Veena World is hiring! Click to apply now

IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

नथिंग मॅटर्स!

17 mins. read

Published in the Sunday Sakal on 02 February, 2025

कुठेही प्रवासाला गेलो की पहिले दोन गोष्टींची खात्री करून घ्यायची सवय लागलीय आणि ती म्हणजे व्हॅनमध्ये टेबल आणि हॉटेलच्या रूममध्ये वर्क डेस्क. आमचे बहुतेक प्रवास हे पंधरा पंधरा दिवसांचे. एकदा गेलं की तो पट्टा पूर्ण बघून घ्यायचा. म्हणजे बघा नं, पोलंडच्या वॉर्सापासून क्रोएशियातल्या डुब्रॉन्विकपर्यंत, न्यूझीलंडमधल्या नॉर्थ आयलंडपासून साऊथ आयलंडमधल्या इनवरकारगीलपर्यंत, पोर्तुगाल स्पेनच्या पोर्तो डुरो व्हॅलीपासून साऊथच्या आलगार्व्ह सेविया मलागा बर्सिलोना माँटसेराटपर्यंत, ग्रीसच्या सिरोस मिकॉनॉस सेन्टोरिनी, ऱ्होड्स, क्रीट या आयलंडसपासून सोलोनिकी अथेन्सपर्यंत, व्हिएतनामच्या नॉर्थमधील हनोई हॅलाँग बे पासून साऊथ मधल्या सायगाव हो चि मिन्न पर्यंत... इतका प्रवास सतत सुरू असतो की तो असा शंभर टक्के हॉलिडे कधी होतच नाही. ऑफिसची कामं करावीच लागतात, यू जस्ट कान्ट एस्केप. त्यामुळेच प्रत्येक वेळी व्हॅनमध्ये एक छोटं इनबिल्ट फोल्डिंग टेबल ज्याचा वर्क डेस्कसारखा वापर करता येईल ते असायला हवं ही गरज होऊन गेली आहे. तसंच व्हॅनमधली सीट रिव्हर्सिबल असणंही मी महत्वाचं मानते. सुधीरचं आणि माझं जेव्हा बरं चाललं असेल तेव्हा सीट्स समोरासमोर करून त्या व्हॅनची ऑफिसमधली केबीन बनवायची आणि ज्या दिवशी दोघांना एकमेकांचा कंटाळा येतो तेव्हा सीट्स सरळ करून तुझा तू माझी मी अशी प्रायव्हसी जपायची. असो. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे कुठे राहू त्या रूममध्ये एक्झिक्युटिव्ह डेस्क असायला हवं, खिडकीच्या समोर असेल तर सोन्याहून पिवळं. रूममध्ये एन्ट्री केल्यावर मी आधी माझं वर्क डेस्क नीट लावून घेते. चार्जर्स, आयपॅड, फोन, एखादं वाचत असेललं पुस्तक, आर्टिकल लिहायचे फुलस्केप्स, पेन स्टँड हे सगळं जागच्या जागी लावलं की जो काही सुकून मिळतो नं. इन डेप्थ डेस्टिनेशन एक्स्प्लोरेशन आणि ऑफिस वर्क ही दोन्ही कामं म्हणजे डबल ड्युटी करत असल्याने वीणा वर्ल्डचं अकाऊंट्स डिपार्टमेंटही आमच्या या नखऱ्यांवर ऑब्जेक्शन घेत नाही.

