IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

जन्नत-ए-काश्मीर ब्रँड-ए-काश्मीर

17 mins. read

Published in the Sunday Sakal on 07 July, 2024

खूप दिवसांपासून काश्मीरला जायचं होतं पण योग येत नव्हता. म्हणजे तुमचा विश्‍वास बसणार नाही पण मी गेल्या नऊ वर्षात काश्मीरला जाऊ शकले नाही. कारण तसं काही नव्हतं पण राहून गेलं. त्याआधी दर सहा महिन्यांनी जाणं होत होतं वीणा वर्ल्ड सुरू झाल्यावर. 2014-15 मध्ये तर ठिय्या मारून तब्बल पंधरा पंधरा दिवस आम्ही राहिलो. रोज शंभर वा दोनशे पर्यटकांसोबत गाला इव्हिनिंग असायची. नंतर काश्मीरच्या फेऱ्या थांबल्या आणि नऊ वर्ष लोटली. गेल्या आठवड्यात मात्र एका लग्नाच्या निमित्ताने योग आला आणि तीन दिवसांसाठी का होईना काश्मीरला जायला मिळालं. काश्मीर लग्नही बघायला मिळालं आणि तिथल्या अनेक असोसिएट्सशी बोलणंही झालं. खूप दिवसांनी गेल्यामुळे नव्या बदललेल्या दृष्टीने काश्मीरकडे पाहिलं. सगळ्यात भावलं ते म्हणजे काश्मीरमध्ये मॉर्निंग वॉक करायला मिळाला. पुर्वी कधीतरी बुलेवार्ड रोडवर दाल लेकच्या काठाने मॉर्निंग वॉक  केल्याच्या आठवणी आहेत. नंतर कधी मिलिटन्सीमुळे तर कधी सर्वत्र खड्या पहाऱ्यामुळे मॉर्निंग वॉकला जायची भीती वाटायची. पण आतातर झेलम नदीच्या काठावर बांधलेल्या छानशा वॉटर फ्रंटला बघूनच `उद्या इथे मॉर्निंग वॉकला यायचं’ हे आम्ही ठरवूनच टाकलं. जवळजवळ दीड तास आम्ही चालत होतो, एकदम बिनधास्त. आमच्यासारखे काही टूरिस्टही मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते. प्रकर्षाने जाणवलेला बदल म्हणजे काश्मीर महिला चांगल्या संख्येने मॉर्निंग वॉक घेताना दिसत होत्या. मी आमच्या एका असोसिएट्‌‍ला बोलले पण, `काश्मीर महिला अशा मस्तपैकी मॉर्निंग वॉक करताना दिसत नव्हत्या पुर्वी’, तर ते म्हणाले, `पूर्वी त्यांना फिरायला अशी जागाच नव्हती. आता हे वॉटरफ्रंट झाल्याने सोय झाली. सेंटर बहुत पैसा डाल रहा है कश्‍मीर और खूबसूरत बनाने के लिए’. एकंदरीत काश्मीरमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल काश्मीरजनता खुश होती. ह्यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काश्मीरमध्ये मोठ्यातली मोठी हॉटेल्स, मिडलेव्हल वा छोटी हॉटेल्स, होम स्टेज्‌‍ सगळं सगळं अगदी हाऊसफुल्ल होतं. गाड्या घेऊन रीझर्वेशन न करता येणाऱ्या पर्यटकांना अक्षरश: गाडीतच रहावं लागलं. ही परिस्थिती खूप पुर्वी असायची पण नंतर काहीना काही कारणाने काश्‍मीरला नजर लागल्यासारखी झाली. आता काश्मीर मागे वळून पहाणार नाही आणि आपण भारतीय नागरिकही काश्मीरकडे पाठ फिरवणार नाही.

