IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

हिमालयातील एक सर्वोच्च तीर्थक्षेत्र

16 mins. read

Published in the Sunday Sakal on 21 January, 2024

ज्यावेळी आम्ही वीणा वर्ल्डची सुरूवात केली तेव्हा भारताच्या उत्तर टोकाकडून लेह लडाखपासून सुरूवात करूया असा विचार करून मी आणि सुधीर २०१४ च्या एप्रिल महिन्यात पोहोचलो थेट लेह ला, पहिल्यांदाच. ना कुणी तिथला ट्रॅव्हल एजंट माहीत होता ना हॉटेलवाले. जर ही पर्यटन स्थळं आपल्याला आवडली तर मग आपल्या पर्यटकांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर लेह लडाखच्या सहली करू आणि पर्यटकांच्या मनात लेहलडाखविषयी जी एक भीती दडली आहे किंवा ‘टू बी ऑर नॉट टू बी‘ सारखी एक संमिश्र भावना आहे ती निपटून काढू हाच विचार प्रामुख्याने होता. लेह ला पोहोचल्यावर नियमानुसार रेस्ट घेतली, झोपून राहीलो. भरपूर पाणी पीत राहीलो आणि त्या हवेशी अ‍ॅक्लमटाइज झालो. चार पाच दिवस आम्ही तिथ रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत भटकत होतो. लेह लडाखचं लँडस्केप बघून आम्ही स्तिमित झालो होतो. ‘इट्स टू लेट टू कम हियर‘आम्हीच आम्हाला दोष देत होतो. त्याचबरोबर ‘इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट समथिंग वर्थव्हाईल‘ म्हणत स्वत:ची समजूत घालत होतो. एक मात्र निश्चित होत होतं आमच्या त्या भटकंतीत, आता भरपूर टूर्स इथे आणायच्या. लेहलडाख पर्यटकांनी पाहिलंच पाहीजे. नव्हे प्रत्येक भारतीयाने इथे आलं पाहीजे. आम्ही टूर्सचा कार्यक्रमही डिझाइन करायला सुरूवात केली. ह्या टूर्स करण्यासाठी आम्हाला लोकल पार्टनर हवा होता. लेह लडाखचा एक ट्रॅव्हल एजंट ITB बर्लिन ह्या जगातल्या सर्वात मोठ्या ट्रॅव्हल शो मध्ये सुधिरला भेटला होता. त्याचा माग काढत आम्ही त्याच्या ऑफिसला पोहोचलो. त्याची मुलगी होती सोबत. आधी आम्ही समजून घेतलं ते काय आणि कसा बिझनेस करतात ते. आत्तापर्यंत ते वर्षाला साधारणपणे पाचशे टूरिस्ट करायचे जुलै ऑगस्टमध्ये. बहुतेक फॉरिनर्स, जे हायकिंग ट्रेकिंगसाठी यायचे. थोडक्यात आम्हाला कळलं की आम्ही करीत असलेल्या टूर्स आणि ते तीथे करीत असलेलं काम टोटली वेगळं आहे. जर ह्यांच्याशी काम करायचं असेल तर अथपासून इतिपर्यंत सगळं शिकवावं लागेल. पण माणसं चांगली वाटत होती. मेहनती दिसली आणि मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे बोलत होती. उगाचच मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करीत नव्हती. पहिल्यांदा माणसंच बघयाची असतात नाही का. त्यांची आपली वेव्हलेंग्थ जमत असेल तर बाकी गोष्टी शिकता वा शिकवता येतात. त्यांना म्हटलं आम्ही जून जुलैपासून टुरिस्ट आणायला सुरूवात करतो, ह्या वर्षी साधारण एक हजार टुरिस्टना इथे सर्व्हिस द्यायचं लक्ष्य ठेवूया. जमेल का तुम्हाला ते? आमचे हे पर्यटक, हायकर्स किंवा ट्रेकर्स नाहीत. हे पर्यटक आहेत. त्यांच्या गरजा थोड्या वेगळया आहेत. ITB बर्लिनच्या थोड्याशा ओळखीचा धागा घेऊन आम्ही त्यांना भेटलो होतो. वीणा वर्ल्ड फक्त काही महिन्यांची झाली होती आणि एक हजार टुरिस्टची गोष्ट करीत होती हे त्यांच्यासाठी विश्वास न बसणारं होतं. आम्हीपण त्यांना सांगत होतो की, ‘एक हजार हे आमच्यासाठीही मोठं लक्ष्य आहे कारण आमची ट्रॅव्हल कंपनी नवी, लेह लडाख हे डेस्टिनेशन नवीन त्यामुळे मनापासून प्रयत्न आम्ही करणार तुम्ही साथ द्या. इंटरनेटमुळे बुकिंग करणं सोप्प झालं असलं आणि आम्ही डायरेक्टली सगळं काही मुंबईत बसून करू शकलो तरी आम्हाला ते करायचं नाहीये. इथला लोकल पार्टनर आम्हाला हवाय. आणि आपलं जमेल असं आम्हाला वाटतंय. ‘लेट्स वर्क टुगेदर, मेक पीपल हॅप्पी अ‍ॅन्ड ग्रो टुगेदर!‘ आम्ही तिथे आमच्या ह्या नव्या पार्टनरशीपवर शिक्कामोर्तब केलं. एकमेकांना थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक देत मुुंबईला पोहोचलो. आल्यावर आम्ही लेह लडाख वुमन्स स्पेशल जाहीर केली. आणि पहिल्या पंधरा दिवसात दोनशे महिलांनी बुकिंग केलं. आम्हाला तेवढ्याच कपॅसिटीची दुसरी टूर लावावी लागली. पर्यटकांनी आणि खास करून महिलांनी अशी लेह लडाखची भीती कुठच्याकुठे पळवून लावल्यावर कुटुंबं कशाला मागे राहतील. सर्वांनी लेह लडाख उचलून धरलं आणि आम्ही त्या पहिल्याच वर्षी पंधराशे पर्यटक लेह लडाखला नेऊन आणले. दरवर्षी पाच हजार पर्यटक वीणा वर्ल्डसोबत लेह लडाखला भेट देतात. आमचे हे लेहचे पार्टनर्स त्या पहिल्या दिवसापासून आमच्याशी जोडले गेले ते आजतागायत. वांगचूक शाली, रिगझीन डोल्मा, गॅल शाली आणि डोलकर ह्या आईवडील मुलगा मुलगी चौकडीने अगदी पहिल्या दोनशे जणींच्या वुमन्स स्पेशलपासून इतकी चांगली सर्व्हिस दिली की मग आम्हाला मागे वळून पहावंच लागलं नाही. एक्सप्लोअर हिमालया हे त्यांच्या ट्रॅव्हल कंपनीचं नाव जे आता जणू वीणा वर्ल्डचं लेह लडाखमधलं ऑफिस बनलंय. आता त्यांच्याकडे कार्स, ड्रायव्हर्स, हॉटेल्स, टेन्ट्स ह्या सगळ्याचं चांगलं नेटवर्क आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या लोकल पार्टनर्सशी त्यांचे चांगले संबंध आहेत. ज्याचा त्यांना आम्हाला आणि पर्यटकांना फायदा होतो.

