IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

भारतातल्या प्रत्येकासाठी जगातल्या प्रत्येक भारतीयासाठी

9 mins. read

 महाराष्ट्रातली, देशातल्या वेगवेगळ्या राज्यातली आणि जगाच्या काना-कोपर्‍यात स्थायिक झालेली भारतीय मंडळी जेव्हा एखाद्या सहलीत संमिश्ररित्या सहभागी झालेली असतात तेव्हा सहलीचा माहोल आणखी चांगला बनून जातो. दशदिशातून आलेल्या पर्यटकांकडून होणार्‍या विचारांचं आदान-प्रदान सहलीची मजा आणखी वाढवतं. जग जवळ येतंय, शहराच्या-राज्याच्या-देशाच्या-खंडांच्या सीमा पुसट होत चालल्या आहेत त्याचं एक छोटसं उदाहरण मला ह्या सहलींमध्येही दिसतं. इंटिग्रेशन ऑफ इंडियन्स अराऊंड द वर्ल्ड!

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या म्हणजे युएसएच्या सहलीवर गेलेल्या सीनियर सिटिझन्सना भेटले, एका बॅचला वॉशिंग्टनला आणि एका बॅचला लॉस एंजेलिसला. ज्येष्ठांशी सुसंवाद सुरू असताना एक प्रश्‍न आला की, ‘आमचं बर्‍यापैकी जग बघून झालं, आता पुढे कुठे जायचं?’ म्हटलं, जग बघून झालं मग आता चंद्रावर स्वारी करू या ही संकल्पना सगळ्यांनीच उचलून धरली. पर्यटनामध्ये ‘समथिंग टू लूक फॉरवर्ड टू’ अंतर्गत सध्या माझ्यासमोर चंद्रावरची स्वारी आहे,पुढे जाऊन कदाचित मंगळ, नेप्च्यून, प्लुटोसुद्दा या यादीत समाविष्ट होतील. हे मी बोलले आणि मला वीणा वर्ल्डचे सुरुवातीचे दिवस आठवले. त्यावेळी, म्हणजे पाच वर्षांपूर्वी मी ‘मला चंद्रावर जायचंय’ असा लेख लिहिला होता. त्याचा आशय असा होता की, ‘आज आपण कुठे आहोत त्यापेक्षा आपल्याला कुठे पोहोचायचंय हे उद्दिष्ट वा ध्येय ठरवूया. आपलं ध्येय हे नेहमी मोठं, उंचावरचं, सहजसाध्य न होणारं असंच घेऊ या. त्याप्रमाणे मार्गक्रमणा करू या’. आणि बघानं! तीन वर्षातच आम्ही, आमच्या पर्यटकांनी आणि आमच्या टूर मॅनेजर्सनी सातही खंडांची म्हणजे आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका आणि युरोपची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. आमच्यासोबत पर्यटन करणार्‍या पर्यटकांमधील अनेकांचे पन्नास देश पूर्ण झालेयत. आमचा टूर मॅनेजर विवेक लवकरच शंभर देश पूर्ण करेल. पंचवीस-पन्नास देश पूर्ण केलेले अनेक टूर मॅनेजर्स आमच्या पर्यटकांच्या दिमतीला असल्याने वीणा वर्ल्डची घोडदौड सुरू आहे.

महाराष्ट्रातील पर्यटक मंडळी वीणा वर्ल्डसोबत मोठ्या संख्येने पर्यटन करतातच पण देशभरातून म्हणजे अगदी दिल्ली कलकत्ता चेन्नई बंगळुरू हैदराबादपासूनची मंडळीदेखील कधी सामिल झाली हे आमचं आम्हालापण कळलं नाही. हल्ली प्रत्येक सहलीत मला महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यातूनच नव्हे तर आपल्या देशाच्या काना-कोपर्‍यातून आलेली पर्यटक मंडळी दिसतात. आता तर ऑनलाईन बुकिंगमुळे ऑस्ट्रेलिया-अमेरिका-इंग्लंड-साउथ आफ्रिका-मिडल ईस्टमध्ये स्थायिक झालेली आपली भारतीय मंडळी सहलीत सहभागी व्हायला लागलीयत. पर्यटनविश्‍वात वीणा वर्ल्डचं विश्‍व वाढतंय आणि म्हणावसं वाटतंय की, ‘भारतातल्या प्रत्येकासाठी-जगातल्या प्रत्येक भारतीयासाठी: वीणा वर्ल्ड अ‍ॅट युवर सर्व्हिस!’ महाराष्ट्रातली, देशातल्या वेगवेगळ्या राज्यातली आणि जगाच्या काना-कोपर्‍यात स्थायिक झालेली भारतीय मंडळी जेव्हा एखाद्या सहलीत संमिश्ररित्या सहभागी झालेली असतात तेव्हा सहलीचा माहोल आणखी चांगला बनून जातो. दशदिशातून आलेल्या पर्यटकांकडून होणार्‍या विचारांचं आदान-प्रदान सहलीची मजा आणखी वाढवतं. जग जवळ येतंय, शहराच्या-राज्याच्या-देशाच्या-खंडांच्या सीमा पुसट होत चालल्या आहेत त्याचं एक छोटसं उदाहरण मला ह्या सहलींमध्येही दिसतं. इंटिग्रेशन ऑफ इंडियन्स अराऊंड द वर्ल्ड!

