आम्ही आमच्या गेस्टना सरळ- सोप्या भाषेत विचारतो की, कुठे जावेसे वाटते आणि काय करावेसे वाटते तुम्हाला हॉलिडेवर? तुम्हाला बीच आणि समुद्रकिनारा जास्त आवडतो की डोंगर-दर्या आणि तिथले तलाव. काही जणं आठवडाभर समुद्रकिनारी राहणे पसंत करतात तर कोणाला डोंगराची आणि हिल स्टेशनची ओढ असते. एकदा ही आवड कळली की मनासारखा हॉलिडे कस्टमाईज करणे अगदी सोपे असते.
आमचे हॉटेल असे निवडा की झोपेतून उठता क्षणी बेडवरूनच समोरच्या लेकचं दर्शन घडायला हवं, खिडकीपर्यंत उठून जायचीसुद्धा गरज भासली नाही पाहिजे. ही मागणी होती ऑस्ट्रियाच्या हॉलिडेवर निघालेल्या आमच्या गेस्टची. आपले हॉलिडे डेस्टिनेशन आणि तिथले हॉटेल निवडताना आपल्या मंडळींच्या आवडी- निवडी लक्षात घ्याव्या लागतात. हॉलिडेसाठी वेगवेगळ्या हटके अशा जागा सुचवताना नक्की आपल्या गेस्टची आवड काय आहे हे समजून घेणे गरजेचे असते. मला तर वाटते की कुठलेच डेस्टिनेशन किंवा कुठलेच स्थलदर्शन अथवा हॉटेल हे अयोग्य नसते. आपल्या आवडी-निवडीनुसार राईट प्लेस फॉर राईट पर्सन सुचविता आले पाहिजे. पण त्याआधी आपल्याला ह्या हॉलिडेमधून नक्की काय साध्य करायचे आहे हे ठरविले पाहिजे. शहराच्या मधोमध राहून त्या शहराचा आविष्कार पाहायचा आहे, मुलांसाठी थीम पार्कमध्ये राहायचे आहे की थोडे निवांतपणे निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गसौंदर्याची मजा लुटायची आहे.
आम्ही आमच्या गेस्टना सरळ-सोप्या भाषेत विचारतो की, कुठे जावेसे वाटते आणि काय करावेसे वाटते तुम्हाला हॉलिडेवर? तुम्हाला बीच आणि समुद्रकिनारा जास्त आवडतो की डोंगर-दर्या आणि तिथले तलाव. काही जणं आठवडाभर समुद्रकिनारी राहणे पसंत करतात तर कोणाला डोंगराची आणि हिल स्टेशनची ओढ असते. एकदा ही आवड कळली की मनासारखा हॉलिडे कस्टमाईज करणे अगदी सोपे असते मग ती लेकच्या काठी असलेल्या रूममधून उत्कृष्ट व्ह्यु दिसायलाच पाहिजे ही मागणी का असेना...
मला स्वतःला तसे बीचेस, समुद्रकिनारा, पांढरीशुभ्र वाळू हे सर्व सुद्धा तितकेच आवडते जितके बर्फाच्छादित पर्वतरांगा, त्या पर्वतरांगांमध्ये दडलेले तलाव, वॉटरफॉल्स व छोट्या-छोट्या लाकडी घरांनी सजलेली सुबक गावं. जगातल्या अनेक लेकच्या काठी राहण्याचा योग मला माझ्या प्रवासात लाभला आणि असाच एक सर्वात संस्मरणीय अनुभव म्हणजे ऑस्ट्रियाच्या साल्झबर्गजवळच्या साल्झकामरगुट भागातलं वुल्फगान्गसी. इथे आमचे हॉटेल हे लेकच्या काठी तर होतेच पण हॉटेलचा स्विमिंग पूल हा चक्क लेकच्या मधोमध बांधला होता. मे महिना सुरू झाला तरी हवेत थंडी होती पण हा पूल हीटेड असल्याने त्यात उतरण्याची हिंमत आमच्यात आली. लेकमध्ये फ्लोटिंग पूल असल्याने आपण चक्क त्यात तरंगतोय असाच भास होत होता. सभोवती पर्वतरांगा दिसत होत्या आणि पाण्यात त्यांचे प्रतिबिंब एखाद्या चित्रासारखे स्पष्ट दिसत होते. साल्झकामरगुट भागात एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क शहात्तरहून अधिक लेक्स असल्याने ऑस्ट्रियातील हा निसर्गसौंदर्याने नटलेला भाग अतिशय अप्रतिम आहे. इथलेच एक सर्वात लोकप्रिय टूरिस्ट डेस्टिनेशन म्हणजे हॉलस्टॅटर सी. हॉलस्टॅटर सी लेकच्या काठी वसलेले हॉलस्टॅट गाव हे एक कार-फ्री व्हिलेज आहे. इथे गाड्यांवर बंदी असल्याने रस्त्यावर अगदी बिनधास्त पायी फिरता येते. हॉलस्टॅट हे इतके सुंदर दिसते की, ऑस्ट्रिया दाखविण्यासाठी बहुतेक फोटोजमध्ये हॉलस्टॅटचाच फोटो वापरला जातो.