भारतातून जास्तीत जास्त पर्यटक लेह लडाखकडे वाढायला लागल्यावर बरीच नवीन हॉटेल्स बांधली गेली. हॉटेलियर्सनी लोन काढून हॉटेल्स बांधली आणि कोवीडने सगळ्यावर पाणी फिरवलं. भविष्याकडे आशेने बघणार्‍या साध्याभोळ्या लडाखी लोकांवर कठीण परिस्थिती ओढवली. कोविडनंतर २०२२ साल चांगलं गेलं आम्हीही पाच हजाराहून जास्त पर्यटकांना लडाख दाखवलं. हळूहळू लडाख पुर्वपदावर येत असतानाच गेल्यावर्षी लडाखला मोठ्या प्रमाणावर पर्यटक घेऊन जाणारी विमान कंपनी कोसळली. पर्यटक जाऊच शकले नाहीत लडाखला. पुन्हा एकदा लडाख संकटात सापडलं. अजूनही लडाख चाचपडतंय. खात्री नाहीये ह्यावर्षी किती पर्यटक येऊ शकतील ह्याची कारण अजूनही विमानकंपन्याना लेह चे एअरस्लॉट्स म्हणावे तितके मिळाले नाहीत. आम्ही मात्र वीडा उचललाय जास्तीत जास्त पर्यटकांना लडाखला घेऊन जायचा. इंडिगो एअरलाइन्सने सीट्स दिल्याबद्दल त्यांचे आभार. ह्यावर्षी आपण प्रत्येकाने ट्रॅव्हल मिशनमध्ये लडाखचं नाव घातलंच पाहीजे. सरकारने लेह लडाख केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर खूपच सुधारणा झाल्या आहेत. रस्ते मस्त झाले आहेत. त्यामुळे पूर्वी जो रस्त्यांचा त्रास व्हायचा तो प्रकार आता नाही. आता फक्त गरज आहे ती पर्यटकांनी लडाखला जायची. टुरिझमवर पुर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तेही फक्त पाच सहा महिनेच चालणार्‍या लडाखच्या टुरिझम अर्थव्यवस्थेला, लडाखी छोट्या मोठ्या व्यावसायिकांना काम मिळवून दिलं पाहिजे. त्यांच्या मनाला उभारी आणली पाहीजे. एकटे जा, ग्रुपने जा, कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीबरोबर जा पण लडाख तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये टॉपवर असू द्या. आणि हो आपण काही उपकार करीत नाही बरं का लडाखवर. लडाखी लोक नम्र आहेत पण लाचार नाहीत.  लडाखला आपण जेव्हा जातो तेव्हा आपण खर्च केलेल्या पैशांच्या बदल्यात आपल्याला जो काही आनंद मिळतो, जे निसर्गसौंदर्य आपण डोळे भरून बघतो, ज्या आठवणी आपण सोबत आणतो ते सगळं अनमोल आहे. लडाखमध्ये काय बघायचंय ते लिहीलं नाही कारण ते तिथे जाऊन बघण्यात मज्जा आहे. सो, चलो  बॅग भरो, निकल पडो! लडाख इज कॉलिंग...


अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

आशिया खंडाच्या पूर्व टोकावरचा, हजारो बेटांचा आणि जिथे प्राचीन परंपरा व आधुनिक जीवनशैलीचा संगम अनुभवायला मिळतो असा देश म्हणजे ‘जपान’. जपानी ‘इकेबाना’, ‘रॉक गार्डन्स’,  ‘बॉन्साय’, ‘ज्युदो-कराटे’, ‘बुलेट ट्रेन’, ‘माउंट फुजी’ अशी अनेक आकर्षणे या देशाकडे खुणावत असतात. जपानमध्ये निसर्गातील सुंदर गोष्टींचे कौतुक मोठ्याप्रमाणावर करण्याची पध्दत रुळलेली आहे. त्यामुळेच जपान म्हटल्यावर ‘साकुरा’ अर्थात चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल आठवतो. चेरीच्या झाडावरील फुलांच्या बहराला जपानी भाषेत ‘साकुरा’ म्हणतात. या ‘साकुरा’बद्दलचा आनंद व्यक्त करण्याची परंपरा जपानमध्ये पूर्वापार चालत आली आहे. पारंपरिक पध्दतीने याला ‘हनामि’ म्हणतात. जपानच्या इतिहासातील ‘नारा कालखंडात’ म्हणजे साधारणतः ८ व्या शतकात चेरीच्या पुष्प बहाराचे कौतुक करायची प्रथा सुरू झाली. खास जपानचा म्हणून प्रसिध्द असलेल्या ‘हायकू’ या काव्यप्रकारातून १० व्या शतकात या फुलांसाठी ‘साकुरा’ हा शब्द वापरायला सुरवात झाली. सुरवातीला हा पुष्पोत्सव फक्त शाही दरबारातले मान्यवरच साजरा करीत असत. पुढे त्यात सामुराई योध्दे सामिल झाले आणि इडो काळात म्हणजे १७ व्या शतकात सर्वसाधारण नागरिकही हा पुष्पोत्सव साजरा करू लागले. १८ व्या शतकात तोकुगावा शोगुनातेच्या ‘तोकिगावा योशिमुने’याने साकुराचा आनंद सर्वांना लुटता यावा म्हणून मोठ्या प्रमाणावर चेरीच्या झाडांची लागवड केली. त्यामुळे ‘चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल’ अधिक लोकप्रिय झाला. पारंपरिक पध्दतीनुसार चेरीची झाडे हलक्या गुलाबी रंगांच्या फुलांनी डवरुन आली की जपानी लोक आपल्या कुटुंबियांसह, मित्रमंडळींसह त्या झाडाखाली जमतात, एकत्र वनभोजन करतात, साकेचा आस्वाद घेतात आणि चेरीच्या बहाराची मजा लुटतात. जपानमधील बहुतेक सगळ्या शाळा आणि सरकारी इमारतींच्या आवारात चेरीची झाडे लावलेली असतात. जपानमध्ये शालेय वर्ष हे आर्थिक वर्षाबरोबरच एप्रिलमध्ये सुरू होत असल्याने अनेक शाळांमध्ये शाळेच्या पहिला दिवस हाच साकुराचा दिवस ठरतो. जपानी संस्कृतीत या पुष्पबहराला आध्यात्मिक संदर्भही आहे. ही अत्यंत सुंदर फुले लवकर कोमेजतात, त्यामुळे त्यांना नश्वर मानवी जीवनाचे प्रतिक मानले जाते. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात चेरी ब्लॉसमचा उपयोग जपानी लोकांमधील राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी करण्यात आला होता. जपानबरोबरच कोरिया, तैवान, चायना या देशांमध्येही चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल साजरा केला जातो. जपानी लोकांचे निसर्गप्रेम आणि सौंदर्यदृष्टी यांचा मिलाफ असलेला ‘साकुरा’ अर्थात चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल थेट जपानमध्ये अनुभवता यावा म्हणून वीणा वर्ल्डकडे नेहमीच खास सहलींचे आयोजन केले आहे. तुम्ही अजूही गेला नसाल तर चला जपानला.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

