IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

ये ॲटिट्युड पहनलो!

22 mins. read

Published in the Sunday Sakal on 28 April, 2024

गेल्या आठवड्यात दुबईत हाहाकार उडाला. प्रचंड पाऊस पडला. आता तो नॅचरल होता की कृत्रिम हे त्यांचं त्यांनाच माहीत. अळी मिळी गुप चिळी. नॅचरल असेल तर ग्लोबल वॉर्मिंगला दोष द्यायचा. कृत्रिम असेल तर प्रशासनाला. निसर्गाशी छेड छाड करायला गेल्यावर निसर्ग कसा धडा शिकवतो ते स्पष्टपणे सर्वांसमोर आलं. तसंच कृत्रिम गोष्टी सुरू तर करता येतील पण त्या आटोक्यात कशा आणायच्या इथेच खरं चॅलेंज आहे हे ही प्रकर्षाने जाणवलं. काहीही कारण असलं तरी लोकांचे मात्र खूप हाल झाले. खेळाडू अडकले, डॉक्टर्स, आर्टिस्ट, टूरिस्टस्‌‍, बिझनेस पीपल सर्वांना खूप त्रास आणि मनस्ताप झाला. चार चार दिवस माणसं अडकून पडली. रेफ्युजी कॅम्पसारखी अवस्था. म्हणजे आमच्या टूर मॅनेजर्समध्ये आणि आमच्यात जो संवाद होता तो म्हणजे, ‘तुझ्यापेक्षा माझा त्रास जरा बरा होता‘ 'तू पाच तास अडकलास, मी दहा तास‘ ‘पण आलो बाबा एकदाचे परत‘ ‘अरे आपण आलो तरी, खेळाडू चार चार दिवस अडकून पडले होते‘. दुसऱ्यांच्या त्रासापेक्षा आपल्या त्रासाची पातळी कमी असली की बरं वाटतं तसा काहीसा प्रकार. अशावेळी आमचंही धाबं दणाणतं, येणारी टूर परत कशी आणायची आणि जाणारी टूर कशी घेऊन जायची ह्या विचाराने डोळ्यापुढे काजवे चमकतात. पण एक पाहिलंय, मार्ग सापडतो, वेळ निभावली जाते. पर्यटकही समजून घेतात. सहकार्य करतात. काही काही गोष्टींना इलाज नसतो. त्यातून मार्ग काढणं हे फक्त आपल्या हातात असतं.

एका बाजुला जग एकदम स्मार्ट बनत चाललंय तर दुसरीकडे थोडंसं अनिश्चित. जगाबरोबर आपण स्मार्ट बनतोय पण आपला पेशन्सही कमी होत चाललाय ही वस्तुस्थिती आहे. इंटरनेट नसणं, मोबाईलची बॅटरी संपणं, ब्राऊझर स्लो चालणं ह्या गोष्टी आपल्याला अक्षरश: परेशान करताहेत. मला स्वतःला माझ्यातही हे बदल जाणवले तेव्हा स्वतःला शांत करणं, ‘आज अभी इसी वक्त' साठी आग्रही असणं, उगाचच परफेक्शनचा अति हव्यास धरणं ह्या गोष्टी टोन डाऊन करायला सुरुवात केली. आयुष्य शांत आणि रसपूर्ण व्हायला लागलं. आज ह्या गोष्टी इथे आठवायचं कारण किंवा लिहायचं प्रयोजन म्हणजे सध्या पर्यटनाचा मोसम सुरू आहे. आमच्यासारख्या छोट्या किंवा मिडसाईज पर्यटनसंस्थेचे आजच्या दिवशी पाच हजारहून अधिक पर्यटक जगभरात पर्यटन करताहेत. युरोपमध्ये पस्तीस टूर्स सुरू आहेत तर काश्‍मीरमध्ये पंचेचाळीस. बाकी सर्वत्र, अगदी नॉर्थ इस्ट पासून नॉर्दन युरोपपर्यंत आणि आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत पर्यटक टूरवर धम्माल करताहेत. ही संख्या मे महिन्यात डबल असणार आहे. आमच्यासारख्याच अनेक पर्यटन संस्थांसोबत हजारो पर्यटक टूर्सवर वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत. आमचे टूर मॅनेजर्स आणि त्यांच्या सपोर्टला संपूर्ण ऑफिस टीम बाह्या सरसावून असणार आहे. स्वतः इंडिव्हिज्युअली जाणारे पर्यटकही बरेच असतात. आपण जसं ‘थिंग्ज टू कॅरी ऑन टूर' ची लिस्ट फॉलो करीत असतो त्याप्रमाणेच ह्यावर्षी किंवा ह्या जमान्यासाठी किंवा नेहमीसाठीच आपल्यासोबत एक गोष्ट अगदी न विसरता सोबत ठेवायचीय आणि ती आहे एक ॲटिट्युड. आता ॲटिट्युड ह्या शब्दाला चांगुलपणाऐवजी जरा वेगळा थोडासा नकारात्मक अर्थच आपल्याला दिसतो किंवा तो शब्द आपण तसाच वापरतो. 'मुझे ॲटिट्युड मत दिखाओ' हे वाक्य दिवसभरात कुणीतरी कुठेतरी वापरतच असतो. आणि हा थोडासा नकारात्मक शब्द मी तुम्हाला खुलेआम वापरायचा सल्ला देतेय ते माझ्या चाळीस वर्षांच्या पर्यटनातील आणि प्रवासातील अनुभवांवरून, मी शिकलेल्या, ऑब्झर्व केलेल्या अनेक गोष्टींवरून.

