Published in the Sunday Sakal on 14 July, 2024
उन्हाळ्याची सुट्टी आणि सुट्टीतल्या सहली संपल्या की आम्हा सगळ्यांना उसंत मिळते. हुश्श्य व्हायला होतं. तसं बघायला गेलं तर वर्षभरातल्या कामाचा, त्याचा रीझल्ट मिळण्याचा हा कालावधी. फायनान्शियल इयरचा फर्स्ट क्वॉर्टर. तो पन्नास टक्के परिणाम दर्शवून जातो. हिरो बनतो. म्हणजे आधीच्या वर्षाने काम केलेलं असतं पण सगळे मान मरातब मिळतात ते नवीन वर्षातल्या पहिल्या तिमाहीला. `बहरला पारिजात दारी.. फुले का पडती शेजारी’, असं आधीचं वर्ष ह्या नवीन वर्षाच्या फर्स्ट क्वार्टरला म्हणत असेल. असो. पण एकंदरीत थोडी विश्रांती घ्यायचा महिना म्हणजे जुलै. रीलॅक्स. ‘काय घ्यायच्या त्या सुट्ट्या बिट्ट्या घेऊन टाका‘ असं आम्ही एकमेकांना सांगत असतो. पुन्हा पुढच्या वर्षाच्या त्या पहिल्या फायनान्शियल क्वार्टरसाठी काम करायचं आहे. ह्या येणाऱ्या सात आठ महिन्यात त्यासाठी रीफ्रेश होणं गरजेचं.
जसा विश्रांतीचा तसाच निवांतपणे गेल्या तीन महिन्यांकडे अवलोकन म्हणून बघण्याचा हा महिना. एकमेकांची पाठ थोपटण्याचा, शाबासकी देण्याचा हा महिना. एकदा का हा अभिनंदनाचा बहर ओसरला किंवा तो ओसरवावा लागतो कारण ह्यात अडकून राहणं म्हणजे हळूहळू पुढच्या प्रयत्नांमध्ये शैथिल्य येणं. सध्याच्या भाषेत ‘कम्फर्ट झोन’ मध्ये जाणं. हे टाळता आलं पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही सुरू करतो दुसरा अध्याय. आणि त्याचं नाव आहे, `माझं काय चुकलं?‘. इतर सगळ्या ठिकाणी आम्ही ‘टीम वर्क’ चा घोषा लावतो, जे काही केलं ते सगळ्यांनी मिळून, सगळ्यांच्या प्रयत्नाने. एकट्याने काही होत नाही, त्यामुळे श्रेय सगळ्यांना. आता ह्यामध्येही आमचे टूर मॅनेजर्स जे असतात ती आहे ‘वन पर्सन इंडस्ी’ बॉलिवूड स्टार्स किंवा क्रिकेटर्स सारखी. टूर्सवर त्यांच्या पाठीशी सगळी ऑफिस टीम असली तरी जो काही परफॉर्मन्स द्यायचा असतो तो त्याला वा तिला एकेकट्यांनाच द्यायचा असतो. त्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव हा त्यांच्यावर थोडा जास्तच असतो. ॲन्ड दे डीझर्व्ह इट.
