Published in the Sunday Sakal on 01 September, 2024
आपल्या घरी एखादं लग्न दहा बारा दिवस चाललं, रोज सकाळ संध्याकाळ पाहुण्यांची उठबस, जेवणावळी, दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असं सुरू राहिलं तर कार्य संपल्यावर आपली काय अवस्था असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. कार्य व्यवस्थित पार पाडल्याचा एक समाधानी आनंद असतो तो वेगळा, पण शरीर शेवटी बोलतंच नं, त्याला विश्रांतीची नितांत गरज असणार हे सांगायला कोणत्याही डॉक्टरची गरज भासणार नाही. आपण हुश्यsss म्हणत हळूहळू त्या लग्नसोहळ्यातून बाहेर येतो, पण इथे ग्रीनलँडमध्ये गेले तेरा दिवस ह्या क्रुझवर चाललेला संपूर्ण कार्यक्रम एखाद्या लग्नसोहळ्यापेक्षा कमी नाही. इथेही जेवणावळी झडताहेत. सकाळ संध्याकाळ कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. रीसेप्शन प्रमाणेच दररोज संध्याकाळी कॉकटेलसह गप्पांचे फड जमताहेत. एंटरटेनमेंट शोज् आहेत. आऊटडोअर पार्टीसारखी डेली एक्सकर्शन्स पाहुण्यांना बिझी ठेवताहेत, कुठेही पाहुणे कंटाळणार नाहीत ह्याची दक्षता घेतली जातेय. आणि ह्या आदरतिथ्यामुळेच आम्ही ग्रीनलँड अगदी विनासायास पाहून आता आइसलँडमार्गे आमच्या परतीचा प्रवास सुरू केलाय. गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रीनलँडला यायचं होतं पण त्याला काही मुहूर्त मिळत नव्हता. आणि असे अनेक देश बघायचे राहून गेले होते. गेल्यावर्षीपासून मग जुलै ते जानेवारी ह्या सात महिन्यात किमान पाच नवीन ठिकाणी जायचं हे ठरवलं. गेल्यावर्षी स्पेन पोर्तुगाल ग्रीस सॅनमरीनो इटली आणि स्वित्झर्लंडमधली न बघितलेली शहरं बघून आलो ज्यामुळे आमच्या आयटिनरीज्मध्ये अनेक चांगले बदल घडवून आणायला मदत झाली. ह्यावर्षी आम्ही ऑगस्ट ते जानेवारी असा कार्यक्रम आखला आणि त्यातलीच ही पहिली टूर, ग्रीनलँड आइसलँडची. आता गणपतीनंतर आम्ही निघालोय ट्युनिशिया माल्टा सिसिलीला, आणि ह्या सगळ्या टूर्स आम्ही वीणा वर्ल्डचे पर्यटक म्हणून करणार आहोत त्यामुळे आम्हालाही बघायचंच वीणा वर्ल्डची सर्व्हिस कशी आहे ते. पर्यटकांना काय खुपतंय का ते आजमावणार आहोत आम्ही. टूर खूप आधीपासून `सोल्ड आऊट’ झालीय. ऑक्टोबरमध्ये आमचा दौरा आहे चियांग राई चियांग माई फुकेत क्राबी ह्या थायलंडमधल्या अतिशय चांगल्या पण आमच्या कडूनही राहिल्या गेलेल्या थोड्याशा ऑफ बीट स्थळांना. दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये आम्ही निघालोय कोरीया आणि तैवानला ऑटम कलर्स फॉल फॉलिएज् बघायला. लाल पिवळ्या ऑरेंज कलरमध्ये न्हाऊन निघालेल्या या दोन अल्ट्रा मॉडर्न शहरांना, नव्हे देशांना भेट द्यायला काय मजा येईल नाही. वुई आर रीअली लुकिंग फॉरवर्ड टू इट. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आम्ही कूच करणार आहोत टांझानिया आणि झांझिबारला. आणि ह्या वर्षी आमचं पर्यटक म्हणून पर्यटन करण्याची सांगता होणार जानेवारीमध्ये फिलिपिन्स मनिला सेबु ह्या टूरने. सो ह्यावेळी आठ देशांचा दौरा ऑलरेडी प्लॅन झालाय. आत्ता लिहितानाच मला दमायला झालं आमची पर्यटनाची ही हाव बघून. पण गेल्यावर्षी असंच सहा महिन्यात शंभर दिवस दौरा करून आम्ही स्वत:ला टेस्ट केलं. वुई आर फिजिकली फिट चं सर्टिफिकेट अगदी प्रॅक्टिकलसह आम्हीच आम्हाला देऊन टाकलं. आवडतं काम असलं की दमायला थकायला होत नाही ते असं. असो.