मे महिन्यात मॉरिशसला गेले होते, तिथे सीनियर्स स्पेशलला आलेले ओरिसाचे ज्येष्ठ नागरिक भेटले. त्यांच्या पुण्यात स्थायिक झालेल्या मुलीने वीणा वर्ल्डमध्ये त्यांचं बुकिंग केलं होतं. त्यांना तिथे भुवनेश्‍वरला वीणा वर्ल्डची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे ते मला विचारत होते की, ‘नेमकं काय आहे वीणा वर्ल्ड. काय-काय करता तुम्ही?’. त्यांना सर्व प्रश्‍नांची उत्तरं मी दिली पण नंतर असं वाटलं की, ‘पर्यटनात आपण नेमकं काय-काय करतो हे कुठेतरी एका ठिकाणी लिहून ठेवण्याची गरज आहे, म्हणजे देश-विदेशातून कुठूनही नव्याने वेबसाईटला भेट देणार्‍या पर्यटकाला थोडक्यात कल्पना येईल की त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी त्यांच्या आवडीनुसार वीणा वर्ल्डकडे नेमकं काय आहे? व्यक्ती  तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती’. एका घरात अनेक आवडी-निवडी आणि विचारप्रवाह असू शकतात. वीणा वर्ल्ड प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी आहे. मात्र कुटुंबातल्या त्या प्रत्येकाने पर्यटनात आपल्याला नेमकं काय आवडतं त्याची शहानिशा करून घेतली पाहिजे. एकदाका आपल्याला कळलं की आपल्याला नेमकं काय हवंय तर मग पुढच्या सगळ्या गोष्टी सुकर होऊन जातात. आणि ते जर कळलं नाही तर मात्र राँग नंबर लागतो आणि सगळाच विचका होऊन जातो.

‘राँग नंबर’ हा आमचा शब्द. वर म्हटल्याप्रमाणे, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. कुणाला एकट्याने प्रवास करायला आवडतो तर कुणाला एकेकट्याने भटकायचा-एकटेपणाचा तिटकारा असतो. कुणी एकटेपणा घालविण्यासाठी ग्रुप टूर्स पसंत करतात तर कुणी इथे इतके लोकांमध्ये वेढलेले असतात की कुठेतरी एकांतात जाऊन फक्त एकट्याने त्यांना राहायचं असतं. परदेशातून येणार्‍या मंडळींची सहलीत सहभागी होण्याची भावना जास्तकरून आपल्या लोकांमध्ये आठ-पंधरा दिवस मिसळायची असते, आपल्या मातीचं नातं घट्ट करायची असते. कुणाला एका फटक्यात युरोपमधले आठ-दहा देश बघायचे असतात तर कुणाला एकावेळी स्वित्झर्लंड किंवा इटलीसारख्या एकाच देशात आठवडाभर ठाण मांडायचं असतं. कुणाला ग्रुप टूरचा सुनियोजित शिस्तबद्ध कार्यक्रम आवडतो तर कुणाला हॉलिडे या संकल्पनेत वेळेचं बंधन अजिबात आवडत नाही. कुणाला टूर मॅनेजर सोबतीला असला की कसं सुरक्षित आणि बिनधास्त वाटतं तर कुणाला टूर मॅनेजर ही संकल्पनाच आवडत नाही. काही कुटुंब आजी-आजोबा-मुलगा-सून-नातवंडं असा एकित्रत प्रवास करणं पसंत करतात, तर काहीजणं घरात आपण एकत्र आहोतच की मग प्रवासात प्रत्येकाला स्वत:ला हवी तशी प्रायव्हसी देऊया म्हणत त्यांच्या-त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या तर्‍हेने वेगवेगळ्या वेळी प्रवास करतात. कुणाला पर्यटनात शहरं आवडतात तर कुणाला निसर्गरम्य ठिकाणं. कुणी पर्वतराजी आणि पहाडांचा प्रेमी असतो तर कुणी समुद्रकिनारे आणि बीच रीसॉर्टस्चा. कुणाला शॉपिंग मस्ट वाटतं तर कुणी त्या-त्या पर्यटनस्थळाच्या खाद्य-संस्कृतीचा अभ्यासक किंवा चाहता. कुणाला डोळ्यांचं पारणं फिटेपर्यंत बघायला आवडतं तर कुणाला अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिविटीज करण्यात इंटरेस्ट असतो. अबबब... पर्यटकांच्या केवढ्या ह्या तर्‍हा. अर्थात ह्या सर्वांचा सतत अभ्यास करूनच तर वीणा वर्ल्ड उभी राहीलीय. पर्यटकांच्या अशा अनेक गरजा आणि आवडी-निवडी लक्षात घेऊन कोणकोणत्या प्रकारच्या पर्यटकांसाठी काय-काय नाविन्यपूर्ण संकल्पना आणल्या आहेत त्याचा परामर्श घेऊया.

