IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

हनिमून अराउंड द वर्ल्ड

7 mins. read

हनिमूनला आणि टूरसोबत? हा प्रश्न आता कोणी विचारत नाही कारण वीणा वर्ल्डच्या हनिमून टूर्सची उपयुक्तता आणि रंगत आता सगळ्यांनाच कळली आहे. कालपर्यंत महाबळेश्वरचा विचार करणारे आता शिमला मनाली नाहीतर अंदमानचा प्लॅन करतात, आपल्या जोडीदाराला मोठ्ठ सरप्राईज देण्यासाठी थेट बाली गाठतात किंवा स्वित्झर्लंडला पसंती देताना दिसतात. जग बदललं तर आहेच पण हनिमूनची गोडी गुलाबी आणि खट्याळ मस्ती मात्र वीणा वर्ल्डच्या हनिमून टूर्सवर तितकीच ताजी आहे.

एकदा बादशहाने दरबारात प्रश्न विचारला, वर्षातले ऋतू किती? आता वर्षाचे ऋतू तीन, उन्हाळा- पावसाळा- हिवाळा हे तर साधं उत्तर सगळ्यांनाच माहीत होतं, पण ज्याअर्थी जहाँपनाह प्रश्न विचारतायत त्याअर्थी त्यात काही तरी खोच असणार हे ओळखून सगळे बिरबलाकडे अपेक्षेनं पाहू लागले. तसा बिरबल म्हणाला, जहाँपनाह, या दिल्लीत उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू आपण अनुभवतो पण आपल्या लाडक्या काश्मिरमध्ये पतझड़, सावन, बसंत आणि बहार असे चार ऋतू अनुभवता येतात. पण जर तुम्ही नवविवाहितांना भेटलात तर लक्षात येईल की त्यांचा पाचवा मौसम सुरू असतो आणि हा पाचवा मौसम असतो प्रेमाचा. बिरबलच्या या चातुर्यपूर्ण उत्तरावर बादशहासह सगळे दरबारी खूश झाले. बिरबल बोलला होता ते आजच्या काळालाही लागू होतं बरं, निसर्गातला ऋतू कोणताही असो म्हणजे बाहेर उन्हाची भट्टी पेटलेली असो किंवा धो-धो पावसाच्या धारा कोसळत असोत किंवा गारठ्याने सर्वांची कुल्फी जमलेली असो, नवविवाहितांसाठी मात्र एकच ऋतू असतो आणि तो असतो प्यार का मौसम. ह्या प्यारभर्‍या मौसमाची खरी जादू सुरू होते ती हनिमूनवर. जर लग्न अरेंज्ड मॅरेज असेल तर आधी एकमेकांची पसंती, मग होकार, मग दोन्हीकडच्या वडीलधार्‍यांच्या बैठका, एंगेजमेंट आणि लग्न ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये वधुवरांना एकमेकांशी कधी कधी निवांतपणे बोलायचीही संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांची नजर लागलेली असते हनिमूनवरच. पण अनेकदा ह्या न्यूली मॅरिड कपलला एकट्यानेच शिमला मनाली किंवा उटी कोडाईसारख्या दूरच्या ठिकाणी पाठवायचं म्हटल्यावर घरातल्यांना जरा काळजी वाटते. नवीन ठिकाण, वेगळा प्रदेश, अनोळखी वातावरण आणि हे दोघं ओल्या हळदीचे, काही अडचण आली तर कसं व्हायचं? कसली मदत लागली तर कोण करेल? असे प्रश्न घरच्यांना सतावू लागतात. पण पर्यटनाबाबतचे प्रश्न सोडवणं हे तर आमचं काम आहे ना, त्यामुळे नवविवाहितांच्या हनिमूनबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठीच तर आम्ही हनिमून टूर्स सुरू केल्या. जेव्हा ह्या टूर्स सुरू झाल्या तेव्हा अर्थातच काही भुवया उंचावल्या गेल्या, हनिमून ही काय ग्रुप टूर्सची गोष्ट आहे का? अशी तिरकस विचारणाही झाली. पण झपाट्याने बदलणार्‍या जगात आणि त्याहून झपाट्याने वाढणार्‍या पर्यटन उद्योगात या प्रकारच्या टूर्सची गरज आहे हे आमच्या तेव्हाच लक्षात आलं आणि आज आमचं जजमेंट अचूक ठरल्याचं सिध्द झालंय.