भविष्यकाळ आजच्यापेक्षा उज्ज्वल हवा असेल तर मग अभिनंदनाची आतिषबाजी थांबवून पुन्हा एकदा त्या दैदिप्यमान कामगिरी केलेल्या पहिल्या तिमाहीकडे बघितलं पाहिजे. वेगळ्या दृष्टीकोनातून आणि ते एवढ्याचसाठी की `सेलिब्रेशनच्या-अभिनंदनाच्या-व्हॉट अ परफॉर्मन्सच्या‘ मानसिकतेत असताना सगळंच छान छान वाटतं. डोळ्यावर कौतुकाची झापडं जी लागलेली असतात. त्याचवेळी भानावर यायचं असतं, यावं लागतं. `ऑल इज वेल’चा चश्मा उतरवावा लागतो आणि मग चश्मा घालावा लागतो तो `माझं काय चुकलं?‘चा. कधी कधी यश इतकं मोठं असतं की चूका बिचाऱ्या कुठेतरी कोपऱ्यात घुसमटत असतात ज्या नजत येत नाहीत. आणि म्हणूनच वास्तवाचा दृष्टीकोन घेऊन एक एक करीत त्या चूका शोधून काढायला आम्ही सुरुवात करतो. एकदा का मनापासून`माझं काय चुकलं?‘चा चश्मा लावला की कोपऱ्यात ढकलल्या गेलेल्या चूका सुस्पष्ट दिसायला लागतात. आमच्याकडे बऱ्याचदा पर्यटकांच्या पत्रांमधून त्या कळतात. टूरवर घडणाऱ्या एखाद्या गोष्टीतून निदर्शनास येतात. त्यामुळे सध्या आमचं चुका शोधण्याचं काम सुरू आहे. ह्या सगळ्या चुकांची जबाबदारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे माझी असते. उत्तरदायित्व माझ्याकडे. चूक कुणाकडूनही होवो पण जेव्हा कुठेतरी काहीतरी चुकीचं घडतं, तेव्हा कधी सिस्टिम चुकीची असते, तर कधी दुर्लक्ष झालेलं असतं. कधी दूरदृष्टीचा अभाव असतो, तर कधी गोष्टी तावून सुलाखून घेतलेल्या नसतात. प्रत्येक चुकीची कारणं अनेक असू शकतात पण शेवटी चूक ही चूक असते आणि त्याची जबाबदारी मी झटकू शकत नाही. म्हणूनच ‘माझं काय चुकलं?’ ही थिअरी.
‘माझं काय चुकलं?‘ ह्यामध्ये कर्ता मी स्वत: असण्याचं कारण चूक झाल्यानंतर ‘कुणी केलं?‘ किंवा ‘कोण जबाबदार?‘ आणि मग त्या व्यक्तीला कसं हाणायचं पाडायचं ह्यातच शक्ती खर्च होते. त्यापेक्षा ‘चूक माझी‘ कारण मी सध्या ‘हेड ऑफ द ऑर्गनायझेशन‘ असल्याने ज्या तऱ्हेने प्रशंसा पुरस्कार स्वीकारतो तेवढ्याच सहजपणे चूक स्वीकारता आली पाहिजे. ऑर्गनायझेशन आहे, ह्युमन डिपेन्डन्सी आहे, एकजण दुसऱ्यावर अवलंबून आहे, त्यामुळे कधीतरी चुका होणार. चूक होणारच नाही ही गॅरंटी सर्व्हिस इंडस्ीत देता येत नाही, मात्र चुका सुधारण्याचं एक एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे दररोज. चुका कमी झाल्या पाहिजेत, ‘चुका होणार नाहीत‘ ह्या थोड्याशा अवघड वाटणाऱ्या मार्गावरून वाटचाल करता आली पाहिजे. एक मात्र अगदी महत्वाचं आणि ते म्हणजे एकदा झालेली चूक पुन्हा होऊ द्यायची नाही. दुसऱ्यांदा तीच चूक झाली तर मग मात्र तो अक्ष्यम्य अपराध. पहिली चूक क्षम्य असते, कधी कधी ती वेलकमिंगही असते कारण ती आपल्या ऑर्गनायझेशनमधले दोष दाखवते. काही वेळा चुका झाल्यावर जी परिस्थिती उद्भवते त्यावेळी तातडीने सोल्युशन काढून आपल्याला ती वेळ आपण निभावून न्यावी लागते. चुकीची तातडीने दुरूस्ती करून आपण ‘हुश्श्य‘ म्हणत तो प्रसंग विसरून जातो. पुन्हा काही दिवसांनी तीच चूक होते आणि मग कपाळाला हात लावण्याची नौबत येते. आता हा गुन्हा असतो. ह्याला क्षमा नाही. आम्ही ह्यासाठी ‘काऊ प्रिन्सिपल‘ वापरतो. तेहतीस कोटी देवांना आपल्यात सामावून घेणारी गाय मॅनेजमेंटमध्ये आमच्या मदतीला आली आहे. ‘एक गाय पाणी भरलेल्या खड्ड्यात पडली, आता ती कुणामुळे? कशामुळे? त्या खड्ड्यात पडली ह्या वादविवादात न पडता आधी तिला बाहेर काढा. एकदा का ती ठाकठिक आहे ह्याची खात्री पटली की मग शोधा ती खड्ड्यात पडण्याची कारणं काय? ‘कुंपण नव्हतं, खड्डा आहे हे कळतच नव्हतं, गाईला दिसत नव्हतं...‘ कारणमिमांसा झाल्यावर लागलीच उपाययोजना करा जेणेकरून ही गाय किंवा कोणतीही दुसरी गाय, बैल, म्हैस इतर प्राणी त्या खड्ड्यात पडणार नाहीत. हे काऊ प्रिन्सिपल आम्हाला गेल्या दहा वर्षात बऱ्याच वेळा उपयोगी पडलंय. आता पीक सीझन संपल्यावर आमची चुका शोधण्याची आणि काऊ प्रिन्सिपल वापरण्याची वेळ आहे. त्याच चुका पुन्हा होऊ न देणं, त्यासाठी पूर्ण खबरदारी घेण्याची वेळ आहे.
