या आठवड्यात सत्तावीस दिवसांची युरोप सहल मुंबईत परत आली. पंधरा-वीस दिवसांच्या युरोप सहली दर आठवड्याला सुरू असतात, पण एवढ्या मोठ्या सहलीचं आयोजन पहिल्यांदाच केल्याने धास्ती होती पर्यटक होमसिक होतील का ह्याची. सहलीनंतर टूर मॅनेजर राहूल देसाईचा फोन आला, ‘स्वारी फत्ते, मंडळी खूश!’... आणि मी महिनाभराची सहल आखायला सुरुवात केली...
जगाच्या टोकाला पोहोचायचं, एकामागून एक देश पालथे घालायचे, चक्क दोन खंडांना पादाक्रांत करायचं एकाचवेळी, असा खास बेत आखला युरोपची सत्त्तावीस दिवसांची मोठी सहल पर्यटकांच्या पसंतीस उतरल्यावर आणि त्यांच्या पचनी पडल्यावरही. त्यात जाण्या-येण्याचा मोठा प्रवास वाचवायचा हा हेतू होताच पण जवळजवळ लाख-सव्वा लाख रुपयांचं प्रत्येकी सेव्हिंग होणार होतं ज्यामध्ये जपानसारखा एखादा देश बघता येवू शकतो. जग अफोर्डेबल बनवायचं हा विडा उचलल्यामुळे ह्या दोन सहलींचं कॉम्बिनेशन म्हणजे एक अफलातून रसायन जमवून आणलंय आणि त्यात ब्राझिल रिओ कार्निवलचा तडका म्हणजे दुग्धशर्करा योग.
साउथ अमेरिका आणि अंटार्क्टिका ह्या दोन्ही सहली एकत्रित करता येतील किंवा फक्त साउथ अमेरिका, फक्त अंटार्क्टिका, फक्त ब्राझिल, फक्त चिली-अर्जेन्टिना किंवा पेरू-चिली-अर्जेन्टिना अशा छोट्या सहलींची पार्ट टूर घेता येईल. सवड आणि बजेट ह्यांची सांगड घाला आणि चला साता समुद्रापार.
आशिया, आफ्रिका आणि नॉर्थ अमेरिकेनंतरचा जगातला नंबर चार चा मोठा खंड म्हणजे दक्षिण गोलार्धातला साउथ अमेरिका. पश्चिमेला पॅसिफिक ओशन, उत्तरेला करिबियन सी आणि नॉर्थ अटलांटिक सी, दक्षिणेला साउथ अटलांटिक सी अशा महासागरांच्या कोंदणात साउथ अमेरिका खंड चपखल बसला आहे. पूर्वी म्हणे आफ्रिका आणि साउथ अमेरिका एकत्र जोडलेले होते आणि भूगर्भातल्या बदलांमुळे ते वेगळे झाले. शास्त्रज्ञांच्या मतानुसार किमान पंधरा हजार वर्षांपासून इथे मानवाच्या वस्त्या अस्तित्वात होत्या. इन्का सिव्हिलायझेशनचे अवशेष आपल्याला ह्याची साक्ष देतात. पोर्तुगीज, स्पॅनिश, इंग्लिश, डच आणि फ्रेंच लोकांनी म्हणजे दर्यावर्दी वा समुद्री चाच्यांनी साउथ अमेरिकेचा एक एक भाग शोधून आपल्या अमलाखाली आणला आणि युरोपियन कोलोनायझेशन व्हायला तिथे सुरुवात झाली. त्यावेळी पॉवरबाज असलेल्या पोर्तुगिजांनी साउथ अमेरिकेच्या पूर्व भागावर कब्जा केला तर स्पॅनिश लोकांनी पश्चिम भागावर आपला हक्क प्रस्थापित केला, त्यामुळेच ह्या दोन भाषांचं प्राबल्य आपल्याला इथे दिसतं. ह्या दोन भाषांमुळे अर्थातच विखुरलेली अनेक कल्चर्स एकत्र यायला मदत झाली, ह्या नवीन उदयाला लॅटीन अमेरिका असंही म्हटलं गेलं. पोर्तुगिजांना बरीच किंमत मोजून अठराशे बावीस मध्ये ब्राझिल स्वतंत्र झाला आणि त्याच्या आसपास सर्वच देशांच्या स्वातंत्र्यचळवळींना उत येत एक एक देश स्वतंत्र होत गेले, बॉर्डर्स प्रस्थापित झाल्या, सरकारं स्थापन झाली आणि सोनं, चांदी, तांबं, लोह, टीन आणि पेट्रोलियमने समृध्द असलेल्या साउथ अमेरिकेची जगरहाटी सुरू झाली. साउथ अमेरिका महत्वाचा खंड बनला.
