Published in the Sunday Sakal on 26 January 2025
व्हिएतनामची आमची टूर संपत आली होती पण मला मनासारखा ‘बुदई‘ किंवा ‘हॅप्पी बुध्दा‘ किंवा ‘लाफिंग बुध्दा‘ची प्रतिमा मिळत नव्हती. व्हिएतनामध्ये ह्या हॅप्पी बुध्दाच्या इतक्या मोठमोठ्या प्रतिमा पाहिल्या होत्या की याची एक छोटी प्रतिकृती आपण घेऊन जाऊया, या विचाराने माझ्या मनात ठाण मांडलं. बरं आमच्या अपेक्षा नेहमीप्रमाणेच जास्त, ती प्रतिमा आडवी उभी दहा इंचच असावी, कारण व्हिएतनामवरून येणाऱ्या किमान एका सोवेनियरसाठी ती जागा राखून ठेवली होती. त्याचा रंग शक्यतोवर पांढरा आणि त्यावर थोडासा लाल हिरवा पिवळा चालेल कारण जिथे ठेवणार तिथे बॅकग्राऊंड ब्लू होती. तो खरोखरच हॅप्पी आणि वेलकमिंग दिसला पाहिजे. या दहा दिवसांच्या टूरमध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी हा हॅप्पी बुध्दा दिसत होता, जात होतो तिथे आम्ही सोवेनियर शॉपमध्ये ह्या बुध्दाला शोधत होतो. पण आमच्या कल्पनेतील गोरागोमटा, सुबक ठेंगणा, गोड गोजिरा, हसरा बुध्दा काही केल्या आम्हाला मिळत नव्हता. आमच्या म्हणजे माझ्या या शोधकार्याला सुधीरने कधीच कोपरापासून नमस्कार केला होता. प्रत्येक शॉपमध्ये गेल्यावर जो दिसेल तो हॅप्पी बुध्दा बघत तो म्हणायचा, ‘हा चांगला आहे की‘, आणि मी जणू माझ्या मुलासाठी मुलगी किंवा मुलीसाठी मुलाचा शोध घेत असल्यासारखी प्रत्येकामध्ये काहीतरी खोट काढत होते. शेवटी व्हायचं तेच झालं. माझी शोधमोहीम हातघाईवर आली. व्हिएतनाममधला हो-चि-मिन्न मधला शेवटचा दिवस आला. तो दिवसही संपला आणि आमची व्हिएतनाममधली अगदी शेवटची संध्याकाळ आली. ‘नुविन हुवे‘ या वॉकिंग स्ट्रीटवर आम्ही फिरत होतो. बुध्दा न मिळाल्याने मी मनातून थोडी नाराजच होते. दाखवू शकत नव्हते कारण मग सुधीरला बोलायला आयतीच संधी मिळाली असती, काय काय ऐकावं लागलं असतं. त्यावेळी तिथे एकही दुकान उघडं नव्हतं, दुसऱ्या दिवशी एअरपोर्टवर सोवेनियर शॉपमध्ये शोधूया असं म्हणत मी माझीच समजूत घातली आणि ‘हॅप्पी बुध्दा‘ची गोष्ट तात्पुरती मनातून काढून टाकली आणि म्हटलं ‘एन्जॉय द मोमेंट‘.