तर ह्या क्रुझवर आम्हा पर्यटकांच्या दिमतीला जी काही टीम आहे ती पण आमच्यासारखी पर्यटनपागल वाटली मला. प्रचंड कामात व्यस्त असते ही टीम पण चेहऱ्यावर कधी म्हणून कधी थकल्याचा वैतागल्याचा मागमूसही नाही. कॅप्टनपासून अगदी छोट्यातला छोटा नव्याने जॉइन झालेला टीम मेंबर एखादं व्रत घेतल्यासारखा आपल्यासमोर उभा. त्या दिवशी क्रुझवरच्या एक्झिक्युटिव्ह शेफ अमित रावने अतिशय सुंदर प्रेझेंटेशन दिलं, क्रुझवरच्या चमचमीत जेवणांमागचं रहस्य आणि अर्थातच व्यवस्थापन उलगडून दाखवलं. `आज ह्या लक्झरी क्रुझवर मी जरी एक्झिक्युटिव्ह शेफ असलो तरी माझी सुरुवात झाली ह्या भांडी साफ करणाऱ्या आमच्या टीमसारखीच. आम्हाला आमच्या कोर्सचा भाग म्हणून ते करावंच लागतं, पण दॅट हार्डवर्क पेड ऑफ. बघा ही माझी टीम सकाळ संध्याकाळ भांडी क्लीन करीत असते तुम्हा सर्वांसाठी पण ते काम कसं हसत खेळत करेतय बघा’. अमित राव बोलत होता पण माझं मन आम्हाला रोज संध्याकाळी सेव्हन कोर्स मिल्स देणाऱ्या ह्या तरुण मुलांचा विचार करीत होतं. ब्रेकफास्ट-लंच-डिनर ह्या तीनही वेळा ही सर्व मुलं हसऱ्या चेहऱ्याने आपल्या स्वागताला आणि सेवेला उभी. मोठमोठे ट्रे घेऊन किचन टू डायनिंग हॉल आणि परत असं सतत करीत रहायचं. तरुण असले म्हणून काय झालं किती दमत असतील ते. त्यातली काही मुलं आम्हा सर्वांना म्हणजे दोनशे जणांना नावाने हाक मारीत होती. आणि त्या डायनिंगमधला त्यांचा बॉस, आपल्या दिल्लीचाच एफॲडबी मॅनेजर पुनीत सायल तर दोनशे जणांना नावाने हाक मारायचा. त्याला विचारलं, कसं काय जमतं तुला तर म्हणे `भगवान की देन आणि आय लव्ह टू सर्व्ह. मग त्या तेरा दिवसांसाठी हे माझं कुटुंब बनून जातं, आणि सर्वांची नावं लक्षात राहतात’. बरं हे एवढंच नाही तर ह्यातली ड्रिंक्स सर्व करणारी मुलं मधल्या वेळात कॉकटेल्स सर्व्ह करायला अपरडेकवर बारमध्ये असायची. किती हार्डवर्क ते. पण ते ती आनंदाने करीत होती कारण भाविष्यात त्यांना अमित राव सारखं बनावंसं वाटत असणार. जेव्हा लक्ष असं अमुक एक लक्ष्यावर असतं नं तेव्हा काम आनंद बनून जातं. स्टॅमिना वाढत जातो आणि लक्ष्य हासील करणं सोप्पं जातं. त्यांना इतकी मेहनत करताना बघून वाटलं की ही जी हार्डशिप आहे ती विद्यार्थीदशेत मुलांना कशी करवता येईल हे बघितलं पाहिजे. पुर्वीच्या गुरुकुल सारखी किंवा काही देशांमधल्या मिलिटरी ट्रेनिंग सारखी शिस्त आणि कष्ट ह्यामधून त्यांना तावून सुलाखून काढलं पाहिजे. मुलांना फिजिकली, मेंटली आणि स्पिरिच्युअली कणखर बनवणं ही काळाची गरज आहे. सेवा क्षेत्रात किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमधे आपण काम करीत असताना स्पिरिच्युआलिटीचा प्रवेश नकळतपणे आपल्या व्यक्तिमत्वात होतोच.