काश्मीरला भूतलावरील स्वर्ग म्हटलं जातं, ‘गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त; हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त’ म्हणजे `ह्या पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथे आहे, इथे आहे, इथेच आहे’. का कुणास ठाऊक, म्हणजे तसं बघायला गेलं तर काश्मीरमध्ये प्रचंड गरीबी आहे. दारिद्य्रच म्हणायचं. कुठे कुठे तर इतकं वैतागायला होतं की ‘हेच का ते काश्मीर ‘ असं म्हणायची वेळ येते. आम्ही आयुष्यातले खूप दिवस काश्‍मीरला राहिलोय त्यामुळे काश्मीरच्या छान छान सुंदर आठवणी आमच्या पोतडीतून सतत बाहेर येतात. सुधीरलाही काश्मीरच्या अनेक आठवणी सांगून मी बोअर करायचे. ‘एकदा जाऊनच येतो काश्‍मीरला’ म्हणून सुधीर पुर्वी जून महिन्यात, त्यावेळीही एका लग्नासाठी जाऊन आला. आल्यानंतर त्याने मला प्रश्‍न केला, `एवढं काय आहे काश्मीरमध्ये, तुम्ही एवढा उदोउदो करताय?’ अ बाप, मला हा धक्काच होता. आपल्यालाच म्हणजे आपल्या ‘बेटर हाफ‘लाच जर काश्मीर आवडलं नाही तर आपण प्रमोट तरी कसं करणार? आता आली का पंचाइत. सुधीरला काश्मीर आवडवणे हा माझ्या छुप्या स्ॅटेजीचा भाग होता. मी नेहमीप्रमाणे ॲनालिसिस केलं, सुधीर जे चार दिवस तिथे होता त्या चारही दिवशी प्रचंड पाऊस पडला होता. फक्त श्रीनगरमध्येच वास्तव्य होतं. स्थलदर्शन केलंच नाही, ना शिकारा राईड. चारही दिवस लग्न आणि तेच समारंभ. सुधीर आणि माझे बाबा दोघंच गेले होते त्या लग्नाला, त्यामुळे दोघांच्याही बायका घरी असल्याने एखाद्या ड्युटीवर गेल्यासारखे गेल्याने काय मजा येणार? वर काश्मीर लग्न म्हणजे ते सर्वांनी एकाच प्लेटमध्ये एकत्र  भोजन करणं ह्या गोष्टी थोड्या अोव्हरव्हेल्मिंग झाल्या असाव्यात. आत्ताही आम्ही तसं एका प्लेटमध्ये एकापाठी एक पंचवीस-तीस पदार्थ टेस्ट केले. मजा आली खूप. ‘व्हेन इन  डू ॲज द काश्मीरज्‌‍ डू’! अर्थात सुधीरचं मत बदललं आणि काश्‍मीर त्याला आमच्यापेक्षा जास्त आवडू लागलं. हल्लीतर आमच्यापेक्षा त्याच्याच फेऱ्या जास्त होताहेत काश्मीरला.

सो, सुधीरसारखी परिस्थिती काही जणांची होऊ शकते. पण काश्‍मीर एकदा जायची जागाच नाही. काश्‍मीर अनुभवायचं असेल तर किमान चार वेळा जायचं असतं. काश्‍मीर चार सीझनवाली जमीन आहे, ‘अ लँड ऑफ फोर सीझन्स‘ उन्हाळा, पावसाळा, वसंत, हिवाळा. प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी खासियत असतेच असते. कधी काश्‍मीर बर्फाने आच्छादलेलं असतं तर कधी ते फुलांनी बहरलेलं असतं. कधी सफरचंद, जर्दाळू, आलुबखार, अनार, बाबूगोशा, अक्रोड सारख्या फळांनी झाडं लगडलेली असतात तर कधी संपूर्णपणे पानगळ झालेली बोडकी झाडं बघायला मिळतात. आतातर मार्च एप्रिलमध्ये ट्युलिप गार्डनने सजलेलं काश्‍मीर बघायला मिळतं आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये केशराचा अनमोल असा बहर आपल्याला थक्क करतो. मागच्या आठवड्यात ॲप्रिकॉट आणि ॲप्पलची कोवळी कोवळी फळं लागलेली झाडं आम्ही बघितली. आता ह्यापुढे जाणाऱ्यांना सफरचंदाच्या बागा बघायला मिळतील. गेल्या तीन दिवसात दाल लेक, बुलेवार्ड रोडसभोवती आम्ही किमान चार-पाच फेऱ्या मारल्या. त्या देखण्या सरोवराला किती काळ डोळ्यात साठवलं तरी मनाची तृप्ती होत नव्हती. आमच्या पॅक्ड शेड्युलमुळे आम्हाला ना शिकाऱ्यात बसता आलं ना आम्हाला शंकराचार्य हिलला जाता आलं. मनातल्या मनात, `मी पुन्हा येईन’ म्हणत दुरूनच शिकारा आणि शंकराचार्य हिलचा निरोप घेतला. आमच्या हातात दिवस तीन पण हावरटासारखं आम्हाला पहलगामलाही जायचं होतं, जमलं तर नवीन साइटसिअिंग स्पॉट्स बघायचे होते, कसलं काय, जेमतेम श्रीनगर करू शकलो. अर्थात ही बिझनेस ीप नव्हतीच. लग्नाला गेलो होतो पण शेवटी ती बिझनेस कम वेडिंग अशीच ीप झाली. ह्यावेळी खरंतर समर व्हेकेशन सीझन जवळजवळ संपला होता तरी ट्रॅफिक जॅम‘ ला सामोरं जावं लागलं. मुंबई दिल्ली लंडन टोकियो न्यूयॉर्कच्या ट्रॅफ्रिक जॅम नंतर आता पुढे श्रीनगर ट्रॅफिक जॅमचीही सवय करून घेतली पाहिजे.

