सततचा प्रवास आणि कामांचं प्रेशर यामुळे ॲक्चुअल पुस्तकं वाचणं थोडं मागे पडलं होतं. त्यात मध्येच ई-बुक्स, आय बुक्स, पॉडकास्ट, व्होडकास्ट ह्या सगळ्याचा भडिमार झाला. आपण काम करत असताना कुणीतरी एखादं पुस्तक वाचून दाखवत असेल तर सो कॉल्ड मल्टिटास्किंग असण्याच्या अभिमानाला पुष्टी मिळाली आणि खास वेळ काढून एका जागी बसून हातात पुस्तक घेऊन वाचणं म्हणजे वेळेचा अपव्यय वाटायला लागण्याची मानसिकता तयार झाली. पण पॅन्डेमिकने घरी बसवलं आणि दृक्श्राव्य माध्यमांचा अतिरेक झाला, टीव्ही स्क्रीन नकोसा वाटायला लागला आणि बुक शेल्फमधली पुस्तकं ‘डोन्ट वरी, वुई आर विथ यू‘ म्हणत आनंदाने साथीला आली. सकाळी वाचायचं एक पुस्तक आणि रात्री वाचायचं एक पुस्तक अशी वेगवेगळ्या विषयाची दोन पुस्तकं अवतीभोवती असण्याची आणि त्यातला किमान एक चॅप्टर रोज वाचण्याची जुनी सवय पुन्हा एकदा दिनचर्येमध्ये यायला लागली. कष्ट पडत होते, पण नेटाने स्वत:ला दामटवत होते. काही दिवसांच्या परिश्रमांनंतर जुनी सवय नव्याने अंगिकारली गेली. त्यावेळी इंद्रा नूयी चं ‘माय लाइफ इन फुल्ल‘ हे आत्मचरित्र बेस्ट सेलर्स लिस्टमध्ये सर्वत्र दिसत होतं. जग पूर्वपदावर येत होतं, पुस्तकांची दुकानं खुणावत होती. ऑनलाईन ऑर्डर करण्यापेक्षा मला किताब खाना वा क्रॉसवर्डमध्ये जाऊन पुस्तकं घ्यायला खूप आवडतं. म्हणजे एका पुस्तकासाठी जायचं आणि पुस्तकांची भली मोठी थप्पी घेऊन बाहेर पडायचं. सुधीरच्या चेहऱ्यावरचा ‘कधी तू वाचणार एवढं?‘ हा भाव दुर्लक्षित करणं हे आता माझं रूटीन झालंय आणि त्याच्याही अंगवळणी पडलंय, म्हणजे असावं. तर मी असंच एकदा केव्हातरी हे इंद्रा नुईचं पुस्तक आणलं आणि वाचायला सुरुवात केली. एका असामान्य कर्तृत्ववान महिलेने सोप्या भाषेत लिहिलेल्या या प्रेरणादायी पुस्तकाचा जमेल तसा फडशा मी पाडत होते. त्या दरम्यान एक दिवस बिल्डिंगमध्ये असंच एकत्र जमलो होतो. गप्पांमध्ये वाचनाचा आणि पुस्तकांचा विषय निघाला. कोण काय वाचतंय चर्चा सुरू झाली. ‘अरे मैं इंद्रा नुई का `माय लाइफ इन फुल्ल’ पढ़ रही हूँ, टू गूड यार, कभी खत्म करू एैसा हुआ है।‘ असं मी म्हणताच, ‘अरे यार इट्स अ बिग मार्केटिंग‘ एक आवाज. ‘व्हॉटेएव्हर शी सेज, आफ्टरऑल व्हॉट शी सोल्ड वॉज ऑल नॉट ॲट ऑल हायजिनिक‘ दुसरा आवाज. ‘अरे वो प्रॉडक्टस ने लोगों की जिंदगीयाँ बरबाद की‘ तिसऱ्याचं अनुमोदन. गप्पा संपवून मी घरी आले. माझ्या डोक्यात मगासच्या चर्चेतले मुद्दे एवढे परिणाम करून गेले की मी ते पुस्तक हातात घेतलं नाही. काहीतरी कारणं काढीत मी त्या दिवशी पुस्तकापासून दूर गेले आणि मग रोज तेच घडायला लागलं. एवढ्या झपाट्याने वाचीत असलेलं ते अतिशय चांगलं पुस्तक अर्धवटच राहिलं.