एकंदरीतच क्रुझवरच्या तेरा दिवसांमध्ये आम्हाला जणू शिक्षणाचे धडे गिरवायला मिळाले. आम्ही नशीबवान होतो आम्हाला बल्गेरियन कॅप्टन श्री लुइबोसोबत डिनरचा सन्मान मिळाला. ते अडीच तास अगदी मंतरलेले गेले. कॅप्टनसोबत को कॅप्टन होती इव्हाना, स्लोव्हाकियाची. इतकी जबरदस्त स्मार्ट दिसत होती त्या युनिफॉर्ममध्ये. लहानपणापासून आपल्याला ह्या युनिफॉर्मचं प्रचंड आकर्षण असतं. गप्पा मारता मारता कळलं आमची को कॅप्टन ही चक्क महाराष्ट्रातल्या आपल्या अंधेरीच्या कुलकर्ण्यांची सून आहे. इव्हाना अमित कुलकर्णी. तिने गळ्यातलं काळ्या मण्यांचं छोटं मंगळसूत्रही काढून दाखवलं. आतातर आम्हाला क्रुझ अगदी आपलीच वाटायला लागली. कॅप्टनला विचारलं, ‘जसं आमचं तेरा दिवसांचं आहे तसं एक एक्सपीडिशन झालं की किती रेस्ट घेता?’ तर म्हणाले ‘ओ यस आम्हाला पाच सहा तासांची रेस्ट मिळेल. तुम्ही नऊ-दहा वाजता बाहेर जाल आणि त्यानंतर तीन वाजता नवीन एक्सपीडिशनचे पर्यटक येतील. ’कॅप्टनने कितीही म्हटलं तरी त्या पाच-सहा तासांच्या रेस्टला काही अर्थ नव्हताच. थोडक्यात त्यांचं शेड्युल हे येणारे चार महिने संपूर्णपणे एक दिवसाचीही विश्रांती न घेता तसंच सुरू राहणार होतं. कुठून येत असेल हा स्टॅमिना, काय असेल ती इच्छाशक्ती. ह्या क्रुझवर आम्हाला आणि आमच्या पर्यटक मित्रांनाही जाणवलं की, इथली टीम ही एका वेगळ्या चांगल्या हेतूने प्रेरित आहे आणि म्हणूनच इतर क्रुझेस्पेक्षा वेगळी आहे. फक्त पैसा हे ध्येय्य नाहीये. 'कर्मण्येवाधिकारस्ते...’ सारखं त्यांचं काम सुरू होतं.
त्यांना बघून आमचे पुर्वीचे टूर मॅनेजर असतानाचे दिवस आठवले. आमचे टूर मॅनेजर्ससुद्धा जेव्हा टूरवर असतात तेव्हा दिवस रात्र असेच कष्ट घेत असतात पर्यटकांच्या आनंदासाठी.
पैसा महत्वाचा आहे, कष्टाचा योग्य मोबदला पैशाच्या स्वरुपात मिळालाच पाहिजे पण पैशापेक्षाही मोठं ध्येय जर समोर असेल तर मग स्टॅमिना आपोआप डेव्हलप होत जातो. आपण प्रत्येकाने आपल्यातल्या 'स्टॅमिना' ला टेस्ट करून पाहिलं पाहिजे आणि स्टॅमिना कमी असेल तर आपलं ध्येय तपासून घेतलं पाहिजे.
अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...
दक्षिण अमेरिका खंडातील आकारानं दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश म्हणजे ‘अर्जेंटिना’. प्राचीन इंका साम्राज्याचे अवशेष मिरविणाऱ्या या देशावर पूर्वी स्पॅनिश राजवट होती. नैसर्गिक साधन सामग्रीबरोबरच परंपरेचा वारसा आणि निसर्गसौंदर्य जोपासणाऱ्या अर्जेंटिनाकडे जगभरातल्या पर्यटकांची पावलं वळतात. अर्जेंटिनाच्या स्वातंत्र्य लढ्याला जिथून आरंभ झाला, ते ब्युनोस आयरेस हे शहर आज या देशाची राजधानी आहे. साउथ अमेरिकेचं पॅरिस म्हणून ओळखलं जाणारं हे शहर इथल्या युरोपियन धाटणीच्या वास्तू वैभवासाठी आणि कल्चरल वातावरणासाठी प्रसिध्द आहे. या शहराजवळचं एक पर्यटन आकर्षण म्हणजे ‘एल टिग्रे’. आता दक्षिण अमेरिकेतल्या देशातलं एक ठिकाण ‘टिग्रे’म्हणजे टायगर-वाघाच्या नावानं का ओळखलं जातं? तर इथे वाघ म्हणजे भारतातला पट्टेरी वाघ नसून या भागात आढळणारा ‘जॅग्वार’ हा आपल्या बिबट्याचा भाइबंद अपेक्षित आहे. वसाहतीच्या काळात 1820 मध्ये पाराना नदीच्या काठावरील या भागात असलेल्या जॅग्वारची शिकार करून इथं मानवी वस्ती वसवण्यात आली होती, म्हणून हा भाग वाघांच्या नावाने ओळखला जातो.
