Published in the Sunday Sakal on 05 January, 2025
आज नवीन वर्षाचा पाचवा दिवस आला, अगदी खरं खरं सांगा (स्वत:ला) त्या नववर्षाच्या संकल्पांचं काय झालं ह्या गेल्या पाच दिवसांत? एक तारखेला सर्वांना सुट्टी. संपूर्ण जगच जर इयर एन्ड पार्टीचा, गेल्या संपूर्ण वर्षाच्या श्रमपरिहाराचा आनंद म्हणून हा दिवस आळसात घालवत असेल, तर मी `एकला चालो रे‘ करीत काय मोठे दिवे लावणार आहे?`बेटर टू बी विथ द वर्ल्ड’. सध्याच्या गुलाबी थंडीत भल्या सकाळी जाग येऊनही पुन्हा पांघरूणात घुसण्याचा मोह भल्याभल्यांना न आवरता येणारा, त्यामुळे `मै तो किस झाड की पत्ती’ एवढा सुज्ञ विचार करून स्वत:ची समजूत काढीत स्वत:ला दुलईत लपेटून घेतलं आणि पुन्हा गाढ झोपी गेले. नवीन वर्षात कामाला वाहून घ्यायचंच आहे मग उद्यापासून सुरू होणाऱ्या उज्वल भविष्यासाठीच्या अपार मेहनतीला सामोरं जायला आजची विश्रांती फारच महत्वाची. त्यामुळे नो गिल्ट ॲट ऑल. जगरहाटीप्रमाणे संपूर्ण दिवस पूर्ण विश्रांतीत गेल्याने ह्या एक तारखेवाल्या बुधवारी नवीन रिझॉल्यूशन्सप्रमाणे काहीही झालं नाही तरी उद्यापासून कामाचे डोफ्लगर उपसायचेच आहेत तेव्हा `जस्ट चिल’ म्हणत मी उद्या मॉर्निग वॉकला नक्की जायचं हा विचार करून शांतचित्ताने झोपी गेले. दोन तारखेला माझ्यात खरोखरच वीरश्री संचारली. ठरवलं की जाग येते ही खात्री होती, तरीही सासूबाईंनाही सांगून ठेवलं. `अब आँधी आए या तुफान‘ सकाळी चार वाजता उठवा. भरपूर काम आहे.
चार वाजता उठले. `थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग’ म्हणत भल्या पहाटे दिवसाची सुरूवात झाल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतली. कुठेतरी वाचलं होतं की, `उठल्यावर तुम्ही नेमकं काय करता ते लक्षात घ्या किंवा त्यावर लक्ष द्या’ नाहीतर वेळ तसाच निघून जातो आणि मग लक्षात येतं, अरे सकाळी उठले खरी पण केलं तर काहीच नाही. या ट्रॅपमधून बाहेर येण्यासाठी उठल्यावर हातात पेन, पॅड फुलस्केपची वही घेऊन चक्क टेबल खुर्चीवर बैठक मारायची आणि लिखाणाला सुरूवात करायची. मग ते वृत्तपत्रातलं आर्टिकल असो वा एखादा बिझनेस संबंधीचा पेपर. पहाटेची वेळ इतकी प्रसन्न असते की आपल्याकडून ती डबल काम करून घेते. ते नसेल तर एखादं चांगलं पुस्तक सतत समोर असलंच पाहिजे हा दंडक घालून घेतलाय. त्यातली दहा पानं तरी वाचायची. जास्त वाचता आली तर नथिंग