Published in the Sunday Sakal on 06 October, 2024
सदर्न युरोपमधील आकाराने सर्वात मोठा देश असलेला स्पेन इतिहासकाळात जगभरातल्या वसाहतींचा मालक होता. त्यामुळेच बहुदा या देशात मायग्रेंट्स म्हणजे स्थलांतरीतांची संख्या इतकी जास्त आहे की जगात मायग्रेशनच्या बाबतीत यु.एस.ए. नंतर स्पेनचाच क्रमांक लागतो. आज युनेस्कोच्या विश्व वारसा यादीत सर्वात जास्त वास्तू असलेला देश म्हणून स्पेन ओळखला जातो. या देशातील बार्सेलोना हे जगभरातील अतिपुरातन शहरांपैकी एक आहे. असं सांगतात की रोमची स्थापना होण्याच्या 400 वर्षे आधी हर्क्युलसने बार्सेलोना वसवले. भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहराच्या हद्दीत एकूण सात बीचेस आहेत. मात्र या शहरातील सर्वात मोठं आकर्षण आहे एक रस्ता ! पटकन विश्वास ठेवणं कठिण जातं ना ? पण या रस्त्याला वर्षाला सात-साडेसात कोटी लोक भेट देतात, या रस्त्याचं नाव आहे ‘ला राम्बला. हा एक तिहेरी पादचारी मार्ग आहे. मात्र या फक्त अर्धा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं आकर्षण जगभरातील पर्यटकांना बार्सेलोनाकडे खेचून आणतं. इथल्या पर्यटकांप्रमाणेच स्थानिकांसाठीही हा रस्ता विरंगुळ्याचं ठिकाण आहे.
हा रस्ता प्लाझा दे कातालुन्या या भव्य चौकाला येऊन मिळतो. खरंतर हा एकच रस्ता नाही, काही लहान लहान रस्ते मिळून हा तयार होतो म्हणून स्पॅनिश भाषेत अनेकदा याचा उल्लेख ‘लास राम्बालास’ असा अनेकवचनी केला जातो. 15 व्या शतकापासून हा रस्ता या शहराच्या वर्दळीचा भाग आहे. आज इथे जी झाडे दिसतात ती 18-19व्या शतकापासून लावायला सुरुवात झाली. या ठिकाणी मूळात पाणी वाहून जाण्याचा चर होता, म्हणून आता या रस्त्यावरच्या लाद्यांचं डिझाइन वाहत्या पाण्यासारखं आहे. या रस्त्यावर काही कलाकृतीही आहेत, शिल्पकार होआन मिरो याने तयार केलेलं एक मोझाइक लोकांचं लक्ष वेधून घेतं. याच रस्त्याच्या वरच्या भागात ‘फॉन्त दे कॅनालेटेस’ हे 1892 मध्ये बसवलेलं कारंजं आहे. या नक्षिदार कारंज्याच्या मध्यभागी लॅम्पपोस्ट आहे. इथे लिहिल्याप्रमाणे जो कोणी या कारंज्याचे पाणी पितो तो पुन्हा परत बार्सेलोनाला येतोच. या रस्त्यावर ‘पॅलेस ऑफ द व्हिरेइना’ आणि ‘एल लिसेऊ’ हे बार्सेलोनामधील सर्वात पुरातन ऑपेरा थिएटरही आहे. या रस्त्यावर चित्रकार, नकलाकार, माइम आर्टिस्ट असे कलाकार आपली कला प्रदर्शित करीत असतात. छोट्या छोट्या दुकानांमधून पर्यटकांना मोहवणाऱ्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या असतात, खाद्यपदार्थांचे कॅफे-बार सुद्धा आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वेळ कसा जातो कळत नाही. साहजिकच रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर लोकांची ये-जा सुरू असते.
'ला राम्बला' ह्या जगातल्या एका मोस्ट हॅपनिंग रस्त्याला भेट देण्यासाठी वीणा वर्ल्डच्या स्पेन टूरवर जायलाच हवं, नाही का.
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन
100 Country Club
पर्यटनाची मॅरेथॉन...