कोविडनंतर टूरिझम व एअरलाइन इंडस्ट्री सावरायच्या आतच जगात सर्वत्र पर्यटकांची इतकी गर्दी वाढली की काही विचारू नका. गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल तर ॲमस्टरडॅममध्ये क्रूझ टूरिझमला नेदरलँड्‌‍स गर्व्हमेंटने बंदी आणली. क्रूझ टुरिझम म्हणजे ॲमस्टरडॅमच्या बंदरावर मोठमोठ्या टूरिस्ट क्रूझेस हॉल्ट घेतात. सकाळी क्रूझेस पोर्टला लागतात. त्यातील म्हणजे प्रत्येक क्रूझमधील सुमारे दोन ते चार हजार पर्यटक शोअर एक्सकर्शन साठी उतरतात आणि ॲमस्टरडॅम शहरात येतात. दिवसभर फिरतात आणि संध्याकाळी क्रूझवर परत जातात. क्रूझ प्रयाण करते दुसऱ्या दिवसाच्या ठिकाणाकडे. रात्री प्रवास आणि दिवसा शोअर एक्सकर्शन असा सर्वसाधारण कार्यक्रम असतो क्रूझेसचा. आता अशा पंधरा क्रूझेस उभ्या राहिल्या तर किमान पन्नास हजार पर्यटक दररोज ॲमस्टरडॅम शहरात घुसतात आणि रस्त्यांवर इतकी गर्दी होते की स्थानिकांना चालायला जागा उरत नाही. आता हे प्रवासी फक्त गर्दी करतात, रेव्हेन्यू देत नाहीत. सकाळी क्रूझवर भरपेट ब्रेकफास्ट करतात. सोबत काही खायला ठेवतात आणि दिवसभरात एखादी कॉफी वा आइसक्रीम शिवाय काही खात नाहीत. तसंच रात्री पण रहात नाहीत त्यामुळे हॉटेल्सनाही रेव्हेन्यू शून्य. ‘इकॉनॉमीला हातभार न लावता नुसती गर्दी करणारे पर्यटक आम्हाला नकोत. आम्हाला आमच्या स्थानिकांची त्यांच्या इझी लाइफस्टाईलची, त्यांच्या आनंदाची जास्त काळजी आहे त्यामुळे आम्हाला जास्त टूरिस्ट नकोत' असा पावित्रा घेऊन नेदरलँड्‌‍सने क्रूझ शिप्स बंद केल्या. ज्यांनी गेल्या वर्षी ह्या क्रूझेसद्वारे ॲमस्टरडॅम पाहण्याची स्वप्नं रंगवली असतील त्यांचं ॲमस्टरडॅम राहिलं असणार. अशीच एक मुव्हमेंट सध्या स्पेनच्या कॅनरी आयलंडवर सुरू आहे. स्थानिकांचा प्रोटेस्ट सुरू आहे ‘आम्हाला जास्त टूरिस्ट्‌‍स नकोत म्हणून‘. युरोप इतका सुंदर आहे की टूरिस्ट्‌‍सचे थवेच्या थवे तिथे झेपावतात. तरी अजून चायना झोपलंय, तिथले पर्यटक रेग्युलेटेड स्वरूपात देशाबाहेर पर्यटन करताहेत. पर्यटन संस्था म्हणून आम्ही एक स्वार्थी विचार करतो तो म्हणजे, ‘चायनीज टूरिस्ट प्लीज तुम्ही बाहेर येऊ नका. तुमचा देश छान आहे, अवाढव्य आहे, तिथेच डोमेस्टिक टूरिझम करा. जगातल्या पर्यटकांना जरा मोकळेपणाने हिंडूद्या जगात.‘ पण ओव्हर टूरिझम ही सुद्धा काही देशांची समस्या झालीय हे निश्चित. ह्या सगळ्याचा परिणाम असा होतोय की अचानक एखादी गोष्ट पर्यटकांसाठी बंद होणं, एन्ी तिकीटं मिळण्याची प्रोसेस बदलणं ह्या गोष्टी व्हायला लागल्यात. हल्ली आपल्या भारतात संपूर्ण टूरिझम इंडस्ट्री अशीच परिस्थिती अनुभवतेय ती काश्‍मीर गुलमर्ग गंडोलाच्या तिकिटांसंदर्भात. जिथे दिवसाला किमान पंधरा हजार तिकिटांची गरज आहे तिथे जेमतेम दोन हजार सातशे तिकिट्स उपलब्ध आहेत. कारण एका दिवसाची गंडोला राईडची कॅपॅसिटीच तेवढी आहे. ह्याला ना गंडोला प्रशासन काही करू शकत ना लोकल ऑथॉरिटीज्‌‍. तुम्ही कितीही आधी बुकिंग करा. गंडोला कॉर्पोरेशन चार ते पाच दिवस आधी संपूर्ण भारतासाठी ऑनलाइन बुकिंग अोपन करतं आणि त्या थोड्याशा वेळात म्हणजे पाच ते दहा मिनिटांत तिकिट्स संपतात. तिकिट्स पर्यटकांची नावं भरून काढावी लागतात. ह्यात लॉटरीसारखं कुणाला तिकिट्स मिळतील कुणाला नाही हे सांगताच येत नाही. त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत वा कुणाहीसोबत वा अगदी इंडिव्हिज्युअली गेलात तरी परिस्थिती हीच असणार आहे. ज्यांच्या नावाने तिकिटे मिळतात ती पर्यटक मंडळी गंडोला करतात बाकीची मंडळी सबस्टीट्यूट साइटसीइंग करतात. आम्ही तर काश्‍मीरच्या प्रत्येक आयटिनरीच्या खालीच हे लिहिलंय. आणि ते बघूनच पर्यटक बुकिंग करतात. `माता का बुलावा’ शिवाय वैष्णोदेवी दर्शन देत नाही असं म्हणतात तसंच काहीसं या गंडोलाच्या बाबतीत झालंय.  मग आम्ही पर्यटकांना सांगतो. ‘काश्‍मीर म्हणजे फक्त गंडोला नाही. जर नाही तिकिट्स मिळाली तर निराश होऊ नका. बाकीचं काश्‍मीर अतिशय सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या. तसंही काश्‍मीर एकदाच नाही तर चार सीझनमध्ये जाण्याची जागा आहे. कधीतरी मिळतीलच गंडोलाची तिकिट्स.‘