Veena World Travel Mission

व्यक्ती तितक्या प्रकृती, एका कुटुंबात संपूर्णपणे वेगळ्या आवडी असलेली माणसं असतात. पर्यटनामध्येही आम्हाला ही आवड लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या टूर्स डिझाइन कराव्या लागतात. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो ‘वीणा वर्ल्ड प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी’ गेल्या रविवारी सत्तावीस दिवसांत पंधरा देश किंवा मल्टी कंट्री कॉम्बिनेशन टूर्स विषयी आपण माहिती घेतली होती. जवळजवळ पन्नास देश असलेल्या युरोपसारख्या कॉन्टिनेंटला आज पर्यटक नऊ ते दहा वेळा जात आहेत आणि टप्प्याटप्याने युरोप खंड बघताहेत. त्यासाठी आम्ही टूर्सही तशाच आणल्या आहेत. पहिल्यांदा जाणारे पर्यटक जास्त करून वेस्टर्न युरोपची वारी सर्वप्रथम करतात. एका वेळी आठ दहा देश बघतात. युरोप कसा आहे ह्याचा अंदाज घेतात आणि मग आवडलं तर मल्टीकंट्री कॉम्बिनेशनवाल्याच टूर्स करतात किंवा एकावेळी एक देश बघायचा, जास्तीत जास्त बघायचा, अशी दिशा ठरवितात. एकावेळी एक देश मध्ये वीणा वर्ल्डच्या सर्वात लोकप्रिय टूर्स आहेत त्या म्हणजे बेस्ट ऑफ स्वित्झर्लंड, बेस्ट ऑफ इटली, बेस्ट ऑफ ऑस्ट्रिया, बेस्ट ऑफ स्पेन, बेस्ट ऑफ ग्रीस, बेस्ट ऑफ टर्की, इत्यादी. वीणा वर्ल्डच्या वेबसाइटवर जाऊन तर बघा काय मस्त आयटिनरीज  आहेत एकेका टूरच्या. तुम्ही अगदी प्रेमात पडाल. युएसए एवढा मोठा देश आहे की शक्यतो त्यासोबत कॉम्बिनेशन्स नसतात, उलट त्या एका देशाच्याच आम्ही वेगवेगळ्या टूर्स केल्या आहेत जेणेकरूण आपल्या सवडीप्रमाणे पर्यटक कधी ईस्ट कोस्ट तर कधी वेस्ट कोस्टच्या टूर्स घेऊ शकतात. जगातल्या टूर्समध्ये सिंगल कंट्रीवाल्या लोकप्रिय टूर्स आहेत त्या म्हणजे बेस्ट ऑफ ऑस्ट्रेलिया, बेस्ट ऑफ न्यूझीलंड, बेस्ट ऑफ जपान, बेस्ट ऑफ साऊथ कोरिया, बेस्ट ऑफ व्हिएतनाम, बेस्ट ऑफ बाली, बेस्ट ऑफ सिंगापूर, बेस्ट ऑफ थायलंड, बेस्ट ऑफ नेपाळ, बेस्ट ऑफ भूतान, बेस्ट ऑफ इजिप्त, बेस्ट ऑफ मॉरिशस, बेस्ट ऑफ श्रीलंका इ. ह्यात आता नव्याने दाखल झाल्यात बेस्ट ऑफ ओमान, बेस्ट ऑफ कतार, बेस्ट ऑफ सौदी अरबिया आणि आपली ऑल टाइम ग्रेट बेस्ट ऑफ दुबई अबू धाबी आहेच. तो चलो, लगे रहो अपना अपना ट्रॅव्हल मिशन अकप्म्प्लिश करने में!

