प्रत्येक येणारं नवीन किंवा रीनोव्हेट होणारं हॉटेल जेट स्प्रेे ची प्रोव्हिजन का करीत नाही? जेट स्प्रे हे एक स्वच्छ सोल्युशन आहे पण ते मान्य करायला पाश्चिमात्य देश तयार नाहीत. एकीकडे ‘पेपर वाचवा, पर्यावरणाचा समतोल साधा’ हे ओरडत बसायचं आणि अतिशय सोप्पं सोल्युशन उपलब्ध असताना इगो खातर पेपर्सची नासाडी करायची
रोज येणारी पत्र, आत्ताच्या जमान्यात इमेल्स ही रोजच्या रोज वाजून त्याचा फडशा पाडायचा म्हणजे त्या त्या डिपार्टमेंटला पाठवून त्यांच्याकडून त्यावर कार्यवाही झाल्याची शहानिशा करणं हा माझ्या कामांमधला एक भाग. जेव्हा ऑफिसला असते तेव्हा दैनंदिन घडामोडीत इतका वेळ जातो की मग मेल साचायला लागतात आणि मनावर त्याचं दडपण यायला लागतं. अशावेळी मला प्रवास वरदान वाटतो. एअरपोर्टचा वेळ, एखाद्या विमानाला होणारा विलंब, हॉटेलमधला वेळ ही सुवर्णसंधीच जणू. मेलबॉक्स क्लीन आणि क्लीअर झालं की खूप मोकळं वाटतं. अर्थात मी जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधल्या टीमच्या चेहर्यावर अनेक प्रकारचे भाव मला वाचायला मिळतात. ‘आता उद्या मेलचा खच पडणार?’ आमची जीआर टीम, ‘तुम्ही तुमचं मेलबॉक्स क्लीन करता पण आमचं भरतं नं त्याचं काय?’ शिल्पा मोरे आमची जनरल मॅनेजर, ‘नहीं! मै क्या बोलती हू, हमें भी यहाँ काम है। और आप जब बाहर जाते हो तो हम काम करते है।’ अॅनी अलमेडा आमची एचआर मॅनेजर, ‘अमूक अमूक चार प्रोजेक्ट्सवर काम चालू आहे तेव्हा प्लीज प्लीज अजून प्रोजेक्ट पाठवू नका या चार दिवसांसाठी’ भावना सावंत आमची प्रोजेक्ट मॅनेजर, ‘बिनधास्त जा, आम्हीच तुम्हाला कामं पाठवतो, वेळच्या वेळी डीसिजन्स द्या.’ प्रणोती जोशी मार्केटिंग मॅनेजर. माझ्यासमोर हे अशी माझी खेचत असतील किंवा टोले हाणत असतील तर मी नसताना किती जोक्स करीत असतील. काही हरकत नाही त्यांच्या हसण्याचं कारण जर मी देत असेन तर त्यात आनंद आहे. कामं खेळीमेळीच्या वातावरणात होणं महत्वाचं. असो, तर अशी ही साचलेली सगळी मेल्स मी माझ्या त्या आठवड्यातल्या मुंबई-बँकॉक-कौलालंपूर-लंगकावी प्रवासात क्लीअर केली. त्यातील एका पत्राने लक्ष वेधलं, वीणा वर्ल्डमध्ये नव्याने दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या फक्त एक लाख पंचाहत्तर हजारात असलेल्या नऊ दिवसांच्या सिडनी मेलबर्न गोल्ड कोस्ट केर्न्स ग्रेट बॅरियर रीफ ह्या एकदम हॅपनिंग सहलीला ते जाऊन आले होते. सगळं काही मस्त मस्त होतं, टूर मॅनेजरने उत्तम काम केलं हे सांगताना त्यांनी एक सूचना केली होती. त्यांचं म्हणणं होतं की, ‘सहलीमध्ये