कधी कधी आम्ही मजेत पण सिरियसली म्हणतोच, ‘त्याच चुका करायला परवानगी नाही. नवीन चुका करा.‘ चुका क्लासिक केससारख्या असाव्यात. म्हणजे कधी कधी एखाद्या चुकीमुळे असा काही प्रसंग उभा राहतो की लक्षात येतं ह्यात बघायला गेलं तर चूक कुणाचीच नाही पण एखादा असा धागा असतो जो कधीही न पाहिलेला, न लक्षात आलेला असतो. ती चूक असते पण तिथे निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष नसतं. मग त्या चुकीला ‘क्लासिक केस स्टडी‘ म्हणून आम्ही मखरात बसवतो. ‘अ असंही होऊ शकतं‘ तेव्हा आणखी सावधानी बाळगावी लागेल. चला शोधून काढूया अशा काही आणखी गोष्टी घडू शकतील का? आणि त्यासाठीचा प्रतिबंध कसा करायचा. प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर. आपल्या चुकीमुळे आपल्या पर्यटकांना त्रास होणार नाही ह्याची खबरदारी घेणं हे माझं आणि ऑर्गनायझेशनमधल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ती मानसिकता प्रत्येकाच्या अंगी बाणवली जातेय. पर्यटकांचा पाठिंबा दिवसागणिक वाढतोय त्यामुळे आपण राइट ट्रॅकवर आहोत असं म्हणायला हरकत नाही. पण ‘दिल्ली अभी दूर है‘ त्यात आम्हाला हवी ती अचूकता आणायला. अर्थात हा कधीही न संपणारा प्रवास आहे. न कंटाळता न थकता तो मन:पूर्वक आनंदाने करता आला पाहिजे. ‘माझं काय चुकलं?‘ हे जसं मी स्वीकारते तसंच ते मॅनेजमेंटमधल्या प्रत्येकाने आणि सगळ्या मॅनेजर्सनीही ज्यांच्या त्यांच्या टीमच्या वा डीपार्टमेंटच्या बाबतीत स्वीकारलं पाहीजे. ज्याला ज्याला असं ‘माझं काय चुकलं?‘ ह्या अवलोकनाची, त्यातून शिकण्याची, त्यात लागलीच कक्शन करण्याची सवय जडेल तो वा ती त्यांच्या करियरमध्ये जास्त वेगात पुढे जाऊ शकतील.
