सेलिब्रेशन ऑफ डेज् कुणाला फॅड वाटतं, कुणाला हाईप वाटते, कुणाला खूळ तर कुणाला मार्केटिंग स्ट्रॅटेजी. काही का असेना त्याची एक सकारात्मक बाजू मला दिसते ती म्हणजे, सध्याच्या अतिगतिमान बीझी-बी युगात आठवण तर होते, आठवणी जाग्या होतात, मनोमन वा प्रत्यक्ष त्याप्रती कृतज्ञता तर व्यक्त करता येते. अदरवाईज त्याला तरी कुठे वेळ आहे सतत घाण्याला जुंपलेल्या आपल्या आयुष्यात. म्हणूनच आम्ही व्हलेंटाईन्स डे साजरा करायचं ठरवलं...
आता तसं बघायला गेलो तर आपण बर्यापैकी स्थिरावलो सेलिब्रेशन ऑफ डेज ह्या पाश्चिमात्य संकल्पनेला. पूर्वी मदर्स डे-फादर्स डे ही तर थेरं वाटायची. असा काय एकच दिवस असतो का, आम्हाला रोजच आमचे आईवडील आठवतात, हे बरं म्हणजे एक दिवस आठवायचं आणि बाकी सगळे दिवस विसरायचं, अरे ह्या सगळ्याची काय गरज आहे, असं केल्याने प्रेम वाढणारेय का न केल्याने घटणार आहे? असे सुसंवाद ठरलेले. जमाना बदलत होता आणि बदलत्या जमान्याच्या नवनवीन संकल्पनांना आपण सरावत होतो, अॅक्च्युअली आपल्यालाही ते आवडायला लागलं होतं. वुमन्स डे सारखा दिवस एका वर्षात येणारा दुसरा बर्थ डे वाटायला लागला मला. पहिला बर्थ डे माझा स्वतःचा तर दुसरा आमच्यासारख्या सगळ्यांचा कॉमन. दोन वेळा स्वतःचे मस्त लाड करुन घ्यायला कुणाला आवडणार नाही? बघानं वुमन्स डे जवळ आला की विचारणा सुरू होते ह्यावर्षी काय करायचं आपण ह्यासाठी. तसाच आता आणखी एक दिवस राऊंड द कॉर्नर आहे तो म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे! प्रेमिकांचा दिवस, मित्र-मैत्रिणींचा दिवस. ह्या दिवसाला आपल्याकडे स्थिरावायला मात्र थोडी अग्निपरिक्षा द्यावी लागली होती, अर्थात आता व्हॅलेंटाईन्स डे-व्हॅलेंटाईन्स वीक-व्हॅलेंटाईन्स मन्थ ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वातावरणात मिसळून गेल्या, मॉल संस्कृतीने त्याला गोंजारलं आणि व्हॅलेंटाईन्स डेसाठी मोठ्ठं मार्केट आपल्या भारतात तयार झालं. प्रेमिकांचा मामला असल्यामुळे, आमचं आणि प्रेमिकांचं घट्ट नातं असल्याने आम्ही तरी त्यापासून कसे दूर राहणार? आमच्याकडेही त्यामुळे सुरू झाला व्हॅलेंटाईन मन्थ, खास हनिमूनर्ससाठी.
व्हॅलेंटाईन डे हा जरी सर्वांसाठी असला तरी आम्ही मात्र आमच्याकडे तो हनिमूनर्सशी जोडलाय. पूर्वी हनिमून ही संकल्पनाही कुठे एकदम पटकन स्विकारली गेली होती. ब्रायडल टूरच्या नावाने ही प्रथा ब्रिटनमध्ये सुरू झाली. लग्नानंतर नवरा नवरी लग्नाला येऊ न शकलेल्या महत्त्वाच्या नातेवाईकांना दूरच्या गावी भेटायला जाण्याची पद्धत हनिमूनमध्ये मिसळून गेली. आता तर प्री-वेडिंग शूटचा जमाना आलाय. वेगवान जागतिकीकरणात काळानुरुप होणारे बदल स्विकारायची समाजाची मानसिकताही आता सबरीची बनली. सुपरफास्ट झालीय. डेस्टिनेशन वेडिंगमध्ये आम्हीही प्री-वेडिंंग शूट हा सध्याचा इन प्रकार समाविष्ट केलाय.