गेल्या वर्षी मी आणि सुधीर सॅनफ्रान्सिस्कोला आमच्या धाकट्या मुलाला राजला भेटायला दहा दिवसांसाठी गेलो होतो. सोबत सुनिलाही होती. निघायच्या दोन दिवस आधी सुनिला म्हणाली, `मॅडम यावेळी आपली व्हॅन विसरून जा बरं, राज आपल्याला त्याच्या गाडीतून फिरवणार आहे. डेस्क वैगेरे मिळणार नाही सो बी रेडी.‌’ तसंही या दहा दिवसांत, जी आठवड्याची आर्टिकल्स असतील ती हॉटेलरूममध्ये सकाळी सकाळी लिहूया हा विचार मी केलाच होता. नाहीतर राज म्हणायचा, `तुम्ही इथे येऊन कामच करणार होतात तर आलातच कशाला?‌’ ते आठ दहा दिवस आम्ही राजच्या गाडीतून फिरलो. फोक्स वागनची छोटी एकदम बेसिक म्यॅन्युअली ऑपरेटेड कार. शेवटच्या दिवशी निघताना हॉटेल लॉबीत आम्ही एअरपोर्ट उबर कारची वाट बघत गप्पा मारत बसलो होतो तेव्हा सुनिला म्हणाली, ‌‘बघ नं इतर वेळी आपण किती पर्टिक्यूलर असतो कार वा व्हॅनच्या बाबतीत पण यावेळी  गाडी छोटी आहे किंवा गाडीत हे नाही ते नाही ह्याचा विचारही मनात डोकावला नाही.‌’ ‌‘सुनिला, ह्या वेळी आपला हेतूच वेगळा होता आणि त्यामुळे ॲक्च्युअली नथिंग मॅटर्स.‌’ मी बोलून गेले.

राजची गाडी त्याने जॉबला लागल्या लागल्या स्वकमाईतून घेतली होती. ‌‘राज तुझ्या वाढदिवसाला आम्हाला तुला गाडी भेट द्यायचीय, तुझं मास्टर ग्रॅज्यूएशन झालं, जॉब लागला, त्याची भेट म्हणून. पण ही मागणी त्याने धुडकावून लावली. आपण मागून कुणी काही दिलं नाही तर वाईट वाटतं, पण आपण देऊ करून कुणी काही घेतलं नाही तर त्याचं दु:ख होतं, त्याप्रमाणे आमचं झालं. अर्थात एका बाजूला तो इथून गेलेल्या इतर भारतीय मुलांसारखा स्वतःच्या पायावर उभं रहायचा प्रयत्न करतोय याचं समाधानही होतं. त्यामुळे त्याने स्वकमाईतून घेतलेली ही गाडी आमच्या अभिमानाचा विषय होती. आमची भाची मुग्धा ठाकूर तिकडेच जवळ राहते. राजने एवढी साधी गाडी घेतलेली बघून मुग्धाने मला विचारलं, ‌‘अरे वीणा माऊ तू राजला काय पैसे पाठवतेस की नाही? तो एकदमच शू स्ट्रींग बजेटवर आहे? मुग्धाला म्हटलं, ‌‘अगं तो आधीच मिनिमलिस्ट, त्याचं म्हणणं, `हाऊ डझ इट मॅटर?` मला सिटी कम्यूटसाठी गाडी हवीय, कुणाला शो ऑफ करायला नाही.‌’ आम्हीही त्याला इन्सिस्ट केलं नाही. म्हटलं, ‌‘लेट हिम बी!‌’