‘माझं काय चुकलं?‘ ही जेवढी चांगली थिअरी तेवढीच वाईट ही बरं का. कधी कधी आपल्याकडून घडलेल्या एखाद्या चुकेला आपण एवढं कुरवाळत बसतो, सारखी त्याची आठवण काढत मनातल्या मनात स्वत:ला दोष देत राहतो की, हळूहळू आपण नैराश्याच्या किंवा सध्या सगळ्यांचा आवडता शब्द म्हणजे ‘डीप्रेशन‘च्या गर्तेत खेचले जातो. इथे थांबवायचं स्वत:ला, अगदी प्रयत्नपूर्वक. चूक झाली आणि अगदी ब्रम्हदेव आला तरी ती रीव्हर्स जर करता येणार नसेल तर त्याचं प्राय:श्चित घ्यायचं. तेही लागलीच. जे काही शक्य असेल ते करायचं. परिस्थिती सुधारण्याचा मनोमन प्रयत्न करायचा आणि त्यातून बाहेर पडायचं. अजिबात त्यात खितपत पडायचं नाही. त्या चुकेमुळे आलेलं गिल्ट, अपराधीपणाची भावना, काळजी, खंत ह्या गोष्टी फक्त आपला भेजा खातात. कशाला ती संधी द्यायची त्यांना. एक इंग्लिश सुभाषित चांगलं आहे. ‘काळजी करून जर प्रश्न सुटणार असेल तर काळजी करण्याचं कारणच काय? आणि काळजी करूनही प्रश्न सुटणार नसेल तर काळजी करण्याचा उपयोग काय?‘ एकूण काळजी करायची नाही. ‘माझं काय चुकलं?‘ हे शोधायचं किंवा अवलोकन करायचं ते गोष्टी वा परिस्थिती सुधारण्यासाठी, चांगल्यासाठी, स्वत:चा, कुटुंबाचा विकास करण्यासाठी, आपल्या करियरला किंवा ऑर्गनायझेशनला पुढे नेण्यासाठी. मात्र उलटा प्रवास कदापि नाही.
अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...
आपल्या भारत देशाला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे आणि या परंपरेत सांस्कृतिक खजिना दडलेला आहे. या परंपरेत अनेक कलांचे प्रवाह आहेत. भारतीय संगीत, भारतीय साहित्य, भारतीय नृत्यकला, भारतीय शिल्पकला या कलांची थोरवी आपण सारेच जाणतो. या कलांबरोबरच आणखी एक कला भारतीय परंपरेत बहरलेली, वाढलेली पहायला मिळते आणि ती कला म्हणजे ‘वास्तुकला ’. भारतीय संगीत आणि नृत्य हे जसं भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने विकसित झालेलं पहायला मिळतं त्याच प्रमाणे वास्तुकलेनं देखिल राज्यानुसार आपलं रुपरंग, शैली बदललेली पहायला मिळते. भारताच्या राज्यांमध्ये जे हवामानाचं, भौगोलिक परिसराचं वैविध्य पहायला मिळतं ते त्या त्या राज्यातील वास्तुशैलीत प्रतिबिंबीत झालेलं दिसतं. त्यामुळेच गुजरातमध्ये स्थानिक हवामान-पर्यावरण आणि कलाकौशल्य यांच्या संगमामधून निर्माण झालेल्या ‘ऑर्नामेंटल स्टेपवेल्स’ म्हणजे ‘नक्षिकामाने सजवलेल्या विहिरी’ पहायला मिळतात. भारताच्या चलनातील शंभर रुपयांच्या नोटेवर यातल्याच एका सुंदर कलात्मक विहिरीचा फोटो बघायला मिळतो. ही विहीर आहे गुजरातमधील ‘पाटण’ या शहरामधली. इतिहासकाळात हे शहर अन्हिलवाड किंवा अनहिलपूर या नावाने ओळखले जात असे. चावडा राजवंशाच्या राजधानीचे शहर अशी 8 व्या शतकात या शहराची ओळख होती. या शहरात 11 व्या शतकात तत्कालीन सोळंकी राजघराण्यातील राणी