आम्ही वीडा उचललाय की, ह्या परदेशींना-NRIsना आमच्या टूर मॅनेजरच्या दिमतीत भारताची एक छानशी ओळख करुन द्यायची, सुरक्षितरित्या सहल घडवायची. भारतातून परत जाताना त्यांच्यात अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्याची-बघितल्याची भावना निर्माण झालीच पाहिजे पण त्याचसोबत भारत त्यांना वाटलं होतं त्यापेक्षा किंवा त्यांच्या ऐकीव माहितीपेक्षा सुंदर वाटला पाहिजे. एक भारतीय पर्यटनसंस्था म्हणून आपलं ते कर्तव्य आहे.
एप्रिल मे जून म्हणजे आमचा सुपरपीक सीझन. भारतातले जास्तीत-जास्त पर्यटक ह्यावेळी आपल्या वेगवेगळ्या राज्यात किंवा भारताबाहेर वेगवेगळ्या देशात पर्यटन करतात. ह्या तीन महिन्यांसाठी आम्हाला प्रत्येकाला आमची शक्ती दुप्पट नव्हे तर चौपट करावी लागते. वुई आर कॉन्सटंटली ऑन अवर टोज. नुसती शक्ती अशावेळी एकवटून चालत नाही तर संपूर्ण समूहाचे-टीमचे विचार-आचार-कृती ह्यामध्ये एकवाक्यता आणावी लागते, म्हणजे ती असते पण थोडी विखुरलेली असू शकते, ती पुन्हा ट्रॅकवर आणून मार्गस्थ करावी लागते. वन टीम-वन लँग्वेज हा फंडा. त्यासाठी मार्चमध्ये असते आमची प्री-सीझन मीट. ह्यावर्षी ती तीन भागात विभागली गेली. सेल्स टीम्स, ऑपरेशन टीम्स, टूर मॅनेजर्स टीम. त्यातली शेवटची मीटिंग मागच्या आठवड्यात होती. आम्ही वाट बघत असतो ह्या मीटिंगची कारण वर्षभर देशविदेशात वीणा वर्ल्डचा झेंडा गौरवाने फडकवीत ठेवणारे आमचे सर्व टूर मॅनेजर्स ह्यावेळी एका ठिकाणी एकत्र येतात. आधीचे चार दिवस आमची चर्चा सुरू असते ऑफिसमध्ये ह्या संबंधी, नेमकं काय सांगायचंय आपल्याला आणि कसं सांगायचंय. नवीन गोष्टी काय आहेत? त्यात आपला रोल काय आहे हे सगळं संवादाच्या रूपात त्यादिवशी प्रत्येकापर्यंत पोहोचवायचंं असतं.
यावर्षीची नवीन हॅपनिंग गोष्ट होती ती म्हणजे, इनबाऊंड टूर्स. परदेशस्थ भारतीयांना आणि परदेशी पर्यटकांना आपला भारत दाखवणे म्हणजे त्यात छोटं-मोठं काम होत होतं पण एक बिझनेस व्हर्टिकल म्हणून ते सुरू झालं सहा-आठ महिन्यांपासून. मोहन रेडकर ह्याची धुरा सांभाळतोय. फोकस्ड अटेंशन एखाद्या गोष्टीला दिलं गेलं की ती गोष्ट चांगल्या तर्हेने मार्गस्थ होते, त्याचं ही आमची इनबाऊंड डिव्हिजन हे अगदी आत्ताचं ताजं उदाहरण वीणा वर्ल्डमधलं. ह्या सहा महिन्यात कॉस्टा रिका, स्पेन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अॅमस्टरडॅम, जर्मनी, चायना, स्वित्झर्लंड, अर्जेटिना, अबुधाबी ह्या देशांतून आलेल्या एनआरआय तसेच फॉरिनर्स मंडळींना भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पर्यटन घडवून भारताचं एक सुंदर चित्र त्या पर्यटकांच्या मनात कोरण्यात आम्ही यशस्वी झालो. इनबाऊंड टूर्स करणार्या अनेक ट्रॅव्हल कंपनीज् भारतात ऑलरेडी आहेत. आमच्या म्हणजे वीणा वर्ल्ड इनबाऊंड टूर्सचं वैशिष्टय असं आहे की, इथे आम्ही प्रत्येक परदेशी किंवा परदेशस्थ भारतीय पर्यटकांसाठी आमचा वीणा वर्ल्डचा टूर मॅनेजर त्यांच्या भारतभ्रमणासाठी सोबत देतो. आत्ता