जनरली ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या मानसिकतेची मी. एकदा एका चर्चासत्राला गेले होते. मुलाखतकाराचे प्रश्न आणि आमची दिलखुलास उत्तरं असा कार्यक्रम बऱ्यापैकी रंगला. कार्यक्रम संपल्यावर एका श्रोत्यांनी येऊन म्हटलं, `तुम्ही दिलेली सर्व उदाहरणं छान होती, पण अमुक एका जोडीचं उदाहरण खटकलं. अहो त्यांना मी चांगलं ओळखतो. चकाकतं ते सर्व सोनं नसतं. अर्ध्या गोष्टी मार्केटिंगसाठी केलेल्या असतात.’ आता ही खरंतर एका श्रोत्याची प्रतिक्रिया, त्याचं मत. त्याचा आपल्यावर कशाला परिणाम व्हायला हवा? पण पुढे कधीही भाषणात किंवा चर्चासत्रात हे नाव घ्यायची वेळ आली की मी मागे हटायचे. एक साधी कमेंट असा परिणाम करून गेली.
शाळेत असल्यापासून अनेक भारतीयांप्रमाणे मी सुद्धा अमिताभ बच्चनची फॅन होते. रद्दीच्या दुकानात जाऊन फिल्मी मॅगझिन्स आणायची, त्यातनं फोटो कापून त्याचा अल्बम बनवायचा असे उद्योगही करून झाले. ‘दोस्ताना‘ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अमिताभ बच्चनला भेटायची संधी मिळाली. त्याला तो अल्बम दाखवला, त्यानेही तो अतिशय सहृदयतेने पंधरा मिनिटं चाळला आणि त्याची रूबाबदार सही त्यावर केली. पुढे कितीतरी वर्षं तो अलब्म मी जपून ठेवला होता. नंतर तो कुठे हरवला माहीत नाही, कदाचित आयुष्यात जोडीदार म्हणून सुधीरची एन्ट्री झाल्यावर हे फॅन प्रकरण मागे पडलं असावं. असो, सांगायचा मुद्दा असा की अमिताभ बच्चन स्ट्रगलर असण्यापासून गेली साठेक वर्षं चित्रपट सृष्टीचा महानायक बनून राहिल्याचं उदाहरण आम्ही आमच्या कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये अनेकदा वापरतो. बॉलीवूड, टॉलीवूड, हॉलिवूड वा क्रिकेट विश्वातली उदाहरणं एवढ्याचसाठी वापरतो कारण ती एखादा मुद्दा पटवून द्यायला बरी पडतात ही उदाहरणं आणि त्यासाठी मग रणवीर सिंग, अक्षय कुमार, कंगना रनौत यांसारख्या स्वकर्तृत्वाने उच्चपदावर पोहोचलेल्या अनेकांची लाइफस्टोरी खूप कामी येते. पण मग कधीतरी एखादा सूर ऐकायला येतोच `अरे तुम्ही एवढं अमिताभचं उदाहरण देताय पण तुम्हाला माहितीय का, कॅमेरासमोरचा अमिताभ आणि कॅमेरा हटल्यानंतरचा अमिताभ ह्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. अनेक सिनेकलाकारांच्या बाबतीत तर, तुला माहितीय का, त्याचं किती जणींशी ‘लफडं‘ आहे ते, अशा लोकांची काय उदाहरणं घ्यायची?’