पाराना नदीच्या डेल्टा म्हणजे त्रिभूज प्रदेशात इथूनच प्रवेश करता येतो. या डेल्टामध्ये जलसफर करताना स्थानिकांचं जनजीवन पहायला मिळतं. इथे तुम्ही कयाकिंग, कनुइंग यांचा आनंद लुटू शकता. वसाहतीच्या काळात इथे फळबागा तयार झाल्या आणि ‘प्युएर्तो दे फ्रुतोस’ म्हणजे फ्रुट मार्केट्स म्हणून हा भाग प्रसिध्द झाला. आता त्या मार्केटमध्ये क्राफ्ट फेअर आहे. नदीकाठची रेस्टॉरंट्स, बार्स, कसिनोज्, ॲन्टिक शॉप्स यामुळे पर्यटक या भागाला आवर्जून भेट देतात. इथल्या ‘पासेओ व्हिक्टोरिया’ या प्रोमेनाडवरून रमत गमत फेरफटका मारणं हा अनुभव घ्यायलाच हवा. नदीकाठावरचा हा रस्ता झाडांच्या आच्छादनाने झाकलेला आहे आणि कारंजी, गॅलरीज् यामुळे त्याची शोभा आणखी वाढलेली आहे. शिवाय इथं असलेला ‘पार्के दे ला कोस्टा’ हा अम्युझमेंट पार्क या भागाचे खास आकर्षण ठरला आहे. तसंच इथं इंग्लिश स्टाइल रोइंग क्लबही आहेत. यातील ‘टायगर क्लब’ च्या पारंपरिक शैलीतील भव्य वास्तूचं रुपांतर आता ‘मुसेओ दे आर्ते टिग्रे’ मध्ये करण्यात आलं आहे. या म्युझियमध्ये अर्जेंटिनामधील कलाविष्करांचे नमुने जतन केले आहेत. ‘माते’ हे साउथ अमेरिकेचं खास पेयं, या मातेचं ही एक म्युझियम इथे आहे. अर्जेंटिनाचा सागरी इतिहास जतन करणारं ‘अर्जेंटिना नेव्हल म्युझियम’ देखील इथे आहे. ब्युनोस आयरेस मधून ‘टिग्रे’ ला येण्यासाठी ‘ट्रेन दे ला कोस्टा’ ही खास रेल्वे आहे.
तर अशा ह्या अफलातून अर्जेंटिनाला भेट देण्यासाठी वीणा वर्ल्डची साऊथ अमेरिका टूर करायलाच हवी.
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन
100 Country Club
आता कुठे?
