एवढ्या आपत्तीमध्येही पर्यटक व एअरलाईनच्या सहकार्याने सहली ठरल्याप्रमाणे सुरू राहिल्या. आम्ही हुश्य म्हणत असतानाच एक ई-मेल माझ्या मेलबॉक्समध्ये धडकला. श्री. महाजन नावाच्या व्यक्तीकडून आला होता, चारच ओळी होत्या. अशा आपत्कालीन संकटाच्यावेळी जास्तीचे पैसे पर्यटकांकडून घेता मग जेव्हा हॉटेल आणि विमानाची भाडी कमी होतात तेव्हा पर्यटकांना पैसे परत करता का? उत्तर दिलं नाहीत तर नफ्यात वाढ होते असं समजायचं का? त्यांना मी उत्तर दिलं.
काल मी आणि माझे आई-बाबा बोलत बसलो होतो तेव्हा आम्ही विचार करीत होतो की, ऐन सीझनमध्ये असं का घडतं? पुलवामासारखे अटॅक, जेट एअरवेजचं कोसळणं, श्रीलंकेत अमानवी संहार होणं, फनी चक्रीवादळाचा तडाखा भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांना बसणं, हे एकापाठोपाठ काहीना काही चालूच आहे. दरवर्षी असा कसला तरी फटका बसतोच, व्हाय? एका सकाळी टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनची असिस्टंट मॅनेजर मधुरा पाटील जस्ट टू मिनिट्स करीत आत आली आणि चिंताग्रस्त चेहर्याने बोलू लागली. तिला म्हटलं, ह्यालाच बिझनेस म्हणतात. सगळं काही आलबेल आहे असं कधीच नसतं. बिझनेसमध्ये आपण येतो तेव्हाच ह्या सगळ्याची मानसिक तयारी करुनच यायचं. आपल्या मराठीत या परिस्थितीला चपखल बसणारं एक वाक्य आहे, बिझनेसमध्ये पडणं आपल्याला तो शब्द चुकीचा वाटतो. आपण त्यात करेक्शनही करतो, बिझनेसमध्ये येणं असं. पण मला वाटतं पहिलाच शब्द बरोबर आहे, बिझनेसमध्ये पडणं हे एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर अनेकदा घडत राहणार आहे. त्या पडण्याला न कंटाळता, न नामोहरम होता, परिस्थितीला दोष न देता सतत-दररोज नव्या उमेदीने पुन्हा उभं राहणं, दंड थोपटून कमॉन, वुई आर रेडी टू फेस एव्हरी चॅलेंज म्हणत आपली शक्ती, हुशारी, प्रामाणिकपणा, धैर्य, जिद्द या सगळ्याचा सहारा घेत त्या प्रत्येक पडण्यातून पुन्हा पुन्हा उभं राहणं हाच तर बिझनेस आहे, ज्याला हे कळलं तो यशस्वी झालाच म्हणून समजा. सगळं काही छान छान पद्धतीने चालू असणं हे रूटीन, त्या सगळ्या छान छान पणाचाही कंटाळा येऊ शकतो. कॉम्प्लेसन्सी म्हणजे आत्मसंतुष्टता-शिथिलता येऊ शकते, जी बिझनेसला अतिशय घातक, ज्याने प्रगतीच थांबू शकते. म्हणूनच परमात्म्यानेच बहुधा ही अडथळ्यांची शर्यत तयार केली असावी. बिझनेस ही मोठी अडथळ्यांची शर्यत पण आयुष्यसुद्धा तसंच आहे की, तिथेही कुठे सगळं आपल्या मनासारखं घडत असतं. परवाच एक सुविचार वाचला, कधी कधी आयुष्यात असे काही टर्नस् येतात की सुन्न व्हायला होतं त्यावेळी डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, देवा मला माहितीय हा तुझा प्लॅन आहे, फक्त ह्यातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती दे!. प्रत्येक अडचणीतून काहीतरी मार्ग सापडतोच. दररोज कितीतरी गोष्टींमध्ये आपण ते अनुभवत असतो, मग ते बिझनेसमध्ये असो किंवा पर्सनल आयुष्यात. अट एकच असते, मध्येच सोडून द्यायचं नाही. शेवटपर्यंत लढत रहायचं. मधुरा म्हणाली, गॉट इट, आज के लिये काफी हो गया। लेट्स फेस इट अँड कम आऊट ऑफ इट विथ शायनिंग कलर्स.
