IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...

16 mins. read
Published in the Sunday Sakal on 20 October, 2024

आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची पाळेमुळे  महाराष्ट्राबाहेर इंदोर-ग्वाल्हेरपासून तमिळनाडूपर्यंत पसरलेली पहायला मिळतात. दक्षिण भारतावर मराठेशाहीचा ठसा उमटवला तो तंजावूरच्या ‘व्यंकोजीराजे भोसले’ यांनी. ह्याच तंजावूर शहरात सगळ्या भारतीयांना अभिमान वाटावा असे एक भव्य मंदिर शतकानुशतकं उभं आहे. हे मंदिर म्हणजेच ‘श्री बृहदेश्वर’ अर्थात ‘राजराजेश्‍वरम्‌‍‘ मंदिर. तंजावूर शहरावर मुथरीयार, पांड्य, चोळ राजवंश, विजयनगर, मदुराईचे नायक, तंजावूरचे नायक, मराठे आणि शेवटी ब्रिटिश अशा अनेक राजवटी होऊन गेल्या. यातील चोळ राजवंशातील सम्राट राजाराजा प्रथम ह्यांनी सन 1003 ते 1010 या काळात हे मंदिर उभारले.

आज जगभरातील सर्वात विशाल मंदिरांपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर युनेस्कोच्या विश्‍व वारसा यादीत ‘ग्रेट लिव्हिंग चोला टेम्पल्स’ म्हणून समाविष्ट आहे. या मंदिराच्या गर्भगृहावरील ग्रॅनाइटचा ‘विमान’ (गोपुर) हा भाग दक्षिण भारतातील सर्वात उंच ‘विमान‘ म्हणून ओळखला जातो. गाभाऱ्यातील भव्य शिवलिंग हे भारतातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक मानलं जातं. या मंदिराच्या समूहात नंदी, पार्वती, गणेश, मुरुगन (कार्तिकेय), दक्षिणमूर्ती, वराही, चंदेश्‍वर, सिध्द करुवूरार यांची मंदिरे आहेत. पूर्व-पश्चिम 790 फूट आणि उत्तर-दक्षिण 400 फूट इतक्या मोठ्या परिसरावर हे मंदिर उभारलेलं आहे. या मंदिराच्या प्रदक्षिणेचा प्राकार 1400 फूटांचा आहे. शिवाच्या उपासनेसाठी बांधलेल्या या मंदिरात वैष्णव आणि शाक्त पंथिय दैवते, प्रतिके पहायला मिळतात. या मंदिरातील ब्रॉन्झचा भव्य नटराजही प्रसिध्द आहे. या नटराजाच्या अनेक प्रतिकृती आता भारतभरातील म्युझियम्समध्ये पहायला मिळतात. या मंदिराच्या महामंडपमच्या भिंतींवर भैरव, गणेश, महिषासुरमर्दिनी, विष्णू, सरस्वती, गजलक्ष्मी यांच्या मोठ्या प्रतिमा कोरलेल्या पहायला मिळतात. ह्या मंदिराला जसं कोरीव शिल्पांनी सजवलेलं आहे तसंच भित्तीचित्रांचा वापरही इथे केलेला पहायला मिळतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील नंदीची विशाल, एकाच पत्थरात घडवलेली मूर्ती पाहून त्या काळातील कलाकारांच्या सामर्थ्याची प्रचिती येते. मंदिराच्या भिंतींना बाहेरून सुशोभित करताना त्यावर कोरलेल्या ‘भरतनाट्यम’च्या एक्याऐंशी मुद्रा पाहताना ते कोरीवकाम करणाऱ्या कलाकारांविषयीचा आदर पराकोटीला जातो. हे मंदिर प्राचीन अभियांत्रीकी ज्ञानाचा सर्वोत्तम नमुना मानले जाते, कारण मंदिर उभारताना वापरलेले दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना वा अन्य कोणत्याही बाह्य साधनांचा वापर केलेला नाही. तसंच या विशाल मंदिराची सावली पडणार नाही अशा पध्दतीने त्याची उभारणी केली आहे.

तर मग भारतातील या अनोख्या भव्य मंदिराचे दर्शन घेण्यासाठी वीणा वर्ल्डच्या साउथ इंडियातील सहलींमध्ये अवश्‍य सहभागी व्हा.