काश्‍मीरचं आकर्षण पर्यटकांमध्ये कधीही कमी झालेलं मी पाहिलं नाही. म्हणजे टेररिझम आणि मिलिटन्सीमुळे काश्‍मीर सलग चौदा-पंधरा वर्ष बंद होतं, साधारण 1990 ते 2005, आणि त्यानंतरही अधूनमधून ते अचानक बंद व्हायचं. पण ह्या सगळ्या काळात पर्यटकांनी काश्‍मीरकडे पाठ फिरवली नाही. पर्यटक नसलेलं काश्‍मीर कधी नव्हतंच. आता तर सगळंच बदललंय. आणि काश्‍मीर सदैव  पर्यटकांच्या स्वागतासाठी ‘दोनों बाहें फैलाए‘ तयार आहे. ‘जन्नत-ए-कश्‍मीर‘ हा खिताब पहनलेलं काश्‍मीर तसं बघायला गेलं तर एक प्रचंड मोठा ब्रँड आहे, जो गेल्या साठ वर्षात त्यावर अगदी टेररिझम, मिलिटन्सी, खौफनाक, धोकादायक असे कितीही आरोप झाले, शिंतोडे उडाले तरी लयाला गेला नाही. भूकंप, महापूर, आग, लॅन्डस्लाइड्स, हिमवादळं अशा अनेक नैसर्गिक आपत्तींमध्येही काश्‍मीर थोड्या काळाकरिता लयाला गेलं असं झालं तरी पुन्हा फिनिक्स पक्षासारखं उभारी घेत राहिलं. आज जगात आपण अनेक कंपन्या एखाद्या छोट्या मोठ्या आपत्तीमुळे उन्मळून पडताना बघतो. कितीतरी मोठमोठ्या कंपन्या ज्या ऐंशी वा नव्वदच्या दशकात भारतावर राज्य करीत होत्या त्यांची नावंही आता आपण विसरलोय. मोठे ब्रँड्स आज आहेत उद्या नाहीत अशा अवस्थेला पोहोचताना बघतोय. अशा ह्या बेभरवशाच्या दुनियेत ‘काश्‍मीर‘ हा ब्रँड मला खूपच इन्स्पायरिंग वाटतो. ‘काहीही संकट येवो, कोणत्याही आव्हानांना तोफ्लड द्यायला लागो, कधी थांबण्याची वेळ येवो, पण नामशेष होणार नाही‘ ही शिकवण देत ‘काश्‍मीर‘ ब्रँड आणखी मोठा होतोय. आतातर आपल्या केंद्र सरकारचीच साथ असल्याने काश्‍मिर मस्त बदलतंय. आम्हीही काश्‍मीरसाठी आता वेगवेगळ्या कॅटॅगरीतल्या हॉटेल्सवर आधारित टूर्स घेऊन येतोय. आता काश्‍मीरमध्ये चांगली हॉटेल्स आली आहेत. मध्ये बरीचशी हॉटेल्स मिलिटरी आणि आर्मीच्या अंडर गेल्याने हॉटेल्सची वानवा होती पण आता खूप हॉटेल्स आहेत. नव्याने बांधली जाताहेत अर्थात पर्यटकांचा अोघही तेवढाच वाढतोय. पण परिस्थिती खूप सुधारलीय. आता ब्रँड काश्‍मीर जो आधीच स्ाँग होता तो आपल्या भारतातला बलाढ्य ब्रँड होणार आहे हे निश्‍चित. आपलीच काही राज्य तर खुलेआम सांगतात, ‘काश्‍मीर सुरू झालं की आमच्या राज्यांमध्ये येणाऱ्या टूरिस्ट्सची संख्या रोडावते. काश्‍मीर बंद असलं की आमचं बरं चालतं.‘ आता ह्या राज्यांनी काश्‍मीर बंद वा चालू ह्यावर अवलंबून न राहता स्वत:ची नवीन स्ॅटेजी केली पाहिजे तरच त्यांचीही भरभराट होईल. कारण काश्‍मीर आता थांबणार नाही. जन्नत ए कश्‍मीर! ब्रँड ए कर!


अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

सेंट्रल युरोपच्या दक्षिण भागात विसावलेला आणि पूर्वीच्या युगोस्लाव्हियाचा हिस्सा असलेला देश म्हणजे ‘स्लोव्हेनिया ’.हा देश आपल्या भारतातील मेघालय किंवा मणिपूर पेक्षाही आकाराने लहान आहे.या देशातील अर्ध्याहून अधिक भूभाग जंगलांनी आच्छादलेला आहे.या देशाचं भौगोलिक स्थानच असं आहे की याच्या एका बाजूला मेडिटेरेनियन समुद्राचा किनारा येतो तर एका बाजूला आल्प्सची हिमाच्छादित रांग येते.या देशात मध्यवर्ती ठिकाणी असलेलं ल्युबलियाना हे शहर या देशाची राजधानी आहे.या शहरापासून फक्त ५५ कि.मी.च्या अंतरावर लेक ब्लेड हे रमणिय सरोवर आहे.ज्युलियन आल्प्समध्ये पर्वतशिखरांच्या आणि दाट अरण्याच्या घेऱ्यात हे सरोवर आहे.या सरोवराच्या काठावर ‘ब्लेड’ हे ऐतिहासिक शहर वसलेलं आहे.इथे पर्यटक गोल्फ,माउंटन ट्रेक्स, घोडेसवारी,फिशिंग याचा आनंद घ्यायला येतात.

११ व्या शतकात होली रोमन एम्पायरचा सम्राट हेन्री द्वितीय याला हा परिसर इतका आवडला की त्याने लेक ब्लेडच्या काठावर ‘ब्लेड कॅसल’ उभारली.या परिसरातील सगळ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे लेक ब्लेड.या तलावाच्या पूर्वेकडच्या भागात थर्मल स्प्रिंग्ज आहेत.या तलावातल्या बेटाबद्दल एक परिकथा आहे,त्यानुसार पूर्वी इथे तलाव नव्हता,गवताचं कुरण होतं,ज्यात पऱ्या खेळायच्या.मात्र इथल्या मेंढपाळांमुळे त्या कुरणातलं गवत कमी होऊ लागलं आणि पऱ्यांना जमिनीवरच्या दगडांमुळे इजा झाली म्हणून त्यांनी रागाने हा भाग जलमय करुन टाकला,फक्त मधला एक मोठा खडक बाहेर राहिला,तेच या तलावातले बेट आहे.या बेटावरचं १७ व्या शतकातील चर्च प्रसिध्द आहे.या बारोक शैलीत उभारलेल्या चर्चमध्ये आजही विवाह समारंभ साजरे होतात.या लग्न समारंभातला मुख्य कार्यक्रम म्हणजे चर्चच्या १७१ फूट उंचीच्या मनोऱ्याच्या ९१ पायऱ्या नवऱ्यानं आपल्या नवपरिणित पत्नीला उचलून चढायच्या असतात,हे जो नवरा करतो त्याचा संसार सुखाचा होतो अशी समजूत आहे.