त्या वॉकिंग स्ट्रीटवर जणू जत्रा भरली होती. कुणी नाचत होतं, कुणी बागडत होतं, कुणी स्टॅचू बनून राहिलं होतं. बरेचसे पर्यटक एखाद्या पार्टीला आल्यासारखे छान छान ड्रेसेसमध्ये पोझेस देऊन फोटोग््रााफी करत होते. ते सगळं आम्ही कुतूहलाने बघत होतो. आमचेही फोटोज काढत होतो.‘व्हेन इन व्हिएतनाम, डू ॲज द व्हिएतनामीज् डू‘. एकंदरीत त्या स्ट्रीटने आमची संध्याकाळ हॅप्पी हॅप्पी बनवून टाकली. आपण बरंच पुढपर्यंत चालत आलोय हा विचार मनात येऊ लागला. माहोल असा होता की पाय निघत नव्हता. तसंही उद्या विमानात आराम करू असं म्हणत आम्ही पुढे जात राहिलो. व्हिएतनामधली ती शेवटची रात्र हावरटासारखी जणू आमच्या पोतडीत भरून घेत होतो. चालता चालता रस्त्याच्या उजव्या बाजूला आम्हाला एक मोठ्ठं बूक स्टोअर दिसलं जे सुरू होतं. पुस्तकांचं स्टेशनरीचं दुकान म्हणजे आमचा दोघांचा वीक पॉईंट. आम्ही आत घुसलो. उद्या विमानात वाचायला एक दोन पुस्तकं मिळाली तर बरं असा विचार करीत आम्ही त्या शॉपमध्ये फिरत राहिलो. वर खाली असं प्रचंड मोठ्ठं शॉप होतं. त्या त्या देशातल्या अशा दुकानांमध्ये आपल्याला तिथल्या स्थानिकांचं जीवनमान उलगडतं. इथले लोकं त्यांच्या दैनंदिन जीवनात काय काय गोष्टी वापरतात, ते बघायला मजा येते. मी दुकानाच्या अगदी आतल्या भागात आले आणि युरेका! मला तो दिसला. पांढऱ्या वस्त्रांमधला, मस्त हसणारा, आपल्या शिष्य परिवाराला अंगाखांद्यावर खेळवणारा, सिरॅकिमचा आणि उंचीला जेवढा हवा होता तेवढा! दहा इंचांच्या आत. मी अत्यानंदाने नाचायचीच बाकी होते. ‘अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है‘ या डॉयलॉगचा मला पुन्हा एकदा प्रत्यय आला. त्या बुद्धाला घेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि मी शांत झाले. आज तो बुद्धा ‘हसत रहा‘ चा संदेश पोहोचवत, त्याच्याशी जोडलेल्या आठवणींना उजाळा देत, आमच्या लिव्हिंग रूममध्ये विराजमान झालाय.
पूर्वी आपल्या घरांमध्ये एक शोकेस असायचीच असायची. कधी प्रवासाला गेलो की काहीतरी सोवेनियर आणलं जायचं आणि ते त्या शोकेसमध्ये विराजमान व्हायचं. कधीतरी त्यातल्या वस्तूंच्या मागे दडलेली गोष्ट आपल्याला घरच्यांकडून सांगितली जायची. ती शोकेस साफ करणं, वस्तूंवरची धूळ पुसणं हा कार्यक्रम असायचा आणि ते करताना एखादी गोष्ट फुटली तुटली की जो काही जमदग्नीचा अवतार मोठी मंडळी धारण करायची की विचारू नका. आमच्या घरातल्या शोकेसची एकच गोष्ट मला आवडायची नाही आणि ती म्हणजे त्याच्या काचा इतक्या घट्ट असायच्या की त्या सरकता सरकायच्या नाहीत. कालांतराने ह्या स्लाइडिंग ग्लासेस जाऊन काचेची दारं आली. मध्ये एक जमाना असा आला की घरात अशी शोकेस वगैरे असणं म्हणजे अनेक आर्किटेक्ट्सच्या मते थोडं ‘चीप‘ समजलं जायचं. त्यामुळे घरातनं `शोकेस’ या प्रकाराची गच्छंती झाली आणि वेगवेगळ्या जागा निर्माण करण्यात आल्या आर्टपिसेससाठी, ओपनमध्ये. मग कधी त्यावरचा एखादा आर्टपिस हात लागून पडण्याच्याही प्रसंगांना सामोरं जावं लागलं. घरात इंटिरीयर करताना मार्केटमधून विकत घेतलेल्या या महागड्या शो पीसपाठी कोणत्याही आठवणी जोडलेल्या नसल्याने फक्त श्रीमंतीचा देखावा असायचा तो. त्यामुळे ते काही फार काळ टिकलं नाही. त्याही पुढे मॉडर्न आर्किटेक्चरमध्ये मिनिमलीझमचा शिरकाव झाला. जेवढ्या कमी गोष्टी घरात तेवढं घराचं इंटिरियर आणि त्यात राहणाऱ्यांची टेस्ट उच्च दर्जाची ही समजूत डोकं वर काढू लागलीं. या सगळ्या वैचारिक उलथापालथीचं पचन होत असताना आमचा प्रवास वा पर्यटन वाढत होतं. प्रत्येक शहरातून किंवा देशातून येणारी किमान एक गोष्ट घरातल्या वस्तू वाढवत होती.