मला ओळखणाऱ्या व्यक्ती मी भेटल्यावर किंवा मला फोन केल्यावर पहिला प्रश्न हाच विचारतात की `आता तू कुठे चाललीस?’कारण आता सगळ्यांना माझं प्रवासाचं वेड माहित झालंय. एकतर मी मुदतपूर्व निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ असतो. या वेळेचा उपयोग मी नवनवीन पर्यटन स्थळांची माहिती मिळवायला करते आणि मग त्यातल्या एकेका ठिकाणाला जाऊन भेट दिल्याशिवाय मला चैन पडत नाही. कोविड काळात निर्बंधामुळे सक्तीने वर्षभर घरातच बसावं लागलं पण त्यानंतर मात्र मी जवळपास दर महिन्याला माझी पर्यटन यात्रा सुरू केली. कोविड आपत्तीमुळे मला जाणीव झाली की उद्याचा भरवसा नाही, मग आजच आयुष्याचा आनंद घ्यायला हवा म्हणून मी माझ्या पर्यटनाच्या छंदाला जणू वाहूनच घेतलं. त्यात मला साथ मिळाली वीणा वर्ल्डची. 2014 पासून माझ्या देश-विदेशातील सहलींचे स्वप्न मी वीणा वर्ल्ड सोबतच साकार करीत आले आहे. आता जरी मी मस्कतमध्ये राहत असले तरी वीणा वर्ल्डच्या पुणे ऑफिसमधूनच मी माझ्या टूर्स बूक करते. आजपर्यंत मी भारतातील 26 राज्यांना भेट दिली आहे आणि जगातील 60 देश पाहिले आहेत. वीणा वर्ल्डसोबत मी आता सप्टेंबरमध्ये ‘ट्युनिशिया माल्टा सिसिली’ या टूरवर जाणार आहे तर नोव्हेंबरमध्ये साउथ अमेरिकेची 21 दिवसांची टूर बूक केली आहे. त्यामुळे मग मी पाहिलेल्या देशांचा आकडा 67 होईल. वर्ल्ड टूरची जी बकेट लिस्ट आहे त्यामध्ये इस्रायल, अलास्का, कॅनडा, तैवान, ऑस्ट्रेलिया, टांझानिया आणि बाल्टिक युरोप या डेस्टिनेशन्सचा समावेश आहे. भारतातली अनेक ठिकाणं मी पाहिलेली असली तरी मला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जायला आवडेल. आपल्या भारताला वैविध्याचं लेणं लाभलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक राज्याची, प्रदेशाची खासियत वेगळी आहे. कुठे हिमालयाचं अद्भुत रूप आहे तर कुठे सागराची मोहक गाज आहे. त्यामुळे एकाच राज्यावर किंवा ठिकाणावर पसंतीची मोहर उमटवणं कठीण आहे. परदेशातील लंडन हे असं एक शहर आहे, ज्याचं गारुड माझ्या मनावर कायम पडलेलं आहे. आजपर्यंत मी दोन वेळा लंडनला भेट दिली, प्रत्येक वेळी मला ते शहर नवं भासलं. तिथल्या उत्स्फूर्त वातावरणात नव्या जागा बघायला मला मजा आली.
संगीता भाटे, मस्कत, ओमान
काय बाई खाऊ कसं गं खाऊ!
उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जाणारा जपान तिथल्या पुरातन संस्कृती आणि परंपरांसाठी ओळखला जातो. या परंपरेमधूनच जपानमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यातलाच एक म्हणजे ‘मोची’. हा पदार्थ ‘जॅपनिज राइस केक’ म्हणूनही प्रसिध्द आहे. जपानी लोकांच्या आहारात भाताचा समावेश असतोच, त्यामुळेच आपल्या कोकणात जसे भातापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात तसे जपानमध्येही पहायला मिळतात. प्राचीन काळात जपानमध्ये ‘मोची’मध्ये काही दैवी सामर्थ्य असल्याचा समज प्रचलित होता. मोचीसाठी जो चिकट तांदुळ वापरला जातो तो ‘मोचीगोमे’ म्हणजे मोची राइस म्हणून ओळखला जातो. हा तांदुळ रात्रभर भिजवून मग दुसऱ्या दिवशी शिजवतात, त्यानंतर जपानी पारंपरिक ‘रगड्यात’ हा भात चक्क रगडला जातो. अलिकडे यासाठी मशिन्स वापरली जातात. वाटलेल्या भाताचे गोळे वळले जातात. मोचीला वेगवेगळे आकार दिले जातात कारण भाताच्या वड्याही करता येतात. स्वीट मोची बनवण्यासाठी ‘मोचीको’ हा गोड तांदुळ वापरतात आणि त्यात आणखी साखरही घालतात.
डाइफुकू मोचीमध्ये स्वीट रेड बीन पेस्ट भरलेली असते तर किनाको मोची करताना त्यावर गोड सोयाबिनची पावडर शिंपडली जाते. चेरी ब्लॉसमच्या काळात बनवली जाणारी साकुरा मोची ही गुलाबी रंगाची, गोड मोची असते. ही मोची साकुरा म्हणजे चेरीच्या पानात गुंडाळलेली असते आणि पानासकट खायची असते. मोची जपानमध्ये न्यू इयर साजरे करताना बनवण्यात येते. मोची आइसक्रीमही जपानमध्ये लोकप्रिय आहे. हिवाळ्यात उब मिळण्यासाठी जपानी लोक‘ओझेन्झाइ’ हे बीनचे सुप करून त्यात मोचीचे तुकडे घालून पितात. जपानी मोचीचा कोरियन अवतारही आहे.
देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा‘ ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.
नॉर्दर्न लाइट्स आणि...
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज् सोबत
नॉर्वे, फिनलँड, डेन्मार्क आणि स्विडन या देशांनी बनलेल्या नॉर्दर्न युरोपच्या भागाला ‘स्कँडेनेव्हिया’ं या नावाने ओळखतात. अतिशय रमणीय निसर्ग, रोमांचक इतिहास, बहुरंगी संस्कृती याची देणगी मिळालेला हा भाग इथल्या नैसर्गिक वातावरणामुळे काही अद्भुत गोष्टींसाठीही ओळखला जातो. त्यातलीच एक म्हणजे ‘नॉर्दर्न लाइट्स’ किंवा ‘ऑरोरा बोरेआलिस’. निसर्गाचा हा चमत्कार या प्रदेशात पहायला मिळतो तो सप्टेंबरच्या अखेरीपासून ते मार्चच्या आरंभापर्यंत. या काळात इथलं काळोखात बुडालेलं आकाश ऑरोरा बोरेआलिसच्या हिरव्या, गुलाबी, लाल, निळ्या रंगाने उजळून निघालेलं पहायला मिळतं.
या वर्षापासून म्हणजे 2024 पासून ते 2026 पर्यंत ऑरोरा बोरेआलिस सर्वात प्रभावीपणे आणि मोठ्या प्रमाणात पहायला मिळणार आहे, त्यामुळे नॉर्दर्न लाइट्स बघण्यासाठी हॉलिडे प्लॅन करण्याचा हा सर्वोत्तम काळ असेल. आकाशातली ही रोषणाई कधी आणि कुठे दिसेल याचं काही टाइमटेबल नसतं, पण म्हणूनच `चेझिंग द नॉर्दर्न लाइट्स’ हा अतिशय थरारक प्रकार असतो. ध्रुविय प्रदेशाच्या ओसाड, निर्मनुष्य आणि वैराण परिसरात ऑरोरा सफारीज् आयोजित केल्या जातात, स्नो मोबाइल, हस्की स्लेड, रेनडियर स्लेज यातील तुमच्या पसंतीचं वाहन निवडून अनुभवी गाइडबरोबर नॉर्दर्न लाइट्सचा मागोवा घेत भटकण्याचा अनुभव तुमच्या हॉलिडेला एकदम इंटरेस्टिंग बनवतो. फिनलँडच्या लॅपलँडमध्ये तुम्ही ‘ऑरोरा फ्लोटिंग’ हा अनोखा अनुभव घेऊ शकता. तारकांनी उजळलेल्या आकाशाखाली गोठलेल्या तलावावर तरंगत नॉर्दर्न लाइट्स बघण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. फिनलँडला गेल्यावर ‘फिनिश सॉना’ चा रिफ्रेशिंग अनुभव तर घ्यायलाच हवा. फिनलँडमधला एक युनिक एक्सपिरियन्स म्हणजे ग्लास इग्लू मधल्या ऑरोरा डोममधून दिसणारे नॉर्दर्न लाइट्स तुम्ही झोपून म्हणजे अगदी आपल्या गादीवर पडून पाहू शकता. बाहेरच्या बर्फाळ वातावरणाचा जराही त्रास न होता, उबदार वातावरणात हिरव्या निळ्या प्रकाशाने उजळलेल्या काळोख्या आकाशाचा 360 अंशातला नजारा तुम्हाला बघता येतो. फिनलँडच्या बर्फमय जगात तुम्ही रोव्हानिएमी मधल्या स्नो हॉटेलमध्ये वास्तव्य करू शकता, तसेच स्नो चॅपलमध्ये लग्न करण्याचीही सोय आहे. स्नो रेस्टॉरंटमध्ये भोजनाच्या आस्वादासोबत आइस बारमध्ये ड्रिंक्स घेऊ शकता आणि स्नो कॅसलमध्ये खेळू शकता. लॅपलँडचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘सांताक्लॉज व्हिलेज’. इथे तुम्ही सांताबाबाला प्रत्यक्ष भेटण्याबरोबरच स्लेज किंवा स्नोमोबाइलची सफरही करु शकता. पोलार लाइट्स बघण्यासाठी अवश्य भेट द्यावी अशी जागा म्हणजे ‘स्वालबार्ड’. नॉर्वे आणि उत्तर ध्रुवाच्या मध्ये असलेल्या या ठिकाणी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात सूर्यच उगवत नाही आणि त्यामुळे नॉर्दर्न लाइट्स बघण्यासाठी अतिशय पोषक वातावरण तयार होतं. या भागात तुम्ही ग्लेशियर्समध्ये तयार झालेल्या आइस केव्हजमध्ये फेरफटका मारू शकता. स्वालबार्डमध्ये नॉर्दर्न लाइट्सचा अप्रतिम नजारा तर पहायला मिळतोच पण त्याचबरोबर पोलार बेअर्स बघायला मिळण्याची शक्यताही असते.