कुटुंबाचा विचार करता घरातल्या ज्येष्ठांचा मान मोठा त्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या देश-विदेशातील सीनियर स्पेशल सहली खूपच लोकप्रिय आहेत. ‘वय झालं आता’ असं सर्वच ज्येष्ठ मंडळींकडून ऐकू येत असताना ह्या सहली म्हणतात, ‘अभी तो हम जवाँ है भार्ई। अभी जिंदगी की खुशियाँ लेना शुरु किया है। वुई आर टोटली फिट अ‍ॅन्ड फाईन टू टेक ऑन द वर्ल्ड!’ घरातली दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्या घरातली महिला, मग ती सात वर्षांची असो किंवा सत्तर, ‘शी डीझर्व्हज हर मी टाईम’. करियर सांभाळताना-घरातली कर्तव्य बजावताना-संपूर्ण घराची जबाबदारी आनंदाने झेलताना, वर्षातून किमान एकदा तिचे स्वत:चे आनंदाचे खुशीचेे आधुनिक माहेरपणाचे दिवस म्हणजे वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल. या सहलींची लोकप्रियता अगदी आसमंताला पोहोचलेली. जगात कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या सहली आयेजित केल्या जात नाहीत ह्याचा अभिमान बाळगतानाच ह्या सहलींनी महिलांच्या आयुष्यात केलेली क्रांती, त्यांचा वाढलेला आनंद, त्यांच्यातला नूतन उत्साह प्रत्येक घराला उपकारक ठरला आहे हे नमूद करावसं वाटतं. घर बनतं ते घरातल्या माणसांमुळे, पण आजकाल घरातली माणसंच त्यांच्या वेगवेगळ्या कार्यबाहुल्यामुळे एकमेकांना भेटेनाशी झाली आहेत. ‘जागतिकीकरण-स्पर्धा ह्या सगळ्यांचेचआपण बळी, आणि मग काही दिवसांसाठी हे सगळं विसरून सर्वजण एकत्र कुठेतरी जाऊ या, आठ-दहा दिवस एकमेकांसोबत राहू या, रीफ्रेश होऊ या, या विचाराने पर्यटन करणार्‍या कुटुंबासाठी फॅमिली टूर्स म्हणजे पर्वणी’. वीणा वर्ल्डच्या व्यवसायाचा सत्तर टक्के भाग ह्या फॅमिली टूर्सनी व्यापलेला आहे. जगात सर्वत्र ह्या फॅमिली टूर्सचा संचार आहे. घरातलं एक अतिशय तरल आणि निष्पाप नातं म्हणजे आजीआजोबा आणि नातवंडांचं. त्यांच्यासाठीही स्पेशल टूर असते शाळांच्या सुट्टीत. या स्पेशालिटीचं नाव आहे ‘ग्रँड पॅरेंट्स अ‍ॅन्ड ग्रँड चिल्ड्रन’. नवविवाहीतांसाठीच्या हनिमून टूर्स जेव्हा सुरू केल्या तेव्हा ती संकल्पना फारशी आवडली नाही कोणालाच. पण हळूहळू सुरक्षितता, समवयीन नवविवाहीतांची सोबत, दिमतीला वीणा वर्ल्डचा टूर मॅनेजर ह्या सर्व गोष्टी हनिमूनर्सना भावू लागल्या. घरच्यांचीही काळजी मिटली आणि भारतात अनेक ठिकाणी तसेच थायलंडला वीणा वर्ल्ड हनिमून टूर्स लोकप्रिय झाल्या. आता स्वित्झर्लंड हनिमून टूर्सची डिमांड वाढायला लागलीय. मला एकटीला किंवा एकट्याला सहलीला जायचंय, ‘लेट मी बी ऑन माय ओन!’असं म्हणणार्‍यांची संख्या आता घराघरात वाढायला लागलीय. त्यांच्यासाठी दोन वर्षांपूर्वी सिंगल्स स्पेशल टूर्स आणल्या आणि लेह लडाख, अंदमान, मनाली सारख्या ठिकाणी वीस ते पस्तीस वयोगटातील सिंगल्स बिनधास्त पर्यटन करू लागले. ज्युबिली स्पेशल कपल टूर्स ही संकल्पना मिड एज (३५ ते ५० वर्षे) कपल्ससाठी राबवली. थायलंड, युरोप, दुबई आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता ह्यावर्षी आम्ही ज्युबिली स्पेशलची ईस्टर्न युरोप सहल आणलीय. ह्याची संकल्पना आहे, ‘उस मोड से शुरु करे फिर ये जिंदगी’... संसाराच्या-कुटुंबाच्या-व्यवसायाच्या रहाटगाडग्यात लुप्त झालेल्या प्रेमाला संजीवनी म्हणजे ‘ज्युबिली स्पेशल टूर्स’ कपल टूर्स. जर