प्रत्येक ठिकाणाहून काहीतरी आणणं म्हणजे तिथल्या आठवणी आपल्या सोबत आणणं. बघा नं, हॅप्पी बुध्दावर लिहितानाही आमची व्हिएतनामची टूर डोळ्यासमोर उभी राहिली. शेवटी आयुष्यात अशाच छान छान आठवणी जमवत राहणं महत्वाचं. सो, या वस्तूंचं करायचं काय हा प्रश्न होताच. मिनिमलीझमचा फंडा थोडासा बाजूला ठेवला आणि घरात बूकशेल्फ-कम-शोकेस बनवून टाकली. त्यातल्या ओपन शेल्व्हज्मध्ये जगभरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू माववल्या. घरात एकटं असलं, कधी उदास वाटायला लागलं की या बूकशेल्फसमोर बसायचं आणि एकेक वस्तू कधी कुठे घेतली त्याची मनातल्या मनात उजळणी करायची. औदासिन्य कुठच्या कुठे पळून जातं.
आमच्या ऑफिस टीममधल्या रोशनी बागवेला फ्रीज मॅग्नेट्स जमविण्याची प्रचंड आवड. तिने आजपर्यंत खूप देशांना आणि शहरांना भेट दिली आहे. तिच्या घरी इतकी फ्रीज मॅग्नेट्स जमली की विचारू नका. एक दिवस तिने कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एच आर ला गळ घातली की, ‘मला एक मॅग्नेटिक बोर्ड द्या मोठ्ठासा, मला ही मॅग्नेट्स आपल्या ऑफिसला द्यायची आहेत‘. आता हा मौका कोण सोडणार? एच आर ने लागलीच तिला एक भिंत दिली आणि त्या मॅग्नेटिक बोर्डवर तिची सगळी फ्रीज मॅग्नेट्स स्थानापन्न झाली. आता मलाही बाहेर कुठे गेले की फ्रीज मॅग्नेट आणण्याचं वेड लागलंय. मध्यंतरी आमच्या टूर मॅनेजमेंट म्हणजे टूर मॅनेजर्सना सांभाळणाऱ्या टीमच्या डिपार्टमेंटमध्ये गेले होते, तेव्हा मला तिथे एक बोर्ड दिसला ज्यावर वेगवेगळ्या देशांच्या कीचेन्स लावलेल्या होत्या. तिथल्या राजीव, श्रीकृष्ण आणि संदीपला विचारलं की कुणी हे एवढं छान क्रिएशन केलंय, तर म्हणे टूर मॅनेजर्स या कीचेन्स आणून देतात त्यांनी एखाद्या नवीन देशात पाय ठेवला की त्याची आठवण म्हणून. म्हटलं, अरे वाह! या `माइलस्टोन कीचेन्स’ आहेत तर. थोडक्यात आपण कळत न कळत आठवणींची साठवण करीत असतो ती अशी.