एकदा आमच्या युएसए च्या वास्तव्यात सुनिलाचा पूर्वीचा शेजारी रोमी विश्वनाथन भेटला, हीच चर्चा आम्ही करीत होतो. कुणाला आदर्श मानायचं हल्ली कळत नाही. एव्हरीवन हॅज स्केलेटन्स इन द बॅकयार्ड. मी म्हटलं कुठेतरी एकदा वाचलं होतं ‘जे जीवित आहेत त्यांना आदर्श मानू नका, जे या जगातून चांगलं काम करून निघून गेलेत त्यांना आदर्श माना. किमान त्यांच्यातरी काही अशा वेड्यावाकड्या गोष्टी समोर येणार नाहीत‘ त्यावर रोमी म्हणाला, ‘अरे आजकल गुजरे हुअे लोगों की भी बहौत सारी कॉन्ट्रोव्हर्शियल बाते सामने आती हैं। सिर्फ भगवान को या मायथॉलॉजिकल कॅरॅक्टर्सको आदर्श मानो।
आदर्श कोण असावं, विचार कुणाचे ऐकावेत हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर अनेक चर्चासत्र वा वादविवाद होऊ शकतात, पण आता मी एक शिकले आहे की, ‘अरे तुझे पता है क्या...’ `तू उसकी असलियत नहीं जानती?‘ ‘अरे हे सगळे दाखवायचे दात आहेत, वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच आहे...‘असे किंवा अशासारखे `गॉसिपी’ विषय आले की त्यापासून जरा दूरच रहायचं. महत्त्वाचं म्हणजे कधी कधी दूर नाही राहता आलं तरी या असल्या कमेंट्सचा प्रभाव आपल्यावर पडू द्यायचा नाही. आपली सारासार बुद्धी सतत जागृत ठेवायची आणि पुढे जायचं. कारण या अशा थोड्याशा जेलसीमुळे म्हणा, पण आपल्यावर कळत नकळत कुणीतरी केलेल्या कमेंट्सचा परिणाम होतो. बॅक ऑफ द माईंड कुठेतरी ती कमेंट चिकटून राहते. बघा नं, इंद्रा नुईचं ते चांगलं पुस्तक त्यावेळी मी अर्धवट सोडलं एका चर्चेतल्या त्या दोन तीन कमेंट्समुळे. खरंतर माझी सद्सद्विवेकबुद्धी मी जागृत ठेवायला हवी होती की, तामिळनाडूमधल्या एका साध्या, सर्वसामान्य घरातल्या मुलीने हे असामान्य यश संपादन केलं आहे. अनेक ॲस्पायरिंग मुलामुलींना भविष्याकडे उमेदीने बघण्यासाठी आणि ‘एव्हरिथिंग इज पॉसिबल इफ यू वर्क टूवर्डस इट होल हार्टेडली-ऑनेस्टली‘ हा एक अतिशय चांगला संदेश देणारं तिचं आयुष्य तिने सर्वांसमोर खुलं केलं आहे. खरंतर अशी पुस्तकं वाचणं आणि त्यावर चर्चा करणं हे शाळा कॉलेजेसमध्ये नित्यनेमाने झालं पाहिजे. लहान वयात मनाची जडणघडण होत असतानाच ह्या चरित्रांचा चांगला परिणाम होऊ शकतो. अमेरिकेत एका बलाढ्य कंपनीत एका महिलेने ग्लास सीलिंग तोडत, जिद्दीने आणि धैर्याने कॉर्पोरेट लॅडर चढत उच्चपदाला पोहोचणं या अतुलनीय कर्तृत्वाकडे आपण बघितलं पाहिजे. आता ही बलाढ्य कंपनी जे काही बनवते ते अनहेल्दी आहे हे अमेरिकाच नव्हे तर जग तरी कुठे मानायला तयार आहे? त्यामुळे तिथे आपण लक्ष द्यायचं नाही. कारण ते बघायला गेलं तर जगातल्या अर्ध्याअधिक कंपन्या रद्दबातल ठरतील. हीच गोष्ट अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची किंवा सिने कलाकारांची, क्रिकेटर्सची. वयाची ऐंशी वर्षं पार केल्यानंतरही तरुणांना लाजवील अशी कारकीर्द गाजविणाऱ्या अमिताभकडून आपण जिद्द, उत्साह, आत्मविश्वास घ्यावा. खूप खोलात जाऊ नये. तुम्ही आम्ही आणि ते कुणीही परफेक्ट नाही आणि नसणार आहोत, कारण `परफेक्ट’ असं काही नसतंच. परिपूर्णतेच्या मार्गावरचे आपण सारे प्रवासी आहोत असं फारतर म्हणता येईल. एखाद्याने मारलेला रिमार्क कसा परिणाम करतो यासाठी मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये चांगलं उदाहरण दिलं जातं. माणसं किंवा ग्राहक वस्तू कशी खरेदी करतात आणि सभोवतालचे लोकल इन्फ्लूएन्सर्स म्हणजे शेजारी, मित्रमंडळी वा डॉक्टर्स, टीचर्स आपल्याला कसे इन्फ्लूएन्स करतात हे बघूया. एखादा फोन घ्यायचा असतो, आपण नेटवर जाऊन त्याची सगळी कुंडली