तुमचा विश्वास बसणार नाही पण जेव्हा मी हनिमून टूर्स हा प्रकार सुरू केला तेव्हा आणि आजही काही प्रमाणात प्रश्न विचारला जातो किंवा भुवया वर जातात, हनिमूनला आणि ग्रुप टूरसोबत? कमॉन! व्हॉट कनेक्शन? इट्स सपोज टू बी अ प्रायव्हेट अफेअर अर्थातच! इट इज अ प्रायव्हेट अफेअर. नो डाऊट. आम्ही वीणा वर्ल्डच्या कस्टमाईज्ड हॉलिडे डिव्हिजनमधून स्पेशली मेड प्रायव्हेट हनिमून हॉलिडे पॅकेजेस भारतात किंवा जगाच्या कानाकोपर्यात कुठेही आयोजित करुन देतो. असेही काही हनिमूनर्स आहेत ज्यांनी स्वित्झर्लंडचं पंधरा दिवसांचं पॅकेज बनवून घेतलंय किंवा न्यूझीलंडची पंचवीस दिवसांची हनिमून टूर करवून घेतलीय. व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा प्रवृत्ती, नवविवाहीतांकडे काल काय आणि आज काय बजेट हा प्रश्न असायचाच त्यात हल्लीतर सुट्टी मिळण्याचीही वानवा. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे नवरा-नवरीच्या घरच्या मंडळींचा.दोघंच जाणार, एकटेच जाणार, सगळं काही नीट होईल नं ही काळजी लागलेली. व्हॉटस फॉर मी ह्या मनःस्थितीला ह्या निरीक्षणात नवसंकल्पना दिसली ती हनिमून टूर्सची आणि पंचवीस वर्षांपूर्वी हनिमून टूर्स सुरू केल्या. पहिल्या सहलीची किंमत होती प्रति हनिमूनर फक्त सहा हजार रुपये, ज्यामध्ये होती शिमला मनालीची सर्व समाविष्ट सहल, ट्रेनच्या तिकिटासह. आज हीच सहल चाळीस हजार रूपयाला पोहोचलीय, अर्थात ह्यामध्ये विमानप्रवास आहे ही गोष्ट वेगळी. पण पंचवीस वर्षात सहा ते सातपट किमती वाढल्या ही वस्तुस्थिती आहे. आज एका दिवसाच्या सहलीलाच पाच ते सहा हजार रुपये लागतात. आपण नुसते हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरी किमान पाचशे आणि कमाल पाच हजारपर्यंतचा खर्च येतो. एव्हरीथिंग हॅज चेंज्ड. एक गोष्ट मात्र कायम राहिली ती म्हणजे हनिमून टूर्स. त्या अनेक वर्षे अव्याहतपणे सुरू आहेत. त्याची लोकप्रियता वाढते आहे. त्याचं कारण हे ही असावं की समूहात किंवा मित्रमंडळींमध्ये रमणार्या मनुष्य स्वभावाला मग ते हनिमूनर्स का असेनात त्यांच्यासारखेच समवयीन हनिमूनर्स सोबतीला मिळाले तर गप्पा गाणी डान्स धमालीला आणखी उत येईल नाही का. हेही कारण आहे हनिमून टूर्सच्या लोकप्रियतेचं.