जसं दुबईच्या बाबतीत पावसामुळे पर्यटकांची रखडपट्टी झाली तसंच भारतातही फ्लाइट डीलेज्‌‍, फ्लाइट रीशेड्युलिंगचे प्रकार वाढलेत. आपण मोठ्या आनंदात निघतो. घरून निघेपर्र्यंत फ्लाइट वेळेवर दिसत असतं पण जसे एअरपोर्टला पोहोचतो फ्लाइट रीशेड्यूल झालेलं असतं. कोविडनंतर अजूनही एअरलाइन इंडस्ी पूर्णपणे ॅकवर आली नाहीये. कधी फ्लाइट्स कॅन्सलही होतात. कधी एखादं साइटसीइंग अचानक व्हिआयपी मुव्हमेंटमुळे पर्यटकांसाठी बंद केलं जातं, कुठे रस्ते बंद होतात... एक ना अनेक गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात पण आपल्याला त्याला तोफ्लड द्यावं लागतं. आम्ही जेव्हा जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तेव्हा लागलीच त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आमची कॉर्पोरेट टीम 24/7 आमच्या टूर मॅनेजर्सच्या दिमतीला असते. एखादी गोष्ट शेड्युलप्रमाणे होत नसेल तर लागलीच ऑल्टरनेटिव्ह देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. ते ही नसेल तर लास्ट रीसॉर्ट असतो रीफंडचा जर त्या साइटसीइंगला एन्ी फी असेल तर. अर्थात ह्याला अपवाद असतो तो म्हणजे कुठे ॅफिक जॅम वा काही मार्गावरील अडचणीमुळे आपण पोहोचू शकलो नाही तेव्हाचा.

पर्यटकहो, एकच गोष्ट लक्षात ठेवायची. मी सुरुवातीला म्हटलं नं तो ॲटिट्युड स्वत:मध्ये रूजवायचा आणि प्रवासाला निघायचं आणि तो ॲटिट्युड आहे `स्वीकार लो’चा. प्रवासाला निघण्याच्या आनंदाला कमी होऊ द्यायचं नाही. अनपेक्षित गोष्टी घडतील प्रवासात. कुठे फ्लाइट डीले होईल, कुठे ेन चुकेल, कुठे एखादं साइटसीइंग नाही होऊ शकणार तर कुठे वादळ वारा पाऊस सुरू होर्इल. हे वास्तव असणार आहे कधी कधी, ते स्विकारूया. निराश नको होऊया, मनस्ताप नको करून घेऊया. बेस्ट ऑल्टरनेटिव्ह द्यायचा प्रयत्न आम्हीच नव्हे तर सर्वच ॅव्हल कंपन्या करतील. लेट्स कोऑपरेट इच अदर आणि पुढे जाऊया. इट इज द नीड ऑफ द अवर. काळाचीही गरज आहे ही.


अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

तुम्हाला जर कोणी सांगितलं की एखाद्या अपूर्ण वास्तूच्या दर्शनाला जगभरातले हजारो पर्यटक गर्दी करतात, तर तुमचा विश्वासच बसणार नाही पण खरंच युरोपमध्ये एक अशी वास्तू आहे की जिचं बांधकाम गेली 141 वर्षे सुरूच आहे. ही वास्तू म्हणजे स्पेन या देशातील बार्सेलोना या ऐतिहासिक शहरातील ‘ला साग्रादा फामिलिआ’ हे चर्च. हे चर्च 2030 मध्ये बांधून पूर्ण होण्याचा अंदाज आहे, म्हणजे जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा इजिप्तच्या ग्रेट पिरॅमिडसना बांधायला जो काळ लागला त्याच्या दसपट वेळ घेऊन बांधलेलं चर्च अशी याची ओळख असेल. चायनामधली द ग्रेट वॉल बांधायला जितकी वर्षे लागली त्यापेक्षा ला साग्रादा फामिलिआ बांधायला 50 वर्षे जास्त लागणार आहेत. हे चर्च बांधायची कल्पना होती ‘होसे मारिया बोकाबेया’ या पुस्तक विक्रेत्याची. त्याने सन 1872 मध्ये इटलीतील व्हॅटिकन सिटीला भेट दिली आणि तिथली चर्चेस पाहून एक अतिशय भव्य चर्च बांधण्याचं त्याने ठरवलं. सुरुवातीला या चर्चचा आराखडा ‘फ्रॅन्सिस्को देल वियार‘ या वास्तूविशारदाने तयार केला होता. पण नंतर या चर्चचं काम आन्तोनि गाउदी कडे गेलं आणि त्याने मूळ आराखडा बदलला. 1926 साली गाउदीनं या जगाचा निरोप घेतला तेव्हा या चर्चचं काम जेमतेम 25% पूर्ण झालं होतं. गाउदीने या चर्चची रचना करताना युरोपमधील सर्वात उंच चर्च बांधायचं असं ठरवून केली आहे. या चर्चचा सेंट्रल टॉवर हा 170 मीटर उंच आहे. गाउदीनं चर्चच्या आतल्या भागातल्या पिलर्सना झाडांचा आकार दिला आहे, मान वर करून बघितल्यावर आपण उंच वाढलेल्या झाडांकडे बघतोय असंच वाटतं. या चर्चच्या रचनेत एकूण अठरा टॉवर्स आहेत, त्यातील बारा टॉवर्स हे येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांचं प्रतिक आहेत. या चर्चचं जे नाव आहे ‘ला साग्रादा फामिलिआ’ त्याचा अर्थ ‘होली फॅमिली’ असा होतो जो ख्रिस्ताच्या कुटुंबाशी संबंधित आहे. त्यामुळेच इथले सहा मनोरे हे स्वतः येशु ख्रिस्त, त्याची माता मेरी आणि चार इव्हॅन्जेलिस्टस्‌‍यांना समर्पित आहेत. या चर्चचा दर्शनी भाग अतिशय प्रेक्षणीय आहे, तीन दर्शनी भागांपैकी पूर्वेचा ‘नेटिव्हिटी’ आणि पश्चिमेचा ‘पॅशन’ पूर्ण झाला आहे तर दक्षिणेचा ‘ग्लोरी’ मात्र अजून अपूर्ण आहे.  या चर्चचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं जे बांधकाम सुरू आहे त्यासाठी सरकारी किंवा अन्य संस्थेची मदत घेतली जात नाही. दरवर्षी सुमारे पंचवीस दशलक्ष युरो बांधकामावर खर्च केले जातात, हा सगळा निधी एन्ट्री तिकिटे आणि खाजगी देणग्यांमधून उभा केला जातो, यावरून किती मोठ्या संख्येनं पर्यटक या चर्चला भेट देत असतील याची कल्पना येईल. अजूनही पूर्ण न झालेल्या ला साग्रादा फामिलिआ चा समावेश जरी युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत झालेला नसला तरी या चर्चच्या काही भागाला मात्र या यादीत स्थान मिळालं आहे. तर मग वीणा वर्ल्डच्या युरोपमधील स्पेनच्या सहलीत सहभागी होऊन ला साग्रादा फामिलिआ बघायची संधी अवश्‍य साधा.

