माहोल ‘थ्रेट’कडून अपॉर्च्युनिटीकडे वळत होता ही महत्त्वाची गोष्ट होती. एखाद्या समजूतीतून किंवा थोड्याशा निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हमधून बाहेर येऊन नव्याने नवं काही स्विकारण्यासाठी मानसिकता तयार होणं, खासकरून समूहाची, हे महत्त्वाचं असतं आणि ती वातावरणनिर्मिती होताना दिसत होती. आता मला उत्तर देण्याची वेळ आली होती.
कोणताही व्यवसाय करताना कितीही गोष्टी आपल्या साथीला असल्या तरी एक भीती प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यावसायिकाच्या मनात असते ती म्हणजे स्पर्धा. भारत उभरतोय, लोकसंख्येचा उच्चांक हा खरंतर काळजीचा विषय होता काही वर्षांपूर्वी, तो वरदान ठरला आणि भारतातल्याच नव्हे तर जगातल्या उद्योजकांना भारत एक ‘गोल्डमाईन’ म्हणून मिळाली. भारत बनलाय ‘द बिग्गेस्ट मार्केट प्लेस ऑन अर्थ!’ नॅचरली डीप पॉकेट्स असलेले, प्रचंड अर्थिक क्षमतेचे, प्रॉडक्ट-स्ट्रॅटेजी-इन्होव्हेशनमध्ये सर्वात वरचढ असलेले जगभरातले उद्योजक भारतात आपलं जाळं पसरवताहेत. ह्यामुळे आपल्याकडच्या पारंपरिक उद्योगांना झळ पोहोचतेय, त्याच्या अनेक कहाण्या रोज आपल्यापुढे आदळत असतात आणि त्यामुळेे कधीतरी आपलाही आत्मविश्वास डळमळतो. आमचं पर्यटनक्षेत्रही ह्याला अपवाद नाही. पण तरीही ‘चलो बनाए भारत की सबसे बडी ट्रॅव्हल कंपनी!’ हे स्वप्न उराशी बाळगून, त्याचं कधीही विस्मरण होऊ न देता आत्मविश्वासाने आम्ही मार्गक्रमणा करतोय. कधीकधी मलाही वाटतं की एवढं मोठं स्वप्न उराशी बाळगणं हा कल्पनाविलास तर नाही नं? आणि त्यावर सिरियसली विचार केल्यावर पटतं की निश्चितच हा कल्पनाविलास नाही. आम्ही सर्व मिळून हे करू शकतो. कुणीतरी भारतीय किंवा परदेशस्थ उद्योजक हे करणारच आहे, मग आपण का नाही? ‘पर्यटनाच्या भाषेत लीझर ट्रॅव्हल किंवा ग्रुप टूर्स मध्ये आपण भारतातली सर्वात मोठी आणि पर्यटकांना आवडणारी एक कंपनी बनायचं’ हे वीणा वर्ल्डमधल्या प्रत्येकाचं लक्ष्य आहे आणि ते गाठण्याचा मानस घेऊनच कामं सुरू आहेत. हे अशक्य नाहीये पण तेवढं सोप्पही नाहीये ह्याची जाणीवही आम्हाला आहे, आणि त्यामुळेच प्रत्येक पाऊल हे वेगळ्या पद्धतीने टाकलं पाहिजे. आपल्या आचार-विचारात, काम करण्याच्या पद्धतीत स्तुत्य बदल करता आले पाहिजेत. बदल स्विकारण्याची मानसिकता संपूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये खेळती राहिली पाहिजे.