हाऊ डझ इट मॅटर्स? किंवा, नथिंग मॅटर्स! या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटायला लागल्या आणि मी आयुष्याकडे मागे वळून पाहिलं. वयाच्या विसाव्या वर्षी मी वडिलांबरोबर पर्यटन व्यवसायात आले. बाविसाव्या वर्षी मी पहिली सहल हिमाचलप्रदेशात केली. त्यानंतर सतत दहा वर्षं मी हिमाचलच्या टूर्स करीत होते टूर मॅनेजर म्हणून. नवीन व्यवसाय, पैशांची चणचण, मुंबईत नव्याने दाखल झालेलो, रहायला स्वतःचं घर नाही अशावेळी पैसे वाचवणं फार महत्वाचं होतं. त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही टूरवर जी बस असायची, त्यात पस्तीस सीटस असायच्या त्या पर्यटकांनी भरायचो. मी आणि माझ्यासोबत आई असायची. आम्ही ड्रायव्हरच्या केबीनमध्ये बसून प्रवास करायचो. असं कंटिन्युअसली दहा वर्षं आम्ही केलं. आज अंगावर शहारा येतो तो प्रवास आठवून. कारण ड्रायव्हरच्या केबीनमध्ये सीट वा खुर्ची नसायची, तो एक बेंच असायचा, तेव्हा आम्ही रात्रीचा बस प्रवासही करायचो आणि रात्रभर कधी तू थोडावेळ आडवी हो कधी मी असं करीत प्रवास व्हायचा. महाकष्टदायी होतं ते. कधी जर पूर्ण बस पर्यटकांनी भरली नसेल तर मात्र आमची लक्झरी असायची. आम्हाला बसायला पुढची किंवा पाठची सीट मिळायची. आता ते कितीही यातनादायी वाटलं तरी तेव्हा अजिबात वाटायचं नाही. रात्रीचा प्रवास करूनही आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी हसतहसत पर्यटकांना सामोरे जायचो. या मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं, जी काही छोटी ट्रॅव्हल कंपनी वडिलांनी सुरू केलीय ती नावारूपाला आणायची हे लक्ष्य इतकं भक्कम होतं की त्यापुढे तो ड्रायव्हर केबीनमधला तासनतास केलेला प्रवास क्षुल्लक वाटायचा. आमच्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठीची ती एकेक पायरी होती. लक्ष लक्ष्याकडे असलं की नथिंग मॅटर्स ते असं.

यावरून आठवण झाली आपल्या स्वातंत्र्यलढ्याची. आपण कृतज्ञ आहोत आणि असलंच पाहिजे आपल्या पूर्वजांप्रति, तसंच खासकरून सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांप्रति, ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण आपल्या स्वतंत्र भारतात मानाने राहू शकतोय. नुसता ड्रायव्हर केबीनमधला बसप्रवास, तोही स्वत:च्या व्यवसायासाठी केलेला आज मला अरे बापरे किती कष्टं असं म्हणायला लावतो किंवा त्यात थोडा ॲटिट्यूड आल्याचा भास माझा मलाच जाणवतोय. पण या साऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची मानसिकता काय असेल? ज्या स्वातंत्र्यासाठी आपण झगडतोय, प्राणांची बाजी लावतोय, ते स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचा उपभोग घेण्यासाठी कदाचित आपण जिवंत नसू, हे त्या प्रत्येकाला माहीत होतं, तरीही ते कसे काय लढत होते! भारताला स्वतंत्र करणं हे एकमेव ध्येय आणि त्याची शक्तीच इतकी अफाट होती की, त्याच्यांसाठी त्यावेळी नथिंग मॅटर्स अशीच मनस्थिती असणार. एका ध्येयाने पछाडलेली, ‌‘एनिथिंग एल्स डझन्ट मॅटर‌‘ म्हणत त्या ध्येयाचा पिच्छा पुरविणारी अनेक व्यक्तिमत्वं या लढ्यात होऊन गेली. अशा व्यक्तिरेखा आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात सतत वास करत असल्या पाहिजेत. त्यामुळे एकतर आपण इतिहास विसरणार नाही, दुसरं म्हणजे जेव्हा आपल्या आयुष्याची लढाई आपल्याला पेलेनाशी होईल तेव्हा ही व्यक्तिमत्वं आपल्या मनाला उभारी देतील. अशावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण तीव्रतेने होते. जेव्हा जेव्हा अंदमानच्या त्या छोट्याशा खोलीला आपण भेट देतो तेव्हा प्रत्येक वेळी ब्रिटिशांनी केलेला जाच समोर येतो आणि डोळ्यातून अश्रू पाझरायला लागतात. आपण एक दिवसही राहू शकलो नसतो अशा ठिकाणी त्यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगली, पण त्यांच्यातला स्वातंत्र्यसैनिक, समाजकारणी, हिंदुत्व प्रेमी, लेखक, कवी, या सगळ्यांना त्यांनी जिवंत ठेवलं. एका ध्येयाचा प्रवास त्या काळ्या पाण्यावरच्या बाकीच्या सर्व प्रकारच्या जाचाला एवढं नगण्य ठरवू शकतो?

