भारतीयांचं पर्यटनप्रेम वाढतंय हे जगजाहीर आहे. गेल्या दहा वर्षांत दोन वा तीन वर्षांतून एकदा पर्यटनाला बाहेर पडणारा पर्यटक वर्षाला किमान दोन सहली करू लागला. सहलींची विभागणी सर्वसाधारणपणे समर आणि दिवाळी किंवा समर आणि ख्रिसमस ह्या दोन सुट्ट्यांमध्ये झाली तसेच वर्षातून एक भारतातली आणि एक परदेशातली अशी भटकंती होऊ लागली. लेटेस्ट ट्रेंडमध्ये ह्या पर्यटनात युरोपने बाजी मारली आणि भारतीय पर्यटकाला देशविदेशातील पर्यटनात दोन वा तीन वर्षांतून एकदा युरोप खुणावू लागला.
तसं बघायला गेलं तर युरोपमध्ये दर काही मैलांवर भाषा बदलते, भोजन बदलतं आणि भुगोलही. अनेक देशांना इंग्लिशचा गंधही नाही किंवा त्यांना इंग्लिश आवडत नाही. तरीही हा खंड वर्षाला जर पन्नास कोटी पर्यटक आपल्याकडे खेचून घेत असेल तर त्यांच्याकडून आपल्यासारख्या अनेक देशांनी शिकायला हवं. टूरिझम ही किती मोठी इंडस्ट्री आहे आणि देशाच्या अर्थकारणात तिचा किती महत्वाचा वाटा आहे हे युरोपमधल्या प्रत्येक देशाने दाखवून दिलंय. ऐतिहासिक वारसा, भौगोलिक अनुकूलता, अप्रतिम निसर्गसौंदर्य, मानवनिर्मित आश्चर्य आणि पर्यटनसदृश दृष्टीकोन युरोपच्या पर्यटन प्रगतीमध्ये महत्वाचे भाग ठरले आणि म्हणूनच युरोप बघणं हे जगातल्या प्रत्येकाचं स्वप्न बनून गेलं. एक पर्यटक सरासरी आठ स्थानिक लोकांना रोजगार पुरवतं ह्या अर्थकारणानुसार युरोपमध्ये चारशे कोटी स्थानिक त्या कारणाने टूरिझमशी जोडले गेलेत असं म्हणायला हवं पण युरोपची लोकसंख्याच साधारण ऐंशी कोटींच्या घरात आहे. त्यातले वीस कोटी लोकं जरी टूरिझमध्ये आहेत असं म्हटलं तर त्यांची श्रीमंती आपल्या ध्यानात येईल.
वीस वर्षांपूर्वी भारतीय पर्यटकाला खासकरून वेस्टर्न आणि सदर्न इंडियातल्या पर्यटकांना युरोप दाखवायला आम्ही युरोपच्या सहली सुरू केल्या आणि आजतागायत त्याची लोकप्रियता वाढतेच आहे. त्यावेळी युरोपमध्ये भारतीय भोजन हे खूप कमी ठिकाणी मिळायचं. अक्षरश: दही भात, दुपारी आलू मटर आणि रात्री मटर आलूवर आमच्या त्यावेळच्या पर्यटकांनी दिवस काढलेत. ऑस्ट्रियातल्या एका हॉटेलला आलू मटर कसं करायचं हे सुधीरने शिकवलं होतं. थोडक्यात खाण्याच्या बाबतीत हाल होण्याचा काळ होता तो. त्यावेळी भारतीय पर्यटक तसा खिसगणतीत नव्हता युरोपियन्सच्या. फॉरिन एक्सचेंज फारच मर्यादित स्वरूपात असल्याने भारतीय पर्यटक हा विंडो शॉपिंगवाला पर्यटक गणला जायचा त्यामुळे तिथल्या दुकानदारांकडूनही ग्राहकाला मिळणार्या रीस्पेक्टमध्ये उपेक्षाच दिसायची. नजरेमध्येच कधीतरी अनादर जाणवायचा. पूर्वी युरोपल्या गेलेल्या पर्यटकांना ह्या गोष्टी जाणवल्या असतील. पण आता जमाना बदललाय. भारताची लोकसंख्या वरदान ठरलीय. भारतीयांच्या हातात खेळणारा अधिक पैसा पर्यटनाकडे आणि त्यातला बराचसा हिस्सा युरोपकडे वळू लागला. चायनानंतर भारतीय पर्यटकांचं मोठं घबाड युरोपला दिसायला लागलं आणि भारतीय पर्यटकाचं युरोपमध्ये चांगल्या तर्हेने स्वागत होऊ लागलं. भारतीय भोजन बहुतेक सर्वत्र मिळू लागलंय, अगदी वडापावपासून. म्हणजे आता पर्यटकांची मागणी आहे की, ‘रोज भारतीय भोजन नको. कधीतरी एखाद्या लोकल डीशचाही आस्वाद द्या.’ ‘पर्यटक देवो भव:’ असल्याने मधूनच कधीतरी तो स्थानिक स्वाद देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
