एकदा एका रीपोर्टरने प्रश्न केला की, ‘आत्तापर्यंत तुमचं राज्य होतं पण येऊ घातलेल्या ह्या स्पर्धेला तुम्ही कसे सामोरे जाल?’ वॉल्ट डिस्नींनी म्हटलं, ‘स्पर्धेशिवाय कसं जगायचं हेच मला माहीत नाही’. स्पर्धेला ब्लेसिंग मानून त्यांनी काम सुरू ठेवलं आणि आज त्रेसष्ट वर्षांनंतरही जगात कितीही अॅम्युझमेंट पार्कस् आली तरी डिस्नीलँड आपलं अढळ स्थान अबाधितरित्या राखून आहे. आता डिस्नीलँडचं हे वर्चस्व का आणि कशामुळे टिकून आहे हा एक वेगळा विषय आहे. मॅनेजमेंट स्टडीज करणार्या प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक व्यवसायिकाने त्याचा अभ्यास केला पाहिजे.
जगातल्या अनंत सुंदर गोष्टींमध्ये निसर्गाने दिलेल्या अप्रतीम गोष्टी वगळून जर विचार केला तर त्यात वाफेच्या इंजिनची क्रांती असेल, विमानाचा शोध असेल, इलेक्ट्रिसिटीचा असेल, टेलिफोनचा असेल किंवा इंटरनेटचा आणि पुढे काय येणार आहे देव जाणे पण आयुष्याची घडी नीट बसवायला ह्या गोष्टी वरदान ठरल्या आणि त्यासाठी संपूर्ण मानवजात अनंतकाळापर्यंत हे घडवून आणणार्या निर्मात्यांची ऋणी राहील. अशाप्रकारे आयुष्यातल्या अनाठायी कष्टांचं उच्चाटन झाल्यावर वेळ मिळायला लागला, नॅचरली आणखी आनंद देणार्या गोष्टी निर्माण व्हायला लागल्या. आमच्या क्षेत्राचा, म्हणजे पर्यटनाचा विचार करायचा झाला तर हे क्षेत्रच मुळी जगतंय किंवा आमचं भविष्यच अवलंबून आहे ह्या मोकळ्या वेळेवर. इथेही जगभर क्रांती झाली ती वेगवेगळ्या अम्युझमेंट आयडियाज् राबविण्यावर, त्याच्या निर्मितीवर. उदाहरणादाखल नावंच द्यायची असतील तर कोरियाचं एव्हरलँड पार्क, मलेशियाचं गेंटिग, चायनाचं शेंझेन, अबुधाबीचं फेरारी वर्ल्ड, अमेरिकेतून उगम पावलेलं युनिव्हर्सल आणि माझं सर्वात आवडतं म्हणजे डिस्नीलँड. थेट परिकथेतल्या जगाची निमिर्र्ती करून आबालवृध्दांना आनंदाची वेगळी अनुभूती देणारं डिस्नीलँड जगातली कोणतीही पार्कस् विचारात घेतली तरी त्यात सर्वात अव्वल नंबरवर आहे ह्यात कोणाचंही दुमत असणार नाही. आता अमेरिकेत दोन, जपान, फ्रान्स, हाँगकाँग आणि चायनामध्ये प्रत्येकी एक अशी मिळून एकूण सहा डिस्नीपार्कस् जगात आहेत. डिस्नी पिक्चर्स, पिक्सार, डिस्नीलँड आदि अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींची निर्मिती झाल्यावर, त्यातलं यश दिसू लागल्यावर त्यासारख्याच दुसर्या गोष्टी निर्माण व्हायला लागल्या आणि स्पर्धेचं वातावरण तापायला लागलं. एकदा एका रीपोर्टरने प्रश्न केला की, ‘आत्तापर्यंत तुमचं राज्य होतं पण येऊ घातलेल्या ह्या स्पर्धेला तुम्ही कसे सामोरे जाल?’ वॉल्ट डिस्नींनी म्हटलं, ‘स्पर्धेशिवाय कसं जगायचं हेच मला माहीत नाही’. स्पर्धेला ब्लेसिंग मानून त्यांनी काम सुरू ठेवलं आणि आज त्रेसष्ट वर्षांनंतरही जगात कितीही अॅम्युझमेंट पार्कस् आली तरी डिस्नीलँड आपलं अढळ स्थान अबाधितरित्या राखून आहे. आता डिस्नीलँडचं हे वर्चस्व का आणि कशामुळे टिकून आहे हा एक वेगळा विषय आहे. मॅनेजमेंट स्टडीज करणार्या प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक व्यवसायिकाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. कोणत्याही व्यवसायातली स्पर्धा जीवघेणी न वाटता ते वरदान आहे हे जाणलं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने आपली मानसिकता तयार केली पाहिजे. मागच्या रविवारी आमच्या क्षेत्राशी संबंधित स्पर्धेविषयी मी लिहीलं होतंच आणि आमच्यापुरती त्याची उकलही करून दाखवली होती की ही स्पर्धा आम्हाला कशी मदत करतेय. प्रत्येक गोष्टीत ब्लेसिंग शोधण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे, त्याक्षणी ते जाणवत नाही पण त्यावर सखोल विचार केला, दूरदृष्टीने त्याकडे बघितलं तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला जाणवतो. म्हणतात नं, ‘आपल्याला दिसतो त्यापेक्षा देवाचा प्लॅन काहीतरी वेगळाच असतो, विश्वास ठेवावा आणि आत्मविश्वासाने मार्गक्रमणा करावी.’