आपलं आयुष्य आज बऱ्यापैकी सुकर झालंय. सुखसुविधांनी आणि तंत्रज्ञानाने आपल्या पायाशी लोळण घेतलीय तरीही आपण समाधानी नाही. काहीतरी खुस्पटं काढण्यात आपली शक्ती वाया जातेय. कारण आपल्यासमोरची ध्येय्यं तेवढी भरभक्कम नाहीत. प्रत्येक ध्येय हे मैलाच्या दगडासारखं असावं. एकाची पूर्ती झाली की त्यापेक्षा थोडं कठीण ध्येय पुढे असलं पाहिजे. ते साध्य केलं की आणखी कठीण असं तिसरं... एकदा का हे मार्गक्रमण सुरू झालं की बाकीच्या गोष्टी खटकणार नाहीत. आपण शांत होऊ पण आपण अधिक शक्तीशाली बनल्याचं आपल्याला जाणवेल आणि मग खरोखरच इतर गोष्टींबाबत आपण म्हणू, नथिंग मॅटर्स!

वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.


देखो अपना देश दिल से!

प्यार से! सम्मान से!

राजस्थान हे भारतातलं सर्वांत मोठं राज्य. ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यापूर्वी राजस्थान 'राजपुताना' म्हणून ओळखलं जायचं. इथे रंगीबेरंगी शहरं, स्वादिष्ट पाककृती, राजवाडे आणि किल्ले यांचा एक सुंदर मिलाफ पहायला मिळतो. इथली इंटरेस्टिंग गोष्टं म्हणजे राज्यातलं प्रत्येक शहर स्पेसिफिक कलर कोड पाळतं. त्या शहरातल्या घरांच्या भिंती एका विशिष्ट रंगाने रंगवलेल्या असतात. उदयपूर ‌‘व्हाईट सिटी‌’, जैसलमेर ‌‘गोल्डन सिटी‌’, जोधपूर ‌‘ब्ल्यू सिटी‌’, तर जयपूर ‌‘पिंक सिटी‌’  म्हणून ओळखलं जातं.जयपूर ही राजस्थानची राजधानी. भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक. सिटी पॅलेस, अंबर फोर्ट, नाहरगड फोर्ट, जयगड फोर्ट, हवा महल, अल्बर्ट हॉल म्युझियम, बिर्ला मंदिर आणि बाजारपेठ ही इथली प्रसिद्ध ठिकाणं. तर थारच्या वाळवंटात वसलेलं बिकानेर हे खाद्यपदार्थ आणि प्राचीन किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथला जुनागड फोर्ट सर्वांत लोकप्रिय आहे. जैसलमेरचा जैसलमेर फोर्ट, बडा बाग, थार हेरिटेज म्युझियम ही प्रेक्षणीय स्थळं आहेत. भारतातील सर्वांत मोठ्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक म्हणजे सवाई माधोपूर, राजस्थानमधलं एक लहान शहर. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे शहरातलं प्रमुख आकर्षण. पुष्कर हे राजस्थानमधलं ब्रह्मदेवाला समर्पित असलेलं जगातील एकमेव मंदिर, तर माऊंट अबू हे इथलं प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.राजस्थानमधल्या लोकांचा पोशाख रंगीबेरंगी, चमकदार, आणि उठावदार असतो. ही लोकं धोतर, अंगरखा, पायजमा, कमरबंद, आणि रंगीबेरंगी पगडी बांधतात. इथे 1000 पेक्षा जास्त प्रकारे पगडी बांधतात. असं म्हणतात की दर एक किलोमीटर अंतरावर त्यांच्या पगडी बांधण्याची पद्धत बदलते. इथल्या महिला सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पोशाखात घागरा चोलीचा समावेश असतो.या राज्यात बहुतेक पदार्थ हे शुद्ध तुपापासून बनवतात. इथला दाल-बाटी-चुरमा खूप प्रसिद्ध आहे. जोधपूरची मावा कचोरी, जयपूरचा घेवर, अलवरचा कलाकंद आणि पुष्करचा मालपुआ, बिकानेरचा रसगुल्ला, नमकीन भुजिया, जलेबी आणि रबडी हे पदार्थ विशेष प्रसिद्ध आहेत.अशा या रंगीलो राजस्थानची संस्मरणीय सफर करायला चला ‌‘वीणा वर्ल्ड‌’ सोबत.


अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...

जगातल्या सात खंडांपैकी नॉर्दन ईस्टर्न हेमिस्फीयर मधला अप्रतिम खंड म्हणजे युरोप. त्यातला महत्त्वाचा देश रोमानिया. पर्यटनाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत हा देश लोकप्रिय झाला आहे. कार्पेथियन माऊंटन्स, डॅन्यूब नदी आणि ब्लॅक सी यांच्यामध्ये वसलेल्या रोमानिया देशात असंख्य मोहक गावं, भव्य माऊंटन्स आणि अप्रतिम बीचेस आहेत.बुखारेस्ट रोमानियामधलं सर्वांत मोठं आणि राजधानीचं शहर. देशाच्या दक्षिण भागात नदीकाठी वसलेलं बुखारेस्ट हे रोमानियाचं आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय केंद्र आहे. आख्यायिका असं सांगते की बुकुर नावाच्या मेंढपाळाने बुखारेस्ट हे शहर वसवलं.मार्च 1847 मध्ये बुखारेस्टच्या जुन्या न्यायालयाजवळच्या एका घरात आग लागली. तेव्हा इथल्या अनेक इमारती लाकडाच्या होत्या. जोरदार वाऱ्यामुळे त्यांनी पेट घेतला आणि शहरात मोठी आग लागली. बुखारेस्टच्या या ग्रेट फायरमुळे त्यावेळच्या बुखारेस्ट शहराचा एक तृतीयांश भाग आगीत नष्ट झाला. यासाठी मोठा रीडेव्हलपमेंट प्रोग्रॅम राबवण्यात आला आणि किंग कॅरल प्रथम च्या कारकिर्दीत हे शहर पुन्हा एकदा समृद्ध झालं. यासाठी पॅरिसच्या आर्किटेक्चरमधून प्रेरणा घेण्यात आली. या शहरातल्या अनेक इमारतींवर आपल्याला त्याचा प्रभाव दिसतो. त्यामुळे बुखारेस्टला 'लिटिल पॅरिस' किंवा 'पॅरिस ऑफ द ईस्ट' असं म्हणतात. बुखारेस्ट मध्ये दीमित्री गुस्टी नॅशनल व्हिलेज म्युझियम आहे. हे एक ओपन एअर संग्रहालय आहे जे पारंपरिक रोमानियन ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवतं.1948 साली इथल्या द रॉयल पॅलेस ऑफ बुखारेस्टचं रूपांतर वस्तू संग्रहालयात करण्यात आलं. दहाव्या ते अठराव्या शतकातील रोमेनियन ललित कलांचं, तसंच वेस्टर्न आणि युरोपियन आर्ट फॉर्म्सचं इथे जतन केलेलं आहे. काला व्हिक्तोरिये   हा बुखारेस्टचा सर्वांत जुना आणि आकर्षक असा मुख्य रस्ता आहे. ठराविक काळात हा ‌‘पेडिस्ट्रियन ओन्ली स्ट्रीट‌‘ बनतो. अनेक जुनी चर्चेस आणि सोबतच चार्मिंग कॅफेज्‌‍ यामुळे स्थानिक लोकं आणि येणारे पर्यटक या रस्त्यावर स्ट्रीट फूड आणि वेगवेगळे परफॉर्मन्सेस एन्जॉय करतात. पूर्वी हा `मोस्ट फॅशनेबल स्ट्रीट‌’ म्हणून ओळखत. 2012 मध्ये बुखारेस्ट शहराच्या उत्तरेकडे काला फ्लोरेआस्का इथे स्काय टॉवर बांधला. हा बुखारेस्टमधला पार्लमेंटचा विशाल पॅलेस आहे. ही सध्या बुखारेस्ट आणि रोमानियामधली सर्वांत उंच बिल्डिंग आहे. याच्या छत्तिसाव्या मजल्यावर एक रेस्टॉरंट आहे. इथून या शहरातली नेत्रदीपक दृश्यं पाहता येतात.फुटबॉल हा बुखारेस्टमधला सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. रोमेनियामधील दोन सर्वांत यशस्वी क्लब हे बुखारेस्टमध्येच आहेत.या बुखारेस्टला, पर्यायाने रोमानियाला तुम्हाला भेट द्यायची असेल तर वीणा वर्ल्ड सोबत आमच्या ईस्टर्न युरोपच्या टूरमध्ये जरूर सहभागी व्हा. चलो, बॅग भरो, निकल पडो!