साउथ अमेरिकेला अनेक वरदानं लाभलीयत. ज्या जंगलांच्या सूरस चमत्कारीक कथांनी आपण नेहमीच आश्चर्यचकित झालोय ते जगातलं सर्वात मोठं अॅमेझॉनचं जंगल (रेन फॉरेस्ट) साउथ अमेरिकेत आहे आणि ज्याचा जास्तीत जास्त भाग हा ब्राझिलमध्ये आहे. अॅमेझॉन जंगल ज्या नदीच्या काठावर वसलं आहे ती जगातली सर्वात मोठी नदी आणि लांबीच्या बाबतीत जगातली दोन नंबरची अॅमेझॉन रिव्हर साउथ अमेरिकेतच आहे. व्हिक्टोरीया फॉल्स आणि नायगारा फॉल्सला मागे टाकील असा इग्वासु फॉल्स ब्राझिल आणि अर्जेन्टिना ह्या देशांना लाभला आहे. इग्वासु फॉल्सला भेट दिल्यावर फर्स्ट लेडी ऑफ अमेरिका-एलेनोर रूझवेल्ट म्हणाल्या होत्या, ‘पूअर नायगारा.’ त्यांच्या ह्या विधानाने अमेरिका म्हणजे युएसए खट्टू झालं होतं पण इग्वासु फॉल्सचं आयुष्याचं भलं झालं आणि हे फॉल्स बघायला जगभरातल्या पर्यटकांमध्ये चढाओढ लागली. जिथल्या बर्याचशा भागात चारशे पाचशे वर्षात पाऊसच पडला नाही असं पॅसिफिक महासागराच्या किनार्यालगतच एक हजार किलोमीटर लांबीचं जगातलं ड्रायेस्ट डेझर्ट ‘आटाकामा’ चिली आणि पेरू ह्या दोन देशांमध्ये विभागलं गेलंय. जगातली सर्वात लांब सात हजार किलोमीटर्सची माउंटन रेंज म्हणजे अॅन्डीज ही अर्जेन्टिना, चिली, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया आणि व्हेनेझुवेला ह्या साउथ अमेरिकन देशांमध्ये पसरली आहे. अटाकामा डेझर्टचा भागही ह्या अॅन्डीजमध्ये येतो. सर्वात उंचावर वसलेली अशी जगातील कॅपिटल सिटी म्हणजे बोलिव्हियाची राजधानी ‘ला पाझ’. जहाजांना दळणवळणासाठी खुला असलेला आणि जगातला सर्वात उंचावरचा लेक टिटिकाका पेरू ह्या देशात म्हणजे अमेरिकेत आहे. अशा अनेक नॅचरल वंडर्ससोबत साउथ अमेरिका सजलंय ते ‘न्यू सेव्हन वंडर्स ऑफ द वर्ल्ड’ मधल्या दोन अद्भुत आश्चर्यांनी. त्यातलं एक आहे इन्का साम्राज्याचे अवशेष माचूपिचू आणि दुसरं ख्राइस्ट द रीडीमरचा भव्य पुतळा. सर्वात मोठी, सर्वात घनदाट, सर्वात उंच, सर्वात लांब... अशा वैशिष्ठ्यांनी नटलेल्या साउथ अमेरिकेमध्ये एकुण बारा देश आहेत.