 

वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

100 Country Club

दुनिया मे फोटो अल्बम में...!

गे ली अनेक वर्षं आपल्या भारतातील वैविध्याने नटलेली राज्यं आणि तशाच विविधतेनं आकर्षून घेणा जगाच्या पाठीवरचे वेगवेगळे देश बघत मी पर्यटनाचा आनंद घेत आहे. माझ्या या भटकंतीचा खास पैलू म्हणजे मी ज्या ज्या देश-प्रदेशांना भेट दिली  तिथल्या सुंदर निसर्गाचे, मानवनिर्मित आकर्षणांचे मी काढलेले फोटो माझ्याकडे संग्रहित आहेत. मी थोडा ‘जुन्या वळणाचा’अोल्ड स्कूलवाला असल्याने डिजिटल फोटोंपेक्षा प्रत्यक्ष प्रिंट काढणं जास्त पसंत करतो, त्यामुळे ‘दुनिया मे फोटो अल्बम में ’ असं मी नक्कीच म्हणू शकतो. मी लातूरला राहतो आणि तिथल्या ‘सह्याद्री टूर्स’ या वीणा वर्ल्डच्या सेल्स पार्टनरकडून माझ्या टूर्स बूक करतो. परदेश पर्यटनासाठी मला वीणा वर्ल्ड जास्त विश्‍वासार्ह सहलसोबती वाटतो. 2017 पासून मी वीणा वर्ल्डसोबत पर्यटन करत आलो आहे. दरवर्षी मी साधारण तीन टूर्स करतो. 2024 मध्ये मी 25 देश पूर्ण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं आणि मला सांगायला आनंद होत आहे की मी माझं उद्दिष्ट तर गाठलंच पण त्यापुढे मजल मारली कारण आता माझे 27 देश बघून झाले आहेत. भारतातील राज्ये आणि युनियन टेरिटरीज मिळून मी एकूण 12 प्रदेश बघितले आहेत. पर्यटन म्हणजे माझ्यासाठी रीलॅक्सेशन असतं. निसर्गाची विविध रुपं बघण्यात आपलं तन-मन अगदी रिफ्रेश होतं, शिवाय वेगवेगळ्या संस्कृतींची-लोकजीवनाची माहिती मिळते.

मी पाहिलेल्या देशांमध्ये मला ‘डावं-उजवं’ करायला आवडत नाही. मात्र तरीही परदेश प्रवासातील माझा सर्वात संस्मरणीय प्रवास ‘ऑस्ट्रेलिया’चा होता. 2018 मधली ऑस्ट्रेलिया सहल विशेषतः तिथे पाहिलेलं द ग्रेट बॅरिर रीफमधलं कोरल्सचं अफलातून जग मी विसरूच शकत नाही. भारतातील राजस्थान या राज्यातील शाही महाल, ऐतिहासिक किल्ले यांनी मला मोहून टाकलं. तिथल्या लोकांनी आपल्या परंपरांचं पालन करून राजपुतानी संस्कृती जपली आहे, त्याचं मला कौतुक वाटतं. केरळमधील डोळ्यांना सुखावणारी हिरवार्इ, बॅकवॉटर्स आणि वन्यजीवन यामुळे केरळची सहलही मी विसरू शकत नाही. आसाम, मेघालय,सिक्कीम पाहिल्यानंतर मला नॉर्थ र्इस्ट मधील उर्वरित राज्ये पाहायची ढ लागली आहे तसेच भारतातील  झारखंड, जम्मू कटरा वैष्णोदेवी यांना मला भेट द्यायची आहे. पुढच्या वर्षी मी भूतानला जाणार आहे. बॅग भरो, निकल पडो माझ्या जीवनाचा भाग झालंय.

  काय बार्इ खाऊ कसं गं खाऊ!