जगातला प्रत्येक माणूस आयुष्यात एकदातरी युरोप बघण्याचं स्वप्न उराशी बाळगतो कारण युरोप आहेच अतिशय सुंदर, अप्रतिम आणि अफलातून. आयुष्यात अतिमहत्वाच्या म्हणजे ‘मस्ट’अशा गोष्टींमध्ये युरोपचा समावेश होतो. एक पर्यटन व्यावसायिक आणि मार्गदर्शक ह्या, दोन्ही नात्यांनी आग्रहाने सांगीन की, ‘आज बजेट असो वा नसो पण युरोप बघण्याचं स्वप्न मनापासून बघितलं तर ते सत्यात उतरेलंच.’ वुमन्स स्पेशल युरोप किंवा सीनियर्स स्पेशल युरोपच्या पर्यटकांना जेव्हा मी भेटते स्वित्झर्लंडला किंवा कुठेही युरोपमध्ये तेव्हा ‘युरोप बघण्याचं माझं स्वप्न मी कसं पूर्ण केलं किंवा ते कसं पूर्ण झालं’ ह्याविषयीचे अनेक अनुभव ऐकते. पर्यटकांच्या चेहर्यावरचा युरोप यशस्वीपणे बघितल्याचा आनंद बघते तेव्हा त्यांच्यासोबत मलाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. शेवटी आनंद वाटण्याच्या व्यवसायातच आम्ही आहोत नाही का. आता परवा मी निघतेय युरोप अमेरिकेला, वुमन्स आणि सीनियर्स स्पेशलच्या सहलीवर गेलेल्या आमच्या पर्यटकांना भेटायला, त्यांच्याशी संवाद साधायला. प्रत्येक सहलीवर एवढ्या इनसाईट्स मिळतात की, आय रीअल्ली लूक फॉरवर्ड टू इट.
जनरली ऑगस्टच्या अखेरीस आम्ही युरोप अमेरिकेचं बुकिंग सुरू करतो. वीणा वर्ल्ड सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी फक्त 450 पर्यटकांनी वीणा वर्ल्डसोबत युरोपवारी केली, आणि आज पाच वर्षांनी, ह्यावर्षी आम्ही 14,000 पर्यटकांना युरोपला घेऊन गेलो, यशस्वीपणे आणि आनंदात त्यांचं युरोपचं स्वप्न पूर्ण केलं ही आमच्यासाठीसुद्धा प्रेरणादायी गोष्ट आहे कारण आमच्या टीमने पर्यटकांचा हा विश्वास संपादन केलाय, ह्या विश्वासाला आमच्याकडून कुठेही तडा जाणार नाही ह्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि अखंड मेहनत घेतोय. त्यामुळे वीणा वर्ल्डचे अकराशे टीम मेंबर्स, हजारच्या घरात पोहोचलेली प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सची टीम, भारतातील व जगभरातील आमचे असोसिएट्स-सप्लायर्स-हॉटेलियर्स आम्ही सारे सज्ज आहोत 2019 च्या युरोप अमेरिका सहलींसाठी. सतत उत्कृष्ट परफॉर्मन्स दिल्यामुळे, वीणा वर्ल्डला सगळ्या एअरलाईन्स किंवा टूरिझम बोर्ड्सचं सहाय्य प्रचंड कामी येतं, खासकरून अडी-अडचणीच्या वेळी.
युरोपला जायचं म्हणजे व्हिसा ही एक अपरिहार्य गोष्ट ठरते. म्हणजे पासपोर्ट असल्याशिवाय आणि त्यावर युरोपियन देशाचा व्हिसाचा शिक्का मिळाल्याशिवाय युरोपला जाता येत नाही. त्यामुळे पर्यटकांना व्हिसा प्रोसेसिंगला संपूर्णपणे सहाय्य करून त्यांची व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया जेवढी सोपी करून देता येईल तेवढी करून देण्यामध्ये वीणा वर्ल्डची नव्वद जणांची व्हिसा टीम सदैव तैनात असते. व्हिसा देणं हे संपूर्णपणे त्या-त्या देशाच्या अखत्यारित असलं तरी त्यासाठीचं मार्गदर्शन आणि डॉक्युमेंटेशन हा महत्वाचा भाग असतो आणि त्यासाठी ही व्हिसा टीम महत्वाची असते. अभिमानाची गोष्ट आहे की ह्यावर्षी ह्या टीमने आमच्या परदेश सहलींच्या पर्यटकांसाठी सव्वा लाखांहून अधिक व्हिसा मिळविण्याच्या कार्यात पर्यटकांना सर्वतोपरी सहाय्य केलं जेणेकरून इतक्या मोठ्या संख्येने पर्यटकांनी परदेशवारी सफल केली.