लाइक इट. सध्याचं पुस्तक आहे `ब्लू ओशन शिफ्ट’. एक मात्र नक्की, मोबाईल अजिबात हातात घ्यायचा नाही ह्या सकाळच्या वेळी! हे गेल्या वर्षात माझ्याकडून पाळलं गेलं, त्यामुळे आता अंगवळणी पडलंय असं म्हणायला हरकत नाही. त्या वाटेला गेलं तर त्या मोहजालात अडकलोच म्हणून समजा. नेटफ्लिक्सचा फाउंडर रीड हेस्टिंगला एका मुलाखतीत विचारलं, `तू कुणाला कॉम्पिटिशन म्हणून बघतोस?’ तर त्याचं उत्तर होतं, `झोप’. हे प्रामाणिक उत्तर वाटलं आणि त्यानेच सांगितलं की लोक झोपले म्हणजे त्याचा बिझनेस ठप्प झाला. त्यामुळे तुम्हाला झोपू द्यायचं नाही आणि तुमच्या हातातला मोबाईल कधीही, थोड्या वेळासाठीही सुटता कामा नये, यासाठीच तर त्यांनी मोहजाल पसवलंय, अगदी दारू आणि ड्रग्जपेक्षाही महाभयंकर. `आम्ही दारूला स्पर्श करीत नाही’ किंवा `ड्रग्ज हे काय प्रकरण आहे ते आम्हाला माहीतच नाही‘ याप्रमाणेच दिवसभरात माझा कामासाठी किंवा सोशली कनेक्टेड राहण्यासाठी ‘मोबाईल वा ऑनलाइनचा वेळ मी खूपच मर्यादित ठेवलाय, त्याच्या आहारी नाही गेलेय‘ हे जर प्रामाणिकपणे आणि ठामपणे सांगता आलं तर आयुष्याची बाजी जिंकली असं म्हणता येईल. प्रयत्न सुरु आहेत अगदी मनापासून, स्वत:ला दरडावून, धमकावूनही! सो दोन तारखेची गुरुवारची सकाळ रिझॉल्यूशनप्रमाणे पार पडली. आर्टिकल लिहून झालं. मॉर्निंग वॉक झाला. वेळेत ऑफिसला गेले, वहीत लिहून काढलेली कामं झाली. शांतचित्ताने, पण विजयश्री खेचून आणल्याच्या आंनदात घरी आले. काय मस्त फीलिंग होतं तेे, मिशन ॲकम्प्लीश्ड. शुक्रवारी जिम डे, शनिवारी स्पा, पेंटिंग सर्व व्यवस्थित पार पडलं. कॉन्फिडन्स यायला लागलाय की 'येस, आय कॅन'. स्वतःला सतत `अंडर ऑब्झर्वेशन’ ठेवावं लागणार आहे. `यू आर अंडर युअर ओन सर्व्हेलन्स’. फायदे इतके आहेत की कधी स्वत:च स्वत:ला ओरडलो, स्वतःशी थोडे निष्ठूर बनलो तरी हरकत नाही. `कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है’ असं म्हणतात. इथे तर खूपच साध्या सोप्या गोष्टी आहेत, ज्या सोडायच्या आहेत. सकाळी जाग आल्यावर उठायचं, गादी-दुलई कितीही खुणावत असली तरी उठायचं, बाहेर पडायचं, मग ते मॉर्निंग वॉक, जिम, स्विम, योग... काहीही असो, बाहेर पडायचंच. नाश्त्याची वेळ, जेवणाची वेळ ठरवायची आणि शक्यतो घरचंच खायचं. नो पॅकेज्ड फूड, सॉफ्ट ड्रिंक्स. साखर, मैदा, तेल जेवढं कमी करता येईल तेवढं करायचं.
