युंंगफ्राऊ किंवा ज्याला टॉप ऑफ युरोप म्हटलं जातं किंवा जिथे युरोपमधलं सर्वात उंचावरचं रेल्वे स्टेशन आहे त्या युंगफ्राऊचा समावेश आमच्या स्वित्झर्लंडला जाणार्या आणि तिथे तीन रात्री राहणार्या बहुतेक सर्व टूर्समध्ये आहे. कारण युंगफ्राऊ हे फक्त एक छान छान स्थलदर्शन नाहीये तर ते आहे एक इन्स्पिरेशन. ते आहे एका माणसाने पाहिलेलं स्वप्न, ते आहे आत्मविश्वास आणि अखंड मेहनतीचं फळ. ते आहे एकशे तीस वर्ष एकाच लक्षासाठी काळानुरूप घडत गेलेल्या नावीन्यपूर्ण अत्याधुनिक बदलांचं एक उत्कृष्ट उदाहरण. ते आहे एम्प्लॉयमेंट जनरेट करणारं, जगभरातील पर्यटकांना स्वित्झर्लंडमध्ये खेचणारं, आसपासच्या गावांमध्ये रेल्वेची सुविधा निर्माण करणारं आणि हे सर्व करीत असताना प्रॉफिटमध्ये असणारं व्हेंचर. हायकिंग, ट्रेकिंग, माऊंटेनिअरिंग, रॉक क्लाईंबिंग, स्कीईंग, झोर्बिंग, माऊंटन बाईकिंग, स्नो बोर्डिंग ह्या सगळ्यात स्वीस लोकं पटाईत आणि हे काही शतकांपासून सुरू आहे. विकेंड्सना ही माणसं घरात बसतच नाही. ओटीटी प्लॅटफॉर्म्स वा सोशल मिडिया त्यांना वेडं करीत नाही. माऊंटन्सनी साद घातल्याप्रमाणे ते अक्षरश: धाव घेतात निसर्गाकडे. गेल्या महिन्यात ख्रिसमच्या वेळी सकाळी आम्ही ट्रेन पकडून या युंगफ्राऊकडे निघालो तेव्हा अगदी पाच सात वर्षांच्या मुलांपासून साठच्या पलिकडच्या स्किअर्सनी स्टेशन तुडूंब भरलेलं. स्किईंगचा पूर्ण ड्रेस, पायात स्कि बूट्स, हातात स्की बोर्ड्स आणि पाठीला हॅवरसॅक हा बहुतेक सर्वांचाच पेहेराव. पण त्याहीपेक्षा सर्वात भावला तो त्यांचा उत्साह. त्या सकाळच्या चार पास तासात अशा गाड्याच्या गाड्या भरून लोकं स्वीस आल्प्समध्ये धाव घेत होते. प्रत्येक ठिकाणी एवढ्या टॉप नॉच फॅसिलिटिज होत्या की प्रचंड संख्येने लोक तिथे जात होते तरी कुठेही कोणत्याही स्पॉटला गर्दी जाणवली नाही. क्राऊड मॅनेजमेंट किवा गर्दीचं व्यवस्थापन इतक्या मस्त तर्हेने प्लॅन केलं आहे की हॅट्स ऑफ टू युंगफ्राऊ मॅनेजमेंट आणि त्याचा सिइओ उर्स केसलर आणि त्याच्या टीमला. एक पूर्ण दिवस उर्स सपत्निक आमच्यासोबत होता. मागच्या लेखात तो सर्व वृत्तांत मी दिला आहेच. सो ग्रिन्डलवाल्ड फर्स्टला माउंटन रेस्टॉरंटमध्ये सुधीरचा बर्थ डे सेलिब्रेट करून आम्ही बसलो होतो आणि मी जणू उर्सची मुलाखत घेत होते. १८९३ मध्ये स्वीस इंडस्ट्रियालिस्ट अॅडाल्फ गुयर झेल्लर युंगफ्राऊ रीजनमध्ये हायकिंग करीत होता. आयगर माँक युंगफ्राऊ ह्या ग्लेशियर्सकडे बघताना त्याला कल्पना सुचली की ह्या स्वीस आल्प्समधल्या टॉप ऑप युरोपवर सर्वांना पोहोचता आलं पाहिजे, त्याद्वारे टूरिस्ट आले पाहिजेत. (त्यावेळी