गेल्या पाच वर्षांमध्ये वीणा वर्ल्डच्या हनिमून टूर्सचा आनंद सुमारे तीस हजार हनिमूनर्सनी घेतला. इतक्या मोठ्या प्रमाणावर या टूर्सना प्रतिसाद का मिळतोय? तर वीणा वर्ल्डची हनिमून टूर म्हणजे एकाचवेळी इंडिव्हिज्युल टूरची मज्जा आणि ग्रुप टूरची सिक्युरिटी ह्याचा झकास संगम असतो. बघा ना प्रत्येक हनिमून टूरवर आमचा त्या त्या सेक्टरचा एक्सपर्ट टूर मॅनेजर असतो. या टूर मॅनेजरला त्या सेक्टरची खडानखडा माहिती असते, साहजिकच समजा आयत्यावेळी काही अडचण आली, प्रश्न निर्माण झाला तर त्यातून मार्ग काढायला आमचा टूर मॅनेजर सज्ज असतो आणि त्याच्यासोबत वीणा वर्ल्ड कॉर्पोरेट ऑफिसमधली सहाशे जणांची टीम तुमच्या आणि त्यांच्यामागे सपोर्टसाठी असते.  मुळात आपल्याबरोबर सगळी व्यवस्था म्हणजे सकाळच्या ब्रेकफास्टपासून ते साइटसीईंगपर्यंत सगळं बघायला एक अनुभवी टूर मॅनेजर आहे, ह्यामुळेच ही लवी डवी कपल्स अगदी निर्धास्तपणे हनिमून टूरचा आनंद लुटतात. कल्पना करा की चार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पत्नीबरोबर तुम्ही अंदमान किंवा मॉरिशससारख्या मस्त ठिकाणी आला आहात, सकाळी उठून बीचवर जायच्या तयारीने रूममधून खाली आला आहात आणि तुम्ही बूक केलेली टॅक्सीच येत नाहीये, तुमचा फोनही तो उचलत नाहीये, वाट पाहण्यात तुमचा वेळ वाया जातोय आणि सगळ्या मूडचा विचका होतो तो वेगळाच. पण जेव्हा तुम्ही वीणा वर्ल्डच्या हनिमून टूरवर असता तेव्हा अशा गोष्टींचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट हा सगळा हनिमूनर्सचा ग्रुप असतो त्यामुळे बरोबर सगळेच लव बर्डस् असतात साहजिकच हवाओं में मोहब्बत की खुशबू मिसळलेली असते आणि सारं वातावरण कसं एकदम रोमँटिक असतं. ह्या गुलाबी वातावरणाची गोडी वाढवायची कशी ते आमच्या टूर मॅनेजरना चांगलं माहीत असतं, मग कधी खट्याळ गेम्समधून तर कधी रोमँटिक गाण्यांमधून हनिमूनचा मूड बरकरार ठेवण्याचं काम ते अचूक करतात. मुळात ह्या सगळ्या टूर्सची आखणीच आम्ही अशी केली आहे की या टूर्सना आलेल्या हनिमूनर्सना सर्वांच्याबरोबर डेस्टिनेशनची मजा तर घेता येतेच पण त्याचप्रमाणे आपल्या जोडीदाराबरोबर काही खास, नजाकतभरे क्षण साजरे करता येतात. हनिमूनचे दिवस म्हणजे नवविवाहितांसाठी आयुष्यभर हृदयात जपून ठेवावेत असे दिवस असतात. लग्नानंतर एकमेकांच्या साथीनं आयुष्याची वाट चालायला सुरुवात करताना येणारं मोहक, हवहवंस वाटणारं वळण म्हणजे हनिमूनचे दिवस, त्यामुळे हे दिवस जितके रंगतदार असतील, बहारदार असतील, संस्मरणीय असतील तितकी पुढची वाटचाल अधिक सोपी, सुखद आणि समाधानाची होणार असते, म्हणूनच वीणा वर्ल्डच्या हनिमून टूरवर हा अनुभव प्रत्येक जोडप्याला मिळावा यासाठी कसोशीनं प्रयत्न केले जातात.