आपल्या जुन्या डायऱ्या वा स्क्रॅप बुक्स किंवा आपला जुना पासपोर्ट चाळताना वेळेचं भान राहत नाही एवढ्या आठवणींमध्ये आपण गुंतून जातो. आमच्या बऱ्याचश्या ऑफिसेसमध्ये भिंतीवर एक मॉडर्न सुविचार लिहिलाय, `ऑफ ऑल द बुक्स इन द वर्ल्ड, मोस्ट ब्युटिफूल स्टोरीज आर फाऊंड बिट्विन द पेजेस ऑफ द पासपोर्ट.’ आपण अनेकांनी हे अनुभवलं असेल. पासपोर्टवरचे शिक्के आपल्या पर्यटनाचे अनेक किस्से आपल्याला सांगत असतात. कधीतरी आपला पासपोर्ट उघडून पाहिला की आठवणीच आठवणी आपल्या पायाशी रूंजी घालतात. आनंदी आठवणींच्या पोतडीसोबत आपलं आयुष्य घालवायचं असेल तर वर्तमानातल्या प्रत्येक क्षणावर काम केलं पाहिजे. कारण आज जे काही करतोय ते पुढच्या क्षणाला आठवण बनणार आहे. तेव्हा चला, आठवणी आनंदी बनवूया.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
देखो अपना देश
दिल से! प्यार से! सम्मान से!
सूर्याचा पारा चढला आणि तो आग ओकू लागला की आपसूकच भटक्यांना हिमालय खुणावू लागतो. अशा वेळी हिमालयाच्या कुशीत वसलेले सदाबहार राज्य त्यांना साद घालते. थक्क करणाऱ्या पर्वतरांगा, बर्फाच्छादित शिखरे, प्राचीन मठ, हिरवीगार कुरणे, चमचमणारे तलाव आणि खोरी आपल्याला उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पहायला मिळतात. त्यातील एक राज्य हिमाचल प्रदेश ही देवभूमी आहे. ही लोककथा, पुराण, यक्ष, गंधर्व आणि किन्नरांची भूमीही मानली जाते. शतकानुशतके या प्रदेशावर मौर्य, कुशाण, गुप्त, कन्नौज घराण्याचे राजे राज्य करीत होते. इथे उन्हाळ्यात असलेली हिरवळ आणि हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी ही नैसर्गिक सुंदर अशी दृश्यं आहेत. या प्रदेशात शिमला, रोहतांग, कुल्लू मनाली, कसोल, धरमशाला, मॅक्लॉडगंज ही अतिशय सुंदर ठिकाणे आहेत.
सिनेसृष्टीतले प्रीती झिंटा, कंगना रणौत, अनुपम खेर, मोहित चौहान, यामी गौतम यांसारखे प्रमुख भारतीय सेलिब्रिटी हे मूळचे हिमाचल प्रदेशातले. शाहिद कपूर आणि करीना कपूरचा 2007 साली आलेला 'जब वी मेट' हा चित्रपट आठवतोय? यातलं `आओगे जब तुम साजना’ हे शिमल्यातल्या मॉल रोड वर चित्रित झालेलं गाणं. तर `ये इश्क हाये’ हे रोहतांग जवळ शूट झालेलंं. रणबीर कपूरच्या 'ये जवानी हैं दिवानी' चित्रपटातही आपल्याला कुलू मनालीचं सौंदर्य पाहायला मिळतं. अशा या राज्यातलं पर्यटन म्हणजे दिल खुश करणारा अनुभव.
हिमाचलमध्ये अनेक ठिकाणी रॉक क्लाइंबिंग, स्कीइंग, ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंग यांसारख्या ॲक्टिव्हिटीज करण्याची आपल्याला संधी मिळते. टॉय ट्रेन म्हणून ओळखली जाणारी कालका-शिमला रेल्वे तसंच कुल्लू इथलं ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क ही युनेस्कोची जागतिक वारसास्थळं आहेत. खज्जियार शहर त्याच्या मोहक सौंदर्यामुळे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं. हिमाचल प्रदेश हे राज्य 'फ्रुट बाउल ऑफ इंडिया' म्हणूनही ओळखलं जातं.