काढतो, रिव्ह्यूज बघतो, प्राइस कम्पेअर करतो आणि गोंधळात टाकणाऱ्या अनेक फोन्सच्या ऑप्शन्समधून सॅमसंग आणि व्हिवो ही दोन मॉडेल्स आठवडाभराच्या मेहनतीनंतर झिरो डाऊन करतो. आता काम सोप्पं असतं. दुसऱ्या दिवशी शोरूम मध्ये जाऊन दोघांपैकी एकाची निवड करायची. आपण फोन हातात आल्याची स्वप्न रंगवू लागतो. खरेदीच्या आदल्या दिवशी आपला एक मित्र बऱ्याच दिवसांनी भेटायला येतो. हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर आपसूकच फोनचा विषय निघतो. आपण उद्या सॅमसंग किंवा व्हिवो यापैकी एक फोन खरेदी करणार म्हटल्यावर तो म्हणतो, `अरे वेडा आहेस का, आजच्या जमान्यातला सर्वात उत्कृष्ट फोन आहे तो म्हणजे हा अमुकअमुक . झाSSSलं! एवढ्या दिवसांची मेहनत वाया गेली म्हणजे. दुसऱ्या दिवशी आपण सॅमसंग आणि व्हिवो बाजूला ठेवतो आणि मित्राने सांगितलेला फोन घेऊन घरी येतो. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपण अनेकदा आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेत असतो. एका परीटाच्या सांगण्यावरून नाही का सीतेला अग्नीपरीक्षा द्यावी लागली. सो, सध्या क्रिएटर इकॉनोमीवाले, पिअर प्रेशर्स, मित्र मैत्रिणी, चित्रपट, पॉडकास्टस या सगळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांचा कितीही इन्फ्लूएन्स झाला तरी शेवटी योग्य निर्णय घेणं हे आपल्या हातात आहे. काय चांगलं काय वाईट याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो. वुई मस्ट हॅव अ स्ट्राँग कंट्रोल ओव्हर अवर माईंड!
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
देखो अपना देश
दिल से! प्यार से! सम्मान से!
लाहौल स्पिती हा भारताच्या हिमाचल प्रदेशातील एक जिल्हा आहे. इथल्या मॉनेस्ट्रीज प्राचीन काळातील कथा सांगतात. इथे जगातील सर्वात उंच मोटरेबल रोडने जोडलेले व्हिलेज कोमिक हे 4587 मीटर उंचीवर आहे. कोमिक शब्दाचा स्थानिक भाषेतील अर्थ होतो स्नो कॉकच्या डोळ्यासारखा. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले पोस्ट ऑफिस हिक्कीम इथे असून ते 4400 मीटर उंचीवर आहे. हे पोस्ट ऑफिस अनेक दशकांपासून त्याच पोस्टमास्टरद्वारे चालवले जाते आणि अजूनही नियमितपणे चालू आहे. प्रवाशांनाही जगातल्या सर्वाधिक उंचीवरच्या या पोस्ट ऑफिसचा स्टॅम्प मारलेले पोस्टकार्ड आपल्या जिवलग व्यक्तींना पाठवायला आवडते. इथले लांगझा गाव एकेकाळी टेथिस समुद्राखाली होते. त्या ठिकाणी आजही आपल्याला 50 दशलक्ष वर्षं जुनी सागरी जीवाश्म पहायला मिळतात. इथे अमोनाईट्स आणि इतर प्राचीन समुद्री प्राण्यांचे जीवाश्म आढळतात. या कारणाने स्थानिक लोक या गावाला ‘फॉसिल व्हिलेज’ म्हणून ओळखतात. स्पितीच्या इथलं आकाश भारतातील सर्वात स्वच्छ आणि गडद आकाश आहे. यामुळे खगोलशास्त्रज्ञांचे अनेक गट इथे आकाशदर्शन आणि स्टारगेझिंगचे कार्यक्रम आयोजित करतात. इथल्या पिन व्हॅली नॅशनल पार्कमध्ये अद्भुत स्नो लेपर्ड आजही जंगलात फिरताना दिसतो. हे पार्क सैबेरियन आयबेक्स, तिबेटन गॅझेल आणि इतरही अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे निवासस्थान आहे. इथल्या ग्यू गावात इंडो तिबेटन सीमेजवळ एक मॉनेस्ट्री आहे. इथे एका बौद्ध भिख्खूची 500 वर्षं जुनी नैसर्गिकरित्या जतन केलेली ममी आहे. ती जतन करताना कुठलेही रसायन वापरलेले नाही. कोरडे, थंड हवामान आणि या प्रदेशाची ऊंची यामुळे तिचे आपसूकच जतन झाले आहे. या जागेबद्दल दलाई लामा यांना विशेष ममत्त्व होते. त्यांनी अनेकदा स्पितीचा उल्लेख आधुनिक जगातल्या आध्यात्मिक साधनेसाठी सर्वात शुद्ध भूमींपैकी एक म्हणून केलेला आढळतो.