गेली अनेक वर्षे मी जगभरात अगदी आवडीने पर्यटन करत आहे. वेगवेगळ्या देशांमधील अनोखी संस्कृती, रोमांचक इतिहास आणि अनुपम निसर्गसौंदर्य बघण्यासाठी मी 40 देशांना भेट दिली आहे. मी स्वतः एक उत्तम ॲथलीट आहे. आज वयाच्या 67 व्या वर्षीही मॅरेथॉनमध्ये भाग घेते. त्यामुळे मला वाटतं की मी जगपर्यटनाचीही मॅरेथॉनच करते आहे. माझ्या या पर्यटनासाठी मला वीणा वर्ल्डसारखा अनुभवी आणि आतिथ्यशिल सोबती लाभला आहे. त्यामुळेच तर 2015 पासून मी देशात किंवा परदेशात वीणा वर्ल्डबरोबरच फिरते. पर्यटनाचा आणखी एक फायदा म्हणजे मला त्याबरोबरच माझा फोटोग्राफीचा छंदही जोपासता येतो. मला माझ्या मोबाईलमध्ये मी जिथे जाते तिथलं निसर्गसौंदर्य टिपायला खूप आवडतं.
या गोष्टीचा मला एकदा फायदाही झाला होता. ती 2017 मधली नेपाळ टूर होती. त्या टूरवर एअरपोर्टवर मला शेवटचा ग्रुप-फोटो घ्यायचा होता. आमच्या टूर मॅनेजरने सगळ्या ग्रुपला तशी रिक्वेस्ट केली. पण मला माझा फोनच सापडेना. जवळच्या बॅगमध्ये मिळाला नाही, वाटलं चेक-इन लगेजमध्ये गेला काय. तिथला अधिकारी को-ऑपरेटिव्ह होता, त्याने चेक-इन केलेल्या बॅग्ज आणून दिल्या, पण त्यातही फोन मिळाला नाही. ज्या हॉटेलमधून आम्ही आलो तिथे फोन करून चौकशी केली तर तिकडेही मिळाला नाही. या शोधाशोधीत आमच्या बसचा ड्रायव्हर अखेर माझा बसमध्ये राहिलेला फोन घेऊन आला, आम्हाला सोडून तो जवळ जवळ 25 किलोमीटर दूर गेला होता, पण प्रामाणिकपणे माझा फोन परत करायला आला. जर मी ग्रुप फोटोचा हट्ट धरला नसता तर कदाचित फोन जवळ नाही हे मला भारतात परत आल्यावरच कळलं असतं, तात्पर्य काय तर फोन कायम जवळ हवा आणि फोटो काढत राहिलं पाहिजे !
मी पाहिलेल्या ठिकाणांमध्ये मला आइसलँड तिथल्या वोल्कॅनोज्मुळे, साऊथ आफ्रिका तिथल्या वन्यजीवनामुळे आणि भारतातलं स्पिती तिथल्या अनोख्या निसर्गामुळे विशेष आवडलं आहे. हा लेख तुम्ही वाचत असताना मी वीणा वर्ल्डसोबत ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सहलीची मजा लुटत असेन. पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्ये मी पुन्हा एकदा गुजरातला भेट देणार आहे. जपान आणि कोरिया हे देश माझ्या ट्रॅव्हल मिशनमध्ये आता अग्रक्रमावर आहेत.
काय बार्इ खाऊ कसं गं खाऊ!
साउथ ईस्ट एशियातला ‘ट्रुली एशियाम्हणून मिरवणारा देश म्हणजे ‘मलेशिया. बहुवांशिक आणि बहुसांस्कृतिक मलेशियात मलय, चायनिज आणि भारतीय वंशाचे लोक आहेत, त्यामुळे इथल्या खाद्यपदार्थांवर या तिन्ही देशांची छाप पडलेली पहायला मिळते. मलेशियन लोकांनी भारतीय ‘करी’ आणि चायनिज ‘न्यूडल्स’ आपल्याशा केल्या आहेत. भात हा इथल्या लोकांच्या आहाराचा मुख्य घटक आहे, त्यामुळे भारताप्रमाणेच भाताचे अनेक प्रकार मलेशियात पहायला आणि खायला मिळतात. त्यातलाच एक म्हणजे ‘नासि करेबू’. मलय भाषेत नासि म्हणजे भात आणि करेबू म्हणजे सलाड, त्यामुळे हा राइस विथ सलाड असतो. मलेशियाची नॅशनल डिश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘नासि उलम’ सारखाच नासि करेबु आहे मात्र मुख्य फरक नासि करेबुमधल्या भाताच्या रंगाचा असतो. या डिशमधला भात हा जांभळ्या रंगाचा असतो. नासि करेबुच्या भाताला हा जांभळा रंग दिला जातो तो ‘गोकर्णाच’फुले वापरून.