सॉल्ट मायनिंगसाठी प्रसिद्ध साल्झकामरगुट भागात व ऑस्ट्रिया-जर्मनीच्या लेक्सना सी म्हणून ओळखले जाते. तसेच, बर्याच मोठ्या सरोवरांनासुद्धा सी म्हणतात. ३,७०,००० स्क्वे.किमीपेक्षा मोठा एरिया असलेले कॅसपीयन सी हे खरे म्हणजे एक लेक आहे. तसेच, जॉर्डन आणि इस्त्रायलमध्ये दिसणारे डेड सी हे सुद्धा एक लेकच आहे. गम्मत म्हणजे या लेकमध्ये आपण बुडू शकत नाही. इथे आपण आरामात तरंगतच राहतो. आपल्या इस्त्रायल- जॉर्डन हॉलिडेवर डेड सी ला भेट देण्यासाठी एक संपूर्ण दिवस तरी मोकळा नक्कीच ठेवा. हा जगातला सर्वात खोल हायपरसॅलाईन लेक असल्याने, हयातील पाण्याचा खारटपणा हा महासागरापेक्षा नऊ पटीने अधिक आहे. त्यामुळे या लेकमध्ये तरंगणे अगदी सोपे आहे. आपल्या इस्त्रायल-जॉर्डन हॉलिडेवर असताना हॅट, सन ग्लासेस् आणि आपले आवडते पुस्तक घेऊन पोहायला जा म्हणजेच तरंगत दिवस घालवायला निघा. डेड सी मधले सॉल्ट्स आणि मिनरल्स आपल्या औषधी गुणांमुळे अनेक कॉस्मेटिक्स आणि स्पा ट्रीटमेंट्समध्ये वापरले जाते. डेड सीच्या अवती-भवती असलेले वेलनेस ट्रीटमेंट रीसॉर्टस् आणि स्पास् जगभरातल्या टूरिस्टमध्ये प्रसिद्ध आहेत. डेड सी ला भेट दिलीत तर खरोखरच तुमचा हॉलिडे रीलॅक्सिंग व रीज्युविनेटिंग ठरेल ह्यात शंकाच नाही.
जगातले अनेक लेक्स हे आपल्या पारदर्शी, निळ्याशार किंवा पाचूसारख्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये मात्र एक अद्भुत दृश्य बघायला मिळते. वेस्टर्न ऑस्टे्रलियामधील एसपेरान्सा येथील रेचेर्चे बेटांच्या समूहांमध्ये निळ्याशार सदर्न ओशनजवळ आहे, एक गोड- गुलाबी रंगाचे लेक हिलियर. समुद्राच्या गडद निळ्या पाण्याजवळ, पांढरी-शुभ्र वाळू, त्याला लागून घनदाट हिरवे जंगल आणि त्याच्या मधोमध हे गुलाबी लेक. हे दृश्य पहाण्यासाठी सीनिक फ्लाईटचा अनुभव घ्यायलाच हवा. ह्या लेकच्या पाण्यातल्या काही बॅक्टिरीयामुळे पाणी गुलाबी दिसते. ह्या रंगबिरंगी ठिकाणी एखादे कांगारु उडी मारत आले की ऑस्ट्रेलिया हॉलिडेची एक संस्मरणीय आठवण तुमच्या गाठी जमा झालीच म्हणून समजा.