साउथ अमेरिकेच्या पश्‍चिम भागातील पेरू हा आकाराने लहानसा देश तिथल्या वैविध्यपूर्ण निसर्गासाठी अोळखला जातो. या चिमुकल्या देशात प्राचीन काळात नाझ्का, कुस्को, इंका अशा बलाढ्य संस्कृती नांदल्या. आधुनिक काळात या देशावर स्पॅनिश राजवट होती, ह्या सगळ्याचं प्रतिबिंब इथल्या खाद्यसंस्कृतीवर पडलेलं पहायला मिळतं. पेरूमधल्या लोकांच्या आहारात प्रामुख्याने कॉर्न, बटाटे, किनोआ, बीन्स, तांदूळ, गहू, चिकन, पोर्क आणि बीफचा समावेश असतो. सगळ्या जगात पेरूइतक्या बटाट्याच्या विविध जाती कुठेच मिळत नाहीत. पेरूमधील ‘चिचा मोरादा’ हे पेय तिथल्या ॲन्डीज्‌‍ पर्वतरांगाच्या भागातलं आहे पण आता ते जणू या देशाचं राष्ट्रीय पेय बनलं आहे. स्थानिक ज्याला ‘कॉर्न कुली’ म्हणतात त्या पर्पल कॉर्नपासून हे पेय तयार केलं जातं. नावाप्रमाणेच या मक्याचे दाणे जांभळ्या रंगाचे असतात आणि त्यामुळे हे पेयही जांभळ्या रंगाचे असतं.

पारंपरिक पध्दतीने चिचा मोरादा तयार करताना जांभळ्या मक्याचे वाळवलेले दाणे उकडतात, पाण्यात मका शिजताना त्यात अननसाची साल, क्विन्स (पेअर सारखे स्थानिक फळ), थोडी दालचिनी आणि लवंगा घालतात. मग हे उकळलेले मिश्रण गाळून घेतात आणि गार झाल्यावर त्यात साखर किंवा गूळ घालतात. तसेच आवडीनुसार फळांचे काप, लिंबाचे कापही घालतात. आता डी टू मिक्स आणि डी टू ड्रिंक अशा दोन प्रकारातही ‘चिचा मोरादा‘ मिळतं. पर्पल कॉर्नमधील औषधी गुणधर्मामुळे आता चिचा मोरादा पेरूबाहेरही लोकप्रिय होऊ लागलं आहे.

देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लार्इफ ’हा पॉडकास्ट नक्की ऐका.

www.veenaworld.com/podcast

न्यूझीलंड फॉर ऑल

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍सोबत

यादेशात माणसांपेक्षा मेंढ्या जास्त आहेत. म्हणजे एका माणसामागे 5 मेंढ्या! जगाच्या पाठीवरचा हा अफलातून एकमेव देश म्हणजे न्यूझीलँड. ज्या देशातल्या एका शहराच्या नावात सर्वात जास्त म्हणज 85 अल्फाबेट्‌‍स आहेत, असा देश म्हणूनही न्यूझीलँड अोळखला जातो. अप्रतीम निसर्गसौंदर्य, आगळी वेगळी माअोरी संस्कृती आणि रोमांचक ॲडव्हेंचर स्पोर्ट्‌स यामुळे जगभरातले पर्यटक न्यूझीलंडकडे आकर्षित होतात. इथल्या निसर्गातील अजब गोष्टी, इथली अनोखी परंपरा ह्यामुळे न्यूझीलंड हे कुटुंबातल्या वेगवेगळ्या वयोगटाच्या सदस्यांना मिळून हॉलिडेसाठी एक झक्कास ठिकाण आहे.