आम्हाला जर कोणी सांगितलं की एखाद्या अपूर्ण वास्तूच्या दर्शनाला जगभरातले हजारो पर्यटक गर्दी करतात, तर तुमचा विश्वासच बसणार नाही पण खरंच युरोपमध्ये एक अशी वास्तू आहे की जिचं बांधकाम गेली 141 वर्षे सुरूच आहे. ही वास्तू म्हणजे स्पेन या देशातील बार्सेलोना या ऐतिहासिक शहरातील ‘ला साग्रादा फामिलिआ’ हे चर्च. हे चर्च 2030 मध्ये बांधून पूर्ण होण्याचा अंदाज आहे, म्हणजे जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा इजिप्तच्या ग्रेट पिरॅमिडसना बांधायला जो काळ लागला त्याच्या दसपट वेळ घेऊन बांधलेलं चर्च अशी याची ओळख असेल. चायनामधली द ग्रेट वॉल बांधायला जितकी वर्षे लागली त्यापेक्षा ला साग्रादा फामिलिआ बांधायला 50 वर्षे जास्त लागणार आहेत. हे चर्च बांधायची कल्पना होती ‘होसे मारिया बोकाबेया’ या पुस्तक विक्रेत्याची. त्याने सन 1872 मध्ये इटलीतील व्हॅटिकन सिटीला भेट दिली आणि तिथली चर्चेस पाहून एक अतिशय भव्य चर्च बांधण्याचं त्याने ठरवलं. सुरुवातीला या चर्चचा आराखडा ‘फ्रॅन्सिस्को देल वियार‘ या वास्तूविशारदाने तयार केला होता. पण नंतर या चर्चचं काम आन्तोनि गाउदी कडे गेलं आणि त्याने मूळ आराखडा बदलला. 1926 साली गाउदीनं या जगाचा निरोप घेतला तेव्हा या चर्चचं काम जेमतेम 25% पूर्ण झालं होतं. गाउदीने या चर्चची रचना करताना युरोपमधील सर्वात उंच चर्च बांधायचं असं ठरवून केली आहे. या चर्चचा सेंट्रल टॉवर हा 170 मीटर उंच आहे. गाउदीनं चर्चच्या आतल्या भागातल्या पिलर्सना झाडांचा आकार दिला आहे, मान वर करून बघितल्यावर आपण उंच वाढलेल्या झाडांकडे बघतोय असंच वाटतं. या चर्चच्या रचनेत एकूण अठरा टॉवर्स आहेत, त्यातील बारा टॉवर्स हे येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यांचं प्रतिक आहेत. या चर्चचं जे नाव आहे ‘ला साग्रादा फामिलिआ’ त्याचा अर्थ ‘होली फॅमिली’ असा होतो जो ख्रिस्ताच्या कुटुंबाशी संबंधित आहे. त्यामुळेच इथले सहा मनोरे हे स्वतः येशु ख्रिस्त, त्याची माता मेरी आणि चार इव्हॅन्जेलिस्टस्‌‍यांना समर्पित आहेत. या चर्चचा दर्शनी भाग अतिशय प्रेक्षणीय आहे, तीन दर्शनी भागांपैकी पूर्वेचा ‘नेटिव्हिटी’ आणि पश्चिमेचा ‘पॅशन’ पूर्ण झाला आहे तर दक्षिणेचा ‘ग्लोरी’ मात्र अजून अपूर्ण आहे.  या चर्चचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं जे बांधकाम सुरू आहे त्यासाठी सरकारी किंवा अन्य संस्थेची मदत घेतली जात नाही. दरवर्षी सुमारे पंचवीस दशलक्ष युरो बांधकामावर खर्च केले जातात, हा सगळा निधी एन्ट्री तिकिटे आणि खाजगी देणग्यांमधून उभा केला जातो, यावरून किती मोठ्या संख्येनं पर्यटक या चर्चला भेट देत असतील याची कल्पना येईल. अजूनही पूर्ण न झालेल्या ला साग्रादा फामिलिआ चा समावेश जरी युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत झालेला नसला तरी या चर्चच्या काही भागाला मात्र या यादीत स्थान मिळालं आहे. तर मग वीणा वर्ल्डच्या युरोपमधील स्पेनच्या सहलीत सहभागी होऊन ला साग्रादा फामिलिआ बघायची संधी अवश्‍य साधा.


नेट सर्फिंग ते ग्लोबट्रॉटिंग

आपल्या सध्याच्या जगण्यात इंटरनेट हा महत्वाचा भाग बनला आहे. माझ्याप्रमाणेच तुम्ही सुध्दा अनेक कारणांसाठी इंटरनेट वापरत असालच. पण मी इंटरनेटचा वापर करते तो माझ्या पर्यटनाच्या छंदाला पुरक म्हणून. माझी पर्यटनाची हौस पुरवताना मी आधी कोणत्या देशात कधी जावं? काय पाहावं? कुठल्या देशाचं काय वैशिष्ट्य आहे ही सगळी माहिती नेटवरून गोळा करते. नंतरच माझी टूर बूक करते. मी म्हणजे सौ. गीता पाटडिया, रहाते गुजरातमधील भावनगर येथे पण मी सहल बूक करते ती मात्र वीणा वर्ल्डच्या चर्नी रोड ऑफिसमधून, तिथल्या आरती मोहिते कडे मी आत्तापर्यंत सगळ्या टूर्स बूक केल्या आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आजपर्यंत मी तिला प्रत्यक्षात भेटले नाहीये. अर्थात पहिली टूर बूक करतानाच ती इतकी विश्वासार्ह वाटली की भेटण्याची गरजच भासली नाही. 2015 पासून आजपर्यंत म्हणजे गेली नऊ वर्ष मी वीणा वर्ल्डबरोबर प्रवास करत आले आहे.

