी झाला आहे जेणेकरून प्रत्येकाला पर्यटन करणं सोपं जाईल, आणि ते शक्य होतंय. सतत नवीन काहीतरी निर्माण करण्याची टीमला सवय लागलीय, आता हे काय नवीन? असं होत नाही.
आम्ही एका लग्नाला गेलो होतो. वधू-वरांना भेटण्यासाठी आलेल्या मंडळींची मोठी रांग लागली होती. त्या रांगेत नव्या ओळखी होतात किंवा कुणीतरी ओळखीचं भेटतं आणि गप्पागोष्टी सुरू होतात, कंटाळवाणी रांग गप्पांचा फड बनून जाते. अशाच गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात एक व्यक्ती लांबूनच हात करून म्हणाली, आत्ताच जाऊन आलो युरोपला, संपूर्ण घर त्याच हँगओव्हरमध्ये आहे आणि चलो, बॅग भरो, निकल पडो! मूडमधून बाहेर यायला तयार नाही. अशी प्रतिक्रिया मिळाली की खूश व्हायला होतंच पण त्यांनी त्याठिकाणी वापरलेली स्लोगन चलो, बॅग भरो, निकल पडो! मनाला जास्त भावली. वीणा वर्ल्ड झाल्यापासून आम्ही जाहिरातीत हे वाक्य वापरतो. पर्यटकही बोलण्यामध्ये आनंदाने त्याचा असा वापर करतात हे बघून खूप बरं वाटलं. त्यांच्या मनाचा किंचितसा कोपरा ह्या वाक्याने व्यापलाय ही आमच्या मार्केटिंगची आणि वीणा वर्ल्ड टीमची- त्यांच्या मेहनतीची परिणिती म्हणायला हरकत नाही. आमच्याकडून सतत असं चांगलं काम होत राहो आणि पर्यटकांना चांगल्या अर्थाने चलो, बॅग भरो, निकल पडो! लक्षात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
हे वाक्य काही अंशी वीणा वर्ल्डचं घोषवाक्य बनलंय म्हणायला हरकत नाही, कारण सहलींचा विषय आला की पर्यटकांच्या मनात ते रुंजी घालायला लागतं हे यश आहे, आणि त्याचं श्रेय जातं ते चित्रपटसृष्टीतले ख्यातनाम दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार, कलाकार, निर्माते श्री. रवी जाधव ह्यांना. रवी आणि मेघना जाधव ह्यांच्या अथांश कम्युनिकेशनने आमच्यासाठी अनेक जाहिराती बनविल्या. वीणा वर्ल्ड इन-हाऊस मार्केटिंग टीमला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आजही मला आठवतोय तो फोन, ज्या दिवशी मी रवीकडून ही लाईन हक्काने मागून घेतली होती. वीणा वर्ल्ड सुरू होऊन जस्ट दोन महिने झाले होते. सहली संबंधीची जाहिरात द्यायची होती ह्याबाबतीत आमची चर्चा सुरू होती. रवीसोबत टीव्हीच्या जाहिरातीविषयीही बोलणं सुरू होतं. एका जाहिरातीची संकल्पना सांगताना त्याने चलो, बॅग भरो, निकल पडो! हे वाक्य सांगितलं. पर्यटनसंस्था आत्ताच कुठे सुरू केली होती, टीव्हीची जाहिरात करण्याची ऐपत नव्हती त्यामुळे तो सगळा प्रोजेक्टच पुढे ढकलला गेला. पण ते वाक्य मात्र मनात होतं. हे जाहिरातीत वापरलं तर कसं वाटेल ह्यावर विचार करू लागले आणि सरळ रवीला फोन लावला. त्याला म्हटलं की, आत्ता आम्ही टीव्हीसाठी जाहिरात करू शकत नाही पण त्यातलं, चलो, बॅग भरो, निकल पडो! हे वाक्य वीणा वर्ल्डच्या जाहिरातीत वापरू का? जेव्हा जमेल तेव्हा आपण टीव्हीची जाहिरात बनवू. कोणताही कमर्शियल विचार न करता त्याने परवानगी दिली आणि आम्ही त्या दिवसापासून ह्या वाक्याला आमच्या प्रत्येक जाहिरातीचा अपरिहार्य भाग बनवलं. संस्थेला चार वर्ष झाल्यानंतर आम्ही अथांशकडून ती टीव्हीची जाहिरात बनवून घेतली. थँक्यू अथांश! थँक्यू रवी आणि मेघना जाधव.