#VeenaWorldTravelMission


काय बाई खाऊ... कसं गं खाऊ!

आपलं जेवण, त्यातले पदार्थ हे विशिष्ट भौगोलिक परिस्थितीवर, हवामानावर अवलंबून असतं. पण त्यामुळेच अतिशय दूर दूर असलेल्या दोन देशांमधील खाद्यपदार्थांमधले साम्य आश्चर्यचकित करतं. साउथ वेस्ट युरोपमध्ये असलेल्या स्पेनला जेंव्हा तुम्ही भेट द्याल तेंव्हा तुम्हाला असा अनुभव नक्कीच येईल. दक्षिण युरोपमधील आकाराने सर्वात मोठा असलेला देश म्हणून स्पेन ओळखला जातो. जगातील सर्वात प्राचीन रेस्टॉरन्ट जे आजही सुरू आहे ते याच देशात आहे. माद्रिद मधील ‘कासा बोतिन’ हे सन १७२५ मधले रेस्टॉरंट आजही खवैय्यांना तृप्त करतं. स्पॅनिश लोक मासे खाऊ तर आहेतच पण त्याच बरोबर त्यांच्या जेवणात भातालाही स्थान आहे. स्पेनमधील एक डिश थेट आपल्या भारतीय पुलावाची आठवण करुन स्पॅनिश डिश म्हणजे ‘पाएया’ (स्पेलिंगमध्ये जरी डबल एल असला तरी त्याचा उच्चार ‘य’ असाच होतो!). स्पेनच्या पूर्व किनारपट्टीवरील वॅलेन्सिया या प्रांतामधून हा पदार्थ आल्याचे मानले जाते. मूळ रेसिपीनुसार या पदार्थात तावेया (चवळीचा स्पॅनिश प्रकार), सशाचे मांस, चिकन (या ऐवजी मासेही वापरतात) डबल बीन हे सगळं भातामध्ये घालून पायया तयार केलं जातं, महत्वाचं म्हणजे यात स्पॅनिश केशर वापरल्याने भाताला पिवळसर सोनेरी रंग येतो.या पदार्थाला ‘पाएया’ हे नाव जे मिळालं आहे ते तो बनविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या उथळ फ्रायिंग पॅनमुळे. वॅलेन्सिया प्रांतात सगळ्याच पॅन्सना ‘पाएया’ म्हणतात, त्यामुळे पाएयामध्ये तयार केला जाणारा पदार्थही त्याच नावाने ओळखला जाऊ लागला. पारंपरिक पद्धतीने पाएया चुलीवर शिजवला जातो. चुलीत सरपण म्हणून संत्र्याच्या, पाइनच्या फांद्या, कोन वापरले जातात. जे लाकूड वापरले असेल त्याच्या धुराचा ’स्मोकी’ फ्लेवर पाएयाची चव वाढवतो. आता वीणा वर्ल्डबरोबर स्पेनची टूर करताना पाएया खाऊन तुम्हीच ठरवा आपल्या पुलावापेक्षा किती वेगळा आहे तो. अशाच देश विदेशातील विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोर सेलिब्रेट लाईफ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.