नासि करेबु हा पश्चिम मलेशियाच्या नॉर्थ इस्टर्न किनारपट्टीवरील केलानतान आणि तेरेंगानु या राज्यातला पारंपरिक पदार्थ आहे. हा पदार्थ करताना भात शिजवताना त्यात गोकर्णाची ताजी वा सुकलेली फुले घातली जातात, त्यामुळे भाताला जांभळा रंग येतो. तसेच या भातात गवती चहा, थाई लाइम, आलं आणि ताडाचा गुळ मिसळला जातो. या भाताबरोबर जे सलाड देतात त्याच्यात काकडी, लेट्युस, फ्रेंच बीन्स, वॉटर स्पिनॅच, चवळीची शेंग, पातीचा कांदा, कोबी, बाम्बूचे कोंब, चिली पेप्पर, लाल तिखट असे पदार्थ असतात. हे सलाड परतून किंवा उकडून घेतात. याबरोबर उकडलेले अंड देण्याची पध्दत आहे. रस्त्यावरच्या गाड्यांपासून ते हायएन्ड रेस्टॉरंट्सपर्यंत मलेशियात सगळीकडे नासि करेबु मिळतो.
देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’हा पॉडकास्ट नक्की ऐका.
रोमँटिक हॉलिडे अराउंड द वर्ल्ड
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत
खडकात कोरलेल्या गुहेतील आरामदायी सुखसुविधांनी युक्त असलेल्या रूममधून अवतीभवती विखुरलेल्या फेअरी चिमनीज मागून होणारा सूर्योदय पहाण्याचा रोमँटिक अनुभव... आर्क्टिक सर्कलमधील लॅपलँडच्या अनोख्या परिसरात अतिशय कम्फर्टेबल आणि उबदार अशा ग्लास टॉप्ड इग्लूमध्ये बसून आकाशातले मोहक नॉर्दन लाइट्स बघण्याचा रोमँटिक अनुभव... न्यूझीलंडमधल्या बर्फाच्छादित सदर्न आल्प्सच्या उत्तुंग रांगेचं आणि या पर्वतरांगेतील फ्रँझ जोसेफ ग्लेशियर, माउंट कूक यांचं नयनमोहक दर्शन घडवणारी रोमांचक हेलिकॉप्टर टूर... केनिया किंवा टांझानियामधल्या ग्रासलँड्समधील वाइल्ड लाईफचं हवाई दर्शन घडवणारी थरारक हॉट एअर बलून सफारी...
जगाच्या पाठीवर अनेक देशांमधील असे एकापेक्षा एक रोमँटिक अनुभव तुमची वाट बघत आहेत. हॉलिडे म्हणजे काय तर आपल्या लाडक्या व्यक्तीबरोबर एखाद्या सुंदर ठिकाणी घालवलेलं क्वालिटी टाइम. असं हे क्वालिटी टाइम अधिकच रोमँटिक होतं जेव्हा तुम्ही त्याला एखाद्या अविस्मरणीय अनुभवाची जोड देता. मग त्यासाठी तुम्ही मालदिव्जसारखे बीच डेस्टिनेशन निवडू शकता, म्हणजे ‘सँडबँक’ सारख्या अफलातून जागेवर इंटिमेट पिकनिकचा आनंद लुटता येईल. मॉरिशस निवडलंत तर तिथल्या लक्झरी रिसॉर्टमधल्या बीचफ्रंट व्हिलामध्ये किंवा अनोख्या ग्लास बबल स्टेमध्ये रहाण्याचा अनुभव घेता येईल. रोमांचित करणारा रेल्वे प्रवास अनुभवण्यासाठी स्वित्झर्लंडमधील ग्लेशियर एक्सप्रेसने प्रवास करायलाच हवा. झरमॅट ते सेंट मॉरित्झ हा रेल्वेचा प्रवास जगातला सर्वात नेत्रसुखद प्रवास मानला जातो. या प्रवासात रेल्वे कोचच्या पॅनोरॅमिक खिडक्यांमधून दिसणारे बाहरचे देखावे डोळ्याला मेजवानी असतात तर त्याच वेळी तुम्हाला सर्व्ह केलं जाणारं चवदार जेवण खरोखरच मेजवानीचा आनंद देतं.