तर असा हा हिमाचल प्रदेश पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. हिमालयातलं हे अलौकिक सौंदर्य नजरेत साठवून घ्यायचं असेल तर वीणा वर्ल्डसोबत या प्रदेशाची सफर नक्की करा.
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
न्यूझीलंडमधले फॉक्स ग्लेशियर हा निसर्गाचा एक चमत्कार मानला जातो. फॉक्स ग्लेशियर ही हिमनदी त्याच्या 13 किलोमीटरच्या पट्ट्यात दक्षिण आल्प्सच्या उंचीवरून 2600 मीटर्स खाली म्हणजेच समुद्रसपाटीपासून फक्त 300 मीटर्स उंचीवर असलेल्या समशीतोष्ण रेनफॉरेस्टमध्ये खाली उतरते. फ्रांस जोसेफ ग्लेशियरसह फॉक्स ग्लेशियर हा प्रवाशांना हिमरेषेच्या खाली जवळजवळ समुद्रापर्यंत पोहोचलेल्या बर्फाच्या व्हॅलीज् पाहण्याची संधी देतो. 1869 ते 1872 पर्यंत न्यूझीलंडचे पंतप्रधान असलेल्या सर विल्यम फॉक्स यांच्या नावावरून याला फॉक्स ग्लेशियर असं नाव देण्यात आलं.
फॉक्स ग्लेशियर हा साधारण 13 किलोमीटर्स लांबीचा सागरी ग्लेशियर आहे जो दक्षिण बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या वेस्टलँड ताई पोटिनी नॅशनल पार्कमध्ये आहे. आल्प्सच्या पायथ्याशी वसलेलं फॉक्स ग्लेशियर्स टाउनशिप, हायकिंग आणि निसर्गरम्य वॉकसाठी प्रसिद्ध आहे. हायकिंग हा फॉक्स ग्लेशियरचा अनुभव घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. फॉक्स ग्लेशियर साऊथ साईड वॉकवे किंवा सायकल वे ही एक पायवाट आहे जी पर्यटकांना जुन्या रेनफॉरेस्टमधून चालायला मार्ग दाखवते. ही वाट म्हणजे थंडगार वाऱ्याचा झोत आणि निसर्गातले विविध आवाज यांची मेजवानीच जणू. ही पायवाट आपल्याला या ग्लेशियरची झलक देते. दुसरीकडे गॉल्ट ट्रॅक लेक हे पॅनोरॅमिक व्ह्यू पहायला आवडणाऱ्यांसाठी ट्रीट आहे. जसजसे आपण वर जाऊ तसतसा माऊंट कूक आपल्या दृष्टीस पडतो. हा गॉल्ट लेकच्या चमचमणाऱ्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतो. या ग्लेशियरची भव्यता पाहण्यासाठी तुम्ही कूक फ्लॅट रोडवरच्या मॅथेसॅन लेकवर जाऊ शकता. हा अतिशय नयनरम्य असा लेक आहे. इथे तुम्ही आईस हायकिंग ॲडव्हेंचर किंवा रम्य असा हेलिकॉप्टर प्रवास करू शकता. जसजसे तुम्ही वर जाता तसा ग्लेशियरचा विस्तीर्ण असा विस्तार तुमच्या नजरेस पडतो. हा बर्डस आय व्ह्यू आपल्याला एक अद्वितीय दृश्य पाहिल्याचा आनंद देतो. या मॅथेसॅन लेकला अनेकदा 'मिरर लेक' म्हणूनही संबोधलं जातं. इथलं फॉक्स ग्लेशियर व्हिजिटर सेंटर हा माहितीचा खजिना आहे.