युरोपमध्ये टूरिझम सुरू झालं होतं) पहाडांमध्ये टनेल्स करून हे शक्य करता येईल. त्याने स्वत: प्लॅन बनवला, त्याचं महत्व ऑथोरिटीज्ना पटवून पास करून घेतला. पुढच्या तीन वर्षात म्हणजे १८९६ ला कामाला सुरुवात झाली आणि सोळा वर्षांत त्यांनी ही कॉगव्हिल ट्रेनवाली रेल्वे पूर्ण केली. ह्यामध्ये अनेक अडचणी आल्या. पैशाअभावी काम थांबणं, अॅक्सिडंट्स होणं, कामगारांचा संप, गव्हर्मेंटचे रेड फ्लॅग्ज आणि सर्वात दुख:द म्हणजे काम सुरू केल्यानंतर तीन वर्षात झेल्लरचं निधन. त्याचं स्वप्न पूर्णत्वाला पोहोचलेलं त्याने पाहिलंच नाही. अर्थात त्याच्या पुढच्या पिढीने हे काम थांबवलं नाही, ते पुढे नेलं. त्यामुळेच वर्षानुवर्ष स्वीस लोकं आणि पर्यटक त्याचा आनंद घेताहेत. आता युंगफ्राऊ ही लिस्टेड कंपनी आह,े बोर्ड शेअर होर्ल्डर्स सिइओ हे स्ट्रक्चर. आणि त्याचा आताचा सिइओ उर्स केसलर. त्याच मातीत वाढलेला, आपलं सर्व आयुष्य युंगफ्राऊला दिलेला, टप्प्याटप्प्याने प्रगती करीत सिइओ पदावर पोहोचलेला उर्स युंगफ्राऊच्या प्रगतीसाठी मात्र एकदम असमाधानी. खरंतर चांगलं चाललं होतं की, भरभरून टूरिस्ट पोहोचत होते युंगफ्राऊला. पण कॉगव्हिल ट्रेन जास्त वेळ घेेत होती, थोड्या वेळाने कंटाळवाणा होणारा कॉगव्हिल ट्रेनचा प्रवास उर्सने ऑब्झर्व्ह केला होता आणि म्हणून ह्याला सर्वांनाच लवकर पोहोचवायचं होतं युंगफ्राऊला. त्याने मग एअरपोर्टच्या धर्तीवर ग्रिन्डलवाल्ड टर्मिनल स्टेशन, तिथून आयगर एक्सप्रेस ही अल्ट्रामॉडर्न केबलकार आयगर ग्लेशियर स्टेशनपर्यंत आणि तिथून युंगफ्राऊ टॉप ऑप युरोप पर्यंत शंभर वर्षाहून अधिक काळ सेवा देणार्या कॉगव्हिल ट्रेनचा छोटा प्रवास हे प्रपोजल तयार केलं. २००८ मध्ये उर्स सिइओ झाला. २०१२ मध्ये त्याने हे टर्मिनल स्टेशन आणि केबलकार प्रस्ताव मांडला आणि २०१८ ला तेे सर्व लोकल्स आणि पर्यटकांसाठी खुलं झालं. ह्या प्रोजेक्टला आठ वर्ष लागली पण त्यातली फक्त अडिच वर्षंच अॅक्चुअल कामाला लागली. बाकीची वर्ष ग्रिन्डलवाल्ड आणि आजूबाजूच्या गावांना मनविण्यात गेली, एकशे पन्नास वेळा त्याने गावातल्या लोकांबरोबर मिटिंग्ज केल्या दुसर्या बाजूला होते त्याचे विरोधक शेअरहोल्डर्स - त्यांच्या दृष्टीने ह्याची गरजच नव्हती. स्टेटस को. आहे ते बरं आहे नं. पण उर्सने हार मानली नाही. गावकरी आणि शेअरहोल्डर्स दोघांनाही त्याने ह्या फ्युचरिस्टिक प्रोजेक्टचं महत्व पटवून दिलं. प्रोजेक्ट अतिशय कमी वेळात पूर्ण केला आणि प्रॉफिटमध्येही आणला. आता शेअरहोल्डर्सही खुश आणि गाववालेही. सर्वांचीच सोय झाली. लोकल व्यवसाय वाढले. टूरिस्टना सोयीचं झालं. एअरपोर्टपेक्षाही सुंदर