लाहौल स्पिती हा भारत आणि तिबेटमधला प्रमुख व्यापारी मार्ग होता. आजही अनेक ट्रेल्स त्या जुन्या काराव्हॅन मार्गावरून जातात. आयसोलेशनमुळे स्पितीची संस्कृती टिकून राहिली. आजही वर्षातले सहा सात महिने बर्फामुळे स्पिती इतर प्रदेशापासून कट ऑफ झालेली असते. त्यांना आधुनिकतेचा स्पर्शही झालेला नाही. यामुळेच इथले बुद्धिस्ट कल्चर आणि बोलीभाषा आजही टिकून राहिलेल्या आपल्याला पहायला मिळतात. अशा स्वप्नातल्या गावी जायला तुम्ही वाट कशाची बघताय ?
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
लोफोटन आयलंड नॉर्दन नॉर्वेमध्ये आर्क्टिक सर्कलच्या वर स्थित आहे. हा नॉर्दलँड काऊंटीचा नॉर्वेजियन समुद्रात पसरलेला एक भाग आहे. हा भाग इथल्या उत्तुंग पर्वतशिखरांसाठी, अप्रतिम समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि इथल्या चार्मिंग फिशिंग टाऊन्ससाठी प्रसिद्ध आहे.
लोफोटन आयलंड समुद्र जीवसृष्टीने समृद्ध आहे. हे हजारो वर्षांपासून आर्क्टिक कॉड म्हणजेच स्क्रेई माशांच्या मासेमारीचे केंद्र आहे. कॉड दर हिवाळ्यात अंडी घालण्यासाठी लोफोटन इथे स्थलांतरित होतात. या ठिकाणचे पाणी हे युरोपमधील सर्वात श्रीमंत मासेमारी क्षेत्रांपैकी एक आहे. कारण अटलांटिक महासागरातील बहुतेक कॉड हिवाळ्यात लोफोटनच्या किनारी पाण्यात अंडी घालतात. इथल्या ट्रेडिशनल रेड फिशरमॅनची केबिन्स ही सुरुवातीच्या काळात ठराविक हंगामापुरती बांधली जात असत. इथे संपूर्ण नॉर्वेमधून मच्छिमार येत आणि कॉड हंगामात फिशिंग करण्यासाठी इथे राहत असत. या नैसर्गिक घटनेने या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला आणि इथल्या संस्कृतीला आकार दिला आहे. शिवाय लोफोटनमध्ये समुद्री गरुड, कॉर्मोरंटस्, इतर समुद्री पक्षी आणि रंगीबेरंगी पफीन आढळतात. इथे असणारे हे एका अक्षराचे गाव E10 या महामार्गाच्या शेवटी आहे. या ठिकाणाचे नाव हे जगातल्या सर्वात लहान नावांपैकी एक आहे. ओल्ड नॉर्स मध्ये याचा शब्दशः अर्थ प्रवाह असा होतो. इथे तुम्हाला उन्हाळ्यात 24 तासांचा दिवस आणि हिवाळ्यात 24 तासांची रात्र अनुभवता येते. पण या भौगोलिक घटनेचा इथल्या माणसांच्या राहणीमानावर परिणाम होतो. इथली लोकं सीझनल मूड शिफ्ट्स आणि त्या त्या काळात त्यांच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीज् मधल्या बदलांना सामोरे जातात. बोर्गजवळ पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका वायकिंग सरदाराचे मोठ्ठे घर सापडले आहे. या घराची लांबी 83 मीटर्स म्हणजे 272 फूट इतकी आहे. आता हे घर लोफोटन वायकिंग म्युझियमचा एक भाग आहे. या म्युझियममध्ये लोहयुग आणि वायकिंग युगातले अनेक पुरावे जतन केलेले आहेत. लोफोटनच्या काही भागात चुंबकीय अनियमितता आहेत. त्या