आपल्या भारतामध्येही असे वैविध्यपूर्ण रोमँटिक अनुभवांनी सजलेले हॉलिडे तुम्ही अनुभवू शकता. राजस्थानमध्ये तिथल्या रॉयल पॅलेसमध्ये राहून शाही पाहुणचार घेऊ शकता. केरळच्या अथांग बॅकवॉटर्समधल्या प्रायव्हेट हाऊसबोटमध्ये राहून पारंपरिक केरळी पदार्थांची लज्जत चाखू शकता. हिरव्या गर्द अरण्याने भरलेल्या वायनाडच्या डोंगराळ भागात उंच झाडावरच्या ट्री हाऊसमध्ये रहाण्याचा अनुभव तर अगदी जगावेगळा. हिमाचल प्रदेशातील पहाडावर ग्लास डोममध्ये राहिल्यावर रात्री तर दिसणारं चांदण्यांनी भरलेलं आकाश तुम्ही कधीच विसरू शकणार नाही.
जपानमधील ट्रेडिशनल ‘ऱ्योकान मधला स्टे असो किंवा बालीमधल्या तुमच्या प्रायव्हेट पूल व्हिलामधला अनोखा फ्लोटिंग ब्रेकफास्ट असो, ग्रीसमधल्या सागर किनाऱ्यांची सैर घडवणारी प्रायव्हेट यॉट राइड असो... ऑस्ट्रेलियापासून अलास्कापर्यंत जगभरात अनेक ठिकाणी तुम्ही कल्पनेबाहेरचा अप्रतिम रोमँटिक हॉलिडे अनुभवू शकता. तुमच्या ड्रीम हॉलिडेची स्वप्न आम्हाला सांगा, मार्गदर्शनासाठी वीणा वर्ल्डची कस्टमाईज्ड हॉलिडे टीम तयार आहेच.
कुणीतरी...कधीतरी...कुठेतरी
तुम्ही कधी शिमला मॉल रोडवर फेरफटका मारलाय? अहाहा काय तो मस्त अनुभव. मी जेव्हा टूर मॅनेजर म्हणून शिमला मनालीच्या टूर्स करीत होते तेव्हा प्रत्येक टूरमध्ये शिमला मॉल रोडला पर्यटकांना घेऊन जाणं मला खूप आनंद द्यायचं. मी वाट बघायचे शिमला मॉल रोडला जायची. असं मस्त वाटायचं तिथून फेरफटका मारताना, आणि आजही हा मॉल रोड तेवढाच चार्मिंग आहे बरं का. असाच शिमला मॉल रोडचा आनंद मिळायचा किंवा मिळतो नैनिताल, दार्जिलिंग, उटी, मसूरी, पंचमढी, शिलाँग, डलहौसी, कोडाईकनाल, माथेरान आदि हिलस्टेशन्सच्या मॉल रोडवर किंवा मेन मार्केटमध्ये फिरताना. बहुतेक ठिकाणी ह्या मॉलरोडवर कार्स रिक्षा वैगेरे वाहनांना बंदी असते त्यामुळे आपलंच राज्य त्या रस्त्यांवर. अगदी निर्धास्तपणे फिरायला मिळतं. ब्रिटिशांनी शंभर दिडशे वर्ष आपल्यावर राज्य केलं, अक्षरश: लुटलं आपल्याला. पण काही चांगल्या गोष्टी ते सोडून गेले त्यातलीच ही काही हिलस्टेशन्स. कोलोनियल स्टाइलने बांधलेली, एका आगळ्या वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी ही हिलस्टेशन्स ब्रिटिशांनी बांधली त्यांना उन्हाळा सहन व्हायचा नाही म्हणून. आज आपल्यालाही उन्हाळ्यात अंगाची लाही होत असताना हीच हिलस्टेशन्स शांत निवांत आणि थंड करतात.