उदयमतीनं बांधलेली पायऱ्यांची, शिल्पांनी सजवलेली विहीर ‘राणी की वाव’ म्हणून ओळखली जाते. राणीनं आपले पती राजा भिमदेव (प्रथम) यांच्या स्मरणार्थ ही विहीर बांधली. आश्चर्यकारक वास्तुरचनेमुळं ही विहीर लक्ष वेधून घेते. अन्य विहिरींप्रमाणे या विहीरीचे अस्तित्व जमिनीच्या वर जाणवत नाही, कारण ही विहीर जमिनीखाली तेही सात मजली अशा पध्दतीनं बांधलेली आहे. पायऱ्या उतरत उतरत जेव्हा आपण खाली खाली जाऊ लागतो तेव्हा ठिकठिकाणचं कोरीवकाम नजरेत भरतं. उपयुक्ततेला सौंदर्याची जोड देण्याची आपल्या पुर्वजांची पध्दत खरोखरच अनुकरणीय आहे. या विहीरीचा आकार एखाद्या उलट्या मंदिरासारखा आहे, जलसंवर्धनाबरोबरच सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचा मंच म्हणूनही या विहीरीचा वापर केला जात असे. मरू-गुर्जर या स्थापत्य शैलीत या विहीरीचं बांधकाम करण्यात आलं आहे. पुर्वी या विहीरीच्या तळ मजल्यापर्यंत म्हणजे जिथे पाणी आहे तिथपर्यंत जाता येत असे, मात्र कच्छच्या भुकंपात या विहीरीचे काही प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे आता फक्त चार मजलेच उतरून जाता येतं. विहीरीच्या भिंतींवर विष्णू, गणपती, शंकर, ब्रह्मदेव, महिषासुरमर्दिनी, दशावतार अशा देवतांबरोबरच प्राणी, पक्षी, अप्सरा, नागकन्या आणि पुराणातले प्रसंग कोरलेले पहायला मिळतात. काळाच्या ओघात काही शिल्पं भंगलेली असली तरीही अत्यंत बारीक कलाकुसर आणि नक्षीकाम यामुळे राणीच्या विहिरीतील कलाकृती डोळ्यांचं पारणं फेडतात. या स्मारकाची नोंद युनेस्कोच्या विश्व वारसा यादीत झाली आहे. भारतीय कला परंपरेचं अभिमानास्पद चिन्ह असलेली राणी की वाव वीणा वर्ल्डच्या गुजरात सहलीत अवश्य पहावी.
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन
धम्माल भटकंती!
मला स्वतःला वर्तमानात जगायला आवडतं. भविष्यात गुंतून न पडता आत्ताच्या क्षणाचा पुरेपुर आनंद घ्यायला मला आवडतो आणि म्हणूनच पर्यटन ही माझ्या हृदयाला सर्वात जवळ असलेली गोष्ट आहे. या गोष्टीचा मनापासून आनंद घेतानाच माझे वीणा वर्ल्डबरोबर सूर जुळले. गेली दहा वर्ष वीणा वर्ल्डच्या डोंबिवली कार्यालयातून माझ्या टूर्स बूक करते. आजपर्यंत मी 16 टूर्स केल्या आहेत आणि या जून महिन्यात 17 वी टूर करत आहे. मला वाटतं की प्रत्येक टूर, त्या टूरमध्ये तुम्ही भेट दिलेला प्रत्येक देश तुमच्या अनुभवाची कक्षा विस्तारत असतो. त्या त्या प्रदेशाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, तिथल्या परंपरा, लोकजीवन याची माहिती आपल्याला पर्यटनामधून मिळते. त्यामुळे मी प्रत्येक सहलीकडे एक नवीन दालन उघडणारी सहल म्हणून बघते. मला माझ्या आगामी सहलीची ‘स्कँडिनेव्हिया विथ ईस्टर्न युरोप’ या सहलीची फार उत्कंठा लागली आहे. युरोपचा वेगळा चेहरा या सहलीत बघणार आहे आणि ते दर्शन घ्यायला मी आतुर आहे.