हे पर्वत मिनरल रिच म्हणजेच खानिजसमृद्ध असल्यामुळे आहेत असं म्हटलं जातं. इथल्या अनस्टड बीचवर वेट सूट घालून कोल्ड वॉटर सर्फिंग करता येतं. इथे दरवर्षी आर्क्टिक सर्फ फेस्टिव्हल नावाचा वार्षिक कार्यक्रम असतो आणि यावेळी तुम्हाला आर्क्टिक सर्कलवर सर्फिंग करता येतं. या आयलंडवर आपल्याला झपाट्याने होणारे वातावरणातले बदल अनुभवता येतात. इथे हिवाळ्याच्या दिवसांत नॉर्दन लाईट्स पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून जातात. त्यावेळी इथली प्रकाशयोजना क्षणाक्षणाला बदलते. ही गोष्ट कलाकारांना आणि फोटोग्राफर्सना वेड लावते. एका क्षणाला वादळी वातावरण असते तर दुसऱ्याच क्षणी सोनेरी प्रकाश... लोकं अचंबित होऊन हा निसर्गाचा सोहळा बघत राहतात. अशा या अजब ठिकाणाला तुम्हालाही भेट द्यायची असेल तर वीणा वर्ल्डच्या ‘ऑल ऑफ स्कँडिनेव्हिया’ टूरवर चला.
ट्रॅव्हलिंग इज पॅशन!
मी जीवरेखा कुलकर्णी, मीरा रोडला राहते. वीणा वर्ल्डसोबत गेली बारा वर्षं प्रवास करते आहे. मी आधी बोरिवली ऑफिसमधून टूर्स बूक करायचे. गेली काही वर्षं आमच्या जवळ झालेल्या मीरा रोडच्या ऑफिसमधून बुकिंग करते. माझी पहिली टूर मी 2014 साली केली ती म्हणजे थायलंड. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या 21 टूर्स झाल्या आहेत. काही टूर्स फॅमिलीसोबत सुद्धा केल्या, पण मिस्टर वर्किंग असल्याने आम्ही कायम एकत्र टूर करू शकत नाही. आणि फिरणं हे माझं पॅशन आहे. म्हणून मी वुमन्स स्पेशल हा पर्याय निवडला. तेव्हापासून आजपर्यंत मी 12-13 तरी वुमन्स स्पेशल टूर्स केल्या आहेत. मी थायलंड, सिंगापूर, मलेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, बाली, मॉरिशस, भूतान, श्रीलंका, मालदीव्ज, युरोप 9 दिवसांत 9 देश अशा परदेशातल्या टूर्स केल्या आहेत, तर रण उत्सव, मारवाड मेवाड राजस्थान, अंदमान, मध्य प्रदेश, वाराणसी अलाहाबाद, धरमशाला डलहौसी अशा भारतातल्या टूर्स केल्या आहेत. मी वीणा वर्ल्ड सोबत टूर करते, कारण ते बहुतेक सर्व महत्त्वाची ठिकाणं कव्हर करतात. मी शक्यतो बाहेरच्या देशांमध्ये फिरायला जाणं पसंत करते. कारण या टूर्सवर आपण पूर्णपणे नवीन, वेगळं, एक्सायटिंग काहीतरी रोज बघत असतो. नवीन पदार्थांची चव बघत असतो. असं हे सतत नवीन ठिकाणं पाहणं, नवीन अनुभव घेणं, वेगळ्या देशात वेगळ्या वातावरणात जाणं मला मनापासून आवडतं. तिथे खास आमच्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटीज् आम्हाला एकदम स्पेशल फील देतात. माझ्या काही टूर्सवर वीणा ताई सुद्धा आमच्यासोबत होत्या. मी कुटुंबासोबतही फिरायला जाते, पण एकटी गेल्यावर जे फ्रीडम मिळतं, जबाबदारी नसते कसली असं मोकळं फिरायला मला जास्त आवडतं. कारण अशा वेळी तुम्हाला तुमची स्वतःची