ग्लेशियरच्या बाजूला असलेले प्राचीन पोडोकार्प रेनफॉरेस्ट हे असंख्य वनस्पती आणि प्रजातींचे अभयारण्य आहे. या ग्लेशियरच्या मार्गावरून चालत असताना तुम्हाला विविध पक्ष्यांचे मंजुळ आवाज मोहित करतात. हिरव्यागार जंगलांनी वेढलेले हे ग्लेशियरचं दृश्य आपल्याला निसर्गाची किमया पाहण्याची अनोखी संधी देते. फॉक्स ग्लेशियर हे मुख्य महामार्गाच्या जवळ असल्याने गाडी चालवत किंवा चालत आपण इथे सहज जाऊ शकतो.
फॉक्स ग्लेशियर छायाचित्रकारांसाठी जणू स्वर्ग आहे. घनदाट जंगलांपासून ते बर्फाच्छादित प्रदेशांपर्यंतच्या वैविध्यपूर्ण लँडस्केप्स तुमच्यातल्या फोटोग्राफरला फोटो काढण्याच्या असंख्य संधी देतात. अशा या फॉक्स ग्लेशियरचा प्रवास आपल्याला आयुष्यभराच्या आठवणी देऊन जातो. सो, चलो यावेळी न्यूझिलंडला.
आयुष्य! एक सुंदर प्रवास
श्री. त्र्यंबक माईणकर, डोंबिवली
फिरायला वयाची अट नसते' हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण मी प्रत्यक्षात आणलंय. मी 'त्र्यंबक माईणकर!' मी वयाच्या 82 व्या वर्षी फिरायला सुरुवात केली. माझ्या पत्नीनं जगाचा निरोप घेतल्यानंतर खूप एकटा पडून गेलो होतो. म्हणजे मुलं, नातवंडं होती, सगळे माझी काळजी घ्यायचे, पण बोलायला कुणीच नसायचं, सगळे आपापल्या व्यापांमध्ये! खूप एकटं वाटायला लागलं होतं. एक दिवस मुलाने सांगितलं की एकटं वाटून घेण्यापेक्षा तुम्ही वीणा वर्ल्डबरोबर फिरायला जा. मला आयती संधीच चालून आल्यासारखी वाटली, कारण मला फिरायला खूप आवडतं. लग्न झाल्यापासून तशीही फिरायला सवडच झाली नव्हती, अर्थात नोकरीच एमटीडीसीत लागल्याने आमच्या हॉटेल्सची व्यवस्था बघायला कधी कधी जात होतो तेही कामाच्या निमित्ताने! पण मुलगा असं म्हणाला आणि पडत्या फळाची आज्ञा मानून मी लगेच वीणा वर्ल्डच्या डोंबिवली ब्रांचमध्ये फोन करून श्रीलंकेची टूर बुक केलीसुद्धा! 2015 ते 2020 म्हणजे लॉकडाउन लागेपर्यंत टूर्स केल्या, सिनियर्स स्पेशल टूर्स ह्या माझ्या सारख्या एकट्यादुकट्या रीटायर्ड बट नॉट टायर्ड व्यक्तींसाठी खूपच सोयीच्या आहेत. तेव्हापासून जो 'वीणा वर्ल्ड’ वर माझा शंभर टक्के विश्वास बसला, तो आजपर्यंत! सध्या मी फिरत नाही फारसा! कारण आता मी 92 वर्षांचा झालोय. अजून आठ वर्षांनी माझी सेंचुरी होईल.
श्रीलंकेनंतर मी ऑस्ट्रेलिया, जपानचं चेरी ब्लॉसम, दुबईसुद्धा केलं, त्यापैकी मला दुबई खूप आवडलं. या सगळ्या टूर्स सिनियर्स स्पेशल टूर्स शिवाय झाल्याच नसत्या. आत्तापर्यंत मी 20 ते 22 देशांना भेट दिलीये. आणि माझ्या 11 टूर्स झाल्यायत. वयाच्या 82व्या वर्षी बाहेरच्या देशात जात होतो, केवढं टेन्शन होतं, पण त्यांच्या टूर मॅनेजरमुळे टेन्शन कधी नाहीसं झालं ते कळलंच नाही.