स्पर्धा हे जर वरदान असेल, स्पर्धा ही जर संधी असेल तर तर मग पुढे काय? तसंच बसून रहायचं? ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ ही म्हण जरी जूनी असली तरी तिने वेळोवेळी दाखवून दिलंय की बाबा आयुष्य एवढं सोप्पं नाहीये. प्रत्येक घराघरात आईवडिलांचीही तीच इच्छा असते किंवा घोषा तोच असतो की उठ, उभा रहा, कोषातून बाहेर ये, धाव, काहीही कर पण यशाचं निशाण आपल्या खांद्यावर डौलाने फडकंव. आणि का नाही हो त्यांनी इच्छा करावी? आमच्या प्रत्येक ट्रेनिंग सेशनमध्ये एक गोष्ट सतत आम्ही ऐकमेकांना जाणवून देत असतो किंवा त्याचं विस्मरण होऊ देत नाही ती म्हणजे, ‘आपण जिवंत आहोत, आपल्या हातात काम आहे, देवाच्या कृपेने आपल्या आवडीचं काम आपल्याला मिळालंय, आपल्या हातून असं काम होऊ देऊया की आपण आपल्या आईवडिलांचा अभिमान बनलं पाहिजे’. आपण स्वत:लाच चेक करीत राहिलं पाहिजे की माझ्याकडून काही चुकीचं तर घडत नाहीये नं?
मागच्या आठवड्यात प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सची मीटिंग झाल्यावर आम्ही पुन्हा डेली रुटीनमध्ये गढून गेलो. एक दिवस कल्याणचे आमचे प्रीफर्ड सेल्स पार्टनर एस एस ट्रॅव्हल्सचे संजय पैठणकर सुधीरला भेटायला ऑफिसमध्ये आले. काहीतरी कामानिमित्त येणार असतील असा विचार सुधीरने केला. ‘आत्ताच मागच्या आठवड्यात तर भेटलो, लगेच भेटण्याचं काय कारण बरं’ म्हणत, सुधीरने मीटिंग सुरू केली. काही मॅनेजर्स मंडळींसह आम्ही वेगळ्या ठिकाणी एका स्ट्रॅटेजी मीटिंगला बसलो होतो, दोनेक तासांनी सुधीरचा फोन आला की, ‘संजय आणि त्याची एक टीम मेंबर आलीय अश्विनी शेवाळे, तिला घेऊन येतो तुमच्याकडे’. आम्ही सगळे इतके गढून गेलो होतो की सुधीरला ओके म्हटलं पण मनात आलं की, अरे यार! आता आला की व्यत्यय, अर्धा तास गेला आपला. पण मग स्वत:लाच सावरलं, ‘संजय एवढ्या दुरून आलाय तर त्याला वेळ द्यायलाच पाहिजे. लेट्स मीट’. सुधीरने संजयची आणि अश्विनीची ओळख करून दिली आणि म्हणाले की, ‘ह्या दोघांनी आपलं ३३३३चं चॅलेंज स्विकारलंय. अजून ह्या फायनॅन्शियल इयरचे नऊ महिने आहेत आणि त्यांनी त्यासाठी आवश्यक ती सर्व मेहनत करायची तयारी केलीय. संपूर्ण स्ट्रेटेजी प्लॅन तयार केलाय. काय करावं लागेल, कसं करावं लागेल, आपण जे आत्तापर्यंत करीत आलोय त्यात काय बदल करावा लागेल हा त्यांच्यापरीने अभ्यास करून ते माझ्याकडे आले होते आणि गेले दोन-अडीच तास आम्ही त्यावर चर्चा केली. अजून आपण काय काय करू शकतो, वीणा वर्ल्ड कॉर्पोरेट टीम तुम्हाला काय सपोर्ट करू शकते ह्याचा परामर्श घेतला आणि आता त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढलाय म्हणून म्हटलं की तुमच्याही कानी हे घालूया. संजय म्हणाला की, ‘प्रीफर्ड सेल्स पार्टनर्सची आपली कॉन्फरन्स झाली, आणि मी अस्वस्थ झालो, आपण जे करतोय त्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे हे जाणवलं. नुस्तं ऑफिसमध्ये बसून काही बदल घडणार नाही. तुम्ही सांगितलेली ३३३३ची मॅजिक फिगर खुणावत होती. मी माझ्या भावाकडे, सचिन पैठणकरकडे गेलो, त्याला विचारलं की मी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करू शकतो? आय मस्ट डू समथिंग! माझा भाऊ म्हणाला की, ‘असं वाटणं आणि त्याने अस्वस्थ होणं ही सुरुवात आहे. अरे ३३३३ नाही तर दहा हजार पर्यटक वर्षाला करण्याचं स्वप्न बघ आणि तू नजिकच्या भविष्यात पाच हजारला तरी पोहोचशील ह्याची गॅरंटी मी देतो’. त्याने माझं मनोबल वाढवलं. आता