ऑस्ट्रेलियातल्या एका कपलने तीस दिवसांची भारताची सहल घेतली होती, त्यांच्यासोबत आमचा टूर मॅनेजर तीस दिवस साथीला होता. ती मंडळी एवढी खूश झाली की वीणा वर्ल्ड टीमला भेटायला कॉर्पोरेट ऑफिसला- विद्याविहारला आली ऑस्ट्रेलियाला जायच्या आधी. इनबाऊंड टूरिस्टसोबत-फक्त दोघांसोबत टूर मॅनेजर देण्याची पद्धतच नाहीये, आम्ही ते सुरू केलं, त्यामुळे त्याचा फर्स्ट हँड फीडबॅक मिळावा म्हणून त्यांना विचारलं की कसा होता आमचा महेंद्र? तुम्हाला असा टूर मॅनेजर सोबत असावा अशी गरज वाटते का? तुम्ही परत भारतात आलात आणि तुमचा राहिलेला भारत बघायचं ठरवलं तर तुम्ही टूर मॅनेजर शिवाय सहल कराल की टूर मॅनेजर हवाच अशी तुमची डिमांड असेल? माझ्या प्रश्नांची सरबत्ती ऐकल्यावर त्या म्हणाल्या, सवालच येत नाही टूर मॅनेजर शिवाय भारत बघण्याचा. आम्ही एकट्यांनी बघितला असता त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टी आम्ही बघितल्या, भारत आम्हाला आणखी सुंदर वाटला. छोट्या- छोट्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने महेंद्रने आम्हाला समजावून संगितल्या, इतकी काळजी त्याने घेतली की आम्ही आता टोटली पॅम्पर्ड अशा अवस्थेत ऑस्टे्रलियाला निघालोय. मंबईत महेंद्रची ड्युटी संपत होती पण आम्ही त्याला रीक्वेस्ट करून आम्हाला वीणा वर्ल्ड स्टाईलने मुंबई दाखव असं म्हटलं आणि त्यानेही हो म्हटलं. एकदम सुरक्षित पद्धतीने कोणतीही दगदग न होता ही तीस दिवसांची सहल पार पडली ह्याबदद्ल धन्यवाद! ह्याचसाठी केला होता अट्टाहास अशी आमची मनःस्थिती झाली.
इनबाऊंड म्हणजे भारतात येणार्या पर्यटकांसाठी, त्यांच्या दिमतीला टूर मॅनेजर सर्व्हिस द्यायची हे आम्ही पक्क करून टाकलं. ह्यामध्ये दोन भाग होते. एकतर आमच्या टूर मॅनेजर्सना नेहमीपेक्षा वेगळ्या पर्यटकांना आगळ्या पद्धतीने भारत दाखविण्याचं नवं काम मिळालं होतं आणि दुसरं म्हणजे ज्यावेळी हे पर्यटक भारतात येतात तेव्हा आपला सुजलाम- सुफलाम असा पाच हजार वर्षांची परंपरा असलेला देश आणखी सुंदर करुन दाखवणं ही जबाबदारी आपल्यावर आली जी घ्यायला संपूर्ण वीणा वर्ल्ड टीम स्वखुशीने तयार आहे. इनबाऊंड टूर्स हे आमचं एक बिझनेस व्हर्टिकल झालं पण ते सुरू होण्याआधी आमच्या अनेक पर्यटकांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटून किंवा ईमेलद्वारे सुचवलं होतं की, वीणा वर्ल्डने बाहेरच्या देशातील पर्यटकांना चांगल्यातर्हेने आपला भारत दाखवायला हवा त्यांचीही इच्छा पूर्ण झाली कारण आम्ही वीडा उचललाय की, ह्या परदेशींना - NRIsना आमच्या टूर मॅनेजरच्या दिमतीत भारताची एक छानशी ओळख करुन द्यायची, सुरक्षितरित्या सहल घडवायची. भारतातून परत जाताना त्यांच्यात अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्याची - बघितल्याची भावना निर्माण झालीच पाहिजे पण त्याचसोबत भारत त्यांना वाटलं होतं त्यापेक्षा किंवा त्यांच्या ऐकीव माहितीपेक्षा सुंदर वाटला पाहिजे. एक भारतीय पर्यटनसंस्था म्हणून आपलं ते कर्तव्य आहे.