आपल्या एका बाजूला जर्मनी आणि एका बाजूला स्वित्झर्लंड असलेले लेक कॉनस्टंझ याचेच दुसरे नाव आहे बोडेनसी. र्हईन नदीचे पाणी या लेकमध्ये येऊन मिसळते. लेक कॉनस्टंझच्या सभोवती अनेक रीसॉर्ट टाऊन्स तयार झाली आहेत. उन्हाळ्यात वॉटर स्पोर्टस्साठी हा लेक संपूर्ण युरोपमध्ये प्रसिद्ध आहे. विंडसर्फिंग सेलिंग आणि पोहण्यासाठीसुद्धा हा लेक सर्वात उत्तम मानला जातो. या लेकभोवती बोडेनसी राडवेग मार्गावर सुमारे २६० किमीच्या सायकल मार्गाने लेकला घेरा घातलाय. लेक कॉनस्टंझची एक खासियत अशी आहे की ही जगातली अशी एकमेव जागा आहे, जिथे आपण जर्मनीत वास्तव्य करून सकाळी उठल्यावर दुपारच्या जेवणासाठी सायकल चालवत स्वित्झर्लंडला भेट देऊ शकतो आणि दुपारच्या चहा आणि एपल स्टडलचे सेवन करण्यासाठी आल्पस पर्वतरांगांचे फोटो काढत आस्ट्रियाला भेट देऊ शकतो. कधी स्वित्झर्लंड-जर्मनीला जायचा योग आला तर लेक कॉन्स्टंझ-बोडेनसीला सायकल प्रदक्षिणा घालत,चक्क एका दिवसात तीन देशांना भेट देण्याचा भन्नाट अनुभव नक्की घ्या. आपल्या सर्वात परिचयाचे लेक्स कदाचित असतील ते स्वित्झर्लंडचे. १५००हून अधिक तलावांसह स्वित्झर्लंड हे अखंड युरोपच्या ताज्या पाण्याच्या साठ्यापैकी सहा टक्क्यांचे हकदार आहे. म्हणूनच इथले पाणी पोहण्यासाठी तर उत्तम आहेच पण स्वित्झर्लंड आपल्या ड्रिंकिंग क्वालिटी वॉटरसाठीदेखील प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, स्वित्झर्लंडच्या कुठल्याही लेक्सचे पाणी आपण अगदी आरामात पिऊ शकतो. इथल्या इंटरलाकेन शहराचे नावसुद्धा दोन लेक्सच्यामध्ये असलेले शहर यावरुन इंटरलाकेन असे पडले. एका बाजूला लेक थुन आणि दुसर्या बाजूला लेक ब्रिएन्झ आणि ह्यांच्या मधोमध असलेलं सुंदर इंटरलाकेन टूरिस्टचे लोकप्रिय हॉलिडे डेस्टिनेशन ठरते ह्यात काहीच वाद नाही. इथल्या ल्युसर्न शहराला लाभले आहे, लेक विअरवाल्दर स्टॅटरसी किंवा सोप्या शब्दात लेक ल्युसर्न. स्वित्झर्लंडच्या या चौथ्या क्रमांकावरच्या लेकमध्ये अनेक स्टीमर बोट्स फिरताना दिसतात. यावर लेक क्रुझ आणि डिनर घेणे हे स्वित्झर्लंडच्या मस्ट डू स्थलदर्शनाचा भाग बनलेले आहे. इथल्या डोंगरांच्या आणि लेक्सच्याभोवती सर्व प्रकारची पर्यटनस्थळं निर्माण झाली आणि जगभरातल्या असंख्य लोकांना ही ठिकाणे आनंंद देण्याचा एक मार्गच बनली. असाच एक लेक म्हणजे फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या बॉर्डरवरचा लेक जिनेवा, ज्याचे खरे नाव आहे लेक लेमन. इथल्या दक्षिणेकडे आहे जगाचे डिप्लोमॅटिक शहर जिनेवा जे आपल्या लक्झरी शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. या