असं हे ‘टर्मिनल‘ तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला नक्की आवडेल. टर्मिनलहून आयगर ग्लेशिअर स्टेशनला नेणारी जगातली मोस्ट मॉडर्न ट्रायकेबल गंडोला तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि त्यातून दिसणारा माऊंटन्सचा नजारा बघून तुम्ही एकदम खुश होऊन जाल. आमचे टूर मॅनेजर्सही खुश आहेत कारण पर्यटकांचा वेळ वाचला आणि थकवा कमी झाला. युरोपचं सर्वात उंचावरचं पोस्ट ऑफिस, उंचावरचं चॉकलेट शॉप, सर्वात उंचावर असलेलं स्वीस वॉच शॉप, टॉप ऑफ युरोपवरचं स्वत:चं फायर ब्रिगेड, संपूर्ण रीजनमधल्या गावांना वरदान ठरलेलं रेल्वेचं जाळं चालविण्यासाठी स्वत:चं हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, वेल मेंटेन्ड कॉगव्हिल ट्रेन ड्राइव्ह, अवाढव्य टर्मिनल स्टेशन, तेथील हायजिनिक क्लिन ऑटोमेटेड किचन हे सगळं शांतपणे हसत हसत सांभाळणार्या उर्सला विचारलं, ‘हाऊ कॅन यू बी सो ग्रेट अॅन्ड स्टिल डाऊन टू अर्थ? तुझे सिक्रेट मंत्र सांग नं, तेवढीच आम्हाला प्रेरणा’. तो म्हणाला, ‘‘मी ‘हो‘ किंवा ‘नाही‘ हा डिसिजन फास्ट घेतो. ’टू बी ऑर नॉट टू बी’ मध्ये फार काळ अडकून रहात नाही. मी भविष्याकडे बघून निर्णय घेतो, भूतकाळात जात नाही. मी जे काही करतो त्यावर विश्वास ठेवतो आणि ज्यावर माझा विश्वास आहे ते मी करतो. प्रत्येक गोष्ट करताना ज्यांच्यासाठी ते करतोय त्यांचा आणि त्यांच्या सोयींचा विचार करतो. क्वालिटीशी मी कॉम्प्रोमाईज करीत नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी क्वॉलिटी बघतो. भविष्याकाळातील अपेक्षित बदलांचा विचार कायम असतो. जगातून येणार्या कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही वर्षभर युंगफ्राऊ सुरू ठेवतो. नो डाऊन टाईम. हा प्रोजेक्ट बघायला आता अमेरिकन कंपन्यांना इथे यायचंय. टूरिस्ट खूप वाढलेत, हॉटेल्स कमी पडताहेत म्हणून आम्ही स्वित्झर्लंडमध्ये तुम्ही कुठेही रहा, एका दिवसात तुम्हाला युंगफ्राऊ बघता येईल असं मोठं ट्रेनचं जाळं एक्स्पांड करतोय.’’ अबब! ऐकूनच आम्हाला दमायला होत होतं. तेवढ्यात उर्सची पत्नी म्हणाली ‘जवळजवळ सर्व टीम मेंबर्सना उर्स त्यांच्या पहिल्या नावाने ओळखतो.’ आता हद्द झाली होती. उर्सच्या भन्नाट कर्तृत्त्वाचं सिक्रेट त्याच्या शांत स्वभावात, प्रचंड महत्वाकांक्षेत, सर्वांविषयीच्या आदर आणि अनुकंपेत होतं. आजचा दिवस आमच्यासाठी फीस्ट होता सर्वार्थाने. युंगफ्राऊला अॅक्च्युअली टॉप ऑफ युरोपला काय आहे हे मी इथे दिलंच नाहीये. कारण ती जादुई दुनिया तुम्ही तीथे जाऊन पहायचीय. त्याचं वर्णन करून मी तुमच्या आनंदातली स्पॉइलर बनत नाही.
अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...
ज्या देशाने आधुनिक काळात सुमारे २० वर्षे विध्वंसक युध्दाचा दाहक अनुभव घेतला आहे अशा देशामध्ये जाणार्या पर्यटकांना साहजिकच या युध्दाच्या खाणाखुणा जपणारी ठिकाणे हमखास पाहायला मिळतात. आज जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेलं असंच एक युध्द स्मारक साउथ ईस्ट एशियातील पहिल्या सात पर्यटक आकर्षणात जागा मिळवून बसलं आहे आणि ते म्हणजे ‘व्हिएतनाम’ या चिमुकल्या देशातील ‘कू ची टनेल्स’. इंडोचायना पेनिन्सुलातील सर्वात पूर्वेकडचा देश म्हणजे व्हिएतनाम. या निसर्गरम्य देशाला युध्द, सशस्त्र उठाव याचा धगधगता इतिहास लाभलेला आहे.
इतिहासकाळात ‘व्हॅन लँग’ ‘नाम व्हिएत’ ‘डिए व्हिएत’ ‘डिए नाम’ अशा नावांनी ओळखल्या जाणार्या या देशाचे नाव १९४५ पासून ‘व्हिएतनाम’ असे कायम करण्यात आले. जगात सर्वाधिक जैवविविधता असलेल्या ज्या पंचवीस देशांची यादी करण्यात आली आहे, त्यात व्हिएतनामचा समावेश होतो. तांदूळ, काजू, काळी मिरी, चहा कॉफी, रबर यांच्या उत्पादनात व्हिएतनाम आघाडीवर आहे. या देशावर हजारो वर्षे चिनी राजवट असल्याने चिनी संस्कृतीचा ठळक प्रभाव जाणवतो. व्हिएतनामचे भारताशी असलेले नाते म्हणजे भारतातून समुद्रमार्गे आलेला हिंदू धर्म इथे प्राचीन काळी रुजला होता. इथले प्राचीन ‘चाम्पा साम्राज्य’ हे हिंदू धर्मिय, शैवपंथिय राज्य होते. पण तुम्हाला हे माहित आहे का? व्हिएतनामचे यापेक्षा मजबूत नाते आपल्या महाराष्ट्राबरोबर आहे. पन्नासच्या दशकात उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाममधील अंतर्गत संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्यानंतर साउथ व्हिएतनाममधील स्थानिकांनी बलाढ्य अमेरिकन सैन्याशी लढताना चक्क गुरील्ला म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘गनिमी काव्या’चा वापर केला आणि अमेरिकन सैन्याला जेरीला आणलं. याच गुरील्ला युध्दासाठी जमिनी खाली बोगद्यांचे जाळे तयार करण्यात आले. आज हो चि मिन्ह सिटी (सायगांव) मधील कू चि डिस्ट्रिक्टमध्ये या भूयारी मार्गाचा काही भाग पर्यटकांसाठी खुला केलेला पाहायला मिळतो.
साध्या साधनांनी रात्रीच्या अंधारात शत्रुला पत्ता लागू न देता स्थानिकांनी टनेल्सचे इतके विस्तिर्ण जाळे निर्माण केले की त्यात सैन्याला लपण्यासाठी दालने, अन्न, औषधे आणि शस्त्र साठवण्याची जागा, जखमींवरील उपचारासाठी हॉस्पिटल्स, शरणार्थींसाठी रहायला जागा याची सोय होती. या टनेल्समध्ये लपलेले व्हिएतनामी वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे अचानक बाहेर यायचे आणि शत्रुवर जोरदार हल्ला करून परत भुयारात गायब व्हायचे. आज पर्यटक या कू चि टनेल्समधल्या काही भागात प्रवेश करून तो थरार अनुभवू शकतात. आपल्या वीणा वर्ल्डच्या व्हिएतनाम टूर्समध्ये सहभागी होऊन तुम्ही सुध्दा कू चि टनेल्सचा गनिमी कावा अनुभवू शकता.