वीणा वर्ल्डच्या ‘वुमन्स स्पेशल’ या सहलींची संकल्पना मला अतिशय आवडते. महिलांचं पर्यटनस्वप्नं पूर्ण करणारी आणि महिलांना नवा आत्मविश्वास देणारी ही सहल म्हणजे जणू प्रत्येक महिलेसाठी नवसंजीवनीच आहे. या सहलीवरच मी वीणा पाटीलना भेटले आणि आमची जणू खुप जूनी अोळख असल्यासारखं वाटलं. सहलींना जाताना मी नेहमी माझ्या मुलीबरोबर बोनी पाटडिया बरोबर  जाते. ती माझीच कॉपी असल्याने तिलाही पर्यटनाची आवड आहे. आम्ही दोघींनी ठरवलेलं पर्यटनामधलं ध्येय गाठलेलं आहे. आत्तापर्यंत  मी 50 देशांना भेट दिली आहे तर बोनीने 25 देश बघितले आहेत. या सगळ्या जगभ्रमंतीमध्ये मला सर्वात जास्त आवडले ते स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया हे देश. अतिशय रमणीय निसर्गसौंदर्याने नटलेले हे देश म्हणजे तुमच्या डोळ्यांना मेजवानीच आहेत. या निसर्गसंपन्न देशांप्रमाणेच प्राचीन इतिहासाचा खजिना साठवलेला इजिप्तही मला अतिशय आवडला. हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे थक्क करणारे तिथले अवशेष पाहून जणू टाइम ॅव्हल केल्यासारखं वाटलं.

वीणा वर्ल्डच्या बाबतीत मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचे सहल कार्यक्रम नेहमी अपडेट होत असतात, ज्या ज्या ठिकाणी नवीन पर्यटन आकर्षण तयार होईल त्याची भर वीणा वर्ल्डच्या सहल कार्यक्रमात लगेच पडते. त्याचप्रमाणे त्यांचा सगळ्यात मोठा ॲसेट म्हणजे त्यांचे टूर मॅनेजर्स. हे सगळेच अतिशय जाणकार आणि अनुभवी आहेत. ते सहलीवर आलेल्या पर्यटकांशी अतिशय नम्रपणे आणि आपुलकीने वागतात, त्यामुळेच सहलीवर कोणतीही समस्या निर्माण झाली तरी पर्यटक निर्धास्त असतात कारण वीणा वर्ल्डचा टूर मॅनेजर त्यातून मार्ग काढणार अशी खात्री सगळ्यांनाच असते. आता मी 2024 मधलं नवीन पर्यटन मिशन ठरवलं आहे आणि बोनीसोबत माझी पहिली टूर आहे वीणा वर्ल्डची ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड.

सौ. गीता पाटडिया आणि बोनी पाटडिया


काय बाई खाऊ...कसं गं खाऊ

एखादी डिश, पदार्थ तो बनवणाऱ्या व्यक्तिच्या नावानं ओळखला जाणं स्वाभाविकच असतं, पण काही वेळा एखाद्या व्यक्तिच्या सन्मानार्थ एखाद्या पदार्थाला त्याचं नाव देण्यात येतं. याचं एक चविष्ट आणि मधुर उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील लोकप्रिय डेझर्ट ‘पावलोवा’. आता या डेझर्टला हे नाव का मिळालं? तर रशियातील जगप्रसिध्द बॅलेरिना ॲना पावलोवा ही 1920 मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टूरवर आली होती आणि तिच्या सन्मानार्थ हा केक तयार करण्यात आला म्हणून याला पावलोवा हे नाव मिळालं असं सांगितलं जातं. आता हे पावलोवा डेझर्ट नक्की कुठे पहिल्यांदा तयार केलं गेलं? ऑस्ट्रेलिया का न्यूझीलंडमध्ये यावर जरा वाद आहे पण तो बाजूला ठेवून या पावलोवाचा आस्वाद घ्यावा. मात्र या दोन्ही देशांमध्ये पावलोवा लोकप्रिय आहे. ख्रिसमसला जेव्हा या भागात उन्हाळा असतो तेव्हा पावलोवाला खूप मागणी असते. पावलोवा हे डेझर्ट ‘मेरिंगे बेस्ड’ म्हणजे अंड्यातील पांढरा भाग आणि साखर एकत्र करून केलं जातं. त्यात काळजीपूर्वक व्हिनेगर किंवा लेमन ज्यूस, व्हॅनिला इसेन्स आणि कॉर्नफ्लोअर मिसळलं जातं. हे सगळं मिश्रण बेकिंग पेपरच्या मदतीने केकसारखं गोलाकार थापलं जातं आणि नंतर बेक केलं जातं. पावलोवाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचं बाहेरचं आवरण जरी कुरकुरीत असलं तरी आतला भाग मऊ असतो. बेक केलेल्या केकमध्ये व्हिप्ड क्रीम भरलं जातं आणि त्यावर आवडीच्या फळांचे तुकडे, ड्रायफ्रुट्स याची सजावट केली जाते. फ्रेश स्ट्रॉबेरीज, किवी, पॅशनफ्रुट या फळांनी पावलोवाची सजावट केली जाते. जुन्या काळात पावलोवामध्ये अक्रोडाचे तुकडे घालायची पध्दत होती. आता दुकानात पावलोवाचे रेडी टू मेक पाऊच ही मिळतात. बाहेरचे कुरकुरीत आवरण, आतला मऊ गोड भाग आणि फळांचे काप यामुळे पावलोवा तुमच्या रसनेला अगदी तृप्त करतो. मग या स्वीट डिशचा आस्वाद घ्यायला चला वीणा वर्ल्डच्या ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सहलीला. देश विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’हा पॉडकास्ट नक्की ऐका.


वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍

युनिक आणि इंटरेस्टिंग

तुमचा हॉलिडे युनिक आणि इंटरेस्टिंग कशामुळे होईल? जेव्हा तुम्ही भेट दिलेल्या देशाची संस्कृती, लोकजीवनातील चालीरीती यांचा जवळून अनुभव घ्याल तेव्हा. जपानमधील ॅडिशनल टी सेरिमनीत सहभागी होण्यापासून ब्युनोस आयर्समध्ये ‘टँगो डान्स’ शिकण्यापर्यंत आणि तैवानच्या अफलातून ‘लॅन्टर्न फेस्टिव्हल’ला हजेरी लावण्यापासून स्वित्झर्लंडमधील ‘फॉन्ड्यु कुकिंग क्लास’मध्ये सामिल होण्यापर्यंत तुम्ही तुमचा हॉलिडे एकदम इंटरेस्टिंग आणि युनिक करू शकता.

कुकिंगमध्ये तुम्हाला रस असेल तर अस्सल पास्ता कसा बनवायचा हे तुम्ही थेट इटलीमध्येच शिकू शकता. तुम्हाला सूशी आवडत असेल तर घरी झकास सूशी कशी बनवायची याचं ट्रेनिंग तुम्ही जपानच्या हॉलिडेमध्ये घेऊ शकता. कोरियातील किमची असो किंवा थायलंडच्या टेस्टी करीज्‌‍, हे पदार्थ त्या त्या देशात फिरायला गेल्यावर शॉर्ट कोर्स करून शिकता येतात. त्यामुळे तुमच्या हॉलिडेमध्ये या कुकिंग क्लासेससाठी अवश्‍य वेळ ठेवावा. वाइन टेस्टिंग हा एकदम नजाकतदार अनुभव असतो, त्याचं एक शास्त्र असतं, ते शिकायची संधी तुम्ही तुमच्या फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, यु. एस. मधील नापा व्हॅली वा इटलीमधल्या हॉलिडेवर घेऊ शकता. इथल्या वायनरीजमध्ये तुम्ही वाइन टेस्टिंगचे स्किल आत्मसात करू शकता. तुम्ही स्पेनमध्ये असाल तर ‘तापाज्‌‍ बार हॉपिंग’ हा धमाल प्रकार ट्राय करू शकता. तापाज्‌‍ म्हणजे स्पेनमध्ये चीज, बटाटा, मासे, ऑलिव्ह पासून वेगवेगळे पदार्थ बनवतात, जे आपल्याकडच्या स्टाटर्ससारखे असतात. तुम्ही एकापाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या तापाज्‌‍ बारमध्ये जाऊन विविध डिशेशचा आस्वाद घेऊ शकता. जगभरातल्या अनेक देशांमधली इतिहासप्रसिध्द मार्केट्स पर्यटकांना आकर्षित करतात. टर्कीमधील ग्रँड बझार असो किंवा थायलंडमधील चाटुचाक मार्केट किंवा साउथ कोरियातील ग्वांगजँग मार्केट असो. या मार्केट्समध्ये स्थानिक लोकांबरोबर स्थानिक उत्पादने, लोकल डिशेस आणि स्थानिक कलाकुसरीच्या वस्तुंचं शॉपिंग करण्याचा अनुभव तुमचा हॉलिडे रंगतदार बनवतो.