लेक ब्लेडला भेट देणाऱ्या पर्यटकांना इथल्या पारंपरिक ‘प्लेटना’ होडीतून तलावात फेरफटका मारायचाच असतो.१६ व्या शतकापासून या तलावात वाहतुकीसाठी या लाकडी होड्या वापरल्या जातात.बव्हारियन जर्मन भाषेत ‘प्लॅट्टन ’ म्हणजे ‘ फ्लॅट बॉटम्ड बोट’ त्यावरुन या होड्यांना ‘प्लेटना’ हे नाव मिळाले.या होड्या वल्हवण्याचा अधिकार फक्त २२ कुटुंबातल्या लोकांनाच आहे.१८ व्या शतकात ऑस्ट्रियाची साम्राज्ञी मारिया थेरेसा हिने या परिसरातल्या बावीस कुटुंबाना या तलावात होडी चालवण्याचा अधिकार दिला होता,त्याच घराण्यातली लोक आजही पर्यटकांना लेक ब्लेडमध्ये जलविहाराला घेऊन जातात. लेक ब्लेडला भेट देणारे पर्यटक या परिसराची खासियत असलेली पेस्ट्री - ‘ क्रेमना रेझिना’ खायला विसरत नाहीत.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

वर्ल्ड  360 डिग्रीज !

Veena World Travel Mission

नोकरी करताना जसं आपलं एक रुटीन असतं ना,तसंच रिटायरमेंटनंतर ही नकळत एक रुटीन बनून जातं.मग त्याचाही कंटाळा येऊ लागतो.मात्र आम्हाला दोघांना – सौ.उज्वला केळकर आणि श्री.विनय केळकर आम्हाला त्यावर एक झक्कास उपाय मिळाला आहे.आम्ही दोघं 2016 पासून जोडले गेलो आहोत वीणा वर्ल्डशी.वीणा वर्ल्डची सोबत मिळाल्यापासून भारतातल्या गुजराथ,सेव्हन सिस्टर्स,राजस्थान,काश्मीर,केरळ अशा राज्यांपासून ते अमेरिका,युरोप, ऑस्ट्रेलिया अगदी आइसलँड,अंटार्क्टिकापर्यंत जणू वर्ल्ड 360 डिग्रीज ओपन झालं.त्यामुळेच तर गेल्या 9 वर्षांमध्ये आम्ही जगभरातल्या 16 देशांना भेट दिली.या वर्षीचे आमचे टूर कॅलेंडरही लागलेलच आहे.फेब्रुवारी– साऊथ आफ्रिका,मार्च- एप्रिल जपान,जूनमध्ये स्कँडेनेव्हिया नंतर ऑक्टोबरमध्ये न्यूझिलंड असा भरगच्च प्रोग्राम ठरला आहे.या भटकंतीत जपानने आमचे डोळे आणि मन अगदी तृप्त केलं.त्यामुळेच एकदा ऑटम म्हणजे फॉल सिझनमध्ये आणि एकदा चेरी ब्लॉसम – साकुरासाठी अशी आम्ही दोन वेळा जपानला भेट दिली आहे. विशेषतः जपानमध्ये पाहिलेला ‘साकुरा’ मी कधीच विसरू शकत नाही.तिथल्या प्रत्येक रस्त्यावर,उद्यानात फुललेली त्या चेरीच्या झाडांनी मला चिरकाळ टिकणारा आनंद दिला.

मला वीणा वर्ल्डचं कौतुक यासाठीच वाटतं की घरातल्या प्रत्येकासाठी त्यांच्याकडे काही ना काही आहे.ग्रुप फॅमिली टूर्सबरोबरच लेडिज स्पेशल टूर्स आहेत,साठी ओलांडलेल्या ‘तरुणांसाठी’ ही खास सिनियर स्पेशल टूर्स आहेत.वीणा वर्ल्डच्या ऑफिसमध्ये जाऊन टूर बूक करतानाच वीणा वर्ल्डच्या आपुलकीच्या सेवेचा प्रत्यय येतो आणि मग पुढे टूरवर टूर मॅनेजर अगदी जातीने लक्ष घालून आपल्याला सगळी मदत करतात.परफेक्ट आयटिनररींमुळे ज्या देशात आपण जातो तिथली महत्वाची आकर्षणे,ठिकाणे पाहून होतातच वर टूर मॅनेजरने दिलेल्या माहितीमुळे तिथली संस्कृती,इतिहास,खाद्यपदार्थ यांचीही ओळख होते.आठ-दहा दिवसांच्या परदेश सहलीमध्ये राहाण्यासाठी सर्व सुखसोयींनी सुसज्ज आलिशान हॉटेल्स तर असतातच पण त्या त्या देशातील-प्रांतातील स्थानिक खाद्यपदार्थांसह परदेशातही भारतीय जेवणाचा आस्वाद घेण्याची सोय हे तर वीणा वर्ल्डचे वैशिष्ट्यच आहे.त्याच बरोबर वीणा बर्ल्डच्या टूर्समध्ये आगळ्या वेगळ्या अनुभवांचा आनंद घेता येतो,कधी गोंडोला राइड तर कधी बुलेट ट्रेनची सफर.या सगळ्यामुळेच आमचं वीणा वर्ल्डबरोबर खास नातं जुळं आहे,मग वीणा वर्ल्डच्या टॅग लाइनमधे थोडा बदल करुन म्हणावसं वाटतं की