पर्यटकांना वेलकम करणार्या, त्यांच्या स्वागताला सज्ज असलेल्या ब्राझिल, अर्जेेन्टिना, पेरू, चिली आणि बोलिव्हीया ह्या पाच देशांना आपण वीणा वर्ल्डच्या साउथ अमेरिकेच्या एकोणीस दिवस आणि अठरा रात्रींच्या सहलीत भेट देणार आहोत. जातानाचा आणि येतानाचा प्रवास धरला तर ही सहल बावीस दिवसांचीच म्हणायला हवी. ही सहल निघतेय फेब्रुवारीत कारण आपण तिथे एक दिवस रिओ कार्निवलही बघणार आहोत. आहेे की नाही सोने पे सुहागा. साउथ अमेरिकेची जी काही वैशिष्ठ्य मी वर लिहीलियत ती सर्व आपण ह्या सहलीत बघणार आहोत बरं का. एवढ्या लांबवरची, अनेक विमान प्रवासांनी युक्त अशी सर्व महत्वाच्या स्थलदर्शनांना कव्हर करणारी ही सर्वसमाविष्ट सहल जगात एक महाग सहल म्हणून गणली जात असली तरी वीणा वर्ल्डकडे तुम्हाला ती तुलनेने कमी किमतीतच मिळणार हे निश्चित. मुंबई ते मुंबई तुमच्यासोबत आमचा एक्सपर्ट टूर मॅनेजर आहेच. त्यामुळे चला निघा बिनधास्त साउथ अमेरिकेच्या आगळ्या पर्यटनाला. बी डिफरंट...डू डिफरंट!
आत्ता थोडंसं जाणूया अंटार्क्टिकाविषयी. पृथ्वीच्या पाठीवरील खंडाच्या निर्मितीचा इतिहास तपासला तर असं लक्षात येतं की काही लाख वर्षांपूर्वी आपला भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि अंटार्क्टिका हे एका विशाल खंडाचा हिस्सा होते. पण कालांतराने हा विशाल खंड तुटला, विभागला गेला त्यात आपला भारत वरच्या दिशेनं गेला तर अंटार्क्टिका खाली खाली जात जगाच्या तळाशी जाऊन बसला. ह्या त्याच्या भौगोलिक स्थानामुळे अंटार्क्टिका बाकीच्या खंडांपेक्षा सर्वस्वी निराळा ठरला. या बर्फाने झाकलेल्या खंडावर माणूस पहिल्यांदा पोहोचला तो सन १८२१ साली. नंतर ह्या परिसरातील व्हेल्स आणि सील्स ह्या प्राण्यांच्या शिकारीचा सिलसिला सुरू झाला आणि त्यासाठी चक्क ह्या मायनस डिग्रीच्या प्रदेशात बेस कॅम्प उभारण्यापर्यंत मजल गेली. सुदैवाने १९५७ साली इंटरनॅशनल जिओफिजिकल इयर साजरे करताना अंटार्क्टिकाच्या संरक्षणासाठी काही नियम तयार करण्यात आले आणि तेंव्हापासून ह्या खंडावर फक्त शास्त्रीय संशोधनाला परवानगी देण्यात आली. आपल्या भारताचाही संशोधन तळ अंटार्क्टिकावर आहे. ह्या खंडाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा भूभाग कोणाही एका देशाच्या मालकीचा नाही, त्यामुळे या खंडाला अधिकृत राजधानी नाही, या खंडाचं अधिकृत चलन नाही आणि ह्या खंडाची अधिकृत भाषाही नाही. अंटार्क्टिकाच्या भूमीवर जे बर्फाचे आवरण आहे त्याची सर्वात जास्त जाडी तब्बल ४.८ किमी इतकी आहे. एकूण १,४०,००० चौ.कि.मी. इतकं क्षेत्रफळ असलेल्या अंटार्क्टिकावरचा फक्त दोन टक्के भूभाग बर्फाने झाकलेला नाही. जगातल्या एकूण बर्फापैकी ९०% बर्फ अंटार्क्टिकावर साठलेला आहे, त्यामुळे जगातल्या एकूण गोड पाण्यापैकी ७०% पाणी याच खंडावर बर्फाच्या रुपात आहे. अंटार्क्टिका खंड जगाच्या तळाशी दक्षिण गोलार्धात असल्याने तिथलं ऋतुचक्र आपल्या विरुध्द आहे, त्यामुळे आपल्याकडच्या हिवाळ्यात तिथला उन्हाळा असतो, त्यामुळे आपण फक्त याच काळात अंटार्क्टिकाला भेट देऊ शकतो.