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन
चला बघुया आपला अतुल्य भारत आणि जगातले अफलातून देश
जग बघायचं किंवा भारतातील राज्य बघायचं मिशन असतं, तसंच युरोप बघण्याचं एक मिशन आहे. छोट्या छोट्या देशांनी मिळून बनलेला युरोप खंड आपण वेस्टर्न, ईस्टर्न, नॉर्दर्न व मेडिटरेनियन युरोप असा विभागून बघू शकतो. ट्रॅव्हल मिशनमध्ये एकावेळी दहा पंधरा देश बघता येतात युरोपमध्ये. म्हणजे बघानं युएसएत आपण पंधरा वीस दिवस गेलो तर आपला एक देश बघून होतो पण आमच्या युरोपीयन ज्वेल्स ह्या पंधरा दिवसांच्या टूरमध्ये आपण बारा देश बघतो. युरोपीयन मॅजिकमध्ये वीस दिवसांत तेरा देश बघता येतात. युरोपला जाणार्या पर्यटकांसाठी सहा दिवसांपासून सत्तावीस दिवसांपर्यंतच्या टूर्स आहेत. ज्यांना जास्त दिवसांच्या, जास्त देशांच्या, जास्त स्थलदर्शनाच्या युरोप टूर्स हव्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही दोन अफलातून टूर्स आणल्या आहेत, त्यातील पहिली टूर आहे सत्तावीस दिवसांची युरोपीयन एक्सप्लोरर. ह्यामध्ये आपण नॉर्थ टू साऊथ युरोप बघतो. ग्लासगो स्कॉटलंडहून सुरू झालेली ही टूर फ्रान्स, बेल्जियम, नेदर्लंड्स, लक्झमबर्ग, स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, लीशटनश्टाईन, इटली, सॅन मारिनो, मोनॅको, व्हॅटिकन असे एकापाठी एक देश बघत स्पेनमध्ये संपते. ह्या टूरमध्ये आपण पंधरा देश आणि एक से एक सुंदर अशा त्रेचाळीस शहरांना भेट देतो. ह्यासारखीच दुसरी टूर आहे स्कॅन्डिनेव्हिया विथ ईस्टर्न युरोप. तेवीस दिवसांच्या ह्या टूरमध्ये आपण नॉर्दन स्कॅन्डिनेव्हियन युरोपसोबत इस्टर्न युरोप कव्हर करतो. डेन्मार्कला ही टूर सुरू होते आणि नॉर्वे स्वीडन फिनलंड इस्टोनिया ह्या देशांना भेट देऊन आपण इस्टर्न युरोपमध्ये प्रवेश करतो आणि तिथे पोलंड, जर्मनी, चेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया, हंगेरी, स्लोव्हेनिया, बॉस्निया, हर्जेगोव्हिना, मॉन्टेनेग्रो करीत क्रोएशियाला संपते. तेवीस दिवसांच्या ह्या सहलीत आपण चौदा देश आणि सत्तावीस शहरं बघतो. ह्या मोठ्या सहलींसोबतच वीणा वर्ल्डकडे वन कंट्री टूर्स आहेत, ज्यांना एका वेळी एक देश बघायचा असतो त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे एकावेळी दोन देश किंवा तीन देशांची लोकप्रिय कॉम्बिनेशन्सही आहेत. सो मंडळी, तुमच्यासाठी आम्ही युरोप वेगवेगळ्या स्वरूपात समोर ठेवलाय. त्यातून तुमच्या आवडीची, सवडीत बसणारी आणि बजेटमध्ये असणारी युरोप टूर निवडा आणि सुरुवात करा युरोप मिशन पूर्णत्वाला न्यायची.
काय बाई खाऊ... कसं गं खाऊ!
