Published in the Saturday Lokasatta on 26 October 2024
...कोणाच्याही प्रगतीचा चढता आलेख बघताना अदरवाईज इन्स्पायर होणारी मी एकदम गळून गेले. ’क्या करने चले थे और कहाँ पहुँचे,’ वो कहाँ हम कहाँ? चे विचार चित्त उसकटवून टाकायला लागले...
रात्र थोडी सोफ्लगे फार’ ही म्हण आजच्या काळासाठीच बनवली गेली आहे असं वाटतं. हे करायचंय, ते करायचंय, तेही करायचंय, अरे हे राह्यलंच की करायचं अशा अनेक गोष्टींनी डोकं आधीच भणाणून गेलंय. त्यात सोशल मिडियाने फोमो आणि जोमो, फियर ऑफ मिसिंग आऊट आणि जॉय ऑफ मिसिंग आऊट ची भर टाकलीय. सोशल मिडियाचं जग, त्यावरच्या छान छान पोस्ट्स बघून तर हे काय मस्त आयुष्य आहे आणि आपण काय ही आयुष्यभर खर्डेघाशी करीत बसलोय हा विचार निराशेकडे खेचतो आपल्यातल्या अनेकांना. आणि हे फक्त समाजाच्या अमुक एका आर्थिक स्तराच्या बाबतीतच घडतंय असं नव्हे तर सर्वांच्याच बाबतीतली ही परिस्थिती आहे.
कोविडमध्ये पर्यटनविश्व दोन अडीच वर्षांसाठी अगदी लयाला गेलं होतं. आम्ही दुकान बंद करून उद्याच्या चिंतेत होतो. अर्ध्या दिवसाचं झूम कॉल ऑफिस संपल्यावर बऱ्याच इन्स्पायरिंग डॉक्युमेंटरीज, यु ट्यूब कॉन्व्हर्सेशन्स वा ओटीटीवरची सिरियल्स बघणं हाच दैनंदिन कार्यक्रम असायचा. एक दिवस एका मोठ्या कंपनीची ॲन्युअल जनरल मिटिंग बघायला बसलो, कोणाच्याही प्रगतीचा चढता आलेख बघताना अदरवाईज इन्स्पायर होणारी मी एकदम गळून गेले. ’क्या करने चले थे और कहाँ पहुँचे,’ वो कहाँ हम कहाँ? चे विचार चित्त उसकटवून टाकायला लागले. पण वेळीच भानावर आले. ’अपना भी टाइम आएगा’ हे मनाला बजावलं आणि कोविड संपायची वाट बघत बसले. त्यासाठीची पुर्वतयारी करण्यामध्ये स्वत:ला गुंतवलं आणि टीमलाही. आता कोविडनंतर आमची पर्यटनविश्वाची धक्कागाडी मार्गी लागलीय.
अर्थात कोविडनंतरचं विश्व बदललंय. गोष्टी म्हणाव्या तितक्या सोप्या राहिल्या नाहीत. महागाई मी म्हणतेच आहे पण आमच्या संलग्न इंडस्ट्रीला प्रचंड मॅनपॉवर शॉर्टेजला तोफ्लड द्यावं लागतंय. आम्ही त्यातल्या त्यात वाचलो कारण आम्ही सर्व टीम ’एक मजबूत जोड’ सारखे एकत्र राहून भविष्याकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलो होतो. त्याचं चीज झालं म्हणायला हरकत नाही. तसं बघायला गेलं तर आता काम वाढलंय, पण पोस्ट कोविडचं जग तेवढं तंदुरूस्त राहिलं नाहीये. प्रदुषण वाढलंय, आपण पितोय ते पाणी स्वच्छ आहे का ह्याचीही खात्री राहिली नाहीये. खोकला, सर्दी, अधूनमधून येणारा ताप काळजी करायला लावतोय. आम्ही मुंबईत राहतो, जिथली रीयल इस्टेट जगात सर्वात महाग पण इन्फ्रास्ट्रक्चर सर्वात वाईट. खरंतर आम्ही एक नागरिक म्हणून जास्त अपेक्षा ठेवत नाही पण चालायला खड्डेविरहीत रस्ते, प्यायला स्वच्छ पाणी आणि श्वासाला म्हणजे जिवंत रहायला अप्रदुषित हवा तर द्या. असो. त्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. त्यावर काथ्याकूट करण्यात आपला वेळ दवडण्यातही अर्थ नाही. मग कसं तोफ्लड द्यायचं ह्या सगळ्याला? उपाय एकच, आपणच आपल्याला कणखर बनवायचं शरीराने आणि मनाने.