तुम्ही जर वीणा वर्ल्डच्या वेबसाईटवर गेलात तर लक्षात येईल की भारतातल्या केरळ, मनालीपासून ते साउथ ईस्ट एशियातील थायलंड आणि युरोप मधील स्वित्झर्लंडपर्यंत हनिमून टूर्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वीणा वर्ल्डच्या सर्वांसाठी पर्यटन आणि अफोर्डेबल टूर्स ह्या मंत्रांनी आता जग अनेकांच्या नव्हे तर सर्वांच्या आवाक्यात आलं आहे. धरतीवरील स्वर्ग मानल्या जाणार्‍या स्वित्झर्लंडमध्ये हनिमून हे अनेकांच्या मनात जपलेलं स्वप्न पूर्ण करणारी वीणा वर्ल्डची सात दिवस सहा रात्रींची बहारदार हनिमून टूर आहे. यश चोप्रांच्या चित्रपटात पाहिलेली, पिक्चर पोस्ट कार्ड शोभावीत अशी लोकेशन्स स्वतः आपल्या जोडीदारासोबत बघण्याची संधी आणि आल्प्सच्या जगप्रसिध्द हिमशिखरांवर बर्फात खेळण्याचा अनुभव देणारी ही टूर म्हणजे तुमच्या सहजीवनाच्या वाटचालीचा शुभारंभ करायला एकदम आदर्श हनिमून टूर आहे. रोटेअर टिटलीसमधून केलेली माउंट टिटलीसवरची चढाई, र्‍हाइन फॉलजवळ नेणारी बोट राईड, एंगेलबर्गच्या चीज फॅक्टरीला दिलेली चवदार भेट, टॉप ऑफ द युरोप म्हणून ओळखल्या जाणार्‍या युंगफ्राउवर बर्फात केलेली मस्ती मज्जा, स्विस लोकसंगीताचा आनंद लुटत केलेली ल्युसर्न डिनर क्रुझ अशा अनुभवांमुळे तुमचा स्विस हनिमून अगदी ड्रीम एक्सपीरियन्स होऊन जातो. परदेशात हनिमून एन्जॉय करण्याची इच्छा असलेल्यांसाठी वीणा वर्ल्डकडे मॉरिशस, सिंगापूर बाली, थायलंड, बँकॉक पट्टाया फुकेत क्राबी, बाली असे एकापेक्षा एक मोहात पाडणारे पर्याय आहेत.

भारतातल्या एकसे एक डेस्टिनेशन्समध्ये हनिमून स्पेशलच्या टूर्स शिमला मनाली, केरळ, अंदमान, उटी म्हैसूर कूर्ग ह्या डेस्टिनेशन्ससाठी आहेत. यातील शिमला मनालीसाठी पुणे ते पुणेचा पर्यायही आहे. कँडल लाइट डिनर, डि जे नाइट, साँग डेडिकेशन, पेपर डान्स आदींसारखे खट्याळ गेम्स, बाजीराव काशीबाई स्टाईलने उखाणे घेण्याचा कार्यक्रम यामुळे या हनिमून टूर्सची गोडी अधिकच गुलाबी होऊन जाते. मग मनालीच्या स्नो पॉइंटवर बर्फात खेळायचंय का मॉरिशसला जोडीनं पॅरासेलिंग करायचंय, बँकॉकच्या चाओ फ्राया रिव्हर क्रुझवर एक शाम सुरीली करायची आहे का क्राबीच्या आयलंड टूरची मजा लुटायची आहे हे तुम्ही ठरवायचं आणि बाकी सगळं आमच्यावर सोपवायचं.

अनेकदा आपल्या नात्यातल्या, घनिष्ट संबंधातल्या न्यूली मॅरिड कपलला भेट काय द्यायची असा प्रश्न पडतो, त्यांना तुम्ही वीणा वर्ल्डची हनिमून टूर गिफ्ट देऊ शकता. तर ज्यांना टेलरमेड, जरा लक्झुरियस हनिमून करायचा आहे त्यांच्यासाठी वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेजकडे मालदिव्हज्पासून ते ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडपर्यंत अनेक पर्याय आहेत. मग तुमच्या आयुष्यातला प्रेमाचा पाचवा मौसम सेलिब्रेट करण्यासाठी चला वीणा वर्ल्डच्या हनिमून टूरला आणि करा सुरुवात एका सुंदर आणि रोमँटिक सहजीवनाची, वीणा वर्ल्डसोबत!

February 10, 2019

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top