मी आजपर्यंत जगातले 35 देश बघितले आहेत. या सगळ्यात माझ्या कायम मनावर कोरली गेलेली जागा म्हणजे भारतातील अंदमान. या बेटावरचं निसर्गसौंदर्य खरोखरच थक्क करणारं आहे. इथला एलिफंट बीच तर मी कधीच विसरू शकत नाही. तिथलं नितळ, स्वच्छ पाणी मला आजही आठवतं. ही जागा माझ्यासाठी खास आहे, कारण इथेच मी पाण्यावर तरंगायला शिकले. मला वीणा वर्ल्डसोबत जायला आवडतं कारण त्यांची सेवा अतिशय प्रोफेशनल आहे. बुकींग ऑफिसपासून ते टूर मॅनेजर्सपर्यंत प्रत्येक बाबतीत एकदम तत्पर, आपुलकीची आणि विश्वासार्ह सेवा मला त्यांच्याकडून मिळते. बाहेरच्या देशात प्रवास करताना सुरक्षितता हा महत्वाचा पैलू असतो. ट्रान्सपोर्टपासून ते निवासव्यवस्थेपर्यंत प्रत्येक बाबतीत वीणा वर्ल्डकडून अतिशय सुविहित व्यवस्था केलेली असते. विशेषतः परदेश सहलींवरसुद्धा भारतीय भोजनाची व्यवस्था केली जाते. वीणा वर्ल्डच्या ‘वूमन्स स्पेशल’ सहलीवर मला आयुष्यातला सर्वात महत्वाचा मंत्र मिळाला आणि तो म्हणजे ‘मीच माझी राणी’. माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी हेच सूत्र अनुसरत आहे. आपण जेव्हा ग्रुप टूरवर जातो तेव्हा आपल्याला समविचारी लोक भेटतात व मित्रमंडळींचं वर्तुळ विस्तारतं.मला स्वतःला पर्यटन म्हणजे शरीराला आणि मनाला रिज्युवेनेट करण्याचा मार्ग वाटतो. पर्यटनामुळे आपल्याला भावनिक आणि आध्यात्मिक अंतर्दृष्टी मिळते. त्यामुळे मी पर्यटनासाठी कायम तयार असते.
विद्या गायकवाड, मुलुंड, मुंबई
काय बाई खाऊ कसं गं खाऊ!
वस्थापनामुळे किंवा कारभाराच्या सोयीसाठी किंवा भाषेमधील फरकांमुळे वेगवेगळी राज्ये निर्माण झाली असली तरी हवामान, निसर्ग आणि आहार यातील समान दुवे पाहून गंमत वाटते. एकसारख्या हवामानाच्या भूभागातले लोक वेगवेगळी भाषा बोलत असले तरी त्यांच्या आहारात काही गोष्टी विशेषतः भाज्या अनेकदा समान असतात. त्यामुळेच खास आसामी जेवणाचा भाग असलेली ‘ढेकी शाक‘ ही भाजी काश्मीरमध्ये, उत्तराखंडमध्ये, सिक्कीममध्ये, नेपाळमध्ये इतकंच काय म्यानमार, थायलंड, इंडोनेशियामध्येही जेवणाचा भाग झालेली पहायला मिळते. आसाममधल्या पारंपरिक गोधुली बाजार म्हणजे संध्याकाळी भरणाऱ्या बाजारात गेलात तर केळीच्या पानात बांधलेली एक पालेभाजी हमखास बघायला मिळेल. फर्न म्हणजे नेच्याच्या जातीतली ही वनस्पती तिच्या सुरनळीसारख्या वळलेल्या शेंड्यांनी लक्ष वेधून घेते. ढेकी शाक जशी रानात उगवते तशीच हल्ली तिची लागवडही केली जाते. ढेकी म्हणजे आसामी भाषेत भाताची तुसं, भात कांडल्यावर जिथे ही तुसं पडलेली असतात, त्या जमिनीवर ही भाजी मोठ्या प्रमाणावर उगवते म्हणून हिचं नाव ‘ढेकी’. आसामी जेवणात ढेकी शाक वेगवेगळ्या पध्दतीने बनवतात. बटाटा, कांदा, लसूण वापरून परतून ही भाजी जशी केली जाते त्याचप्रमाणे हरभरे-चणे घालून रस भाजीही करतात किंवा फिश, पोर्कबरोबरही ढेकी वापरली जाते. मुरवलेल्या बांबू शूट्सबरोबर ढेकीची चटणी केली जाते. डाळ, भात आणि ढेकीची भाजी हा मेन्यू आसाममधल्या घराघरांमध्ये असतो. खास रानभाजीची चव, ओमेगा थ्री व ॲन्टीऑक्सिडंट्स असे उपयुक्त घटक यात असल्यामुळे ही भाजी नक्की टेस्ट करून बघावी. देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.
