… नंतर जेव्हा मी विचार केला तेव्हा अलार्म न लावणं हे माझ्यासाठी किती सोप्पी गोष्ट होती पण तेच अलार्म लावायचा म्हटल्यावर जो स्ट्रेस आला की काही विचारू नका...
Published in the Saturday Lokasatta on 13 April, 2024
`देवाला नमस्कार कर, थँक्यू बोल, आणि तुला ज्यावेळी उठायचंय ते देवाला सांग, तो उठवतो आपल्याला, बरोबर त्या वेळी जाग येईल बघ. हो, पण मनापासून कर हं प्रार्थना आणि विश्वास ठेव.’ आजी आजोबांनी आणि आई बाबांनी आपल्या पुढच्या पीढीला दिलेला हा कानमंत्र. मलाही मिळाला आणि आजतागायत त्याचा अनुभव मी घेतेय. आमच्या बेडरूममध्ये अलार्म क्लॉक नाही. हं मोबाईलने आपला ताबा घेतल्यावर सुधीरच्या मोबाईलवर त्याने सोडेपाचचा अलार्म सेट करून ठेवलायं. `इन केस’. सुधीर म्हणजे आमच्या घरातलं काळजीवाहू सरकार त्यामुळे `इन केस जाग आली नाही तर‘ त्यासाठी त्याचा हा एक सावधगिरीचा पवित्रा. अर्थात अलार्म वाजायच्या कितीतरी आधी आमचा दिवस सुरू झालेला असतो. जाग आपोआपच येते. देवावर भरोसा जो ठेवलेला असतो. हो खरंच आहे नाही का, तो भरोसाच असतो नाहीतर सकाळी आपण उठणारंच ह्याची खात्री कोण देऊ शकतो?का कुणास ठाऊक अलार्म लावणं मला अपराध्यासारखं वाटतं. अलार्म लावायचा विचार नुसता आला तरीही माझं एक मन दुसऱ्या मनाला विचारायला लागतं,`तुझा तुझ्यावर विश्वास नाही? तुला अलार्मची गरज का वाटते? तुझं बॉडी क्लॉक का नाही तू ॲडजस्ट केलंस? तुला जर तुझ्या सकाळच्या उठण्याची म्हणजे नैसर्गिकरित्या उठण्याची खात्री वाटत नसेल तर टीमला तू काय खाक खात्री देणार? तुझ्या मनाचं तुझं शरीर ऐकत नाही का? तुझं हेड आणि हार्टचं संतुलन बिघडलंय का? स्वत:वर नाही पण देवावर तर विश्वास ठेव’. हे तुंबळ युद्ध तेव्हाच थांबतं जेव्हा मी ठरवून टाकते `नाही लावत मी अलार्म, मला जाग येईल‘. आणि जाग येते, ठरल्यावेळी, हव्या त्यावेळी.कधीतरी अलार्म लावावा लागतो. आणि मी लावते. मला आठवतं एकदा मी लंडनला गेले होते. फक्त एका दिवसासाठी, नव्हे एका रात्रीसाठी, मला `चिटी चिटी बँग बँग’ हे नाटक बघायचं होतं. ते आपल्या पर्यटकांना दाखवायचं होतं. पण `त्यांना ते आवडेल का?‘ हे बघण्यासाठी मी रात्रीच्या फ्लाइटने निघाले. सकाळी लंडनला पोहोचले, दुपारी आमच्या असोशिएटसोबत मिटिंग केली. रात्री शो बघून हॉटेलवर आले, सकाळी सहाचं फ्लाइट होतं, पहाटे तीन वाजता निघायचं होतं. विंटर असल्याने भारताच्या आणि युकेच्या टाइममध्ये साडेपाच तासांचा फरक. एका दिवसात बॉडी अडॅप्ट करणं शक्य नव्हतं. टाइम डीफरन्समुळे शरीराच्या उडालेल्या गोफ्लधळाने माझा आणि माझ्या देवावरचा विश्वास डळमळीत झाला. मी हॉटेल रीसेप्शनवर फोन करून त्यांना मॉर्निंग अलार्म द्यायला सांगितला. माझ्या मोबाईलवर अलार्म लावला आणि तरीही खात्री वाटली नाही, कारण अलार्मची सवयच नव्हती म्हणून मी आमचा सेव्हियर सुधीरला फोन लावला.