वीणा वर्ल्डची हनिमून टूर म्हणजे त्यासोबत आला टूर मॅनेजर. संपूर्ण सहलीची जबाबदारी त्याची. हनिमूनर्सच्या डोक्याला ताप नाही. एअर तिकीटाचं रीकन्फर्मेशन, हॉटेल बुकिंग, बूक केलेली कार येणार की नाही? जेवायला कुठे जायचं? मनालीचा रोहटांग पास असो किंवा थायलंडचं कोरल आयलंड किंवा स्वित्झर्लंडच माऊंट टिटलीस, तिथे पोहोचायचं कसं, गेल्यावर काय काय करायचं ह्या सगळ्याचं काम हे वीणा वर्ल्डच्या टूर मॅनेजरचं. त्यामुळे हनिमूनर्सनी फक्त छान छान नटायचं, भरपूर फोटोज काढायचे, चिंताविरहीत धम्माल करायची. आता मला सांगा, बुकिंग कन्फर्मेशन्स, जेवण ही कामं हनिमूनर्समधल्या एकाने करायला तो किंवा ती काय टूर मॅनेजर आहे का? हे आमचं काम. ते आमच्यावरच सोपवायचं.
हनिमूनर्सचा आणि प्रेमिकांचा महत्त्वाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे, त्यासाठी काय करायचं हा प्रश्न आमच्या प्रोडक्ट स्ट्रॅटेजी मीटमध्ये जेव्हा चर्चिला गेला तेव्हा एकमताने शिमला मनाली ह्या निसर्गसुंदर सहलीला आमचीही जास्त मतं पडली. आत्तापर्यंत जास्तीत जास्त हनिमूनर्स कुठे जात असतील तर ते शिमला मनालीला. कारण मनाली आहेच इतकं सुंदर. आतातर मनालीचं स्वित्झर्लंड झालंय. जिथे बघावं तिथे सर्वत्र पांढर्या-शुभ्र बर्फाची दुलई ओढलेली. स्नो व्हाईट म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला इथे कळेल. आता ह्या व्हॅलेंटाईन मन्थमध्ये अनेक हनिमूनर्स वीणा वर्ल्डच्या हनिमून टूर्ससोबत शिमला मनालीला पोहोचलेत. धम्माल करताहेत त्यांच्या फेसबूक पोस्ट आणि इन्स्टाग्राम पोस्ट-स्टोरीज सध्या मनालीमय-बर्फमय झाल्यात. सर्वांना आवडणारी ही सहल आम्ही ह्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये डिस्काउंटेड प्राईसमध्ये द्यायचं ठरवलंय.
मुंबई-दिल्ली-मुंबई असा विमान प्रवास, दिल्ली- शिमला-मनाली-चंदिगड-दिल्ली हा लक्झरी बसप्रवास, आत्तापर्यंतच्या हनिमूनर्सना आवडलेली हॉटेल्स, रिव्हर राफ्टिंग, हिडिंबा टेंपल ट्रेक, सोलांग व्हॅली, रोहटांग रोड, स्नो पॉईंट-स्नो स्लायडिंग, शिमला मॉल रोड, लिजर वॉक, चंदिगड रॉक गार्डन, रोझ गार्डन आणि रोमँटिक पिंजौर गार्डन असं सगळं दे धम्माल स्थलदर्शन, रोज ब्रेकफास्ट-लंच-डिनर, काही वेळा लोकल डिशेसचा तडका आणि दिमतीला वीणा वर्ल्डचा मोस्ट एक्सपीरियन्स टूर मॅनेजर. आयोजनाची सर्व जबाबदारी त्याची आणि त्याच्या सपोर्टसाठी आमच्या बॅक ऑफिसला असलेल्या पाचशे वीणा वर्ल्ड टीम मेंबर्सची.ते अहोरात्र कनेक्टेड असतात एकमेकांशी, त्यामुळे ना हनिमूनर्सना चिंता ना त्यांच्या घरच्यांना. एन्टायर वीणा वर्ल्ड इज अॅट देअर सर्व्हिस! आहे की नाही वीणा वर्ल्डची हनिमून टूर एकदम झक्कास. आता व्हॅलेंटाईन महिन्यात हनिमूनर्स ऑफर सुरू आहे. ज्यामध्ये शिमला मनालीची ही सहल तीस हजारांपेक्षा कमी किमतीत आहे. त्याचा लाभ घ्या आणि निघा हनिमूनला वीणा वर्ल्डसोबत.हनिमून झालाच पाहिजे, वीणा वर्ल्ड आहे त्यासाठी. झोकात होऊ द्या, तुमच्या सहजीवनाची सुंदर सुरुवात.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.