हा देश नॉर्थ आयलंड आणि साऊथ आयलंड या दोन मोठ्या बेटांनी मिळून बनलेला आहे. नॉर्थ आयलंड झगमगत्या शहरांसाठी, अनोख्या माअोरी कल्चरसाठी आगळ्या जिअोथर्मल ॲक्टिव्हिटीज्‌‍साठी तर साऊथ आयलंड नयनमनोहर देखावे आणि ॲडव्हेंचर टूरिझमसाठी अोळखलं जातं. नॉर्थ आयलंडवरचा तुमचा हॉलिडे उजळून निघतो तो ‘वायटोमो केव्हज्‌‍’ मधल्या हजारो ग्लोवर्म्समुळे. त्या अंधाऱ्या गुहेच्या छतावरचे ते चमकणा जीव बघताना लाखो ताऱ्यांनी उजळून निघालेलं आकाश आठवतं. रोटोरुआ शहर माअोरी कल्चर आणि गिझर्ससाठी प्रसिध्द आहे. इथे तुम्ही पारंपरिक ‘हाका’ सादरीकरण बघताना ‘हांगी’ म्हणजे मातीच्या अोव्हनमध्ये शिजवलेल्या ेडिशनल जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. लेक रोटोरुआच्या काठावरील पॉलिनेशियन स्पामध्ये नैसर्गिक मिनरल झऱ्यांमध्ये आंघोळ करून स्वतःला रिज्युवेनेट करू शकता. तुम्ही जर ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ आणि ‘हॉबिट ’या सिनेमांचे फॅन असाल तर ‘हॉबिटन मूव्ही सेट’ला भेट द्यायलाच हवी. याच ठिकाणी या सिनेमांचे शूटिंग झाले होते. ऑकलंड जवळच्या बे ऑफ आयलंडस्‌‍ची भेट संस्मरणीय होते, कारण इथे तुम्ही ‘डॉल्फिन वॉचिंग टूर्स’ करता. या टूरमध्ये तुम्हाला ह्या खेळकर प्राण्यांबरोबर थोडी मजा करायची संधी मिळते.

साऊथ आयलंडवर तर तुम्हाला अधिक रोमांचक अशी ‘व्हेल क्रुझ’ करता येते. व्हेल बघण्यासाठी ‘कैकौरा’ ही जगातली सर्वोत्तम जागा मानली जाते. फ्रॅन्झ जोसेफ ग्लेशियरवरची हेलिकॉप्टर रार्इड आणि ट्रान्स अल्पाइन ट्रेन रार्इड हे दोन अनुभव तर चुकवू नयेत असेच आहेत. निसर्गरम्य प्रदेशातील अतिशय उत्तम दर्जाचे रस्ते ही इथली खासियत असल्याने तुम्ही सेल्फ ड्राइव्ह टूर्सचा आनंदही घेऊ शकता. मुख्य म्हणजे इथेही आपल्या सारख्याच लेफ्ट हँड ड्राइव्ह कार आहेत, त्यामुळे हा अनुभव नक्की घ्यावा. ॲडव्हेंचर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणून प्रसिध्द असलेल्या ‘क्विन्स टाउन’ या शहरात तुम्ही बंजी जम्पिंग, स्काय डायव्हिंग, जेट बोटिंग, स्कीइंग अशा अनेक थरारक खेळांचा आनंद घेऊ शकता. न्यूझीलंडमधील ‘मार्लबोरो’ हा प्रांत प्रिमिअर वार्इन रीजन आहे. तिथल्या विन्यर्डस्‌‍मध्ये तुम्ही वार्इन टूर करून तुमचा हॉलिडे एकदम रंगतदार बनवू शकता.

तुमचा हॉलिडे एक्सायटिंग करण्यासाठी, अनोख्या डेस्टिनेशनवर कुटुंबियांसह रोमहर्षक अनुभव घेण्यासाठी ह्यावेळी न्यूझीलंडचा विचार नक्की करा. मार्गदर्शनासाठी वीणा वर्ल्डची कस्टमार्इज्ड हॉलिडे टीम सज्ज आहेच.

 

लीगली. एथिकली. मॉरली.