`सुधीर प्लीज तुझ्या म्हणजे इंडियन टाइम सकाळच्या साडेआठ वाजता मला उठव. मोबाईलवर फोन कर किंवा हॉटेलला फोन करून माझ्या रूमला कनेक्ट करायला सांग,’ सुधीरने हसत हसत `काय हा मुर्खपणा’ म्हणत फोन ठेवला आणि मी शांतपणे झोपी गेले. नंतर जेव्हा मी विचार केला तेव्हा अलार्म न लावणं हे माझ्यासाठी किती सोप्पी गोष्ट होती पण तेच अलार्म लावायचा म्हटल्यावर जो स्ट्रेस आला की काही विचारू नका. थोडक्यात नॅचरली जाग येणं हे माझ्यासाठी स्ट्रेस फ्री होतं तर अलार्म लावणं ही गोष्ट खूपच अँग्झायटी निर्माण करणारी होती. आमच्या टूर्सवर `पर्यटकांना मॉर्निंग अलार्म देणं’ ही महत्वाची गोष्ट आहे. तिथे `अलार्म लावायची गरज नाही’ ही माझी थीअरी बासनात गुंडाळून ठेवावी लागते. कारण असतं टाइम डिफरन्स. विमानप्रवासाच्या शिणवट्यामुळे बॉडी क्लॉक ची ऐशी की तैशी होऊन जाते. `मला जेट लॅग लागत नाही’ हा माझा फुकाचा अभिमान चक्काचूर झाल्याचं मला आठवतंय ते माझ्या पहिल्या युएसएच्या भेटीत आणि पहिल्या ऑस्ट्रेलियाच्या भेटीत. ह्या दोन्ही वेळा मी आणि नील आम्ही दोघंच मायलेक गेलो होतो. आणि दोन्ही ठिकाणच्या पहिल्याच दिवशी आम्ही आमच्या टूर प्रोग्रॅमची अशी काही वाट लावली की विचारू नका. तेव्हा शहाणपण आलं की उगाच गमजा मारण्यात काही अर्थ नाही. जेट लॅग लागतो, लागू शकतो. अथार्त तो लागायचा नसेल तर थोडी तयारी करून ठेवावी लागते. पूर्वेकडच्या देशांमध्ये जिथे आपल्या आधी सकाळ होते अशा जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, हाँगकाँग, सिंगापुर ह्या देशांमध्ये जाताना किमान एक महिना आधी लवकर उठायची सवय करायची. भारताच्या आणि आपण जाणाऱ्या देशाच्या मध्ये टाइम डिफरन्स किती आहे ते बघून जाण्याआधी एक महिना रोज पंधरा पंधरा मिनिटं आधी उठायचं आणि जायच्या एक आठवडा आधी त्या देशाचं टाइम जर आपल्या बॉडी क्लॉकशी ॲडजस्ट करता आला तर निश्चितपणे जेट लॅग वर आपण कन्ट्रोल करू शकतो. सकाळी लवकर उठणाऱ्यांना पूर्वेकडच्या देशांच्या वेळेशी ॲडजस्ट करणं कठीण जात नाही. ह्या उलट पश्चिमेकडच्या देशांमध्ये म्हणजे दुबई मिडल इस्टर्न वा युरोपीयन देशांकडे जाताना एक महिना आधी थोडं थोडं आळशी बनायची सुरुवात करायची. रात्री उशीरा झोपायचं आणि सकाळी उशीरा उठायचं. पर्यटकांचा विचार केला तर जास्तीत जास्त पर्यटक हे मार्च ते ऑक्टोबर ह्या दरम्यान प्रवास करतात. त्यावेळी म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्या आणि बहुतेक सगळ्या युरोपीयन देशांमध्ये साडेतीन तासांचा किंवा थोड्या आपल्या जवळच्या म्हणजे ग्रीस टर्की ह्या देशांमध्ये अडीच तासांचा फरक असतो. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये हा फरक साडेचार आणि साडेतीन तासांचा होतो. युके लंडनच्या बाबतीत तो साडेपाच आणि साडेचार तास असा होतो. आपण कुठे चाललोय त्याचा विचार करून एक महिना आधीपासून जर आपल्या बॉडीला सवय लावली तर तिथे गेल्यावर त्या वातावरणाशी जमवून घ्यायला थोडंसं सोप्पं जातं. थोडक्यात सकाळी लवकर उठणाऱ्या पूर्वाभिमुख लोकांना पूर्वेकडच्या देशांना जाणं सोईचं वाटतं, तर सकाळी उशीरा उठणाऱ्या पश्चिमाभिमुख लोकांना पश्चिमेकडच्या देशांना जाणं बरं वाटतं. आणखी दुसरी गोष्ट असते ती विमानप्रवासात आपल्याला ॲडजस्ट करायची. आपण ज्या देशात उतरणार त्या देशात दिवस असेल तर विमानात मस्त झोप काढायची. ठरवून झोपायचं. एअरहोस्टेसला सांगायचं ‘डू नॉट डिस्टर्ब प्लीज‘. याऊलट आपण ज्या देशात जाणार त्या देशात जर आपण रात्री पोहोचत असू तर विमानात झोपायचं नाही. एखादं पुस्तक वाचायचं, चित्रपट बघायचे. लॅपटॉप आयपॅड सोबत असेल तर त्यावर मुव्हीज डाऊनलोड करून घ्यायच्या आणि बघायच्या राहिलेल्या मुव्हीजचा मस्त आस्वाद घ्यायचा. पूर्वी माझ्यासोबत अनेकदा पद्माताई वाघ ह्या पर्यटक म्हणून अनेक देशात यायच्या. त्या न्यूजपेपर मधली वाचायची राहिलेली कात्रणं घेऊन यायच्या आणि अशा प्रवासात त्याचा फडशा पाडायच्या. एकूणच विमानप्रवासात जागं रहायचं असेल तर आपापली बेगमी आपणच करून ठेवायला हवी. सांगायचा मुद्दा पर्यटकांसाठी मॉर्निंग अलार्म महत्वाचा आणि आमचे टूर मॅनेजर्स त्याची काळजी घेतात.