सो वुई आर ऑलवेज रेडी, अॅन्ड वुई ऑल हॅव टू बी! विषयाच्या अनुषंगाने, जेट एअरवेजवर जेवढ्या टूर्स होत्या त्या सगळ्यांना पर्यायी रीझर्व्हेशन मिळविण्यात आम्ही यशस्वी झालो. थँक्स टू एतिहाद, कतार, एमिरेट्स आणि ओमान एअरवेज. जरी नवीन तिकीटांची किंमत सव्वा लाखाच्यावर पोहोचली होती आणि जुन्या व नव्या तिकिटाच्या फरकाची रक्कमच नुसती साठ ते पंचाहत्तर हजार भरत होती, तिथे एअरलाईनच्या सहकार्याने, इतक्या वर्षांच्या चांगल्या संबंधांमुळे आम्ही ती खूपच कमी करू शकलो. पर्यटकांनी परिस्थिती समजून जे सहकार्य केलं त्यांचे मनापासून आभार. ह्यातील दोन सहली ऑलरेडी युरोपची धम्माल अनुभवून, ट्युलिप गार्डन्सची मजा घेऊन परतही आल्या. जेट एअरवेजवरच्या नेपाळच्या रद्द केलेल्या एप्रिलमधल्या टूर्स मे महिन्यात रॉयल नेपाळ एअरलाईन्सच्या सहकार्याने सुरू झाल्या. इथेही पर्यटकांनी तारीख बदलून घेण्यात चांगलं सहकार्य केलं. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या ज्या सहली सिंगापूर-हाँगकाँग- बँकॉकपर्यंत जेट एअरवेजवर होत्या, त्या ऑस्ट्रेलियन एअरलाईन क्वंाटासच्या सहकार्याने आणि एअर इंडिया, सिंगापूर एअरलाईन्स, थाई एअरवेज, कॅथे पॅसिफिकच्या मदतीने ठरल्यानुसार सुरू आहेत. अर्थात सर्वच ट्रॅव्हल कंपन्यांप्रमाणे आमचेही ओरिजिनल तिकीटाचे पैसे जेट एअरवेजकडे जमा आहेत, त्या रीफंडची वाट पाहणेच सध्या हातात आहे. म्हणूनच बिझनेसमध्ये पडणे हा शब्द चपखल बसतो. एकच आनंदाची गोष्ट की एवढी आपत्ती येऊनही ठरल्याप्रमाणे सर्व टूर्स सुरू आहेत. पर्यटक सुट्टीतल्या ज्या फॅमिली हॉलिडेकडे डोळे लावून होते त्या सहली कमीत कमी त्रासात पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे करता आल्या.