गेल्यावर्षी आम्हाला जाणवायला लागलं की, ’सर सलामत तो पगडी पचास’ हे प्रत्येकाच्या गळी उतरवलं पाहिजे. आपली आणि आपल्या कुटुंबाची तब्येतीची काळजी घेणं ही सर्वप्रथम आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. एक संस्था म्हणून वीणा वर्ल्ड काय करू शकतं? तेव्हा जाहीर केलं आपली ऑफिसेस लवकर बंद होतील. सेल्स ऑफिसेस जरी सात वाजता बंद झाली तरी शेवटी आलेल्या गेस्टना टीम आत अटेंड करीत असते. पण यापुढे सेल्स आणि कॉर्पोरेट ऑफिस साडेआठ वाजता बंद होणार. निशाचर बनायचं नाही. ’लवकर नीजे लवकर उठे त्यास ज्ञान आरोग्य संपत्ती मिळे’ हे लहानपणी शाळेच्या भिंतीवर असणारं सुभाषित आपल्या अंगी नव्याने बाणवायची वेळ आलीय. अकरा वर्षांपूर्वी वीणा वर्ल्ड सुरू झाल्या झाल्या आम्ही ’टाइम थिअरी’ बनवली होती. काळाच्या ओघात कामांच्या दबडग्यात ती मागे पडली आणि कोविडमध्येतर सपशेल विसरलो आम्हीच आमच्या टाइम थिअरीला. मग गेल्यावर्षी 2024 च्या डायरीतच आम्ही त्याचा समावेश केलाय. जेव्हा गोष्टी आपल्या नजरेसमोर असतात आणि त्या कधीतरी वाचल्या जातात तेव्हा हळूहळू बदल घडतो हे अनुभवावरून सांगते. सो, ही टाइम थिअरी आहे, ’वेळेआधी या, वेळत काम सुरू करा, वेळ वाया घालवू नका, वेळेआधी काम पूर्ण करा, वेळेवर घरी जा, घरच्यांना वेळ द्या, वेळच्यावेळी खा, वेळ काढून वाचन करा, वेळेवर झोपा, वेळेत उठून व्यायाम करा, सर्ववेळ प्रफुल्लित रहा.’ आता जेवढ्या सोप्या पद्धतीने हे लिहिलंय तेवढं ते आचरणात आणायला सोप्पं नाहीये हे माहीत आहे पण सुरुवात तर केली पाहिजे जर आपल्याला आपली स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी असेल तर. आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये आम्ही नेहमी म्हणतो की, देवाने आपल्याला धडधाकट या जगात पाठवलंय तर चला ह्या आयुष्याला छान सकारात्मक घडवूया. आपल्या आईवडिलांचा अभिमान बनूया, आणि त्यासाठी अखंड प्रयत्न करूया’. आम्हाला आमच्या टीमचा सार्थ अभिमान आहे कारण आम्ही आमच्यात दररोज काहीतरी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच परिपाक आमच्या पर्यटकांच्या आनंदात दिसतो. म्हणजे मला कल्पना आहे की अजूनही आम्ही करीत असलेल्या कामात इम्प्रूव्हमेंट करायला वाव आहे. पण ते समजण्याची आणि त्यात दुरूस्ती करण्याची लवचिकता आम्हा सर्व टीममध्ये आहे हे भाग्याचं.