ह्या अनोख्या खंडाची अफलातून सहल वीणा वर्ल्डने शंभर टक्के यशस्वी केली दोन वर्षापासून. अंटार्क्टिका गाठण्यासाठी आपल्याला जावं लागतं साउथ अमेरिकेतील अर्जेंटिनाची राजधानी असलेल्या ब्युनोस आयर्स ह्या शहरातून, अंटार्क्टिकाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या ‘उशुआया’ह्या शहरात. उशुआयामधूनच आपली अंटार्क्टिकाची क्रुझ निघणार असते. उशुआया ज्या बिगल चॅनलच्या काठावर आहे, त्या चॅनलमधून प्रवासाला सुरुवात करतो. यानंतर जी भूमी दिसेल ती असेल जगाच्या तळाशी असलेल्या सातव्या खंडाची-अंटार्क्टिकाची, नुसत्या कल्पनेनचं पर्यटक एक्साईट होतात. अंटार्क्टिकाकडे जाताना वाटेत ड्रेक पॅसेज ओलांडावा लागतो. १६ व्या शतकातील दर्यावर्दी, धाडसी, आक्रमक फ्रान्सिस ड्रेक याचे नाव या पॅसेजला दिले आहे. हा ड्रेक जितका उलाढाल्या होता त्यापेक्षा हा पॅसेज अधिक उलाढाली करणारा आहे, कारण ह्या ठिकाणी अटलंटिक आणि पॅसिफिक महासागरांची गळाभेट होते आणि आपल्याला ‘रफ सी’ म्हणजे काय ते कळतं. ड्रेक पॅसेज पार केल्यावर भोवतालच्या समुद्रात तरंगणारे हिमखंड सांगायला लागतात की आपण अंटार्क्टिकाच्या घेर्यात पोहोचलो आहोत. ह्या सहलीत आपण भेट देतो अंटार्क्टिका पेनिन्सुलातील साउथ शेटलँड आयलंड्सना. अंटार्क्टिकाच्या निसर्गाची काळजी घेण्यासाठी आणि इथल्या भौगोलिक अवस्थेत फरक पडू नये म्हणून इथे कुठेही जेट्टी किंवा धक्का बांधलेला नाही. आपण आपल्या क्रुझमधून छोट्या बोटीत - ज्यांना झोडियाक म्हणतात त्यात उतरतो आणि कुशल नावाडी वल्हवत वल्हवत आपल्याला वेगवेगळ्या बेटावर घेऊन जातात. या बर्फाच्या राज्याचे रहिवासी म्हणजे पेंग्विन्स, सील्स, व्हेल्स हे जलचर. त्यामुळे अंटार्क्टिकावर स्थलदर्शन म्हणजे इथलं अनोखं वाइल्डलाईफ. आपल्याला इथे चिनस्ट्रॅप पेंग्विन्सची कॉलनी पाहायला मिळते. जेमतेम दीड दोन फूट उंचीचे हे पेंग्विन्स शेकडोंच्या संख्येनं पाहायला मिळतात तेंव्हा आयुष्यात न पाहिलेलं काहीतरी पाहातोय ह्याची खात्री पटते.
हे सारं अनुभवताना आपण खरोखर अंटार्क्टिकावर आहोत की स्वप्नात सफर करतोय असा प्रश्न मनात आल्यावाचून राहात नाही पण जेंव्हा आपल्या क्रुझच्या समोरून महाकाय व्हेल्स कधी आपली भव्य शेपटी दाखवत तर कधी डोक्यातून उसळणारे पाण्याचे कारंजे उडवत जातात तेंव्हा खात्री पटते की आपण प्रत्यक्षात या जगावेगळ्या भूमीवर आलो आहोत. अंटार्क्टिकाच्या हवामानामुळे आणि तिथे जाणार्या पर्यटकांच्या संख्येवर असलेल्या निर्बंधामुळे आम्ही वर्षातून फक्त एकच सहल नेतो. गेल्यावर्षी वीणा वर्ल्डसोबत ह्या बर्फखंडाला भेट देऊन आलेले पर्यटक अजूनही अंटार्क्टिका इफेक्टमधून बाहेर आलेले नाहीत.
जगाच्या टोकावरच्या साउथ अमेरिका आणि अंटार्क्टिका या दोनही सहली वीणा वर्ल्डने नेहमीप्रमाणे (कंबाइन्ड किंवा सेपरेट) तुलनेने कमी पैशात आणल्या आहेत. ह्या दोन्ही सहलींचा यशस्वी अनुभव वीणा वर्ल्डने ऑलरेडी पर्यटकांना दिलाय. तेव्हा ह्यावेळी ‘करो तैयारी, और चलो, बॅग भरो, निकल पडो!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.