जेव्हा अलार्म हा प्रकार अस्तित्वातच नव्हता तेव्हा लोक असेच देवावर भरोसा ठेवायचे, सूर्योदयापूर्वी उठायचे किंवा रात्री भरपूर पाणी पिऊन झोपायचे म्हणजे सकाळी लघवीला जाण्यासाठी जाग यायचीच. तरीही जनरली `सकाळी अमूक एका वेळी त्याकाळी लोक कसे उठायचे बरं’ हे गुगलला विचारल्यावर कळलं की अलार्म क्लॉक पहिल्यांदा अस्तित्वात आलं ते 1787 मध्ये लेवी हचिन्स ह्या अमेरिकन माणसाने पहाटे कामावर जायचंय म्हणून स्वत:साठी अलार्म बनवला. पण तो फक्त पहाटे चार वाजताच वाजायचा. त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे 1847 मध्ये फ्रेंच इन्व्हेंटर ॲन्टोन डियर ह्याने पहिलं मेकॅनिकल अलार्म क्लॉक बनवलं आणि त्याचं पेटंट घेतलं. त्याआधी शेकडो वर्ष ह्यावर अनेक प्रयोग सुरू होतेच. ॲस्ॉनॉमिकल क्लॉक, वॉटर क्लॉक, टाऊन स्क्वेअर मधली बेल, फॅक्टरी व्हिसल्स किंवा ज्याला आपण भोफ्लगे म्हणायचो. ह्याचा सगळ्यांचा वापर लोक करत होते. आमच्या लहानपणी हे भोफ्लगे वाजलेले आम्ही ऐकलेयत. भोफ्लगा वाजला म्हणजे इतके वाजले हे आपण एकमेकांना बोलायचो. फ्रेंचमनने पेटंट घेतल पण अलार्म क्लॉकचं मास प्रॉडक्शन सुरू झालं 1876 मध्ये अमेरिकन इन्व्हेंटर सेट थॉमसच्या कंपनीकडून. इंडस्ीयल रीव्हॉल्युशननंतर ‘कामावर वेळेत जाणं‘ सक्तीचं झालं तसंच दुसऱ्या महायुद्धात सैनिकांनाही वेळेवर उठणं कम्पल्सरी बनलं आणि अलार्म क्लॉक इंडस्ी फळफळली.आतातर अलार्म वेगवेगळ्या आवाजांचे आलेयत. पण मला वाटतं की अलार्मशिवाय जाग यायला पाहिजे. अलार्म लावल्याने तर कुणीही उठू शकेल पण ज्यावेळी एखाद्या कामाने, एखाद्या प्रोजेक्टने, एखाद्या ध्येयाने आपण झपाटलेलो असतो तेव्हा आपोआप जाग येते. रात्रभरच्या झोपेने-विश्रांतीने शरीर चार्ज होतं आणि मन `चलो, आज और अच्छा, कलसे बढ़्रकर बेहतर कुछ करते हैं, आगे जाते हैं’ म्हणत आपण उत्साहात उठतो. सकाळी जाग आल्यावर टुणकन गादीतून उठावसं वाटत असेल तर `वुई आर ऑन द राइट ॅक. काहीतरी मकसद आहे आपल्या आयुष्यात, वुई रीअली लूक फॉरवर्ड टू समथिंग मोअर मिनिंगफुल‘ असं म्हणायला हरकत नाही. ही स्वत:चीच मॅनेजमेंट. आपणच आपल्याला तपासायचं. म्हणजे बघानं, अलार्म न लावता जाग आली पाहिजे. औषध न घेता प्रकृती ठणठणीत ठेवता आली पाहिजे (अपवाद काही आजारांचा) लाफिंग क्लबचं मेंबर न होता मनसोक्त हसता आलं पाहिजे, `टू बी ऑर नॉट टू बी’ चं युद्ध न होता मॉनिंग वॉकला जाता आलं पाहिजे. गरम पाणी, चहा अशी कसलीही ब्राइब न देता सकाळी पोट साफ झालं पाहिजे, टेंशनशिवाय ताण तणावाशिवाय प्रगती करता आली पाहिजे, सहजपणे नीती नियमांचं पालन करता आलं पाहिजे. खूप कष्ट न घेता नेहमी मानसिक आणि शारिरीक संतुलन व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे, जगत्नियंत्याने एक सुंदर आयुष्य आपल्याला बहाल केलंय त्याचं सौफ्लदर्य आपल्याला आणखी वाढवता आणि खुलवता आलं पाहिजे.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरीता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.