स्लोगन्समध्ये आम्ही, आखिर साल में एक हॉलिडे तो बनताही है। चलो, बॅग भरो, निकल पडो! हे आलटून पालटून वापरतो तर कधी वीणा वर्ल्डची टॅगलाईन ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट हे एकत्र किंवा तुकड्या तुकड्यात वापरलं जातं. सेलिब्रेट लाईफ! किंवा जस्ट गो! हे तर आमच्या काही सेल्स ऑफिसेसमध्ये भिंतीवर विराजमान झालंय. वीणा वर्ल्ड नवीन संस्था आहे त्यामुळे ही स्लोगन्स तशी खूपच कमी लोकांना माहीत आहेत पण काही कंपन्यांची स्लोगन्स आपल्या आयुष्याचा अपरिहार्य भाग बनून गेली. कधी आपण ती गुणगुणली, कधी त्यावर चर्चा केली, आठवून तर बघा. रविवारी रुटीन, टार्गेट्स इ. सगळ्यांचा विसर पडायचा असेल तर असं काहीतरी छानसं खादय डोक्याला मिळालं पाहिजे. आम्ही तर सहलींवर बसप्रवासात ह्या स्लोगन्सवरून एक खेळ घेतो. घरात घेता येण्यासारखाही तो आहे. बसमध्ये डावी बाजू-उजवी बाजू किंवा आगेवाले-पिछेवाले अशा दोन पार्टीज करायच्या. एका पार्टीने स्लोगन बोलायचं तर दुसर्या पार्टीने कंपनीचं नाव सांगायचं, किंवा एकाने कंपनीचं नाव सांगायचं तर दुसर्याने त्याचं स्लोगन. कधीकधी आमचा टूर मॅनेजर सूत्रधार बनतो. दोन पार्टीज असतात, प्रश्न तो विचारणार आणि पर्यटकांनी त्याला उत्तरं द्यायची. ज्या बाजूने जास्त उत्तरं दिली जातील ते हुशार आणि त्या गेमचे विजेते. आता जेव्हा तुम्ही सहलीला जाल तेव्हा अवश्य ह्या खेळाची मजा लुटा. गृहपाठच करून जा, बरं का!
आपल्या पुढच्या सहलीवर खेळू तेव्हा खेळू पण आज थोडा टाईमपास करायला काय हरकत आहे. चला आठवा बरं, ही कुणाकुणाची स्लोगन्स आहेत. देश का नमक? हर घर कुछ कहता है।, द टेस्ट ऑफ इंडिया, बुझाये प्यास बाकी सब बकवास।, बजाते रहो।, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी।, द कम्प्लीट मॅन, देश की धडकन।, द बाप ऑफ ऑल अॅप्स, अ डायमंड इज फॉरेेव्हर, टेस्ट द थंडर, सिम्प्लीफ्लाय, बॉर्न टफ, फ्रेश एन ज्युसी, यही है राईट चॉईस बेबी, चलो निकलो, नेबर्स एन्व्ही ओनर्स प्राईड, आय अॅम लव्हिंग इट, अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी, थिंक डिफरंट, इससे सस्ता और अच्छा कही नहीं, द मिंट विथ द होल, डिझाईन्ड फॉर ड्रायव्हिंग प्लेजर, दिल मांगे मोअर, जस्ट डू इट, द सिक्रेट ऑफ अवर एनर्जी, दाग अच्छे हैं।, इसको लगा डाला तो लाईफ झिंगालाला।, दिमाग की बत्ती जला दे।, देअर इज नो फिनिश लाईन, सर उठाके जियो े।, बिकॉझ यू आर वर्थ इट, कुछ मीठा हो जाये।, एव्हरी लिटील हेल्प्स, ऑलवेज लो प्राईसेस्, झूम झूम झूम, इंपॉसिबल इज नथिंग, द हॅप्पीएस्ट प्लेस ऑन अर्थ, कितना देती है?, कनेक्टिंग पीपल, थिंक स्मॉल, डर के आगे जीत है।, हर एक फ्रेंड जरूरी होता है।, नथिंग ऑफिशियल अबाऊट इट, स्वाद जिंदगी का।, इट हेल्दी थिंक बेटर, जब मै छोटा बच्चा था, बडी शरारत करता था।, या ठिकाणी पन्नास स्लोगन्स दिली, त्यातली तुम्हाला किती ओळखता आली? काठावर पास झालात की शंभर टक्के मार्कस् मिळाले?