जेट एअरवेजचा इश्यू संपता संपता श्रीलंकेची भीतीदायक बातमी कानावर आली. नितळ निळाईचं- हिरव्यागार निसर्गाचं शांत-निवांत श्रीलंका असं भीषण आपत्तीत सापडेल हे स्वप्नातही खरं वाटलं नसतं. महिन्याभरातल्या श्रीलंकेच्या सर्व सहली पुढे ढकलाव्या लागल्या. एअरलाईनने पहिल्या दोन सहली पोस्टपोंड करण्यात सहकार्य केलं, पुढच्या सहलींविषयी चर्चा सुरू आहे. त्यातही काही श्रीलंकाप्रेमी पर्यटकांनी आम्हाला जायचंच आहे हा आग्रह केला आणि त्यांना ह्या परिस्थितीतही आम्ही सहल घडवली. चिंताजन्य परिस्थिती असतानाही आमचा भुषण गुप्ते ह्या श्रीलंकेच्या सहलीला टूर मॅनेजर म्हणून बेधडक जाऊन आला आणि आता अमेरिकेच्या सहलीला निघालाय. डेअर अॅन्ड अॅक्टवाले आमचे हे टूर मॅनेजर्स, त्यांच्यामुळे आज काश्मीरमध्येही सहली व्यवस्थित सुरू आहेत. तिथे वीणा वर्ल्डचा झेंडा डौलाने फडकवताहेत आमचे धैर्यशील टूर मॅनेजर्स जीगर वोरा, आसिफ शेख, सागर रगडे, संग्राम कारंडेे, मंगेश माने, अनिकेत आळेकर, रोहित निळेकर, वैभव पोळ, बालाजी कांबळे ह्या सर्वांचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे आणि त्यांच्या प्रती मी कृतज्ञ आहे. श्रीलंकेनंतर घोंघावत आलं फनी चक्रीवादळ, त्यामुळे अनेक विमानं कॅन्सल झाली. त्यात आपली नॉर्थ ईस्ट आसामकडे जाणारी एक सहल अडकली. नाईलाज होता, पण इंडिगो एअरलाईनने ही सहल दुसर्या तारखेला रीइन्स्टेट करुन दिली आणि ही मंडळी आता सहलीवर आहेत. सो, व्हेन देअर इज अ विल देअर इज अ वे!
जेव्हा जेट एअरवेज कोसळली त्यावेळी संबंधित पर्यटक आणि आम्हा पर्यटन कंपन्यांच्या पुढे मोठाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी म्हणजे गेल्या 21 एप्रिलला जो होगा सो होगा, लेट्स कीप काल्म हा लेख लिहून संपूर्ण परिस्थितीची कल्पना सर्वांनाच करुन दिली होती. अनिश्चिततेच्या वेळी नक्की काय घडतंय, कशा तर्हेने परिस्थिती हाताळली जातेय हे आपल्याकडूनच कळलं की उगाचच होणार्या चर्चा, तर्क-वितर्क ह्या गोष्टींना विराम मिळतो. आम्ही हुश्य म्हणत असतानाच एक ई-मेल माझ्या मेलबॉक्समध्ये धडकला. श्री. महाजन नावाच्या व्यक्तीकडून तो ई-मेल आला होता, चारच ओळी होत्या. अशा आपत्कालीन संकटाच्यावेळी जास्तीचे पैसे पर्यटकांकडून घेता मग जेव्हा हॉटेल आणि विमानाची भाडी कमी होतात तेव्हा पर्यटकांना पैसे परत करता का? उत्तर दिलं नाहीत तर नफ्यात वाढ होते असं समजायचं का? त्यांना मी उत्तर दिलं. सर्वप्रथम बिझनेसमध्ये नफा मिळवणं हे पाप नाही. तो मिळालाच पाहिजे. वीणा वर्ल्ड जस्ट सहा वर्षांची स्टार्टअप कंपनी म्हणता येईल जी नफ्याकडे वाटचाल करतेय. आर्थिकदृष्ट्या संस्था मग ती कोणतीही असो, सशक्त झालीच पाहिजे. त्यावर आपल्यासह अनेकजण अवलंबून असतात, आमच्या बाबतीत सांगायच झालं तर, आमची एक हजार पेक्षा जास्त जणांची टीम, तेवढेच आमचे सेल्स पार्टनर्स, त्याहीपेक्षा जास्त आमचे सप्लायर्स हे नेटवर्क सुरू राहिलं पाहिजे. आणि आम्ही जर चांगलं काम करीत असू तर पर्यटकांनाही एका चांगल्या पर्यटनसंस्थेचा पर्याय हवा असतोच की. मात्र चांगल्या संस्था सर्व दृष्टीने सशक्त असल्याच पाहिजेत, नाहीतर काय होतं हे आपण पेपरमध्ये रोज वाचतोच आहोत. दुसरा मुद्दा होता, पैसे कमी झाले तर पैसे परत करता का? अशी वेळ येण्याचं भाग्य खूपच कमी वेळा येतं पण जेव्हा जेव्हा अशी वेळ येते तेव्हा आम्ही पर्यटकांसाठी वेगवेगळी कॅम्पेन्स केली आहेत. कदाचित आपल्याला आठवतही असतील त्या जाहिराती, जेव्हा क्रुड ऑईलच्या किमती कमी झाल्या होत्या तेव्हा आम्ही आणलं होतं, ऑईल प्राईस डाऊन-टूर प्राईस डाऊन नंतर एकदा आणलं होतं एअरफेअर्स डाऊन-टूर प्राईस डाऊन असं काही सुदैवाने झालंच तर लगेच आम्ही सहलीच्या किमती अॅडजस्ट करतो. पर्यटकांनाही कधी कधी आश्चर्य वाटतं सहलीची किंमत कमी कशी झाली म्हणून. हा आमच्याकडे नेहमीचा म्हणजे अगदी रूटीनचा भाग आहे.