दहा वर्षांपुर्वीचा प्रसंग. वीणा वर्ल्ड नुकतंच सुरू झालं होतं. आम्ही मिळून सारे झटत होतो. ऑर्गनायझेशन आकार घेत होती. आम्ही एवढे नशीबवान होतो की सर्वांचा सहानुभूतीपूर्वक पाठींबा आम्हाला मिळत होता आणि काम करायला आणखी बळ मिळत होतं. आमची मैत्रिण नीलू सिंग एक दिवस भेटायला आली. सगळ्या गप्पा झाल्यावर म्हणाली, ‘अरे तुम्ही पूर्ण बुडून गेला आहात हे सगळं निर्माण करण्यात. थोडी विश्रांती घ्या. चला माझ्यासोबत ह्या विकेंडला चेंबूरच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ऑडिटोरियममध्ये. चांगला कार्यक्रम आहे, आवडेल तुम्हाला. थोडं वेगळं काहीतरी कराल.‘ आणि आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी. त्यावेळी यु ट्युब पॉडकास्ट व्हिडीयोकास्ट वा वॉडकास्टचा सुळसुळात नव्हता त्यामुळे मोठमोठ्या व्यक्तिमत्वांकडून विचार ऐकण्यासाठी आपण कुठे कुठे जात असू. मी तर दिल्ली लंडनपर्यंत पोहोचले होते. सो, नीलूने सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम उत्कृष्टच होता. ती संध्याकाळ आमच्यासाठी धन्य झाली होती. कालांतराने अर्थातच आपल्याला विस्मरण होतं कार्यक्रमाचं किंवा त्यातल्या विचारांचं पण ह्या कार्यक्रमात लक्षात राहिलं ते टाटा इंडस्ट्रीज लिमिटेडचे पुर्वीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. किशोर चौकर ह्यांचं भाषण किंवा त्यांनी श्रोत्यांसोबत साधलेला संवाद. त्यातल्या दोन गोष्टी डोक्यात पार तळापर्यंत पोहोचल्या. त्या आम्ही अमलात आणल्या आणि आतातर त्या वीणा वर्ल्ड व्हॅल्युज आणि प्रिन्सिपल्सचा घटक झाल्या आहेत आणि आमच्या इयरली डायरीचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.

पहिली गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे, ‘आज आपण सस्टेनेबिलिटी, ग्लोबल वॉर्मिंग, पाणी, रीसोर्सेस ह्या सगळ्यांवर खूप चर्चा करतोय पण जोपर्यंत मी सकाळी ब्रश करताना पाण्याचा नळ उगाचच वाहता न ठेवता तो नको तेव्हा बंद करीत नाही, पाणी वाचवायची सवय मी मला स्वत:ला आणि माझ्या मुलांना वा माझ्या घराला लावत नाही तोपर्यंत या चर्चांना काही अर्थ नाही’. डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं. आपल्याकडून पाणी वाया जात नाही नं या बाबतीत आत्मपरिक्षण करू लागले. आणि फरक पडला, इतका की सर्व वॉशबेसिन्समध्ये पाणी जे मोठ्या फोर्सने यायचं, बरंच यायचं, ते खालून कमी करून टाकलं. आणि मग सवयच लागली उगाचच वाया जाणारं पाणी, वस्तु, गोष्टी, वेळ ह्यावर मनन चिंतन करायची आणि त्याने एकूणच जीवनशैलीमध्ये फरक पडला.

दुसरी गोष्ट म्हणजे जणू जॅकपॉटच लागला त्या दिवशी. त्यांनी एक प्रसंग सांगितला. एकदा एका कोणत्यातरी केस संदर्भात ते श्री. रतन टाटांचं मत विचारायला गेले. त्यांनी केस समजावून सांगितली आणि त्यावर काय पाऊल उचलायचं ठरवलंय हेही सांगितलं. आणि श्री. टाटांचा कौल मिळविण्यासाठी ते त्यांच्याकडे बघत होते. टाटांनी त्यांना विचारलं, ’आर यु लीगली राइट?’ यस सर! टाटांचा दुसरा प्रश्न होता, ’आर यू एथिकली राइट?’ यस सर! टाटांनी तिसरा प्रश्न केला, ’आर यू मॉरली राइट?’ श्री. चौकर म्हणाले, इथे माझा थोडासा गोफ्लधळ झाला. पण तरीही मी यस सर! म्हणालो आणि टाटांनी मला सांगितलं ’देन गो अहेड!’ श्री. चौकर खाली आले आणि त्यांनी डिक्शनरीमध्ये ’एथिक्स’ आणि ’मॉरल्स’ ह्यातला नेमका फरक काय आहे हे जाणून घेतलं. थँक्यू चौकर सर! अगदी मनापासून, हा प्रसंग शेअर केल्याबद्दल. आयुष्यातलं किती मोठ्ठं कोडं किंवा अनेक कोडी अशी चुटकीसरशी सोडवली गेली ह्या भाषणातून.