काही कंपन्यांनी स्वतःचं नाव स्लोगनमध्ये घातलं आणि आपण अक्षरश: त्याप्रमाणे गुणगूणायला लागलो. हा दुसरा टाईमपास. बघूया गाळलेल्या जागा भरता येतात का? हॅव अ ब्रेक हॅव अ , अॅनकॅन चेंज युवर लाईफ, अमेरिका रन्स ऑन, आय लव्ह यू, वाह ।, थंडा मतलब।, हमारा।, देअर इज समथिंग मनी कांट बाय, फॉर एव्हरिथिंग एल्स देअर इज, है जहाँ, तंदुरुस्ती है वहाँ।, द नेव्हर स्लीप्स, अटरली बटरली डेलिशस ।, आय अॅम बॉय, सबकी पसंद ।, का मजबूत जोड़ है, टूटेगा नही।, की गोली लो खिचखिच दूर करो।, टर्मरिक नही कॉस्मॅटिक।, याऽऽऽऽ । एक्सेल है ना।, अबबं! केवढं हे खाद्य डोक्याला. एक मात्र निश्चित आहे ह्यातल्या अनेक गोष्टींनी आपल्या मनावर कधी ना कधी राज्य केलंय. आपण बोलण्यात, मजामस्ती करण्यात ह्यातली बरीच स्लोगन्स वापरतो. काही कंपन्यांची स्लोगन्स आपल्यासमोर खूप चांगली प्रतिमा निर्माण करतात. आपल्याला ती कंपनी आवडत असली तर आपण त्यांचं स्लोगन गर्वाने म्हणतो. आमची वुमन्स स्पेशलची आवडती स्लोगन म्हणजे, डर के आगे जीत है।, जेव्हा-जेव्हा आमच्याकडे मार्केटिंगची मीटिंग असते तेव्हा बर्याचदा दोन विचारप्रवाह असतात. जाहिरातीत जे सांगायचंय ते सरळ सरळ लिहायचं की थोडं छान-छान ब्रँडिंग स्टाईलने लिहायचं. मग माझा आवडता डायलॉग असतो, ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही, बुझायें सिर्फ प्यास और बाकी सब बकवास। पर्यटकांना कळेल अशा शब्दात स्पष्ट लिहूया, कोणतीही लपवाछपवी नाही, कुठेही गैरसमज व्हायला नको.
खरंतर स्लोगन ही जबाबदारी असते त्या-त्या कपंनीची कारण जे लिहिलंय ते प्रत्यक्षात खरं उतरलं पाहिजे. चलो, बॅग भरो, निकल पडो! हे म्हणताना पर्यटकांना खरोखर तसं वाटायला पाहिजे असं काहीतरी आम्हाला सतत निर्माण करता आलं पाहिजे. पर्यटन हे एक स्वप्न आहे, ते एक साहस आहे, एक उत्साह आहे, व्यक्तीमत्त्व विकासाची कार्यशाळा आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने छोटं- मोठं पर्यटन करीत रहावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे किंवा ती तळमळ आहे, म्हणूनच प्रत्येकासाठी पर्यटन शक्य व्हावं ही वीणा वर्ल्डची सुरुवातीपासूनची मनोधारणा आहे. वीणा वर्ल्डचा जन्मच मुळी अफोर्डेबल टूरिझमसाठी झाला आहे जेणेकरून प्रत्येकाला पर्यटन करणं सोपं जाईल, आणि ते शक्य होतंय. सतत नवीन काहीतरी निर्माण करण्याची टीमला सवय लागलीय, आता हे काय नवीन? असं होत नाही. कोणतीही सुट्टी मग ती उन्हाळ्याची असो किंवा गणपती दिवाळी ख्रिसमसची, विमान प्रवास-हॉटेल्स हे सगळं महागतं त्यावेळी आपल्याला ती थोडीशी चढी किंमत मोजावीच लागते.
सुपरपीक सीझन संपल्यानंतर भारतातील काही रम्य पर्यटन स्थळं आम्ही पंचवीस हजार रुपयात आणली आहेत. विमानप्रवास, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्थलदर्शन असं सर्व समाविष्ट असलेल्या ह्या सहली आहेत, कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय. अट एकच होती, ह्या सहली कुणालाही कळेल की ना नफा-ना तोटा तत्त्वावर असल्याने ह्यात कोणतंही डिस्काऊंट नाही आणि अपरिहार्य कारणामुळे कुठे फ्लाईट कॅन्सल झालं किंवा समाविष्ट सहल कार्यक्रमाव्यतिरिक्त कोणताही जादा खर्च आला तर तो पर्यटकांना करावा लागेल. पूर्वी मी एक स्लोगन केली होती, कॅरी झिरो मनी ऑन टूर आत्ताही ती योग्यच आहे कारण ठरलेल्या सहल कार्यक्रमात सर्व काही समाविष्ट केलेलं असतं. संपूर्ण जुलै महिन्यात किमान दोन हजार पर्यटकांनी ह्या पंचवीस हजारातल्या सहलींचा आनंद लुटला. आता ऑगस्टमधल्या सहलींच बुकिंग पंचवीस हजारात सुरू आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे विदेश सहलीही फक्त पन्नास हजारात आणल्यामुळे अनेक पर्यटकांनी त्यांच्या पहिल्या-वहिल्या फॉरिन टूरचं स्वप्न पूर्ण केलं. काही पर्यटकांची बर्याच दिवसांची इच्छा होती की, आणखी कमी पैशात फॉरिन टूर नाही का आणता येणार? खास त्यांच्यासाठी आत्ताच आम्ही तीस हजारात थायलंड तीन रात्री व चार दिवसांची सहल आयोजित केली, जेणेकरून ज्यांनी अजून परदेश प्रवासाचा श्रीगणेशाच केला नाही त्यांनी एकदातरी देशाच्या बाहेर पडावं. म्हटलं नं, आम्ही सतत असं काहीतरी करीत राहणार ज्यामुळे पर्यटकांना खरोखर वाटलं पाहिजे, त्यांनी म्हटलं पाहिजे, चलो, बॅग भरो, निकल पडो!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.