चलो बॅग भरो और निकल पडो,

रिश्ते सब दुनियासे जोडो

--- श्री .विनय केळकर आणि सौ.उज्ज्वला केळकर


काय बाई खाऊ कसं  गं खाऊ!

खाद्यपरंपरेची पाळंमुळं अगदी दूरवर पसरलेली असतात, त्यामुळेच आपले वाटणारे खाद्यपदार्थ दुसऱ्या देशातून आलेले आहेत हे कळल्यावर धक्काच बसतो. भारतातील लोकांसाठी ‘पुलाव’ आणि ‘कबाब’ हे पदार्थ इतके ओळखीचे आणि आवडीचे आहेत की हे पदार्थ हजारो किलोमीटर अंतरावरच्या, युरोपच्या कोपऱ्यातल्या एका देशामधून आले आहेत हे सांगितलं तर चटकन विश्‍वास बसणार नाही. पण पूर्व युरोप आणि पश्‍चिम आशियाच्या सिमारेषेवर वसलेल्या अझरबैजान या देशात मिळणारा ‘प्लोव’ म्हणजे आपल्या भारतातल्या पुलावाचा पूर्वजच म्हणावा लागेल. अझरबैजानमध्ये 200 प्रकारचे प्लोव बनवतात. भाज्या, सुकवलेली फळे, मटण, चिकन, मासे, बीफ घालून इथे प्लोव तयार करतात. अझरबैजानच्या जेवणात कबाबही असतातच. लुला कबाब, टिक्का कबाब असे प्रकार इथे लोकप्रिय आहेत. मांसाहारी पदार्थांमध्ये बलिक, डोल्मा, दुश्‌‍बरा, लवांगी असे पारंपारिक पदार्थ आवडीने खाल्ले जातात. या देशातल्या जेवणात जे सूप दिलं जातं ते अधिक दाट असतं आणि त्यात घातलेल्या पदार्थांत बटाटा, हरभरे, भाज्या, मटण याचं प्रमाणही भरपूर असतं. त्यामुळे आधी सेकंड कोर्स म्हणून सूप प्यायलं जातं आणि मग त्यातले पदार्थ थर्ड कोर्स म्हणून खाल्ले जातात. या देशातला ‘लवाश’ म्हणजे भारतातल्या रोटी किंवा नानचा चुलतभाऊ म्हणता येईल. त्याबरोबरच युखा, यायमा, फतिर, फसाली असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड या देशात खाल्ले जातात. इथे हलव्याचेही वेगवेगळे प्रकार मिळतात. सामनी हलवा, शाकी हलवा असे प्रकार खाताना आपण भारतीय मिठाई खातोय असंच वाटतं. बकलावा या देशात ‘पकलावा’ म्हणून ओळखला जातो. अझरबैजानच्या विविध प्रांतामधले पकलावाचे वेगवेगळे प्रकार प्रसिध्द आहेत. ‘ब्लॅक टी’ हे या देशाचं राष्ट्रीय पेय मानलं जातं. त्याचप्रमाणे अक्रोड, लिंबू, डाळिंब, स्ट्रॉबेरी, पुदीना यांची सरबतेही या देशात मिळतात. देशविदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा‘ ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’हा पॉडकास्ट नक्की ऐका.www.veenaworld.com/podcast