म्हातारपण नको वाटतं, वृद्धापकाळ आला की माणूस एकटा पडतो, त्याला नैराश्य येतं, हे नैराश्य घालवायचं असेल तर फिरलं पाहिजे, त्यामुळे मन प्रसन्न राहतं आणि तब्येत सुद्धा छान राहते. थोडक्यात टूर्स केल्या की नव्या ओळखी होतात, नवी ठिकाणं बघता येतात. दुबईमध्ये लक्षात राहिलेल्या भेटी म्हणजे बुर्ज खलिफा, मॉल्स, डेझर्ट सफारी. कधीतरी परदेशवारी करायचीच असं पूर्वीपासून ठरवलं होतं, ते माझं स्वप्न वीणा वर्ल्डने पूर्ण केलं.
टूरवर गेल्यावर मी घरच्यांसाठी खरेदी करतोच. कुटुंबाला काय आवडतं, हे मला माहीत आहे. जसं की माझ्या मुलाला घड्याळं आणि टी शर्ट्स आवडतात, तसंच मुलीसाठी तिच्या आवडीच्या, तर नातवासाठी त्याच्या आवडीच्या गोष्टी. अशी सगळी खरेदी मी मनापासून करतो. आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या टूर्सबाबत मी खूपच समाधानी आहे. या प्रवासामुळे आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटतंय मला. आणखी काय हवं आनंदी आयुष्यासाठी!
प्राइव्हेट हॉलिडे आयडियाज्
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत
तुमच्यापैकी कोणाकोणाला सफारीवर जायला आवडतं? भारत देश त्याच्या नैसर्गिक विविधतेसाठी आणि त्याच्या समृद्ध वन्यजीवनासाठी ओळखला जातो. भारतात जंगल सफारीवर निघालं की आपल्याला आपल्या कल्पनेपलिकडच्या जगाची सफर घडते. अशा या सफारीचे अनेक ऑप्शन्स आपल्या भारतात उपलब्ध आहेत.
- बांधवगड, ताडोबा, रणथंबोर, जिम कॉर्बेट अशा राष्ट्रीय उद्यानांमध्ये जंगल सफारी करण्याचा अनुभवच काही और आहे. हे सगळे खासकरून टायगर रिझर्व्ह आहेत.
- तुम्हाला नदीतून वा बोटीतून सफारी करायची असेल आणि वाघाबरोबरच मगरींसारखे इतरही वन्य प्राणी पहायचे असतील तर सुंदरबन नॅशनल पार्कमध्ये बोटीतून सफारी करू शकता.
- सातपुडा राष्ट्रीय उद्यानात तज्ञ अनुभवी मार्गदर्शकांसोबत काही दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती पाहण्यासाठी निसर्गाच्या सहवासात एका सुंदर अशा वॉकिंग सफरीचा अनुभव घेऊ शकता.
- डेक्कन ओडिसी या लक्झरी ट्रेनमधून प्रवास करायचं ठरवलंत तर ताडोबा, पेंचसह विविध वन्यजीव अभयारण्यात एका परिपूर्ण सफारीचा अनुभव तुम्हाला घेता येईल.
- एखाद्या ठिकाणी कॅम्पफायर सोबतच तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता, तसंच लोकल रेंजर्सच्या सान्निध्यात त्या किर्र वातावरणात खास जंगलच्या गोष्टी ऐकू शकता.
- काही जंगलांमध्ये तुम्ही नाइट सफारीत घुबडे, बिबट्या आणि सिव्हेट यांसारखे निशाचर प्राणी जवळून पाहू शकता.