या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर 2024 पासून आम्ही आमच्या टाइम थिअरीत आणखी थोडी सुधारणा केली. म्हणजे दिवसाचं चक्र तेच आहे पण आठवड्याच्या चक्रात थोडा बदल केला. आमच्यासारख्या संस्था म्हणजे सोमवार ते शनिवार पूर्ण वेळ काम करणाऱ्या, आणि ते कमी म्हणून काय जमलं तर रविवारीही काम करणारे आम्ही, रविवारी सुट्टी घेण्यात यशस्वी झालो. ऑफिसमध्ये महिलांचं प्रमाण जास्त. एक दिवस आमची एच आर सिनियर मॅनेजर ॲनी अम्लेडा सर्वांचं प्रतिनिधित्व केल्याप्रत म्हणाली, ‘एक संडे में नहीं जमता है घर के सारे काम निपटना‘. झालं, आम्ही आमच्या विचारांमध्ये बदल घडवला. दर पंधरा दिवसांनी ‘एक सॅटरडे ऑफ‘ सुरू झाला आणि तो टिकला. त्यामुळे बिझनेस कमी झाला असं काही नाही. ॲनीच्या पावलावर पाऊल ठेवीत एच आर मॅनेजर रजिथा मेनन ने काही महिन्यांपासून जोर लावला, वुई मस्ट हॅव ‘फाईव्ह डेज् वर्क‘ पॉलिसी. आता शनिवार रविवार ऑफिस बंद ठेवणं शक्य नव्हतं, कारण आमच्या पर्यटकांना शनिवारी सुट्टी असते, आणि आमची सेल्स ऑफिसेस शनिवारी पर्यटकांनी भरलेली असतात. पण शहाणपण हळू हळू येतं तसं जाणवलं की जग सॅटरडे संडे ऑफ ने चालू आहे, नव्हे वेगात पळतंय, प्रगती करतंय मग आपण दिवसरात्र काम करून अजूनही का धडपडतोय? कोविडनंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यात अग्रस्थानी आलंय कुटुंब. आणि त्या कुटुंबाला वेळ देणं गरजेचं आहे. फॅमिली फर्स्ट! रजिथाची आणि एच आर ची आणि आम्हाही सर्वांच्या मानतली सुप्त इच्छा पूर्ण झाली. आम्ही या महिन्यापासून ‘फाइव्ह डेज् वर्क‘ आत्मसात केला. सेल्स ऑफिसेस शनिवारीही सुरू असतील आणि ती संबंधीत मंडळी आठवड्यात कधीतरी सुट्टी घेतील, बाकीची मंडळी सॅटरडे संडे ऑफ घेतील. गेले तीन आठवडे आम्ही आता ह्या आठवड्यातल्या दोन दिवस ऑफची मजा अनुभवतोय आणि पुर्वीपेक्षा जोमाने आणि नव्या उत्साहाने जास्त काम करतोय.