पर्यटकांना कमीत-कमी किमतीत जास्तीत- जास्त मोबदला देणे, पर्यटकांसाठी आपला भारतच नव्हे तर संपूर्ण जग अफोर्डेबल करणे ह्यासाठीच तर वीणा वर्ल्डचा जन्म झालाय. चार लाखांपेक्षा अधिक लोकं गेल्या पाच वर्षांत वीणा वर्ल्डसोबत सप्तखंडातल्या सहली करुन आले हा त्याचाच तर परिपाक आहे. मग जेव्हा, ऑईलच्या, हॉटेलच्या किमती कमी होतील तेव्हा आपण सहलीच्या किमती कमी करू हा झाला जर-तर चा भाग, बेभरवशाचाच. त्यावर तर आपण अवलंबून राहू शकत नाही. एक लीडर म्हणून आपण सहलीच्या किमती पर्यटकांसाठी कमी करून घेतल्या पाहिजेत. असोसिएट्स, सप्लायर्स, एअरलाईन्स, हॉटेल्स आणि पर्यटक सर्वच वीणा वर्ल्डच्या पाठीशी उभे राहिले आणि बिझनेस व्हॉल्यूम वाढला. ह्या वाढलेल्या व्हॉल्यूमच्या जोरावर आम्ही सुपरपीक सीझन संपला की जिथे-जिथे शक्य आहे तिथे-तिथे सर्व ठिकाणी सहलींच्या किमती ज्या-ज्या घटकांपासून बनतात म्हणजे एअरलाईन्स, हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट ह्या किमती कमी करून घेतो आणि त्या शांत-निवांत सीझनमध्ये बिझनेस जनरेट करतो. त्याच सहली, त्याच सोयी पण किंमत मात्र नेहमीपेक्षा खूप कमी असल्याने पर्यटकांचा फायदा होतो, त्यांचे भरपूर पैसे वाचतात. एअरलाईनच्या अदरवाईज रीकाम्या जाणार्या सीट्स त्यांना रेव्हेन्यू मिळवून देतात. सुट्टीचा मौसम संपल्याने हॉटेल्सच्या लो सीझनमध्ये त्यांचं रोलिंग चालू राहतं. आमचंही इन्फ्रास्ट्रक्चर बीझी राहतं आणि आमचे टूर मॅनेजर्सही. दो गूना नाही चक्क चार गूना फायदा. विन-विन-विन-विन सिच्युएशन, जी प्रत्येक बिझनेसमनला निर्माण करावी लागते. आमचा- तुमचा-त्यांचा-ह्यांचा असा सर्वांचा फायदा करीत आम्ही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पर्यटन सुरू ठेवलंय. दॅट्स कॉल्ड बिझनेस... लगे रहो!
सुपरपीक सीझन संपल्यावर येणार्या शांत- निवांत, अधिक चांगल्या तर्हेने पर्यटनस्थळांचा आनंद देणार्या सहलींचं जुलै ऑगस्ट कॅम्पेन लाँच केलंय आणि पर्यटकांनी दे दणादण बुकिंगला सुरुवातही केलीय. कारण फक्त ह्या दोन महिन्यांमध्येच ह्या कमी किमतीतल्या सहली आहेत. सो, चलो, बॅग भरो, निकल पडो! हॅप्पी जर्नी!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.