आणखी एक महत्वाचा भाग युरोप टूरच्या बाबतीत असतो तो म्हणजे युरोप सहलीसोबत येणारा, तुमच्या दिमतीला असणारा टूर मॅनेजर. यावर्षी आमच्या पंच्याऐंशी एक्स्पर्ट युरोप टूर मॅनेजर्सनी ही जबाबदारी लिलया पेलली. युरोप टूर करणं तशी सोपी गोष्ट नाही, पण आमचे हे खंद्दे वीर (ह्यापैकी अनेकांनी पन्नास देशांमध्ये सहली करण्याचा रेकॉर्ड केलाय तो त्यांचा अनुभव कारणी लागतोय) एकमेकांच्या उत्कृष्ट नेटवर्कद्वारे आणि ‘एकमेका साह्य करू, ...’ ह्या न्यायाने पर्यटकांची युरोप सहल यशस्वी करण्यात यशस्वी होताहेत. महत्वाचं म्हणजे आमच्यापैकी कुणीच पिढीजात चालत आलेल्या मिळकतीवर नाही आहोत, तर ‘माझा आज-माझा उद्या आणि माझं भविष्य’ हे आज मी घेत असलेल्या मेहनतीवर आहे. मी मनापासून काम केलं तर माझं भविष्य उज्वल आहे अन्यथा नाही ह्याची जाणीव वीणा वर्ल्डमधल्या प्रत्येकाला आहे. त्यामुळे सर्व्हिस किती चांगल्या तर्हेने देता येईल ह्याकडेच प्रत्येकाच्या भावना एकवटलेल्या आहेत.
टेक्नॉलॉजिनेही महत्वाची जबाबदारी बजावलीय ती तत्पर सेवा देण्यात आणि त्याचा पुरेपूर फायदा आमची मुंबईत असलेली सपोर्ट टीम घेत असते. कुठच्याही सहलीवर काहीही अडचण उद्भवली तर ती तात्काळ कळते आणि तिच्यावर फास्टेस्ट सोल्युशन देण्यामध्ये ते एक्सपर्ट झालेयत, त्याचा अनुभव आमच्या पर्यटकांनी कुठे ना कुठे घेतला आहेच. अडचणी येऊ शकतात पण त्या आपण कशा सोडवतो, किती वेळात सोडवतो हे फार महत्वाचं. आणखी एक गोष्ट आम्ही करतो ती म्हणजे प्री-डीपार्चर गेट-टुगेदर्सची. ऑक्टोबर ते मार्चमध्ये मुंबई कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दर शुक्रवार शनिवार आणि ऑक्टोबर व एप्रिल महिन्यात असं दोनवेळा पुण्याला त्या-त्या सीझनमध्ये परदेशसहलींना जाणार्या पर्यटकांचं गेट-टुगेदर एकूणच सहलीच्या पूर्वतयारीसाठी आणि सहलीच्या निखळ आनंदासाठी उपयोगी पडतं.
आता युरोप कसं बघावं त्याकडे आपण येऊया. युरोपमध्ये फिरताना आपल्याला जाणवतं ते म्हणजे युरोप बघण्यासाठी चायना अमेरिका ऑस्ट्रेलिया आफ्रिका जपान कुठूनही येणार्या पर्यटकांमध्ये भाषा भुगोल भोजन भटकंती ह्यात विविधता आणि एकटं फिरण्यातल्या अडचणी यामुळे ‘ग्रुप टूर्स’ हा सर्वांना आवडणारा असा पर्याय ठरलाय. तरुणाई किंवा फ्रीक्वेंट ट्रॅव्हलर्स हे आमच्याकडून त्यांना हवा तसा कस्टमाईज्ड हॉलिडे बनवून घेतात किंवा सीझन्ड अॅडव्हेंचर लव्हर्स बॅकपॅकर्स बनून युरोपचा आनंद घेतात. इन्सेन्टिव्ह टूर्स किंवा कॉर्पोरेट टूर्स किंवा डीलर्स मीट करण्यासाठीही अनेक कंपन्या युरोपमधल्या देशांना पहिली पसंती देतात त्यामुळे आमच्या माईस टूर्सही वाढल्यात. महिलांचं आणि सीनियर सिटिझन्सचंही युरोप बघण्याचं स्वप्न आम्ही स्पेशालिटी टूर्सद्वारे पूर्ण करीत असतो. हनिमूनर्ससाठी तर युरोपमधला प्रत्येक देश ‘एक परफेक्ट डेस्टिनेशन’ ठरतो. अर्थात फक्त दोघांनी आणि तेही नवविवाहितांनी जायचं म्हटलं तर खर्च खूप वाढतो म्हणून आम्ही हनिमूनर्सना स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये ग्रुप टूर्समध्ये काही जागा राखीव ठेवतो, जेणेकरून कमी पैशात त्यांचा ‘युरोपियन हनिमून’ साकार होऊ शकतो.
पर्यटकांचे एवढे प्रकार आणि युरोपचे एवढे देश, त्यामुळे प्रत्येक पर्यटकाने आता, मला एक्झॅक्टली काय हवंय? मी कुठे जाणार? कसा जाणार? कधी जाणार? काय बघणार? कुठे राहणार? काय खाणार? ह्या सहा प्रश्नांची उत्तरं शोधायची. एकदा का आपण ह्या गोष्टी आपल्यासाठी क्लीअर केल्या की, नेमकं पुढे काय करायचं? वीणा वर्ल्डकडे कोणते पर्याय आहेत? आता बुकिंग केलं तर फायदा काय?... ह्याविषयी पुढच्या रविवारी जाणून घेवूया.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.