एक जानेवारीला सुट्टी हा पूर्वी आमच्याकडे ‘टू बी ऑर नॉट टू बी' चा मुद्दा होता. वर्षाचा पहिला दिवस, तो आळसात घालवायचा? खरंतर हा दिवस दिवाळीच्या अभ्यंग स्नानासारखा सुरू झाला पाहिजे. पहाटे उठायचं, उटण्याने सुगंधी अंघोळ करायची. तासभर योगाभ्यास करून आपल्या मनाला मागच्या वर्षातून काढून या वर्षात माइंडफूल राहण्याचा सल्ला द्यायचा. ऑफिसला जायचं, मागच्या वर्षाप्रति कृतज्ञता व्यक्त करून, नमस्कार करून प्रवेश करायचा आपल्या कार्यस्थळी आणि झोकून द्यायचं नवीन वर्षात, हे माझं कल्पनाचित्र. तुमच्यापैकी कुणाची मतं अशी असतील तर जरूर लाइक करा. हा हा हा! पण एकंदरीत जगाचा आणि सर्वांचाच रोख बघता मी रेखाटलेलं हे चित्र बाजूला ठेवलं आणि जगाशी, नव्या जमान्याशी जुळवून घेतलं. मात्र एक तारखेला मी माझ्या कल्पनाचित्राप्रमाणे बऱ्यापैकी गोष्टी करते. ऑफिस बंद असलं तरीही मी, वही, पेन आणि डेस्क आम्ही बरोबर दहा वाजता एकत्र भेटतो. नवीन वर्षात ऑर्गनायझेशनशी निगडित नवीन रिझॉल्यूशन्सनी मनात गर्दी केलेली असते. त्याकडे तटस्थपणे बघत, त्यातली काही बासनात बांधत, जेवढी प्रॅक्टिकली शक्य वाटतात त्यावर 'लेट्स डू इट' चा शिक्का मारत, एक एक लिहायला सुरुवात करते. अगदी खूप खेचत नाही स्वत:ला या पहिल्याच दिवशी, पण दुपारच्या जेवणापर्यंतचा हा वेळ खरोखरच नवीन वर्षाकडे बघण्याचा दृष्टीकोन दृढ करून टाकतो आणि दोन तारखेला जेव्हा कार्यालयात प्रवेश होतो तेव्हा टीम जरी थोडीफार हँगओव्हरमध्ये असली तरी मी क्लिअर असते, आपल्याला नेमकं काय करायचं या नवीन वर्षात त्या प्रति!
गेल्यावर्षी माझ्या रिझॉल्यूशन्समध्ये मी तीन भाषा शिकण्याचा संकल्प केला होता. स्पॅनिश, जापनीज आणि गुजराती. त्यातल्या स्पॅनिशला तर मी विसरूनच गेले. गुजराती वाचण्यापुरतंच मर्यादित राहिलं, जापनीज क्लास मात्र सुरू आहे. तिथे अजूनही मी नर्सरीतच आहे पण हे ही नसे थोडक.े रिझॉल्यूशन्सची वाट लागल्यावर मी ह्या नवीन वर्षासाठी `उद्याची कामं आज रात्री वहीत लिहीणं आणि उद्या रात्री त्यावर टिकमार्क करणं’ (ही गोष्ट अनेकदा ठरवलीय पण कधीच पूर्ण विजय नाही मिळवलाय, विश मी बेस्ट लक!) याउपर एकही रिझॉल्यूशन न करण्याचं ठरवलं, माझं ॲम्बिशियस मन दरवर्षीप्रमाणे अनेक रिझॉल्यूशन्सकडे खेचत असलं तरीही. ॲक्च्युअली हलकं वाटतंय त्यामुळे. पण एक मात्र मान्य करावं लागेल ते म्हणजे वर्षांनुवर्षं नवीन वर्षी केलेल्या रिझॉल्यूशन्सची कितीही वाट लागली तरी प्रत्येक वर्षी पुन्हा एकदा रिझॉल्यूशन्स करण्याची आपली जी काही जबरदस्त इच्छा असते त्याला तोड नाही. चिकाटी, सातत्य, पर्सिस्टन्सचं ह्यापेक्षा चांगलं उदाहरण नसेल.