अमेझिंग ऑस्ट्रेलिया
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत
गाच्या दक्षिण गोलार्धात एका भल्या मोठ्ठ्या बेटावर वसलेला खंड, जो एक देश ही आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. या बेटावरच्या देशातला निसर्ग अर्थातच जगावेगळा आहे, म्हणूनच इथला हॉलिडेसुध्दा एकदम भन्नाट होतो. स्वतःच एक मोठ्ठं बेट असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर आठ हजारपेक्षा जास्त बेटं आहेत, त्यामुळे ऑस्ट्रेलियातला हॉलिडे म्हणजे बेटावरच्या बेटांमधली सफर असतो. इथल्या प्रायव्हेट आयलंडसवर असलेल्या सुविधांमुळे तुमची सुट्टी एकदम रंगतदार होते. नॉर्थ ईस्टर्न ऑस्ट्रेलियामधील क्विन्सलँड राज्यातील नूसा नदीमधलं ‘मेकपीस आयलंड’ त्यातलंच एक. या प्रायव्हेट आयलंडवर अतिशय सुरेख आणि सुखसोयींनी युक्त असे व्हिला आहेत. इथे तुम्ही कयाक, पॅडल बोर्डस् वापरून सागराच्या लाटांवर स्वच्छंद भ्रमण करू शकता, इथल्या आउट डोअर सिनेमामध्ये आरामात पहुडून सिनेमाचा आनंद घेऊ शकता. ऑस्ट्रेलियाला जाणारे सगळेजण ग्रेट बॅरिअर रीफला भेट देतातच. या अद्भुत निसर्गशिल्पाचा आनंद घेण्यासाठी हॅगरस्टोन आयलंड रिसॉर्ट ही एकदम योग्य जागा आहे. या बेटावर टिपिकल ट्रॉपिकल पध्दतीच्या वास्तुशैलीतली निवास व्यवस्था आहे. भोवतालच्या निळ्या हिरव्या समुद्रातले जलचर, कोरल्स याबरोबरच तुम्हाला इथल्या जंगलातले पक्षीही आकर्षित करतात. ग्रेट बॅरिअर रीफच्या अलौकिक निसर्गाचा अनुभव घ्यायला आणखी एक झकास जागा म्हणजे ‘पम्पकिन आयलंड’. फक्त पंधरा एकरांच्या या लहानशा बेटावर ग्लास बॉटम कयाक, स्नॉर्केलिंगपासून ते स्वतः ऑयस्टर गोळा करण्यापर्यंत अनेक अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता. ऑस्ट्रेलियाच्या हॉलिडेवर घ्यायलाच हवा असा अनुभव म्हणजे ‘द घान’ या रेल्वेचा प्रवास. गेली नव्वदहून अधिक वर्षे धावणाऱ्या या ट्रेनचा प्रवास म्हणजे कम्फर्ट आणि ॲडव्हेंचर याचं मस्त कॉम्बिनेशन मानला जातो. ॲडलेड ते डार्विन असा प्रवास करणारी ही रेल्वे ऑस्ट्रेलियाच्या अनोख्या निसर्गाचं दर्शन घडवते. या ट्रेनचे आरामादायी कोचेस, ट्रेनमधलं चविष्ट जेवण आणि प्रवासातील साइटसीइंग यामुळे घान ट्रेनचा प्रवास हा खरोखरच जगातला सर्वोत्तम रेल्वे प्रवास आहे याची खात्री पटते. ऑस्ट्रेलियातील एक खास आकर्षण म्हणजे ‘उलुरु’ अर्थात ‘आयर्स रॉक’. या देशातल्या नॉर्दन टेरिटरीमधला हा अतिप्रचंड ‘मोनोलिथ’ इथल्या स्थानिक जमातीच्या लोकांसाठी एक पवित्र स्थळ आहे. युनेस्को हेरिटेज यादीत समाविष्ट असलेल्या या भव्य रॉकला जवळून पहाण्यासाठी ‘लॉन्जिट्यूड 1310’ या लक्झुरियस रिसॉर्टमध्येच रहायला हवं. इथून तुम्ही उलुरु आणि काता जुता या ठिकाणांभोवती हेलिकॉप्टर राइड घेऊ शकता तसेच हार्ले डेव्हिडसन राइड, पारंपरिक कॅमल राइड याचाही अनुभव घेऊ शकता. स्थानिक लोकांकडून या परिसराच्या लोककथा ऐकत, ताऱ्यांनी चमचमणाऱ्या आकाशाखाली घेतलेला फोर कोर्स डिनरचा आस्वाद तुमच्या हॉलिडेला एकदम संस्मरणीय करतो. कांगारू आयलंडवरील सदर्न ओशन लॉज, हॅमिल्टन आयलंडवरील क्वालिया रिसॉर्टमधील प्रायव्हेट पूल व्हिला, बरोसा व्हॅलीतील वाइअनरीजची भेट, ग्रेट बॅरिअर रीफमधील ‘रीफ स्विट्स’ या अंडरवॉटर हॉटेलमधला निवास असे एकापेक्षा एक अनुभव ऑस्ट्रेलियाच्या हॉलिडेत तुम्ही घेऊ शकता, वीणा वर्ल्डची कस्टमाईज्ड हॉलिडे टीम आहेच तुमच्या दिमतीला.