स्पेस मिळते. आजवरच्या टूर्समध्ये मला अनेक ठिकाणं आवडली. स्वच्छ, नितळ असा मॉलदीव्ज् बीच खूप आवडला. बेस्ट आहे तो. युरोप त्याच्या डायव्हर्सिटीमुळे आवडला. अर्थात 9 दिवसांत 9 देश पाहणं तसं हेक्टिक होतं, पण आवडलं ते पण. शिवाय मॉरिशस आवडला, अंदमानची टूर आवडली. मला बीचेस जास्त आवडतात त्यामुळे तसं एक्सपोजर असलेल्या सगळ्याच टूर्स लक्षात राहिल्यात. शिवाय लक्झुरिअस एक्सपिरिअन्स म्हणून सिंगापूरची केलेली टूर लक्षात राहिली. अशा अनेक टूर्स वेगवेगळ्या कारणांमुळे माझ्यासाठी खास आहेत. माझ्या वर्षभरात किमान 1-2 टूर्स तरी होतात. मी वीणा वर्ल्ड सोबत जाते, कारण मला ते कम्फर्टेबल वाटतं. त्यांच्या ऑफिस स्टाफपासून टूर मॅनेजर्सपर्यंत सगळेच को ऑपरेटिव्ह आहेत. त्यामुळे मी फक्त मला सुटेबल डेट्स आणि डेस्टिनेशन ठरवते आणि बाकी सगळं वीणा वर्ल्ड वर सोपवून निर्धास्तपणे जाते. आता माझं पुढचं ड्रीम डेस्टिनेशन आहे अमेरिका आणि मी ते लवकरच प्लॅन करणार आहे.
द ग्रेट मायग्रेशन
हे जगातील सर्वात मोठे प्राण्यांचे स्थलांतर मानले जाते. जवळपास पंधरा लाखांपेक्षा जास्त विल्डंबीस्टस्, तीन लाख झेब्रे आणि लाखो हरीणं या काळात टांझानियातील सेरेंगेटी आणि केनियातील मसाई मारा ओलांडून वर्तुळाकर मार्गाने भ्रमण करतात. हा मायग्रेशन रूट सुमारे 800 ते 1,000 किलोमीटर लांबीचा आहे. हा पावसाच्या पॅटर्नमुळे आणि ताज्या चराऊ कुरणांमुळे तयार झाला आहे. हे स्थलांतर म्हणजे सिंह, बिबट्या, चित्ता, तरस, मगरी या प्राण्यांसाठी मेजवानी आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये दररोज हजारो विल्डंबीस्टस् पिल्लेे जन्माला येतात. याचा मांसभक्षी प्राणी फायदा घेतात. प्राण्यांचा प्रसूतीकाळ, रुटिंग, प्रवासातील नाट्य अनुभवण्यासारखे असते. विल्डंबीस्टस्, झेब्रा, हरीण हे प्राणी इतर प्राण्यांना धोक्याची सूचना देतात. शिकार, उपासमार, थकवा आणि बुडण्यामुळे दरवर्षी सुमारे 250,000 प्राणी मृत्यू पावतात. मेल्स वर्चस्वासाठी एकमेकांशी लढतात. या गवताळ भागात वासावरून विल्डंबीस्टस्ना पावसाची चाहूल लागते आणि वादळांचे संकेतही मिळतात. हे पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणं म्हणजे टांझानियातील सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान, ग्रुमेटी रिझर्व्ह आणि नॉर्दन सेरेंगेटी आणि मसाई मारा. मग तुम्ही कधी जाताय हे ग्रेट मायग्रेशन बघायला ?
प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्
व्हिएतनाम - एक ट्रेंडिंग हॉलिडे डेस्टिनेशन
निसर्गसौंदर्य, कल्चर आणि ॲडव्हेंचरने भरलेला देश म्हणजे व्हिएतनाम. शॉर्ट हॉल फ्लाइट आणि सोप्पी व्हिसा प्रोसेस असलेला हा अफलातून देश, तुमच्या समर हॉलिडेसाठी एक परफेक्ट ठिकाण ठरू शकतो.