नुकतीच पुण्याला वीणा वर्ल्ड प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सची कॉन्फरन्स झाली. संवादाच्या देवाण घेवाणीत एक प्रश्न सारखा डोकं वर काढत होता आणि तो होता कॉम्पीटिशन, स्पर्धा, प्रतियोगिता! त्याला कसं सामोरं जायचं? आज म्हणजे स्वतंत्रपणे पर्यटन करणार्या पर्यटकाला आपण एक कोटेशन दिलं की दुसर्या दिवशी ते ऑनलाईन पोर्टलवर बुकिंग करतात आणि आमची मेहनत वाया जाते. ऑनलाईन बुकिंग हा मोठ्ठा थ्रेट किंवा संकट वाटतंय आम्हाला. काय करू शकतो आपण? त्या मोठ्या बॉलरुममध्ये ऑनलाईन कॉम्पीटिशनची भीती संपूर्ण वातावरणात मिसळलेली दिसली. भीती ही गोष्ट अतिशय वाईट, पुढे ती काही सुचू देत नाही. गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. आपण अवसान गाळून बसतो. लक्ष्याकडे वाटचाल करायची असेल तर ही भीती घालवणं हे माझं काम होतं. पण काहीतरी सांगून ती भीती तशी जाणार नव्हती. जेवढी भीती त्या वातावरणात होती तेवढी ती मला स्वत:ला कधीच जाणवली नाही, किंवा ‘ऑनलाईन बुकिंग पोर्टल’ ही प्रचंड मोठी स्पर्धक आहे आपली असं कधीच का मला जाणवलं नाही? हा विचार त्याक्षणी माझ्या मनात आला आणि त्याचं उत्तर होतं की ‘ऑनलाईन बुकिंग पोर्टल्स’ हा थ्रेट म्हणजे आपल्या यशाच्या मार्गक्रमणातला अडथळा नसून ती एक मोठी अॅपॉर्च्युनिटी-संधी आहे असंच मला सारखं वाटत आलंय, आणि म्हणूनच त्याची काळजी मी कधी केली नाही उलट आय वॉज ऑलवेज ग्रेटफूल टू द ऑनलाईन रीव्हॉल्युशन. पण हे त्या संपूर्ण भीतिच्या वातावरणात पटणार कसं? मी जे बोलायचं ठरवून आले होते त्यापेक्षा ह्या परिक्षेचा पेपर मला वेगळाच आला होता. मुद्दे नाजूक होते, महत्वाचे होते त्यामुळे मी केलेली तयारी बाजूला सारली आणि ठरवलं, चला ह्या भीतिचाच परामर्श घेऊया. खचाखच भरलेल्या सभागृहाला प्रश्न केला की, “तुम्ही ऑनलाईन बुकिंग पोर्टलच्या भीतिच्या सावटाखाली वावरताय, त्याला मोठी कॉम्पीटिशन मानताय, ऑनलाईन इज द बिग्गेस्ट थ्रेट म्हणताय त्याचवेळी मी म्हणतेय की ऑनलाईन इज नॉट अ थ्रेट, इट्स अॅन अपॉर्च्युनिटी, रादर इट्स अ ब्लेसिंग! सांगा कसं काय?” आधी सर्वत्र शांतता. हा थेट विचारांवरच घाला होता. बरं एखादं सुभाषित सांगून गप्प बसण्यासारखी किंवा वेळ निभावण्यासाठी काहीतरी सांगितलं असं करुन चालणार नव्हतं, जर सभागृहातून उत्तर मिळालं नाही तर मला ते संपूर्णपणे समजावून द्यायचं होतं. थोड्या वेळाच्या शांततेनंतर एक एक हात वर यायला लागले. पहिली प्रतिक्रिया, ‘ऑनलाईन बुकिंग म्हणजे मशिनशी केलेला व्यवहार. आपल्या लोकांना तो तेवढा आवडत नाही.’ “ मग मिनिटागणिक ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सचे नंबर्स महाप्रचंड वेगाने वाढताहेत कसे?” दुसरी प्रतिक्रिया, ‘ऑनलाईनमध्ये पर्सनलाईज्ड अटेंशन मिळत नाही.’ “ठीक आहे, गोष्टी जर व्यवस्थित असतील तर पर्सनलाईज्ड अटेंशनची गरजच भासणार नाही.” तिसरी प्रतिक्रिया, ‘ऑनलाईन बुकिंग करून गेल्यावर तिथे काही प्रॉब्लेम आला तर देअर इज नो ह्युमन फेस टू टेक केअर’ “थोडं तथ्य आहे यात पण हा ऑनलाइन कंपन्यांचा प्रॉब्लेम झाला. तुम्ही मला सांगा इथे आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे पण ती मर्यादित स्वरूपात, तरीही अजून प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही.” माहोल ‘थ्रेट’कडून अपॉर्च्युनिटीकडे वळत होता ही महत्त्वाची गोष्ट होती. एखाद्या समजूतीतून किंवा थोड्याशा निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हमधून बाहेर येऊन नव्याने नवं काही स्विकारण्यासाठी मानसिकता तयार होणं खासकरून समूहाची हे महत्त्वाचं असतं आणि ती वातावरणनिर्मिती होताना दिसत होती. आता मला उत्तर देण्याची वेळ आली होती. “आज सकाळपासून आपण अधूनमधून एकमेकांशी संवाद साधत होतो. सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे बिझनेस वाढतोय म्हणून. अनेकांनी येऊन ‘नवीन मोठं ऑफिस घेतलं’ हेही अभिमानाने सांगितलत. पूर्वी आपले पर्यटक दोन तीन वर्षातून एकदा पर्यटनाला निघायचे ते आता वर्षातून तीन तीन वेळा सहलींवर येताहेत ह्या आपल्या पर्यटकांच्या वाढलेल्या प्रेमाबद्दलही तुम्ही आश्चर्य व्यक्त केलंत. नो डाऊट आपण सर्वांनी केलेल्या मेहनतीमुळे, आपल्या टूर मॅनेजर्सनी सहलीवर दिलेल्या सर्व्हिसेसमुळे आपले पर्यटक वाढताहेत. कारण आनंदी आणि समाधानी पर्यटक हीच मोठी जाहीरात आणि तीच मोठी बिझनेस स्टॅ्रटेजी ह्यावर आपण सर्वजण विश्वास ठेवतो. कुठे काही चुकलं तर तेही लागलीच सुधारायचा प्रयत्न करतो. पण हे आपण गेली पस्तीस वर्ष करीतच होतो की. फक्त पाच वर्षांत एवढ्या पर्यटकांना आनंदात सहली घडवल्याने वीणा वर्ल्ड हा एक पर्यटनातला ब्रँड बनला. पण हे कमी वेळात एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटकांची ये-जा होण्याचं कारण फक्त वीणा वर्ल्डची स्ट्रॅटेजी नाही, ते पुरेसं नाही, तर ते आहे ट्रॅव्हलमधलं ‘ऑनलाईन रीव्हॉल्युशन’. ऑनलाईन पोर्टल्सनी पर्यटनाचा माहोल तयार केला. ही प्रचंड मोठी मदत त्यांनी आपल्याला केलीय. पर्यटकांच्या पर्यटनाची फ्रीक्वेन्सी वाढण्याचं मोठं कारण आहे ऑनलाईन, हे कुणा आपल्यासारख्या एकट्या-दुकट्याचं काम नव्हतं. कॅन वुई बी ग्रेटफूल टू ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टल्स? ज्यांची ज्यांची मदत आपल्या सर्वांच्या उद्योगवाढीसाठी होतेय त्या सर्वांना म्हणजे आपल्या पर्यटकांना, आपल्या असोसिएट्सना, एअरलाईन्सना, टूरिझम बोर्डस्ना, कॉन्स्युलेटस्ना, हॉटेलीयर्सना, ट्रान्सपोर्टर्सना, लोकल पार्टनर्सना आणि सर्व वीणा वर्ल्ड टीम ह्यांना आपण मनापासून धन्यवाद देत आलोय. ‘टुगेदर वुई ग्रो’ ह्याने आपली मार्गक्रमणा सुरू आहे. आपल्या अशा अनेक गॅदरिंगमध्ये आपण ह्या सर्वांसाठी टाळ्यांचा कडकडाट केलाय. आज आपण अगदी थोड्या वेळापूर्वी ज्यांना कॉम्पीटिशन मानत होतो, ज्याची भीती बाळगत होतो त्या ‘ऑनलाईन’साठी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देत