ऑस्ट्रेलिया झालं अफोर्डेबल!

australia

अमेरिका मायनस व्हॉयलन्स म्हणजे ऑस्ट्रेलिया. कधीतरी कुणीतरी हे ऐकवलं आणि ते पटलं सुद्धा. हे दोन्ही देश अगदी अलिकडचे. आपल्यासारखी पाच हजार वर्षांची परंपरा नाही त्यांना. युएसए एक देश म्हणून अवघ्या अडिचशे वर्षांचा तर ऑस्ेलिया सव्वाशे वर्षांचा देश. अर्थात तेथील म्हणजे अमेरिकेतील ड इंडियन्स आणि ऑस्ट्रेलियातील ॲबॉरिजीन्स ह्या अनुक्रमे तीस हजार व साठ हजार वर्ष आधीपासूनच्या वसाहती आहेत. ब्रिटीशांचा अंमल असल्याने नवे देश म्हणून सगळ्या गोष्टी नव्याने साकारायला त्यांना सोप्पं गेलं आणि युएसए ऑस्ट्रेलिया झपाट्याने प्रगती करणा आणि जगभरातल्या लोकांना खास करून स्थलांतरीतांना आकर्षित करणा देश ठरले. आजही युएसए जगभरातल्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट चॉइस आहे तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बऱ्याच देशांमध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. पर्यटकांनीही त्यांच्या ट्रॅव्हल मिशनमध्ये पहिल्या दहा देशांमध्ये किंवा पहिल्या तीन कॉन्टिनेंटस्‌‍मध्ये ऑस्ट्रेलियाचा नंबर लावलेला असतो. प्रथम युरोप मग युएसए आणि मग ऑस्ट्रेलिया ह्या क्रमाने पर्यटक प्रवास करीत असतात. युएसए किंवा ऑस्ट्रेलिया तसं बघायला गेलं तर दूरचे देश, त्यामुळे तिथे जाण्यासाठी, सर्वकाही साग्रसंगीत बघण्यासाठी खर्चही बराच येतो. तिथे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही म्हणजे वीणा वर्ल्ड घेऊन येतो त्या देशात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त स्थळांचा समावेश असलेल्या सहली. आत्ताही ऑस्ट्रेलियासाठी ‘फक्त दोन लाखात’ अशी ‘सिडनी मेलबर्न कॅनबेरा’ची मस्त मस्त सहल आणली आहे. ऑस्ट्रेलियातील तीन मुख्य शहरं यात आहेत. ऑस्ट्रेलिया थ्री सिटीज्‌‍, फाइव्ह सिटीज्‌‍ किंवा सेव्हन सिटीज्‌‍ किंवा जरा मोठ्या टूरमध्ये न्यूझीलंडसोबत बघितला जातो. त्या सगळ्या टूर्स आहेतच. पण वेळ कमी असेल तर ऑस्ट्रेलियाची ही सात दिवसांची टूर एक मस्त पर्याय आहे तुमच्या ट्रॅव्हल मिशनमधल्या ऑस्ट्रेलिया खंडावर तुमच्या भेटीची मोहोर उठवायला. सो चलो, बॅग भरो, निकल पडो, ह्यावेळी ऑस्ट्रेलियाला.


न पाहिलेला साऊथ ईस्ट एशिया

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍ सोबत

जनरली अनेकांचा पहिला इंटरनॅशनल हॉलिडे हा साऊथ ईस्ट एशियामधला असतो. एकतर तिथलं हवामान,संस्कृती आपल्यापेक्षा फारस वेगळं नाही, तिथले खाद्य पदार्थही आपल्या ‘चवीचे’ असतात.त्यामुळेच थायलंड,सिंगापूर,बाली,मलेशिया या साऊथ ईस्ट एशियातील देशांकडे भारतीय पर्यटकांची पावले चटकन वळतात.मात्र बँकॉक,पट्टाया,कौलालंपूर-बाटू केव्हज-गेंटिंग हायलँड,बालीमधील उबूद - कुटा-किंतामनी या पॉप्युलर टूरिस्ट  ॲट्रॅक्शन्स खेरीज या देशांमध्ये आणि एकूणच साऊथ ईस्ट आशियात पाहाण्यासारखं बरचं काही आहे.