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

Veena World Travel Mission

100 Country Club

राहतात `त्या‌’ आठवणी!

माझा विश्वास आहे की आपण फोटोंमध्ये जे पाहतो ते प्रत्यक्ष अनुभवण्यापेक्षा बरंच वेगळं असतं. मी 2019 पासून प्रवास करत आलो आहे. आता या वर्षी मी कोईम्बतूरला शिफ्ट होणार आहे पण मी नेहमीप्रमाणे माझ्या सगळ्या टूर्स, वीणा वर्ल्डच्या अंधेरी किंवा आता कोईम्बतूरमधल्या ऑफिसमधून बुक करणार आहे, कारण माझ्यासाठी विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे वीणा वर्ल्ड.  कोणत्याही टूरवर जाण्यापूर्वी मी सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. जसं की जिथे जाणार आहे तिथलं हवामान, तापमान कसं आहे? या गोष्टींचं प्लॅनिंग मी प्रवासाच्या आधी करतोच. त्यामुळे ट्रिप अगदी सुरळीत, मनाजोगती होते.  मी 'नारायणन सुब्रमण्यम' मी आत्तापर्यंत 11 देशांचा प्रवास केलाय. तसंच जवळजवळ 23 भारतीय राज्यं पालथी घातलीयेत. त्यापैकी अनेक राज्यांमध्ये खूपदा गेलोय. येत्या 10 वर्षांत ज्या देशांना भेट द्यायची आहे त्यांचा ट्रॅव्हल पोर्टफोलिओच बनवला आहे. आत्ता जे देश बघायचे आहेत ते प्रामुख्याने 'केनिया आणि इस्टर्न युरोप!'   मला भारतात प्रवास करायला जास्त आवडतं. आपल्याकडे जे वैविध्य आहे ना, ते इतर कोणत्याही देशाकडे नाही. मग ती भोजनसंस्कृती असो, अभेद्य डोंगररांगा, वाळवंट, नद्या, मंदिरं, वास्तूकला आणि लेण्या. त्यामुळे मला भारतातलं एकच ठिकाण नव्हे तर संपूर्ण भारतच आवडतो. जास्त अंतराच्या ट्रिप्स आवडतात मला! आता या वर्षी गुजरात ते गुवाहाटी अशी रोड ट्रिप बुक करण्यासाठी मी आतुर आहे जी 30 दिवसांची आहे. मी अलीकडेच काश्मीर ते कन्याकुमारी अशी 40 दिवसांची रोड ट्रिप केली. पहिल्या टप्प्यात माझ्यासोबत टूर मॅनेजर शार्दुल पेंढारकर, तर दुसऱ्या टप्प्यात टूर मॅनेजर हडसन फ्रान्सिस होते. मला आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाण्याआधी तिथली सगळी लोकेशन्स निवडून ठेवायलाही आवडतं. माझ्यासाठी प्रवास हा शिक्षणाचाच भाग आहे. जेव्हा आपण कुठे कुठे फिरायला जातो ना, तेव्हा फक्त ठिकाणांना भेट देत नाही, तर खोलवर निरीक्षण करतो. मला प्रवासात आलेले अनुभव शेअर करायला नेहमी आवडतं. काय विकत घ्यायचं असा प्रश्न मला कधीच पडत नाही. कुटुंबियांच्या सगळ्या आवडी लक्षात घेऊनच मी कुठलीही खरेदी करतो. मिलिटरी शॉप्समधून मी कॅप्स किंवा टी-शर्ट्‌स घेतो. एकच सांगतो, फिरण्याने मनाची कवाडं खुली होतात. जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनसुद्धा मनमोकळा होतो आणि आपलं आरोग्य सुधारतं. एक प्रवास संपला की लगेच पुढच्या प्रवासाची तयारी करायची, बॅग भरायची आणि निघायचं त्या प्रवासाला, पुढचं डेस्टिनेशन बघायला. आणखी अनुभव गाठीशी बांधायला आणि बरंच काही शिकायला सुरुवात करायची. थोडक्यात दरवेळी पुन्हा एकदा नव्याने जगायला सुरुवात करायची.  ,