तुम्ही तुमच्या हॉलिडेवर काही वेगळ्या स्किल्सही शिकू शकता. व्हेनिस या इटलीमधील शहरातील पारंपरिक कार्निव्हल मास्क जगप्रसिध्द आहेत, तुम्ही हे मास्क बनवण्याचा वर्कशॉप करू शकता. फ्रान्समधील पर्फ्युम्स कोणाला आवडत नाहीत? मोहक सुगंधी परफ्युम्स कशी बनवायची हे तुम्ही फ्रान्सच्या हॉलिडेवर शिकू शकता. जपानच्या हॉलिडेमध्ये तुम्ही तिथली ‘शोडो’ ही ॅडिशनल कॅलिग्राफी शिकून त्याची ग्रिटींगकार्डस्‌‍ तयार करू शकता. मलेशियाच्या हॉलिडेवर तुम्ही तिथलं खास मलेशियन बाटिक कसं बनवायचं याचा वर्कशॉप अटेंड करून स्वतःसाठी स्पेशल सोव्हेनियर्स घरी घेऊन येऊ शकता. जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधल्या पारंपरिक फेस्टिव्हल्समध्ये सहभागी होणं हा देखिल तुमच्या हॉलिडेला इंटरेस्टिंग करायचा मार्ग आहे. ब्राझीलमधल्या रिओ शहरातील जगप्रसिध्द कार्निव्हलपासून स्पेनमधील ला टोमॅटिना पर्यंत अनेक प्रकारचे उत्सव जगात साजरे होत असतात, प्लॅनिंग करून हॉलिडेवर त्यांची मजा लुटता येईल. थायलंडमध्ये आपल्याकडच्या रंगपंचमीसारखा ‘सोंगक्रान’ हा फेस्टिव्हल मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळी थायलंडच्या रस्त्यांवर जणू ‘वॉटर फाइट्स’ होतात, त्यांची मजा अनुभवायला थायलंडला भेट द्यायलाच हवी. नुकताच आमच्या एका पर्यटकानी टोक्योमधील ट्युना फिश ऑक्शनचं बुकिंग केलं होतं, तिथे रोज हा ऑक्शन बघायला फक्त 27 लोकांनाच प्रवेश मिळतो. अशा अनेक गोष्टी आहेत तुमच्या हॉलिडेची रंगत वाढविण्यासाठी. सो, आजच वीणा वर्ल्ड कस्टमाइज्ड हॉलिडेशी संपर्क साधा तुमच्या युनिक एक्स्पीरियन्सवाल्या हॉलिडेसाठी


ऑफबीट युरोप.

एकदा बघून समाधान झालंय असं युरोपच्या बाबतीत होत नाही. पर्यटकांना पुन्हा पुन्हा स्वतःकडे आकर्षित करून घेणारा खंड म्हणजे युरोप आणि म्हणूनच आमच्याकडे युरोपचे पन्नासहून अधिक ग्रुप टूर ऑप्शन्स आहेत. आणि ह्या सर्व ऑप्शन्सना पर्यटकांचा जोरदार पाठींबा आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीत दहा हजारहून अधिक पर्यटक वीणा वर्ल्डसोबत युरोपचं स्वप्न पूर्ण करताहेत. नॉर्दन युरोप म्हणजे स्कॅन्डिनेव्हिया कींज, फिनलँड, ग्रीनलँड, आइसलँड, स्कॉटलँड, आयर्लंड हे देश तर इस्टर्न युरोप म्हणजे पोलंड, हंगेरी, क्रोएशिया, स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया, चेक रीपब्लिक, युरेशिया साइडचे उझबेकिस्तान, कझाकस्तान, किरगिस्तान, अझरबैजान हे देश, मेडिटरेनियन युरोपमध्ये येतात स्पेन पोतुगाल मोरोक्को, ग्रीस, टर्की, इजिप्त वैगरे. युरोपमधल्या ह्या बहुतेक सगळ्या देशांमध्ये आता टूर्स सुरू आहेत. ह्यामध्ये आता भर पडलीय ती बाल्टिक युरोपची. एस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया ह्या बाल्टिक देशांची डिमांडही आम्ही पूर्ण केलीय. ह्याची फक्त तीन देशांची टूर आहे किंवा स्कॅन्डिनेव्हिया विथ बाल्टिक युरोप अशी पंधरा दिवसांची मस्त टूर आहे. एवढ्या टूर्स बघितल्यावर पहिल्यांदाच युरोपला जाणाऱ्या पर्यटकांना गोंधळायला होतं. त्यांच्यासाठी थोडंसं मार्गदर्शन. पहिल्यांदा युरोपला जाणाऱ्यांनी वेस्टर्न युरोपची टूर घ्यावी. ज्यात पॅरिस, स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, नेदरलँड्‌‍स, बेल्जियम लक्झमबर्ग सारखे देश येतात आणि त्याला जोडून युके लंडन सोबतची टूर घ्यावी. ह्या वेस्टर्न युरोपच्या कॉम्बिनेशनमध्ये सहा दिवसांपासून अगदी सत्तावीस दिवसांपर्र्यंतच्या टूर्स आहेत. एकदा वेस्टर्न युरोप झालं की मग इस्टर्न, मेडिटेरेनियन, नॉर्दन, आयर्लंड, ग्रीनलँड, आइसलँड असं एकेक करीत युरोप पादाक्रांत करावा. बरेच पर्यटक एकावेळी एक देश पाहणंही पसंत करतात. अजूनही युरोपचं बुकिंग केलं नसेल तर मे जूनच्या काही टूर्स मध्ये जागा आहेत. त्यासाठी आजच संपर्क साधा. त्यातील काही टूर्स  इथे खाली दिल्या आहेत

April 27, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top