सो टाइम थिअरी तर सांगितली, पण ‘लवकर नीजे...‘ ला लवकर झोप तर आली पाहिजे आणि ती नाही आली तर सकाळी जाग कशी लवकर येणार? वेळेत काम संपवायचं तर त्यासाठी एकाग्रता कशी आणायची? एकाग्रता तेव्हाच येऊ शकते जेव्हा डोकेदुखी, अंगदुखी, पाठदुखी, वात ह्या सगळ्यांपासून आपण मुक्त असू. मग आम्ही स्वत: आधी पॅकेज्ड, प्रोसस्ड फूड आणि सॉफ्टड्रिंक्स आदी मोफ्लहापासून स्वत:ला मुक्त केलं. नॉनव्हेज खाणं कमी केलं, हो जर आपल्याला जमलं तरंच इतरांना जमू शकतं नाही का. महात्मा गांधीजींनी म्हटलंय नं, ’बी दे चेंज यू वाँट टू सी इन द वर्ल्ड!’ हल्ली आम्ही शक्य तेव्हा शक्य तिथे सर्वांना ’तब्येतीची काळजी घ्या, अरबट चरबट खाऊ नका, घरून डबा आणा, बाहरेचं खाऊ नका’ ह्याचा घोषा लावलाय. कोणत्याही दुखण्याचं मूळ पोटात आहे आणि पोट साफ तर शरीर तंदुरूस्त आणि मन प्रफुल्लित! ह्या बाबतीत खूप छान व्हिडियोज यू ट्यूबवर आहेत. त्यातला आर माधवन आणि अक्षय कुमारचा व्हिडिओ मला भावतो. अक्षयकुमारला कुणीतरी विचारलं, ’आप सुबह चार बजे उठते हो, इतनी जल्दी उठकर क्यूँ सबको छे बजे की शिफ्ट लगाके काम पे बुलाते हो?’ त्याचं उत्तर होतं, ‘सुबह उठने के लिए होती है। मैं जल्दी उठता हूँ उसमें बुरा क्या है?‘ दुसऱ्या व्हिडियोत तो दमच देतोय, सतत काहीतरी मिळेल ते तोफ्लडात टाकीत खात राहणाऱ्यांना, ‘क्यूँ ठुसते रहते हो दिनभर? शामको छे बजे के बाद कुछ भी खानेकी जरूरत नहीं है। सुबह एक घंटा शरीर को दो, व्यायाम करो, अगर ये नहीं कर सकते हो तो मरो?‘ आर माधवनने स्वत:ला कसं तंदुरूस्त बनवलं हे प्रामाणिकपणे सांगितलंय. आता जनरली आपण ह्या सीने कलाकारांबद्दल बऱ्याच इतर गोष्टीही ऐकतो पण ते आपण बाजुला ठेवूया. स्वत:च्या मेहेनतीवर त्यांनी भविष्य घडवलंय एवढंच लक्षात घेऊया आणि आपल्यालाही तंदुरूस्त बनवूया. हॉलिवूडचा कलाकार ह्यू ग्रॅन्ट म्हणाला, ’जिमचे सर्व प्रकार करून झाल्यावर मला कळलं धावण्यासारखा व्यायाम नाही’ म्हणजे व्यायामासाठी जिमला डोनेशन्स द्यायचीही आवश्यकता नाही. फक्त मनाने ठरवायला हवं, इट्स हाय टाइम नाऊ... आयुष्याला शिस्त लावण्याची आणि आपली जीवनशैली सुधारण्याची गरज आहे, आणि हो त्यासाठी टाइमटेबल किंवा अलार्म लावण्याची आवश्यकता नाही बरं का. हे सगळं अलार्म आणि रिमांइडरशिवाय जमलं तरच ते आयुष्यभर टिकू शकतं.
सकाळी उठल्यापासून एकापाठी एक म्हणजे हे झालं की ते... अशा गोष्टी करीत रहायच्या. उठायचं, देवाला थँक्यू म्हणायचं नवीन कोरा दिवस आपल्याला दिल्याबद्दल आणि मग वाचन योगा जिम स्विमिंग ब्रेकफास्ट घरच्यांना बाय बाय... संध्याकाळी वेळेत घरी, जेवण, चर्चा, वाचन मनन आणि थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग म्हणत शांत झोप... जेव्हा शांत निवांत झोप लागते नं तेव्हा पाच-सहा तासांची झोप पण पुरते. अगदी नवीन क्रेझप्रमाणे आठ तास झोप मिळालीच पाहिजे असं काही नाही. हा विषय खूप मोठा आहे. पण वीणा वर्ल्डमध्ये आम्ही टाइम थिअरी व शारिरीक मानसिक तंदुरुस्तीवर काम करतोय आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनने ते केलं पाहिजे. बलवान संस्था तेव्हाच बनेल जेव्हा संस्थेमधला प्रत्येक टीम मेंबर शारिरिक मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सदृढ असेल. योगाचार्य बीकेएस अय्यंगार यांनी चांगलं सागितलंय, ’हेल्थ इज अ कम्प्लीट हार्मनी ऑफ द बॉडी, माईंड ॲन्ड स्पिरिट.’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.