एखाद्या घरात डिफरंटली एबल्ड व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल टूर्स आम्ही ह्यावर्षी सुरू केल्यात व त्यातील पहिली सहल १८नोव्हेंबरला निघतेय थायलंडला. विद्यार्थ्यांसाठी शाळांचे मोठे ग्रुप्स त्या-त्या शाळांच्या गरजेनुसार डिझाइन करून त्याप्रमाणे कंडक्ट केले जातात. बिझनेस क्लासने विमानप्रवास, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य आणि फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये भोजन व्यवस्था आणि दिमतीला वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर असलेल्या लक्झरी टूर्सची सुरुवात आम्ही मागच्याच महिन्यात केली, जेणेकरून ज्यांना आलिशान पद्धतीने सहल करायचीय त्या कुटुंबाचीही सोय केली गेलीय. वीकेन्ड्सना किंवा लाँग वीकेन्डचा फायदा घेऊन ‘एक ब्रेक तो बनताही है’ म्हणत छोट्या टूर्सचा श्रीगणेशा आम्ही गेल्या वर्षी केला वीकेन्ड स्पेशल टूर्सद्वारे. त्यामध्येच म्हणजे वीकेन्ड्सना वाइल्ड लाईफ लव्हर्ससाठी आम्ही वाइल्ड लाईफ स्पेशल टूर्स आणल्या. ज्यांना ग्रुप टूर्सने जाणं बंधनाचं वाटतं किंवा जे स्वतःच्या मनासारखा हवा तसा प्रवास करायचं ठरवितात त्यांच्यासाठी कस्टमाईज्ड हॉलिडेची डिव्हिजन फार चांगलं काम करतेय. ज्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत त्यांच्या कॉर्पोरेट टूर्स आमच्या वीणा वर्ल्ड माईस डिव्हिजनतर्फे नेल्या जातात. ज्यात ट्रेनिंग, टीम बिल्डिंग, अ‍ॅवॉर्ड फंक्शन्स, सिईओ-डिरेक्टर्स मीट अशा अनेक गोष्टी जगाच्या पाठीवर केल्या जातात. ज्यांना लवकरात लवकर जगप्रदक्षिणा पूर्ण करायचीय त्यांच्यासाठी ग्लोब ट्रॉटर सुपर जंबो प्लॅनही आम्ही तयार ठेवलाय. तर मंडळी बघितलंत, एका कुंटुंबात पर्यटनासाठी आम्ही चौदा ते पंधरा पर्याय तयार ठेवलेयत. स्वतःला ओळखायचं आणि ह्यातलं सुटेबल प्रॉडक्ट निवडायचं. राँग नंबर लागू द्यायचा नाही. आफ्टर ऑल, ‘पर्यटन हे आनंदासाठी आहे’. सो, चलो, बॅग भरो, निकल पडो!

 

September 03, 2018

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Comments (4)

rapid tone before and after photos
Sep 15, 2018

Pretty! This has been a really wonderful post.
Thank you for providing this info.

Siddheshwar Shirshetti
Sep 13, 2018

May 2019 madhe mala north East Group Tour sathi Jayache ahe. Mi already may 2017 madhe Veena World sobat Bankok & Pattaya tour keli ahe. So please guide me north east Group tour for 7 days

Priyanka Tawde
Sep 14, 2018

Hello Mr.Siddheshwar, Thank you for your enquiry! We have forwarded your request to our concerned team and they will get back to you shortly on your email.

Siddheshwar Shirshetti
Sep 13, 2018

Mi veena world sobat Dec 2017 madhe Thailand Group tour keli ahe. With My wife & Son. Mala Atta May 2020 madhe Europe Tour 15 days sathi with Family Karawayachi ahe. Pl5 Guide me.

Priyanka Tawde
Sep 14, 2018

Hello Mr.Siddheshwar, Thank you for your enquiry! We have forwarded your request to our concerned team and they will get back to you shortly on your email.

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top