एकंदरित चार हॉटेल्स होती त्यापैकी दोन हॉटेल्सच्या टॉयलेट्समध्ये जेट स्प्रे होता आणि दोन हॉटेल्समध्ये नव्हता, आणि हे जर तुम्ही आधी सांगितलं असतं तर इथून एखादा मग आम्ही सोबत घेऊन गेलो असतो’. खरंतर ही गोष्ट जाहीर चर्चा करण्यासारखी नाहीये पण अगदी महत्वाची आहे. हल्ली सर्वांचंच प्रवासाचं आणि पर्यटनाचं प्रमाण वाढलंय. ह्या साध्या साध्या गोष्टी सहलीचा मूड बदलू शकतात. गेली तेहेतीस वर्ष अखंड प्रवास सुरू आहे पण एक गोष्ट माझ्या पल्ले पडली नाही आणि ती म्हणजे प्रत्येक येणारं नवीन किंवा रीनोव्हेट होणारं हॉटेल जेट स्प्रेे ची प्रोव्हिजन का करीत नाही? जेट स्प्रे हे एक स्वच्छ सोल्युशन आहे पण ते मान्य करायला पाश्चिमात्य देश तयार नाहीत. एकीकडे ‘पेपर वाचवा, पर्यावरणाचा समतोल साधा’ हे ओरडत बसायचं आणि अतिशय सोप्पं सोल्युशन उपलब्ध असताना इगो खातर पेपर्सची नासाडी करायची. आता इगो कुठे आहे तर तो आहे पाश्चिमात्य आणि पौर्वात्य विचारसरणीत. जिथे जिथे हिंदू किंवा मुसलमान लोकांचं प्राबल्य आहे त्या त्या ठिकाणी म्हणजे त्या देशात बहुतेक सर्व हॉटेल्समध्ये तुम्हाला हे जेट स्प्रे प्रकरण दिसेल. पण युरोप अमेरिकेत किंवा इंग्रजांनीच वसविलेल्या ऑस्टे्रलियामध्ये जेट स्प्रे म्हणजे नो नो! भारतासारख्या देशाकडून किंवा मुस्लिम देशांकडून ही पध्दत स्विकारायला त्यांना कमीपणा वाटत असणार, हमखास. आम्ही श्रेष्ठ आणि आमच्या सगळ्या पध्दतीही श्रेष्ठ आणि तेच उत्कृष्ट, आम्ही बदलणार नाही ह्या आडमुठेपणामुळे अॅक्च्युअली जगात पेपरची नासाडी होतेय आणि पर्यावरणाचा तोल ढासळण्याचं अंशतः काम त्यातून होतंय. इगो कसा हार्मफूल ह्याचं उत्कृष्ट उदाहरणच नाही का हा जेट स्प्रे इश्यू म्हणजे. हल्ली बहुतेक चांगल्या मिडल ईस्ट एअरलाईनच्या बिझनेस क्लास टॉयलेट्समध्ये जेट स्प्रे नाही पण वेट टिश्यूज ठेवलेले असतात. जेट स्प्रे विमानात आणू शकत नाहीत ह्या अडचणींवर ह्या मुस्लिम देशांतील एअरलाईन्सनी काढलेली ही उपाय योजना. पर्यटक वाढलेत पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर अगदी अंटार्क्टिकापासून अलास्कापर्यत त्यांचा प्रवास सुरू आहे. जेट स्प्रे किंवा विदाऊट जेट स्प्रे अशी टॉयलेट्स आपल्या वाट्याला येणार आहेत त्यासाठी पूर्वतयारी आवश्यक आहे, मग ती ‘मग’ म्हणजे तांब्याच्या स्वरूपात असो किंवा ‘वेट टिश्यू’ च्या, बी प्रिपेअर्ड! सकाळी सकाळी मूड जायला नको. आणि हो हे सगळं लिहायला एका सूचनेद्वारे उद्युक्त केल्याबद्दल मी आमचे पर्यटक मुलुंडचे श्री. विजय जोशी ह्यांचे आभार मानते.