गतवर्षी ठरविलेलं पर्यटन मात्र आम्ही पूर्ण केलं. अनेक नवीन देश पाहिले. पर्यटकांसोबत वीणा वर्ल्डच्या सहलींचा आस्वाद घेतला. त्यातल्या दोन टूर्स अजून पूर्ण व्हायच्या आहेत, त्या म्हणजे मोरोक्को रोड ट्रीप आणि फिलिपिन्स. फायनान्शियल इयर संपण्याच्या आत त्या पूर्ण होतील. गेल्यावर्षी आम्ही ठरवून, पर्यटकांना सांगून टूर्स केल्या. त्या झाल्याही. आता दरवर्षी नित्य नवं काहीतरी हवं नं, तेव्हा आम्ही थीम घेतलीय ती म्हणजे वीणा वर्ल्डची टॅगलाइन, `चलो, बॅग भरो, निकल पडो!’. काहीही ठरवायचं नाही. एखादा विकेंड थोडासा मोकळा मिळाला की निघायचंं आणि आमच्या कोणत्याही, कुठेही चालू असलेल्या टूरला जॉइन व्हायचं. दोन तीन दिवस पर्यटकांसोबत आणि आमच्या टूर मॅनेजरसोबत आनंदात घालवायचे. बहुतेक सर्व व्हिसा तर आमच्याकडे असतातच त्यामुळे भारतात वा परदेशात आम्ही कुठेही जॉईन होऊ शकतो. शॉप फ्लोअर रिॲलिटी तर कळेलच आणि पर्यटकांसोबत राहिल्यामुळे त्यांचेही फीडबॅक फर्स्टहँड मिळतील. `जे आम्ही प्रॉमिस करतो ते डिलीव्हर होतं का?’ हे बघणं हा महत्वाचा भाग असेल. हे पोलिसिंग नाही, कारण आमचा आमच्या सर्व डिपार्टमेंट्सवर, आमच्या असोसिएट्सवर, आमच्या टूर मॅनेजरवर पूर्ण विश्वास आहे. सर्वांच्या मन:पूर्वक सहकार्यानेच तर वीणा वर्ल्डची घोडदौड सुरू आहे आणि दिवसागणिक पर्यटकांचा विश्वास वाढतोय. दिलेल्या शब्दाला जागणं, पर्यटकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणं यासाठीच आमची ही सारी धडपड.
हे नवीन वर्ष सर्वांना मस्त जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला येणाऱ्या नित्य नव्या दिवसाचं सोनं करूया!
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...
आयबेरियाच्या पेनिन्सुलावर विसावलेला आणि युरोपमधला आकाराने चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश म्हणजे ‘स्पेन’. एकेकाळी या देशाच्या जगभरात अनेक वसाहती होत्या आणि त्यामुळेच आज ‘स्पॅनिश’ ही भाषा जगातली सर्वात जास्त प्रचारात असलेली दुसऱ्या क्रमांकाची भाषा ठरली आहे. स्पेन म्हटल्यावर ‘ला टोमॅटिनो’ आणि ‘पॅम्पलोनाची बुल फाइट’ या दोन गोष्टी चटकन आठवतात. त्याबरोबरच स्पेनच्या ऐतिहासिक परंपरेमुळे या देशातील एकूण 47 स्थानांचा समावेश युनेस्कोच्या विश्व वारसा यादीत झालेला आहे. या स्मारकांपैकी एक म्हणजेच स्पेनच्या ग्रॅनाडा शहरातील ‘अलहम्ब्रा पॅलेस’. हा एकच महाल नाही, तर हा राजवाड्यांचा समूह आहे जो 35 एकर जमिनीवर पसरलेला आहे. 13 व्या शतकात या प्रदेशावर नासरिद ही इस्लामी राजवट असताना, हा समूह उभारण्यात आला आहे. तेव्हापासून याचे सौंदर्य, भक्कमपणा आणि याच्या आवारातील उद्यानांसाठी ही वास्तू ओळखली जाते. या समूहात सहा पॅलेस, अनेक स्नानगृहं, दोन मनोरे यांचा समावेश आहे, इथे पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था होती, त्यामुळे अलहम्ब्रा मध्ये राहणारे लोक जणू स्वतंत्र वसाहतीत राहायचे. हा सगळा समूह घडवताना धरतीवरील स्वर्ग उभारायचा आहे असं ठरवूनच याचे आराखडे बनवण्यापासून ते इमारती उभारण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत तशी दक्षता घेण्यात आली होती. इथल्या टाइल्सबद्दल सांगितलं जातं की अतिशय परिपूर्ण डिझाइन्स तयार होतील याची काळजी घेऊन टाइल्सचं काम केलं आहे. इथली इस्लामी राजवट संपल्यानंतर या वास्तूचा उपयोग स्पेनचे सम्राट-सम्राज्ञी फर्डिनंड आणि इसाबेला यांच्या रॉयल कोर्टसाठी करण्यात आला. याच वास्तूमध्ये ख्रिस्तोफर कोलंबसला त्याच्या सागरी मोहिमेसाठी स्पेनचं पाठबळ जाहीर करण्यात आलं.
