सहलीत परिपूर्ण स्थलदर्शन असावं, जे जे महत्वाचं आहे ते सर्व समाविष्ट असावं, सहलीवरून परत आल्यावर कुणी असं म्हणू नये की, ‘काय म्हणताय? तिथे जाऊन तुम्ही हे पाहिलं नाहीत?’ थोडक्यात पर्यटकांनी भरलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला द्यायचा ही वीणा वर्ल्डची पध्दत आणि ती कंटिन्यू राहणार, कारण आमच्या पर्यटकांना ती आवडते. पण...
‘सहा सात आठ’ किंवा ‘सात आठ नऊ’ किंवा ‘आठ नऊ दहा’ हे आहेत मॅजिक नंबर्स. हे वाचताच आमच्या अनेक पर्यटकांना आज त्यांची टूर आठवली असेल आणि सहलीच्या गमती जमती समोर उभ्या राहिल्या असतील. पर्यटकांच्या अनेक इमेल्समध्ये, ‘सहलीवरून परत आल्यावर दुसर्या दिवशी आम्हाला आमच्या टूर मॅनेजरची खूप आठवण आली, मॅजिक नंबर्स आम्ही मिस करतोय, वुई आर मिसिंग अवर टूर फॅमिली’ असा उल्लेख असतोच असतो. तर हे मॅजिक नंबर्स म्हणजे आपली सहल यशस्वीरित्या पार पाडणारे महत्वाचे घटक आहेत. ह्या मॅजिक नंबर्सवर सहलीतल्या प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला जातो. ‘सहा सात आठ’ ह्या मॅजिक नंबर्सचा अर्थ आहे ‘सकाळी सहा वाजता उठायचं, सात वाजता ब्रेकफास्टला यायचं आणि आठ वाजता स्थलदर्शनार्थ प्रस्थान करायचं’. त्या दिवसात काय काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यावर सात आठ नऊ, आठ नऊ दहा हे मॅजिक नंबर्स अवलंबून असतात. म्हणजे आठ नऊ दहा ही गोष्ट सहलीवर तशी खूपच कमी वेळा अनुभवायला मिळते. सहल म्हटली की ती जनरली सहा सात आठ किंवा सात आठ नऊ चा घोषा लावणारीच असते. कारणं अनेक आहेत, आता वीणा वर्ल्डचा विचार केला तर माझी स्वत:ची इच्छा अशी असते की पर्यटक जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांनी जास्तीत जास्त बघावं. परत आल्यावर कुणी त्यांना, ‘अरे, तुम्ही हे पाहिलंच नाही?’ असं विचारायला नको. जग इतकं मोठ्ठं आहे, आपला भारत इतका बघण्यासारखा आहे अशावेळी खरंतर एक आयुष्य अपुरं आहे सगळं काही पादाक्रांत करायला, त्यात अनेक नवनवीन देशांची-स्थळांची-एक्सपीरियन्सेसची भर पडतेच दरवर्षी, त्यामुळे पर्यटक एकाच ठिकाणी पुन्हा जायची किंवा तशी जाणार्यांची संख्या कमी आहे. आतातर पर्यटकांमध्ये रेस लागलीय ‘तुझे किती देश बघून झाले आणि माझे किती?’ आत्ता मागच्याच महिन्यात आमच्या एका पर्यटकांनी श्री अमृसकरांनी वीणा वर्ल्डसोबत पाच वर्षात पन्नास देशांच्या आणि आपल्या भारतातल्या पंचवीस राज्यांच्या सहली पूर्ण केल्या, आणि अंटार्क्टिकाही केल्यामुळे त्यांचे सात खंडही बघून झाले. आमच्या टूर मॅनेजरर्समध्ये पंचवीसएक टूर मॅनेजर्सचे पन्नास देश बघून झालेयत. आणि ह्या टूर मॅनेजर्सचा मॅनेजर विवेक कोचरेकरचे मला वाटतं अठ्ठ्याहत्तर देश आणि अर्थातच सातही खंड पूर्ण झालेयत. आता अकरा ऑगस्टला आईसलँडला जिंकायला विवेक निघालाय आमच्या पर्यटकांना घेऊन. त्यामुळे त्याच्या आणि आमच्या पर्यटकांच्या आकडेवारीत ह्या नव्या देशाची भर पडणार आहे. सांगायचा मुद्दा