लीगली किंवा लीगल म्हणजे काय हे तसं सर्वांना माहित असतं. देशाने राज्याने समाजाने बनविलेले जे नियम वा कायदे-कानून असतात त्याच्या अखत्यारित राहून काम करणे, नियम न मोडणे, नियमाला बगल देऊन जुगाड करून काहीही न करणे म्हणजे ’लीगली राइट’. एथिक्स आणि मॉरल्स ह्या बाबतीत खरंच गोफ्लधळ असतो आपल्या अनेकांचा. ते जाणण्यासाठी मी एकदा आमच्या लीडरशीप मीट मध्ये साठ सत्तर मॅनेजर्स आणि इंचार्जेसना हा प्रश्न केला आणि बऱ्यापैकी गोफ्लधळ निदर्शनास आला. तेव्हा मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्यादिवशीच ह्या बाबतीतला नेमका फरक जाणून घेतला. सोप्या भाषेत सांगायचं तर एथिक्स म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनने आपल्यासाठी बनविलेली नियमावली किंवा कोड ऑफ कंडक्ट किंवा प्रिन्सिपल्स. जोपर्यंत आपण त्या ऑर्गनायझेशनमध्ये असतो तोपर्यंत ते नियम पाळणं किंवा एथिक्स फॉलो करणं बंधनकारक असतं. जेव्हा आपण ह्या सगळ्या बंधनांचं पालन करून गोष्टी करतो तेव्हा आपण म्हणू शकतो ’एथिकली राइट’. तिसरा भाग येतो तो म्हणजे मॉरल्स. मी, म्हणजे एका व्यक्तीने स्वत:साठी बनविलेले नियम, बंधन, शिस्त, लक्ष्मणरेषा इत्यादि गोष्टी म्हणजे माझी मॉरल्स. माझी मॉरल्स मी ठरवायची असतात. ती कुणी आपल्यावर लादलेली नसतात. त्याची नियमावली नसते. आणि म्हणूनच ती फार महत्वाची असतात. इथे स्वत:चाच कस लागतो. आपणच नियम बनवायचे. आपणच आपल्या नियमांची सातत्याने पाठराखण करायची. कुठे आपल्याकडून ह्या नियमांची पायमल्ली झाली तर आपण आपल्याला आपल्याच कोर्टात उभं करून त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं आणि स्वत:ला ’मॉरली राइट’ बनवायचं. सो देशाने-राज्याने-घटनेने जे नियम केलेत ते लीगल, ऑर्गनायझेशनने केलेले नियम म्हणजे एथिक्स आणि स्वत:ने स्वत:साठी केलेले नियम म्हणजे मॉरल्स. हे आम्ही आमच्यासाठी सोप्पं करून टाकलं आणि मग टाटांच्या त्या तीन प्रश्नातली व्याप्ती लक्षात आली. लीगली गोष्टी करणं किंवा एथिकली गोष्टी करणं सोप्पं असतं. कारण समोर एक कुणीतरी घालून दिलेली चौकट असते. त्या चौकटीच्या बाहेर गेलो तर तिथे शिक्षा असते. त्यामुळे ह्या चौकटीत राहून काम करणं सोप्पं आहे. पण ’मॉरल्स’ हा मामला तसा अवघडच. कारण इथे आपल्याला बघणारे आपणच असतो. त्याच लीडरशीप मीटमध्ये मी प्रश्न केला, `सिग्नल रेड दिसला की तुमच्यापैकी किती जण गाडी थांबवता आणि सिग्नल ग्रीन व्हायची वाट बघता?‘ सगळे हात वर. मी चक्रावले. काय म्हणजे ही सिच्युएशन असेल तर भाग्यवान म्हणायची वीणा वर्ल्ड. एवढी आदर्श टीम. वाह! वाह! पण तरीही डाऊट होताच. नॉट पॉसिबल. मी म्हटलं, `माझा अजिबात विश्‍वास बसत नाहीये. सगळे थांबतात सिग्नल रेड झाल्यावर?’ पटकन दोन तीन आवाज आले, ’अहो फोटो काढला जातो नं!’ माझी ट्युबलाइट पेटायला जरा उशीरच लागला. ओ हो, म्हणजे लीगली ते पुर्वीही अलाऊड नव्हतंच, ऑरेंज झाला रे झाला की गाडीचा स्पीड वाढवायचा आणि समोर पोलिस नाहीये नं ह्याची खात्री करून मग भले रेड सीग्नल झाला तरी सीग्नल तोडणारी मंडळी आता थांबत होती, कारण कॅमेरा फोटो घेत होता आणि नंतर त्याचा दंड भरावा लागत होता. सो मॉरली जे काम होत नव्हतं ते लीगली व्हायला लागलं होतं. साम दाम दंड भेद मधलं दंड इथे कामी आलं होतं. ह्याबाबतीत प्रकाश अय्यर ह्यांच्या पुस्तकात एक छान छोटासा लेख आहे. त्यांचं म्हणणं, ’स्टॉप ॲट दॅट रेड सिग्नल. कुणी बघत नाही म्हणून, पोलिस नाही म्हणून, रस्ता मोकळा आहे म्हणून, रात्री कुणीही रस्त्यावर नाही म्हणून, आपण घाईत आहोत म्हणून.... कारण काहीही असो, पण सिग्नल रेड दिसला की थांबा. ही सवय तुम्ही जोपासा. तुमच्या मुलांना लावा. शाळांनी ह्यावर भर द्या. मुलांच्या अपब्रिगिंगमध्ये हा महत्वाचा मुद्दा असू द्या. कारण आज कुणी बघत नाही म्हणून मी सिग्नल तोडला तर उद्या कुणी बघत नाही म्हणून एखाद्या खणातले माझे नसलेले पैसे घ्यायलाही मला काही वाटणार नाही, आणि मग ही सवय वाढत जाईल नकळत. हेच तर कारण आहे आज मोठ मोठ्या स्कॅम्सचे बळी आपण सामान्य नागरिक आहोत आणि आपला देश आहे‘. आमच्याकडे ड्राइव्हर्सना इंडक्शनमध्ये हे सांगितले जातं, ’काहीही झालं तरी सिग्नल तोडायचा नाही’. परवा तर नवलच पाह्यलं. आमच्या ऑफिसकडे येत असताना बिल्डिंगपाशी एक सिग्नल आहे तिथे लेफ्ट घ्यायचा असतो. सिग्नल रेड होता. प्रथमेश थांबला पण राइट साईडला थांबला. मी म्हटलं, `अरे इथे कुठे चाललायस?‘, तर म्हणाला, `लेफ्टला गाडी थांबवली तर सिग्नल तोडणारे हॉर्न वाजवत बसतात, त्यांना जागा करून दिली.’ ये लो कर लो बात. नियम तोडणाऱ्यांप्रती किती हे औदार्य.