टाळ्या वाजवू शकतो?” आणि टाळ्यांच्या गजराने हॉल दुमदुमून गेला. “आता यापुढे एकच लक्षात घेऊया की जे जे काही घडतं ते भल्यासाठीच असतं. त्यावेळी कदाचित आपल्याला कळत नाही पण ज्यावेळी मागे वळून पाहतो त्यावेळी आश्चर्यात पडायला होतं. इथेच बघानं आपण उगाचच इतके दिवस भीतिच्या सावटाखाली होतो. ऑनलाइनने आपल्याला मदतच केलीय. पर्यटक ऑनलाइनकडे पण जाणार आहेत आणि आपल्याकडेही येणार आहेत. ही संख्या वाढतच राहणार आहे. आज फक्त एक टक्का भारतीय पर्यटन करताहेत. ही टक्केवारी पाच टक्के झाली तर महापूर कोसळणार आहे पर्यटकांचा. ‘घेशील किती दोन करांनी’ अशी अवस्था येऊ शकतेय त्यासाठी आपल्याला तयार करुया. आणि कॉम्पीटिशन असायलाच हवी, नसेल तर ती स्थिती आणखी वाईट. छोटी स्पर्धा चांगली असते पण अशी आज जी तुम्हाला जाणवतेय तशी सिव्हियर स्पर्धा म्हणजे ब्लेसिंग असतं. आपल्यातलं पोटेन्शियल उभरून येतं त्यामुळे. क्रीएटिविटी, इनोव्हेशन, डीफरन्ससिएशन हे आपोआप जमून जातं, म्हणजे ऑप्शनच राहत नाही हातपाय हलवण्यापासून, आणि त्यामुळेच लाईफ एकदम इंटरेस्टिंग बनून जातं. लेट्स प्रीपेअर अवरसेल्व्हज् फॉर द फ्युचर!”
मार्केटमधली कॉम्पिटिशन जेव्हा आपण ब्लेसिंग म्हणतो त्याला धन्यवाद देतो तेव्हा भीती संपून जाते. चिंता करण्यात जो वेळ जात होता तो वाचतो आणि आपल्याला वेळ मिळतो स्वत:कडे बघायला, आपण काय करतोय त्याचा परामर्श घ्यायला, काल जे काही केलं त्यापेक्षा आज अधिक चांगलं काय करता येईल ह्यावर विचार करायला, भूतकाळातल्या चूका सुधारायला आणि मग खरी कॉम्पीटिशन सुरू होते आपली आपल्या स्वत:शी. तिथे जर आपण सतत आऊट-परफॉर्म करीत राहिलो तर काय बिशाद आहे कुणाची आपल्याला यशाचं शिखर न गाठू देण्याची. मार्केटिंगमध्ये शिकवलं जातं की ‘आपला शत्रू कोण आहे ते जाणून घ्या’. आपला खरा शत्रू आपणच असतो, एकदाका ह्या शत्रूवर विजय मिळवला की मग विनासायास यशाची अनेक शिखरं पादाक्रांत करता येतात. आजचं युग भल्याबूर्याचं आहे. रेस लागलीय बाहेर सगळीकडे, एक देश दुसर्या देशाशी भांडतोय, शेजार-शेजारची राज्य तंटा बखेड्यांमध्ये मग्न आहेत, समाजा-समाजांमध्ये एकमेकांवर कुरघोडी सुरू आहेत, कुटुंबामधली दरी वाढतेय, एवढंच कशाला आपल्या क्षेत्रात पर्यटन संस्थांमध्येही प्राईस-वॉर सुरू आहे. आपण बिग पिक्चर बघतच नाही आहोत. आता अॅक्च्युअली गरज आहे प्रत्येक व्यक्तीने आपली सद्सद्विवेकबुद्धी जागरूक ठेवून थोडं बियाँड बघण्याची, मोठा विचार करण्याची. एकदाका ती सवय झाली की कॉम्पीटिशन इररिलेव्हंट बनून जाते. आजपर्यंतचा इतिहास सांगतोय की ज्यांनी-ज्यांनी कॉम्पीटिशन हे एकच लक्ष्य ठेवलं किंवा कॉम्पीटिशनचा खातमा करायचा प्रयत्न केला त्यांना कळलंही नाही की त्यात ते स्वत:च कसे खलास झाले. तेव्हा लेट्स क्रीएट समथिंग डिफरंटली, फीअरलेसली, डेअरिंगली, अॅन्ड बी द विनर, व्हाइल ब्लेसिंग द कॉम्पीटिशन!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.