नारायणन सुब्रमण्यम, अंधेरी


प्रायव्हेट हॉलिडे आयडियाज्‌‍

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍सोबत

समृद्ध संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचा मिलाफ असलेलं आधुनिक शहर म्हणजे दुबई. दुबईला गेलं की बुर्ज खलिफा, द वर्ल्ड आयलँड्‌‍स, वेगवेगळे थीम पार्क्स, सोनेरी वाळवंट आणि शांत निवांत समुद्रकिनारे यांच्याशी आपली भेट घडते.

तुम्हीही दुबई टूरवर जायचं ठरवत असाल तर काही खास अनुभव जरूर घ्या.

  • दुबई डेझर्ट कॉन्झर्वेशन रिझर्व्हतर्फे आयोजित केली जाणारी खास व्हिंटेज लँडरोव्हर्समधली डेझर्ट सफारी अनुभवाआणि अरेबियन ऑरिक्ससारखे नेटिव्ह वन्य प्राणी पाहण्याचा मनमुराद आनंद लुटा.
  • पाम जुमेराहच्या आसपास प्रायव्हेट यॉट आणि क्रूझची सफर करा. सोबतच तुमच्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्या आणि ऑन बोर्ड एंटरटेनमेंट एन्जॉय करा.
  • दुबईची हेलिकॉप्टर टूर करून बुर्ज अल अरब, बुर्ज खलिफा, द वर्ल्ड आयलँड्‌‍स यांसारख्या प्रतिष्ठित ठिकाणांचा टॉप व्हू घ्या, तर स्काय डायव्हिंग करताना खाली मनमोहक असं पाम जुमेराह पहा.
  • दुबईच्या आकर्षक सिटीस्केप आणि हायवेवरून गाडी चालवायची असेल तर लॅम्बोर्गिनी, फेरारी किंवा रोल्स रॉयस या सारख्या लक्झरी कारचा विचार करा..
  • पाण्यावर सुपर जेट कार चालविण्याचा अफलातून एक्सपिरीयन्स घ्या.