दिल्लीतील राष्ट्रपती भवन बघण्याची इच्छा आपल्या प्रत्येकालाच असते. हे भवनसुद्धा बांधलं गेलं ब्रिटीशांच्या काळात व्हॉइसरॉय हाऊस म्हणून. तीनशे वीस एकर्समध्ये पसरलेलं, तीनशे चाळीस रूम्स आणि अनेक मोठी दालनं असलेलं हे आपल्या राष्ट्रपतींचं निवास्थान जगातलं दुसऱ्या नंबरचं मोठं निवासस्थान आहे कोणत्याही हेड ऑफ स्टेटसाठीचं. पहिलं इटलीत आहे. अशीच एक अप्रतीम देखणी भव्य वास्तू ते देऊन गेले ते म्हणजे कोलकाताचं व्हिक्टोरिया मेमोरियल. दिल्लीचं संसद भवन वा मुंबईचं गेट वे ऑफ इंडिया ह्या भव्यदिव्य लँडमार्क्स सोबत मुंबई कोलकाता चेन्नई बंगळुरूसारख्या शहरांची रचनासुद्धा ब्रिटिश काळात केली गेली. युएसए रशिया चायना नंतर जगात चौथ्या नंबरवर असलेलं आपल्या भारतीय रेल्वेचं अवाढव्य जाळं ही सुद्धा ब्रिटिशांनी केलेली सुरुवात. नव्या जगासाठी आवश्यक असणारी ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टिम, रोड्स, शाळा, मॉडर्न एज्युकेशन सिस्टिम, हॉस्पिटल्स, जगासोबतचं ट्रेड नेटवर्क, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट सिस्टिम, इंडस्ट्रिलायझेशन, अशा अनेक गोष्टी सुरू करून ते गेले. म्हणजे हे करताना त्यांनी स्वतः प्रचंड फायदा घेतला ही गोष्ट वेगळी. त्यावर अगदी प्रखर मतांतरं असतील, पण इतिहास आपण बदलू शकत नाही, त्यावरून शिकू मात्र शकतो. त्यामुळे आपल्या फायद्यांकडे आपण बघूया. आपल्या शत्रुलाही कधी धन्यवाद देण्याइतकं मोठं मन आहे आपल्या भारतीयांचं, त्याप्रमाणे त्यांना थँक्यू म्हणूया.
शहाजहानने बांधलेला दिल्लीचा लाल किल्ला आणि आग्राचा ताजमहाल, रजपूतांची देन म्हणजे जोधपूरचा मेहरानगड फोर्ट, जैसलमेरचा गोल्डन फोर्ट, जयपूरचा आमेर फोर्ट, चित्तोडचा चित्तोडगड, कुंभलगड फोर्ट, हैद्राबादच्या निझामचा फलकनुमा पॅलेस, हंपीच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स, ग्वालियर फोर्ट, खजुराओ टेम्पल्स, कोनार्क सन टेम्पल, सांची स्तुपा, औरंगाबादचे अजिंठा एलोरा केव्हज्, लेहची थिकसे मॉनेस्ट्री, मदुराइचं मिनाक्षी अम्मन टेम्पल, नालंदा युनिव्हर्सिटीचे अवशेष, व्हिक्टोरिया टर्मिनस मुंबई.... हे पान अपुरं पडेल आपल्याला आपल्या पुर्वजांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलेल्या ह्या संपत्तीचा नुस्ता नामोल्लेख करायला. कधी सम्राट अशोक असेल तर कधी एखादा मोगल बादशहा, कधी छत्रपती शिवाजी महाराज असतील तर कधी चंडेला डायनॅस्टी, कधी महाराजा वड्डीयार असतील तर कधी पांडियन राज्यकर्ते. प्रत्येकाने असं काहीतरी येणाऱ्या पिढ्यांसाठी तयार करून ठेवलंय की आपण त्यांचे शतश: ऋणी असलं पाहिजे.