हॅनोई आणि हॅलाँग
हॅलाँग बे मध्ये ओव्हरनाईट क्रूझवर गुरमे डायनिंग, ऑनबोर्ड स्पा आणि फ्लोटिंग व्हिलेजेसच्या प्रायव्हेट एक्सकर्झन्सचा अनुभव घ्या.
हॅलाँग बे मध्ये लाईमस्टोनच्या डोंगरांमधून कयाकिंग ॲडव्हेंचरचा आनंद घ्या.
हॅलाँग बे मध्येच डे, ओव्हरनाईट, पार्टी, लक्झरी अशा विविध प्रकारच्या क्रूझेसचा पर्याय उपलब्ध आहे.
निन बिन इथे एक डे ट्रिप घेऊन हिरव्यागार राईस पॅडीजमधून वळण घेत जाणाऱ्या न्गो डोंग नदीवर बोटिंगचा अनुभव घ्या.
विंटेज व्हेस्पावर गाईडसोबत हॅनोईची नाईटलाईफ व स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करा.
ट्रेडिशनल वॉटर पपेट शो पाहून व्हिएतनामी लोककथांचा आनंद घ्या.
हॅनोइ ट्रेन स्ट्रीट वर बसून अनोख्या एग कॉफीचा आस्वाद घेत ट्रेन अगदी तुमच्या बाजूने धावत असल्याचा अनुभव घ्या.
होई आन आणि दा नांग
होई आनच्या एन्शियंट टाऊनमध्ये सायकलिंग करत त्याचं सौंदर्य अनुभवा.
लोकल कारागिरांकडून लँटर्नमेकिंग शिका.
जिप टूरद्वारे मिस्टिकल मार्बल माऊंटन्स एक्सप्लोअर करा.
बांबू बास्केट बोटीतून बे माऊ कोकोनट फॉरेस्टमध्ये भटकंती करा.
होई आन नदीवर कंदिलांनी सजलेली सुंदर बोट राईड घ्या.
दा नांगमधील ड्रॅगन ब्रिजवर वीकएंड्सना होणारा फायर ॲण्ड वॉटर शो पहा.
दा नांग इथून चॅम आयलंडवर स्पीडबोटने जाऊन स्नॉर्कलिंगचा अनुभव घ्या.
फु क्वोक आयलंड
पायनॅपल आयलंडला जाण्यासाठी जगातील सर्वात लांब समुद्र ओलांडणाऱ्या केबल कारने प्रवास करा.
इटालियन आर्किटेक्चर आणि कॅफेज्साठी प्रसिद्ध असलेल्या सनसेट टाऊन मध्ये रहा.
विनपर्ल सफारी, विन वंडर्स आणि ग्रँड वर्ल्डसारख्या आकर्षणांना भेट द्या.
स्कूबा डायविंग किंवा सी-वॉकद्वारे समुद्रातील कोरल गार्डन आणि रंगीबेरंगी मरीन लाईफ एक्सप्लोअर करा.
फु क्वोक नाईट मार्केटमध्ये ग्रिल्ड सीफूड आणि शॉपिंगचा आनंद घ्या.
आयलंड हॉपिंग, स्नॉर्कलिंग करा आणि सुंदर बीचेसवर रिलॅक्स व्हा. हो ची मिन सिटी
कु ची टनल्समध्ये व्हिएत काँगच्या भूमिगत जगाचा शोध घ्या, उदा. गुप्त दरवाजे, बंकर्स, इ. इथे रायफल शूटिंगचादेखील अनुभव घ्या.
मुइ ने इथले लाल व पांढरे सॅण्ड ड्यून्स पाहण्यासाठी डे ट्रिप घ्या. क्रिएटिव्ह कॅफे अपार्टमेंट बिल्डिंगला भेट द्या.
बेन थान मार्केट व इतर लोकल क्राफ्ट मार्केट्समध्ये सुव्हिनीयर शॉपिंग करा.
चला तर मग, ह्या समर व्हेकेशनमध्ये व्हिएतनामचा भन्नाट अनुभव घ्यायला, वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत. आजच आपला प्रायव्हेट हॉलिडे प्लॅन करा!
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्साठी आजच संपर्क साधा: 1800 22 7979 l customizedholidays@veenaworld.com
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.