या राजवाड्यांच्या समूहाचं नाव ‘अल हमरा’ या अरेबिक शब्दावरुन आलं आहे, ज्याचा अर्थ होतो ‘लाल रंगाचा’. कारण सुरुवातीला इथल्या राजवाड्यांच्या भिंतींचा रंग त्यासाठी वापरलेल्या मातीमुळे ‘लाल’ होता. त्यामुळे ‘द रेड फोर्ट्रेस’ म्हणजे ‘लाल किल्ला’ म्हणून ही याची ओळख आहे. या महालाची सजावट करण्यासाठी भिंतींवर, स्तंभांवर अतिशय नाजूकपणे केलेलं कोरीवकाम पहायला मिळतं, मात्र ती केवळ नक्षी नाही, तर कुराणातील वचनांच्या ओळींमधून ही नक्षी तयार केलेली आहे.
या समूहातील ‘अल्काझाबा’ हा मनोरा अस्तित्वात असलेल्या सर्वात पुरातन इमारतींपैकी एक आहे. या इमारतीचा 85 फुटांचा टॉवर हा इथला सर्वोच्च मनोरा आहे, जिथून पूर्वी सगळ्या परिसराचे नियंत्रण केले जायचे. इस्लामिक आणि ख्रिश्चन दोन्ही राजवटींच्या खुणा अलहम्ब्रा पॅलेस समूहावर पहायला मिळतात.
वीणा वर्ल्डच्या स्पेन टूरमध्ये सहभागी होऊन अलहम्ब्रा पॅलेसला भेट द्यायची संधी चुकवू नका.
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन
100 Country Club
अनुभवसंपन्न पर्यटन
आपण जेव्हा दुसऱ्या देशाला भेट देतो, वेगळ्या संस्कृतीचा परिचय करून घेतो, नेहमीपेक्षा वेगळा निसर्ग बघतो आणि त्या त्या देशातले स्थानिक पदार्थ खाऊन बघतो तेव्हा आपल्या अनुभवाचं क्षितिज विस्तारतं. असा पर्यटनानुभव तुमच्या आयुष्याला समृध्द करतो आणि तुमचं जगणं अधिक अर्थपूर्ण करतो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे याच उद्देशाने जग पर्यटन करत असतो. आम्ही कोलकाता येथे राहतो आणि वीणा वर्ल्डसोबत आम्ही आमचा पर्यटनाचा छंद पूर्ण करतो. दरवर्षी आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर साधारणपणे दोन वर्ल्ड टूर्स आणि तीन ते चार भारतातील सहली करतो. आजपर्यंत आम्ही जगभरातल्या 40 हून अधिक देशांना भेट दिली आहे. या भटकंतीमुळे आमचं जीवन नक्कीच समृध्द झालं आहे.
पर्यटनाचा उद्देश रिलॅक्सेशन असतो, रोजच्या कामाच्या ताणतणावांपासून पर्यटनामुळे चार-आठ दिवस मुक्ती मिळते, रोजच्या कटकटी-विवंचना विसरायला होतं आणि एक वेगळा भूभाग-अनोखी माणसं पाहून मन अगदी ताजंतवानं होतं, ज्यामुळे तुम्हाला काम करायला दुप्पट उत्साह येतो. आम्ही पर्यटनासाठी ठिकाण निवडताना आधी त्या देशाविषयी माहिती गोळा करतो, तिथे कोणत्या हवामानात पर्यटन करणं सुखकारक आहे याचा अभ्यास करतो, त्यानंतर ठिकाण पक्कं करतो. आजवरच्या सगळ्या भ्रमंतीमध्ये आम्हाला सर्वात जास्त आवडलेलं ठिकाण म्हणजे ‘स्वित्झर्लंड’. जगातल्या इतर कोणत्याही ठिकाणाची तुलना स्वित्झर्लंडच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याशी होऊच शकत नाही. स्वित्झर्लंडप्रमाणेच साउथ ईस्ट एशियामधील देशांनीही आमच्या मनावर गारूड केलं. विशेषतः थायलंड आणि मलेशिया या देशांचा अनुभव आम्ही विसरूच शकत नाही. त्यातही थायलंडमध्ये खाल्लेल्या स्वादिष्ट सी फूडची चव तर आजही जिभेवर रेंगाळते आहे.