थायलंडमधील फुकेतजवळच आहे ‘खाओ सोक नॅशनल पार्क’.गर्द हिरव्या रेन फॉरेस्टने भरलेला हा परिसर तिथल्या नयनरम्य सरोवरांमुळे अधिकच सुंदर झाला आहे.या सरोवरांमधील चेओ लार्न लेक हा तलाव त्याच्या अप्रतिम सौंदर्यसाठी तर प्रसिध्द आहेच पण त्यातले फ्लोटिंग बंगले पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.या मानव निर्मित सरोवरात बाम्बूची पारंपरिक शैलीतली तरंगती निवासस्थाने आहेत तसेच बंगलेही आहेत.वन्यपशु-पक्ष्यांनी भरलेल्या घनदाट अरण्यात अशा तलावात तरंगत्या निवासस्थानात राहाण्याचा अनुभव तुमच्या हॉलिडेला वेगळीच रंगत आणेल.नयनमनोहर निसर्ग आणि लक्झ्युरियस हॉटेल्स याचा संगम अनुभवायचा असेल तर नॉर्थ थायलंडमधील चिआंग माइ,चिआंग राइ या भागांना भेट द्यावी.इन्फिनिटी पूल्स आणि स्पा फॅसिलिटीने सुसज्ज प्रायव्हेट व्हिलाजमध्ये राहून तुम्ही थाई मसाजचा सुखकारक अनुभव घेऊ शकता.

नेशन ऑफ रिव्हर्स म्हणून ओळखला जाणारा साऊथ ईस्ट आशियातला देश म्हणजे ‘व्हिएतनाम’.कॉफीसाठी जग प्रसिध्द असलेल्या देशातील ‘हा लॉन्ग बे’ हा किनारा पर्यटकांना नेहमीच मोहवतो.खाडीमध्ये असलेले डोंगराचे सुळके,बेटं आणि त्यावरील घनदाट जंगल अशा अनोख्या निसर्ग द्रूश्याचं अविस्मरणिय हवाई दर्शन घेण्यासाठी इथे सी प्लेन टूर उपलब्ध आहेत. सदर्न व्हिएतनाममधील मेकॉंग डेल्टा हा तिथल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिध्द आहे.मेकॉंग नदीच्या प्रवाहात रिव्हर क्रुझचा आनंद घेऊन तुम्ही तुमचा हॉलिडे अधिक मजेदार करू शकता. यात एक दिवसाच्या जलसफरीपासून ते लक्झुरियस क्रुझवरच्या ३-४ दिवसांच्या टूर पर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत.

हजारो बेटांनी बनलेल्या इंडोनेशियातील ‘बाली ’आयलंडस जगभरातील पर्यटकांना खुणावत असतात.आयलंड्स ऑफ गॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालीमधला नुसा दुआ हा भाग तिथल्या आलिशान रिसॉर्टससाठी नावाजला जातो,इथे तुम्ही ‘केव्ह डायनिंग’चा आगळावेगळा अनुभव घेऊ शकता.तुम्हाला बालीच्या जेवणाचा ऑथेन्टिक अनुभव घ्यायचा असेल तर तुगु रिसॉर्टमधील बाले पुपुतान या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्यावी.इथे १८ व्या शतकातील संगमरवरी टेबलावर जेवणाचा आनंद घेता येतो.बालीमधले ॲक्टिव्ह वोल्कॅनो,सागर किनारे,हिरवीगार अरण्ये पाहाण्यासाठी प्रायव्हेट हेलिकॉप्टर राइडचा झकास पर्याय उपलब्ध आहे.

थायलंडच्या चिआंग राइमधील सनराइज हॉट एअर बलून राइड,व्हिएतनामच्या फू कोक बेटावरील लक्झुरियस ओव्हर वॉटर व्हिला,फिलिपाइन्समधील प्रायव्हेट यॉट राइड असे अनेक अनुभव तुमचा साऊथ ईस्ट एशियातला हॉलिडे एकदम बहारदार करतील.मदतीसाठी वीणा वर्ल्डची कस्टमाइज्ड हॉलिडे टीम आहेच,मग निवडा तुमचा एक्सपिरिअन्स आणि चला साऊथ ईस्ट एशियाला.

July 06, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top