www.veenaworld.com/podcast


नॉर्दन लाइट्स की मिडनाइट सन, की फक्त आइसलँड स्कॅन्डिनेव्हिया

गेल्या आठवड्यात स्कॅन्डिनेव्हिया नॉर्दन लाइट्सची टूर सुरू होती. टूरच्या पहिल्याच दिवशी नॉर्वेच्या ट्रॉमसो मध्ये पर्यटकांना नॉर्दन लाइट्सचा चमत्कार पहायला मिळाला आणि त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. गेल्या महिन्यात डिसेंबरमध्येही नॉर्दन लाइट्सची टूर होती आणि त्याहीवेळी पर्यटकांना आसमंतात होणारी ही रोषणाई बघायला मिळाली. ह्याला ’ऑरोरा बोरीयालिस’ असंही म्हटलं जातं. ह्या दोनही टूर्सवर पर्यटकांच्या दिमतीला असलेले आमचे टूर मॅनेजर्स राहुल देसाई आणि महेंद्र वाडकर ह्यांच्या मते ह्यावर्षी नॉर्दन लाइट्स खूपच छान तर्‍हेने दिसताहेत. आणि त्याला कारणही आहे. २०२४ मध्ये नॉर्दन लाइट्स जास्त ब्राइट दिसणार आहेत. ह्याविषयी वीणा वर्ल्डच्या नील पाटीलने लिहिलेल्या आर्टिकलचा QR कोड इथे दिला आहे. तो स्कॅन करून २०२४ मधील नॉर्दन लाइट्स फिनॉमेनाची माहिती जरूर वाचा. नॉदर्न लाइट्स बघण्यासाठी आमच्याकडे दोन प्रकारच्या टूर्स आहेत. एक आहे स्कॅन्डिनेव्हिया नॉर्दन लाइट्स ही नऊ दिवसांची टूर. तर दुसरी आहे चौदा दिवसांची आइसलँड स्कॅन्डिनेव्हिया नॉर्दन लाइट्स टूर. फेब्रुवारीमध्ये जाणार्‍या ह्या टूर्समध्ये अनुक्रमे दोन आणि पाच सीट्स उपलब्ध होत्या हे लिहित असताना. यू कॅन ट्राय इफ सीट्स आर अवेलेबल. अदरवाईज मार्चमध्येही ह्या दोन्ही टूर्स आहेत आणि त्याचं बुकिंग सुरू आहे. नॉर्दन लाइट्स ही स्कॅन्डिनेव्हियाला मिळालेली देन आहे कारण हा निसर्गचमत्कार बघायला नोव्हेंबर ते मार्चएप्रिलपर्यंत जगभरातून पर्यटक येत असतात. मे जून मध्ये शाळांना सुट्ट्या असतात त्यामुळे पर्यटक बेस्ट ऑफ स्कॅन्डिनेव्हिया वा स्कॅन्डिनेव्हिया आइसलँचं कॉाम्बिनेशन घेतात. समर व्हेकेशन मध्ये नॉर्दन युरोप वा ह्या नॉर्डिक टूर्सना खूप मागणी असते. स्कॅन्डिनेव्हिया आणि आइसलँडला आणखी एक वरदान मिळालंय ते मिडनाइट सनचं. मे एन्ड पासून जुलै पर्यंत इथे चोविस तास सूर्यप्रकाश किंवा दिवस असतो, सूर्य मावळतच नाही. मध्यरात्रीचा हा सूर्य बघायला पर्यटक कुठून कुठून येतात. वीणा वर्ल्डकडे स्कॅन्डिनेव्हिया मिडनाइट सन ची सोळा दिवसांची गेली अनेक वर्ष लोकप्रिय असलेली सहल आहे, ज्याचं बुकिंग आता सुरू आहे. आइसलँड स्कॅन्डिनेव्हिया मिडनाइट सन ची चौदा दिवसांची कॉम्बिनेशन टूरही आहे. ह्या टूर्स प्रत्येकी दोनच आहेत त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर बुकिंग करणं हिताचं. बाकी काळजी नसावी वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्स आणि त्यांच्या सपोर्टसाठी संपूर्ण ऑफिस टीम आहेच तुमच्या दिमतीला.