मुंबईत एकदा एक मोठ्ठं ट्रॅव्हल एक्झिबिशन भरलं होतं. भारतातूनच नव्हे तर जगभरातून अनेक ट्रॅव्हल एजंट्स मुंबईत दाखल झाले होते. आमच्या ऑफिसमध्येही दररोज भरपूर गर्दी असायची. आम्हाला एकमेकांना भेटण्यासाठी खासकरून वीणा वर्ल्ड टीमला आपल्या भारतातल्या आणि जगातल्या सर्व असोसिएट्सना भेटण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असते. काश्मीरला आम्ही भरपूर संख्येने पर्यटक घेऊन जात असल्याने एक दिवस तर आमचं ऑफिस सर्व काश्मीरी हॉटेलियर्स, ट्रान्सपोर्टर्स, रेस्टॉरंटीयर्सनी भरून गेलं होतं. सगळेच म्हणतात काश्मीर आता मस्त झालंय, एकदम कायापालट. अर्थात आम्ही ह्याचा अनुभव गेली पाच सहा वर्ष घेतो आहोतच पण आमच्या काश्मीरी पार्टनर्सना याबद्द्ल काय वाटतंय ते आजमावूया म्हणून त्यांना आलटून पालटून मी एकच प्रश्न विचारत होते की, ‘कैसा है कश्मीर? सच मे कुछ बदलाव आपको लग रहा है? कुछ अच्छा हो रहा है या जैसे थे?’ मला लिहितानाही आनंद होतोय तो म्हणजे आमच्या काश्मीरी पार्टनर्सच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आनंददायी होत्या. ’सच बताऊँ यहाँ गव्हर्मेंट नहीं होगा तो भी चलेगा, सेंटर से ही कंट्रोल करने दो’, ’बहुत बढ़िया चल रहा है , अभी कोई दिक्कत ही नहीं है’, ’काम बढ़ गया है, यूथ काम में जूट गया है, अभी वह स्टोन पेल्टिंगवाले मामले ख़त्म’ ‘मोदी को मानना पडेगा‘, ‘दल लेक आप पहचान नहीं पाओगे ऐसा बदल गया है..... ह्या काही प्रतिक्रिया जशाच्या तशा. काश्मीरमधल्या प्रगतीचा हा आलेख असाच उंचावत राहिला तर भविष्यातल्या अनेक पिढ्या दुवा देतील ह्या सरकारला आणि काश्मीर जगातलं एक अव्वल नंबरचं टूरिस्ट डेस्टिनेशन बनेल. सरकारचे प्रयत्न सुरू आहेतच, आपण सदिच्छा तर नक्कीच देऊ शकतो.
कोविडमध्ये आपण न भूतो: अशा परिस्थितीला सामोरे गेलो. पैशाची आवक थांबली होती आणि घरांचे हप्ते डोक्यावर होते. थोडी सवलत मिळाली बँकांकडून पण त्यावेळी ज्यांची स्वत:ची घरं होती मग ती स्वकमाईने घेतलेली किंवा आईवडिलांकडून वा वडिलोपार्जित चालून आलेली असतील ती मंडळी इतरांपेक्षा बऱ्यापैकी चिंतामुक्त होती. मला खात्री आहे की त्यांनी त्यासाठी आपल्या आईवडिलांना धन्यवाद दिले असतील. आणि नसतील तर आत्ताही द्यायला हरकत नाही. थँक्यू म्हणायला इट्स नेव्हर टू लेट. अर्थात ज्यांच्याकडे ही मालमत्ता नव्हती त्यांनी आईवडिलांना वा बापजाद्यांना दुषणं द्यायची गरज नाही बरं का. प्रत्येकजण आपल्यापरीने पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी खस्ता काढत असतो. ज्याला जमेल झेपेल तसं प्रत्येकजण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्यालाही ते करायचंय.