जानेवारी महिना सुरू होऊन थंडीची दुलई दाट होऊ लागली की मस्तपैकी चटकदार डीश खायची सुरसुरी येते, आता अशी सुरसुरी पूर्ण करायला खाण्यावर मनापासून प्रेम करणार्या गुजरातकडेच धाव घ्यावी लागणार ना? संक्रांत म्हटल्यावर गुजरातमधले आकाश व्यापून उडणारे पतंग जसे आठवतात त्याचबरोबर वाफाळता, चटकदार उंधियू हमखास आठवतो. या थंडीच्या दिवसात मिळणार्या भाज्या म्हणजे सुरती पापडी, कोनफळं, रताळी, अर्धवट पिकलेली केळी, बटाटे, वांगी, सुरण, तुरीचे दाणे या सगळ्यांच्या मिश्रणातून बनणारा उंधियू म्हणजे गुजरातची सिग्नेचर डिश आहे. ओला नारळ, कोथिंबीर, ओला लसूण, शेंगदाणे याच्या वाटणाने उंधियू रसदार होतो. या उंधियूची चव वाढते ती त्यात घातलेल्या मेथी मुठियांमुळे. ‘उंधू’ म्हणजे गुजराती भाषेत उलटा, पारंपरिक पध्दतीने उंधियू करताना एका मातीच्या भांड्यात सगळ्या भाज्या, मसाला घालून ते उलटे करून जमिनीत गाडले जाते आणि वर आग पेटवून त्या धगीवर उंधीयू शिजवला जातो. पारंपरिक पध्दतीने उंधियू करायचा तर भरपूर वेळ लागतो आणि त्यात तेलाचा वापरही सढळपणे करावा लागतो. त्यामुळे अनेकदा कमी तेलात झटपट उंधियू बनवला जातो. सुरती उंधियू, काठेवाडी उंधियू असे प्रकार गुजरातच्या वेगवेगळ्या भागात बनवले जातात. सुरती उंधियूची ग्रेव्ही हिरव्या रंगाची असते तर काठेवाडी उंधियू अधिक तिखट मसालेदार असतो. काठेवाडी उंधियूबरोबर गरमागरम पुर्या खातात तसेच जिलेबी आणि उंधियू हे कॉम्बिनेशनही लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील ‘पोपटी’ची आठवण करून देणारा उंधियू आता सगळीकडे उपलब्ध झाला आहे. ह्या सिझनमध्ये आपण महाराष्ट्रातही उंधियूची मजा घेत आहोत पण अस्सल गुजराती चवीचा उंधियू ट्राय करायचा असेल तर वीणा वर्ल्डसोबत गुजरात सहल अवश्य करावी. गुजरातच्या सांस्कृतिक वैभवा बरोबरच चवदार खाद्य परंपरेचा आस्वाद घ्यायची संधी अजिबात सोडू नका. देश विदेशातील विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोर सेलिब्रेट लाईफ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.
www.veenaworld.com/podcast
हॅलो गर्ल्स - लेट्स मेक लाइफ मोअर इंटरेस्टिंग!