फोटोवधान

Savdhan

ज्यावेळी मी टूर मॅनेजर म्हणून टूर्सवर जात होते तेव्हा एकदा आम्ही झुरीक लेकवर फोटोस्टॉप साठी थांबलो होतो. सकाळची वेळ होती. सर्वाचा मूड छान होता. फोटो घेणं चालू होतं तेवढ्यात तिथे एक हटके मोटरबाईक येऊन थांबली. आजही ती मोटरबाईक मला जशीच्या तशी आठवते. सगळ्याचं लक्ष त्या बाईककडे. तशा बाईक्स आपल्या भारतात त्यावेळी नव्हत्याच. आताही सहजासहजी नाहीच कुठे दिसत. टूरमध्ये दोन तीन मुलांवाल्या फॅमिलीज होत्या. मला कळलंच की मुलांना बाईकबरोबर स्वत:चा फोटो काढायचाय. त्या स्मार्ट स्वीस तरूणाला रिक्वेस्ट केली आणि तो व्हाय नॉट म्हणून बाजूला झाला. मुलांमधल्या एकाने कॅमेरा हातात घेतला आणि ज्यांना फोटो काढायचे होते त्यांना एक के पिछे एक बाईकवर पोज द्यायला सांगितली. बहुतेक आता सगळेच फोटो काढायला येतील आणि वेळ जाईल हे ध्यानी घेऊन बाईकवाल्याने एक्सक्यूज मी! मला जायचय‘ म्हणून तिथून कलटी मारली. त्याला कृतज्ञतापूर्वक थॅक्यू म्हणत मुलं फोटो बघायला लागली आणि अचानक ज्याने फोटो काढले होते त्याला बदडायला सुरूवात केली. काय झालं म्हणत आम्ही तिथे गेलो तर लक्षात आलं ह्या महाशयानी फोटो तर काढले होते पण ते होते सगळ्या मुलांचे बाईक दिसतच नव्हती आता बाईकवालाही गेला होता. एका साईडला मुलांचा राग अनावर झाला होता आणि आमची मात्र हसता हसता पुरेवाट झाली. हा होता माझ्यामते फोटो ऑक्सिडंट आणि आजही असे अनेक किस्से घडताना दिसत असतील. कुठेही गेल्यानंतर फोटो काढणं ही अपरिहार्य गोष्ट आहे आणि का नाही, त्याच तर छान छान आठवणी आहेत. तीच तर आहे फोटो डायरी. फोटो कसे काढावे ह्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठीचे एक्सपर्ट आम्ही नाही पण टूर्सवरच्या ऑव्झर्वेशनमधून काही छोट्या गोष्टी लक्षात आल्या त्या इथे नमूद कराव्याशा वाटतात. सिनियर्स टूरवर जात असतील तर त्यांच्या स्मार्टफोनवर फोटो आयकन पहिल्या स्क्रीनवर राईट टॉपवर ठेवावा जेणेकरून पटकन फोटो घेता येतील. मेक इट इझी फॉर देम अँड गाइड देम.’ दुसरी गोष्ट टूरवर मोबाईल हरविण्याची आणि त्यातील सर्व फोटोज तसेच त्या सोबत जोडलेल्या आठवणी हरविण्याची हे प्रकार खूप होतात. मोबाइल नेक स्ट्रॅप किंवा क्रॉस बॉडी स्ट्रिंग्ज मिळतात. त्याला मोबाईल लटकवला की हरविण्याची भीती नाही आणि हात मोकळ. कधीही पटकन फोटो काढायचा असेल तर पर्समधून फोन काढण्याचं ऑपरेशन करावं लागत नाही. बर्‍याचदा ते करेपर्यत एखादा छानसा नजारा कॅमेर्‍यात पकडण्याच्या आत आपली गाडी पुढे निघून गेलेली असते. शेवटची आणि एक रीक्वेस्टवजा सुचना म्हणजे प्रत्येक निसर्गरम्य स्थळी आपण फोटो काढण्यात इतके ढंग होतो की आपल्या डोळ्यांनी आणि मनाने त्या स्थळाचा आनंद घ्यायचंच विसरून जातो. मी तर म्हणेन आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या वेळातला फक्त पंचवीस टक्के वेळ फोटोग्राफीला द्यावा आणि बाकीचा वेळ त्या ठिकाणाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी वापरावा. ज्यासाठी आपण आलोय त्या पर्यटनस्थळाचं तना मनाने रसग्रहण करूया.

January 20, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top