सध्या नवनवीन विचार कानावर येऊन आदळत असतात. काय म्हणे, ‘आम्ही ठरवलंय मुलं होऊ द्यायची नाहीत‘. काहींचा त्या पाठचा विचार स्तुत्य असेलही किंवा त्याची काही जबर कारणंही असतील, मला मात्र जनरली हा खूपच स्वार्थी विचार वाटतो. आपण जन्माला आलो आणि आयुष्याची मजा चाखतोय नं. मग आपला धर्म बनतोय नवा जीव ह्या जगात आणण्याचा आणि त्यालाही ह्या आयुष्याचा आनंद मिळवून द्यायचा. आणि एकच नव्हे तर किमान दोन. आहे की नाही अशी काही पॉलिसी माहीत नाही. पण सरकारने दुसऱ्या मुलासाठी काही सवलती ठेवायला पाहिजेत. आपला भारत देश सतत तरुण असला पाहिजे. सध्याचं भारतीयांचं सरासरी वय आहे 28 वर्ष. तेच युरोपमध्ये 45 ते 50 वर्ष आहे तर इंग्लंडमध्ये 40 वर्ष, जपानमध्ये 50 वर्ष, ऑस्ट्रेलियामध्ये 38, कॅनडात 41 वर्ष, चायना 40, युएसए 35 वर्ष, पाकिस्तानात ते 22 वर्ष तर अफगानिस्तानात 19 वर्ष, आफ्रिकेत 20 ते 25. म्हणजेच युके युरोप युएसए म्हातारे झालेयत. आपण तसे बरे आहोत पण आपले शेजारी देश आपल्यापेक्षा तरुण आहेत. देशाची शक्ती ही तरुणांवर अवलंबून आहे आणि ह्या तारुण्यात भर टाकण्याचं काम आपल्याला करायचंय जेणेकरून पुढच्या पिढ्या आपल्याला दुवा देतील.
एकदा मलेशियन एअरलाइन्स चे साऊथ ईस्ट एशिया मिडल ईस्ट आणि आफ्रिका सांभाळणारे रीजनल मॅनेजर श्री अमित मेहता आणि वेस्टर्न इंडियाचे सेल्स मॅनेजर एम कृष्णासोबत दुपारचं जेवण घेत होतो. बऱ्याच गप्पा झाल्या. मुंबईचा ट्रॅफिक, त्यात जाणारा वेळ, लोकांना होणारा त्रास ह्यावर संभाषण आलं. त्रासांचे पाढे वाचून झाल्यावर श्री अमित म्हणाले, ’मी रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही हात जोडून देवाला थँक्यू म्हणतो आजचा दिवस दिल्याबद्दल’. खरंच आहे ते. वुई ऑल शूड बी ग्रेटफुल फॉर इव्हरी मोमेंट.
मुंबईचा ट्रॅफिक खरंच अनप्रेडिक्टेबल झालाय. आम्ही ऑफिसमधून कधी पंधरा मिनिटात घरी पोहोचतो तर कधी तासभरही लागतो सगळीकडच्या खोदकामामुळे. कंटाळा येतो त्या ट्रॅफिकमध्ये पण मग रस्त्यावर ठिकठिकाणी लागलेली एक पाटी दिसते आणि मी स्वत:ला शांत करते. ’मुंबई के उज्ज्वल भविष्य के लिए’.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
वीणा वर्ल्ड
ट्रॅव्हल कॉन्टेस्ट
हा QR कोड scan करून वीणा वर्ल्ड वेबसाईटवर ह्या मंगळवार पर्यंत उत्तरं द्या. लकी विनर बना आणि इन्दौर उज्जैन मांडू (STUM) टूर फ्री मिळवा.दर आठवड्याला एक लकी विनर काढला जाईल आणि ह्या ठिकाणी विनरचे नाव जाहीर केले जाईल.
प्रश्न 1 - टेस्ट क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज कोण होता?
प्रश्न 2 - 'बबल टी' सर्वप्रथम कोणत्या देशात बनवला गेला?
प्रश्न 3 - जगातला सर्वात मोठा एअरपोर्ट कोणता?
प्रश्न 4 - कोणत्या खंडात सर्वाधिक देश आहेत?
प्रश्न 5 - स्टार वॉर्स मध्ये, ल्यूक स्कायवॉकरचे वडील कोण आहेत?
प्रश्न 6 - कलिंग युद्धानंतर कोणत्या मौर्य शासकाने बौद्ध धर्म स्वीकारला?
प्रश्न 7 - वयाच्या 30 व्या वर्षी कोणत्या मॅसेडोनियन शासकाने सर्वात मोठे साम्राज्य निर्माण केले?
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.