परदेशातून आम्ही जसे फ्रीज मॅग्नेट्स आणतो त्याचप्रमाणे स्थानिकांच्या कला कौशल्याला उत्तेजन देण्यासाठी त्यांनी बनवलेल्या विविध वस्तूही आणतो. पर्यटनाचा खरा आनंद अनुभवण्यासाठी तुम्ही ज्या देशाला भेट देता तिथला एखादा सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकाचा प्रयोग अवश्य बघावा.
काय बाई खाऊ कसं गं खाऊ!
खाद्यपदार्थ आणि पेयं यांच्या स्वादाची मोहिनीच अशी असते की त्यांना कोणत्याही सीमारेषा अडवू शकत नाहीत. बघता बघता जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर या गोष्टी जाऊन पोहोचतात आणि लोकप्रिय होतात, म्हणून तर आशिया खंडाच्या कोपऱ्यातील बाली बेटांवरची कॉफी युएसए मध्ये लोकप्रिय झालेली पहायला मिळते. गंमत म्हणजे ‘कॉफी’ हे काही बाली बेटांवरचं स्थानिक पीक नाही. जेव्हा इंडोनेशियावर डचांची राजवट होती तेव्हा त्यांनी अरबस्तानामधून (स्मगल्ड करून!) आणलेल्या कॉफीच्या रोपांची लागवड इंडोनेशियातील किंतामनी आणि सिंगराजा या भागात केली आणि बालीची कॉफी जगासमोर आली. आता कॉफी बालीच्या खाद्यसंस्कृतीत पूर्ण मिसळून गेली आहे. तिथल्या पारंपरिक कॉफी हाऊसमध्ये म्हणजे ‘वारुंग कोपी’ मध्ये बसून स्थानिक आणि पर्यटक सारख्याच आवडीने बालिनीस कॉफीचे घुटके घेताना पहायला मिळतात.
बालिनीस कॉफी इंडोनेशियातील इतर भागांमधील कॉफीपेक्षा वेगळी ठरते, कारण ती ‘वेट प्रोसेसिंग’ पध्दतीने बनवली जाते. या पध्दतीत कॉफीची फळे सुकण्याआधीच झाडावरून तोडतात आणि त्यातल्या कॉफीच्या बिया बाहेर काढतात. मात्र या नेहमीच्या पध्दतीने बनवलेल्या कॉफी शिवाय बालीमधली ‘कोपी लुवाक’ ही कॉफी जगभरात सर्वात महाग कॉफी म्हणून ओळखली जाते. ही कॉफी सिवेट कॅटच्या (रान मांजराचा प्रकार) पोटातून प्रोसेस होऊन आलेली असते आणि त्यामुळे दुर्मिळ असते. सिवेटने खाल्लेल्या कॉफीच्या फळातल्या बिया तिच्या पोटात तशाच राहतात, तिच्या पोटातील पाचक रसांमुळे त्यांचा कडवटपणा कमी होतो, त्यामुळे या कॉफीची चव जरा गोडसर लागते.
देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.
ट्रॅव्हल बकेट लिस्ट!
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत
तुमच्यासारख्या पर्यटन प्रेमींसाठी न्यू इयर रिझॉल्यूशन अर्थातच पर्यटनाशी संबंधित असणार, नाही का? तुम्ही जर नवीन वर्षासाठी तुमची ट्रॅव्हल बकेट लिस्ट तयार करत असाल तर आमच्याकडून हे घ्या त्यासाठीचे काही पर्याय.
नॉर्दर्न लाइट्स अर्थात अरोरा बोरेआलीस हा आकाशातल्या नैसर्गिक आतिषबाजीचा नजारा बेडवर पडल्यापडल्या पाहायला मिळाला तर? त्यासाठी तुम्हाला फिनलँडच्या सर्वात उत्तरेकडच्या लॅपलँडला भेट द्यायला हवी. आर्क्टिक सर्कलमध्ये येणाऱ्या लॅपलँडमध्ये तुम्ही ‘ग्लास इग्लू’ मध्ये राहण्याचा रोमांचक अनुभव घेऊ शकता. बाहेरच्या बर्फाळ वातावरणाचा त्रास न होता, या इग्लूमधल्या उबदार बेडवर पडून तुम्ही आकाशात उमटणारी नॉर्दर्न लाइटसची रांगोळी सहज बघू शकता. फेब्रुवारी-मार्चपर्यंत नॉर्दर्न लाइटस बघायला मिळतात, मग लगेच ठरवा तुमच्या तारखा.