असा की आपल्या भारतातली अनेक राज्यं आणि भूतलावरचे इतके देश बघायचे असल्याने पर्यटक सर्वसाधारणपणे एका देशात किंवा एका शहरात एकदाच जाणार आहेत. अशावेळी त्यांना जास्तीत जास्त गोष्टी दाखवणं एक पर्यटनसंस्था म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच वीणा वर्ल्डच्या सहली स्थलदर्शनाने खचाखच भरलेल्या असतात. आमचे टूर मॅनेजर्स विनोदाने म्हणतातही की, अरे किती हा दाखवायचा हव्यास! आपल्या सहली म्हणजे ‘जागते रहो, भागते रहो’. त्यांना माझं उत्तर असतं, ‘आता प्रत्येक देशाचे परिवहन-नियम आलेयत तुमच्या मदतीला’. युरोप अमेरिका आणि बहुतेक सर्वच ठिकाणी ड्रायव्हिंग अवर्स हे बारा तासांवर रीस्ट्रिक्ट केलेयत. त्यापुढे ड्रायव्हर गाडी चालवू शकत नाही, कारण ड्रायव्हरला किमान आठ तासांची झोप मिळालीच पाहिजे. त्यामुळे जेवढं त्या बारा तासांत फिट होईल तेवढं स्थलदर्शन प्रत्येक सहलीत समाविष्ट असतं. सर्वांना जमणार नाहीत अशा काही अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीज् सोडल्या तर सगळं काही आपल्या सहलीत समाविष्ट असणार. तो हव्यास सुटणार नाही कारण पर्यटकांचे कष्टाचे पैसे आहेत आणि आपल्याला त्यांनी भरलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला द्यायचा आहे, दिलाच पाहिजे. पण एकंदरीतच पर्यटकांची वाढती संख्या हेच दर्शविते की जास्तीत जास्त स्थलदर्शनाच्या, ब्रेकफस्ट लंच डिनर असलेल्या, एअरफेअर, कोचेस, हॉटेलवास्तव्य असलेल्या कोणत्याही ऑप्शनल गोष्टी आणि हिडन कॉस्ट नसलेल्या सर्वसमाविष्ट सहलीच पर्यटकांना भावतात. आपण तेच देत आलोय आणि देत राहिलं पाहिजे.
जग बदलतंय, सवयी बदलताहेत, नव्या आवडीनिवडी आणि सुखसुविधा निर्माण होताहेत. बारा वर्षांपुर्वी गरज जाणवली महिलांच्या किंवा सीनियर्सच्या सहलींची. त्या सुरू केल्या ज्या अगदी अव्याहतपणे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, जगभर आणि भारतभर. त्याआधी हनिमून टूर्स ही संकल्पना आणली तीही नवविवाहीतांनी आजतागायत सुरू ठेवलीय आणि गौरवलीय. चार वर्षांपूर्वी यंगस्टर्सची म्हणजे वीस ते पस्तीस वयोगटाची मागणी आली सिंगल्स स्पेशल टूर्सची जी मार्गस्थ झालीय. ही सिंगल्स मंडळी पुढच्या महिन्यात निघालीयत लेह लडाखला. वीकेन्ड स्पेशल टूर्स, वाइल्ड लाईफ टूर्स, फेस्टिव्हल टूर्स, कॉर्पोरेट टूर्स, इंडिया इनबांऊड टूर्स (फॉरिर्न्ससाठी), कस्टमाईज्ड हॉलिडेज अशा अनेक नवनवीन संकल्पना वेळोवेळी आम्ही राबविल्या. आता मागच्या आठवड्यात घेऊन आलो स्पेशली एबल्ड व्यक्तींसाठी टूर्स. व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे जिथे जिथे ज्या ज्या सहलींची गरज भासतेय तीथे तीथे त्या सहलींची बांधणी आम्ही करीत आलोय. आणि पर्यटकांना मनापासून धन्यवाद की त्यांनी आजतागायत ह्या सर्व नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रचंड पाठिंबा दिलाय. सतत नवीन काही निर्माण करण्याची प्रेरणा पर्यटकांकडूनच मिळते ती अशी.