- सकाळच्या सफारीवरचा बोनेट ब्रेकफास्टचा अनुभव तुम्हाला खूश करून जाईल.
- कधी निरभ्र आकाशाखाली तुमचे टेलिस्कोप्स सेट करून खगोलशास्त्रज्ञांसोबत प्रायव्हेट स्टार गेझिंग सेशन अटेंड करता येईल. हे सेशन तुम्हाला आगळावेगळा अनुभव देईल.
बरं तुम्ही जंगल सफारींवर निघत असाल आणि राहणार कुठे हे टेन्शन असेल तर त्याचेही ऑप्शन्स आहेत बरं आपल्याकडे. तुम्हाला आवडतील असे जंगल लॉजेस.
- रणथंबोर नॅशनल पार्कजवळ असलेली अमनइ खास, ओबेरॉय वन्य व्हिलाज, सुजन शेर बाग ही हॉटेल्स सुदींग स्पा ट्रीटमेंटसाठी तसंच गोर्मे डिनरसाठी प्रसिद्ध आहेत.
- याशिवाय तुम्ही पूर्वीच्या काळी शाही शिकारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सवाई माधोपूर लॉजवर राहून रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये प्रायव्हेट सफारीचा अनुभवही घेऊ शकता.
- बांधवगड नॅशनल पार्कमध्ये जाणार असाल तर महुआ कोठी किंवा बांधव व्हिलाज इथे मुक्काम करा. या ठिकाणी तुम्हाला लक्झरी टेन्टमध्येही राहता येईल आणि वन्यजीवही जवळून पाहता येतील.
- पेंचमध्ये जाणार असाल तर जामतारा विल्डरनेस कॅम्पमध्ये तिथल्या शेतात चांदण्या रात्री आकाशात स्टार गेझिंगचा अनुभव घ्या.
तुमची जंगल सफारी फक्त वन्य प्राण्यांमुळेच नाही तर इतरही अनेक कारणांनी संस्मरणीय होऊ शकते. अशा खास अनुभवांची मेजवानी घ्यायची असेल तर आजच वीणा वर्ल्डच्या कस्टमाइज्ड हॉलिडे टीमशी संपर्क करा.
चलो, बॅग भरो, निकल पडो!
जोडून येणाऱ्या सुट्ट्यांची वाट आपण सगळेच बघत असतो. कारण या सुट्ट्या आपल्याला संधी देतात आपल्या नेहमीच्या वातावरणातून बाहेर पडण्याची. नेहमीचं रुटीन ब्रेक करून आयुष्यातला तोचतोपणा घालवायची आपली इच्छा असते. यावर सोप्पा उपाय म्हणजे एक शॉर्ट टूर... ही टूर आपल्या नीरस आयुष्यात प्रवासाचे नवीन रंग भरते. एक शॉर्ट एस्केप आपला सगळा कंटाळा दूर करायला मदत करते. अशा या टूर्सवर आपण काय करू शकतो? तर एखाद्या लोकप्रिय कौटुंबिक मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊ शकतो. पवित्र अशा तीर्थक्षेत्रांना भेटी देऊ शकतो. भारताच्या एखाद्या भागात त्या त्या वेळी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सणांना, तिथल्या खास फेस्टिवल्सना भेट देऊन आपल्या देशात असलेली विविधता अनुभवू शकतो. हे प्रवास आपल्याला नवीन दृष्टी देतात. या प्रवासातून आपल्याला अनेक आठवणींची पुंजी मिळते. आपण नव्याने रिचार्ज होतो. तुम्हालाही नक्कीच हवी असेल अशी छोटीशी विश्रांती, मग लगेचच कॅलेंडर हातात घ्या, लाँग वीकेंड्स शोधा आणि त्यावेळी तुम्हाला कुठे जायला आवडेल त्या डेस्टिनेशन्सच्या शॉर्ट टूर्स करीता असणाऱ्या विविध ऑप्शन्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.veenaworld.com
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.