युरोपमधल्या काही देशांमध्ये जशी सिटी साइट सीइंगसाठी हॉप ऑन बस सर्व्हिस असते, त्याचप्रमाणे साउथ ईस्ट एशियातील व्हिएतनाम मध्ये तुम्ही ‘आयलंड हॉपिंग’ करू शकता. व्हिएतनाममधील ‘फू कोक’ या बेटावर हॉलिडे एन्जॉय करताना आसपासच्या अनेक बेटांना भेट देण्यासाठी तुम्ही हा मार्ग वापरू शकता. रम्य सागर किनारे, वॉटर पार्क्स, वॉटर स्पोर्टस, चविष्ट सी फूड यामुळे इथला हॉलिडे अगदी संस्मरणीय होतो. आशिया खंडातल्या रंगतदार हॉलिडेज् मध्ये जपानमधल्या चेरी ब्लॉसमचा समावेश करायलाच हवा. फिकट गुलाबी रंगाच्या नाजूक फुलांनी डवरलेल्या चेरीच्या झाडांचा बहर बघणं याला जपानी परंपरेत ‘हानामी’ म्हणतात. वसंताच्या आगमनाची चाहूल देणारा हा चेरीचा बहर साजरा करताना जपानी परंपरेप्रमाणे तुम्ही त्या बहरलेल्या झाडाखाली पिकनिकचा आनंद लुटू शकता. आशियाई सेलिब्रेशनचा एक धमाका तुम्ही तैवानमध्ये ‘लँटर्न फेस्टिव्हल’ मध्ये अनुभवू शकता. आशा, समृध्दी, शांतता याचं प्रतीक असलेले रंगीबेरंगी, विविध आकाराचे कंदील आकाशात सोडून येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करायची परंपराच तैवानमध्ये आहे. या वर्षीचा लँटर्न फेस्टिव्हल फेब्रुवारीत होणार आहे.
नवीन वर्षाच्या बकेट लिस्टमध्ये आपल्या भारतातील ऋषिकेशचा समावेश अवश्य करावा. गंगेच्या काठावरचं ऋषिकेश ही पुरातन तपोभूमी आहे. इथल्या निसर्गरम्य वातावरणात मेडिटेशन, योगा यातून तुम्हाला मनःशांती आणि आरोग्य मिळवता येईल. इथले वेलनेस रिट्रीट त्यासाठीच प्रसिध्द आहेत. नवीन वर्षातील हॉलिडेसाठी भारतीयांसाठी एक खुशखबर म्हणजे थायलंड, मलेशिया, मॉरिशस, भूतान आणि इतर काही देशांना ‘व्हिसा फ्री’ तत्वावर भारतीय पासपोर्टधारक शॉर्ट स्टेसाठी भेट देऊ शकतात. एकूण 2025 ची हॉलिडेजची बकेट लिस्ट एकदम इंटरेस्टिंग होणार तर. त्यात सेरेंगेटीमधली हॉट एअर बलून राईड, स्वित्झर्लंडमधील ग्लेशियर एक्सप्रेसचा अविस्मरणीय प्रवास, इटलीच्या टस्कनीमधील वाइन टेस्टिंग आणि ट्रफल (मशरुम्स) हंटिंग, जॉर्जियामधील स्कीइंग असे कितीतरी अनुभव तुमची वाट पाहत आहेत.
नवीन वर्ष सुरू झालंय. मग आता वाट कसली बघताय? बनवा तुमची 2025 ची हॉलिडे बकेट लिस्ट आणि वीणा वर्ल्डच्या कस्टमाइज्ड हॉलिडे टीमच्या सोबतीने करा ती कंम्प्लिट.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.