काय बघावं? कसं बघावं?
पहिली वहिली फॉ रेन टूर
रदेश प्रवास ही तर प्रत्येकाच्या मनात दडलेली सुप्त इच्छा. गावाबाहेर, शहराबाहेर, राज्याबाहेर, देशाबाहेर असा सर्वसामान्य प्रवासाचा आलेख असतो आणि देशाबाहेर पडतानाही साऊथ ईस्ट एशिया, मिडल ईस्ट एशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका हा क्रम असतो. आणि ते चांगलही आहे कारण पहिल्या प्रवासात जगाची तोफ्लडओळख, दुसऱ्या प्रवासात भीतीची गच्छंती, तिसऱ्या प्रवासात स्मार्ट पर्यटक, चौथ्या प्रवासात फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर अशी प्रगती जास्त चांगली. आता साऊथ ईस्ट एशिया हा जगप्रवासातील पहिला टप्पा असला तरी साऊथ ईस्ट एशियातही खूप देश आहेत. मलेशिया, सिंगापूर, इंडोनिशिया, व्हिएतनाम, थायलंड... त्याच्याच पुढे फार ईस्ट मध्ये जपान, कोरिया, तैवान, हाँगकाँग सारखे देश येतात. आम्ही एक ट्रॅव्हल कंपनी म्हणून प्रत्येक देशाच्या सोलो टूर किंवा दोन, तीन, चार, पाच देशांना एकत्र घेऊन कॉम्बिनेशन टूर्स देत असतो. पर्यटकांना जे हवंय ते देणं हे तर वीणा वर्ल्डचं कामच आहे. आता ह्या साऊथ ईस्ट एशियाच्या अनेक देशांमध्ये पर्यटकांची पहिल्यांदा कोणत्या देशाला सर्वात जास्त पसंती असेल तर ती आहे थायलंडला. थायलंड म्हणजे पटकन डोळ्यासमोर येतं ते बँकॉक पट्टाया. माझासुद्धा पहिला वहिला परदेश प्रवास थायलंडलाच घडला. आतातर थायलंड वीणा वर्ल्डच्या फॅमिली टूर्स, वुमन्स वा सिनियर्स स्पेशल टूर्स, कस्टमाईज्ड हॉलिडेज् आणि कॉर्पोट टूर्ससाठी लोकप्रिय बनलं आहे कारण थायलंड आतिथ्यशील देश आहे, माणसं वेलकमिंग आहेत, खूप काही बघण्यासारखं ह्या देशात आहे तसंच पॅरासेलिंग, थाय मसाज, टॉवर जंप, अंडर सी वॉक सारखे अनेक आनंददायी अनुभवही आहेत. बाहेरचे देश कसे आहेत त्याचा श्रीगणेशा थायलंड देश आपल्याला करून देतो. थायलंडच्या ऑल इन्क्लुसिव्ह पन्नास हजारातल्या टूरपासून पंधरा दिवसांच्या ऑल ऑफ थायलंडपर्यंतच्या टूर्स आहेत. तसंच कॉम्बिनेशन टूर्सही आहेत. तर चला, तुमच्या परदेशप्रवासाचा श्रीगणेशा करा. चलो, बॅग भरो, निकल पडो, ह्यावेळी थायलंडला.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.