मी माझ्या बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सारून ह्याच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहे आाणि मनापासून प्रयत्न करणार आहे. तुम्हा सगळ्यांची साथ हवी’. संजयसोबत आलेली त्याची टीम मेंबर अश्विनी शेवाळे म्हणाली, ‘मागच्या कॉन्फरन्सच्या वेळी आम्हाला परफॉर्मन्स अवॉर्ड मिळालं नव्हतं आणि तेव्हाच मी सरांना सांगितलं होतं की हे चांगलं नाही झालं, आत्ता इथे ठरवूया की पुढच्या कॉन्फरन्समध्ये आपण अवॉर्ड घेऊन जाणारच. आणि ह्यावर्षी आम्ही अवॉर्ड पटकावलं. म्हणजे ठरवलं तर होतं मग ह्यावर्षी का नाही हे चॅलेंज स्विकारायचं? संजय सरांच्या एस एस ट्रॅव्हल्सची प्रगती झाली तर आमची होणार’. अश्विनी साधी मुलगी वाटली आधी मला पण ज्यावेळी ती बोलत होती त्यावेळी तीच्या डोळ्यातली आत्मविश्वासाची चमक मला जाणवली. तिचे शब्द अगदी मनाच्या गाभ्यातून येत होते आणि ह्या मुलीने ‘फायर इन द बेली’ म्हणजे काय हे आम्हाला जाणवून दिलं, एवढं की तिचा आत्मविश्वास बघून माझ्याच नव्हे तर तिथल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आसवं आली, आमची आयटीची वैभवी सोमण तर खूपच इमोशनल झाली. एखादी गोष्ट घडवून आणण्याची प्रामाणिक तळमळ आमच्यासमोर उभी होती. कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये अशी प्रामाणिक कळकळ असणारी, वचनबध्द आणि फुल्ली फोकस्ड टीम असेल तर काय बिशाद आहे कुणाची यशाच्या मार्गातला अडथळा बनण्याची? ‘ऑर्गनायझेशन वाढली तर प्रत्येकाला ग्रोथ आहे, त्यात प्रत्येकाचा विकास आहे’, हे आपण सर्वत्र ऐकतो पण मला थोडंसं ते उलट्या तर्हेने जास्त बरोबर वाटतं. अश्विनीसारख्या अनेकांनी बनलेली टीम जर त्यांच्या पॅशन आणि कमिटमेंटच्या जोरावर विकासाकडे जायला लागली तर त्यांच्यातला उत्साह आणखी वाढायला लागेल आणि मग संजयची एस एस ट्रॅव्हल्स वाढेल आणि एस एस टॅ्रव्हल्स सारखे आमचे अनेक पार्टनर्स जेव्हा वेगाने प्रगती करतील तेव्हा वीणा वर्ल्डचीही प्रगती होऊ शकेल. संजयची भेट जी आधी व्यत्यय वाटत होती ती आम्हाला खरंतर खूप काही शिकवून गेली.
आणखी एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे जेव्हा संजय हे प्रपोजल घेऊन आला तेव्हा त्यांना आपल्याकडून काय काय मदत करता येईल ह्याचा विचार आमची टीम करू लागली. म्हणजे एखादी गोष्ट चांगल्या हेतूने, प्रामाणिकपणे करण्याची जिद्द बाळगली तर चोहोबाजूने त्याला सपोर्ट करण्यासाठी हात मदतीला येतात. माझ्या बॉलीवूडप्रेमी मनाला एक डायलॉग आठवला, ‘अगर किसी चीज को दिलसे चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।’ ‘हिम्मत कर’ असं आपली बुजूर्ग मंडळी नेहमी आपल्याला सांगत असतात, आणि तीच हिम्मत करण्याची हिम्मत आपण ठेवायला हवी. जगात काहीही उलथापालथ होवो पण ‘फायर इन द बेली’ जर आपल्यात जिवंत असेल तर आपण कोणत्याही कठीणातल्या कठीण गोष्टीला सामोरे जाऊ शकतो. स्पर्धा म्हणजे सुसंधी आहे आणि आपल्या ‘फायर इन द बेली’ सह त्याला सामोरं जायचंय, त्याचं सोनं करायचंय, ते शक्य आहे, शंभर टक्के! एकदा एक मित्र दुसर्या मित्राला काळजीच्या स्वरात सांगतो, ‘अरे मेरा पूरा घर जलके राख हो गया, सिर्फ मैं बच गया’ हा मित्र त्याला म्हणतो, ‘अरे साले, फिर जला ही क्या है?’ छोटासा संवाद खूप मोठा अर्थ आपल्याला सांगून जातो. लेट्स नेव्हर फर्गेट, वुई हॅव इमेन्स पॉवर अॅन्ड वुई कॅन मेक इम्पॉसिबल पॉसिबल!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.