चला तर मग नॉर्दर्न लाइट्सचे आगळेवेगळे अनुभव घ्यायला. मार्गदर्शन करायला वीणा वर्ल्डची कस्टमाइज्ड हॉलिडे टीम सज्ज आहेच.
काय बघावं? कसं बघावं?
अफलातून युरोप वीणा वर्ल्ड सोबत
पंचवीसएक वर्षांपुर्वी युरोपला जाणं म्हणजे एक दिव्य असायचं. रुपया खुला झाला नव्हता. तीन वर्षांतून फक्त एकदाच पाचशे युएस डॉलर्स मिळायचे. व्हिसा काढणं म्हणजे प्रचंड जिकिरीची गोष्ट असायची. पर्यटकही अगदी तुरळक संख्येत युरोपला जायचे. सर्व ट्रॅव्हल कंपन्यांकडे एकाच प्रकारची युरोप टूर असायची. लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, रोम असा सर्वसाधारण कार्यक्रम. मग कुणी त्यात ॲमस्टरडॅम घुसवायचं, तर कुणी ऑस्ट्रिया. पण एकाच प्रकारची आयटिनरी मला अस्वस्थ करायची. हळूहळू ह्या वेस्टर्न युरोपच्या आयटिनरीज्मध्ये वाढ व्हायला लागली. अगदी पाच दिवसांपासून पंचवीस दिवसांपर्यंतच्या टूर्स आल्या आणि ते सेट झाल्यावर पुन्हा मी अस्वस्थ. मग नॉर्दर्न युरोपमधल्या स्कॅन्डिनेव्हियाची भर पडली आणि नेहमीच्या वेस्टर्न युरोपच्या देशांसोबत डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंडची वर्णी लागली. युरोपचा पसारा वरच्यासाईडला म्हणजे उत्तरेकडे वाढविल्यावर दक्षिणेकडचे देश म्हणजे मेडिटेरेनीयन युरोप खुणावायला लागला आणि ग्रीस, टर्की, स्पेन, पोर्तुगाल, मोरेक्को युरोपच्या बँडवॅगनमध्ये सामील झाले. हे होत असताना इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स 'हम भी कुछ कम नहीं' म्हणत युरोपीयन यात्रेतले सहचर झाले. एवढा युरोप पादाक्रांत केल्यावर इस्टर्न, सेंट्रल, बाल्टिक आणि बाल्कन कंट्रीज् थोड्याच मागे राहणार? इस्टोनिया, लॅटविया, लुथवानिया, पोलंड, स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया, हंगेरी, चेक रीपब्लिक, क्रोएशिया सारख्या देशांची डीमांड वाढली आणि युरोप एकदा बघण्याचा नव्हे तर अनेक वेळा बघण्याचा खंड झाला. त्यामुळेच आम्ही पर्यटकांना ‘युरोप बघण्याचं सिस्टेमॅटिक प्लॅनिंग करा' हा सल्ला देऊ लागलो. वीणा वर्ल्डच्या युरोपीयन टूर्सही आम्ही तशाच आखल्या आहेत. आत्ताही सप्टेंबरमध्ये युरोपच्या 70 टूर्स निघाल्या आहेत वीणा वर्ल्डच्या. युरोपमधला ह्या वर्षीचा कडक उन्हाळा आता कमी झालाय. तेव्हा चला युरोपला, वीणा वर्ल्डसोबत गणपतीनंतर, दिवाळीत किंवा चक्क ख्रिसमसमध्ये. चलो, बॅग भरो, निकल पडो! यावर्षी युरोपला.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.