दुबईला जाताय आणि राहणार कुठे हा प्रश्न असेल तर तुमच्यासाठी काही स्टायलिश स्टे ऑप्शन्स :

  • दुबई डेझर्ट कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये रिसॉर्ट सेटिंगमधल्या लक्झरी टेंटेड स्टाईल व्हिलाज एक्सप्लोअर करा. या प्रत्येक व्हिलाज ना प्रायव्हेट इन्फिनिटी पूल आहे.
  • आयकॉनिक पाम जुमेराहमध्ये असलेलं ‌‘ॲटलांटिस द पाम‌’ या मरीन थीम असलेल्या लक्झरी रिसॉर्टमध्ये रहा. इथे तुम्ही ॲम्बॅसेडर लगूनच्या व्ह्यू सोबत अंडर वॉटर स्वीटमध्ये राहू शकता. इथे स्टे केलात तर तुम्हाला `ॲक्वाव्हेंचर वॉटर पार्क‌’ आणि ‌‘द लॉस्ट चेंबर्स ॲक्वेरियम‌’ मध्ये फ्री एंट्री मिळेल.
  • 'ॲटलांटिस द रॉयल' इथे तुम्ही स्काय हाय इन्फिनिटी पूल्स, मिशेलिन स्टार डायनिंग, एक्सक्लुझिव्ह ऍक्सेस असलेला प्रायव्हेट बीच अशा अनेक लॅव्हिश फॅसिलिटीजचा आनंद घेऊ शकता.
  • दुबईला जाऊन खायचं काय आणि कुठे हा प्रश्न असेल तर त्याचे हे काही ऑप्शन्स :
  • जगातील सर्वांत उंच बिल्डिंग असलेल्या बुर्ज खलिफा इथल्या ‌‘ॲटमॉस्फिअर ॲट बुर्ज खलिफा‌‘ इथे तुम्ही खास भोजनाचा आस्वाद घेऊ शकता.
  • चित्तथरारक ॲक्वेरियमने वेढलेल्या ॲटलांटिस मधल्या ओसियानो इथे  प्रायव्हेट डायनिंग एक्सपिरीयन्स घ्या.
  • बुर्ज अल अरबच्या गोल्ड प्लेटेड इंटिरीयर भागाची टूर करा आणि एडिबल गोल्डचा समावेश असलेल्या त्यांच्या सिग्नेचर गोल्ड कॅपेचिनोचा आस्वाद घ्या.

तुमची दुबई टूर परिपूर्ण करायची असेल तर आजच आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडेज टीमशी संपर्क करा.

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍साठी आजच संपर्क साधा: 1800 22 7979  l  customizedholidays@veenaworld.com


हॅलो गर्ल्स

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक छोटासा ब्रेक तो बनता है. कारण ‌‘मैं खुद की फेव्हरिट हूं‌’, ‌‘आय ॲम द क्वीन‌’ ही फक्त बोलायची वाक्यं नाहीत, तर वर्षभर घर, करियर या धबडग्यात अडकून गेलेल्या तुला, या निमित्ताने रुटीन ब्रेक करून काहीतरी स्पेशल, काहीतरी वेगळं करण्याची संधी आहे. आणि म्हणूनच, या दिवसाचं धम्माल सेलिब्रेशन हा तुझा हक्कच आहे. स्वतःच्या राज्याच्या सीमा पार करत, देशाच्या सीमा ओलांडत, परदेशप्रवास करून स्वतःचं आभाळ मोठ्ठं करण्याचा विचार तू आता करायला लागली आहेस. या तुझ्या स्वप्नांना पंख देणारा दिवस म्हणजे वुमन्स डे.  आज तू पूर्वीपेक्षा जास्त कॉन्फिडन्ट आणि फिअरलेस झाली आहेस. तुला जग बघायचंय, तुला आकाशात उडायचंय, समुद्रात पोहायचंय, नवनवीन ॲडव्हेंचर्स ट्राय करून बघायचे आहेत. आयुष्य मुक्तपणे आणि भरभरून जगायचं आहे. आणि या तुझ्या प्रवासात तुझी हक्काची मैत्रीण आहे वीणा वर्ल्ड ची ‌‘वुमन्स स्पेशल टूर‌’. मग हा ‌‘वुमन्स डे‌’ तू कुठे सेलिब्रेट करतेयस?

January 31, 2025

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top