आणखी एक सामाजिक गरज ह्या पर्यटनाच्या बाबतीत आम्हाला जाणवली किंवा मुंबईतल्या एका प्रतिथयश व्यावसायिकांनी माझ्या निदर्शनास आणली ती म्हणजे, ते म्हणाले, ‘वीणा आम्ही एक-दोन सहलींना तुमच्यासोबत जाऊन आलोय, सगळंकाही आम्हाला आवडलं, नो डाऊट तुमचे टूर मॅनेजर्स खूप करतात आमच्यासाठी पण आम्हाला थोडी स्लो पेस्ड सहल देता येईल का? प्रयोग तर करून बघ. बिझनेस क्लास किंवा फर्स्ट क्लासने प्रवास, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य, अर्धा दिवस किंवा कधी पूर्ण दिवस असं स्थलदर्शन, अगदी सगळं बघायलाच हवं असं नाही आणि तिथल्या लोकल फाईन डाइनिंग रेस्टॉरंटमध्ये जेवण किंवा तिथले काही वेगळे एक्सपीरियन्सेस जर इन्क्लुड करता आले तर बघ. आणि ग्रुप जरा छोटा ठेव. मात्र तुझा टूर मॅनेजर आम्हाला पाहिजे बरं का!’ अॅक्च्युअली त्यांनी लक्झरी टूरची संपूर्ण संकल्पनाच माझ्यासमोर मांडली. कधीपासून हे मनात होतं पण या ना त्या कारणाने मागे पडत होतं किंवा कदाचित ह्या सहलींना ग्राहक मिळतील का? अशीही भीती असावी मनात. कधीकधी अशा अदृश्य भीतीमुळेही आपण गोष्टी पुढे ढकलत असतो. आता वाटतंय की कदाचित पाच-सात वर्षांपुर्वी हे केलं असतं तर ‘अहेड ऑफ टाईम’ झालं असतं. पण ‘नाऊ इट्स द राइट टाईम फॉर लाँचिंग वीणा वर्ल्ड लक्झरी टूर्स’. पर्यटकांच्या रीस्पॉन्सप्रमाणे एक-एक करीत आम्ही ह्या लक्झरी टूर्सची डेस्टिनेशन्स आणि संख्या वाढवू.
सध्याचं मोस्ट हॅपनिंग डेस्टिनेशन ठरलंय सिंगापूर. दर वर्षी ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, टूरिस्ट अट्रॅक्शन्समध्ये अनेक बदल करीत असतं, अमेरिकेचे अध्यक्ष आणि नॉर्थ कोरियाचे लीडर ह्यांच्यातल्या भेटीमुळेही सिंगापूरने आणखी वाहवा मिळवली. मरिना बे सॅन्डस्, गार्डन्स बाय दे बे, रीसॉर्ट वर्ल्ड, युनिव्हर्सल स्टुडिओज ह्या नवनवीन आकर्षणांमुळे ते पूर्वी जाऊन आलेल्या पर्यटकांसाठीही सेकंड टाईम भेट देण्याइतकं उत्कृष्ट डेस्टिनेशन बनलंय आणि तिथेच आम्ही सर्वप्रथम वीणा वर्ल्डची लक्झरी टूर नेतोय ह्या दिवाळीच्या सुट्टीत. बिझनेस क्लासने मुंबई-सिंगापूर-मुंबई प्रवास, उत्कृष्ट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य, एका सहलीत जास्तीत जास्त वीस पर्यटक, दिमतीला वीणा वर्ल्डचा एक्सपीरियन्स्ड, केअरिंग, एन्थुसियास्टिक टूर मॅनेजर, इंडियन, चायनीज, सिंगापोरीयन, इटालियन आणि थाई भोजनाचा आस्वाद आपल्या हॉटेलच्या रेस्टॉरंट्समध्ये तसेच तेथील प्रतिथयश रेस्टॉरंटमध्ये. मरीना बे सॅन्डस् स्काय डेक, गार्डन्स बाय दे बे ट्री रेस्टॉरंट, क्लार्क की पॉप्युलर ईटरीज असे वेगवेगळे अनुभव ह्या सिंगापूरच्या चार दिवस तीन रात्रीच्या सहलीत द्यायचा आमचा प्रयत्न आहे. सहलीची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याव्यतिरीक्त आणखी काही माहीती हवी असेल तर टोल फ्री क्रमांक 1800 22 7979 वर संपर्क साधा. एकच लक्षात असू द्या, ह्या सहलीत फक्त वीसच जागा आहेत, तेव्हा निर्णय लवकर घेणं आलंच. शुभस्य शीघ्रम!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.