एअरपोर्ट टॉयलेट्स, इनफ्लाइट टॉयलेट्स आणि स्थलदर्शनाला ठिकठिकाणी वापराव्या लागणार्या टॉयलेट्स हे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याकडे बाय अँड लार्ज आता सर्व एअरपोर्टस्ना टॉयलेट्स चांगल्या प्रकारची झालीयत. मेट्रो सीटीज म्हणजे मुंबई-दिल्ली-बंगळुरु-चेन्नई इथे एकदम चकाचक. एकच गोष्ट खटकते ती म्हणजे ह्या टॉयलेट्स परिपूर्ण आहेत सुविधांच्या दृष्टीने पण तिथे असणार्या ज्या अटेंडंट महिला असतात त्यांना एक चुकीची गोष्ट शिकवलीय, ‘अतिथी देवो भवः’ चा पगडा असेल, तुमच्याही हे लक्षात आलं असेल कदाचित. वॉश बेसिनवर हात धुतल्यानंतर त्या आपल्याला टिश्यू पेपर्स द्यायला पुढे येतात. हायजिनिकली चुकीचं आहे हे. मी तिथेच त्यांना सांगायचा प्रयत्न करते पण ट्रेनिंगचा मारा असणार. टॉयलेट्स क्लीन ठेवणं हा त्यांचा जॉब आहे आणि आपल्या घरातली टॉयलेट्स आपण जशी क्लीन ठेवतो तेवढ्याच आत्मियतेने त्या ते काम करीत असतात त्यांच्यामुळे पूर्वी जसं ‘टॉयलेट साफ असेल का?’ असा पोटात गोळा यायचा तो आता येत नाही, म्हणजे ‘वुई आर प्राऊड ऑफ अवर एअरपोटर्स टॉयलेट्स’ असं म्हणावसं वाटतंय. पण ज्या हाताने, ज्या डस्टरने त्या कमोड सीट पुसतात त्याच हाताने तो पेपरटिश्यू काढून द्यायचा हे चूक आहे. आणि गरजच नाहीये त्याची. बरं हे एकाच मुंबई एअरपोर्टच्या टॉयलेटमध्येच नाही तर दिल्ली, बंगळुरु इथेही मी खास निरीक्षण केलं तर प्रकार तोच. म्हणजेच हा मध्यवर्ती शिकवणूकीचा ‘अतिथी देवो भवः’ च्या एक्सेस डोसचा मामला आहे जो सुधारला पाहिजे. अदरवाईज एव्हरीथिंग इज रिअली गूड!
इनफ्लाईट टॉयलेट्स हा वेगळा महत्वाचा आणि मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझिंगचा मामला आहे. शंभर दीडशे प्रवाशांसाठी चार वा सहा टॉयलेट्स तसंच जागेच्या लिमिटेशनमुळे टॉयलेटमध्ये जेमतेम उभं राहू एवढी जागा. जरा आपण सुदृढ बालक प्रकारात असलो तर आणखी अडचण. त्यामुळे प्रवासात कपडे सुटसूटीत असावे. अवघडणारे कपडे नको हे म्हणण्यामागे टॉयलेटमध्ये वावरायला इझी जावं हे ही कारण आहे. जे सतत प्रवास करतात ते टॉयलेट कधी वापरायची ह्यासाठी एक्सपर्ट झालेले असतात. जनरली जेवल्यावर सकाळी उठल्यानंतर किंवा फ्लाइटमधून उतरण्यापूर्वी टॉयलेट बाहेर गर्दी असते हे त्यांना माहीत असतं त्यामुळे ते त्यांच्या वेळा अॅडजस्ट करतात आणि प्रवास सुखावह करतात. सकाळी इतरांपेक्षा थोडं लवकर उठलं तर गर्दीपासून आपण आपला बचाव करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जशी स्वच्छ टॉयलेट लागते तशी आपल्या नंतरच्या प्रवाशालाही ह्याचा विचार करून टॉयलेटबाहेर पडण्यापूर्वी मागे वळून बघावं की आपण स्वच्छ स्वरूपात दुसर्यांसाठी स्वच्छ टॉयलेट सोडतोय नं. ‘येस् इट्स मस्ट’ आपली विमानातली सोशल रीस्पॉन्सिबिलिटी आहे ती. आता टॉयलेटपुराण थांबवते. पुढच्या वेळी स्थलदर्शन हा विषय जरा खोलात जाऊन बघूया. ‘लेट्स मेक लाईफ मोअर सिम्प्लिफाईड’.
Dear Ms Veena Patil... You have handled a very sensitive and delicate issue with such a great ease and elegance that I was glued to the article till end. Opening para though seemed a bit off tracked.