नव्या वर्षी आनंदाचे नवनवे रंग आम्ही शोधतच असतो. त्या रंगांमधला एक गुलाबी रंग आम्हाला गवसलाय तो आहे वुमन्स डे. आठ मार्च. गेल्यावर्षी एक्केचाळीस ठिकाणी देशविदेशात आम्ही हा दिवस सेलिब्रेट केला महिलांसोबत. ह्यावर्षी आठ मार्चला आम्ही वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल टूर्सवर वुमन्स डे सेलिब्रेट करणार आहोत आपल्या भारतातल्या 14 आणि जगातल्या 25 डेस्टिनेशन्सवर. वीणा वर्ल्डची संपूर्ण टीम आणि टूर मॅनेजर्स सज्ज आहेत महिलांना त्यांच्या आवडीच्या वुमन्स स्पेशल टूर्सवर दे धम्माल उडवून द्यायला. वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल म्हणजे आनंदाचा नवा रंग आणि उत्साहाचं नवं कारंजं. मी म्हणेन की महिलांच्या मनातील सुप्त इच्छांना दिलेलं मूर्त स्वरूप म्हणजे वुमन्स स्पेशल. कुणाला घराचा उंबरठा ओलांडायचा असतो तर कुणाला गावाची वेस, कुणाला राज्याची सीमा पार करायचीय तर कुणाला चक्कं देशाची सरहद्द. कुणाला स्वतःचा नवा कोरा पासपोर्ट काढून त्यावर देशोदेशीच्या शिक्कयांची मोहोर उठवायची असते तर कुणाला एकटीलाच घरातल्या कुणालाही सोबत न घेता आत्मविश्वासाने सोलो ट्रॅव्हलर बनायचं असतं. इथे कधीही मॉडर्न कपडे न घातलेलीला जीन्स, मिनी, गाऊन घालायचा असतो तर कुणाला पहिल्यांदाच स्विमिंग कॉश्च्युम घालून पूलवर किंवा बीचवर मोठ्ठा गॅागल घालून सन लाउंजरवर पहुडायचं असतं. गेली अनेक वर्ष वुमन्स स्पेशलव्दारे आम्ही महिलांच्या अशा अनेक इच्छा पूर्ण केल्यात. महिलांना सप्त खंडाची सैर निर्धास्तपणे करता आली पाहिजे हाच आहे आमचा ध्यास आणि त्याचसाठी करतो आम्ही हा अट्टाहास अगदी मनापासून आनंदाने. ‘मी पण बघितलाय स्टॅच्यु ऑफ युनिटी आणि स्टॅच्यु ऑफ लिबर्टी! मी जाऊन आलेय लंडनच्या टॉवर ब्रीजवर, मी अनुभवलाय जपानचा चेरीब्लॉसम आणि नेदर्लंड्सचे ट्युलिप गार्डन्स, मी सैर केलीय काश्मीरच्या शिकार्यातून आणि व्हेनिसच्या गंडोलातून, मी गेलेय पॅरिसच्या आयफेल टॉवरवर आणि दुबईच्या बुर्ज खलिफावर, मी मनसोक्त डुंबलेय ग्रीसच्या नितळ नीळ्या पाण्यात आणि सनसेट क्रूझ राइड घेतलीय मॉरिशसच्या समुद्रात, मी अनुभवलाय रीव्हर राफ्टींगचा थरार मनालीच्या बियास नदीत आणि बालीच्या आयुंग रीव्हरमध्ये...’ असं आमच्या महिलांना अभिमानाने बोलता आलं पाहिजे हे आहे आमचं महिलांप्रतीचं लक्ष्य, आणि अगदी दररोज ते कुठेनाकुठे पूर्ण होताना दिसतेय. कारण वर्षाच्या कोणत्याही दिवशी वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल कुठेना कुठे विहार करीत असतेच. सो, चलो गर्ल्स! मी म्हणते वर्षाला किमान एक आठवडा स्वत:ला द्या, रीज्युविनेट होऊन आनंदात आयुष्याला सामोरं जा. आणि अंदरकी बात... घरच्यांना सांगू नका बरं मी सांगितलंय, ‘लेट देम मिस यू!’