ऑफिसमध्ये भरपूर काम केल्यावर आणि डोकं कामातून गेल्यावर घरी जाताना गाडीत काहीतरी हलकं फुलकं कॉमेडी ऐकूया म्हणत असताना यु ट्युबवर समोर आलं हास्य कवी संमेलन. सुरेंद्र शर्मा समोर आले. कधी ऐकलं नव्हतं पण ऐकल्यानंतर एकापाठी एक तीन व्हिडियोज्‌‍ मी पाहिले आणि लक्षात आलं की त्यांना पद्मश्री सन्मानाने का गौरवलं गेलंय. त्यांच्या एका व्हिडियोत एक किस्सा त्यांनी सांगितलाय. एकदा एक ऑफिसर त्यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, ’शर्माजी कुछ तो रास्ता बताइए, कितनी अशांतता है दुनिया में, सर फटा जा रहा है।’ शर्माजींनी तिला शांतपणे सागितलं, ’बस तू शांत रह!’ ऑफिसर पुढे सुरूच, ’भ्रष्टाचार चारो तरफ फैला है, पुरी दलदल बन गयी है।’ शर्माजींनी पुन्हा तेवढ्याच शांतपणे तिला म्हटलं, ’बस तू मत कर!’ मॉरल व्हॅल्युज्‌‍ जपणं म्हणजे काय हे गेल्या वर्षी आलेल्या `ट्वेल्थ फेल’ ह्या चित्रपटाने अतिशय सुंदर तऱ्हेने दाखवून दिलंय. शाळांनी हा चित्रपट मुलांना दाखविला पाहिजे.

October 17, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top