लेकच्या दक्षिण किनार्यावर आहे, फ्रेंच स्पा टाऊन इवियाँ लेस बॅन्स. इथे आपण सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक स्पा आणि ब्युटी ट्रीटमेंट्स घेऊ शकतो. इथल्या इवियाँच्या फॅक्टरीमधून जगभरात इवियाँ ह्या मिनरल पाण्याचा पुरवठा होतो. जगातले एक सर्वात मोठे लेक म्हणजे रशियातील सैबेरियामधले लेक बायकल. लेक बायकल हा एक प्राचीन व जगातल्या सर्वात मोठ्या दहा तलावांपैकी एक तलाव. बेल्जियम देशापेक्षाही मोठे हे लेक बायकल जगातील सर्वात डीपेस्ट लेक आहे. ग्रेट बायकल ट्रेल नावाच्या हाइकिंग मार्गाने घेरलेले लेक बायकल हे अॅडव्हेंचर प्रेमी पर्यटकांचे आवडते स्थान.
जगातल्या ह्या सगळ्यात जुन्या तलावाला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा किताब घोषित करण्यात आलाय. ट्रान्स सैबेरियन ट्रेनचा प्रवास करताना लेक बायकलला भेट देणे सहज शक्य होते. लेक बायकलचे खरे सौंदर्य दिसते ते हिवाळ्यात. जेव्हा या लेकचे पाणी गोठून याचा बर्फ होतो आणि लेक बायकलचे रुपांतर हे जगातल्या सर्वात मोठ्या आईस रिंकमध्ये होते. ह्या बर्फावर जवळ-जवळ १५ टन वजनसुद्धा चालू शकते आणि बर्याच गाड्यासुद्धा चालवता येतात. लेक बायकल हा जगातला सर्वात पारदर्शक लेक असल्याने जवळ-जवळ ४०मीटर खोलवर जाऊन आपण पाण्याखालच्या जगाची झलक पाहू शकतो.
हिवाळ्यात गोठल्यावरसुद्धा लेक बायकलचा बर्फ हा सर्वात पारदर्शक असतो आणि पाण्याखालच्या आयुष्याची सुंदर झलक आपल्याला दिसते. अशा या फ्रोझन लेकवर आपण आईस स्केटिंग, विंडसर्फिंग सारखे अनेक स्पोर्टस् खेळू शकतो. हिवाळ्याची खरी मजा घेण्यासाठी जगातला एक उत्तम देश म्हणजे फिनलँड. सान्ताक्लॉस ला भेट देण्यापासून हस्की डॉग, रेनडियर राईड्ससारख्या अनोख्या अनुभवांबरोबर आपण नॉदर्न लाईट्स बघण्याचा अनुभवसुद्धा इथे घेऊ शकता. इथेच हिवाळ्यात लेक्स गोठले आणि पाण्याचे बर्फ झाले की या बर्फाच्या लाद्यांनीच इथे आईस हॉटेल तयार होते. अशाच एका लेकमध्ये आपण अनोख्या आईस फिशिंगची गाईडेड टूरसुद्धा घेऊ शकता. लेकच्या बर्फामध्ये एक फिशिंग होल ड्रिल केले जाते व त्यातून फिशिंग लाईन टाकून मासे पकडण्यासाठी आपण आपले लक ट्राय करू शकतो.
आपल्या हॉलिडेची स्टाईल कशीही असो, आपण अॅडव्हेंचर प्रेमी असाल, स्पा आणि वेलनेसचे प्रेमी असाल किंवा निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात तुम्हाला नुसताच आराम करायचा असेल तर जगातल्या अनेक लेक्सपैकी कुठल्या न कुठल्या लेकच्या काठी तुमचा परफेक्ट हॉलिडे नक्कीच तुम्हाला सापडेल!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.