बुकिंगावधान
जानेवारी ते मार्च हा आपल्या भारतात पर्यटन करण्यासाठी मस्त उत्कृष्ट सीझन. मध्य भारतापासून दक्षिणेकडे आल्हाददायी वातावरण. राजस्थान मस्त गुलाबी थंडीत पहुडलेलं तर हिमाचल आणि काश्मीर बर्फाची शाल पांघरून पर्यटकांच्या स्वागताला उत्सुक. आपला भारत एक असा देश आहे जो ३६५ दिवस पर्यटकांच्या स्वागताला उत्सुक असतो. आणि आता पर्यटकही वर्षभर भ्रमंती करीत असतात. एप्रिल ते जून हा सीझन आहे शाळांच्या सुट्ट्यांचा आणि त्यामुळेच मुलांचा आणि फॅमिलीजचा. सध्या वीणा वर्ल्डच्या सर्व सेल्स ऑफिसेसमध्ये बुकिंग सुरू आहे जानेवारी ते जून ह्या सहा महिन्यांतील टूर्सचं. बुकिंग करताना काही गोष्टीचं अवधान राखणं महत्वाचं आहे. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर आमचा पहिला सल्ला असेल भारतात पर्यटन करताना सिनियर मंडळी किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी सुट्टयांचा सीझन सोडून इतर वेळी पर्यटन करावं. शांत निवांत वातावरणात पर्यटनस्थळाचा आनंद जास्त चांगल्या तर्हेने घेता येतो. इंटरनॅशनल टूर्ससाठी सुट्ट्यांमध्ये आपण जाऊ शकता कारण जगातील शाळांच्या सुट्टीचा मौसम जूलै ऑगस्ट असल्याने परदेशी पर्यटनस्थळांची गर्दी बर्यापैकी आटोक्यात असते. शाळांमुळे मुलांवाल्या फॅमिलिज्ना समर हॉलिडे, दिवाळी ख्रिसमस शिवाय पर्यायच नसतो. अर्थात ह्या सुट्टीतल्या टूर्स लवकर फुल्ल होतात हे ध्यानी घेऊन आधीच बुकिंग करून निश्चिंत व्हावं. कोणत्या सहलीचं बुकिंग करावं हा प्रश्न असतोच. पण त्याआधी आपल्याला बघायचंय ते स्वत:कडे म्हणजे आपण टूरवाले पर्यटक आहोत की कस्टमाइज्ड हॉलिडेवाले ते ठरवायचं. ज्यांना इतर पर्यटकांची कंपनी आवडते, डोक्याला ’रीझर्वेशन्स कन्फर्मेशन्स काय कुठे कधी कसं’ असे कोणतेही ताप नको असतात त्यांनी बिनधास्त ग्रुप टूर्सचं बुकिंग करावं. ’मैं हूँ ना’ म्हणत आमचा टूर मॅनेजर पर्यटकांच्या दिमतील असतोच. ज्यांना स्वत:ला हवं तसं आरामात पर्यटन करायचं असतं. सगळंच स्थलदर्शन करायचं नसतं त्यांच्यासाठी आहे वीणा वर्ल्ड कस्टमाइज्ड हॉलिडे डिव्हिजन. इथे तुम्हाला हवं ते हॉटेल गाड्या तसेच विमानप्रवासाचा क्लास घेता येतो. तुमच्या मागण्यांप्रमाणे कस्टमाईज्ड हॉलिडेची किंमत कमी जास्त होत असते. ग्रुप टूर्स रीझनेबल असतात आणि तिथे आखीव रेखिव सहल कार्यक्रमात तुम्हाला जास्त बघता येतं. ग्रुप टूर्समध्ये प्रिमियम इकॉनॉमी किंवा बिझनेस असा विमानप्रवास उपलब्धतेनुसार जादा पैसे भरून घेता येतो. सो ग्रुप टूर की कस्टमाइज्ड हॉलिडे हे पहिलं ठरवा. तिथे राँग नंबर लागू देऊ नका. वीणा वर्ल्डच्या टूर्स आम्ही अशाप्रकारे डिझाइन केल्या आहेत की तुम्ही एकापाठी एक टूर्स करीत तुमचं ट्रॅव्हल मिशन व्यवस्थित साध्य करू शकाल. त्यामुळे वीणा वर्ल्डचं लेटेस्ट ट्रॅव्हल प्लॅनर वीणा वर्ल्ड वेबसाइटवर बघून पुढच्या तीन वा पाच वर्षांचं प्लॅनिंग करूनच ठेवा. प्लॅनिंगमुळे पैसे वाचतात. घाईघाईत काही तरी बघितलं असं होत नाही. जनरली पर्यटक वर्षाला दोन टूर्स करतात. एक टूर भारतातली करावी आणि एक परदेशातली. आमचे जे पर्यटक वर्षाला चार ते पाच टूर्स करतात त्यांनी आमच्याकडून ट्रॅव्हल पोर्टफोलिओ बनवून घ्यावा आणि ट्रॅव्हल मिशन आनंदात पूर्ण करण्याकडे कूच करावी. आणखी अनेक गोष्टींविषयी यथावकाश माहिती देऊच.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.