इनबाऊंड टूर्स हा नवीन टॉपिक होता या आमच्या टूर मॅनेजर्स मीटसाठीचा. माझा पहिलाच प्रश्न होता की, इनबाऊंड टूर्ससाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? तेजस ज्ञानेने परफेक्ट उत्तर दिलं की आपल्या भारताबद्दलचा अभिमान. सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती, आणि त्याचं उत्तर टूर मॅनेजर्सकडून मिळालं ह्याचा आनंद झाला. संस्कृतीची रुजवात हा महत्त्वाचा भाग होता वीणा वर्ल्डच्या वाटचालीचा आणि त्यात आपला भारत हा अतिमहत्त्वाचा भाग होता. आपण प्रत्येकजण भारतात राहतो, भारतात शिकतो, भारतात व्यवसाय करतो, भारत जर आपली मातृभूमी आहे तर मग भारतावर आपली असीम निष्ठा आणि भारताप्रती आपल्या मनात अतोनात आदर असला पाहिजे ही ती शिकवण आमच्या प्रत्येक मीटमध्ये आम्ही पुढच्या टप्प्यावर घेऊन जातो. ह्यात आदर-प्रेम- निष्ठा असली पाहिजे ही कदाचित सक्ती झाली, ते पण नकोय. माझ्यात- प्रत्येकात ती मनापासून आहे ही मानसिक बैठक असली पाहिजे. कुणी सांगतंय म्हणून, आपण पर्यटनाच्या व्यवसायात आहोत म्हणून किंवा आता आपण इनबाऊंड टूर्स सुरू केल्यात म्हणून माझ्यात भारताविषयीचा अभिमान किंवा आदर वाटणं असं झालं तर ते फारच वरवरचं आहे आणि टिकणारंही नाही. भारताविषयीच्या कोणत्याही नकारात्मक तुलनेत आपण सहभागी व्हायचं नाही. बर्याचदा परदेश सहलींमध्ये बसमध्ये आपला भारत विरूद्ध ज्या देशात पर्यटन सुरू असतं तो देश ह्याची तुलना सुरू असते. त्यावेळी टूर मॅनेजर्स शक्य झालं तर नकारात्मक तुलनेला थांबवण्याचा प्रयत्न करतात. भारताविषयी आपल्या तोंडून कधीही कोणत्याही पद्धतीचा अपशब्द निघणार नाही ही सक्ती आहे वीणा वर्ल्डची आपल्या संपूर्ण टीमसाठी-तीच आहे संस्कृृती. आता इनबाऊंड टूर्समुळे ती मानसिकता आणखी सुदृढ केली. येणारा परदेशी पर्यटक हा भारताविषयी अनेक गोष्टी ऐकून आलेला असतो. त्याने त्याच्या मनात भारताचं एक चित्र रेखाटलेलं असतं. त्यात कधी चांगल्या गोष्टी असतात तर कधी नॉट सो गूड थिंग्जचा भरणाही असतो. आपल्या अखत्यारित हा पर्यटक आला की ते चित्र संपूर्णपणे आनंदी-हवहवंस असं परिवर्तित करणं ही आपली वीणा वर्ल्ड म्हणून मुख्य जबाबदारी. ह्याचं भान टूर मॅनेजर म्हणून तसंच एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला असलं पाहिजे. ज्यावेळी इनबाऊंड टूर्सची स्ट्रॅटेजी कम पॉलिसी मीट झाली तेव्हा आम्ही एक ठरवलं की भारताचा चांगला भागच ह्या परदेशी पर्यटकांना दाखवायचा. टेरर टूरिझम किंवा स्लम टूरिझम ह्यामध्ये आपण पडायचंं नाही. ते सोडून खूप सुंदर-सरुदर गोष्टी आहेत पर्यटकांना दाखवायला, एक जन्म अपूरा पडेल एवढ्या. जगातल्या प्रत्येक देशात चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत. त्यांनाही चॅलेंजेस आहेत पण आपण जेव्हा पर्यटक म्हणून जातो त्या देशांमध्ये तेव्हा तिथल्या चांगल्या गोष्टीच दाखविण्यावर टूरिझमचा आणि तिथल्या टूर गाईड्सचा भर असतो. त्यांच्या बोलण्यात देशाविषयीचा अभिमान जाणवतो. ही चांगली गोष्ट आपणही आचरणात आणली पाहिजे, ह्या भावनेने आम्ही इनबाऊंड डिव्हिजन सुरू केली आणि आज ती चांगल्यातर्हेने मार्गस्थ झालीय. ह्या नव्याने सुरू झालेल्या वाटचालीसाठी आपले शुभाशीर्वाद हक्काने मागून घेते. अतिथी देवो भव:!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.